मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काही जुन्या लेखनांचे धागे

प्रसाद गोडबोले · · काथ्याकूट
नमस्कार मी मिपावर नवीनच आहे . इथे काही सुंदर (/ "प्रसिध्द") जुन्या लेखांच्या कवितांच्या इतर लेखनाच्या लिन्क्स देणार का ? माझ्या बरोबर इतर नवीन सभासदांना फार मदत होईल . (तसेच जुन्या सभासदांना जुन्या लेखनाचा पुनःप्रत्यय घेता येइल ) प्रतिसादा मधे लेखनाचे नाव , थोडक्यात वर्णन , आणि लिन्क असे अपेक्षित आहे . (अवांतर : १) चांगले लेखन शोधण्याचा स्वतः प्रतत्न केला पण साहित्य ४२४ पाने , चर्चा १८६ पाने , काव्य २४६ पाने , पाककृती ७४ पाने ... इतकं सगं लेखन सर्फ करणे जरा अवघड आहे ... त्यापेक्षा जाणकार रसिक वाचकांचे आवडते लेखन आधी वाचावे असा विचार आला म्हणुन हा धागा ! २) हा धागा काथ्याकुट मधे टाकणयाचे एकमेव कारण म्हणजे काथ्याकुट हा मिपावरील सचिन तेन्डुलकर आहे असे आमचे गेल्या काही दिवसात ठाम मत झाले आहे . अति-अवांतर : ३) संविधानात "असे धागे काढु नयेत " अशी तरतुद न सापडल्या मुळे धागा काढण्याचे धाडस करीत आहे ...राग नसावा :) ) --- आपली कृपाभिलाषि राष्ट्रकाकु गिरीजा

वाचन 55830 प्रतिक्रिया 92