Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सन्जोप राव on Mon, 11/16/2009 - 19:10
  • Log in or register to post comments
  • 21389 views

Book traversal links for माझे खाद्य-पेय जीवन-३

  • ‹ माझे खाद्य-पेय जीवन-२
  • Up
  • माझे खाद्य-पेय जीवन-४ ›

प्रतिक्रिया

Submitted by प्रदीप on Mon, 11/16/2009 - 19:21

Permalink

पुण्यात

आलो की जेवायचे कुणाकडे हे हा लेख वाचून मी ठरवून टाकले आहे. कारण 'चवीने खाणार्‍याबरोबर भोजन केले की मोक्ष मिळतो' असे वेदात (३.अ.२८०९१) मध्ये वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 11/18/2009 - 12:42

In reply to पुण्यात by प्रदीप

Permalink

पुलंच्या

पुलंच्या लेखाणाची तिय्यम दर्जाची रटाळ आणि सुमार नक्कल करण्याचा स्तूत्य उपक्रम. वाहवा वाहवा तोडलत भौ....जीओ ...लगे रहो Image removed. जय महाराष्ट्र.....
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Tue, 03/16/2010 - 12:06

In reply to पुलंच्या by विजुभाऊ

Permalink

बट...बट

देअर इज एलीफंट इन द रूम .. ब्रावो विजुभाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Mon, 11/16/2009 - 19:22

Permalink

नेहमीप्रम

नेहमीप्रमाणेच रुचकर! >>कवठाची चटणी तशीच खावी आणि तीही त्या कवठाच्या भकलात घेऊन. देवा! नुसत्या आठवणीनेच =P~ =P~ =P~
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 11/16/2009 - 19:46

Permalink

फारच रुचकर

फारच रुचकर लेख! अख्ख्या मसूराची उसळ करताना फार शिजवून त्याचे गरगट करणे ही माझी खासियत होती. हल्ली जरा शिजवताना कधी थांबायचे हे कळते आहे. डिंगरी/मुळ्याच्या शेंगांची साधी पटकन होणारी कोशिंबीर हाही छान प्रकार आहे. मुळ्याच्या कोवळ्या शेंगा बारीक चिरून, कच्चे तेल, गोडा मसाला, तिखट, मीठ, साखर, लिंबूरस. बाकी पालेभाज्यांबद्दल काय बोलावे? तो तर अशक्त बिंदू आहे सगळ्यांचा. भारतात असताना कुठली भाजी करू? असा प्रश्न पडत नाही. उलट भाजी रिपिट होत नाही असे वाटते. इथे मेल्या त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, मग बटाटा हीच पर्यायी भाजी असते. छे बुवा! फारच आठवणी येताहेत भाज्यांच्या!:) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Tue, 11/17/2009 - 13:27

In reply to फारच रुचकर by रेवती

Permalink

रूचकर

आख्ख्या मसुराला लसणाची फोडणी देऊन मस्तपैकी उसळ-वरण करण्यात हातखंडा असल्याचा आपला समज आहे. (तो खरा असल्याचं बायकोचं म्हणणं आहे.) बाकी लेख नेहमीप्रमाणे रूचकर, चविष्ट. (भोचक) इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं! हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 11/16/2009 - 20:46

Permalink

मस्त

मस्त ....सुंदर लेख...... --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Mon, 11/16/2009 - 20:51

Permalink

रावसाहेब

रावसाहेब आपल्या खवय्येगीरीला सलाम. सुरेख लिहिलयत. शेवट पर्यंत लाळ टपकत होती वाचताना. >>शेवग्याच्या पानाची भाजी आणि ओल्या हरभर्‍याच्या पानांची भाजी. आजीची आठवण करुन दिलीत. आजी अशी फक्कड करायची आणि जोडिला त्यांचीच भजी. >> मुळ्याच्या कोशिंबिरीसारखी कोशिंबीर नाही. लाखमोलच बोललात. गेल्याच आठवड्यात केली होती. मुळा न आवडणार्‍या अनेकांना नंतर बोटं चाटायला भाग पाडलय ;) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Tue, 11/17/2009 - 01:05

In reply to रावसाहेब by गणपा

Permalink

हे गणपाभाऊ

हे गणपाभाऊ आले की रेशिपी नाहीतर फटू घेऊनच येतात! आधीच लेखामुळे वाईट मानसिक अवस्था त्यातून हा फोटू!;) अवांतर: कोशिंबीर छान सजवलीये. नेत्रसुख म्हणतात ते हेच असेल!:) रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Mon, 11/16/2009 - 22:19

Permalink

नेहमीप्रन

नेहमीप्रनांए उच्च लेखन ... बारकावे अतिशय सुक्ष्मपणे टिपलेत .. आवडले रावसाहेब ... - खाद्योप राव जेवण गरम आहे ... तोवरंच खाण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आण्णा चिंबोरी on Mon, 11/16/2009 - 22:36

Permalink

उत्तम लेख

उत्तम लेख. जियो!!! --आण्णा चिंबोरी
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 11/16/2009 - 23:48

Permalink

छान लेखन!

जेवता जेवता वाचण्यासाठी खास ठेवून दिला होता हा लेख! :) मजा आली. वर्णन बरेच बारकाईने केले आहेत. पालेभाज्यांची खवय्येगिरी ही मी भरपूर अनुभवली ती मिरजेला शिकायला रहात होतो तेव्हा. मावशीकडे नियमितपणे ताज्या भाज्या येत करडई, मेथी, लाल माठ, तांदुळजा, कांद्याची पात, अळू, हिरवा माठ, शेपू, पालक, घोळ, अंबाडी कितीतरी. मावशीकडे समाधान की गणेश अशा नावाची एक चूल बांधून घेतलेली होती बर्‍याचदा त्यावर स्वैपाक होई. चुलीतल्या आगटीत भाजायला घातलेले कांदे आणि वांगी स्वयंपाक होईस्तो मस्त खरपूस भाजून निघत. जेवताना तोंडी लावायला काय मजा यायची वा! शेंगदाण्याच्या किंवा लसणाच्या झणझणीत चटणीला कच्चं करडीचं तेल मिसळून ज्वारीच्या भाकरीबरोबर हाणणे म्हणजे स्वर्गसुखच. हाच आनंद नुसता कच्चा काळा मसाला (पण हा कांद्याचा हवा) अधिक तेल ही जोडगोळी सुद्धा देते. अंबाडीची भाजी आणि वरून चरचरीत लसणाची फोडणी मारलेलं तेल असं भाकरीबरोबर खाताना जगातल्या समस्त गोष्टी यःकश्चित वाटायला लागतात. शेवग्याच्या शेंगांबद्दलही मीही असाच अशिष्ठ आहे. शेंग सोलून दाताने गर काढून खाल्ल्याखेरीज काय मजा आहे राव? उगीच आपलं पंगतीचा नसता आब-बीब राखण्याच्या भानगडीत मी पडत नाही, मस्त सोलून, चाखून बिखून खातो शेंगा (मग माझं बघून इतरही चार जण हळूच इकडे तिकडे बघत शेंगा सोलायचा प्रयत्न करतात! ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by sujay on Tue, 11/17/2009 - 08:46

In reply to छान लेखन! by चतुरंग

Permalink

अंबाडीची

अंबाडीची भाजी आणि वरून चरचरीत लसणाची फोडणी मारलेलं तेल असं भाकरीबरोबर खाताना जगातल्या समस्त गोष्टी यःकश्चित वाटायला लागतात. +१०००० लेख तर नेहमी प्रमाणे चवीष्टच. सुजय
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 11/17/2009 - 00:58

Permalink

अळू तर

अळू तर पात्रता फेरीतून एकदम फायनललाच जावे तसा श्राद्धापक्षांतून एकदम लग्नाच्या पंगतीतच जाऊन बसला आहे. =)) =)) =)) हे वाचून एकदम फस्सकन् हसू आलं. सॉल्लिड!! एकदम पटलं. लेख छान ,सुंदर च्या पलिकडे गेला आहे. चमचमीत तर आहेच पण.. बर्‍यापैकी झणझणीतही आहे. सुंदर लेखाबद्दल रावसाहेब तुमचं अभिनंदन!! - प्राजक्ता http://www.praaju.com/
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 11/17/2009 - 01:06

Permalink

पीठ पेरुन

पीठ पेरुन केलेली मेथीची गोळाभाजी प्रसंगी अंडा बुर्जीला अस्मान दाखवून जाते.
क्या केहेने.. अतिशय सुरेख खाद्ययात्रा.. जियो... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Tue, 11/17/2009 - 04:42

Permalink

अत्यंत सुंदर

लहानपणी समजायला लागलं तेव्हापासूनचा काळ असा एखाद्या माँटाजसारखा डोळ्यापुढे तरळून गेला. आई आणि हयात असलेल्या व नसलेल्या सर्व आज्या, मावश्या, काकवांच्या हातच्या स्वयंपाकाच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटलं (क्षणभर वाटलं की एखादा थेंब चुकून डोळ्यांतही आला असावा), आणि भारतात पळून जावंसं वाटलं... धन्यवाद रावसाहेब!! - भटोबा
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Tue, 11/17/2009 - 06:36

Permalink

भारी

हा भाग उल्लेखनीय. वाचनखुण साठवली आहे. असे पुण्यात हॉटेल आहे का? जिथे यातील बर्‍यापैकी पदार्थ ते देखील चांगल्या चवीचे नियमीत मिळतात? तश्या बर्‍यापैकी भाज्या लक्षात आहेत पण भारतदौरा करताना परत एकदा लक्षात ठेवायला आयती लिस्ट दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Tue, 11/17/2009 - 08:13

Permalink

लेखन आवडले

लेखन आवडले. >बीट बाकी स्वतःचे काहीही अस्तित्व नसलेले. केवळ 'लोह' हा विचार करुनच खायच्या लायकीचे. हे विशेष पटले नाही. स्वतःचे खूप अस्तित्व नसले तरी इतर गोष्टींबरोबर छान "जाते". उकडून चिरलेल्या बिटाची थोडे दही, कच्चा कांदा मध्यम आकाराचा चिरून थोडे मीठ- थोडी हवी असल्यास साखर घालून केलेली कोशिंबीर छान लागते. बीट आवडत नसल्यास एका प्रकारे अजून खाऊन पहावे - बिटाचे उकडून मध्यम लांबी/जाडीचे काप करावेत. कांदाही तसाच उभा चिरावा. बिट/कांद्यात ऑलिव्ह ऑईल, व्हिनेगर आणि किंचित मीठ घालून मुरवावे. >आमसुलाची चटणी तिला लाभलेल्या संदर्भाने एरवी अस्पर्श झाली आहे, पण तीही एक वेगळीच खमंग चव. खरे आहे. ह्याला थोडा वेगळा पर्याय म्हणजे जिरे आणि आमसुले एकत्र वाटून (खूप बारीक नाही) गोळी करायची, आणि ती पिठीसाखरेत घोळवून जेवणानंतर खायची. लहानपणी मला पाट्यावर करू द्यायचे असा हा एकच पदार्थ होता.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 11/17/2009 - 08:35

Permalink

आणि

आणि खाद्योपजीवीये| विषेशी लोकी इये|दृष्टादृष्टविजये होआवे जी|| आम्ही नेहमीच म्हणतो, मस्त दुपारचे असेच मस्त जेवण आणि मग तास दोन तास झोप. मग जगी सर्व सुखी असा दुसरा कोण आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 11/17/2009 - 11:52

In reply to आणि by Nile

Permalink

सहमत

आहे, रुचकर लेख!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Tue, 11/17/2009 - 08:49

Permalink

काल तर

काल तर वाचलाच लेख्..पण आता पहाटे उठुन परत वाचला. भन्नाट्च!!!! अम्बाडीची भाजी हवीये :( चुचु
  • Log in or register to post comments

Submitted by JAGOMOHANPYARE on Tue, 11/17/2009 - 11:46

Permalink

पोट भरले..

*************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Tue, 11/17/2009 - 11:54

Permalink

छान

आपल्याकडील विविध प्रकारच्या भाज्या आणि त्यांच्या वैशिष्ठ्यांचा घेतलेला धांडोळा आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 11/17/2009 - 11:54

Permalink

क्या बात

क्या बात है ! खुपच छान आपल्या या लेखाने आता कुठलिही भाजी चवीने ( लेख आठवत ) खाल्ली जाईल यात शंका नाही. -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by लवंगी on Tue, 11/17/2009 - 11:55

Permalink

परत परत वाचावासा लेख

आता २ आठवडे कोणत्या भाज्या करायचा प्रश्न सोडवला तुम्ही..
  • Log in or register to post comments

Submitted by baba on Tue, 11/17/2009 - 12:05

Permalink

अगागागा..

+१ नंबर लेख....
  • बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, लेकुरवाळी भाजी, लोणी आणि ताजे ताक
  • बटाट्याच्या रसभाजीत फ्लॉवर
  • कांद्याच्या पातीची पीठ पेरुन केलेली भाजी आणि तव्यावरुन डायरेक्ट पानात आलेली भाकरी
  • भरल्या वांग्याची शेंगदाण्याचे कूट, काळा मसाला, कांदा, कोथिंबीर, मीठ, गूळ आणि लालभडक तिखट घालून केलेली भरली भाजी
  • गवारीची शेंगदाणे घालून केलेली सुकी भाजी
  • तुरीच्या डाळीच्या आमटीतल्या शेवग्याचा शेंगा
  • कटाच्या आमटीबरोबर पुरणपोळी
  • भगरीच्या जोडीला येणार्‍या शेंगदाण्याच्या आमटी
  • कढी, खिचडी, तूप, मेतकूट, पापड
8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8> 8>
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Tue, 11/17/2009 - 12:12

Permalink

मस्त

कांद्याच्या पातीची पीठ पेरुन केलेली भाजी आणि तव्यावरुन डायरेक्ट पानात आलेली भाकरी हे कसे न मोजता खायचे काम आहे. सोबत शेंगदाण्याची जाडसर वाटलेली चटणी असली तर क्या कहने!
खल्लासच ! :) हाही लेख चवदार झालाय. रविवारच्या दुपारी जेवणात जर गरम गरम मटकीची, चवळीची आमटी असेल तर चपात्या भराभर संपतात. मस्त टम्म जेवून झाल्यावर झोपण्यापेक्षा हृषीदांचा ’गोलमाल’ किंवा 'चुपके चुपके' पाहत बसायच.
  • Log in or register to post comments

Submitted by नितीनमहाजन on Tue, 11/17/2009 - 12:23

Permalink

सुखी माणसाचे जेवण

अस्सल कढीला असले काही नखरे लागत नाहीत. कढी, खिचडी, तूप, मेतकूट, पापड .. फारफारतर लिंबाचे लोणचे. 'माणसाला किती जागा लागते?' या धर्तीवर 'जगात सुखी व्हायला फार काय लागते?' असा प्रश्न पाडणारे हे जेवण .
मानले तुम्हाला! B) नितीन
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Tue, 11/17/2009 - 12:25

Permalink

सन्जोपराव......एकदम जबरदस्त......

मराठी खाद्यपदार्थाच्या संपन्न साम्राजाची सफर खुपच आवडली. कोवळ्या हरभर्‍याची सकाळी खुडुन आणलेल्या कोवळ्या पानाची भाजी,त्यात शेंगदाणे व चवीसाठी खरडा घालुन केलेली भाजी काय चवीची असते ते खाल्याशिवाय लक्षात येणार नाही. सुंदर लेखाबद्दल परत एकदा धन्यवाद. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Tue, 11/17/2009 - 12:29

Permalink

लेख छानच.

लेख छानच. (फणसाची भाजी आणि अळूची भाजी प्रेमी) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Tue, 11/17/2009 - 12:30

Permalink

सूंदर लेख..

एकदम रुचकर झालाय हा लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Tue, 11/17/2009 - 12:31

Permalink

नेहमीसारख

नेहमीसारखाच मस्तच आहे लेख
  • Log in or register to post comments

Submitted by शिप्रा on Tue, 11/17/2009 - 12:35

Permalink

आधिच्या

आधिच्या लेखांप्रमाणेच हा भाग पण मस्त झाला आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन on Tue, 11/17/2009 - 12:45

Permalink

लेख चांगला

लेख चांगला झालायं आमच्या कोकणात डाळिंब्या नावाचा एक प्रकार असतो म्हणजे वालाला मोड आणुन मग साल काढुन कांदा लसुण घालुन केलेली उसळ. (चापुन खावी अशी लागते.) चेतन
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Tue, 11/17/2009 - 13:03

Permalink

सुंदर!

भूक चाळवली हे वाचता वाचता..! =P~ हादग्याच्या फुलांची भाजी आमच्याकडे बर्‍याचदा होते! खूप चविष्ट असते. प्रॉब्लेम एवढाच की खूप सार्‍या फुलांची थोडीशीच भाजी बनते! :( "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Tue, 11/17/2009 - 13:24

Permalink

श्री.रा.रा. रावसाहेब सा.न.वि.वि,

विश्वास ठेवा . वाचुन खरोखरीच "निशब्द" झालो. Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed. गावच्या आठवणी ताझ्या झाल्या. थंडीत सकाळी पाखरं राखताना भुक लागल्यावर खालेला गरमागरम हुरडा,मक्याची कोवळी कणसं, शेणात आंड लपेटुन ते चुलीत टाकावं आणि शेकल्यावर गट्कन मटकवाव. आह्हाहाहा...... खयालोंमे, खयालोंमे, खयालोंमे मझा मुंगेरीलाल झाला आणि तो केल्या बद्द्ल लक्ष लक्ष धन्यवाद *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Tue, 11/17/2009 - 13:54

Permalink

मस्तच लेख

मस्तच लेख आहे... एकदम रुचकर
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 11/17/2009 - 14:05

Permalink

चवदार

सुरेख. चवदार!
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Tue, 11/17/2009 - 14:16

Permalink

मस्त

लेख सकाळीच बघितला होता. पण जेवण झाल्याशिवाय वाचायचा नाहि हे ठरवून आत्ता उघडला.. माझ्याच निर्णयाचे मला कौतूक वाटते :) या अप्रतिम रेचचेलीत माझी अत्यंत आवडीची भरपूर ओले खोबरे घालून केलेली सागरमेथी (वाळूतील मेथी) विसरल्याबद्दल णिशेध! ;) याच बरोबर पावसाळ्यात शेवळं, करवं वगैरे पावसाळी पालेभाज्यांची आपलीच एक वेगळी मजा आठवली. मस्त लेख! ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?
  • Log in or register to post comments

Submitted by झकासराव on Tue, 11/17/2009 - 14:24

Permalink

वाह!!!!! काय

वाह!!!!! काय मस्त लिहिल आहे संजोपराव तुम्ही. :) मला तर आमटीतली शेवग्याची शेंग चोकुन न खाता तशी टाकुन देणाराच अशिष्ठ वाटतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Tue, 11/17/2009 - 14:34

Permalink

मस्त

एकदम मस्त
  • Log in or register to post comments

Submitted by अक्षय पुर्णपात्रे on Tue, 11/17/2009 - 20:22

Permalink

चांगला लेख

श्री राव, भाज्यांची सरमिसळ आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Tue, 11/17/2009 - 20:37

Permalink

खल्लास!

संजोपरावांच्या लेखणीतुन उतरलेला आणखी एक फक्कड लेख! बस्स..ह्यापलिकडे संजोपरावांच्या लेखनाबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे? बाकी संजोपराव, ह्या सरंजामात मिरचीचा ठेचा/खर्डा आला असता तर मजा आली असती :)
  • Log in or register to post comments

Submitted by सन्जोप राव on Tue, 11/17/2009 - 20:52

In reply to खल्लास! by धमाल मुलगा

Permalink

मिरचीचा खर्डा

ह्या सरंजामात मिरचीचा ठेचा/खर्डा आला असता तर मजा आली असती खरे आहे. मिरचीचा खर्डा, वर्‍हाडी ठेचा, चिंचेची चटणी आणि कर्नाटकी चटणी पूड राहून गेले... प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. सन्जोप राव जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Tue, 11/17/2009 - 21:19

In reply to मिरचीचा खर्डा by सन्जोप राव

Permalink

स्वतंत्र

पानातील डावीकडच्या या पदार्थांवर स्वतंत्र लिहा. लोणची, चटण्या, चटणीपुडी, कोशिंबिरी वगैरे सलगतेनं घेता येईल कदाचित.
  • Log in or register to post comments

Submitted by आण्णा चिंबोरी on Tue, 11/17/2009 - 21:37

Permalink

शेपूची भाजी

श्री. संजोप राव साहेब, तुम्ही शेपूची भाजी आणि हुलग्याची उसळ या अनुक्रमे पालेभाजीची राणी व कडधान्यांचा राजा असलेल्यांना का वगळले हे कळले नाही. मुळ्याप्रमाणेच शेपूचीही टेस्ट डेवलप करावी लागते... मुगाची भिजवलेली डाळ घालून ठेचलेला भरपूर लसूण घालून केलेली शेपू कुठल्याही अमेरिकन बर्गर-पिझ्झ्याच्या मुस्काटीत मारुन जाते. हुलग्याची उसळ तर क्या कहने. त्यावर एक लेखच लिहावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 11/17/2009 - 23:14

Permalink

झ क्का स ! ! !

झ क्का स ! ! ! झ क्का स ! ! ! झ क्का स ! ! ! जीभ खवळणे हा वाक्प्रचार अनुभवास आला, वाचता वाचता. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Tue, 11/17/2009 - 23:20

Permalink

मिपाची

मिपाची टिमकी वाजवायची असं नाही, परंतु मिपाच्या निमितानं संजोपला योग्य ते कोंदण मिळालं असं म्हणू इच्छितो.. संजोपने असंच सुंदरतेने येथे मनमुराद लिहावंन असंच मनापासून वाटतं.. शुभेच्छा.. खाद्ययात्रेचा पुढला भाग येऊ दे लौकर.. (सजोपचा चंचीमित्र) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Sat, 11/21/2009 - 02:52

In reply to मिपाची by विसोबा खेचर

Permalink

असेच म्हणतो

+१ -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by वैशाली हसमनीस on Wed, 11/18/2009 - 12:24

Permalink

सुंदर-

आपला नुसता लेख वाचूनच तोंडाला पाणी सुटले आणि डोळ्यातही भारतातल्या भाज्यांच्या आठवणींनी पाणी आले.फारच सुंदर्,रसभरित लेख !
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com