अल्बर्ट स्पिअर - सैतानाचा वास्तुविशारद. भाग - ३

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Aug 2011 - 11:28 am

अल्बर्ट स्पिअर -भाग १
अल्बर्ट स्पिअर - भाग २

गोबेल्सला नाझी पक्षात डॉक्टर म्हणून ओळखले व संबोधले जायचे. त्याच्या प्रचार मंत्रालयाच्या बिल्डिंगचे नूतनिकरणाचे काम त्याने अल्बर्ट स्पिअरला दिले होते. पण ते त्याने नंतर त्याच्याकडून काढून घेउन दुसर्‍या संस्थेला दिले. त्याचा चिटणीस, एक हांक नावाचा माणूस होता ज्याने त्या कार्यालयात बर्‍यापैकी बस्तान बसवीले होते. या माणसाची आणि अल्बर्ट स्पिअरची दोस्ती होती. एक दिवस अल्बर्ट स्पिअर त्याच्या कार्यालयात त्याला भेटायला गेला असता त्याच्या टेबलावर त्याला काही रेखाटन केलेले काही कागद पडलेले दिसले. हे कसले आहेत याची चौकशी केल्यावर त्याला समजले की ते टेंपलहॉफ विमानतळाजवळ होणार्‍या १ मेच्या रात्रीच्या मेळाव्याची आरेखने होती. ती बघितल्यावर त्याला हसावे की रडावे ते कळेना.
“ते बघून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मी चिडून म्हटले ’एखाद्या सुमार रायफल क्लबचा मेळावा आहे का हा ?”
हांक शांतपणे त्याला म्हणाला “ जर तुला असे वाटत असेल की तू याच्यापेक्षा चांगले काही करू शकशील तर कर !”
अल्बर्ट स्पिअरने ते आव्हान स्विकारले आणि त्याच रात्री त्याने त्या मेळाव्याची ड्रॉइंग्ज्‍ तयार केली. एक भले मोठे व्यासपीठ आणि त्याच्या मागे १५० फूट उंचीचे ३, लाल पांढर्‍या व काळ्या रंगाचे झेंडे अशी एकंदरीत कल्पना होती. हे सगळे भल्यामोठ्या सर्चलाईटस्‌ने प्रकाशित करण्यात येणार होते. हे जरा धोकादायक होते कारण या झेंड्यात शिडासारखे वारे भरू शकले असते. या झेंड्यांना आधार होता लाकडांच्या चौकटींचा. जो या मेळाव्याचा आयोजक होता त्याने हे पसंत नसल्याचे अल्बर्ट स्पिअरला स्पष्ट सांगितले. पण हांकने खाजगीत अल्बर्ट स्पिअरला हिटलरला हे सगळे पसंत असल्याचे सांगितले. अर्थातच ते सगळे आराखडे स्विकारण्यात आले हे सांगायची गरज नाही. हीच ती कल्पना ज्याचा पुढे वारंवार उपयोग करण्यात आला.

खुद्द अल्बर्ट स्पिअरला कल्पना नव्हती की त्याने एक प्रकाश योजना शास्त्र नावाचे एक नवीन शास्त्र जगाला खुले करून दिले होते.
भव्यता

भग्नता

हिटलरला संध्याकाळी सिनेमे बघायचा छंद होता. अल्बर्ट स्पिअर आठवड्यातून १/२ वेळा तरी हिटलरकडे या कार्यक्रमासाठी जायचा. शेवटचा सिनेमा झाल्यावर त्याला कधी कधी अल्बर्ट स्पिअरचे नकाशे पहायची लहर यायची आणि ते नकाशे तो इतक्या सविस्तरपणे बघायचा की ते काम रात्री २ पर्यंत चालायचे. बाकी सगळे पाहुणे आपापल्या घरी जायचे किंवा वाईन पीत बसायचे कारण त्यांना माहीत होते की एकदा का हिटलर त्याच्या या आवडत्या कामाला लागला की त्याच्याशी दोन शब्दही बोलणे मुष्कील. हिटलरची सगळ्यात लाडकी योजना होती ती बर्लिनचे पुनर्निर्माण. त्यासाठी बर्लिन एकॅडमी ऑफ आर्टसमधे त्या नकाशांप्रमाणे प्रतिकृती बनविण्यात आल्या होत्या. त्या विस्तीर्ण दालनात जाता यावे म्हणून चॅन्सेलरी आणि या दालनाच्या इमारतीमधे एक दार पाडण्यात आले . रात्री हातात विजेर्‍या आणि चाव्या घेऊन ही मंडळी त्या भल्यामोठ्या दालनात अवतीर्ण व्हायची. प्रत्येक मॉडेल हे १:५० या पटीत बनवलेले होते आणि त्याच्यावर उच्च दर्जाची प्रकाश योजना केलेली होती. सकाळी, संध्याकाळी व रात्री ती इमारत वा रस्ता कसा दिसेल हे वेगवेगळ्या दिव्यांच्या करामतींनी साधलेले होते. कधी कधी हिटलरची खास माणसांनाही ही जागा बघण्यासाठी आमंत्रण असायचे. अल्बर्ट स्पिअरने लिहून ठेवले आहे “ यावेळी मला क्वचितच बोलायला लागायचे. हिटलर स्वत:च अतिउत्साहात पाहुण्यांना सगळी माहिती पुरवायचा आणि त्यावेळी त्याचे डोळे एका वेगळ्याच प्रेरणेने चमकत असायचे.”

एखादे नवीन मॉडेल जर तयार झाले असेल तर मग हिटलरच्या उत्साहाला बांध नसायचा. त्या मॉडेलची वरची बाजू रस्त्यावरून कशी दिसेल हे बघण्यासाठी तो पार जमिनीवर रांगायचा आणि आपले डोळे त्या पातळीवर न्यायचा प्रयत्न करायचा.

या दालनाविषयी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती आणि त्याची संरक्षण व्यवस्था अत्यंत चोख ठेवण्यात आली होती. एक दिवस राईश मार्शल गोअरींग याने त्या दालनाला एक नवीन १:१०० पटीत केलेले मॉडेल पाहण्यासाठी भेट दिली. ते बघताना भावनाविवश होत त्याने अल्बर्ट स्पिअरचे हात हातात घेतले आणि म्हणाला “ काही दिवसांपूर्वी हिटलरने त्याच्या मरणानंतर मी कुठली कामे पार पाडायची व काय काय करायचे हे सांगितले. मला सगळे माहीत असल्यामुळे मला त्याने सर्व स्वातंत्र्य दिले आहे कारण त्याला खात्री आहे की मी ते सर्व करेन. फक्त एका गोष्टीबद्दल त्याने मला आज्ञा केली व माझ्याकडून वचन घेतले ते तुझ्या बाबतीत - त्याच्या मृत्यूनंतर मी तुला तुझ्या पदावरून पदच्युत करणार नाही व दुसर्‍या कोणालाही त्या पदावर नेमणार नाही. तुझ्या कुठल्याही योजनेत मी हस्तक्षेप करणार नाही व तुला त्यासाठी लागणारा पैसा कधीही कमी पडू देणार नाही. मी फ्युररचा हात हातात घेऊन त्याला हे वचन दिले आहे. आणि आज मी तुला तेच वचन देत आहे.” असे बोलून त्याने माझ्याशी आत्मीयतेने हस्तांदोलन केले.

गंमत म्हणजे सुमारे याचवेळी अल्बर्ट स्पिअरचे वडील त्याच्या आता प्रसिद्ध झालेल्या मुलाचे काम बघायला बर्लिनमधे आले होते. अल्बर्ट स्पिअर त्यांना अभिमानाने ती सगळी मॉडेलस्‍ दाखवत असताना त्यांच्या चेहर्‍यावर कौतुकाचे कुठलेच भाव उमटले नाहीत. त्यांनी फक्त त्यांचे खांदे उडवले आणि ते म्हणाले “ तुम्हाला सगळ्यांना वेड लागले आहे !” त्याच मुक्कामात अल्बर्ट स्पिअर आणि त्याचे वडील एका नाटकाला गेले असता योगायोगाने हिटलरही त्याच नाटकाला आला होता. अल्बर्ट स्पिअरला आणि त्याच्या वडिलांना बघताच त्याने त्या दोघांना त्याच्या खास बॉक्समधे बोलावले. अल्बर्ट स्पिअरचे वडील पक्के जर्मन व त्यावेळी ७५ वर्षाचे असूनसुद्धा ताठ होते. हिटलर त्यांच्या मुलाचे कौतुक करत असताना त्यांचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. त्यांचा चेहरा पांढराफटक पडला होता आणि एखादा निराशेचा झटका आलेल्या माणसासारखे ते थरथरत होते. काहीही न बोलता त्यांनी आमचा निरोप घेतला. ते असे का वागले किंवा त्यांना काय झाले हे ना अल्बर्ट स्पिअरने त्यांना पुढे भविष्यात विचारले आणि नाही त्यांनी तो विषय कधी काढला. बहुतेक त्यांना भविष्याची कल्पना त्या क्षणांमधे आली असावी.

हे लिहिताना स्पिअरची दुसरी आठवण लिहायची राहिलीच. ती आहे हिटलरच्या पॅरीसच्या भेटीबाबत.
पॅरिसला भेट.

फ्रान्स काबीज केल्यानंतर ( याचे सर्व श्रेय हिटलरने स्वत:कडे घेतले होते ) अल्बर्ट स्पिअरला हिटलरच्या कार्यालयातून फोनवर बोलावणे आले. हिटलरने त्यावेळी एका छोट्याशा गावात आपले मुख्यालय थाटले होते आणि त्यासाठी अर्थातच ते गाव पूर्णपणे रिकामे करण्यात आले होते. त्या मुख्यालयातून त्याची पॅरिसला भेट द्यायची योजना होती. फ्रान्सचा विजेता म्हणून नव्हे तर एक कलाकार म्हणून द्यायची होती. त्यासाठी त्याने बरोबर येण्यासाठी तीन कलाकारांना आमंत्रण दिले होते. अल्बर्ट स्पिअर , ब्रेकर आणि गिसलेर. हिटलरचे हे अत्यंत आवडते शहर होते आणि त्याने याच्या सर्व नकाशांचा चांगलाच अभ्यास केला होता. एवढेच काय त्या शहरामधील इमारतींचे नकाशेही त्याने पालथे घातले होते.
“तुम्ही बघाल मला पॅरिसमधे वाटाड्याची गरज भासणार नाही” हिटलर म्हणाला होता.

युद्धाचा तह झाल्यावर सगळे बोर्गेटच्या विमानतळावर उतरले. वेळ होती पहाटेची ५.३०. समोर तीन आलिशान मर्सडीज उभ्या होत्या. हिटलर नेहमीच चालकाशेजारी बसायचा. त्यांनी पटकन मागच्या जागा पटकावल्या. त्या निर्मनुष्य रस्त्यांवरून ते ऑपेराला पोहोचले. या इमारतीबद्दल हिटलरला खूपच कुतूहल होते. या गार्नियेने बांधलेल्या इमारतीचा त्याचा अभ्यास एखाद्या विद्यार्थ्यासारखा पूर्ण झाला होता आणि त्याचा पडताळा लवकरच आला. त्या हळुवार चढणार्‍या विस्तीर्ण पायर्‍यांवर चालताना जणू त्याचे एक स्वप्न पुरे होत होते. आत गेल्यावर रंगभूमीचा पडदा आणि प्रेक्षकांच्या मधे जी मोकळी जागा असते, जेथे वाद्यवृंद बसतो, त्याकडे बोट दाखवत हिटलरने तेथील मार्गदर्शकाला विचारले “ येथे एक छोटीशी खोली होती ना?” तो माणूस ते ऐकून चक्रावलाच. त्याने कबूल केले की काही वर्षांपूर्वीच नूतनीकरणाच्यावेळी ती खोली काढून टाकण्यात आली होती. त्या माणसाला बक्षिसी देण्यासाठी हिटलरने एक ५० मार्कची नोट काढून त्याच्या सहाय्यकाला त्याला देण्यास सांगितले पण त्या माणसाने नम्रपणे पण ठामपणे ती नाकारली.

“त्याच रात्री जेवताना हिटलर मला म्हणाला ’काय आवडले ना पॅरिस ? आपल्याला बर्लिन यापेक्षाही सुंदर व भव्य बांधायचे आहे. मी पॅरिस का तोडले नाही याचे कारण आता तुला कळले असेल. पॅरिसचा खुजेपणा हा बर्लिनचा विजय आहे. नाहीतर तुलना कशाशी होणार ?”

त्याच रात्री त्या छोट्याशा गावातून त्याने मला बर्लिनच्या पुनर्निर्माणाच्या कामाच्या लेखी आज्ञा दिल्या आणि काम सुरू करायला सांगितले. त्या पॅरिसच्या भेटीत आम्ही ट्रायंफ आर्क पहायला गेलो नाही कारण हिटलरने त्याच्या ट्रायंफ आर्कचा नकाशा अगोदरच तयार केला होता. त्याची उंची पॅरिसच्या कमानीच्या दुप्पट होती. तो नकाशा त्याने मला फार पूर्वीच दाखवला होता आणि त्यावर तारीख होती १९२५. त्यावेळी हिटलर कोण हे कोणालाच माहीत नव्हते ! त्यावेळी तो नुकताच तुरुंगातून सुटला होता आणि बव्हेरियात कुठेतरी हिंडत होता. पण त्याच्या त्या नकाशांमधे बारीकसारीक तपशील लिहिलेला होता. आता तुम्हाला कळेल त्याचा सूप्त आक्रमकपणा आणि कलेचे प्रेम याचा काय संबंध होता ते. हा आक्रमकपणा त्याच्यात लहानपणापासूनच होता. ज्यूंच्या हत्याकांडाचे मूळ त्याच्या खुनशी स्वभावातच होते १९४२-४३ हा फक्त एक काळ होता जेव्हा तो प्रकट झाला.”

डॉ. टॉड हा एक हिटलरचा प्रमुख मंत्री होता आणि त्याच्याकडे ३/४ खाती होती. हा एक अत्यंत कार्यक्षम असा मंत्री होता आणि त्याच्या कामात कुठेही नावे ठेवायला जागा नव्हती. १९४२ मधे रशियन आघाडीला भेट देऊन अल्बर्ट स्पिअर हिटलरला भेटायला प्रशियामधे रास्टेनबर्ग नावाच्या गावात विमानाने उतरला. हिटलरबरोबर रात्री २ पर्यंत चर्चा करून तो झोपायला गेला. पहाटे ५.३० वाजता त्याचे विमान बर्लिनसाठी उडणार होते. याच विमानात डॉ. टॉडही असणार होता. रशियाच्या आघाडीवरच्या खडतर प्रवासाने व लगेचच जागरण झाल्यामुळे अल्बर्ट स्पिअरने त्या विमानाने जायचे नाकारले आणि विश्रांती घ्यायचे ठरवले. दुर्दैवाने त्याच विमानाच्या अपघातात डॉ. टॉड हा मरण पावला. त्याच्याकडे असणार्‍या चार मंत्रालयामधे त्याकाळात अत्यंत महत्वाचे असणारे असे युद्धसामग्री उत्पादन मंत्रालय. डॉ. टॉडच्या मृत्यूने अल्बर्टचेचे सर्व आयुष्य परत एकदा दुसर्‍या वावटळीत सापडले. हिटलरने अल्बर्ट स्पिअरला हे मंत्रालय स्विकारायची गळ घातली. अल्बर्ट स्पिअरने बराच नकार द्यायचा प्रयत्न केला पण हिटलरला दुसरा विश्वासू सहकारी मिळाला नाही. या मंत्रालयाला अमर्याद पैसे खर्च करण्याची परवानगी होती कारण युद्धासाठी हे सगळे साहित्य लागत होते आणि मुख्य म्हणजे याचा कुठलाही हिशेब विचारला जात नसे. ( हिटलर सोडून ). हे पद स्विकारल्यापासून हिटलरचे अल्बर्ट स्पिअरशी असलेले मित्रत्वाचे नाते संपुष्टात आले.
“आता तो माझ्याशी त्याचा एक हाताखालचा मंत्री समजून वागायला लागला होता. मी, ज्याने कधी हातात साधी रायफलही धरली नव्हती तो आता शस्त्रात्र उत्पादन बघणार होता.”
अर्थात बालीशपणे अल्बर्ट स्पिअरने हिटलरकडून एक वचन घेतले ते म्हणजे युद्ध संपल्यानंतर तो त्याची परत राईशचा वास्तूविशारद म्हणून नेमणूक करेल. हिटलरने त्याला आनंदाने मान्यता दिली.
“ परत एकदा आपण या रोजच्या कटकटीतून मुक्त होऊन आपल्या बर्लिन बांधायच्या कामात गुंतून जाऊ”. हिटलरने वचन दिले.

हे मंत्रीपद स्विकारल्यानंतर अल्बर्ट स्पिअर लगेचच कामाला लागला. या मंत्रीपदामुळे तो अजून एका माणसाच्या संपर्कात आला आणि तो म्हणजे फिल्ड मार्शल मिल्च. हा डॉ. टॉड्चा सहकारी होता आणि मुख्य म्हणजे हुशार होता. हे मंत्रीपद सांभाळण्यासाठी डॉ. टॉडला एक मोठी तडजोड करावी लागत होती आणि ती म्हणजे राईश मार्शल गोअरिंगच्या चार वर्षांच्या वार्षिकयोजनेमधे ढवळाढवळ न करणे. तसा त्यांच्यामधे लेखी करारच झाला होता. म्हणजे हिटलरच्या जवळिकीने आणि आधिकाराने गोअरींगने तो त्याच्यावर लादला होता. थोडक्यात काय, उत्पादनासाठी लागणारा पैसा हा अप्रत्यक्षपणे गोअरिंगच्या परवानगीनेच मिळायचा. अल्बर्ट स्पिअरला हे मुळीच पसंत नव्हते. या खात्याच्या पहिल्याच सभेत, ज्यात मोठमोठे उद्योगपतीही उपस्थित होते, अल्बर्ट स्पिअरने हा करार मोठ्या कौशल्याने हिटलरच्याच मदतीने मोडला व आपला स्वत:चा सवतासुभा निर्माण केला.

ही जबाबदारी धडाडीने पार पाडण्यासाठी अल्बर्ट स्पिअरने कंबर कसली...........
कशी पार पाडली त्याने ती आणि राईश मार्शलला त्याने कसे गुंडाळले हे क्रमश:.......................

जयंत कुलकर्णी

इतिहाससमाजराजकारणविचारलेख

प्रतिक्रिया

आगाऊ कार्टा's picture

3 Aug 2011 - 11:40 am | आगाऊ कार्टा

केवळ अप्रतिम.....
पुढच्या भागांची वाट बघत आहे.

किसन शिंदे's picture

3 Aug 2011 - 11:55 am | किसन शिंदे

नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर...
स्पिअरने सांभाळलेल्या युध्दसामग्री उत्पादन मंत्रालयाची माहीती वाचण्यास उत्सूक.

सहज's picture

3 Aug 2011 - 12:16 pm | सहज

वाचनीय. मस्त झालाय हाही भाग.

हिटलरचा नेपथ्यकार!!

मनराव's picture

3 Aug 2011 - 12:42 pm | मनराव

Classssssssss !!!..............हिटलर बद्द्ल काहीही वाचायला आवडतं.......तो प्राणीच तसा होता.......

लेखन अप्रतीम...... येउ देत अजुन.....

मस्स्त्त्त!!!!!!
हिटलरवरील एखाद्या ठराविक पुस्तकापेक्षा या लेखांची मजा जास्त येतेय.
आता चांगली ऐसपैस लेखमाला होऊनच जाऊ द्या.

>>>आता चांगली ऐसपैस लेखमाला होऊनच जाऊ द्या.<<<

+१

dev's picture

3 Aug 2011 - 2:29 pm | dev

हेच म्हणतो..

जयंत कुलकर्णी's picture

5 Aug 2011 - 10:38 pm | जयंत कुलकर्णी

Hi !

It only means I am a good story teller and nothing more !

:-)

पल्लवी's picture

3 Aug 2011 - 1:24 pm | पल्लवी

वाचत आहे.

अन्या दातार's picture

3 Aug 2011 - 1:37 pm | अन्या दातार

स्पिअरने पुढे काय काय उपद्व्याप केले हे वाचण्यास उत्सुक.

जयंतकाका लेखमालिका छान चालली आहे.. पुढील भाग वाचण्यास उत्सुक..

- पिंगू

विकाल's picture

3 Aug 2011 - 4:59 pm | विकाल

..................कर माझे जुळती....!!

उ त्त म ...!!

जिंकलात ओ!

प्रास's picture

3 Aug 2011 - 6:39 pm | प्रास

सु रे ख!

एक छान लय पकडून लिहित आहात.

आवडतेय.

असेच लिहा.....

(नेहमीचाच) फ्यान :-)

मी-सौरभ's picture

3 Aug 2011 - 8:17 pm | मी-सौरभ

क ड क !!

स्मिता.'s picture

3 Aug 2011 - 8:37 pm | स्मिता.

छान चालली आहे लेखमाला. पुढेचे भागही येवू द्या.

रामपुरी's picture

3 Aug 2011 - 9:40 pm | रामपुरी

फक्त हिंदी शब्दप्रयोग टाळलेत तर उत्तम... नाहीतर तेवढेच गालबोट राहून जाईल. उदा. "त्यासाठी अर्थातच ते गाव पूर्णपणे खाली करण्यात आले होते"

अर्धवट's picture

3 Aug 2011 - 10:10 pm | अर्धवट

वाचतोय.. अजून येउदेत

मयुरा गुप्ते's picture

4 Aug 2011 - 2:41 am | मयुरा गुप्ते

कितीही राग आला तरी अजुनही अ‍ॅडोल्फ हिटलर ह्या नावाचं आकर्षण कमी झालेलं नाही. अप्रतिम लेखमालेला आमच्या शुभेच्छा.

--मयुरा.

nishant's picture

4 Aug 2011 - 3:29 pm | nishant

अप्रतिम लेखमालेला.पुढच्या भागांची वाट बघत आहे..

स्वाती दिनेश's picture

4 Aug 2011 - 7:20 pm | स्वाती दिनेश

लेखमाला चांगली पकड घेते आहे,
पुढच्या भागाची वाट पाहत आहे..
स्वाती

प्राजु's picture

4 Aug 2011 - 10:42 pm | प्राजु

प्रचंड वेग आहे लेखनाला. वाचतेय.
एक वेगळीच दुनिया दिसतेय, वाचयला मिळ्तेय.
मस्त!

पंगा's picture

4 Aug 2011 - 10:51 pm | पंगा

प्रचंड वेग आहे लेखनाला.

साधारणपणे किती डब्ल्यूपीएम असेल? काही अंदाज?

आणि कसा कळला?

जयंत कुलकर्णी's picture

5 Aug 2011 - 7:27 pm | जयंत कुलकर्णी

पुढील भाग टाकण्या अगोदर सगळ्यांना धन्यवाद देतोय !