पाहूच की
काव्यरस
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची
अन् आरशाला प्रतिमांची
.
आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची
कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते
अंधार असो वा उजेड
नावड असो वा आवड
त्याला लिहावीच लागते,
हृदयातून उमटणारी ओळ
.
जसे पाण्याला घ्यावाच लागतो,
त्यात मिसळणारा रंग
.
पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला
पाण्याचा रंग आणि
कवीची ओळ
म्हणूनच मी निवांत आहे
.
माझ्या ओळीच्या प्रारब्धिही
असेलच कि उजेड
उजळेल तेव्हा पाहूच की
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१४/०९/२०११)
वाचने
3259
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
व्वा..! बर्याच दिवसांनी
काव्य आवडले
छान !
छान कविता.
>>पाण्याला आवड असून चालत नाही
माझ्या ओळीच्या
मिका कविसमाजाच्या मनातले
In reply to मिका कविसमाजाच्या मनातले by पाषाणभेद
>>जय कविसमाज!! =))
In reply to >>जय कविसमाज!! =)) by नगरीनिरंजन
ननि ती 'स्पेस' आम्हासही दिसली
कधी विचारच नाही केला.
मस्तच!! पण ही आधी प्रसिद्ध
In reply to मस्तच!! पण ही आधी प्रसिद्ध by स्वानन्द
हो
काव्य आवडले.
मस्तच...आवडली !! पहिल्या
कविता, कल्पना आवडली..
१ नंबर!!!! आरशाला तरी मुभा
आवडली
छान...
व्वा!!!!!!!!
जियो! एकदम खणखीत!!
जियो! एकदम खणखणीत!!