बोमडीला - एक निसर्ग रम्य स्थळ अजुन काही चित्रे.
आमचा बोमडिला ला जाण्याचा प्रवास रात्रीचा असल्यामुळे फोटो काढता आले नाहीत परंतु परतीच्या प्रवासात हा प्रवास किती थरारक होता यासाठी मुद्दाम प्रपंच
एकी कडे खोल नदी व दुसरीकडे पहाड त्यात पाउस आणि वारंवार रस्त्यावर साचणारा चिखल यातुन मार्गक्रमण म्हणजे चालकाची कमाल होती.
बोमडिला हुन १५०० फुटावर बुधदाचा मोठा मठ आहे. या मठाद्वारे येथील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी शाळा चालविली जाते येथे त्यांच्या राहण्याची व जेवण्याची देखील मोफत सोय असते.
मठावरुन दिसणारी मनमोहक दृश्ये
मठधिपती व तेथील भिख्खुंचे निवास स्थान
महाराष्ट्राचे लाडके गायक सुधिर फडके यांचे मानस पुत्र दिपकजी यांची भेट बोमडिला येथे होणे हा एक दुग्ध सर्करा योग. त्यांच्या घरी जेवण व अण्णा(बाबुजी) यांच्या प्रतिभा आणि प्रतीमा मध्ये झालेल्या कार्यक्रमाची १ तासाची बैठक पहावयाला मिळाली ही तर मला मेजवानी च होती. दिपक जी हे शुध्द मराठी बोलतात हे वेगळे सांगणे न लगे. ते बोमडिला येथे राज्याच्या उद्योग विभागात जॉइंट डायरेक्टर आहेत् दोन वर्षानंतर ते त्यांच्या मुळ गावी तवांग येथे राहणार आहेत.
त्यांच्याच घरी पुण्याचा ह्रुषिकेश दिवेकर या तरुणाची भेट झाली. हा तिथे गेल्या ३ वर्शांपासुन हिन्दी शिकवतो व ९ आणि १० वि च्या विद्यार्थ्यांचे निषुल्क गणिताचे वर्ग घेतो हृषीकेश दिवेकर हा तेथील शाळेत प्राचार्य पदाचीही जवाबदारी सांभाळतो.

Book traversal links for बोमडीला - एक निसर्ग रम्य स्थळ अजुन काही चित्रे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद. हृषिकेश
इशान्य भारतातील प्रकाश किरणे
सुंदर निसर्ग अमोल केळकर
धन्यवाद
क्लास.!
डेंजरसली रोमँटीक
मस्तच! ऋषिकेश दिवेकर
संपूर्ण लेख वाचला नाही, फक्त फोटो पाहीले..... अप्रतीम नीसर्ग
फारच सुंदर..
फारच सुंदर..
मस्तच!
स्वर्ग या पेक्षा वेगळा