काही जुन्या लेखनांचे धागे

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
6 Feb 2013 - 4:13 pm
गाभा: 

नमस्कार
मी मिपावर नवीनच आहे .

इथे काही सुंदर (/ "प्रसिध्द") जुन्या लेखांच्या कवितांच्या इतर लेखनाच्या लिन्क्स देणार का ?

माझ्या बरोबर इतर नवीन सभासदांना फार मदत होईल .
(तसेच जुन्या सभासदांना जुन्या लेखनाचा पुनःप्रत्यय घेता येइल )

प्रतिसादा मधे लेखनाचे नाव , थोडक्यात वर्णन , आणि लिन्क असे अपेक्षित आहे .

(अवांतर :
१) चांगले लेखन शोधण्याचा स्वतः प्रतत्न केला पण साहित्य ४२४ पाने , चर्चा १८६ पाने , काव्य २४६ पाने , पाककृती ७४ पाने ... इतकं सगं लेखन सर्फ करणे जरा अवघड आहे ... त्यापेक्षा जाणकार रसिक वाचकांचे आवडते लेखन आधी वाचावे असा विचार आला म्हणुन हा धागा !
२) हा धागा काथ्याकुट मधे टाकणयाचे एकमेव कारण म्हणजे काथ्याकुट हा मिपावरील सचिन तेन्डुलकर आहे असे आमचे गेल्या काही दिवसात ठाम मत झाले आहे .
अति-अवांतर :
३) संविधानात "असे धागे काढु नयेत " अशी तरतुद न सापडल्या मुळे धागा काढण्याचे धाडस करीत आहे ...राग नसावा :)
)

---
आपली कृपाभिलाषि
राष्ट्रकाकु गिरीजा

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Feb 2013 - 4:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सगळ्यात पहिले हे वाचा.

खरं सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं?
..याचं उत्तर आहे हा दुवा म्हणजे. :)

विजुभाऊ's picture

1 Oct 2013 - 9:02 pm | विजुभाऊ

आपली कृपाभिलाषि
राष्ट्रकाकु गिरीजा

अरेरे... गिरीजा भाऊ तुम्ही चक्क स्वतःला काकू म्हणवून घेताय.
हा केवळ वस्त्रप्रावरणे वापरून वरवरची रंगरंगोटी की आणखी काही?

प्रसाद गोडबोले's picture

6 Feb 2013 - 4:17 pm | प्रसाद गोडबोले

हे " शास्त्रीय संगीत" हाय तरी काय राव ? ( भाग १) : शास्त्रीय संगिताविषयी थोडक्यात ओळख : http://www.misalpav.com/node/23783

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

6 Feb 2013 - 4:19 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मग हे वाचा.

कवी सुरेश्चन्द्रा जोशि यांची "मोकलाया दाही दिश्या" ह्या अजरामर कवितेपासून सुरुवात करू.

http://www.misalpav.com/node/6332

आणि ते शेवटी राष्ट्रकाकू ऐवजी राष्ट्रकाकूबाई लिहिल्यास अजून बरें ;) =))

अभ्या..'s picture

6 Feb 2013 - 4:28 pm | अभ्या..

=))

यसवायजी's picture

12 Feb 2013 - 8:51 pm | यसवायजी

परती-किर्या वाच्च्चून तं जेव्नाच सर्रथ्क जाल्ल. =))
अशे अजुन ३-४ धागे द्या की. उप्कार हुतील.

पिलीयन रायडर's picture

6 Feb 2013 - 4:38 pm | पिलीयन रायडर

गविंच काहीही वाचा...

इनिगोय's picture

6 Feb 2013 - 4:39 pm | इनिगोय

ही एक सुरेख कथा.

आणि यापैकी कोणताही लेख उघडून वाचायला सुरूवात करा.. मिपावरचा खजिना!

प्रसाद गोडबोले's picture

23 Feb 2013 - 1:12 pm | प्रसाद गोडबोले

सध्या हेच वाचत आहे !!

इतक्या सुंदर लेखकाची आणि लेखनाची ओळख करुन दिल्याबद्दल विषेश आभारी आहे :)

मन१'s picture

6 Feb 2013 - 5:02 pm | मन१

माझ्या वाचनखुणा पहा.
पाकृ, कविता सोडून २००७ पासूनचं सारं सापडेल. कित्येक धागे, त्यांचे मथळे, दिसायला थिल्लर वाटतील पण त्यातही चांगले, माहितीपर प्रतिसाद सापदल्याकारणाने त्याम्नाही वाचनखुणेत साठवलय.
.
भावनिक, रंजक, उद्बोधक, खुसखुशीत, धो धो हसायला लावणारं असं सारं काही मिपावर नक्कीच सापडेल.
.
अजून एक गोष्ट म्हणजे, एकाच लेखकाचे पाच्-सात धागे अत्यंत आवडल्ले, तर मी ते सारे धागे वाखू मध्ये टाकत नाही. वाचनखुणेत लेखक दिसतोय ना, मग जौअन सरळ त्याचे सर्व लेखन वाचतो.
.
थोडक्यात, माझ्या वाचनखुणा पहा एवढच सांगणं आहे.
.
गविचे अपघारंजथरारक धागे, रामदास ह्यांच्या काही न बोलता बरच काही सांगून जाणार्‍या कथा, तात्यांची जुनी व्यक्तिचित्र, राजेश घासकडवी ह्यांचे खुसखुशीत लेख, चाफा ह्यांच्या काही गुदगुल्या करणार्‍या गोष्टी तर काही भयकथा, पेशव्याच्या प्रासंगिक का असेना पण भन्नाट बुधवारच्या कविता, टार्‍यानं केलेली सह्यांची विडंबनं आणि काढलेले कोथळे, इंडिआना जोन्स वल्लीचं ऑथेंटिक माहितीनं ठासून भरलेलं प्रामुख्यानं ऐतिहासि वगैरेसंदर्भातील सारच गद्य लिखाण(प्रतिसाद्+धागे) सुहास डॉट डॉट ह्यांच्या (अति)वास्तववादी आणि आणी त्रास देत रहाणार्‍या कथा/वर्णने; थत्ते,विकास, पंगा, आजानुकर्ण ह्यांचे सविस्तर प्रतिसाद
.
धमु,डान्या, आंद्या ह्यांचे जुने धागे(आंद्यानं केलेली साधय घटनांची जिवंत, सुंदर वर्णनं, डान्रावांनी खेळाबद्दल लिहिलेलं खूप काही, धमुच्या ढाकची बहिरीच्या उचापती).
.
परा ह्यांची चित्रपट नवनवीन चित्रपटाअंची ओळख करुन देणारी परिक्षणं, फार एन्ड रावांनी भिकार चित्रपटाअंची केलेली धमाल परिक्षणं, जे पी मॉर्गन वगैरेंचे खेळाविषयीचे धागे.
.
सध्या सुरु असलेली टीम गोवा ह्यांची मालिका .श्रामोंचे आपल्या आसपास चादरीखाली काय जळतय ह्याचा उल्लेख करणारे थेट, स्पष्ट पण संयत धागे, बिका ह्यांचे अरबस्थानातील अनुभवाअंचे रोचक वर्णन "माझं खोबार". विनायक प्रभू ह्यांचे सुरुवातीच्या काळातील क्रिप्टिक पण धमाल्/रंजक(आनि कधी अक्धी दाहक) धागे.
.
(न थकता वाचण्याचा दम असेल तर)५०फक्त ह्यांच्या कथा मालिका
हे सर्व तर "लै भारी" आहेच; पण ह्याशिवायही खूप खूप काही चांगलं आहे मिपावर*(पाकृ आणी कवितांकडे तर वळलोही नाही). त्यामुळच मी मिपाचा प्रामुख्यानं वाचकच आहे. प्रतिसाद देणं ,हिरिरिनं सहभागी होणं येत नसलं तरी जमेल तसं हे सगळं वाचत होतोच. त्यावेळी कित्येक आवडलेल्या गोष्टींना दाद द्यायची राहून गेली. प्रतिसाद देणं झालं नाही, म्हणून फारसा कुणाशी वैयक्तिक परिचयही झाला नाही.
.
*प्रचंड कचराही आहे; पण तो दुर्लक्षून पुढं जावं हेच उत्तम.

आदूबाळ's picture

6 Feb 2013 - 5:31 pm | आदूबाळ

तुम्हाला मिपाचा अधिकृत इतिहासकार घोषित करायला पाहिजे!

इतिहासकार म्हणायचं तर खव-खफ वरचं 'लोकसाहित्य'पण घ्यावं लागेल.

अधिकृत प्रवक्ता म्हणून चालेल काय हो भाषाभक्षक?

बांवरे's picture

7 Feb 2013 - 4:00 am | बांवरे

मन१ - धन्यवाद !
गिरिजा, धाग्याचा मलाही उपयोग होणार आहे.

सहज सापडलेला हा एक प्रतिसाद. असे असंख्य उत्तमोत्तम प्रतिसादही आहेत वाचण्यासारखे.

आणि हा लेख.

मेवेंचा हा लेख अफलातूनच

:)
हा अफलातून आय्डी सध्या कुठे गायबलाय?

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Feb 2013 - 9:59 pm | बिपिन कार्यकर्ते

सध्या हे बघा.... पुरून उरलात तर पुढचे देईन....

रामदास
http://www.misalpav.com/user/185/authored

चतुरंग
http://www.misalpav.com/user/344/authored

नंदन
http://www.misalpav.com/user/17/authored

श्रावण मोडक
http://www.misalpav.com/user/640/authored

आळश्यांचा राजा
http://www.misalpav.com/user/4013/authored

विनयक प्रभू
http://www.misalpav.com/user/1235/authored

भडकमकर मास्तर
http://www.misalpav.com/user/418/authored

मस्त कलंदर
http://www.misalpav.com/user/3586/authored

चित्रगुप्त
http://www.misalpav.com/user/9160/authored

चिंतातुर जंतू
http://www.misalpav.com/user/7338/authored

मेघना भुस्कुटे
http://www.misalpav.com/user/37/authored

पिवळा डांबिस
http://www.misalpav.com/user/401/authored

नितिन थत्ते
http://www.misalpav.com/user/3083/authored

विकास
http://www.misalpav.com/user/48/authored

३_१४ विक्षिप्त अदिती
http://www.misalpav.com/user/305/authored

संजोप राव
http://www.misalpav.com/user/26/authored

पिवळा डांबिस's picture

8 Feb 2013 - 1:45 am | पिवळा डांबिस

अवो बिकाशेठ,
ते तात्या राहिले की वो!!!
त्यांच्यामुळेच तर मिसळपाव हे मिसळपाव झालं!!
त्यांची लिंक द्या ना...

शुचि's picture

8 Feb 2013 - 2:06 am | शुचि
बांवरे's picture

13 Feb 2013 - 6:29 am | बांवरे

धन्यवाद बिपिन.

पुण्याचे वटवाघूळ's picture

7 Feb 2013 - 10:09 pm | पुण्याचे वटवाघूळ

हारापरी हौताम्य हे ज्यांच्या गळा साजे या धाग्यात टग्यांनी लिहिलेला http://www.misalpav.com/comment/75942#comment-75942 हा प्रतिसाद म्हणजे अगदीच अफलातून.याच्यासारखा दुसरा प्रतिसाद बघितला नाही.

पैसा's picture

7 Feb 2013 - 10:35 pm | पैसा

गवि

http://www.misalpav.com/user/12865/authored

नगरीनिरंजन

http://www.misalpav.com/user/9157/authored

क्रान्ति

http://www.misalpav.com/user/3804/authored

बिपिन कार्यकर्ते

http://www.misalpav.com/user/322/authored

मेघवेडा

http://www.misalpav.com/user/6468/authored

ब्रिटिश

http://www.misalpav.com/user/1509/authored

धनंजय

http://www.misalpav.com/user/12/authored

आणि जे आयडी आता नाहीत पण त्यांनी उत्कृष्ट लेखन पूर्वी केलेलं आहे,

http://www.misalpav.com/user/0/authored

जयंत कुलकर्णी

http://www.misalpav.com/user/9199/authored

रणजित चितळे

http://www.misalpav.com/user/11520/authored

मितान

http://www.misalpav.com/user/10137/authored

इन्द्र्राज पवार

http://www.misalpav.com/user/9279/authored

aparna akshay

http://www.misalpav.com/user/9349/authored

अवलिया (नाना चेंगट) कधी कधी अगदी घायाळ करणारं लिहितात. विकास, क्लिंटन यांचा अभ्यासू वावर, ५० फक्त याच्या दीर्घकथा, स्पा च्या भयकथा. वाचाल तितकं थोडं.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Feb 2013 - 9:27 am | बिपिन कार्यकर्ते

स्पा लेखन करतो? छ्या! कैप्पण फ़ेकू नकोस! कधी दिसलं कसं नाही? ;)

पैसा's picture

9 Feb 2013 - 9:44 am | पैसा

त्याच्या "ते" मालिकेचे भाग आले रे आले की मिपा बंद पडायचं म्हणून सध्या त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. :P

प्रमोद देर्देकर's picture

30 Sep 2013 - 2:52 pm | प्रमोद देर्देकर

"स्पा च्या भयकथा" मला direct लिन्क द्याल काय ?

जानकी's picture

7 Feb 2013 - 11:04 pm | जानकी

या धाग्याबद्दल धन्यवाद! वाचनखूण साठवली आहे.

बहुगुणी यांचंही बरंचसं लिखाण वाचनीय असतं, मला आवडलेल्यापैकी काहींचे निवडक दुवे:


वन फिश अ‍ॅट अ टाईम (मिपा दिवाळी अंक)
ही दीर्घकथा
एअरपोर्ट ही दीर्घकथा
शब्द शब्द जपून फेक

अटरली बटरली

बाप माणूस
मुक्त मी
देस परदेस

निदान नमस्कार तरी कराल?
निरोप नाही, फक्त आभार
उन्मन क्षण

उन्नत क्षण

यूं तो हैं हमदर्द भी ही दीर्घकथा

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Feb 2013 - 9:41 am | पुण्याचे वटवाघूळ

मला स्वतःला फारसे चांगले लिहिता येत नाही पण मिसळपाववरील अगदी प्रत्येक लेख आणि प्रतिसाद गेल्या दोन वर्षाच्या सदस्यकाळात मी वाचले आहेत.त्यावरून सांगतो की काही क्षेत्रांवरील पुढील सदस्यांचे लेख आणि प्रतिसाद खूप आवडतात (जरी सगळी किंवा अजिबात मते पटली नाहीत तरी)

चित्रपट परिक्षणः परिकथेतील राजकुमार
क्रांतिकारकः सर्वसाक्षी
व्यक्तिचित्रे: विसोबा खेचर
भारतीय संस्कृती: नाना पेठकर, योगप्रभू
राजकारणः नितीन थत्ते, श्रीगुरूजी, विकास, क्लिंटन
स्त्रीयांचे प्रश्नः ३_१४ विक्षिप्त अदिती
संख्याशास्त्रः राजेश घासकडवी
अर्थशास्त्रः क्लिंटन, प्रदीप
पाककृती: प्रभाकर पेठकर, सानिका स्वप्नील, रेवती, खादाड अमिता, अपर्णा अक्षय

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Feb 2013 - 9:42 am | पुण्याचे वटवाघूळ

भारतीय संस्कृती: नाना चेंगट असे वाचावे नाना पेठकर नाही.

पुण्याचे वटवाघूळ's picture

8 Feb 2013 - 9:50 am | पुण्याचे वटवाघूळ

नाडी: शशिकांत ओक
विडंबनः परिकथेतील राजकुमार
धर्म-देवपूजा: शुचि
स्त्रीविरोधः युयुत्सु (पाशवी धागा आठवतोय ना?)
ज्योतिष: युयुत्सु
भूतकथा: प्रियाली
भारतीय राज्यघटना: ऋषिकेश, कॉमन मॅन
शेतकर्‍यांचे प्रश्नः गंगाधर मुटे

तसेच विश्वनाथ मेहंप्रतिसाद, पंगा यांचे प्रतिसाद एकापेक्षा एक असतात.

(स्वतःचा प्रतिसाद एडिट करता येत असता तर नवा प्रतिसाद लिहावा लागला नसता :( )

पुण्याचे वटवाघूळ's picture

12 Feb 2013 - 1:20 pm | पुण्याचे वटवाघूळ

आणखी काही:

काश्मीर/ पाकिस्तान/ अणुबॉम्बः सुधीर काळे
बुध्दीबळः चतुरंग
क्रिकेटः सुधीर काळे
डावे विचारः रमताराम
विमाने/ विमान अपघात/ मृत्यू: गवि

तसेच पर्नल नेने मराठे यांची भाषा आणि टारझनदादांची 'न' ला 'ण' म्हणण्याची अदा अगदीच जबरदस्त.

रमताराम's picture

13 Feb 2013 - 12:40 pm | रमताराम

डावे विचारः रमताराम>> मेलो. काका मला वाचवा... कोणतेही का चालतील, अगदी बिकाकाका किंवा श्रावणकाकासुद्धा चालतील.

पप्पु अंकल's picture

12 Feb 2013 - 7:30 pm | पप्पु अंकल

गणपा, जागुताई यांना विसरलात काय?

छोटा डॉन's picture

8 Feb 2013 - 10:14 am | छोटा डॉन

वर अनेकांनी दिलेल्या सर्व लिंक्स उपयुक्त आहेत.
वैयक्तिक आम्हाला आवडणारे लेखक म्हणजे तात्या, जेपी मॉर्गन, बिका, रामदासकाका, प्रभुमास्तर, हलकट नान्या (हा त्यांचा आयडी नाही, ते 'विशेषण' आहे), केसुगुर्जींची काही जुनी विडंबने, आता लेटेस्ट आलेली चीनी प्रवासवर्णने, विलासरावांची ब्राझिल सफर वगैरे वगैरे ...
लेख वगैरे ठिक आहे, पण इथे खरी मज्जा आहे ती प्रतिसादात.

हे सर्व असले तरीही मिपावर ... नव्हे आख्ख्या आंतरजालावर माझ्यापेक्षा महान, मोठ्ठा, समंजस, लोकप्रिय, मातब्बर लेखक असेल असे वाटत नाही. माझे लिखाण म्हणजे उदाहरणार्थ माईल स्टोन म्हणावे असे आहे. आजकाल ते इतके महान होत आहे की पब्लिकला समजत नाही म्हणुन मी लिहणेच बंद केले आहे.
आजकाल मी स्वतःपुरतेच लिहीत असतो, असो, अवांतरास इथे पुर्णविराम ;)

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Feb 2013 - 11:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एका जुन्या मित्राची आठवण झाली. तो ही उत्तम राजकीय, सामाजिक प्रकारचं लेखन करत असे. त्याच्या स्वाक्षर्‍याही रोचक असत. मला सगळ्यात आवडायची ती:
तुम्ही पत्रकार आहात? ... कोणत्या पक्षाचे?
हे त्याचं लेखन: http://www.misalpav.com/user/680/authored

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Feb 2013 - 11:51 am | बिपिन कार्यकर्ते

ती लिंक टाळली होती मुद्दाम! :(

ऋषिकेश's picture

8 Feb 2013 - 2:37 pm | ऋषिकेश

+१ :(

इनिगोय's picture

8 Feb 2013 - 5:44 pm | इनिगोय

अशीच ती अजून एक :(

मन१'s picture

8 Feb 2013 - 2:40 pm | मन१

इंदौरी मराठीवरची त्यांची कमेंट्री मस्तच.
"बाबा चिल्लाउ नकोस" हे वाक्य डोक्यात फिट्त बसलय.
.
ती वर दिलेली सहीसुद्ध भन्नाट.
RIP

योगप्रभुंचा हा प्रतिसाद वाचा.
http://www.misalpav.com/comment/356877#comment-356877

प्रकाश घाटपांडे's picture

8 Feb 2013 - 11:53 am | प्रकाश घाटपांडे

आनंद घारे यांचा मिसळपाववरील पहिले वर्ष हा लेख एक मिपावरील एक चांगली स्मृती आहे

दादा कोंडके's picture

8 Feb 2013 - 2:45 pm | दादा कोंडके

मला भुरळ पडली होती ती वस्तुनिष्ठ, कर्क पासून ते आत्ता आत्ता पर्यंत पंगा यांच्या प्रतिसादाची. फक्त प्रमाणिकपणे व्यक्त होण्यासाठी मिसळपावचा खूप कमी जण वापर करतात त्यापैकी ही मंडळी होती. स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद येण्यासाठी दुसर्‍यांच्या लाळघोटेपणा-खुषामती करणं, प्रतिक्रिया देताना वैयक्तीक ओळख, फायदा याचा विचार करणारे खूप आहेत. अर्थात हे चुकीचं नाही पण कसल्याश्या फुटकळ व्यक्तीचित्रणावर पुलं नंतर तुम्हीच वगैरे म्हणणं म्हणजे कहर झाला. :)

मन१'s picture

8 Feb 2013 - 5:53 pm | मन१

म्हणूनच कचरासुद्धा प्रचंड आहे असं मी वरती म्हटलं.
पब्लिक बहुतांश वेळेस इथले धागे म्हणजे ग्रुप चॅटिंग सुरु असल्यासारखं वापरते.
पाच सात महिन्यांपूर्वी कुणीतरी कुठलातरी जोक कुणा दुसर्या आयडीच्या नावानं सांगितलेला असतो.
त्याचे एकमेकाम्ना टाळ्या देत कोड लँग्वेज मध्ये बोलल्यासारखं सुरु असतं.
त्यातले रेफेरन्सेस काहिच समजत नसल्यामुळे मलाही त्या भंकसगिरीचा वैताग येतो.
.
शिवाय हल्ली अधिकच जाणवू लागलेली गोष्ट म्हणजे पुरेसे वाचक/प्रतिसाद काउंट हवे असतील तर अधिकाधिक थिल्लर, उथळ,बाष्कळ लिहिता आलं पाहिजे.

प्रसाद गोडबोले's picture

8 Feb 2013 - 6:33 pm | प्रसाद गोडबोले

शिवाय हल्ली अधिकच जाणवू लागलेली गोष्ट म्हणजे पुरेसे वाचक/प्रतिसाद काउंट हवे असतील तर अधिकाधिक थिल्लर, उथळ,बाष्कळ लिहिता आलं पाहिजे.

>> हे माझ्या लिखाणात व्हायला लागलं म्हणुन तर हा धागा काढला मी. ....उगाच काहीच्या काही फालतु थिल्लर काथ्याकुटत , बाष्कळ्पणा करण्यापेक्षा .....चांगले वाचन केलेलें बरें :)

दादा कोंडके's picture

12 Feb 2013 - 8:29 pm | दादा कोंडके

खरं आहे.

आणखी फक्त प्रतिसाद देणार्‍यांचं म्हणाल तर मिपावर (किंवा कुठल्याही संकेतस्थळावर) तेच युनिक आहेत. बाकी अगदी पाकृपासून ते कलाकुत्रींपर्यंत सगळीकडे तेच ते आणि तेच ते. वेगळेपण असेल तर ते प्रतिसादात. अशोक पाटील आणि इंद्रराज पवार यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अभ्यासपुर्ण असायच्या.

तुला माझ्या मनातलं कस कळतं रे ?

मनीषा's picture

8 Feb 2013 - 4:57 pm | मनीषा

उपयोगी धागा.
वाचनखूण साठवते आहे.

चिगो's picture

8 Feb 2013 - 7:14 pm | चिगो

+१..

शुचि's picture

9 Feb 2013 - 3:30 am | शुचि

http://www.misalpav.com/user/21434/authored

"आज फिर जीनेकी तमन्न है" या गाण्याचे रसग्रहण वाचून तर पार वेडावून गेले होते.

ओ काकू किती जणांनी तुमच्या विनंतीवरून, प्रयत्नपूर्वक खोदकाम करुन जुने जुने धागे दिले. जरा त्या धाग्यांबद्दल फीडबॅक द्या की. की तुम्ही वाचलेच नाहीत ते?

श्री गावसेना प्रमुख's picture

12 Feb 2013 - 9:19 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांनी फक्त स्वतची ओळख करुन देण्यासाठी एव्हढा आटापीटा केलेला दिसतोय.

प्रसाद गोडबोले's picture

12 Feb 2013 - 1:07 pm | प्रसाद गोडबोले

गावसेना प्रमुख ,
प्रत्येक काथ्याकुट वर वाद / राडा केलाच पाहिजे असा काही नियम आहे का ?

स्वतःची ओळख काय करुन देणार मी ? इथे भले भले लिहिणारे आहेत ...त्यांच्या पुढे मी फारच लहान आहे .
( संकलक म्हणुन ओळख होणार असेल तर मला हरकत नाही त्याची )

आता तुम्हाला कळत असेल तर हे पहा
Appreciation and critisism are works of second rate mind - G.H. Hardy .( अ म्यॅथेम्यॅटीशियन्स अपोलोजी )
सो मी सध्या फक्त वाचत आहे ...जिथे अ‍ॅप्रिसियेशनची उर्मी टाळता येत नाही तिथे प्रतिसाद देत आहे .

आता ह्याही उपर , तुम्हाला हा धागा टोचत असेल तर मी संध्याकाळी बॅकअप घेवुन धागा डीलीट करेन . ओके ?

आपली स्पष्टवक्ती
गिरीजा तांबे

संजय क्षीरसागर's picture

12 Feb 2013 - 1:19 pm | संजय क्षीरसागर

काही लोक आधी कमेंट टाकतात आणि मग विचार करतात (किंवा तोही करतात का नाही काय माहिती)

श्री गावसेना प्रमुख's picture

12 Feb 2013 - 6:57 pm | श्री गावसेना प्रमुख

खुपच विचारी आहात हो तुम्ही(आम्ही जे बोलतो ते समोर मागाहुन विचार नाही)

श्री गावसेना प्रमुख's picture

12 Feb 2013 - 7:04 pm | श्री गावसेना प्रमुख

ते जाउ द्या ह्या बद्दल तुमच काय म्हणन आहे ते सांगा ,मनावर घेतल्याशिवाय तुम्हाला चैन नाही पडत वाटते.
बिचारे खोदकाम करुन दमले,आणी तुम्हाला ह्याच काहीच नाही होय.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 10:11 am | परिकथेतील राजकुमार

शुचिमामीने सदर लेखीक काकू म्हणले आहे, म्हणजे सदर लेखीका ह्या वयाने देवा पेक्षा दोन दिवसांनी लहान असाव्यात. आता ह्या वयोमानाच विचार करता 'फिडबॅक'ला वेळ लागणारच.

आता ह्या वयोमानाच विचार करता 'फिडबॅक'ला वेळ लागणारच

अवांतर : एनी वन इन्टरेस्टेड इन ब्लाइन्ड डेट ?

हाहाहा ..... परा तुझे टोमणे कळतात हो मला म्हातारीला :)

परिकथेतील राजकुमार's picture

12 Feb 2013 - 7:29 pm | परिकथेतील राजकुमार

शुचिमामी तू अजून यंग अँड ब्युटीफुल आहेस हो. ;)

शुचि's picture

12 Feb 2013 - 7:35 pm | शुचि

:) ..... थँक्स रे :)

प्रसाद गोडबोले's picture

12 Feb 2013 - 1:01 pm | प्रसाद गोडबोले

धन्यवाद शुचि !

मी क्हरच सर्वांचीच आभारी आहे मदती बद्दल !
वाचत आहे हळु हळु
रामदास ह्यांचे लेखन चाळत आहे सध्या .( श्रामों चा बंदा आणि खुर्दा : समर्थ हाही लेख वाचनात आला आहेच )
शिवाय http://www.misalpav.com/comment/457936 हे फारच भारी वाटले .

मागे एकदा "निल्या म्हणे " एका विडंबन कवितेत(हे रोज कविता करणारे ) म्हणाला होता " मायबोली अन मिसळपावचे मैत्रीण होतय रे "
पण इथे तर लोक लईच भारी सीरीयसली लेखन करीत आहेत असे दिसते
वाचायला वेळ लागणारच .

पुनश्च एकवार सर्वांचे आभार !!

सुहास..'s picture

12 Feb 2013 - 8:49 pm | सुहास..

सुबक च नाव नसल्याने महाप्रचंड त्रास झाल्याने हा प्रतिसाद लिहायला प्रेरित झालो आहे .......

सुबक चा " चवीने खाणार त्याला "

ब्रिटिश ची " आत्महत्येवरील कविता "

त्या ट्वाळ पर्‍याची " मनस्वी "

मनोबा चा स्साला, आईने बनविलेल्या पाकृ वरचा लेख ,

धम्या ने लिहीलेला " बारमध्ये भेटलेला एक माणुस "

दुष्मने-जान अदिती ने लिहीलेले " नाशिक-पुणे " प्रवास वर्णन .

रंगाशेठ ला भेटलेली " नेक्स्ट डोअर गर्ल "

नंद्याच्या तर... साल्याला ( धरून झोडला पाहिजे )

त्यो मदन्या नुसता फोटो काढत फिरतो आजकाल !

जागु ताईं ची आख्खी सिरीज ( काय मस्करी आहे का भाज्यांचे चाळीस प्रकार म्हणजे )

बिकांचा टिंब आणि मग नंतर स्साला रडवणार " भिकारी मातेच सत्य "

केसूगुर्जींच चापट पारून ही न समजणारी चापट, क्रान्तीताई आणि मिक्का च्या गझल ,

ररां च आर्थिक-ए-सामाजिक-ए-भंडावुन सोडणार लिखाण !

गणपा आणि पेठकर काकांच्या पाकृ !!

अरे , काय वाचलंस मिपा तु....

नसल वाचलसं तर ...एकदा श्रामोंच्या " अश्या तश्या नोंदी " वाच, आणि त्या नंतर पम्याची डायरी पण वाचायला घे.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Feb 2013 - 9:36 am | बिपिन कार्यकर्ते

हे आवर्जून लिहिल्याबद्दल धन्यवाद रे... विशेषतः पम्याची डायरी!

:)

काही नवोदित आणि काही जुने राहिलेच .

फट्टु म्हणजेच धन्या ने गाण्यांची काढलेली ईभ्रत ( गान समीक्षण/ परीक्षण या माणसाने आंजावर आणला असे म्हणावे लागेल.)

फारएन्ड या आयडी ने लिहीलेले चित्रपट परीक्षण ( हाफिसातून अजिबात याचे धागे ऊघडु नयेत हि विनम्र सुचना )

स्पावड्या हा धारपांची शैली उचलुन भयकथा लिहितो हे मान्य , पण त्याची फोटो, ३डी, अ‍ॅनिमेशन लिहिण्याची स्वता शैली ( आपल्याला आवडते ब्वा )

सोक्या ( सोत्रि) च्या चावडी वरच्या गप्पा आणि तांत्रिक विषय सोप्पे करून लिहीलेले सर्वकाही

ईंडियाना वल्ली जोन्स ने लिहिलेल्या भटकंती

तात्याने केलेली व्यक्तीचित्रे सगळेच सांगतील, पण हाच तात्या कधे मधे प्रतिसाद, कौल, चर्चा आणि चपलांमधुन ही छाप सोडुन जातो. ( मायकल जॅक्सन च्या धाग्याची लिंक डकवा रे कोणीतरी :) )

प्रमोद देर्देकर's picture

30 Sep 2013 - 3:27 pm | प्रमोद देर्देकर

"पम्याची डायरी!"

क्रुपया direct link द्यावी.

विजुभाऊ's picture

26 Sep 2014 - 12:26 pm | विजुभाऊ

ही एका वाटचालीची कथा http://misalpav.com/node/18704

श्रावण मोडक's picture

13 Feb 2013 - 11:06 am | श्रावण मोडक

हे लिहिणाऱ्या सुहासचेही काही लेखन आवर्जून वाचावे असेच आहे. त्याने दोन भिन्न आयडीने लेखन केले आहे. कुणी तरी काढा रे तेही बाहेर... :-)

पैसा's picture

13 Feb 2013 - 11:12 am | पैसा

अगदी सुरुवातीलाच मनोबाने केली आहे. एकाने लिहिलेले सहसा दुसर्‍या कोणी रिपीट केले नाही तर त्यात भर आणखी टाकली आहे.

स्पा's picture

13 Feb 2013 - 11:20 am | स्पा

श्रा. मो

वाशाचे काही विनोदी लेख वाचून मी हापिसात गडबडा लोळलेलो आहे =))

http://www.misalpav.com/node/19918 हा कहर आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Feb 2013 - 11:34 am | बिपिन कार्यकर्ते

प्रच्चंड सहमत! अतिशय पोटेन्शियल असलेला माणूस आहे सुहास!

वेगवेगळ्या लिंक दिलेल्या सर्वांचे आभार

रामदास काका , विसोबा खेचर काहिहि वाचा .
पर्‍याचं अर्धवट लिखान वाचुन भरपूर शिव्या द्या :-/

गौरव जमदाडे's picture

13 Feb 2013 - 11:12 am | गौरव जमदाडे

धन्यवाद गिरीजा !

सर्वांचे आभार !

मिपावर नवीन असाल्यामुळे ह्या धाग्याची फार मदत झाली.

आणि लेखनाबरोबर त्यावरील प्रतिसादही वाचण्यासारखे आहेत.

मृत्युन्जय's picture

13 Feb 2013 - 11:22 am | मृत्युन्जय

प्रसिद्ध आणि आवडत्या लेखकांच्या यादीत माझा साधा नामोल्लेखसुद्धा करावासा तुम्हाला वाटला नाही ना? अरे हाच दिवस बघायचा होता तर आम्ही स्वातंत्र्य चळवळीत कशासाठी लढलो मग?

तसा मी प्रसिद्धीसाठी कधीच हपापलेला नव्हतो. माझ्या 'विचारांचा उकीरडा' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्याचे ठरले होते. मी विनयाने पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. आता वाटते, की ती चूकच झाली.

असो, जेव्हा मला साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार मिळेल तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल. पण नकोच. कुणाच्या नजरेत भरण्यासाठी पुरस्कार हवाच कशाला?

आज लोक मला विसरलेत, पण एकेकाळी 'राया माझा धोतरातच' या नाटकाला लोकांनी केवढे डोक्यावर घेतले होते, याची तुम्हा मुलांना कल्पना नाही. काही कुचाळांनी 'शीर्षक अपुरे आहे. काही शब्द राहिलाय का?' असेही खवचटपणे विचारले, पण मी सांगितले, की 'जग जरी प्यांट वापरायला लागले असले तरी माझ्या रायाने अद्याप धोतर सोडलेले (वापरायचे) नाही. म्हणून नाटकाचे नाव 'राया माझा धोतरातच' असे आहे. शीर्षक तिथेच संपले आहे.' त्यानंतर या नाटकाने मागे वळून पाहिले नाही.

'वाचा आणि नाचा' (बालसाहित्य), 'एक तरी शिवी अनुभवावी' (गहन आध्यात्मिक साहित्य), 'भुंकले कोण..थुंकले कोण' (समीक्षा), 'रेझर इरेझर' (विज्ञानकथा), 'कारल्याच्या मांडवात' (काव्यसंग्रह), 'रस्त्यातले रहस्य' (रहस्यकथा), या माझ्या काही उल्लेखनीय साहित्यकृती. बाकी नावे यादीत बघून सांगेन.

असो. देवा त्यांना माफ कर. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून हे लोक माझी सही घ्यायला येतील तेव्हा माझ्या मनात काही पूर्वग्रह राहू नको दे...

******************************************************************************

योगप्रभूंचा वरील प्रतिसाद अशक्य आहे. हा प्रतिसाद ज्या धाग्यावर आहे तो धागाच इथे महत्वाचा ठरावा:

http://www.misalpav.com/node/19057

पैसा's picture

13 Feb 2013 - 11:38 am | पैसा

योगप्रभू अशक्य माणूस आहे! त्याचेही लेखनच नव्हे तर प्रतिसाद लै भारी असतात.

या धाग्यावर आणखी एक लिंक मिळाली.

http://www.misalpav.com/node/14173

श्रावण मोडक's picture

13 Feb 2013 - 11:49 am | श्रावण मोडक

हाहाहाहा... :-)

रेवती's picture

4 Mar 2013 - 10:01 pm | रेवती

ही ही ही ही ही. ह्या ह्या ह्या.
हा धागा बघायचा रहिला म्हणून इतके दिवस तुमचा प्रतिसाद वाचनात आला नव्हता.

कपिलमुनी's picture

10 Sep 2014 - 12:35 pm | कपिलमुनी

+१

प्रसाद गोडबोले's picture

10 Sep 2014 - 12:55 pm | प्रसाद गोडबोले

विनयक प्रभू
http://www.misalpav.com/user/1235/authored

हे लेखन वाचायला मिळाले .... कसले भन्नाट लिहितात हे ... तुफान !!

हा एक धागा मुद्दाम देतो आहे , चर्चा, त्याचा समारोप , हसु ही यायच आणि बर ही वाटायच ..

http://misalpav.com/node/3201

खास नव मिपाकरांसाठी ..

मुद्दा रेटेकर

स्वप्नज's picture

22 Sep 2014 - 5:52 pm | स्वप्नज

ज्याक ड्यानियल्स्(?) यांच्या सर्प लेखमालेचा दुवा आहे का कुणाकडे..??

एस's picture

22 Sep 2014 - 5:57 pm | एस
स्वप्नज's picture

22 Sep 2014 - 6:00 pm | स्वप्नज

धन्यवाद....

विजुभाऊ's picture

26 Sep 2014 - 12:24 pm | विजुभाऊ

हे बघा http://misalpav.com/node/25166
आणि हे http://misalpav.com/node/26437 तसेच हेही http://misalpav.com/node/26361
झालंच तर ही आख्खी सिरीज http://misalpav.com/node/6675
आनि जेनीबै बरोबर मिळून लिहीलेली http://misalpav.com/node/25357

बाबा योगिराज's picture

30 Sep 2015 - 6:45 pm | बाबा योगिराज

हेच तर हव होत. लगेच वाखु सठवाली.

दमामि's picture

30 Sep 2015 - 7:13 pm | दमामि

वा! खजिनाच सापडला!

द-बाहुबली's picture

30 Sep 2015 - 8:34 pm | द-बाहुबली

वाखुसा.

diggi12's picture

16 Jun 2022 - 1:11 am | diggi12

मस्तच