हे ssss इथं

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in जनातलं, मनातलं
24 Oct 2011 - 11:38 am

आपण खुपदा एखाद्याशी बोलताना विचारतो कि अमुक अमुक रस्ता, बिल्डींग इ. कुठे आहे? उत्तर " हे इथंच तर आहे".
..हे इथच म्हणजे नक्की कुठं? काही दिशा वगैरे काही नाही....बऱ्याचदा एखादा पत्ता सांगतानासुद्धा लोक "हे इथच " असली भाषा वापरतात, आता याला काही अर्थ आहे का?
एकदा माझा एक काका दुसऱ्या शहरातून मुंबईत आला होता आणि स्टेशनावरून घरी यायला बसमध्ये चढला....तिसऱ्या थांब्यावरच घर होते पण त्याला काही थांब्याचे नाव आठवेना..
कंडक्टरने "कुठं ?" विचारल्यावर ह्याने "हे ssss इथं " सांगितलं आणि त्याने बरोबर तिकीट दिलं...

अजून एक किस्सा आठवला...पुण्यातला..
मी पुणे university त एका कामासाठी गेले होते आणि हवा तो विभाग कुठे आहे ते माहिती नसल्याने म्हंटल जरा विचारून सापडेल...तर एका इमारतीत गेले आणि एका प्यूनला विचारला...त्याने हि पुढची इमारत असं सांगितल्यावर "त्या पुढच्या " इमारतीत गेले आणि पार अगदी तिसऱ्या मजल्यावर जाऊनसुद्धा कोणी कुत्रासुद्धा, माफ करा कुत्रे तिथं बरेच होते तेव्हा कोणीच माणूस सापडेना..म्हणून तसेच फिरत फिरत हि नाही ती असेल करीत आजूबाजूच्या इमारतीत गेले...त्यातल्याच एका ऑफिसातल्या बाईंनी एका इमारतीत जा सांगितले आणि कसं जायचं (म्हणजे इथून उजवीकडे मग डावीकडे )ते सांगितलं....मग तसं गेले...तर तिसऱ्याच ठिकाणी...शेवटी वैतागून म्हंटल एखाद्या विद्यार्थ्याला नाहीतर रस्त्यावरच्या कोणालातरी विचारावं आणि एक महाशय जे शिक्षक असू शकतात हि शंका आली त्यांना विचारलं...त्यांनी काही प्रश्न विचारून मला हवा तो विभाग कोणता आणि इथे कसं जायचं ते सांगितलं....इथे गेले...

जरा आत गेल्यावर लक्षात आलं कि पहिल्यांदा ज्या ठिकाणी (जिथून प्युनने "हि पुढची" सांगितलं ) तिथंच स्वारी परत आलेली. इतका संताप आला आणि मग हसू आलं. त्या प्युनला झापावं तर तो मेला कुठं दिसेना. तो विभाग तळात होता. मग तिथल्या एका ऑफिसात जाऊन एका तरुण प्रोफेसरला भेटले आणि काम सांगितलं. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि अजून एका ठिकाणी जायला सांगितलं. मी पत्ता विचारला तर इमारतीचं नाव देऊन महाशय म्हंटले कि "हि इथेच ए". मग मात्र राहवलं नाही..." अहो काय लावलंय? इथ यायच्या आधी याच ठिकाणच्या एका प्युनने ती पुढची बिल्डींग म्हणून इथून पाठवलं. प्रत्येकजण हि इथंच ए करत होते आणि याच इमारतीभोवती गेला दीड एक तास तरी मी गोल गोल फिरतेय...जरा नीट सापडेल असं पत्ता सांगायला काय होतंय? " असं वसकले.

असो,
पण एकंदरीत एखाद्याला आपला पत्ता सांगायचा नसेल किंवा घरी सहजासहजी किंवा अगदीच घरी येऊ द्यायचं नसेल तर बिनदिक्कत सांगावे "अरे त्यात काय मी हे sssssss इथच तर राहते/तो " ,
त्याने शंका काढली कि "कसं यायचं?" तर जसं काही आपण अमिताभ बच्चनसारखे अगदी प्रसिद्ध आहोत असं भासवून
"अमुक अमुक स्टेशनावर ये आणि खाली उतरून कोणालाही विचार" किंवा " अमुक अमुक बस स्टॉपवर उतर आणि कोणालाही विचार ",

आणि जर आपल्याला कोणी अशा पद्धतीचा पत्ता सांगितला तर समजावे की कोणालाच तो माणूस किंवा पत्ता माहिती नाही...अन आपली भरपूर पायपीट होणार आहे....इतके करूनही नशीब जोरावर असेल तरच पत्ता सापडेल ...त्यामुळे असा कोणी पत्ता सांगत असेल तर त्यांनाच घरी बोलवावे आणि म्हणावे "एक फोन टाक, मी स्टेशनावर घ्यायला येते/तो" आणि एकदम घाई असल्याचे किंवा बस आल्याचे किंवा अचानक कोणीतरी ओळखीचे पण खूप काळ न भेटलेले दिसले असे करावे आणि जरी आपल्याकडे त्या ह्या ओरिजिनल वेळखाऊचा फोन नंबर नसला तरी " मी तुला फोन करतो/ते, आता खूप घाईत आहे " वगैरे सांगून पळावे.

प्रवाससमाजजीवनमानआस्वाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Oct 2011 - 12:01 pm | पैसा

शिल्पाचा लेख इतक्या दिवसानी पाहिला की नवीन लेखक म्हणून स्वागत करावं की काय अशा विचारात होते! ;)

आमच्या कोकणातल्या लोकाना सगळ्यानाच ही सवय आहे. "अमक्याचं घर कुठे?" म्हणून विचारलं की "हे इथंच!" असं उत्तर मिळतं. आमच्यासारखे अनुभवी लोक आता किमान २० मिनिटं चालायचं आहे हे समजून चुकतात. पण साक्षात द्दिल्लीतसुद्धा असाच अनुभव आला होता. प्रत्येकजण "बस, यहीं पे है" म्हणून सांगतोय!

ओळखीच्या कोणी असं केलं तर तुझा उपाय जालीम आहे, पण अशा दिल्लीवाल्यांचं काय करायचं?

चित्रा's picture

24 Oct 2011 - 7:30 pm | चित्रा

आज शिल्पाजींच्या प्रतिभेला हर आला आहे.

छान, लेख आवडला :-)

आत्मशून्य's picture

24 Oct 2011 - 7:42 pm | आत्मशून्य

नेहमीप्रमाणे पूणे मूबैची उदाहरणे सूखावून गेली....

शिल्पा ब's picture

24 Oct 2011 - 9:19 pm | शिल्पा ब

नाईलाज आहे...या दोन शहरांशिवाय फारसं कुठं जाणं येणं नाही.

बाकी सगळ्यांना धन्यवाद.

रेवती's picture

24 Oct 2011 - 7:46 pm | रेवती

माझा अनुभव मात्र वेगळा आहे.
माझ्याकडे एक कॉलेजची मैत्रिण आली होती.
सगळा पाहुणचार घेऊन झाला.
"छान वाटलं, मजा आली भेटून " वगैरे झालं.
"ए, आता माझ्याकडे नक्की यायचं गं!"
मी हो म्हटलं. नंतर एकदा ती रस्त्यात भेटली. गप्पा झाल्या.
"ए, आता माझ्याकडे ये गं एकदा!"
"तू कुठं राहतेस? माझा प्रश्न.
एका बिल्डींगच्या बाहेर उभं राहून अर्धा तास गप्पा झाल्या होत्या, त्या बिल्डिंगकडे बोट दाखवून "ही काय, याच बिल्डींगमध्ये!" तीचं घर खरच अगदी इथंच होतं.;)

किस्से आवडले.

नेहमीचा अनुभव आहे हे इथे

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Oct 2011 - 1:05 pm | बिपिन कार्यकर्ते

मला असे भोंगळ लोक अज्जिबात आवडत नाहीत. पुण्यात (आणि अजूनही काही गावांमधे) मला 'वरच्या अंगाला' 'खालच्या अंगाला' असं म्हणून रस्ता दाखवणारे लोक भेटले. असह्य होतं. नुसतं एवढं सांगून दिशा वगैरे कशी कळणार? आणि काही लोक तर बरोबर विरुद्ध दिशेला हात दाखवून दिशा समजवतात. त्यांचा तर रांझ्याचा पाटिल करावासा वाटतो!

शिल्पातैंचा लेख य वर्षांनी आला त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

>>त्यांचा तर रांझ्याचा पाटिल करावासा वाटतो!

हॅ हॅ हॅ..

आमच्याकडे याला, खात्या हाताला आणि धुत्या हाताला असं म्हणतात.. असो.

याच्या विरूद्धही टोकं असतात,

आमचा एक मित्राला दुधाचा रतीब चालू करायचा होता, त्यानं बिचार्‍या दुधवाल्याला "क्ष चौकातून दक्षिणेला जाताना पुर्वेला पहिला वळण, ३०० मिटरवरची पश्चीमेची इमारत" असा काहीसा पत्ता सांगीतला होता, अजूनही तो मित्र स्वत:वर चडफडत सकाळी जाऊन दुधाची पिशवी स्वतः आणतो.

अवांतर - माणूस हास्यास्पद गोष्टीला चिडू लागला म्हणजे वय झालं असं समजावं. ;)

धमाल मुलगा's picture

26 Oct 2011 - 4:36 pm | धमाल मुलगा

ओये गुरुऽऽऽ....
शेवटच्या बॉलला काय सिक्सर मारलाय! ओये जियो मेरे शेर.... ;)
-धमालसिंग सिध्दू.

ह्म्म... आता मला कळलं, ह्यो बिपीनदा पत्ते विचारायला मला फोन का करतो ते... उत्तर सोप्पंय, मी पुणेकर नाहीय्ये! :P

अनिता's picture

26 Oct 2011 - 9:28 am | अनिता

बर मग?

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Oct 2011 - 10:14 am | चेतन सुभाष गुगळे

अनिताजी,

मानलं बुवा. तुमची तीव्र स्मरण शक्ती (http://www.misalpav.com/node/19320#comment-343700)
आणि हजरजबाबी पणा या दोन्ही गोष्टींना.

त्यांनी नेमकं काय लक्षात ठेउन प्रतिसाद दिला हे तुम्हाला काय माहीती? त्यापेक्षा तुमचीच असल्या बाबतीत स्मरणशक्ती भयंकर चांगली आहे याची नोंद आम्ही केव्हाच घेतली आहे.
(आमचे असे आणि तसे पण प्रतिसाद सगळीकडे विखुरलेले आहेत. )

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Oct 2011 - 11:10 am | चेतन सुभाष गुगळे

<< त्यांनी नेमकं काय लक्षात ठेउन प्रतिसाद दिला हे तुम्हाला काय माहीती? >>
त्यात माहिती असायची काय गरज? अगदी तेच शब्द वापरल्यावर आधी त्याच प्रतिक्रियेची आठवण होणारच की आणि समजा तसं नसेल तर त्या खुलासा करतीलच की. मुख्य म्हणजे मला त्यांच्या त्या समयोचितपणाचं कौतूक वाटलं आणि मी ते व्यक्त केलं. तुम्हाला दुखावण्याचा उद्देश नव्हता हे मुद्दाम नमूद करीत आहे.

<< त्यापेक्षा तुमचीच असल्या बाबतीत स्मरणशक्ती भयंकर चांगली आहे याची नोंद आम्ही केव्हाच घेतली आहे. >>
असल्या बाबतीत म्हणजे तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे ते स्पष्ट होत नाही तरी खुलासा करावा.
माझी स्मरणशक्ती सर्वच गोष्टींकरता सारखीच तीव्र आहे आणि त्या माझ्याकरिता तरी अभिमानाचीच बाब आहे. तुम्हाला भीती वाटावी असं त्यात काय आहे? सबब आपण भयंकर शब्द योजण्याचे प्रयोजन समजत नाही.

<< आमचे असे आणि तसे पण प्रतिसाद सगळीकडे विखुरलेले आहेत >>
असे आणि तसे म्हणजे नेमके कसे हो? बाकी गेला बराच काळ तुम्ही अनेक लेखांवर प्रतिसाद देत होतात. आता तुमचा स्वत:चा लेखही प्रकाशित केलाय. इतके दिवस इतरांच्या काचेच्या घरावर दगडं मारलीत आता तुमच्या काचेच्या घरावर ही दगडं पडणारच. तुमच्या प्रतिसादरूपी दगडांचा सर्वात भयंकर फटका माझ्याच धाग्यांना बसलाय, पण तरीही मी काही इथे तुमच्या काचेवर दगडं मारायला आलो नव्हतो. हां आता इतर कुणी दगड मारला तर त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहवलं नाही इतकंच.

बाकी तुम्ही http://www.misalpav.com/node/19448#comment-347091 असले प्रतिसाद देऊन पुन्हा त्यात जसं करू नये म्हणताय तसंच करताय हे पाहून गंमत वाटली.

शिल्पा ब's picture

26 Oct 2011 - 12:27 pm | शिल्पा ब

तुमच्या सामान्यज्ञानाचं, विनोद बुद्धीचं आम्हाला प्रचंड कौतुक वाटत असतं अन त्यामुळेच ही भीती बरं का!!

बाकी प्रतिसादरुपी दगड वगैरे शब्द छान. आता तुमचे घरंच काचेची तर जरा धक्का लागला की फुटणारच नै का!! आमच्या घरावर वाट्टेल तितकी दगडं मारा आम्ही घरात साठा ठेवलेला आहे त्यामुळे अज्जिबात काळजी नै अन घराला काचंच नसल्याने कै फुटायची भीती तर नैच नै.

असो, हल्ली शाळेत रंग ओळखायचं पण शिकवतात म्हणे...

चेतन सुभाष गुगळे's picture

26 Oct 2011 - 12:44 pm | चेतन सुभाष गुगळे

<< प्रचंड कौतुक वाटत असतं अन त्यामुळेच ही भीती बरं का!! >>

<< आमच्या घरावर वाट्टेल तितकी दगडं मारा आम्ही घरात साठा ठेवलेला आहे >>

कौतुकाबद्दल धन्यवाद बरं का, पण भीती अजिबात वाटून घेऊ नका. तुम्ही घरात दगडांचा साठा करून ठेवलाय त्यावरून तुमचा हेतू लक्षात आला पण आम्हाला तरी बिलकूल दगडं मारायची नाहीयेत. म्हणजे तशी क्षमता बरीच आहे हो पण इच्छा अजिबात नाहीये. काय आहे की, बर्‍याच कालावधी नंतर तुमचा धागा इथे प्रकाशात आलाय. त्यात आज प्रकाशाचा उत्सव. उगाच आपल्या नस्त्या वादावादीमुळे तुमच्या धाग्याला बाधा पोचायला नको (तुम्ही आमच्या धाग्याला पोचवली होती तशी). उलट तुमच्या धाग्याला शतकी, सहस्त्री प्रतिसाद मिळो आणि त्यास कुठलीही हानी न होवो ही संपादक चरणी प्रार्थना.

आणि हो ... तुम्हाला दिवाळी, पाडवा, बकरीद, गुरू नानक जयंती, मोहरम, नाताळ, नववर्ष... झालंच तर तुमचा वाढदिवस या सगळ्या शुभेच्छा आताच देऊन ठेवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2011 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त.

हे इथं म्हणजे दहा बारा फूटापासून ते दोन पाच कि.मी अंतर असू शकतं. बिका म्हणतात तसे 'माथ्यावर' 'घाटाखाली' हे अंतर म्हणजे मी जवळ-जवळ दहा-बारा कि.मी समजून चालतो.

परसूंकी बाते सारखं हे इथं चा अर्थ आहे असे वाटले.

-दिलीप बिरुटे

इंटरनेटस्नेही's picture

26 Oct 2011 - 2:47 pm | इंटरनेटस्नेही

शिल्पाजींचा हा लेख मिपावरील वाढत्या प्रगल्भतेचं लक्षण आहे असे निरीक्षण नोंदवतो.

धमाल मुलगा's picture

26 Oct 2011 - 4:37 pm | धमाल मुलगा

_/\_
इंटेश्वरा, आमचा दंडवत स्विकार व्हावा!

इंटरनेटस्नेही's picture

26 Oct 2011 - 5:27 pm | इंटरनेटस्नेही

थँक्स! जे उस्फुर्तपणे सुचलं ते लिहीलं..!

धमाल मुलगा's picture

26 Oct 2011 - 5:39 pm | धमाल मुलगा

अर्‍ये पण इत्कं जड? :D

इंटरनेटस्नेही's picture

26 Oct 2011 - 5:52 pm | इंटरनेटस्नेही

;)

धमाल मुलगा's picture

26 Oct 2011 - 4:57 pm | धमाल मुलगा

पत्ते सांगण्याचे किस्से भारी! :)
पण बाकी, पत्ता सांगणं हीसुध्दा एक कलाच आहे असं मी मानतो. एकेक नमुने भेटतात. अगदीच वेळ जात नसेल तर सरळ एखादा चिटोरा हातात धरुन बावरलेल्या चेहर्‍यानं रस्त्यावर फिरत लोकांना पत्ता विचारावा....झक्कास मजेत वेळ जातो.

कुणी, शिल्पाताईनी म्हणल्याप्रमाणं, 'हेऽऽ इथं' म्हणून बोळवण करतं, तर कुणी इतका तपशीलवार पत्ता सांगायला घेतं की, "बाबारे, पत्ता नको, पण तपशील आवर" अशी गत होते.
पध्दत म्हणजे अगदी, " हें पहां, आत्ता तुम्ही इथे ह्या चौकात उभे आहात, इथून सरळ खाली जा.."
खाली जा? काय पाताळात शिरायचं माणसानं? पण नाही, खाली जा म्हणजे खाली जा!
"पुढच्या चौकात अमुक एक दुकान लागेल...काय? अमुक एक दुकान.."
बरं, त्याच्या इथे का?
"नाऽही! नीट ऐका हो. त्या दुकानावरुन पुढे खाली जा, तिथे एक विष्णू की हनुमान की भोलेनाथ स्विट्स असं दुकान दिसेल..."
चला, म्हणजे अमुक एक दुकानानंतर आणखी पाताळात कोणत्याशा देवाच्या नावाचं मिठाईचं दुकान शोधा आधी...
"हां, तर त्या स्विट्सवाला दुकानाच्या वरच्या अंगाला एक गल्ली जाते.."
कर्माऽ...
"त्या गल्लीत एक सायकल रिपेअरचं दुकान आहे, तिथं बरेचजण गप्पा मारत बसलेले दिसतील.."
त्या तिथे आहे क्...
"हां! तर त्यांच्यापैकी कुणालाही विचारा...काय तो तुमचा पत्ता?"
एव्हढ्या भानगडीनंतर पत्ता विचारणाराच बेपत्ता! :D
अर्थातच, पत्ता सांगणारे गृहस्थ कोणत्या पेठेत रहात असावेत आणि त्यांचं वय काय असावं ते वेगळं सांगायची गरज नसावी. ;)

गावांमध्ये, खेड्यांमध्ये गेलात तर आणखी वेगळे अनुभव!

आपण विचारावं, "दादा, अमुक अमुक कुठंय?"
दादा सांगणार, " ह्येऽऽ कासराभर तं है. "
आता कासराभर म्हणजे काय ते आपल्याला कळत नाही, अन नक्की किती ते त्या दादालाही सांगता येत नाही...

एखादवेळी पत्ता विचारायला थांबलो तर रानातली फळं,/फुलं/ऊस पळवायला थांबले की काय असं वाटून अस्सल गावाकडच्या कचकचीत शिव्यांनी आपलाच पत्ता गुल होतो.

किंवा एखाद्या झाडाखाली थांबलेल्या गृहस्थाला विचारावं, "ओ मामा..अमुक अमुक कुणिकडं आलं होऽऽ?"
तर मामा एकदम तरतरी आल्यागत झपकन पुढं होतात, आणि, "कुठं? अमुक अमुक हितं जायचंय व्हय? चला की, दावतो!"
तुमची वरात एकदम इच्छित स्थानाच्या दारात!

थोडक्यात काय, कामाची गडबड नसेल तर पत्ते विचारावेत आणि ते सांगणार्‍याच्या शैलीची मजा घ्यावी!
क्काय म्हणता? :)

दादा कोंडके's picture

26 Oct 2011 - 5:25 pm | दादा कोंडके

बॅगलोरमध्ये काही वेगळे ठोकताळे आहेत.
खरं म्हणजे जुनं बँगलोर अतिशय प्लॅन्ड सिटी.
जयानगर (इथं त्याचा उच्चार जायनगर असं करतात), बीटीएम, कोरमंगला, जेपी नगर मध्ये "मेन" आणि "क्रॉस" माहीत असेल तर पत्ता शोधणं अवघड नाही पण इतर ठिकाणी गोची होउ शकते.
एरवी रिक्षावाल्यांचा राग येतो, पण पत्ता विचरायचा असेल तर यांच्या एव्हडा 'उपयुक्त प्राणी' कुणी नाही.
बँगलोर मध्ये "वॉकेबल" म्हणजे अंतर २-४ किलोंमिटर पर्यंत असू शकते. "फर्स्ट लेफ्ट", "थर्ड राईट" वगैरे सांगण्याची पद्धत आणि चौकाला सर्कल म्हणतात. पण तिथे जाताना वाटेत छोटसं बोळ असेल तर तो रस्ता समजायचा की नाही हे अनुभवानीच शिकावं लागतं!

स्मिता.'s picture

26 Oct 2011 - 6:40 pm | स्मिता.

जयनगर, बीटीएम, कोरमंगला, जेपी नगर हे जुन्या बंगलोराचे भाग कसे काय झालेत? मग मॅजेस्टिक आणि चिकपेटसारख्या भागांना काय म्हणायचं?
खरं तर बंगलोरात व्यवस्थित 'मेन्स' आणि 'क्रॉस' लिहिलेला पत्ता असेल तर तो शोधून काढणं फार अवघड नाही. बहुतेक ठिकाणी चौकोनी ब्लॉक्स आहेत आणि रस्ते काटकोनात छेदणारे आहेत. प्रत्येक रस्ता गल्लीच्या सुरुवातीला पिवळ्या पाटीवर त्या भागाचं नाव आणि कितवा मेन/क्रॉस आहे हे लिहिलेलं असतं. (या पाट्या काही वेळा पडक्या किंवा कश्याने तरी झाकल्या गेलेल्या असतात हा भाग वेगळा.)

दादा कोंडके's picture

26 Oct 2011 - 7:09 pm | दादा कोंडके

टुमकुर रोड, होसूर रोड व्हाईटफिल्डरोड (खर तर सगळ्याच बगलोरबाहेर जाणार्‍या रोड) वर अशक्य डिव्हेलप्मेंट्स झाली आहेत म्हणून मी बीटीएम वगैरे (त्यामानानं) जुनं म्हणालो. चिकपेठ वगैरे प्राचीन बँगलोरचा भाग झाला आता! :)

इंटरनेटस्नेही's picture

26 Oct 2011 - 5:32 pm | इंटरनेटस्नेही

गुगल / ओवीआय बाय नॉकिया हे पत्ते शोधण्यासाठी बेस्ट ऑप्शन.

धमाल मुलगा's picture

26 Oct 2011 - 5:38 pm | धमाल मुलगा

मग या पुण्यात!
असल्या गुगल फिगल वाल्यांना पुण्यातल्या गल्ल्यांनी असं गंडिवलंय की बास!

इंटरनेटस्नेही's picture

26 Oct 2011 - 5:49 pm | इंटरनेटस्नेही

त्याचा आण्णभ्व आलायं आम्हाला.. पुढच्या वेळेस येताना मर्सिडीज ऐवजी 'हेलिकॅप्टरच' घेऊन येतो. एकादी जागा वरुन दिसलीच मोक्याची, तर लगे हात एखादी 'सदाशिव सिटी' बांधता येईल! ;)

तुला नाही सदाशीव सिटी बांधता यायची!
कोणतीही सिटी बांधण्यासाठी आडनाव वेगळं असावं लागतं.;)

इंटरनेटस्नेही's picture

26 Oct 2011 - 11:00 pm | इंटरनेटस्नेही

फॉर्च्युन फेर्वस ब्रेव्ह.. रेवतीताई! ;)

विकास's picture

26 Oct 2011 - 11:58 pm | विकास

आत्ता वाचला! अचूक निरीक्षण! त्यावरून मला एक कधीकाळी वगनाट्यात पाहीलेला विनोद आठवला:

या की घरी येकदा
कुथ हाय तुमच घर?
मारूतीच्या देवळासमोर
अवो पण मारूतीचे देऊळ कुथ हाय?
असं काय करता? माझ्या घरा समोर!
अहो, पन दोन्ही कुथं हाय?
समोरासमोर!