पाहूच की

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
14 Sep 2011 - 4:26 pm

पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची
अन् आरशाला प्रतिमांची
.
आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची
कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते
अंधार असो वा उजेड
नावड असो वा आवड
त्याला लिहावीच लागते,
हृदयातून उमटणारी ओळ
.
जसे पाण्याला घ्यावाच लागतो,
त्यात मिसळणारा रंग
.
पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला
पाण्याचा रंग आणि
कवीची ओळ
म्हणूनच मी निवांत आहे
.
माझ्या ओळीच्या प्रारब्धिही
असेलच कि उजेड
उजळेल तेव्हा पाहूच की

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०९/२०११)

शांतरसकवितामुक्तक

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

14 Sep 2011 - 4:29 pm | किसन शिंदे

व्वा..!

बर्‍याच दिवसांनी लिहते झालात.

जाई.'s picture

14 Sep 2011 - 6:13 pm | जाई.

काव्य आवडले

परिकथेतील राजकुमार's picture

14 Sep 2011 - 6:16 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त हो मिका.

पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची
अन् आरशाला प्रतिमांची

हे बेष्टच.

लै दिसानी आलासा ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2011 - 6:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते
अंधार असो वा उजेड
नावड असो वा आवड
त्याला लिहावीच लागते,
हृदयातून उमटणारी ओळ

छान ओळी.

प्रारब्धिही हा शब्द तितका सहज वाचता येत नाही, असे वाटले.

नगरीनिरंजन's picture

14 Sep 2011 - 7:10 pm | नगरीनिरंजन

>>पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची
अन् आरशाला प्रतिमांची

हो ओळ छान चमकली!

अत्रुप्त आत्मा's picture

14 Sep 2011 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा

माझ्या ओळीच्या प्रारब्धिही
असेलच कि उजेड
उजळेल तेव्हा पाहूच की.... जे ब्बात... ये हींमत अच्छी लगी... :-)

पाषाणभेद's picture

15 Sep 2011 - 2:10 am | पाषाणभेद

मिका कविसमाजाच्या मनातले लिहून कविसमाजासाठी योग्य योगदान दिले आहे.

जय कविसमाज!!

पाभे (कविसमाजाध्यक्ष)

नगरीनिरंजन's picture

16 Sep 2011 - 12:00 pm | नगरीनिरंजन

>>जय कविसमाज!!

=)) =))
पाभेंना अभिप्रेत आहे की नाही कोण जाणे पण आम्हाला आणखी एक 'स्पेस' दिसते आहे या शब्दात. :)

किसन शिंदे's picture

16 Sep 2011 - 1:13 pm | किसन शिंदे

ननि ती 'स्पेस' आम्हासही दिसली बर. ;)

स्पंदना's picture

15 Sep 2011 - 5:32 am | स्पंदना

खरच

पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची
अन् आरशाला प्रतिमांची
????

मस्त. पहिल्या ओळीतच दिल बेहद्द खुष ! मांगो मिका आज कुछ भी मांगो। दिन बना दिया आपने मेरा ।

स्वानन्द's picture

15 Sep 2011 - 8:59 pm | स्वानन्द

मस्तच!!

पण ही आधी प्रसिद्ध केली होतीस का कुठे? वाचल्यासारखी वाटतेय. ( चोरीचा आरोप नव्हे बरं हा :P )

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Sep 2011 - 11:04 am | मिसळलेला काव्यप्रेमी

ऑर्कुटवर प्रसिद्ध केली होती, शिवाय माझ्या खरडवहीवरही होती काही दिवस!!

अभिजीत राजवाडे's picture

16 Sep 2011 - 8:14 am | अभिजीत राजवाडे

छान आणि ओघवते आहे.

सुहास झेले's picture

16 Sep 2011 - 11:28 am | सुहास झेले

मस्तच...आवडली !! पहिल्या दुनोळीत पकड घेतली कवितेची...

ऋषिकेश's picture

16 Sep 2011 - 12:02 pm | ऋषिकेश

कविता, कल्पना आवडली..

आरशाचे रुपकही चांगले होते.. ते मधेच का सोडले? (अर्थात कवीचे स्वातंत्र्य वगैरे मान्य आहेच!)

निनाव's picture

16 Sep 2011 - 6:09 pm | निनाव

१ नंबर!!!!

आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची
कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते
अंधार असो वा उजेड
नावड असो वा आवड
त्याला लिहावीच लागते,
हृदयातून उमटणारी ओळ

हे खूप खूप खूप खूप खूपच छान लिहिले आहे... तोडच नाही. अनन्यच!!

रामदास's picture

22 Sep 2011 - 9:52 pm | रामदास

त्याला लिहावीच लागते,
हृदयातून उमटणारी ओळ
ही ओळ फाराच आवडली

मदनबाण's picture

23 Sep 2011 - 10:15 am | मदनबाण

छान... :)

अनिदेश's picture

21 Feb 2013 - 5:16 pm | अनिदेश

मस्त :)

इनिगोय's picture

21 Feb 2013 - 6:40 pm | इनिगोय

जियो!
एकदम खणखीत!!

इनिगोय's picture

21 Feb 2013 - 6:41 pm | इनिगोय

जियो!
एकदम खणखणीत!!