शब्द शब्द जपून फेक

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
18 Apr 2011 - 3:18 am

आपल्या विचारांत असो, बोलण्यात असो वा लिखाणात असो, आपले शब्द आपल्या भोवतालचं जग बदलू शकतात. प्रेम, आनंद, वीरश्री, मैत्री, दु:स्वास, भीती, तिरस्कार ...सगळे, सगळे भाव या शब्दांतून जन्म घेतात.

राल्फ वाल्डो इमर्सनने लिहून ठेवलंय त्याप्रमाणे (आपण जगातल्या खूपश्या गोष्टी बदलू शकत नसलो तरीही), आपण जन्मलोच नसतांना जग होतं, त्यापेक्षा आपल्या 'असण्याने' ते थोडंसं बरं, सुसह्य झालं असेल तर कधीही चांगलंच. कुणाच्या बाबतीत हे एखादं सुदृढ मूल वाढवण्याने असेल, एखादी सामाजिक समस्या सोडवण्यात हातभार लावल्यामुळे असेल, किंवा कुणी इतर कुणाला आपल्या खेळण्याने, गाण्याने किंवा हसण्याने आनंद दिला म्हणून असेल...इमर्सन म्हणतो: to know even one life has breathed easier because you have lived . . this is to have succeeded.” असं यश मिळवणं हे आयुष्याची इतिकर्तव्यता असावी.

मला वाटतं आपले शब्द जेंव्हा दुसऱ्या व्यक्तीला उल्हसित किंवा आश्वासित करायला वापरले जातात ते शब्दही आपल्याला अशाच यशाच्या जवळ घेऊन जातात. नेतृत्वाचा विषय असेल तर गांधीजींपासून स्फूर्ती घेऊन बोलणारे डॉ. मार्टिन ल्युथर किंग I have a dream म्हणतात, किंवा त्या दोघांना गुरुस्थानी मानणारे ओबामा Yes, we can! म्हणतात. अनुभव आणि इतिहास आपल्याला असेही सांगतो की विचार करायला लावणारे शब्द हे सर्वोत्तम शब्द असतात. कधी कधी माणसां-माणसातील नाते-संबंधांवर, समाजावर आसूड ओढून जळजळीत टीका करणारे शब्द निर्माण होतात आणि ते आपलं अंतरंग हलवून टाकतात. मराठीचा संदर्भ घेतला तर कुसुमाग्रजांचं नटसम्राट हे असं एक नाटक आहे:

पण कुसुमाग्रज तर फार उत्तुंग झाले, ते भाषाप्रभू.

मला वाटतं की त्यांच्यासारख्यांकडून प्रेरित होऊन का होईना, केवळ चार शब्द माझ्यासारख्यांच्या भांडारात पडले म्हणून आम्ही ते अनिर्बंध वापरावेत का? बडवायला कळफलक मिळाला, फुकटात किंवा स्वस्तात जागा द्यायला संस्थळं निर्माण आणि तयार झालीत, म्हणून काय वाटेल ते, वाटेल त्या वेगाने, वाटेल त्या अभिनिवेषाने, वाटेल तितकं पाल्हाळिक लिहावं का? लिहीन ते स्वांत सुखाय असलं तरी दुसऱ्याला दु:खदायक, क्लेशदायक असू नाही इतकी माफक अपेक्षा असायला हरकत नसावी. नाहीतर हल्ली बरेचदा ब्लॉग्ज बघतांना हे verbal diarrhea चे प्रकार खूपदा दिसतात. काही लिखाण तर केवळ शब्दबंबाळ ओरबाडून थांबत नाही तर चक्क विद्वेषही पसरवतं. हा शब्द सामर्थ्याचा दुरुपयोग आहे असं खेदाने म्हणावंसं वाटतं.

मितभाषी, पण मोजक्याच शब्दांत आपलं म्हणणं पटवून देणारे थोडे तरी शिक्षक, किंवा निदान सहकारी, आपल्या सर्वांच्याच वाट्याला आलेले असतात. तेंव्हा 'किमान शब्दात कमाल' हे केवळ 'अपमाना'ला लागू असणारं विशेषण न ठरता 'यशा'लाही लागू व्हावं याची गरज आहे. (या संदर्भात Thomas Jefferson चं "The most valuable of all talents is that of never using two words when one will do" हे वाक्य आठवतं.)

जाता जाता:

शब्दांचं सामर्थ्य नेमकं दाखवणारा हा छोटासा व्हिडिओ सापडला:

शब्द शब्द जपून फेक
दुखविशील कधी अनेक

कधी प्रभावी, कधी दुधारी
शब्द हे हत्यार भारी

प्रेमपूर्ण शब्द काही
डोळ्यातून आत पाही

शब्द कमी वापर रे
नजरेचा धाक पुरे

मितभाषी हास्यमुखी
निश्चिंत, सदा सुखी

हे ठिकाणमुक्तकभाषाविचार

प्रतिक्रिया

माझीही शॅम्पेन's picture

18 Apr 2011 - 5:05 am | माझीही शॅम्पेन

वाह खूप छान लिहिलेय ! शेवटचा विडिओ पाहून तर स्तब्ध झालो !!

यशोधरा's picture

18 Apr 2011 - 8:08 am | यशोधरा

सुरेख लिहिलं आहे. आवडलं.

सहज's picture

18 Apr 2011 - 8:24 am | सहज

ते सगळं ठीक पण सगळ्यांनाच हे जमत नाही ना! ज्याच्या त्याच्या नाडीपट्टीत, पत्रिकेत नोंदवले असेल तरच होतो हो बहुगुणी! तुमचे काय बरे आहे नावच इतके छान की हाही गुण असणारच. ;-)

क्रिएटीव्ह रायटींगबद्दल एक लेखमाला आली पाहीजे. आदी जोशी अश्या व्हिडीओनिर्मीती, शब्दरचनेबद्दल आधीक सांगतील.

शब्द असे हवे की एक वेगळा पर्स्पेक्टीव्ह मिळायला हवा!

बाकी सगळाच शब्दछल!

लवंगी's picture

18 Apr 2011 - 8:32 am | लवंगी

शब्द योग्य तेवढेच आणी योग्यवेळी वापरणे अति अवघड आहे.. सोपी नाहि ही कला.. सगळ्यांना बोलण्याचीच घाई असते, मग भले कुणी ऐकतय कि नाही काय पर्वा! खरं तर लक्षपुर्वक ऐकणे हेच कठीण आहे जे फार कमी लोकांना जमते..

जमल्यास ऐकण्याच्या कलेबद्द्ल एखादा लेख होऊन जाऊ दे, बहुगुणी.

प्राजु's picture

18 Apr 2011 - 8:26 am | प्राजु

अप्रतिम!!
बहुगुणी, हा लेख वाचनखुणा म्हणून साठवण्यात आला आहे. हा लेख इमेल मधून फोर्वर्ड करावा असाच आहे.
सुरेख!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Apr 2011 - 11:02 am | मिसळलेला काव्यप्रेमी

अगदी हेच म्हणायला आलो होतो.. :)

यशोधरा's picture

18 Apr 2011 - 11:10 am | यशोधरा

कोणी फॉर्वर्ड केलात तर बहुगुणी ह्यांच्या नावासकट करा म्हणजे योग्य होईल.

नंदन's picture

18 Apr 2011 - 8:50 am | नंदन

लेख आवडला, पटला. व्हिडिओतल्या उदाहरणावरून बादशहाला पडलेल्या स्वप्नाचा एकच अर्थ दोन ज्योतिषी कसा वेगवेगळा सांगतात, ती कथा आठवली.

स्वाती दिनेश's picture

18 Apr 2011 - 11:28 am | स्वाती दिनेश

लेख आवडला, पटला.
नंदन सारखेच म्हणते,
स्वाती

प्रीत-मोहर's picture

18 Apr 2011 - 9:13 am | प्रीत-मोहर

मस्त लेख बहुगुणी ...फार आवडला मला.

वाखु साठवली आहे.:)

नगरीनिरंजन's picture

18 Apr 2011 - 9:30 am | नगरीनिरंजन

मस्त आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा लेख!
धन्यवाद बहुगुणी!

किसन शिंदे's picture

18 Apr 2011 - 9:34 am | किसन शिंदे

+१
सहमत

मराठमोळा's picture

18 Apr 2011 - 11:22 am | मराठमोळा

सुंदर, थोडक्यात, आणि छान..
विचार करायला भाग पाडलेत. :)

धन्यवाद!!!

+१.
विचार करायला भाग पाडलेत.

शब्द संभाले बोलीये शब्द को हाथ ना पाव।
एक शब्द करे औषधी तो दुजा करे घाव॥

सुंदर लेख!!

मितभाषी's picture

6 Aug 2011 - 4:40 pm | मितभाषी

छान लेख. आवडला.

धाग्याचा विषय चांगला.
व्हिडीओ तर मस्तच, अगदी विषयाला साजेसा!
बहुगुणींचा धागा आला की वेगळे काहीतरी वाचायला मिळणार याची खात्री असते.

चतुरंग's picture

18 Apr 2011 - 6:12 pm | चतुरंग

विचाराला खाद्य देणारे लेखन. वीडिओतर अफलातूनच! एकच गोष्ट वेगळ्या शब्दांमुळे किती प्रभावी होते ह्याचा उत्तम नमुना.
कुसुमाग्रजांच्या नटसम्राट मधला हा उतारा ऐकून किती वर्षं झाली होती, आज पुन्हा एकवार अंगावर रोमांच आले!
बहुगुणी तुमचे आभार! :)

-रंगा

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2011 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

क्लासच !

प्रभो's picture

18 Apr 2011 - 6:44 pm | प्रभो

मस्त!! आवडला!

क्रान्ति's picture

18 Apr 2011 - 8:16 pm | क्रान्ति

अगदी मनापासून पटला आणि आवडला. शब्द हे शस्त्र आहे म्हटलं जातं, पण शस्त्रांचे घाव काही काळानं तरी भरतात, शब्दांचे घाव भरणं कठीण असतं. तेव्हा ते जपून वापरणंच श्रेयस्कर!

मेघवेडा's picture

19 Apr 2011 - 3:49 am | मेघवेडा

शब्दन शब्द पटला. शीर्षक, व्हिडिओ सर्वच समर्पक! :)

वाचनखूणच!

कोणी फॉर्वर्ड केलात तर बहुगुणी ह्यांच्या नावासकट करा म्हणजे योग्य होईल.

+१.

धनंजय's picture

19 Apr 2011 - 4:05 am | धनंजय

शब्दांच्या सामर्थ्याबद्दल दोन वेगवेगळे धागे आहेत. ते एकाच लेखात लिहिले आहेत.
एकीकडे पल्लेदार, लयबद्ध विस्ताराचे नटसम्राटाचे भाषण; किंवा व्हिडियोमधील बाईची युक्तीसुद्धा शब्दांची संख्या परिणामाकरिता वाढवते, तेसुद्धा. दुसरीकडे मितशब्दत्वाचे महत्त्व सांणारे जेफरसनचे वचन.

शब्दांत सामर्थ्य - जादू म्हणावे इतके सामर्थ - असते. सहमत.

आणि ज्या कुणाला हा लेख इतरांना फॉरवर्ड करावासा वाटेल त्यांना माझा आक्षेप नाहीच, आजूबाजूला इतक्या काही विषण्ण करणार्‍या घटना घडताहेत की त्यातल्या निदान शाब्दिक हिंसाचाराला तरी माझ्या एका यःकश्चित लेखाने काही मुरड बसली, तर बरंच आहे.

आदूबाळ's picture

4 Jan 2013 - 12:46 am | आदूबाळ

व्वा!! लेख आणि व्हिडिओ अप्रतिम!

समयांत's picture

15 Jan 2013 - 11:59 pm | समयांत

एक गुलदस्तात गेलेलं रत्न सापडावं तसा आनंद झाला वाचून.
धन्यवाद.

किसन शिंदे's picture

16 Jan 2013 - 12:02 am | किसन शिंदे

फार सुरेख लिहलंय.

मीनल's picture

17 Jan 2013 - 1:15 am | मीनल

व्हिडीओ मनाला भावला, रूचला,पटला.

आनन्दिता's picture

17 Jan 2013 - 7:52 am | आनन्दिता

अप्रतिम लिहिलय....

मागचे काही लेख चाळत असताना हे एक मुक्तक सापडलं फारच छान लिहिलंय. योग्यवेळी चार मोजकेच शब्द किती महत्त्वाचे असतात ते पटलं. ब्लॉगवर आपण अमर्याद लिहू शकतो परंतू बऱ्याचदा वाचक तिथे पाल्हाळ वाचून कंटाळतो. पूर्वी एक सिनेमा आला होता. त्यात हॉस्पिटलमध्ये एका महिलेला घशाचा कैन्सरमुळे खूप त्रास होत असतो. तिला काही गमतीजमती सांगून शेजारचीच दुसरी महिला रुग्ण तिला धीर देत असते. एक दिवशी ही सकाळी न दिसल्यामुळे पहिली विचारते कुठे गेली ती तेव्हा कळते तिलाही रक्ताचा का कसला तरी कैन्सरच असतो परंतू तसे न दाखवता आपल्याला मदत करत होती.

शब्द बंबाळ करतात आणि धीरही देतात. लेखातले दोन व्हिडिओ मात्र कॉपीराइटमुळे काढले गेले आहेत.

बहुगुणी's picture

12 Aug 2016 - 1:18 am | बहुगुणी

माझाच धागा वरती काढण्याचा प्रमाद करतो आहे. मिपावरील काही चांगल्या धाग्यांवरील चर्चेत (कदाचित भावनेच्या भरात, पण) शब्दबंबाळ लिहिलं जाण्याच्या सद्यस्थितीकडे पाहून या लेखाची आठवण झाली म्हणून शोधून पाहिलं तर महत्वाचे व्हिडिओ दुवे गायब झाल्याचं कंजूस यांनी लिहिलेलं दिसलं. त्यांपैकी पहिला डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्या I Have A Dream या भाषणाचा व्हिडिओ दुवा:

दुसरा ओबामा यांच्या "Yes We Can" भाषणाचा व्हिडिओ:

भाषाप्रभू कुसुमाग्रजांच्या नटसम्राट नाटकातील व्हिडिओ खाली देतो आहे.

अखेरचा शब्दांचं सामर्थ्य नेमकं दाखवणारा हा व्हिडिओ:

पूर्वीही वाचला होता अन भावला होता !
शेवटचा विडिओ हि सुरेख..

अवांतर - थोड्या दिवसांपूरवी ओबामाला बोलताना ऐकले कि व्हाईट हाउस मध्ये येऊन तो खूप म्हातारा झाला .. हा विडिओ बघून हे अगदी जाणवते :)