मिसळपाववर नव्या स्त्री विभागाच्या स्थापनेची घोषणा आपण सर्वांनी वाचलीच असेल. त्याबद्दल ही माहिती.
इथे कथा, काव्य, चर्चा, पाककृती, भटकंती, कलादालन असे विभाग आहेतच. त्याशिवाय नव्यानी लिहिणार्या स्त्रियांना उत्तेजन मिळण्यासाठी व फक्त स्त्रियांचे असे जे विषय असतात त्यासाठी हे वेगळे दालन सुरु करण्यात येत आहे. यातून प्रोत्साहन मिळून मिसळपाववर स्त्री-सदस्यांचा सहभाग अधिकाधिक वाढेल अशी अपेक्षा आहे.
'लिहित्या व्हा' या कार्यशाळेची माहिती देताना काही स्त्री सदस्यांच्या चर्चेत असा एक प्रस्ताव पुढे आला की एक बंदिस्त दालन स्त्री सदस्यांसाठी सुरू व्हावे. अगदी घरगुती वस्तू असोत, खास कलागुण असोत, प्रकृतीच्या तक्रारी असोत, स्वैपाकातल्या साध्या साध्या गोष्टी असोत, किंवा इतर कुठल्या व्यावहारीक गोष्टींबद्दलची माहिती असो, यासाठी स्त्रियांना एक व्यासपीठ हवे आहे. ज्या स्त्रियांना राजकीय, आर्थिक किंवा अन्य चर्चांमधे रस नसतो पण इतर स्त्री सदस्यांशी इंटरअॅक्शन आवडेल, त्या मोकळेपणाने अशा दालनात वावरू शकतील. अश्या वेगळ्या दालनामुळे आपल्या नेहमीच्या माहितीतल्या ४ जणींऐवजी अजून १०० जणींचे मत जाणून घेता येइल. फक्त स्त्रियांना रस वाटेल अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या मुख्य पानावर सर्वांना अपील होणार नाहीत. उदाहरणार्थ; मध्ये आलेला एक 'फ्रॉक'चा धागा. त्यावरची शिवणाची चर्चा होउच शकली नाही. त्यावरच्या थट्टा-मस्करीला विरोध नाही, पण तरीही त्यात काहीजणींचा उत्साह मावळतो आणि इतर काहीजणींची काही छोट्या गोष्टी शिकण्याची संधीही जाते. "अबोली" हे दालन अश्या सर्व गोष्टींना व्यक्त होण्यासाठी स्थापन करण्यात येत आहे.
हा विभाग केवळ स्त्रियांसाठी आहे. इथली व्यवस्था मिसळपावच्या स्त्रीसंपादिकांकडे असेल. पुरुष संपादकांना या विभागात प्रवेश नाही. अर्थातच नीलकांत व प्रशांत अपवाद आहेत. तांत्रिक बाबींसाठी त्यांना यावे लागेलच.
ज्या स्त्रियांना या दालनात येण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी काही नियम.
१. मंचाचे सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रथम मिसळपावचे सदस्यत्व घ्यावे. नंतर सदस्येने आपली माहिती (आपला मिसळपाव आयडी, खरे नाव, फोन नंबर, इमेल, राहण्याचे गाव, देश) ही माहिती मिपावरच्या संपादिकांना पाठवावी. ही माहिती केवळ संपादिका आणि नीलकांत यांच्यापुरतीच मर्यादित राहील, व इतर कुणालाही दिली जाणार नाही. (ही माहिती इथल्या व्यक्तिगत निरोपाऐवजी कुणाला इतर इमेल-आयडीवरुन पाठवायची असेल तरीही चालेल.)
२. माहितीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्याकडून फोन केला जाईल. फोन कोण करेल याबद्दल आधी इमेलवरुन संपर्क करुन कळवले जाईल.
३. ज्या आयडींची खात्री देता येत नाही वा वाटत नाही, अशा आयडीज वा इतर कोणी स्त्रीआयडीरुपे असल्या तरी पूर्ण शहानिशा केल्याशिवाय अॅक्सेस देता येणार नाही.
४. इथे वावरताना आपण एकमेकींना मदत करण्यासाठी आलो आहोत हे लक्षात ठेउन प्रतिक्रिया द्याव्यात. साहजिकच आक्षेपार्ह विधाने, शिवराळ भाषा असणारी कुठलीही प्रतिक्रिया चालवून घेतली जाणार नाही.
५. अगदी सामान्य मानवी आयुष्याशी निगडीत असलेले साधे विषय, चर्चाप्रश्न चालतील. पण अगदीच एकोळी धागे किंवा कॉपी पेस्ट नको.
६. टोकाची वैयक्तिक टीका, जातिय / धार्मिक तेढ वाढवणारे लेखन व प्रतिसाद आणि अश्लील लेखन नको.
७. विभागातले विषय वा पोस्टी ह्याबद्दल विभागाबाहेर न बोलणे हे पथ्य प्रत्येकीने पाळावे.
या दालनात येउ इच्छिणार्या मैत्रिणींना सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकीने कोणी आपली चेष्टा करील किंवा अशी कसलीही भीती न बाळगता, इथे व्यक्त व्हावे. तुमच्या सहभागातूनच हा उपक्रम यशस्वी होणार आहे.
स्त्री विभागात किती आणि कोण सदस्या (व त्यांचे आयडी) आहेत हे संपादिका आणि नीलकांत सोडून बाकी कुणालाही सांगितले जाणार नाहीत.
स्त्रियांसाठी नीलकांताने खास विभाग सुरू करून दिल्याबद्दल त्याला धन्यवाद आणि सहकार्याबद्दल इतर संपादक सल्लागारांचे आभार!
डिस्क्लेमरः
वेगळा विभाग हा स्त्रियांना त्यांना रस असलेल्या गोष्टीत फक्त स्त्रियांशी बोलायचे असल्यास सोयीचे जावे यासाठी सुरु केला आहे. शिवाय लेखनाला प्रोत्साहन मिळून मुख्य पानावरदेखिल सहभाग वाढावा हा उद्द्येश आहे. पण वेगळा स्त्री विभाग सुरु झालयाने सर्व महिलांनी तिथेच काय ते लिहावे अशी जबरदस्ती नाही. तसा अर्थ कृपया कोणी घेउ नये. कुणाला आपली माहिती द्यायची नसेल तर त्या सदस्या मुख्य पानावर नेहमीप्रमाणे लिहित राहू शकतातच.
मिसळपावची धोरणे बाकी नेहमीप्रमाणेच राहतील. स्त्रीविभागामुळे त्यात काहीही बदल होणार नाहीत.
वाचने
21151
प्रतिक्रिया
113
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद.
धन्यवाद !
शुभेछा
धन्यवाद .
शुभेच्छा !
शुभेच्छा
धन्यवाद.
In reply to शुभेच्छा by आतिवास
सर्व मिपाकरणींना या विभागाच्या भरगोस यशासाठि मनःपुर्वक शुभेछ्चा
वेगळा विभाग पटलेला नाही.
स्वागत
उगाच मला काही मुद्दे लिहावे वाटत आहेत..
या धाग्यावर लिहिणार नव्हतो.
In reply to उगाच मला काही मुद्दे लिहावे वाटत आहेत.. by पिलीयन रायडर
बॅट्या
In reply to या धाग्यावर लिहिणार नव्हतो. by बॅटमॅन
ते ठीके, उभयपक्षी भावनाओंको
In reply to बॅट्या by पैसा
नाही नाही...
In reply to या धाग्यावर लिहिणार नव्हतो. by बॅटमॅन
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद
In reply to नाही नाही... by पिलीयन रायडर
शुभेच्छा
फक्त आणि फक्त असे विषय जे
In reply to शुभेच्छा by तिमा
उलट टोटल लेख वाढतील आणि जे
In reply to फक्त आणि फक्त असे विषय जे by पिलीयन रायडर
एक शक्यता अशीही आहे..
In reply to उलट टोटल लेख वाढतील आणि जे by अग्निकोल्हा
काही स्त्रीया इथल्या
In reply to एक शक्यता अशीही आहे.. by पिलीयन रायडर
शुभेच्छांसाठी धन्यवाद!
In reply to काही स्त्रीया इथल्या by अग्निकोल्हा
ब्रम्हास्त्र आले असल्याने आयुधे खाली ठेवतो... व दयेची याचना करतो
In reply to शुभेच्छांसाठी धन्यवाद! by पैसा
धन्यवाद!
In reply to ब्रम्हास्त्र आले असल्याने आयुधे खाली ठेवतो... व दयेची याचना करतो by अग्निकोल्हा
हम्म थोडक्यात ...
In reply to धन्यवाद! by पैसा
मी विचारवंत नाही
In reply to हम्म थोडक्यात ... by अग्निकोल्हा
नक्किच सांगतील!
In reply to मी विचारवंत नाही by पैसा
एक शक्यता !
In reply to शुभेच्छांसाठी धन्यवाद! by पैसा
जर का हा तुम्ही म्हणता तसा संकुचित ग्रुप राहिला तर तो आपोआपच बंद पडेल याची जाणीव आहे.माफ करा
In reply to एक शक्यता ! by तर्री
बिल्ला क्रमांक २१६५९. पण त्या
In reply to माफ करा by अग्निकोल्हा
असं 'थेट' विचारु नये असं एकदा
In reply to बिल्ला क्रमांक २१६५९. पण त्या by विश्वनाथ मेहेंदळे
मी कधी म्हणालो बे? मी तर उलट
In reply to असं 'थेट' विचारु नये असं एकदा by प्यारे१
कृपया निवेदन नीट वाचावे.
In reply to काही स्त्रीया इथल्या by अग्निकोल्हा
एकतर प्रगल्भ म्हणजे नक्की काय
In reply to कृपया निवेदन नीट वाचावे. by कवितानागेश
स्त्रियांचा विभाग सुरु
In reply to एकतर प्रगल्भ म्हणजे नक्की काय by अग्निकोल्हा
छान.
In reply to स्त्रियांचा विभाग सुरु by कवितानागेश
विभाग स्त्रियांसाठी आहे.
In reply to छान. by अग्निकोल्हा
ओह ..?
In reply to विभाग स्त्रियांसाठी आहे. by कवितानागेश
गिल्फूकाका -१
In reply to ओह ..? by अग्निकोल्हा
तुम्ही निवेदन नीट वाचत नाही
In reply to ओह ..? by अग्निकोल्हा
हत्तिच्या इतकच होय
In reply to तुम्ही निवेदन नीट वाचत नाही by कवितानागेश
ए मौ जौदे णा ... कुठे त्या
In reply to विभाग स्त्रियांसाठी आहे. by कवितानागेश
हाण्ण
In reply to एकतर प्रगल्भ म्हणजे नक्की काय by अग्निकोल्हा
नीलकांत धन्यवाद!
'अबोली' नावात मला काहीसा
म न मा न सी मा न सी
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by मस्त कलंदर
+१११११ मानिनी आवडलं .....
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by मस्त कलंदर
'अबोली' नावात मला काहीसा
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by मस्त कलंदर
मला तरी अबोली, सौम्या अशी
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by पुष्करिणी
खरं आहे. अबोली ह्या नावात
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by पुष्करिणी
स्वामिनीकस आहे.. चालेल का या
In reply to 'अबोली' नावात मला काहीसा by मस्त कलंदर
.
ओक्के! नो प्रॉब्लेम!
In reply to . by दादा कोंडके
अय्या ... म्हणजे माझा
In reply to . by दादा कोंडके
म्हणजे पहा किती पार्शॅलिटी ते
In reply to अय्या ... म्हणजे माझा by जेनी...
दादा
In reply to . by दादा कोंडके
अब तुमने बोलाच है तो...
In reply to दादा by निनाद मुक्काम …
असो
In reply to अब तुमने बोलाच है तो... by दादा कोंडके
कितीदा विमनस्क मनाने कोर्ड्या
In reply to असो by अभ्या..
हेहेहेहे
In reply to कितीदा विमनस्क मनाने कोर्ड्या by शुचि
आपण क्वीट बाबा
In reply to हेहेहेहे by अभ्या..
शुभेच्छा
छान..
+१
In reply to छान.. by उपास
माहेरी पुरषांची पंगत आधी व
हीहीही.
In reply to माहेरी पुरषांची पंगत आधी व by शुचि
शुचितै डायेटवर असेल, तिला नको
In reply to हीहीही. by कवितानागेश
शुचि, अबोली मधे
In reply to माहेरी पुरषांची पंगत आधी व by शुचि
धन्यवाद! नक्की येणार
In reply to शुचि, अबोली मधे by पुष्करिणी
तुमच्या साखिंना अबोलीचं सांगू
In reply to धन्यवाद! नक्की येणार by शुचि
नावाबद्दल परत विचार करु.
अबोलीस शुभेच्छा!
विभाग अत्ता तर कुठे सुरु
In reply to अबोलीस शुभेच्छा! by पुष्करिणी
खरं सांगायचं तर "भावनाकल्लोळ"
कशावरुन स्त्री विभागातील
In reply to खरं सांगायचं तर "भावनाकल्लोळ" by शुचि
म्हणूनच "written" गोष्टींसाठी
In reply to कशावरुन स्त्री विभागातील by कवितानागेश
एक खूप सुंदर वाक्य वाचले होते
In reply to म्हणूनच "written" गोष्टींसाठी by शुचि
कशावरुन फुटतील?
In reply to कशावरुन स्त्री विभागातील by कवितानागेश
कधी कधी मला निनावी धागा
In reply to कशावरुन फुटतील? by विश्वनाथ मेहेंदळे
कधी कधी मला निनावी धागा टाकण्याची सोय हवी असे वाटते.+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११इथे पैजेचा आणि सिद्ध करण्याचा
In reply to कशावरुन फुटतील? by विश्वनाथ मेहेंदळे
"कशावरुन फुटतील?" हा प्रश्न
In reply to इथे पैजेचा आणि सिद्ध करण्याचा by कवितानागेश
त्याची स्पष्ट कल्पना
In reply to "कशावरुन फुटतील?" हा प्रश्न by विश्वनाथ मेहेंदळे
अगदी सहमत .... शुचि सारखाच
.
In reply to अगदी सहमत .... शुचि सारखाच by जेनी...
काँडु काका बदलाहो हे वाक्य ..
In reply to . by दादा कोंडके
ग्लिफ यांनी 'ओपननेस फार
'ओपननेस फार महत्वाचा आहे'
In reply to ग्लिफ यांनी 'ओपननेस फार by कवितानागेश
आपल्या सूचनांबद्दल आणि उणीवा
In reply to 'ओपननेस फार महत्वाचा आहे' by अग्निकोल्हा
शुभेच्छा!!
+१
In reply to शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी