✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!

न
नगरीनिरंजन यांनी
Sun, 10/10/2010 - 14:07  ·  लेख
लेख
काही महिन्यांपुर्वीची गोष्ट. शनिवारची सकाळ, म्हणजे तसे दहा वाजून गेलेले, पण तरीही ती सकाळच. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ऑफिसात इमर्जन्सी रिलीजवर काम करून, आयटीतला माणूस झोपू शकेल तितपत, ढाराढूर झोपलेला बंडू रस्त्यावरच्या वाहनांच्या कर्कश कलकलाटाने जागा झाला. बिछान्यावर पडल्या पडल्याच त्याने कानोसा घेतला. स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला. अपेक्षेप्रमाणे अपेक्षाभंग झाल्यावर किमान एक आयता चहा तरी आज पदरात पाडून घ्यावा म्हणून त्याने खास ठेवणीतला लाडिक स्वर काढून हाक मारली, "स्नेहूऽऽऽ", आणि थोडं थांबून, "ए, स्नेहाऽऽऽ". दोन-पाच मिनीटे गेली तरी काहीच उत्तर नाही हे बघून चरफडत बंडू उठला आणि झकत स्वतःच चहा करून घ्यायला किचनकडे निघाला. स्टडीवरून जाताना त्याने दारातून आत पाहिले तेव्हा ओले केस टॉवेलात गुंडाळलेली आणि अंगात बेदिंग गाऊन घालून स्विवेलिंग चेअरवर बसून कंम्प्युटरचा कीबोर्ड बडवत मैत्रिणीशी चॅट करणारी स्नेहलता त्याला दिसली. बंडू दारात उभा राहून पाहतोय हे तिच्या गावीही नव्हते. खुदूखुदू हसत ती भराभर काही तरी टंकत होती. दोन मिनीटे हताशपणे तिकडे बघून बंडूने खांदे उडवले आणि चहा करायला निघून गेला. बंडूचा चहा करून झाला तरी स्नेहलताचं चॅटींग काही संपलं नव्हतं. तिच्या वाटेचा चहा भांड्यात झाकून ठेवून त्याने आपला कप घेतला आणि मग आपला आयफोन घेऊन तो टेरेसवरच्या रिक्लाईनरवर जाऊन बसला. मन्या आणि मोहनने ढकललेले दोनचार फनी व्हिडिओज पाहत पाहत तो चहाचे घुटके घेत राहिला. त्याचा चहा संपता संपता स्नेहलता अखेर स्टडीतून बाहेर आली आणि चहा तयार असल्याबद्दल किंचितही आश्चर्य किंवा आनंद व्यक्त न करता तिचा कप भरून आली आणि बंडूसमोर बसली. "आज कुठे जाऊ या जेवायला? ", बसल्या बसल्या तिने प्रश्न फेकला. "तू म्हणशील तिकडे", बंडू आयफोनवरची नजर न उचलता म्हणाला. त्या नंतर चहा संपवून कपडे बदलायला जाईपर्यंत पाच-दहा मिनीटे ती रेस्टॉरंटस् आणि क्विझिन्स वगैरेवर काहीतरी बोलत होती असं बंडूला वाटलं. ती गेल्यावर त्याने इमेल बंद करून फेसबुकचे अ‍ॅप उघडले. फेसबुक उघडल्या उघडल्या सगळ्यात वरती त्याला स्नेहलताचा स्टेटस अपडेट दिसला. तिने लिहीलं होतं 'पिंक', अर्थातच इंग्रजीतला. बंडूला काही समजलं नाही पण फार विचार न करता तो इतरांचे अपडेटस् पाहू लागला. दोनचार फालतू अपडेटस् पाहिल्यावर त्याला मन्याच्या बायकोचं रागिणीचं स्टेटस दिसलं, "ब्लॅक". मित्रमंडळातल्या आणखी दहाबारा महिलासदस्यांनीही असेच काही काही रंग लिहीले होते. बऱ्याच गुलाबी होत्या, काही ब्लॅक, काही व्हाईट तर काहीं हिरव्यापिवळ्याही झाल्या होत्या. बंडूला आता फारच गंमत आणि उत्सुकता वाटू लागली होती. त्याने प्रयत्नपूर्वक ते लक्षात ठेवून लंचला जाताना स्नेहलतेला विचारलं देखील, पण तिने ताकास तूर लागू दिला नाही. नुसतीच गालात जीभ घोळवत हसत राहिली. बंडूने हरतऱ्हेने प्रयत्न केले पण तिने सांगितलं नाही ते नाहीच. आता बंडू चांगलाच इरेला पडला आणि त्यात आणखी नवीन रंगीत अपडेटस् ची भर पडतच होती. त्याने संध्याकाळी मन्याला फोन केला आणि त्याला विचारलं, पण मन्यालाही काहीच पत्ता नव्हता. तो दिवस असाच गेला. संध्याकाळपर्यंत त्याच्या मित्रांच्या बायका, त्याच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी आणि एवढंच काय ऑफिसमधल्या कलिग्जनीही एक एक रंग टाकला होता. रात्री टीव्ही पाहायाला बसला तरी बंडूचे लक्ष त्यात लागेना शेवटी चक्क अकरा वाजताच टीव्ही बंद करून बंडू स्टडीत जाऊन कंप्युटरसमोर बसला. बराच विचार करूनही एखादी गोष्ट कळाली नाही तर करण्यासारखी एकच गोष्ट त्याला माहिती होती. त्याप्रमाणे त्याने गूगलवर जाऊन फेसबुक, कलर, लेडीज वगैरे जेवढी संगत त्याला लागत होती तेवढे सगळे शब्द टाकले आणि सर्च मारला. गूगलने दिलेले रिझल्टस पाहून तो तीनताड उडालाच आणि हे सगळं ब्रेस्ट कॅन्सरच्या अवेअरनेससाठी चाललं आहे हे वाचून त्याने कपाळावर हात मारून घेतला. घाईघाईने त्याने मन्याला फोन लावला. "मन्या, तुला कळालं का? " "काय? " "अरे ते रंगाचं रे" "नाही ब्वॉ. मी विचारच केला नाही. दुपारी झोपलो होतो मस्त योगीची बिर्याणी चापून. हॅ हॅ हॅ" "ऐक मग. अरे ते ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी चालू केलेलं कँपेन आहे बायकांचं. " "काय सांगतो. अरे पण फेसबुक वापरणार्‍या किती लोकांना ब्रेस्टकॅन्सरबद्दल माहिती नसेल आधीच? आणि हे रंग लावून कसं काय बॉ कळणार कॅन्सरबद्दल? " "अरे ते रंग म्हणजे ना... ते रंग म्हणजे ना.... अरे ते एकेकीच्या ब्राचे कलर आहेत रे... " दोन मिनीटे भयाण शांतता... "म्हणजे स्नेहलताने आज पिंक....? ", मन्या हळूच म्हणाला. "आणि रागिणीने ब्लॅक?.. ", शहारत बंडू बोलून गेला आणि दुसऱ्याच सेकंदाला त्यांनी फोन ठेवून दिला. बंडूला फारच गिल्टी वाटत होतं पण कितीही प्रयत्न केले तरी त्याचा मेंदू त्याच्या इच्छेविरुद्ध काल्पनिक चित्रं तयार करतच राहिला. थकून बंडू उत्तररात्री झोपला पण स्वप्नातही त्याला नको त्या स्त्रिया येऊन नको ती माहिती देत राहिल्या. त्यानंतरही बरेच दिवस त्या अपडेटस् वाल्यांपैकी कोणतीही स्त्री समोर आली की "आज कोणता रंग असेल? " असा प्रश्न नकळत कुठूनतरी येऊन त्याला लाजवून जायचा. बर्‍याच दिवसांनी आणि बर्‍याच प्रयत्नांनी बंडू सावरला पण एका कापडातून दुसया कापडाचा रंग ओळखायची सवय मात्र त्याला कायमचीच जडली. त्यानंतर गेल्या आठवड्यातली गोष्ट. अशीच शनिवारची रम्य सकाळ. तसंच ते चॅटींग आणि तसाच तो चहा. हे सगळं नेहमीप्रमाणे घडून गेल्यावर बंडूने फेसबुक उघडले. स्नेहलतेचा अपडेट पाहून तो बावरला आणि सावध झाला. तिने लिहीलं होतं, " आय लाईक इट ऑन बेड". सावधपणे बंडूने इतरांचे अपडेटस् पाहिले. रागिणीने लिहीलेलं वाचून बंडू लाजून चूर झाला. तिने लिहीलं होतं, "आय लाईक इट ऑन द डायनिंग टेबल". आणखी एकीने लिहीलं होतं, "आय लाईक इट एनीव्हेअर व्हेअर एनीवन कॅन सी इट". आणखी चार-पाच जणींनी असेच प्रक्षोभक अपडेटस् टाकलेले त्याने पाहिले आणि तो स्टडीकडे धावला. धडधडत्या काळजाने त्याने सर्च मारला आणि थरथरत्या हाताने सर्च रिझल्टवर क्लिक केलं. पुन्हा हा प्रकार ब्रेस्ट कॅन्सरच्याच अवेअरनेससाठी आहे हे वाचून त्याचं डोकं फिरलं. नशीब या वेळी "तुमची पर्स तुम्हाला कुठे ठेवलेली आवडते" या प्रश्नाची ती उत्तरं होती. सुटकेचा निश्वास टाकून त्याने कपाळावरचा घाम टिपला न टिपला तोच त्याचा फोन वाजला. फोन उचलता क्षणीच पलीकडून मन्या किंचाळला, "अरे बंडू, हा आता काय नवीन प्रकार आहे? तू वाचलंस ना? शिव शिव शिव... आता नक्की कशाबद्दल बोलतायत या बायका? " "शांत हो मन्या, " बंडू आचार्य बंडो रजनीश झाल्याच्या थाटात बोलला, " या वेळी त्या फक्त पर्सबद्दल बोलत आहेत. त्यांना त्यांची पर्स कुठे ठेवलेली आवडते ते त्या सांगत आहेत. " मन्याने सोडलेला सुस्कार त्याला स्पष्ट ऐकू आला. संध्याकाळी कट्ट्यावर भेटायचं ठरवून त्यांनी फोन ठेवला. संध्याकाळी नेहमीच्या अड्ड्यावर बंडू, मन्या आणि मोहन जमले. नेहमीची चहाची ऑर्डर दिली आणि मग विषयाला पुन्हा तोंड फुटलं. "च्यायला या बायकांच्या, " मन्या करवादला," सगळं ताळतंत्रच सोडलंय यांनी आजकाल. मी रागिणीला म्हणालो सुद्धा, तर म्हणते कशी.. 'तुमच्याच मनात चांदणं आहे आम्ही तर आपलं सरळ मनाने लिहीलंय'. छ्या, चोर तो चोर वर शिरजोर. आणि मी म्हणतो किती अवेअरनेसतरी वाढवायचा त्या ब्रेस्ट कॅन्सरचा? बाकीचे कॅन्सर नाहीत की काय या जगात? पुरुषांना का कॅन्सर होत नाही? पुरुष का माणसं नाहीत?" मन्या इमोशनल झालेला पाहून मोहन कळवळला, "हो रे. काही तरी केलं पाहिजे बघ. अरे... अरे अर्चनाने तर लिहीलंय 'आय लाईक इट ऑन झोपाळा'... आता हे बरं दिसतं का तूच सांग. " दोघं असं तावातावानं बोलत असताना बंडू मात्र धुरांच्या वलयांकडे शांतपणे बघत बसला होता. बर्‍याच वेळाने त्याने तोंड उघडलं, " मन्या, तू म्हणतोस ते बरोबर आहे. पुरुषांचे पण कॅन्सर आहेतच की. आपण आपलं कॅंपेन सुरू करायचं" "आपलं कँपेन?" "हो, पुरुषांचं कँपेन.प्रोस्टेट कॅन्सर अवेअरनेस. या बायका आपल्याला लाजवतात ना, आपणही त्यांना लाजवायचं. कसं ते मी सांगतो. " मग त्या तिघांनी डोक्याला डोकं लावून मध्येमध्ये एकमेकाना टाळ्या देत, मध्येमध्ये खिंकाळत बरीच खलबतं केली आणि शेवटी सगळं ठरवून एकमेकांचा निरोप घेतला. त्या नंतरचा शनिवार. दहा वाजता बंडू उठून नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात गेला तेव्हा स्नेहलता आंघोळीला गेली होती. चहा करून घेऊन तो रिक्लाईनरवर बसला आणि त्याने फेसबुक उघडले. मन्याचा अपडेट पाहून तो मनाशीच हसला. मन्याने लिहीलं होतं, " सहा इंच" आणखी एक-दोघांनीही असंच लिहीलं होतं. कोणी साडेपाच इंच, कोणी सात इंच. एक जण अतिउत्साहाच्या भरात आठ इंचावरदेखील पोचला होता. "हं, हळूहळू लागण होतेय तर. पब्लिसिटी बरोबर झाली म्हणायची", बंडू म्हणाला आणि त्याने झोकात स्टेटस अपडेट टाकला, "साडेसहा इंच" आणि मग तो खुशीत चहा पिऊ लागला. स्नेहलता तिचा चहा घेऊन आली तोपर्यंत मात्र तो एकदम गंभीर होऊन बसला होता आणि लंचला जायला निघेपर्यंत आवरताना आतून खूप उकळ्या फुटत असूनही त्याने चुकूनही तिच्याकडे पाहिले नाही. आंघोळीला गेल्यावर शॉवरखाली मात्र त्याने पोटभर हसून घेतले. लंचला जाताना कारमध्ये स्नेहलताचा मूड उखडल्यासारखा वाटला. "काय झालं गं, लतू? ", त्याने मुद्दाम विचारले. "हा काय चावटपणा लावलाय तुम्ही लोकांनी? ", तिला थोडी कल्पना असूनही चिडखोरपणे तिने विचारलं. "कसला चावटपणा ब्वॉ? ", गालात जीभ घोळवत बंडूने विचारले. ती उसळून काही तरी बोलणार होती पण काही तरी विचार करून गप्प बसली. दिवसभर बंडू, मन्या आणि मोहनने एकमेकांना फोन करून करून भरपूर आनंद लुटला. महिलावर्गात मात्र अस्वस्थता होती. खुद्द स्नेहलतेने किमान दहा-बारावेळा तो विषय काढला होता पण तिला काही पुढे बोलता येईना. दिवसभर तिने कळ काढली. पण रात्री झोपायला गेल्यावर मात्र ठेवणीतला रडवेला चेहरा करून तिने बंडूला विचारले, "ए बंडू, सांग की रे असं काय करतो? " "काय सांगू? " "हेच तुम्ही कसले आकडे लिहीलेत? " "अगं ते कँपेन आहे आमचं. प्रोस्टेट कॅन्सरच्या अवेअरनेससाठी" "हो पण मग हा असला चावटपणा कशाला? " "कोण म्हणतं तो चावटपणा आहे? ती खरीखुरी मापं आहेत. आम्ही प्रामाणिकपणे मोजून लिहीली आहेत", बंडू सात्त्विक संतापाने म्हणाला. "शीः, वर तोंडकरून सांगायला लाज नाही वाटत? पुरुष मेले चावटच असतात. आणि तू आणि तुझे मित्र तर एक नंबरचे अश्लील आहात. काहीच कशी लाजलज्जा नाही म्हणते मी? वर खुशाल तोंड वर करून सांगतोस? तुला बोलवतं तरी कसं? सगळ्या बायका हसताहेत तुम्हाला आणि नाही नाही ते प्रश्न विचारताहेत एकमेकींना... " असं आणि आणखी बरचसं बोलत तिने जीभेचा पट्टा सोडला. बंडू खरं म्हणजे तिला आणखी ताणणार होता. "काय प्रश्न विचारतात एकमेकींना आणि का हसतात? " वगैरे विचारून तिला बोअर करायचं होतं पण तिचे डोळे पाणावलेले पाहून आणि नाकाचा शेंडा लाल झालेला पाहून तो विरघळला आणि मोठमोठ्याने हसू लागला. त्याला हसताना पाहून ती बोलायची थांबली आणि मुसमुसत रागाने त्याच्याकडे पाहू लागली. " अगं ब्रेस्ट कॅन्सरच्या अवेअरनेससाठी तुम्ही कसं कँपेन केलं तसंच हे. तुम्ही तेव्हा चावटपणा केलात तो विसरलात वाटतं. तुम्हाला धडा शिकवायचा म्हणून आम्ही हे प्रोस्टेट कॅन्सरचं कँपेन चालू केलं आणि ती मापं आमच्या हाताच्या तळव्याच्या लांबीची आहेत. तुला काय वाटलं? अं अं? आहात की नाही तुम्ही बायकाच चाव्वट?" एवढं बोलून बंडू डोळ्यातून पाणी येईपर्यंत हसत राहिला आणि हळूहळू स्नेहलताही त्यात सामील झाली.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
51285 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

हा हा हा, काय योगायोग. आत्ताच

Nile
Sun, 10/10/2010 - 14:17 नवीन
हा हा हा, काय योगायोग. आत्ताच मित्रांबरोबर या विषयावर चर्चा झाली. प्रथम एका मैत्रिणीचे ' आय लाईक इट ऑन टीव्ही' पाहुन उडालो होतो. अर्थात 'टीव्ही' मुळे मला लवकर शोधाशोधाची बुद्धी झाली अन कळाले. (बादवे, सद्ध्याचा "आय लाईक इट ऑन फ्लोअर" हा सर्वात जास्त शोध पैकी एक आहे.) पण ह्याने कँपेनला मदत होते आहे का? वगैरे प्रश्नांवरच चर्चा झाली. काही शोधाशोध करणारे सोडले तर बर्‍याच लोकांना चावटपणाचेच निमित्त मिळत आहे, असो. इंचांची कल्पना आवडली. अमलात आणावी काय असा विचार करत आहे. ;-)
  • Log in or register to post comments

नेकी और पूछ पूछ?

नगरीनिरंजन
Sun, 10/10/2010 - 14:29 नवीन
नेकी और पूछ पूछ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

असेच

मेघवेडा
Mon, 10/11/2010 - 02:29 नवीन
म्हणतो. होऊन जाऊदे नायल्या! लेख आवडला! मस्त खुसखुशीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

खी: खी: खी:

नंदन
Sun, 10/10/2010 - 14:33 नवीन
असले स्थितिसंदेश म्हणजे 'अळवावरचं पाणी'च की ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा !

सूड
Mon, 10/11/2010 - 13:36 नवीन
Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हा हा हा !

कानडाऊ योगेशु
Sun, 10/10/2010 - 14:38 नवीन
चावट पण भलताच खुसखुशीत लेख!
  • Log in or register to post comments

हा हा

धनंजय
Sun, 10/10/2010 - 19:25 नवीन
असेच म्हणतो. अगदी सोज्ज्वळ चावटपणा. बॅलन्स साधलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

+१

शहराजाद
Mon, 10/11/2010 - 02:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

हा हा हा मस्त लेख !!

अवलिया
Sun, 10/10/2010 - 14:57 नवीन
हा हा हा मस्त लेख !!
  • Log in or register to post comments

लेख आवडला! जशास तसे /पेराल

Pain
Sun, 10/10/2010 - 15:04 नवीन
लेख आवडला! जशास तसे /पेराल ते उगवते :)
  • Log in or register to post comments

हा हा हा!

सहज
Sun, 10/10/2010 - 15:47 नवीन
छान लिहलाय!
  • Log in or register to post comments

इंच का मामला है... ;)

मदनबाण
Sun, 10/10/2010 - 16:19 नवीन
खी खी खी... ;) छान लिखाण... ;)
  • Log in or register to post comments

लेख आवडला

सन्जोप राव
Sun, 10/10/2010 - 18:20 नवीन
लेख आणि कल्पना भलतीच आवडली. गाडगीळांना समाधान वाटले असते. प्रतिसादांची संख्या पाहून मिसळपावची प्रेरणा कम दुस्वास अशा वरणभात संकेतस्थळाच्या दिशेनेच मिसळपावची वाटचाल चालू आहे की काय अशी शंका आली....
  • Log in or register to post comments

नाही हो

चित्रा
Sun, 10/10/2010 - 19:16 नवीन
लेख शनिवारी/रविवारी आला आहे यामुळे प्रतिसादांची संख्या कमी आहे हे तुमच्यासारख्या अनुभवी लोकांना माहिती असेलच. असो. उत्तम ललित लेखन. बंडू/स्नेहलतेचा मॉडर्न अवतार पाहून आनंद झाला. स्नेहलता म्हटली की नयनतारा बाई डोळ्यासमोर उभ्या राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

लेख आणि कल्पना भलतीच

शाहरुख
Sun, 10/10/2010 - 19:40 नवीन
लेख आणि कल्पना भलतीच आवडली.
असेच म्हणतो ! बाकी तळव्याच्या लांबीवरून एका प्रसिद्ध अफवेची आठवण झाली ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

लोका सांगे..

अवलिया
Mon, 10/11/2010 - 11:13 नवीन
संजोपरावांशी सहमत आहे. रावांच्या वाटचालीवर नजर टाकुन त्यांनी प्रोत्साहन दिलेले प्रतिसाद पाहिले. डोळे पाणावले. बहुधा काही करुन मिपाला नावे ठेवायचीच ही जुनी सवय अजुन कायमच आहे असे दिसते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

धन्यवाद

सन्जोप राव
Tue, 10/12/2010 - 08:10 नवीन
आमच्या वाटचालीचा इतका बारकाईने अभ्यास केल्याबद्दल धन्यवाद. पण हा वेळ वाया घालवलात. याच वेळेत स्वतःची बौद्धिक वाढ करण्याचा प्रयत्न केला असता, तर तो सत्कारणी लागला असता. अर्थात आपल्याला काय जमेल आणी काय जमणार नाही याची आपल्याला पूर्ण जाणीव आहेच म्हणा. दरम्यान मिसळपावचे वकीलपत्र खाली ठेवा. स्वतःचे खाते उडणार नाही, एवढी काळजी घेतली तरी आपल्या वकूबाच्या मानाने फार झाले. 'लोका सांगे' हे तर पटलेच, पण 'मोजून माराव्या पैजारा' हेही आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

हॅ हॅ हॅ माझा वेळ वाया

अवलिया
Tue, 10/12/2010 - 13:53 नवीन
हॅ हॅ हॅ माझा वेळ वाया घालवला का सत्कारणी लावला याची चिंता आपण करु नये. आमच्या बौध्दिक वाढीची आपणास असलेली कळकळ पाहुन डोळे पाणावले. बाकी आमचा वकुब वगैरे काढतांना तुमची तशी लायकी आहे का हा प्रश्न नक्कीच पडतो. असो. बाकी मिसळपाव आम्ही आमचे मानतो, तुमच्या सारख्या केवळ शिंतोडे उडवण्यार्‍यांना ते कसे कळणार? आमचे खाते ऊडाले काय किंवा नाही उडाले काय याची चिंता आपल्याला का पडावी? ज्याची त्याची जाण समज वगैरे... आम्हाला जे वाटले ते आम्ही लिहित असतो... यापुढील चर्चा खव मधुन करु. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

हेच ते

सन्जोप राव
Tue, 10/12/2010 - 16:14 नवीन
की मिसळपाव आम्ही आमचे मानतो, तुमच्या सारख्या केवळ शिंतोडे उडवण्यार्‍यांना ते कसे कळणार? हेच ते वकीलपत्र. अशीच एकतर्फी निष्ठा बाळगत राहा. आम्हाला जे वाटले ते आम्ही लिहित असतो... यापुढील चर्चा खव मधुन करु. असो गरज नाही. अनाहूत खरडींकडे दुर्लक्ष केले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

>>हेच ते वकीलपत्र. अशीच

अवलिया
Tue, 10/12/2010 - 18:22 नवीन
>>हेच ते वकीलपत्र. अशीच एकतर्फी निष्ठा बाळगत राहा. ज्या गोष्टीतले तुम्हाला काही माहीत नाही त्यामधे आम्ही काय करावे आणी काय नाही हे सांगायला तुमची आवश्यकता नाही. फुकाचे सल्ले देऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

मस्त अन खुसखुशीत लेख....

वेताळ
Sun, 10/10/2010 - 18:30 नवीन
आवडला.....
  • Log in or register to post comments

आई शप्पत =)) =)) इतकी हसले

शुचि
Sun, 10/10/2010 - 19:02 नवीन
आई शप्पत =)) =)) इतकी हसले इतकी हसले
  • Log in or register to post comments

मस्तच लेख फुलवलाय..

शेखर
Sun, 10/10/2010 - 19:25 नवीन
मस्तच लेख फुलवलाय..
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Sun, 10/10/2010 - 19:40 नवीन
मनोरंजक!
  • Log in or register to post comments

खरा बंडू

पैसा
Sun, 10/10/2010 - 22:06 नवीन
गाडगिळांचा खरा बंडू आता आला असता, तर काहीसा असाच असता! जरा चावट, जरा हुषार.
  • Log in or register to post comments

मस्त... चावटपणाची हिंट असलेला

शिल्पा ब
Sun, 10/10/2010 - 22:12 नवीन
मस्त... चावटपणाची हिंट असलेला लेख..
  • Log in or register to post comments

मस्तच..

हर्षद आनंदी
Sun, 10/10/2010 - 22:40 नवीन
खुमासदार लेख!!
  • Log in or register to post comments

धन्य आहात हो निरंजनभौ!

रेवती
Sun, 10/10/2010 - 22:51 नवीन
धन्य आहात हो निरंजनभौ!
  • Log in or register to post comments

भारी!

आनन्दा
Sun, 10/10/2010 - 23:13 नवीन
आम्ही पण ते सर्व अप्डेट्स पाहून चक्रावून गेलो होतो... एका चांगल्या विषयाला तोंड फोडल्याबद्दल धन्यवाद!! -आनन्दा
  • Log in or register to post comments

खी! खी! खी!

स्वाती२
Sun, 10/10/2010 - 23:37 नवीन
भारी लिहिलय!
  • Log in or register to post comments

जबरदस्त लेख! (महाचावट)

इंटरनेटस्नेही
Mon, 10/11/2010 - 00:06 नवीन
जबरदस्त लेख! (महाचावट) इंट्या,
  • Log in or register to post comments

मस्त लेख. वरवर पाहाता हा लेख

राजेश घासकडवी
Mon, 10/11/2010 - 01:52 नवीन
मस्त लेख. वरवर पाहाता हा लेख चावट वाटतो खरा, पण त्यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे. ती लिंगभूमिकांविषयी काळ्या विनोदातली टिप्पणीच आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. आता आम्हाला काही सरळसोट गोष्टींमध्ये वात्रट अर्थ दिसतात, तर काही वात्रट लेखनांमध्ये गंभीर मुद्दे हाताळलेले जाणवतात हा आमच्या नजरेचाच दोष. असो. यावर आम्ही एक अभ्यासपूर्ण लेखच लिहायचं ठरवलेलं आहे.
  • Log in or register to post comments

गुर्जींच्या अभ्यासपूर्ण

शहराजाद
Mon, 10/11/2010 - 02:54 नवीन
गुर्जींच्या अभ्यासपूर्ण लेखाची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हॅ हॅ हॅ

सुनील
Mon, 10/11/2010 - 03:48 नवीन
एकनाथ आणि विष्णुदास नाम्याच्या काव्याचे वाचन/रसग्रहण कमी करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

एक विचारु ? एव्हढ चवताळण्या

स्पंदना
Mon, 10/11/2010 - 08:18 नवीन
एक विचारु ? एव्हढ चवताळण्या सारख काय वाट ल तुम्हाला त्यात? बायकांनी मिळुन केली थोडी मजा अं? बाकी लेखाबद्दल विचारुच नका..___/\___.
  • Log in or register to post comments

झक्कास लेख आहे. साला असले

llपुण्याचे पेशवेll
Mon, 10/11/2010 - 08:59 नवीन
झक्कास लेख आहे. :) साला असले रंगीत स्टेटस पाहून असा गूढ अर्थ त्यामागे आहे हे कधी सुचलेच नसते. ;) बाकी आधी रंग वेगळ्याच कशाचातरी वाटला होता. नगर्‍या भारी लेख रे. आवडेश.
  • Log in or register to post comments

___/\___ मस्त लिखाण

सुहास..
Mon, 10/11/2010 - 18:43 नवीन
___/\___ मस्त लिखाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

__/\__ असेच म्हणतो...

प्रभो
Mon, 10/11/2010 - 19:23 नवीन
__/\__ असेच म्हणतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

साष्टांग...

चिगो
Sat, 10/16/2010 - 00:59 नवीन
-------^-- :-) ढिश्क्यॅव..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मला पण आधी रंग वेगळ्याच

खटपट्या
Sat, 02/09/2013 - 06:08 नवीन
मला पण आधी रंग वेगळ्याच कशाचातरी वाटला !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मस्त

रन्गराव
Mon, 10/11/2010 - 09:08 नवीन
हसून हसून पोट दुखायला लागल!
  • Log in or register to post comments

मस्त

समई
Mon, 10/11/2010 - 09:12 नवीन
मस्त ...अगदि शेवत पर्यंत खुसखुषित पणा आहे...जोरात आहे.. :)
  • Log in or register to post comments

सही

चेतन
Mon, 10/11/2010 - 10:11 नवीन
सही लिहलयं. ;) कधीपासुन हासतोय
  • Log in or register to post comments

"एक नम्बर......"

विकाल
Mon, 10/11/2010 - 11:01 नवीन
"एक नम्बर......"
  • Log in or register to post comments

झ्यॅक लेखन.

गांधीवादी
Mon, 10/11/2010 - 11:15 नवीन
झ्यॅक लेखन. ५.९५
  • Log in or register to post comments

मस्तच!

अरुण मनोहर
Mon, 10/11/2010 - 11:23 नवीन
मस्तच!
  • Log in or register to post comments

मस्तच!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 10/11/2010 - 12:10 नवीन
हॅहॅहॅ!!! मस्तच लेख. - (५ इंची)
  • Log in or register to post comments

एकदम खुसखुशीत लेख.

गणपा
Mon, 10/11/2010 - 12:57 नवीन
एकदम खुसखुशीत लेख. :)
  • Log in or register to post comments

मस्त लेख!

यशोधरा
Mon, 10/11/2010 - 13:03 नवीन
मस्त लेख!
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

sneharani
Mon, 10/11/2010 - 13:25 नवीन
मस्त लेख!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा