ईशान्य वार्ता

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
25 Jul 2011 - 10:41 am

तिबेटमधील त्सांगपो(ब्रम्हपुत्र) नदीचं पाणी वळवण्याच्या चीनच्या योजनेमुळे भारताला लगेचच धोका पोहचत नाही असे वक्तव्य परराष्ट्रमंत्री एस. एम कृष्णा यांनी नुकतेच केले आहे. मात्र जगाच्या डोळ्यात धुळफेक करुन स्वतःला वाटेल तेच साध्य करण्याची चीनची सवय लक्षात घेता, निदान आसाम सरकारने तरी या विषयावर गाफील राहू नये असे आवाहन या विषयावर जनजागृती करणार्‍या फोरम ने आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांना केले आहे. त्याचबरोबर श्री कृष्णा यांनी हे वक्तव्य कोणत्या आधारावर केले आहे? हे ही लोकांना कळायला हवे. असे ही या फोरम ने म्हटले आहे.

या नदीची तिबेटमधील लांबी १६२५ कि.मी. आहे. भारतातील ब्रम्हपुत्र नदात समाविष्ट होणार्‍या या नदिच्या पाण्याचं प्रमाण ३० टक्के इतकं आहे. या नदिवर चीन धरण बांधत असल्याची उपग्रह - छायाचित्रे काही वृत्तवाहिन्यांनी जुन महिन्याच्या मध्यावर प्रसिध्द केल्याने खळबळ उडाली आहे. ब्रम्हपुत्र नदातील ७० टक्के पाणी भारतीय भुप्रदेशातील आहे हे लक्षात घेता चीनने धरण बांधल्यास, त्सांगपो नदिचा प्रवाह वळविल्यास भारताती ब्रम्हपुत्र नदाचं पात्र कोरडं पडेल अशि शक्यता नाही.

मात्र युध्दसदृष्य परिस्थीतीत भारताविरुध्द वापरण्याचं हत्यार म्हणून चीन या धरणाचा वापर करु शकेल हाच खरा चिंतेचा विषय आहे. तसे झाल्यास अरुणाचल आणि आसामच्या सखल भागात पूरपरिस्थिती ओढावेल. आधीच ब्रम्हपुत्रला येणार्‍या पुरानं फार मोठी हानी होत असते; तशात या धरणातील पाणी चीनने अचानक सोडले तर भयानक संकट ओढवेल.

ब्रम्हपुत्र नदाच्या पाणी वाटपाबाबत चीन बरोबर बोलणी करुन मार्ग काढणे आवश्यक आहे. भारत त्यादृष्टीने गेली काही वर्षे प्रयत्नशील आहे. पण चीनकडुन याबाबतीत कोणताच प्रतिसाद मिळत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन याबाबतीत चीनवर दबाव आणणे एवढाच एक मार्ग आहे. पण आज बलाढ्ञ अमेरिकेला अंगावर घेण्याइतका सामर्थ्यशाली झालेला चीन या दबावतंत्राला भीक घालील असे वाटत नाही.

संदर्भ-आसाम ट्रिब्यून - १७ जून

प्रवासमाध्यमवेध

प्रतिक्रिया

निनाद's picture

25 Jul 2011 - 12:04 pm | निनाद

अपुरी माहिती वाटते.
अजून हवी होती. लेख त्रोटक आहे.
मात्र नकाशा दिल्याबद्दल धन्यवाद!

आवांतरः
ईशान्य वार्ता हे मासिक कसे मिळते याची माहिती परत एकदा द्याल का?
म्हणजे वर्गणी भरण्याचा पत्ता वगैरे.
तसेच या मासिकाचे संपादक कोण खप किती याबद्दल काही माहिती देता येईल का?