जशी रंग बोटांवर ठेवून... - १

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
25 Feb 2012 - 9:34 pm

रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते एव्हाना. अश्विन थकून बेडवर आडवा झाला होता. वाढदिवस असल्यामुळे ऑफीसला सुट्टी जरी होती तरी दिवसभर विश करणार्‍या कॉल्सना उत्तरे देऊन आणि संध्याकाळी ऑफीसमधल्या अगदी जीवाभावाच्या मित्रांसोबत हेवी डीनर केल्यामुळे त्याला एग्झॉस्ट झाल्यासारखे वाटत होते. दिवस संपल्यात जमा होता. आता कुणी कॉल करण्याची किंवा मेसेज करण्याची शक्यता नव्हती. म्हणून शांतपणे डोळे मिटून झोप येण्याची वाट पाहत होता. इतक्यात त्याच्या मोबाईलवर दोन वेळा बीप झालं. कुणाचातरी मेसेज आला होता नाईलाजानेच अश्विन कुशीवर वळला. हात थोडासा लांब करुन त्याने साईड टेबलवरचा मोबाईल उचलून कोणाचा मेसेज आहे हे पाहिलं.

"श्रेया..." एक हलकासा उसासा त्याने सोडला. चेहर्‍यावर मंद स्मित उमटलं.
"सॉरी, थोडा उशीराच मेसेज करत आहे बर्थडे विश करण्यासाठी. फेसबुकवरील पोस्ट्स पाहून कळलं की तुझा आज बर्थडे आहे. एनीवेज, बीलेटेड हॅप्पी बर्थडे". त्याने रीप्लाय ऑप्शन सिलेक्ट करुन थँक्स म्हणून उत्तर पाठवून दिलं. अन स्वतः मात्र भूतकाळात हरवून गेला.

साधारण सहा सात महिन्यांपूर्वीची गोष्ट. मॅट्रीमोनी पोर्टलवर इकडे तिकडे चाळाचाळ करत असताना श्रेयाचं प्रोफाईल त्याच्या नजरेस पडलं होतं. पुण्याची होती ती. वयानं त्याच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेली. त्याच्यासारखीच संगणक अभियांत्रिकीमधून बी ई झालेली. बी ई नंतर तिने एचआर मधून एमबीए केलं होतं आणि आता पुण्याच्याच एका नामांकित आयटी कंपनीच्या रिक्रुटमेंट डीपार्टमेंटला सिनियर रिक्रूटर म्हणून काम करत होती. दिसायलाही छान होती. त्या मॅट्रीमोनी साईटचा "एक्स्प्रेस इंटरेस्ट" ऑप्शन वापरायला हरकत नव्हती. पण एक प्रश्न त्याच्या मनात असा चमकून गेला की ही आपल्या इंटरेस्टला प्रतिसाद देईल का? म्हणजे त्याच्यात काही कमी होतं अशातला भाग नव्हता. ईंजिनीयरींग नंतर त्याने सी डॅ़क मुंबईच्या जुहू सेंटरमधून अ‍ॅडव्हान्स्ड पी जी केलं होतं सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये. आणि आता बँकांच्या एटीम मशीनध्ये वापरले जाणारे सॉफ्टवेअर बनवणार्‍या एका मल्टीनॅशनलमध्ये प्रोग्रामर अ‍ॅनालिस्ट म्हणून काम करत होता. मजबूत पगार होता. नुकतीच स्विफ्ट डीझायर घेतली होती. पासपोर्टवर दोन वेळा ऑस्ट्रेलिया वारी झाल्याचे ठप्पे होते. पण एव्हढं सारं असूनही मुलगी पाहायला सुरुवात करुन आता दोन वर्ष होउनही मनासारखी मुलगी भेटत नव्हती. त्यामुळेच हल्ली हल्ली त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता.

हो नाही करता करता त्याने मनाचा हिय्या करुन श्रेयाच्या प्रोफाईलवरचं "एक्स्प्रेस इंटरेस्ट" बटन क्लिक केलं. पेड मेंबर असल्यामुळे तिचे कॉन्टॅक्ट डीटेल्स पाहून घेतले. आई बाबांना तिचे कॉन्टॅक्ट डीटेल्स देऊन फोन करायला लावण्यापेक्षा आधी ती आपल्या "इंटरेस्ट"ला प्रतिसाद देते का ते पाहूया असं म्हणून त्याने दोन तीन दिवस थांबायचे ठरवले. रोज संध्याकाळी घरी येऊन फ्रेश होत असे. सीप्झवरुन ठाण्याच्या घोडबंदर रोडला येताना मधला साकीनाका चकाल्याच्या ट्रॅफीक जामच्या दुखःद आठवणी लॅपटॉपच्या बॅकपॅकमध्ये टाकून तो जोमाने मॅट्रीमोनी पोर्टलवर लॉगिन करत असे. श्रेयाने आपला "इंटरेस्ट" ओपन केला का ते पाहत असे. ती ऑनलाईन असूनही किंवा नुकतीच ऑनलाईन येऊन गेलेली असूनही तीने आपला "इंटरेस्ट" ओपन केला नाही हे पाहून तो मनातल्या मनात खट्टू होत असे. असे तीनेक दिवस गेले. चौथ्या दिवशी मात्र तिने त्याचा इंटरेस्ट ओपन केला. पण प्रतिसाद काहीच नाही. आता मात्र अश्विनला धीर निघेना.

शेवटी बाबांना फोन करुन श्रेयाचे डीटेल्स दिले आणि तिच्या घरी कॉल करण्यास सांगितले.

"अरे त्यांनी तुझा इंटरेस्ट वाचला आहे."
"हो. पण उत्तर काहीच दिलं नाही."
"तिच्या आईने फोन उचलला होता. ते तुझी पत्रिका जुळवून पाहणार आहेत."
"अहो बाबा, पण तिच्या प्रोफाईलमध्ये तर तिने हॉरोस्कोप मॅच नॉट रीक्वायर्ड असं लिहिलंय."
"असू दे. आपण दोन दिवस वाट पाहू. नाहीच त्यांनी काँटॅक्ट केला तर आपण फोन करु".

पुन्हा दोन दिवस गेले. मात्र श्रेयाच्या घरुन काहीच उत्तर नाही.
पुन्हा एकदा अश्विन घायकूतीला आला. बाबांना फोन करुन त्याने श्रेयाच्या घरी फोन करण्यास सांगितले.

"अरे पत्रिका जुळतेय म्हणे. तिचे आई बाबा दोघेही शिक्षक आहेत. ते म्हणाले पाहण्याचा कार्यक्रम करण्यास काही हरकत नाही. याशनिवारी त्यांच्या घरी जाण्याबद्दल विचारूया का?"
"या शनिवारी म्हणजे खुपच घाईत होईल बाबा."
"अरे हा ऑगस्टचा शेवटचा आठवडा चालू आहे. सात आठ दिवसांनी गणपती येतील. मग पित्रूपक्ष. आता नाही केलं तर पाहण्याचा कार्यक्रम लांबणीवरच पडेल."
"ठीक आहे. इलाज नाही. तुम्ही विचारुन बघा त्यांना या शनिवारी चालेल का म्हणून"

श्रेयाच्या घरच्यांनी शनिवारी पाहण्याचा कार्यक्रम करण्याला होकार दिला. अश्विनला घोडं गंगेच्या काठी गेल्याने हायसे वाटले.

आई बाबा शुक्रवारी संध्याकाळीच बागमांडला - ठाणे गाडीने ठाण्याला आले.
शनिवारी सकाळी लवकरच लवाजमा पुण्याच्या दिशेने निघाला. सकाळी साडे सहा सातची वेळ असूनही कळवा नाक्यापासून जे ट्रॅफिक भेटले ते अगदी ठाणे बेलापूर रोड तुर्भ्याला सायन पनवेल रोडला येऊन मिळेपर्यंत. कळंबोली येईपर्यंत थोडंसं वैतागतच अश्विन गाडी चालवत होता.

डाव्या हाताचे मॅकडी झपकन मागे टाकून गाडी सुसाट वेगात एक्स्प्रेसवेवर चढली. अश्विनने आपल्या बाजूची काच खाली केली. गार वार्‍याचे झोत अंगावर घेत त्याने शीळ घालत अ‍ॅक्सलरेटर अजून जोरात दाबायला सुरुवात केली. एव्हाना उजवीकडे दिसणारी फोफावलेल्या पनवेलची घरेही तुरळक होऊ लागली. गाडी एकदम उजवीकडच्या लेनमधून एकशे दहाच्या वेगाने पळू लागली.
__________________________________________________________________________________
तळटीप १ - शिर्षकात १ आकडा असला तरी मायबाप वाचकांना आवडले तरच पुढची पाटी टाकण्यात येईल.
तळटीप २ - हा माझा स्वतःचा अनुभव नाही.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रास's picture

25 Feb 2012 - 9:44 pm | प्रास

सुरूवात तर चांगली केलीय पण जरा छोटी केल्यासारखं वाटतंय.

तळटीप १ - शिर्षकात १ आकडा असला तरी मायबाप वाचकांना आवडले तरच पुढची पाटी टाकण्यात येईल.

किती? किती हा विनय? फायनलायझेशनपूर्वीची प्रॅक्टीस की काय ही?

तळटीप २ - हा माझा स्वतःचा अनुभव नाही.

आम्ही सूज्ञ असल्याने आम्हास अधिक सांगणे न लगे....... ;-)

अर्थात येऊंद्या!

तूर्तास,

'पुलेशु'च.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Mar 2012 - 7:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आम्ही सूज्ञ असल्याने आम्हास अधिक सांगणे न लगे

मग काय तर !!! कोंबडी झाकली म्हणून सूर्य उगवत नाही होय.. अरेच्या म्हण चुकली. पण जाऊ दे. मुद्दा काय आहे की पुण्याचे ठाणे केले, अमेरिकेचे ऑस्ट्रेलिया केले तर आम्हाला सत्य कळणार नाही होय ??

माझा अंदाज :- खऱ्या केस मध्ये दोघांत तीन वर्षांचा फरक असेल. HR ऐवजी मार्केटिंग किंवा फायनान्स मधून MBA केले असेल. काय चु......ना लावता काय आम्हाला ?? ;-)

ईंजिनीयरींग नंतर त्याने सी डॅ़क मुंबईच्या जुहू सेंटरमधून अ‍ॅडव्हान्स्ड पी जी केलं होतं सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीमध्ये....सीप्झवरुन ठाण्याच्या घोडबंदर रोडला येताना मधला साकीनाका चकाल्याच्या ट्रॅफीक जामच्या ...कळवा नाक्यापासून जे ट्रॅफिक भेटले ते अगदी ठाणे बेलापूर रोड तुर्भ्याला सायन पनवेल रोडला येऊन मिळेपर्यंत. कळंबोली येईपर्यंत...डाव्या हाताचे मॅकडी झपकन ....

वाकडोजी धने, खूप म्हणजे खूपच डीटेलिंग करून तुम्हारा चुक्याच. लगेच कळली ना आम्हाला खरी बात. :-)

Ravindra's picture

25 Feb 2012 - 9:50 pm | Ravindra

आवडले . पटापट पुढचा भाग येउद्या.

टवाळ कार्टा's picture

26 Feb 2012 - 12:04 am | टवाळ कार्टा

+१

पैसा's picture

25 Feb 2012 - 10:17 pm | पैसा

छान! अनुभव कोणाचाही असो, पुढे काय झालं?

(उरलेली प्रतिक्रिया क्रमश: जर पुढचा भाग आला तर)

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Feb 2012 - 11:08 pm | चेतनकुलकर्णी_85

पूर्वी दैनिक सकाळ मध्ये कोणी काळे नावाचे गृहस्थ "तो आणि ती" अश्या काही नावाची एक क्रमश गोष्टी लिहित होते..सुरवातीचे काही भाग अगदी रंगेबेरंगी व स्पप्नाळू होते नंतर काही भागांनी गोष्ट वाचण्या पेक्ष्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचायला मजा यायला लागली :D
असो ..आता आमची उत्सुकता तुटेपेर्यंत न ताणावता मस्त पैकी पुढचे (जिलब्यांचे )भाग टाका पाहू... :)

धनाजीरावांचे लिखाण दर्जेदारच असणार. पुढचा भाग टाका पाहू पटकन.
बाकी कहाणी मात्रतुमचीच वाटते आहे

प्रभो's picture

26 Feb 2012 - 12:41 am | प्रभो

भाग चांगला झालाय ..:)

अन्या दातार's picture

26 Feb 2012 - 4:50 am | अन्या दातार

पुण्याच्या ऐवजी ठाणे घेतलेत का? बर बर!! ;)

क्रमशः

पुढचा भाग टाका मग डीट्टेलवारी प्रतिक्रिया देउ.

सुरुवात चांगली जमलिये.
पुढे काय होते याची वाट पाहू.

धन्या, पुढचा भाग आणि मगच खरी प्रतिक्रिया..

- पिंगू

नगरीनिरंजन's picture

26 Feb 2012 - 8:23 am | नगरीनिरंजन

अरे वा, कथेची सुरुवात तर...

क्रमशः
;-)

५० फक्त's picture

26 Feb 2012 - 10:26 am | ५० फक्त

छान सुरुवात झाली आहे, येउ द्या अजुन, फार वेळ उरला नाही.

चेतनकुलकर्णी_85's picture

26 Feb 2012 - 10:45 am | चेतनकुलकर्णी_85

कथा मी पूर्ण करू का?
मला काह्लील शक्यता वाटत आहेत..

१.मुलगा व मुलगी पाहण्याचा कायक्रम पार पडतो..मुलाला मुलगी पसंत पडते..मुली कडून होकार यायचा बाकी असतो..मग मुलाची तगमग दाखवण्य साठी आणखी २-३ भाग...
२.शेवटी त्या रंभेचा आपल्या होतकुरू दोस्ताला होकार येतो..मुलाला स्वर्ग प्राप्ती झाल्या सारखे वाटते..मग ह्या आनंदात दोघांचे फोन वरील हितगुज,समस,गप्पा, रुसवे फुगवे ह्यात आणखीन २ भाग..
३. नंतर अचानक त्या मुलीचा "इतिहास"त्याला कळतो..मग दोघ्ना मध्ये गैरसमज..वाद विवाद...भांडणे..रुसावी फुगवी..ह्याचे कामातले लक्ष्य उडते..मग बोस चे त्याला झापणे..बढती डवले जाने इत्यादी इत्यादी..शेवटी हा तिला किंवा ती ह्याला नाही म्हनांच्या कठोर निरयन घेते..हमारे रस्ते अब अलग अलग है..ह्यात २ भाग..
४.मग त्याला आलेल्या समस वरून परत त्याला तिची ओढ वाटायला लागते ...आणि मग शेवटी समेत होऊन शेवट "जिलेबी" सारखा गोड होतो..आणि ह्या कथानकात अनेक जन आपल्याला पाहून मोरपीस अंग्वरून फिरवल्याचा आनंद लुटतात... समाप्त..
आता ह्यात तुम्ही आणखी काय वेगळा मसाला घालणार आहे ते तुम्हीच ठरवा...
"Grow-up"

पटले तर घ्या नाहीतर द्या सोडून.....

आता ह्यात तुम्ही आणखी काय वेगळा मसाला घालणार आहे ते तुम्हीच ठरवा...

"Grow-up" ;)

"Grow-up"

ग्रो होणे ही माणसाच्या आयुष्यात चालू असणारी अखंड क्रिया आहे. ती आमच्याबाबतीत तरी चालू आहे. तुम्हीही मोठे व्हा. :)

पटले तर घ्या नाहीतर द्या सोडून.....

तुम्ही म्हणताय तसा मसाला घालायचा असता तर नक्कीच तुम्हाला पुर्ण करु दिली असती. पण तसं नाही. तेव्हा क्षमस्व. :)

पाषाणभेद's picture

27 Feb 2012 - 12:38 am | पाषाणभेद

@चेतनकुलकर्णी_85
तुमची कारकिर्द पाहून तुम्ही कथा काय काथ्याकुटात पुर्ण कराल काय?
http://www.misalpav.com/user/17059/authored
काथ्याकूट भारत "IT" मध्ये प्रगत आहे म्हणजे नक्की काय आहे? 85 29नवीन 20 फेब्रुवारी 2012 - 14:46
काथ्याकूट "साहेब" आता निवृत्त होणार काय??? 29 21नवीन 31 Jan 2012 - 17:31

किंवा तुम्ही संध्यानंदचे फॅन असल्यामुळे तुम्ही त्याप्रमाणेच विचार करत असाल असे वाटते.

तुमच्या डोक्याप्रमाणे विचार करायला गेलं तर जगातील सगळ्या भाषांमधील कथा केवळ बोटावर मोजण्याच्या प्रकारात मोडतील. जरा मोठे व्हा अन मोठा विचार करा.

बघा ब्वॉ...पटले तर घ्या नाहीतर द्या सोडून.....

@पाषाणानेकेलीकर्णी_१२(महीने)

धन्या's picture

27 Feb 2012 - 1:03 am | धन्या

चेतनभाऊ अजून नविन आहेत मिपावर. थोडेसे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍यातले दिसतात.

आणि दोन सवंग (फुटकळ हा शब्द लिहिण्याचा मोह आवरता घेतला. ;) ) धागे काढल्यानंतर त्यांना वाटत असेल की आपण आता एखादया सिरियलचे कथा, पटकथा आणि संवाद लेखनही करु शकतो, या धन्याच्या क्रमशः कथेची काय बात असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांचा हा वाटण्याचा आनंद हीरावून कशाला घ्यायचा.

असो. चेतनभाऊ, तुमच्या लेखन कौशल्यावर आमचा पुर्ण विश्वास आहे. त्यामुळे लवकरच तुम्हीही एखादी छानशी कथा लिहा बरं. आम्हाला वाचायला आवडेल.

५० फक्त's picture

27 Feb 2012 - 8:15 am | ५० फक्त

@ चेतन कुलकर्णी, अवघड आहे बुवा तुमचं, तुम्हाला हा शीघ्रतेचा त्रास सगळ्याच क्षेत्रात आहे का हो ?

कपिलमुनी's picture

27 Feb 2012 - 9:16 am | कपिलमुनी

अगबाब्वो...
घुमवून हाणलासा ..

उपाय सांगायचे का शीघ्रतेचा त्रासावरचे ??

जेनी...'s picture

27 Feb 2012 - 11:18 am | जेनी...

:D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Mar 2012 - 1:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे

काय हे पन्नास राव, असे अडचणीचे प्रश्न विचारून "दुखती रग पे हात" वगैरे असे काहीसे झालेले दिसते. म्हणून खरडवहीत तिखट प्रतिक्रिया उमटली आहे. :-)

माझा निरोप द्या एक. म्हणावे, भुंकणारे कुत्रे चावत नाहीत. जालावर भुंकणारे तर अजिबात चावत नाही. खरे तर इतरत्र भुंकण्याची पण कुवत नसते म्हणून इथे येऊन उगाच दात काढत बसतात.

कसंय, कडबा आणि चिवडा यात फरक असणारच. (काथ्याकूट म्हणजे जनावरं कडबा खावून जशी रवंथ करीत बसतात तसं तोच विषय चघळणं चालू असतं, तर काही लेख चिवड्यासारखे खमंग , खुसखुशीत चविष्ट असतात. ) आता कोणाला काय आवडेल सांगता येत नाही.

बघा पटलं तर नाहीतर सोडून द्या.

(वेतनकरभर्णी३६.....बदलापूर)

ज्याची त्याची आवड, दुसरं काय.

डॉ.श्रीराम दिवटे's picture

26 Feb 2012 - 10:52 am | डॉ.श्रीराम दिवटे

कथा क्रमशः ठेवल्यामुळे उत्सुकता ताणून तुटण्यापूर्वी शेवट केला तर तारेचा झंकार गुंजत जाईल! नाहीतर मध्येच अटकलेल्या प्रतिसादांचे तुणतुणे ऐकण्यास तयार रहावे लागते. तेव्हा आजच काय तो कथांत करुन टाका धनाजीराव!

रेशा's picture

26 Feb 2012 - 11:56 am | रेशा

मस्त

मी-सौरभ's picture

26 Feb 2012 - 12:47 pm | मी-सौरभ

क्रमशः

बर्‍यापैकी जमलंय...पुढेही वाचायला आवडेल. बाकी भारंभार काथ्याकूट करुन तोच तोच विषय चघळत बसणार्‍या धाग्यांपेक्षा हे नक्कीच छान लिहीलंयत. सुज्ञांस सांगणे न लगे. ;) पुभाप्र.

मोदक's picture

26 Feb 2012 - 10:34 pm | मोदक

वाचतोय..

पाषाणभेद's picture

27 Feb 2012 - 12:22 am | पाषाणभेद

वाचतोय अन तुम्ही लिहीत रहा.

शेखर काळे's picture

27 Feb 2012 - 3:51 am | शेखर काळे

कथेची सुरुवात जरा अपेक्षित मार्गावरून झाली असली तरी तुम्ही चेतनकुळकर्णी_८५ ला दिलेल्या प्रतिसादामुळे उत्कंठा वाढलेली आहे.
पुढचा भाग जरूर आणि लवकर टंकावा ही विनंती ...

प्राजु's picture

27 Feb 2012 - 8:35 am | प्राजु

सुरुवात चांगली झाली आहे..
बाकी प्रतिक्रिया सगळी कथा वाचून झाल्यावरच.

धन्या..उत्तम चालू आहे..

चेतन कुलकर्णीजी..

उगाच चांगलं चाललेल्याला हिणवण्यात काय अर्थ आहे हे समजलं नाही.. तसंच करायचं तर कोणत्याही कथेच्या पहिल्या भागानंतर स्थूलमानाने त्याचे शक्य असलेले सर्व शेवट लिहून दाखवून त्यातली मजा काढून घेता येईल.. पण तसं कशाला करायचं?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Mar 2012 - 7:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

तसंच करायचं तर कोणत्याही कथेच्या पहिल्या भागानंतर स्थूलमानाने त्याचे शक्य असलेले सर्व शेवट लिहून दाखवून त्यातली मजा काढून घेता येईल

साफ असहमत !!!
त्यांना म्हणावे ब्राउ चा पहिला भाग वाच आणि शेवटचा गेस करून दाखव. करून दाखवला एक महिना मिशी काढून फिरेन मी ;-)

गवि's picture

9 Mar 2012 - 5:43 pm | गवि

हॅ हॅ हॅ... मुळात मिशा न ठेवता असल्या पैजा मारणं सोपंय मेहेंदळे ... ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Mar 2012 - 10:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

हीहीही !!! ठीक आहे. एक महिना मिशी ठेवून फिरेन. पण आधी सिद्ध करावे लागेल की पूर्ण न वाचता गेस केले आहे. :-)
असो, मुळात पैज घेणारच नाही कुणी. रंगपंचमी ची वाट बघताहेत बहुतेक सगळे*. ;-)

*अर्थ नाही कळला तर खरडीतून किंवा व्यनितून विचारा.

आक्षी हेच मी माझ्या तिन्ही कथांबाबत विचारणार होतो, पण झैरात झैरात असं झालं असतं, असो. नुसत्याच कट्ट्यांच्या गप्पांनी खरडवही भरली तर नजर नाय का लागणार. ?

जेनी...'s picture

27 Feb 2012 - 11:17 am | जेनी...

अरे लिहुद्यना त्याना :(

धनाजिराव पट्टापट्टा लिहा बघु :P

स्वातीविशु's picture

27 Feb 2012 - 11:20 am | स्वातीविशु

वाचत आहे. पुढील भाग लवकर येऊद्या.
पु.ले.शु. :)

धन्या लिहित रहा ..
वाचातोय ..

@ चेतन कुलकर्णी :
रिप्लाय चुकीचा आहे ..
बाकी कुप्रसिद्धी मिळवुन उगाच कसे ही करुन नाव चर्चेत ठेवण्याची उक्ती छान आहे तुमची असे आपल्या रिप्लाय वरुन वाटत आहे.
चालायचेच ..
समजुन घ्या .. नसेल समजत तर चालु द्या ..

वपाडाव's picture

27 Feb 2012 - 3:29 pm | वपाडाव

धन्या = इथपर्यंत छान जमली आहे...
५० राव = दे घुमाके...
@च्याय्ला... गणेशासोबत सहमत होण्याची पैलीच वेळ... चालु द्या...

चान आहे.
पण जर कथा पूर्ण नाही झाली तर नाकावर दोन ठोसे मिळतील.इथले सगळे लेखक क्रमश: लिहितात आणि गुल होतात.
उरलेला प्रतिसाद पुढच्या भागात.

पण जर कथा पूर्ण नाही झाली तर नाकावर दोन ठोसे मिळतील.

तै, कथेचे चार भाग लिहून कथा संपलीसुद्धा. तुम्ही अजून कथेचा पहिला भाग वाचून पुढचे लिहा म्हणताय.

अशाच पद्धतीने (इतरांची) लग्नं जमवत असाल तर अवघड आहे. ;)

असो, कथेचा हा भाग आवडला असेल, तर पुढचे भाग जरुर वाचा आणि तुमचे मत सांगा. तुमच्याच लाईनमधली ष्टोरी आहे. :)