मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाहूच की

मिसळलेला काव्यप्रेमी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची . आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ . जसे पाण्याला घ्यावाच लागतो, त्यात मिसळणारा रंग . पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला पाण्याचा रंग आणि कवीची ओळ म्हणूनच मी निवांत आहे . माझ्या ओळीच्या प्रारब्धिही असेलच कि उजेड उजळेल तेव्हा पाहूच की |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०९/२०११)

वाचने 3262 वाचनखूण प्रतिक्रिया 21

परिकथेतील राजकुमार 14/09/2011 - 18:16
मस्त हो मिका.
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची
हे बेष्टच. लै दिसानी आलासा ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 14/09/2011 - 18:29
कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ छान ओळी. प्रारब्धिही हा शब्द तितका सहज वाचता येत नाही, असे वाटले.

अत्रुप्त आत्मा 14/09/2011 - 23:49
माझ्या ओळीच्या प्रारब्धिही असेलच कि उजेड उजळेल तेव्हा पाहूच की.... जे ब्बात... ये हींमत अच्छी लगी... :-)

पाषाणभेद 15/09/2011 - 02:10
मिका कविसमाजाच्या मनातले लिहून कविसमाजासाठी योग्य योगदान दिले आहे. जय कविसमाज!! पाभे (कविसमाजाध्यक्ष)

स्पंदना 15/09/2011 - 05:32
खरच पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची ???? मस्त. पहिल्या ओळीतच दिल बेहद्द खुष ! मांगो मिका आज कुछ भी मांगो। दिन बना दिया आपने मेरा ।

ऋषिकेश 16/09/2011 - 12:02
कविता, कल्पना आवडली.. आरशाचे रुपकही चांगले होते.. ते मधेच का सोडले? (अर्थात कवीचे स्वातंत्र्य वगैरे मान्य आहेच!)

निनाव 16/09/2011 - 18:09
१ नंबर!!!! आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ हे खूप खूप खूप खूप खूपच छान लिहिले आहे... तोडच नाही. अनन्यच!!

रामदास 22/09/2011 - 21:52
त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ ही ओळ फाराच आवडली