गीतगुंजन - ७: 'Thriller' -> Michael Jackson

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
26 Dec 2011 - 3:20 pm

गीतगुंजन - ६
गीतगुंजन - ५
गीतगुंजन - ४
गीतगुंजन - ३
गीतगुंजन - २
गीतगुंजन - १

मागच्या एका धाग्यामध्ये ऐंशीच्या दशकात पाश्चात्य संगीतामध्ये अवतरलेल्या मायकल जॅक्सन नावाच्या गारुडाचा उल्लेख आलेला होता. भारतामध्ये संगीतात विशेष प्राविण्य दाखवलेल्या व्यक्तीला गंधर्व किंवा गंधर्वाचा अवतार समजलं जातं. मायकलही एक असाच गंधर्व होता पण काहीसा शापित गंधर्व! प्रचंड हरहुन्नरी आणि जाणकार संगीतकार. त्याचा जन्मच संगीतावर प्रेम करणार्‍या कुटुंबात झालेला. त्याचे मोठे भाऊ नि बहिण सगळेच संगीताचे जाणकार तसेच वडिलही. पण हे वडिल नको इतक्या कडक शिस्तीचे असल्याने मायकलचे बालपण फार आनंदात गेले नाही.

सुरूवातीला मायकलने आपल्या मोठ्या भावांबरोबर सांगीतिक कार्यक्रमात भाग घेणे चालू केले. त्यांचा जॅक्सन ५ नावाचा ग्रूप खूप प्रसिद्ध झाला. वयाने सगळ्यात लहान असूनही जॅक्सन ५ चा मायकेल म्होरक्या गायक (लीड सिंगर) बनला. त्याची लोकप्रियता चिकार वाढली. तरी त्याच्या वडिलांचा कडक शिस्तीचा बडगा कमी झाला नाही. प्रसंगी लहानग्या मायकलवर हात उचलायलाही ते कमी करत नसत. मायकलच्या वाढत्या वयात या गोष्टीचा त्याच्या मनावर खूप परिणाम झाला असं तो सांगायचा पण अर्थात वडिलांच्या कडक शिस्तीतल्या रियाजामुळेच पुढे त्याला संगीतामध्ये अभूतपूर्व यश मिळवता आलं हेही तो नमूद करायचा.

तो सज्ञान झाल्यावर त्याने जॅक्सन ५ हा भावांचा ग्रूप सोडून वैयक्तिक एकल गायनाला सुरूवात केली. ऐंशीच्या दशकापासून त्याने एकाहून एक सरस गाणी द्यायला सुरूवात केली आणि लवकरच तो 'किंग ऑफ पॉप' म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने पाश्चात्य संगीतात, विशेषतः पॉप संगीतात अनेक प्रयोग केले. त्याच्या आवडत्या संगीताला बॅले, कॉयर, आर् अ‍ॅण्ड बी, रॅप, जॅझ, ब्लूज् आणि डिस्को अशा विविधांगी संगीताची जोड देऊन नवी फंकी स्टाईल बनवली. त्याचप्रमाणे या सगळ्यावर कडी केली ती त्याच्या अप्रतिम नृत्य शैलीने! नाचणार्‍या आणि न नाचणार्‍यालाही आपल्या तालावर थिरकवायची नृत्यशैली! त्याच्या टिपेच्या अवाजातली गायकी, त्याची जबरदस्त नृत्यशैली, त्याची साध्या साध्या आणि कोणालाही समजतील अशा शब्दांची गाणी आणि त्याचं त्या गाण्यांचं सादरीकरण या सार्‍यांचा परिणाम त्याची 'लार्जर दॅन लाईफ' प्रतिमा बनण्यात झाली. केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते निर्माण झाले.

मायकल जॅक्सन एक उत्तम कलाकार होता आणि त्याचवेळेला एक हुशार प्रेझेन्टर होता. त्याचं संगीत कसं सादर व्हावं याचा तो खूप बारकाईने विचार करायचा. त्याने स्वतः त्याच्या गाण्यांचे विडिओ बनवण्याचे कष्ट घेतल्याने ते आजही तितकेच नाविण्यपूर्ण वाटतात.

१९८२ साली त्याने गायलेल्या एका गाण्यामध्ये मायकलचे सगळे गुण प्रकर्षाने उठून दिसतात आणि एखादा कलाकार आपली कला लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी म्हणून किती कष्ट घेऊ शकतो आणि प्रत्येक गोष्टीचा किती सूक्ष्म विचार करून ती सादर करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून या गाण्याकडे पाहता येतं. हे गाणं आहे, 'Thriller'.

रॉड टेंपर्टनने लिहिलेल्या आणि संगीत दिलेल्या या गाण्याची निर्मिती क्विन्सी जोन्सची होती आणि सादरकर्ता गायक होता मायकल जॅक्सन. त्याच्या याच नावाच्या अल्बममधलं हे शेवटचं गाणं होतं. सुरूवातीला हे गाणं 'Starlight' नावानं ओळखलं जायचं पण क्विन्सीने रॉडला नवीन नाव सुचवायला सांगितलं आणि त्याने सुचवलं 'Thriller', ज्या नावाने पुढे पूर्ण अल्बमच ओळखला गेला.

'Thriller' चं गीत एखादी भयकथा वाचावी असंच होतं आणि त्यातलं संगीतही अगदी त्याला साजेसं. यात दरवाजा बंद व्हायचे आवाज होते, वादळी वार्‍याचे आवाज होते, लाकडी पृष्ठभागावर बूट घालून चालल्यावर येणारे टॉक टॉक असे आवाज होते, कुत्र्याच्या रडण्याचे आणि अगदी खिडक्यांची तावदानं फुटण्याचेही आवाज होते. या गाण्याला सुरूवातीपासून शेवटपर्यंत सिंथसायझरवर एक बॅसलाईन दिलेली आहे. ही बॅसलाईन गाण्याबरोबर आपला सतत पाठलाग करते. त्यावर मायकल आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजात गाणं सादर करतो. 'Thriller' मध्ये हे जितकं उत्तम सादर झालंय तितकंच उत्तम झालंय १९४० - ५० च्या दशकातल्या, आपल्या भारदस्त आणि कमावलेल्या आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या विन्सेन्ट प्राईस या नटाच्या आवाजातलं नॅरेशन. ते देखिल एखादं गद्य-गानच असावं असंच ऐकू येतं आणि या सॉलिड गाण्याची परिणामकारकता जास्तच वाढवतं.

एखाद्या भयकथेमध्ये जे जे काही अपेक्षित असतं ते सर्व या गाण्यात आणि त्याच्या संगीतात उपलब्ध होतं आणि ते मस्तच होतं पण या सगळ्यावर कडी केली ती मायकल आणि जॉन लेंडिस यांनी बनवलेल्या 'Thriller' च्या म्युझिक विडिओने.

सुमारे दहा लाखभर बजेटच्या या विडिओला 'Michael Jackson's Thriller Movie' असंच नाव दिलं गेलं. मूळ गाण्यापेक्षा हा चित्रपट दुप्पट लांबीचा होता. लेंडिस आणि मायकलने मिळून याची पटकथा लिहिली आणि दिग्दर्शन लेंडिसने केलं. यात मायकल स्वतः प्रमुख भूमिकेत होता आणि ओला रे ही त्याची नायिका होती. भयपट बघणारे मायकल आणि ओला, तो चित्रपट अर्धवट सोडून बाहेर पडतात आणि रात्रीच्या सुनसान रस्त्यावरून जाताना कबरीतून बाहेर पडलेल्या झाँबींच्या तावडीत सापडतात. या विडिओचं वर्णन करण्यापेक्षा तो प्रत्यक्ष बघणंच केव्हाही उत्तम! तेव्हा आनंद घ्या, मायकल जॅक्सनच्या 'Thriller' गाण्याचा आणि त्याचबरोबर त्याच्या 'Michaela Jackson's Thriller' या विडिओचाही.

'Thriller' वर पुरस्कारांची बरसात झाली. २०११ सालच्या जुलैत 'टाईम मॅगझिन'ने 'Michael Jackson's Thriller' या विडिओचा समावेश जगातल्या सर्वोत्तम ३० विडिओंमध्ये केला.

हे 'Thriller' गीत -

Michael:
It's close to midnight and something evil's lurking in the dark
Under the moonlight, you see a sight that almost stops your heart
You try to scream but terror takes the sound before you make it
You start to freeze as horror looks you right between the eyes
You're paralyzed

You hear the door slam and realize there's nowhere left to run
You feel the cold hand and wonder if you'll ever see the sun
You close your eyes and hope that this is just imagination, girl!
But all the while you hear the creature creeping up behind
You're out of time

They're out to get you, there's demons closing in on every side
They will possess you unless you change that number on your dial
Now is the time for you and I to cuddle close together, yeah
All through the night I'll save you from the terror on the screen
I'll make you see

That this is thriller, thriller night
'Cause I can thrill you more than any ghost would ever dare try
Thriller, thriller night
So let me hold you tight and share a
Killer, diller, chiller, thriller here tonight

'Cause this is thriller, thriller night
Girl, I can thrill you more than any ghost would ever dare try
Thriller, thriller night
So let me hold you tight and share a killer, thriller, ow!

(I'm gonna thrill ya tonight)

Vincent Price:
Darkness falls across the land
The midnight hour is close at hand
Creatures crawl in search of blood
To terrorize y'alls neighborhood

And Whosoever Shall Be Found
Without The Soul For Getting Down
Must Stand And Face The Hounds Of Hell
And Rot Inside A Corpse's Shell

The foulest stench is in the air
The funk of forty thousand years
And grizzly ghouls from every tomb
Are closing in to seal your doom

And though you fight to stay alive
Your body starts to shiver
For no mere mortal can resist
The evil of the thriller

Michael:
That this is thriller, thriller night
'Cause I can thrill you more than any ghost would ever dare try
Thriller, thriller night
So let me hold you tight and share a
Killer, diller, chiller, thriller here tonight

'Cause this is thriller, thriller night
Girl, I can thrill you more than any ghost would ever dare try
Thriller, thriller night
So let me hold you tight and share a killer, thriller, ow!

'गीतगुंजन'चं हे ७ वं पुष्पं तुम्हा सर्वांना नक्की आवडेल अशी आशा आहे.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

28 Dec 2011 - 2:03 am | आत्मशून्य

जर सचिनला क्रिकेटचा देव म्हटलं तर मायकेल जॅक्सन संगित मनोरंजनाचा परमेश्वर आहे. बाकि ति ओला फ़ारच गोड दिसते व्हिडिओत. मस्त चाल सुरेख ठेका अप्रतिम काव्य एकुणच जिव ओतुन केलेलं तडाखेबंड सादरिकरण. गाणं कसलहि असो कोणत्यहि प्रसंगावर असो... मायकेल जॅक्सन रॉक्स! डॉम सेल्ड्न, डर्टि डाएना, दे डोंट केर अबॉट अस, टु बॅड, रॉक्क विद यु, बेन, जॅम, हु इज इट, हिल द वर्ल्ड, यु रॉक माय वर्ल्ड, 2000 वॉट्स, बिट इट, स्क्रिम ह्या किती नावं घ्यायची... अख्खा मायकेल जॅक्सनच अप्रति
मायकेलला साश्टांग दंडवत ! न भुतो: न भविषती: . (संगित क्षेत्रात पुन्हा कोणि असा प्रभुत्वशालि होणे नाही. )

प्रचेतस's picture

26 Dec 2011 - 3:40 pm | प्रचेतस

मायकेल जॅक्सन एकाच भागात उरकू नका. त्याची अजूनही गाणी येऊ द्यात.
अर्थ साँग, ब्लॅक ऑर व्हाईट, लिटल सुझी वर पण येऊ द्यात काही शब्द.

अगदी.. मायकेल जॅक्सन या लेजंडवर एका गाण्यात संपवताच येणार नाही. बॅड, वानाबी स्टार्टिंग समथिंग, द वे यू मेक मी फील, बिली जीन, गिव्ह इन टू मी, व्हाय ट्रिप ऑन मी, रिमेंबर द टाईम, स्मूथ क्रिमिनल, विल यू बी देअर, दे डोंट केअर अबाउट अस..
गाण्यांच्या आठवणींचे झरेच फुटताहेत..

खूप डीटेल माहिती दिली आहेस प्रासभाऊ, पण अजून फक्त गाण्यांसाठी दुसरा भाग हवाच्...वल्लीशी सहमत.

अन्या दातार's picture

26 Dec 2011 - 3:41 pm | अन्या दातार

मला त्याचे डेंजरस आवडले होते. हे पुष्पही चांगलेच झाले आहे हे वे सां न ल :)

मराठी_माणूस's picture

26 Dec 2011 - 9:22 pm | मराठी_माणूस

व्हीडीओ गलीच्छ वाटला

तसाच अपेक्षित आहे.. बीभत्स रसवाले हॉरर आहे हे.. :)

पियुशा's picture

27 Dec 2011 - 12:29 pm | पियुशा

आपल आवड्त गाण आहे हे :)

जयंत कुलकर्णी's picture

27 Dec 2011 - 7:46 pm | जयंत कुलकर्णी

एलव्हिस शिवाय ही मालिका चालूच कशी झाली !
संपादकांना विनंती ही लेखमालिका प्रास यांना ताबडतोब "०" वा भाग लिहायला सांगावा आणि त्यात त्यांनी एलव्हिसवर लिहावे.
:-)

प्रास's picture

27 Dec 2011 - 8:49 pm | प्रास

आम्हीही मिपावर आमच्या संगीत विषयक लिखाणाचं श्रीफळ एल्विसच्या नावानेच वाढवलेलं आहे. द किंगला मुजरा करूनच आमची सांगीतिक मुसाफिरी सुरू झालीय.

एकदा तिथे नजर टाकून तर बघा....

जयंत कुलकर्णी's picture

27 Dec 2011 - 8:59 pm | जयंत कुलकर्णी

लगेचच नजर टाकली आणी कानही लावले. धन्यवाद ! आता त्या लेखाने सुरवात केली असे म्हटले आहे म्हणजे काही प्रश्नच नाही !
धन्यवाद ! पण या लेखाची लिंक या लेखमालिकेवर दिलीत तर बरे होईल. एलव्हिस व सिनात्राची एकूण एक गाणी अत्यंत चांगल्या प्रतीची माझ्याकडे आहेत. हे आपले सहजच सांगितले.......

प्रास's picture

27 Dec 2011 - 9:10 pm | प्रास

एलव्हिस व सिनात्राची एकूण एक गाणी अत्यंत चांगल्या प्रतीची माझ्याकडे आहेत.

तुमच्या घरी हल्लाबोल करण्याच्या अनेक कारणांच्या जंत्रीमध्ये आणिक एका कारणाचा अंतर्भाव झाला आहे हे इथे सविनयपूर्वक सांगू इच्छितो.

:-)

गीतगुंजन मालिकेचा हेतु, ज्या गाण्यांनी मला अपार आनंद दिलेला आहे त्यांची माहिती माझ्या रसिक मित्रांबरोबर वाटून घेणं हा आहे. एल्विसच्याच काय पण इतरही कलाकारांच्या गाण्यांना एकाच लेखात आवश्यक तो सन्मान मिळणं कठीण आहे. मग या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा त्यात आलेल्या आणि न आलेल्या गाण्यांचं रसग्रहण करता आलं तर उत्तमच, नाही का?

बाकी, लेखाच्या शेवटी आम्ही मिपावर केलेले लिखाणाचे आघात दिसतातच ;-)