अरुणाचल प्रदेश-भारताची संरक्षक भिंत

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in जनातलं, मनातलं
22 Apr 2011 - 1:21 pm

अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील राज्यामध्ये आकाराने सर्वात सर्वात मोठे राज्य असुन त्याचे क्षेत्रफळ ८३७४३ चौरास किलोमिटर इतके आहे. हे राज्य म्हणजे भारताची संरक्षक भिंत असुन याच्या पश्चिमेस भुतान, उत्तरेस नेपाळ, इशान्येस चीन आणी पुर्वेला बर्मा हे देश आहेत. सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सीमेनी (१६८० कि.मि) वेढलेले असे हे राज्य आहे. १९७२ पर्यंत या भुभागास (NEFA) North East Frontier Agency असे संभोधण्यात येत असे. २०/०१/१९७२ ला यास केन्द्र शासीत प्रदेश म्हणुन मान्यता मिळाली व २०/०२/१९८७ रोजी हे भारताचे स्वयंपुर्ण राज्य म्हणुन अस्तित्वात आले.

गर्द हिरवी जंगले, खोल नद्यांच्या दर्‍या आणि मनमोहक पठारे, उत्तरेस बर्फाच्छादीत पर्वत रांगा तर दक्षिणेस ब्रम्हपुत्रेचा सखल प्रदेश असा निसर्गानी भरभरभरुन वर्षाव केलेला अतिसुंदर प्रदेश म्हणुन याचे वर्णन करता येईल आकारमानाने सर्वात मोठे राज्य असुनही येथील लोकसंख्येची घनता मात्र प्रती चौरस कि.मी मागे केवळ १५ इतकी आहे. या विशाल प्रदेशाच्या निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटक येथे आकर्षित होतात.

इथे अनेक धार्मीक स्थळे आहेत. मोठ्या संख्येने यात्रेकरु येथील तवांग मधील बुध्दधर्मीयांसाठी सर्वोच्च असलेल्या मठापैकी एक असलेल्या मठात येत असतात. त्याच प्रमाणे लोहीत जिल्यातील परशुरामकुंड, दिबांग जिल्यातील रुक्मीणीचे जन्मस्थान असलेले भिष्मक नगर, पश्चिम सियांग जिल्ह्यातील मालिनिथान व इटानगर ही अरुणाचल ची राजधानी असलेल्या शहरातील इटाफोर्ट येथे यात्रेकरु व पर्यटक नियमीत येत असतात. झिरो जिल्यात नुकतेच २८ फुट उंच व २२ फुट व्यास असलेले विशाल शिवलिंग सापडले असुन तेथे ही पर्यटकांचा ओघ सुरु झाला आहे.

परशुरामकुंडात स्नान करण्यासाठी मकर संक्रांतीला इथे भाविकांची मोठि गर्दी उसळते. गेल्या वर्षी ही संख्य ६०००० होती. बहुतेक यात्रेकरु मणिपुर, महाराष्ट, राजस्थान, बिहार, आसाम, अरुणाचल, उत्तर प्रदेश या राज्यातुन आले होते.

कालीका पुराणात व महाभारतात देखिल अरुणाचल चा उल्लेख आहे. पुराणातील प्रभु पर्वत म्हणजे आजचे अरुणाचल. येथे व्यास मुनींनि ध्यान धारणा केली. परशुरामाने आपले पाप क्षालन केले तेही येथेच व कृष्णाचे रुक्मीणीशी लग्न झाले तेही येथेच.

प्रशासनीय दृष्ट्या या राज्याचे १६ जिल्हे आहेत. सगळ्या जिल्ह्याची नावे ही येथील नद्यांच्या नावाने दिली गेली आहेत. ति जिल्हे खालील प्रमाणे:- १) तिराप २) चांगलांग ३)लोहीत ४) आन्जॉ ५) दिबांग व्हैली ६) लोअर दिबांग व्हैली ७) ईस्ट सियांग ८)अप्पर सियांग ९) वेस्ट सियांग १०) अप्पर सुबानसिरि ११) लोअर सुबानसिरी १२) कुरुंग कुम्ये १३) पापुम्पारे १४) ईस्ट कामेंन्ग १५) वेस्ट कामेंन्ग व १६) तवान्ग

२००१ च्या लोकगणनेनुसार या राज्याची लोकसंख्या १० लाख ९७ हजार ९६८ इतकी होती. येथे २० उप-विभागीय केन्द्रे, १०८ सर्कल्स, २० मुख्य शहरे व ३८६३ गावे आहेत. येथील साक्षरतेचे प्रमाण ५४.७४% आहे.

अरुणाचलचे लोक

अरुणाचलमध्ये २६ मुख्य जनजाति तर १०७ पोट जमाति आहेत. मुख्य जनजातित ठळक अशा जनजाती म्हणजे मोन्पा, शेर्दुक्पेन, आका, मिजि, निशी, अपातानी, पहाडी मिरि, तागिन, गालो, आदि, मेम्बा, कम्बा, इदु, मिश्मि, दिगारु मिश्मि, मिजो मिश्मि , तन्ग्सा, तुसा, वान्चो, नोक्टे, खाम्प्ति, सिन्ग्पो इत्यादि. यातील मोन्पा, शेर्दुक्पेन, खाम्प्ति, सिन्ग्पो व मेम्बा या जमाती बुध्दिस्ट आहेत. हिनायना व महायना सारखे प्रवाह निरनिराळ्या जमातीत प्रबळ आहेत. आणि ते प्रामुक्याने तवान्ग, वेस्ट कामेन्ग , अप्पर सुभानसिरि, वेस्ट सियांग, अप्पर सियान्ग आणि लोहित व चान्गलन्ग जिल्ह्यातील काही भागात वसलेले आहेत. नेफा च्या काळापासुन ज्या चकमा जमातिचे पुनर्वसन तात्पुरते चान्ग्लान्ग जिल्ह्यात केले गेले होते ते बुध्द धर्मिय आहेत. तानी हे स्वत:ला आबोतानी चे वंशज मानतात व आबोतानी हे पृथ्वीवरिल प्रथम मानव होते असा त्यांचा विश्वास आहे. निशि, गालो, आदि, तागिन, पहाडी मिरी व आपातानी हे देखिल स्वतःला याच वंशावळीचे मानतात.

तानी जमातिचे लोक "दोनी" व "पोलो" म्हणजे सुर्य व चंद्र यांना सर्वोच्च देव मानतात.

तिरप जिल्ह्यातील वानजिल्ह्यातील, तुत्सा तर चांगलांग जिल्ह्यातील तांगसा, सिंग्फो या जनजातीत रंगफ्राईजम चळ्वळ जोरात सुरु आहे. रंगफ्रा हा त्यांचा सर्वोच्च निर्माता.. 'रंग' म्हणजे पृथ्वीचे संचालन करणारी शक्ती आणि 'फ्रा' म्हणजे विश्वास, शांती, त्याग, श्रध्दा. बुध्दाला मानणारे सोडले तर सर्वच जनजातींमध्ये पशुबळी हा धार्मीक विधिचा एक भाग आहे. घरातील आजारी व्यक्तीच्या आरोग्यासाठी त्याच्या स्थानीक दैवतेला साकडे घालण्यासाठी किंवा नवस फेडण्यासाठी त्यांच्या स्थानिक देवतेला संतुष्ट करण्यासाठी पशु बळी देणे ही सर्वच जनजातीमध्ये नियमीत प्रथा आहे.

प्रत्येक जनजातीमध्ये त्याचा स्वतंत्र धर्मगुरु असतो. आणी तो विशिष्ठ संप्रदाय त्या धर्मगुरुचा आदर करतो कारण त्याच्यामध्ये जन्मतःच काही दैवी शक्ती आहेत अशी त्यांची श्रध्दा असते. हे धर्मगुरु दैवी शक्ती असलेले, विशुध्द अंतःकरणाचे, आणि स्वर्गीय मनाचे असतात. ते कुठलेही लेखी साहित्या च्या आधारा शिवाय मंत्र पठण करु शकतात. आपल्या दैनंदिन समस्यासाठी या समुदायाचा मोठा वर्ग या धर्मगुरुंचा सल्ला घेतो.

येथील लोक शेतीशी संबंधीत सण हे उत्साहाने साजरे करतात. हे उत्सव ते देवाला भविष्यातील भरभराटीसाठी आणी भरघोस पिकासाठी आशिर्वाद मागण्यासाठी व आभार मानण्यासाठी असतात. या उत्सवाची वेगवेगळी नावे आहेत. जसे मोपीन, सोलुन्ग, लोस्सर, द्री, सि-डोनी, न्योकुम, रेह. इ. संपुर्ण जनजाति हे उत्सव साजरे करण्यासाठी येतात. यात पारंपारिक वेषभुशा करुन केलेले नृत्य, पशु बळी देणे, घरी बनविलेले पारंपारिक मद्य प्राशन, व सर्व समुदायाला जेवण ह्याचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो.

धर्मांतरण

ब्रिटिश राजवटित हे राज्य इतर इशान्यभारतातील राज्याच्या विपरित, ख्रिश्चन धर्मप्रचारकाच्या धर्मांतरण कारवायां पासुन पुर्णपणे मुक्त होते. मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर धर्मप्रचारकांनी या पहाडी प्रदेशांतिल काही कप्प्यांना आपल्या कारवायांचे लक्ष्य बनविले. लगेच येथील जनजातींना आपल्या वेगळ्या संस्कृति वर व शांत सामाजिक जिवनावर धर्मप्रसारकांच्या होत असलेल्या आक्रमणाची जाणीव होउ लागली. त्यांनी या विरुध्द १९७४ मध्ये लढा उभारला आणि धर्मप्रसारकांना राज्यापासुन दुर ठेवण्यात पुढील २ दशके तरी यशस्वी झाले.

राज्याच्या पश्चिम व मध्य भागात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे अस्तित्व व धर्मांतरणाचा वेग हा या लढ्यामुळे नाममात्र राहीला. मिशनर्‍यांनी मग आपल्या या कामाच्या व्युहरचनेमध्ये बदल करुन अरुणाचल - आसाम या सिमावर्ती भागात अरुणाचली विद्यार्थ्यांसाठी शैक्षणीक संस्था स्थापन करण्याचा सपाटा लावला. त्यांनी ओडलगुडी जिल्ह्यातजिल्ह्यातील, नॉर्थ लखिमपुर जिल्ह्यातील हरमोती, सोनित्पुर जिल्ह्यातील बालिपारा , धेमाजी जिल्ह्यातील सिलापथार, तिन्सुखीया व दिब्रुगढ इत्यादी ठीकाणी वस्तिगृहाची स्थापना करुन विध्यार्थ्यांना त्यांच्या रानटी परंपरेपासुन तुम्ही कसे वेगळे आहात हे बिंबविण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांचा धर्म आधुनीकतेच्या नावाखाली बदलविण्यास भाग पाडले. मग या सुशिक्षीत झालेल्या नव ख्रिश्चनांनी येथील राजकारणी नेते व सरकारी अधिकार्‍यांवर प्रभाव टाकुन त्यांना ख्रिश्चन धर्मप्रचारकांच्या कारवायांबद्दल अनुकुल मत तयार केले.
यानंतर ख्रिश्चन मिशनर्‍यांना जरी राज्यात प्रवेश बंदी होती तरी देखील परिस्थीती इतकी बदलली कि राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी मदर टेरेसा यांना याचुली येथे चर्च संस्था उघडण्यास १९९८ मध्ये परवानगी दिली. आज अरुणाचल्या प्रत्येक कानाकोपर्‍यात ख्रिश्चन मिशनर्‍यांचा वावर आहे. आज येथे धर्मांतरणाचा वेग वाढतो आहे. २००१ च्या जनगणनेनुसार ख्रिश्चनांचे प्रमाण हे राज्याच्या लोकसंख्येच्या २२% इतके आहे व ते आज सुमारे २५% पर्यंत पोचले आहे.

चर्च चे मुख्य लक्ष्य हे प्रामुख्याने येथील जनजातीचे धर्मगुरु हे असतात कारण त्यांचा जनजातिवर प्रभाव असतो. काही धर्मगुरुअ हे त्यांना दिल्या गेलेल्या आमिषाला बळी पडतात. धर्मांतरणाचा येथील वाढता वेग ही येथील गंभीर बाब आहे आणि हे असेच चालु राहीले तर हे राज्य ख्रिश्चन राज्य होण्यास विलंब राहणार नाही आणि तसे झाल्यास तो देशाच्या एकात्मतेला धोका होउ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.

The National Socialist Council of Nagalim (NSCN) या संघटनेने अरुणाचलच्या अर्ध्यी भागावर तो ग्रेटर नागालीम चा भाग असल्याचा दावा केला आहे. बंडखोर गटांनी तयार केलेल्या नकाशात अरुणाचलचे सहा जिल्हे हे त्याचे असल्याचे दर्शविले आहे. ही तीच सघटना आहे जीचे घोष वाक्य "Nagaland for Christ" आहे. त्यांना सभोवतालचा प्रदेश हा त्यांच्या राज्यात सामील करावयाचा आहे. या संघटनेने तिराप व चांगलांग जिल्ह्यातील बर्‍याच तरुणांना आपल्या संघटनेत भरती करुन घेतले आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ही काळजी करण्यासारखी आहे.

अरुणाचल प्रदेशाचे पहिले लेफ्ट. गवर्नर हे के.ए.ए.राजा हे होते. त्यांनी ख्रिश्चन मिशनर्‍यांपासुन या भुभागाचे संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच काळात येथे District Art and Curture Officer(DACO) चे पद निर्माण करण्यात आले आणि प्रत्येक जनजातीचे वेगळे सांस्कृतिक मंडळ निर्माण केले. या द्वारे प्रत्येक जमातिचा वैशिष्ट्यपुर्ण सांस्कृतीक वारसा जतन व विकसित करण्याला प्रोत्साहन मिळाले. त्यांनी रामकृष्ण मिशन व विवेकानंद केन्द्रांना अरुणाचलात आमंत्रित केले व त्यांना येथिल निरनिराळ्या भागात शाळा व वैद्यकिय प्रकल्प सुरु करण्यास प्रोत्साहीत केले.

"स्त्री सक्षम झाली तर घर सक्षम होईल" या विचाराने विवेकानंद केंद्र आज अरुणाचलमध्ये चार ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षण केंन्द्र चालवित आहे. शिवणकाम, विणकाम, लोणची, सॉस - जैम बनवणे, कापड विणने हे शिकवलं जाते. कोवळ्या बांबूचलोण्ण्चं इथे खुप प्रसिध्द आहे. या चार केन्द्रामधुन सुमारे ५०० च्या वर मुलींनी प्रशिक्षण घेतलं आहे.

दिवंगत तालोम रुक्बो

श्री तालोम रुक्बो हे येथील एक महान द्र्ष्टे व्यक्तिमत्व होते. त्याची येथील बदलत्या वातावरणावर बारीक नजर होती व येथील धर्मांतरणाच्या कार्यकलापाला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय करण्यात प्रयत्नशील होते. त्यांनी 'तानी' जनजाती मानत असलेली 'दोनी-पोलो' ही धर्मश्रध्दा लोकप्रिय करण्याचा निश्चय केला.त्यांनी जर्मनी येथे १९८६ मध्ये झालेल्या धर्मसभेत 'दोनी-पोलो" धर्माचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी पासीघाट येथे १९८९ मध्ये 'गांगीन' (प्रार्थना केंन्द्र) स्थापन केले व आपल्या भाषेत प्रार्थना गीताची रचना केली. त्यांनी 'आदि' जनजातीच्या स्थानीक श्रध्दा व संस्कृती जपण्यासाठी 'दोनी-पोलो' येलम केबान्ग' या' संस्थेची स्थापना केली.

अरुणाचलातील चांगलांग व तिरप या जिल्ह्याचे स्थान वैशिष्ट्यपुर्ण आहे. आसाम व नागालैंड या राज्यांमधील हा चिचोळा भूप्रदेश आहे. या दोन्ही जिल्ह्यांवर नागा भुमीगत संघटना दावा सांगत आहेत. तो प्रत्यक्षात यावा म्हणुन बंदूकीच्या जोरावर या जिल्ह्यातील जमातीचे पाश्चात्यीकरण करण्याचा विडाच, या भूमीगत संघटनेने उचलला आहे. या पाश्चात्यीकरणाचा प्रतिकार शांततेच्या मार्गाने 'रंगफ्रा' चळवळीद्वारे होतो. या दोन्ही जिल्ह्यात रंगफ्रा' देवतेची ६२ मंदिरे उभारली गेली आहेत. ७० हजार नागरिक या चळवळीत सामील आहेत. रंगफ्रा मंदिरामध्ये दर रविवारी प्रार्थना होते, त्याचप्रमाणे घरोघरी पूज व रंगफ्रा देवतेच्या प्रतिमेपुढे आपल्या प्रथेप्रमाणे दिवाही लावला जातो. २००४ मध्ये एन.एस.सी.ए. च्या बंडखोरांनी २ रंगफ्र मंदिरे उध्वस्त केली. परंतु स्थानिक जनतेने दहशतीचे वातावरण असुनसुध्दा त्या मंदिरांची पुनर्बांधणी केली.

अरुणाचलमध्ये निशी जनजाती ही प्रमुख असुन ख्रिश्चन मिशनृयांची ती प्रथम लक्ष्य बनली . आज या जनजातीचे ५०% लोक हे ख्रिश्चन झालेले आहेत मात्र जनजागृती च्या विविध चळवळीने यांच्या मध्येही अस्तित्व गमावल्याची भावना निर्माण होत आहे. व त्यांचा परतिचा प्रवास सुरु झाल्याच्या बातम्या येत असतात. चर्च चा प्रयत्न अर्थात च याला मोडता घालण्याचा दिसुन येतो. त्या साठी ते कोणताही मार्ग अवलंबण्यास तयार असतात.

पंतप्रधान श्री मनमोहन सिंह यांची भेट या राज्याला झाल्यानंतर बराच विश्वास येथे निर्माण झाला आहे. पण ह्या भेटी वारंवार झाल्यास येथील लोकांच्या मनात भारत आपल्या पाठीशी आहे ही भावना दृढ होइल व येथील स्थानिक चळवळीला बळ मिळेल.
राज्याचे मुख्यमंत्री श्री दोरजी खन्डु यांनी देखिल पर्यटकाना मोठ्या प्रमाणात या सुंदर राज्याला भेट देण्याचे आव्हान केले आहे. भारतातील पर्यटकांचा ओघ जसजसा वाढेल तसतसा येथे सुरु असलेल्या चोरट्या कारवाया देखील पितळ उघडे पडण्याच्या भितीने कमी होतिल यात शंका नाही.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

शशिधर केळकर's picture

22 Apr 2011 - 2:17 pm | शशिधर केळकर

वा, छान छोटेखानी पण माहितीपूर्ण लेख. आपणही अरुणाचल मधे जाऊन स्थायिक व्हावे असे वाटले!
धन्यवाद.

यशोधरा's picture

22 Apr 2011 - 2:20 pm | यशोधरा

वाचते आहे.. माहिती बद्दल धन्यवाद.

आदित्य रुईकर's picture

22 Apr 2011 - 4:06 pm | आदित्य रुईकर

येथे धर्माँतर बंदीचा कायदा करायला हवा.

आनंदयात्री's picture

22 Apr 2011 - 5:46 pm | आनंदयात्री

छान. हाही लेख माहितीपुर्ण आहे.
हेच का ते शिवलिंग ?

विश्वास कल्याणकर's picture

24 Apr 2011 - 10:58 am | विश्वास कल्याणकर

निवडणुकिची तेथील धामधुम व नंतर पावसामुळे लैंडस्लाईड्स मुळे इच्छा असुनही मी झीरो जिल्ह्यात जाउ शकलो नाही त्यामुळे मी यावेळी नक्की जाउन मगच सांगु शकेन. मात्र दिलेली माहिती माझ्या तेथील सहकार्यांच्या आधारे दिली आहे.

ती विदर्भाची राजकन्या होती. असं रुक्मिणीस्वयम्वर का कुठल्याशा ग्रंथातला धडा अभ्यासाला होता, त्यात वाचल्याचं आठवतय. माझे विदर्भातले मित्रही अशाच तिथं रुजलेल्या कथा सांगतात की रुक्मिणी विदर्भाची.

अता मूळ लेखाबद्दलः-
ही अघोषित लेखमाला व्यवस्थित आणि अपेक्षित मार्गानं पुढं जातेय.
आपण अरुणाचल वगैरे कसे आणि काय आहे हे सांगताय.सध्याची किंवा अर्वाचीन स्थिती सांगताय, तर मीही माझ्याकडे असलेल्या मतांची पिंक टाकल्याशिवाय राहु शकत नाही, जमत असल्यास दुरुस्ती करावी. आभारी राहिन.
ही घ्या आमची मुक्ताफळं:-

अरुणाचलात इतके बौद्ध कसे काय आले बुवा? त्यांची भौगोलिक सलगता, सांस्कृतिक एकता कुठे आहे?
भारतीय मुख्य भूमीशी मिळतं जुळतं समाजजीवन असलं तरी त्याच्या सारखा समाज कुठे आहे भारतात?
उत्तरः- सध्याच्या भारतात कुठेच नाही. इतर पूर्वोत्तर राज्यात नुसत्या जनजाती आणि फक्त स्थानिक धर्म व बाहेरचा ख्रिश्चन धर्म दिसतो, त्शा केवळ जनजाती इथे का नाहित? तुलनेनं स्थिर बौद्धसमाजजीवन कसं काय आहे ?
कारण सोप्पय. अशीच संस्कृती तुम्हाला सीमेपलीकडे मिळेल. तिबेटमध्ये! तिबेट आणि अरुणाचलाच्या सांस्कृतिक जीवनात घनिष्ठ संबंध आहे. तिबेट हा एक प्रबळ देश असताना, सुमारे शंभर एक वर्षापूर्वी चीन विखुरुन पडलेला एक सुस्त देश होता. भारत ब्रिटिशांच्या हातात होते. तेव्हा अरुणाचलाचा काही भाग तिबेटच्या ताब्यात होता.
त्याहीपूर्वी म्हणजे मध्ययुगात, किंव मागील हजारेक वर्षात तिबेट -अरुणाचल- भूतान इथं एकच संस्कृती होती. तिबेटचा धर्मप्रमुख हाच ह्या भागातला अधिकारी असे. त्यांची भाषाही मिळतीजुळती आहे. अगदि पूर्वापार त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार होत असे. एकाच विस्तीर्ण अशा भूभागावर एक समाज रहात असे. तिथल्या बौद्ध वाञ्मयात ह्याचे उल्लेख आहेत.

मग? अरुणाचल भारताचा भाग नाही? किंवा तो चीनचा भाग आहे काय?
चीनचा तो नक्कीच भाग नाही. पण भारतानं १९६२ नंतर "तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग आहे" असं काहिसं मान्य केलय.
भरिला भर म्हणजे प्रत्येक मोठ्या राजनैतिक देवाणघेवाणित आणि भेटीत चीन हे पुन्हा पुन्हा आपल्याकडुन वदवुन घेत असतो. आता चीन म्हणतो की अरुणाचलचा strategic area /प्रमुख भाग हा वस्तुतः "दक्षिण तिबेट" असल्यामुळ्ं भारतानम आम्हाला तो "gift" करुन टाकावा. इथच भारताची पंचाइत होते.
भरिला भर म्हणजे "तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग आहे" असं बोलताना निदान भारतान त्याच धर्तीवर "काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे" असं चीन कडुन वदवुन घेतलं असतं (किंवा तसं त्यांनी मान्य न केल्यास तिबेटचं तुणतुणं वाजवायची धमकी दिली असती) तर बरच परवडलं असतं असं वाटतं.

ह्याचा ख्रिस्तीकरणाशी काय संबंध?
एक नक्की की हा भाग (देव न करो) चीनच्या ताब्यात गेल्यास आणि तुम्ही म्हणता तसं तिथं खरचं भयंकर धर्मांतर वगैरे सुरु असल्यास तत्काळ थांबेल. चीनच्या वरवंट्याखाली जर तिबेटची चळवळ गपगार पडु शकते, सिक्यांग ह्या मुस्लिमबहुल भागातील फुटीर आवाज बंद होत असतील, तर ह्या मिशनर्‍याम्चही काही खरं नाही. चीन फुटीर चळवळी आणि वांशिक/धार्मिक्/सांस्कृतिक भिन्नता कशा निष्ठुरपणे संपवतो, कोट्यवधी लोकसंख्या असणार्‍या भागात लोकसंख्येचा तोल कसा अचानक बदलतो/बिघडवतो ह्याच्या अतर्क्य वाटणार्‍या आणि इसरायली करत असलेल्या क्रूर धंद्यालाही लाजवतील अशा कथा ह्या स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

ह्याचा मूळ लेखाशी काय संबंध?
कधी कधी क्षणभरच का असेना देशहितासाठी असलं काही कठोर, क्रूर वाटेल असं केल्यास काय हरकत आहे असं वाटुन जातं. पण पुन्हा स्वतःला त्या जनतेपैकी एक असं समजुन विचार केल्यास क्रूर उपाय पटत नाहित.

--मनोबा.

विश्वास कल्याणकर's picture

26 Apr 2011 - 3:49 pm | विश्वास कल्याणकर

विदर्भाबद्दल बरीच गल्लत होते मी विदर्भाचा असल्याने मला देखील बरेच काळ ही गल्लत होती. पण इशान्य भारताशी संबध आल्यानंतर खुलासा झाला पौराणीक कालात. कुण्डिल आणि विदर्भ ही अरुणाचल मधील प्राचीन राज्यांची नावे आहेत. रुक्मीणी ही पूर्वांचल कन्या मानली जाते. लोहित जिल्ह्यात कुण्डिल नदीच्या काठी भिष्माकाची राजधानी भीष्मक नगर होती. तेथुन १० कि.मी वर ताम्रेश्वरीचे मंदिर आहे. रुक्मीणी हरणाची घटना तिथे घडली. याभुप्रदेशात इंदुनिशनी ही जनजाती आहे. ही जनजाती रुक्मिणीशी आपला संबध जोडते.

चिंतामणी's picture

24 Apr 2011 - 5:37 pm | चिंतामणी

आपली लेखमाला चांगली माहिती देत आहे.