अल्कोपाथी व रुद्राक्षांच्या माळा.......

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Mar 2011 - 9:10 pm

रुद्राक्षाच्या माळा.

श्री. देवांना समाजकार्य करायची हौस फार ! समाजकार्य करायची सगळ्यात सोपी पध्दत म्हणजे पत्रकारिता करणे असा त्यांचा दृढ समज झाल्यामुळे ते त्यांचा कॅमेरा गळ्यात अडकवून सगळीकडे मिरवायची हौस पुरवून घेत असतात. त्यासाठी त्यांनी एक बनावट वर्तमानपत्राचा खास बनावट बिल्ला एका बनावट छापखान्यात छापून घेतला आहे. हा बिल्ला आणि त्यांचा कॅमेरा वापरून त्यांनी अनेक सभा, कार्यक्रमाचे वृत्तांत तयार केले व विविध वर्तमानपत्रांना व मासिकांना पाठवले पण छे ! कोळशाच्या खाणीत जोपर्यंत हिरा असतो तोपर्यंत तो कोळसाच असतो हेच खरे. पण त्यांनी नुकताच एका धर्ममार्तंडाच्या सभेचा वृत्तांत लिहिला आणि त्या कोळशाचा हिरा झाला. तो चक्क एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रात छापून आला आणि त्यांच्या या वृत्तांतावर वाचकांच्या उड्या पडल्या. प्रतिक्रियांचे तर विचारूच नका. त्यांचा सर्व्हर शेवटी ढपला.

कथाविडंबनविनोदसमाजमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

रामजोशी's picture

19 Mar 2011 - 10:13 pm | रामजोशी

:-)

आत्मशून्य's picture

19 Mar 2011 - 11:58 pm | आत्मशून्य

लेखामधे काही गोष्टी लीहताना कलम थोडे संभाळून वापरायचे होते असे व्यक्तीगत नीरीक्षण आहे, असो लेख वीनोदी आहे व हसू आणतो यात शंकाच नाही. पूलेशू.

दणका.. आपल्याला (बिअर खाशी आवडत नसली तरी) जाम आवडले! ग्रँडमध्ये कधीतरी जाउन पहावेच असा मनसुबा करीत आहोत, आपण भेटलात तर क्या कहने! ;-)

जयंत कुलकर्णी's picture

20 Mar 2011 - 9:23 pm | जयंत कुलकर्णी

चला जाऊयाच एकदा ! जमवा.

प.पु.'s picture

20 Mar 2011 - 12:47 pm | प.पु.

ही आमची ध्यानस्थिती.................

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2011 - 9:25 am | प्रकाश घाटपांडे

हल्ली म्हणे यात अल्कोरिथम या विषयाचा अंतर्भाव केला आहे. सोमरस विद्यापीठात यावर भरपुर संशोधन झाले आहे.

जयंत कुलकर्णी's picture

21 Mar 2011 - 7:47 pm | जयंत कुलकर्णी

:-) :-)