गणेश उत्सव २०१२

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
23 Sep 2012 - 2:54 pm

नमस्कार मिपाकर मंडळी ! :)
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मला बाप्पाच्या विविध छटा टिपायची संधी मिळाली,कॉलनी मधले आणि गिरगावातल्या गणपतींचे दर्शन मी घेतले.
या पहिल्या धाग्यात मी गिरगावतले काही निवडक गणपती टिपले,ते देत आहे.त्याची सुरुवात केशवजी नाईकांच्या चाळीतील गणपतीने करतो आहे,हा मुंबईतला पहिला गणपती असुन अधिक माहिती इथे मिळेल.
http://www.1stganeshfestival.com/section3/section3a1.html

हौशी फोटुग्राफर) ;)
मदनबाण.....

कॅमेरा:--- निकॉन डी ५१००

संस्कृतीकलाधर्मइतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

23 Sep 2012 - 3:03 pm | प्रचेतस

मस्त रे बाणा.
बाप्पाच्या विविध भावमुद्रा छान टिपल्यास.

स्पंदना's picture

23 Sep 2012 - 3:24 pm | स्पंदना

गणपत्ती बाप्पा मोरया!
मदनबाण तुमचे आभार मानावे तेव्हढे कमीच वाटताहेत.

ऐकसयुरी's picture

23 Sep 2012 - 4:09 pm | ऐकसयुरी

खुपच छान आहे बाप्पा......

बाणा, यावर्षीची गणपतीची सफर सुद्धा छान घडवून आणलीस. आणखी फोटो असतील तर दुवा दिल्यास आणखी भारी..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Sep 2012 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाणाचं छायाचित्रण मस्त होत चाललं आहे. लगे रहो.
बोलो गंपती बप्पा मोरया...........!!! :)

अवांतर : एक स्पर्धा घ्या रे या वेळेसच्या गणेशोत्सवाच्या काळातील विविध छायाचित्रांची. प्रत्येक सदस्यानं दोनच छायाचित्र टाकायची. क्यामेरा असो की मोबाईल क्यामेरा. एक गणेशाचं आणि एक व्यक्तिचित्र. असं काहीतरी.

-दिलीप बिरुटे

वाटच पहात होते या धाग्याची. नेहमीप्रमाणेच छान फोटू.

पिवळा पितांबर नेसलेल्या फेटेवाल्या गणपतीची मूर्ती आवडली.
अजून गणपतींचे फोटो पहायचे आहेत.

किसन शिंदे's picture

23 Sep 2012 - 5:57 pm | किसन शिंदे

मस्त. सगळेच फोटो आवडले आहेत.

आणि वर प्रा.डॉ. च्या मताशी १००% सहमत. एक स्पर्धा भरवलीच पाहिजे.

अंवातर: पुण्यातल्या गणेशोत्सवाचे फोटू कूणी टाकेल काय?

पैसा's picture

23 Sep 2012 - 6:05 pm | पैसा

हौशी फटुग्राफर, चित्रे नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

फोटो मस्तच, पण तो हिरवा गणपति प्रचंड खटकला, चक्क म्हातारा वाटला तो, बघवला नाही. नॅट जिओ वर वगैरे म्हातारे झालेले असहाय हत्ती दाखवतात ना तसं दिसतंय ते.

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2012 - 7:33 pm | प्रभाकर पेठकर

१) मखरात खुश आहे.
२) प्रेमळ.
३) फुलांनी अवघडलेला.
४), ५) वयस्क, करारी, घरातील आजोबांसारखा.
६) समाधानी कुटुंबवत्सल.
७) विजयी आणि आत्मविश्वासू.
८) उत्सवमूर्ती
९) खट्याळ आणि खोडकर.
१०) पुढारी, लोकनायक (बाळ ठाकरे, राज ठाकरेंची आठवण करून देणारा).
११) वाढदिवसासाठी आई पार्वतीने हौशीने सजविलेला बालगणपती.

गणपा's picture

23 Sep 2012 - 9:29 pm | गणपा

मरच रे बाणा.
तुझ्या या धाग्याची आतुरतेने वाट पहात होतो. :)

अमोल केळकर's picture

24 Sep 2012 - 10:40 am | अमोल केळकर

मस्त .....
गणपती बाप्पा मोरया !!

अमोल केळकर

मदनबाण's picture

24 Sep 2012 - 6:01 pm | मदनबाण

सर्व प्रतिसाद देणार्‍या मंडळींना थांकु... :)
न-देणार्‍यांना डबल थांकु ! ;)
कलादालनात फोटो चढवता येत नसल्याने वेगळ्या विभागात हा धागा टाकला आहे.