✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गीतगुंजन - १९ : 'Piano Man'

प
प्रास यांनी
गुरुवार, 04/19/2012 - 12:32  ·  लेख
लेख
"बिली जोएल", अत्यंत संवेदनशील गीतकार, संगीतकार गायक आणि जबरदस्त पियानीस्ट. हजारो त्याच्या पियानो वादनावर फिदा आहेत नि मला खात्री आहे तुमचंही यावर दुमत नसावं. बिलीची कारकीर्द जवळपास अर्ध्या दशकभराची. त्याने स्वत: एकट्याने लिहिलेली त्याची ३३ गाणी चार्टसमध्ये वरच्या पाय-यांवर स्थापित आहेत. (पहिल्या ४० मध्ये.) त्याला २३ ग्रॅमी नामांकनं आहेत तर त्यापैकी ६ वेळा तो ग्रॅमी जिंकला आहे. त्याची जगभरातली रेकॉर्ड्स-विक्री १५ कोटींच्या वर झालेली आहे. साँग-रायटर्स हॉल ऑफ फेम, रॉक एण्ड रोल हॉल ऑफ फेम इत्यादींमध्ये सामील केला गेलेला बिली, बिल-बोर्ड मासिकाच्या जगातील सर्वोच्च कलाकारांच्या मांदियाळीत २३व्या क्रमांकावर आहे.
त्याचे स्वत:चे मत तो त्याच्या गाण्यांत नियमितपणे व्यक्त करतो. त्याचे आनंदाचे, दु:खाचे अनुभव तो गाण्यात गुंफतो. त्याचं पाहिलं प्रसिद्ध गाणं होतं, १९७३ सालचं Piano Man. एका गीत-संगीतकाराच्या दृष्टीने आजूबाजूचे जग या गाण्यात फार सुंदर प्रकारे दर्शवले आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की गाण्यात वर्णलेला हा गीत-संगीतकार दुसरा तिसरा कुणी नसून बिली जोएल स्वत:च होता. झालं काय होतं, एक कलाकार आपल्या कारकिर्दीत व्यावसायिक म्हणून ज्या चुका करतो त्या चुका बिलीनेही केल्या. फार कमी कलाकारांना स्वत:चा बिझनेस स्वत:च सांभाळता येतो. बिली त्यात कमी पडला. न्यूयॉर्कहून तो लॉस एंजलीसला 'फॅमिली प्रॉडक्शन' नावाच्या रेकॉर्ड लेबल बरोबर कॉन्ट्रॅक्ट साईन करून आला. त्याचा या कंपनीबरोबरचा पहिला अल्बम, कंपनीच्या चुकीमुळे, बाजारात पार धुतला गेला. बिलीला 'कोलंबिया रेकॉर्ड्स' या दुस-या कंपनीशी नवा करार करायचा होता पण आधीच्या करारातील जाचक अटींमुळे सर्व अडचणीचं झालेलं. मग बिली काही दिवस 'बिली मार्टिन' या नावाने गुपचूप एल.ए. मधल्या एका बारमध्ये लाउंज पियानिस्ट म्हणून काम करू लागला आणि दरम्यान 'कोलंबिया रेकॉर्ड्स'चे वकील त्याला आधीच्या करारातून सोडवण्याच्या कामाला लागले. या बारमध्ये काम करताना आपल्या अवतीभवती पाहिलेल्या लोकांवरून आणि स्वत:च्या त्या वेळच्या अगतिक परीस्थितीमधल्या अनुभवावरून बिलीने गाणं लिहिलं, 'Piano Man'. स्वत:सकट अनेकांमध्ये त्याला फलद्रूप न झालेल्या आकांक्षा त्या काळात दिसल्या. त्यावेळचे त्याच्या आजूबाजूचे बार-टेंडर्स, वेट्रेसेस, बारमध्ये येणारी मंडळी यांचे आणि बिलीचे स्वत:चे अनुभव-इच्छा एकत्र गुंफून त्याने हे अप्रतिम गाणं दिलं आहे. संगीतामध्ये मुख्यत: पियानोचा अप्रतिम वापर हे या गाण्याचा विशेष आहे. सुरुवात जॅझ प्रकारच्या पियानो वादनाने होऊन पुढे बिलीने आपल्या सुरेख पियानो आणि हार्मोनिका वादनाने आणि गाण्याच्या मस्त मेलडीने चार चांद लावले आहेत.
'Piano Man' हे गीत असं आहे - It's nine o'clock on a Saturday the regular crowd shuffles in There's an old man sitting next to me Makin' love to his tonic and gin He says, Son can you play me a memory I'm not really sure how it goes But it's sad and it's sweet and I knew it complete When I wore a younger man's clothes [Chorus] La la la de de da la la de de da da dum Sing us a song, you're the piano man sing us a song tonight Well, we're all in the mood for a melody And you've got us feelin' alright Now John at the bar is a friend of mine He gets me my drinks for free And he's quick with a joke or to light up your smoke But there's someplace that he'd rather be He says Bill, I believe this is killing me As the smile ran away from his face Well I'm sure that I could be a movie star If I could get out of this place La la la de de da la la de de da da dum Now Paul is a real estate novelist Who never had time for a wife And he's talking with Davy who's still in the navy And probably will be for life And the waitress is practicing politics As the businessmen slowly get stoned Yes, they're sharing a drink they call loneliness But it's better than drinking alone Sing us a song, you're the piano man Sing us a song tonight. Well, we're all in the mood for a melody And you've got us feelin' alright. It's a pretty good crowd for a Saturday, And the manager gives me a smile 'Cause he knows that it's me they've been coming to see To forget about life for awhile. And the piano sounds like a carnival And the microphone smells like a beer And they sit at the bar and put bread in my jar And say "Man, what are you doin' here?" La la la de de da la la de de da da dum Sing us a song, you're the piano man Sing us a song tonight. Well, we're all in the mood for a melody And you've got us feelin' alright. गीतगुंजन १८ चित्र आंतरजालावरून आणि विडिओ यू ट्यूब वरून साभार.

Book traversal links for गीतगुंजन - १९ : 'Piano Man'

  • ‹ गीतगुंजन - १८ : November Rain
  • Up
  • गीतगुंजन - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
2780 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

सुंदर गाणे

बॅटमॅन
गुरुवार, 04/19/2012 - 12:52 नवीन
सुंदर गाणे :)
  • Log in or register to post comments

बिली जोएल हा मनुष्य अफाट

गवि
गुरुवार, 04/19/2012 - 12:59 नवीन
बिली जोएल हा मनुष्य अफाट आहे. एका वेळी एकाच गाण्याचा परिचय गीतगुंजनमधे येत असल्याने अपटाऊन गर्ल.. रिव्हर ऑफ ड्रीम्स.. वी डिडंट स्टार्ट द फायर.. अशा खूप गाण्यांना मागे ठेवावं लागलं असणार तुला. अजूनही एखाद्या अधूनमधून रिट्रो गाणी लावणार्‍या ठिकाणी (उदा. माँडेगार, कुलाबा) अपटाऊन गर्ल हमखास ऐकू येतं आणि मूडच बनतो एकदम.. परिचयाबद्दल धन्यु. पियानो मॅनची बॅकग्राउंड माहीत नव्हती..
  • Log in or register to post comments

या लेखा बद्दल धन्यवाद.

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 04/19/2012 - 15:30 नवीन
या लेखा बद्दल धन्यवाद ते गाण माहिती आहे का हो तुम्हाला ?. मला बिलकूल आठवत नाही आहे. एक म्हातारा (आंधळा) असाच एका बार मधे बसलेला असतो आणि त्याचा मुलगा गाणे गात असतो आणि मग स्वतःची ओळख देतो.... असेच काहितरी...
  • Log in or register to post comments

And the piano sounds like a

अनुप ढेरे
गुरुवार, 04/19/2012 - 16:09 नवीन
And the piano sounds like a carnival And the microphone smells like a beer And they sit at the bar and put bread in my jar And say "Man, what are you doin' here?" या ओळी कहर आहेत...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा