ग्रो अप बेब्ज..!!

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
16 Feb 2011 - 5:10 pm

नाही नाही.."आजकालचे तरुण-तरुणी".."पाश्चात्यांचं अंधानुकरण"..असा त्रिफळाचूर्णी लेख नाही हा..तरीही हा यापूर्वी पहिल्यांदा लिहीला तेव्हा मला कोणीतरी आधुनिक बुरख्याआड लपलेले कृष्णराव हेरंबकर (अश्लीलमार्तंड) म्हणाले होते. त्या रात्री मात्र मी त्रिफळाचूर्ण नाही तरी जरा हवाबाण हरडे घेतले..असो..

तर ..

वक्षखिंड (Cleavage ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) दाखवणारे काचोळीसदृश (Bra ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) उत्तरीय घालून महाविद्यालयात येणा-या पात्रांवर ड्रेस कोड नावाचा काहीतरी निर्बंधवजा अत्याचार होतोय असं पेपरमध्ये मध्यंतरी कळलं. आणि अधूनमधून कळतच असतं.

युवावर्गाची (मी पण युवा हं..!!) मुख्य तणतण ही की हे कपडे (म्हणजे सूक्ष्म वस्त्रे) कम्फर्टेबल असतात म्हणून आम्ही घालतो. त्यावर बंदी घालणारे हे कोण प्रिन्सिपॉल.. इट्स आवर लाईफ..

मी अजिबात संस्कृतीरक्षक नाही बाबा. आधीच सांगतो. मी अजिबात कुठल्याही फॅशन विरोधात नाही. उलट नव्या नव्या कपड्यांत नटलेल्या पोरी पाहून मी कौतुक करतो. पोरांचं मला कौतुक नाही. कारणं नैसर्गिक आहेत. मी पोरींविषयीच सगळं लिहिणार.

तंग किंवा लहान कपडे घालू नका असा प्रचार इथे नाही. मी तो करणारही नाही. मला उलट असल्या फटाकड्या पोरी बघायला आवडेलच. पण "कम्फर्ट"च्या मुद्दयामुळे आंबट ताक प्यायल्यासारखी माझ्या कपाळावर आठी आली आहे.

ज्या निर्वस्त्रांवर "उपाय" म्हणून ड्रेस कोड आला असावा ती निर्वस्त्रं मी नीट पहिली आहेत. हो. पहिली आहेत.

बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते. म्हणजेच माय लॉर्ड..तो शर्ट कम्फर्टेबल नाही.

दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (याचं नक्की नाव सांगून सहकार्य करावं):- हा कपडा मी घालू का असं मुलीनं विचारल्यावर "पण बाकीचे कपडे कुठे आहेत?" असा भाबडा प्रश्न जातो.. ही स्ट्रिंग स्कंधखळग्यांच्या दोन्ही बाजूस आणि कमरबंदाच्या जागेतून दिसत असते (चू.भू.द्या.घ्या.). ती ही मुलगी सारखी ओढत असते आणि कापडाच्या आत झाकायला बघत असते. म्हणजे लाज वाटते. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच ना?

खूप कमी उंचीचा स्कर्ट:- (वारा आला तरी उडणार नाही कारण उडायला काही शिल्लकच नाही असा.) तो घालून एअरपोर्टवर बसलेली मुलगी पाय अत्यंत आवळून क्रॉस करून बसते. मोकळेपणानं सरळ पाय पसरून बसू शकत नाही. दोन मांड्यांत उरला सुरला स्कर्ट खुपसून घट्ट धरून बसायचं..बाथरूम सापडत नसल्यासारखा चेहरा करून. म्हणजे कम्फर्टेबल नाहीच.

मुलीच्या टी शर्टच्या छातीच्या उभारावरच्या एरियात जर लक्षणीय मजकूर छापलेला असला (भले गायत्री मंत्र का असेना..) तर तो आम्ही वाचायचा की नाही वाचायचा? वाचायचा नाही तर मग तो तिथे कशाला ?

मैत्रिणींनो..जर उत्तम वक्ष आणि मांड्या दाखवणारा ड्रेस तुम्ही घातलात तर त्यात तुम्हाला फक्त कम्फर्ट हवा असतो का? की उकडतं म्हणून घालता? की आपले असेट इतरांनी बघावेत असं वाटतं? खरं सांगू? इतरांनाही ते बघावेसे वाटतात. तुम्ही ते दाखवलेत तर आम्ही बघू. लाजून खाली मान घालूच असं नाही.

ऑफिसात एक मुलगी पूर्ण मांड्या दाखवणारा स्कर्ट घालून आली होती. बराच वेळ तिच्यासोबत काम (मराठी अर्थानं..) करताना, बोलताना छताकडे बघ, पूर्वेकडे बघ, ईशान्येकडे बघ असं केल्यावर माझ्या लक्षात आलं की मी कशाला लाजतोय? मी कशाला टेन्शन घेतोय? मी कपडे घातलेत. आता माझी नजर चोरायची मला काही गरज नाही. पण ते अवघड होतंच.

पावसात पांढरा टी शर्ट घातलात तर तो भिजल्यावर कोणी तुम्हाला बघू नये आणि बघितलं तर "तसल्या ओलेत्या" नजरेनं बघू नये अशी अपेक्षा जरा अनरियल नाही वाटत?

अरे माझ्या (सारख्याच) तरुण मित्र मंडळींनो. तुम्ही म्हणता की कॉलेजनं आमच्या कपड्यांत लक्ष घालू नये. तुम्ही म्हणता की "यहां का सिस्टीम ही है खराब". तुम्ही म्हणता की "आम्हाला व्यक्तिस्वातंत्र्य हवं."

तर मग घसा खरवडून विरोध करण्यापूर्वी "सारासार विचार" नावाची एक सोपी गोष्ट का करून बघत नाही?

त्यासाठी आधी नुसता "विचार" करण्याची सवय का लावून घेत नाही?

साधा शुद्ध शांत विचार. मग तो कसलाही असो. भिरभिर न करता शांत बसून "विचार".

रोज थोडी थोडी सवय केली तर हळू हळू जमेल.

काय आहे तो ड्रेस कोड? कशासाठी केला गेलाय? नागडं फिरायची परवानगी मिळाली तर तुम्ही फिराल का?

आपण तथाकथित "प्रगत" होत जाताना नुसते "कपडे" स्वीकारलेले नाहीत, त्यासोबत काही संकोचाच्या कल्पनाही तयार केल्या आहेत.. अपरिहार्यपणे.

कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल. समाजाने बदलावं आणि नजर सुधारावी ही अपेक्षा चूक नसली तरी अतिआदर्शवादी आहे. ते होणे नाही. तोपर्यंत तरी स्वातंत्र्याची आजच्या दिवशी अस्तित्वात असणारी एक किंमत आहे. ती द्यायची तयारी आहे का?

निसर्गाकडे परत जाऊन वल्कलं नेसायची (किंवा तीही नाही) तर त्याच मार्गावर पुढे निसर्गाकडेच जाऊन मुक्त नर मादी संभोग चालेल का? तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का?

विचार..विचार..

किंमत द्यायची तयारी असेल तर जरुर घ्या ते स्वातंत्र्य.. हरकत घेणारे देणारे समाज किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल यापैकी कोणी कोणी नाही..प्लीज गैरसमज करू नका..तुम्हीच आहात स्वातंत्र्य घेणारे, किंमत देणारे आणि हरकत घेऊ शकणारे..

ग्रो अप बेब्ज. .. !! ... (आता यात कोणी डबल मीनिंग घेतलं तर तो प्रस्तुत लेखकाच्या आधीच डागाळलेल्या चारित्र्यावरचा आणखी एक दुर्दैवी डाग ठरेल..)

समाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

आजानुकर्ण's picture

16 Feb 2011 - 5:18 pm | आजानुकर्ण

शॉर्ट शर्ट घालणाऱ्या युवती या मनोगतावरील चर्चेची आठवण झाली. इथल्या आंतरजालीय स्त्रीमुक्तीवाद्यांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत.

(थोडी काडीः तुम्हाला फक्त स्त्रियांचेच छोटे कपडे दिसले का?)

गवि's picture

16 Feb 2011 - 5:23 pm | गवि

(थोडी काडीः तुम्हाला फक्त स्त्रियांचेच छोटे कपडे दिसले का?)

हो..

पुरुषांचे पाहून सुदैवाने मनात फरक पडला नाही. त्यामुळे त्यावर लिहिले नाही. :)

आजानुकर्ण's picture

16 Feb 2011 - 5:26 pm | आजानुकर्ण

पुरुषांचे पाहून मनात फरक पडत नाही आणि स्त्रियांचे पाहून फरक पडतो हा 'तुमचा' प्रॉब्लेम आहे की ते कंफर्टेबल कपडे घालणाऱ्यांचा?

गवि's picture

16 Feb 2011 - 5:29 pm | गवि

याचे उत्तर न देऊन वादाला वाव दीड वाव राखून ठेवतो.. ;)

विजुभाऊ's picture

16 Feb 2011 - 5:20 pm | विजुभाऊ

लढव रे खिंड लढव...
झकास ल्हिलयस.
किंग फिशर एअरलाईन्स ने जे टाईट हिपहगर ( याला मराठी शब्द माहीत नाही) त्यांच्या हवाइसुंदर्‍यांसाठी मुक्रर केलेले असतात त्याम्चे प्रयोजन काय असते?
जेट एअरवेज त्यांच्या हवाई सुम्दर्‍याना तोकडे स्कर्ट्स देते आणि उघडे पाय झाकायला काळे तलम मोजे देते या ड्रेस कोडचा अर्थ कधी लागतच नाही

गवि's picture

16 Feb 2011 - 5:27 pm | गवि

प्रयोजन "उघड" आहे.

असो. विरोध प्रयोजनाला, कमीजास्त कपड्यांना यापैकी कशाला नाही.

खरंतर "विरोध" नाहीच. त्याविषयी सतत कॉन्शस राहूनही त्याउप्पर त्यांना "कंफर्टेबल" म्हणण्यातला "विरोधाभास" फक्त..

आता प्रत्युत्तरे आवरतो.. अन्यथा पराभाऊ यायचे धाग्याची खव केल्याबद्दल सत्कार करायला.. ;)

गणेशा's picture

16 Feb 2011 - 5:29 pm | गणेशा

लेखन एकदम छान आहे..
जे सांगायचे आहे ते त्यांच्याच भाषेत सांगुन उगाच संस्क्रुती रक्षकाची भुमिका न घेता त्या ही पेक्षा जास्त जागरुकता दाखवण्यात लेखक या लेखा मार्फत यशस्वी होतो आहे असे वाटते..

अवांतर :
निर्लज्ज पणे उघड्या मांड्या किंवा अस्लिल चाळे करणार्‍यांसाठी एक घोष वाक्य रुढ होत गावाकडे..
बघणार्या ने लाजावे पण करणार्‍या ने लाजु नये....

स्वैर परी's picture

16 Feb 2011 - 5:31 pm | स्वैर परी

गवि, तुम्ही पुन्हा एकदा मुद्द्याला हात घातला आहात! खुपच सुरेख विचार! मनापासुन पटले!

वपाडाव's picture

16 Feb 2011 - 6:26 pm | वपाडाव

आता गविंनी मुद्याला घातलेले "हात" आखडते घ्यावेत, असा काहींचा मानस दिसतोय. ;-)
सुरेख मांडणी.
मेरी बिल्ली मेरेकोच म्याउ
असं झालंय हे लेखन.

अमित देवधर's picture

16 Feb 2011 - 5:44 pm | अमित देवधर

गविं शी सहमत.

मनराव's picture

16 Feb 2011 - 5:47 pm | मनराव

सुंदर लेख............रिवर्स थेरेपी आवडली.........

नाटक्या's picture

16 Feb 2011 - 6:48 pm | नाटक्या

बेंबीवर संपलेला शर्ट:- हा घालून मुलगी बाईकवर कुमारमित्रापाठी (Boyfriend ला मराठी शब्द सुचेना म्हणून वापरावा लागतोय) बसते, तेव्हा ती दर तीस सेकंदांनी हात मागे नेऊन शर्ट चिमटीने खाली कमरेवर खेचते. त्याखाली असलेला थालीपीठ भाजणी, उडदाचं डांगर, मोदकाची उकड यापैकी एका शेडचा मांसल भाग झाकावा अशी इच्छा तिला वारंवार होते.

अशा मुलींना आमच्यात ABCD म्हणतात. म्हणजे "अमेरिकन बॉर्न कन्फ्युजड देसी" नव्हे तर "अग्ग बाई चड्डी दिसते!!!"

बाकी लेख छानच आहे...

मनराव's picture

16 Feb 2011 - 7:18 pm | मनराव

:D :D :D

वाटाड्या...'s picture

17 Feb 2011 - 12:03 am | वाटाड्या...

लढ बाप्पु...:) :) एवढेच म्हणतो...

विचारवंतांच्या गुडबुकात गेलात तुम्ही !

स्वाती२'s picture

16 Feb 2011 - 7:28 pm | स्वाती२

लेख पटला.
वक्षखिंड :D

>> वक्षखिंड
असली खिंड लढवायला शेकडो देशपांडे लंगडी घालत तयार होतील!

भारतातील या परिस्थितीशी सहमत.
हिरव्या देशात मात्र आता आमचीच नजर मेलिये.
लेख खुसखुशीत झालाय.
आमच्याकडे सहा महिने थंडीच असते म्हणून का होइना पूर्ण, म्हणजे अगदी गळाबंद कपडे सगळेजणच घालतात.
जर्रा स्प्रिंग सुरु झाला की पुन्हा आपले तोकडे कपडे आहेतच.
इतकी वर्ष काही वाटलं नाही पण आता मुलगा मोठा (आणि बिनधास्त) होतोय आणि "हा प्रश्न आईवडीलांना कसा विचारू?" असं त्याला अजिबात वाटत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर त्याला कसं देऊ असं मला मात्र वाटत असतं.;)

पैसा's picture

16 Feb 2011 - 8:10 pm | पैसा

त्या निदान म्हणतायत "कम्फर्टेबल" वाटतं. तुम्हाला बघायला कम्फर्टेबल वाटायची सवय करून घ्या हळूहळू! जुन्या हिरोलोकांकडून शिका काहीतरी. ते बिचारे बुरख्यातल्या हिरोईनला बघून पण प्रेमात पडायचे. जरा आधुनिक व्हा! नायतर तुमचा दुसरा "मुतालिक " व्हायचा! आता हा कोण म्हणून विचारू नका!

स्पंदना's picture

16 Feb 2011 - 8:41 pm | स्पंदना

'कम्फर्ट' या शब्दाला धरुन जे काही धोबी पछाड टाइप लिहलय त्याला तोड नाही. एक अन एक शब्द पटला, अन मी स्वतः सुंदर सुंदर स्कर्ट्स घालते पण निदान गुडघ्या पर्यंत तरी उंची हवीच. ट्राउझर्स मध्यंतरी आम्हाला घालताच येनार नाहीत अश्या लो- कट च्या निघाल्या तेंव्हा भारतात येउन रेमंड मधुन एक दम स्टायलिश अश्या शिवुन नेल्या. अगदी थाम्बवुन विचारल गेल मला कुठ मिळाल्या म्हणुन. कपडे छान दिसाव म्हणुन घालायचे असतात, गरीब दिसाव म्हणुन नव्हे.

बाकि मराठीची शब्द संपदा वाढविल्या बद्दल हाबिनंदन!!

वाटाड्या...'s picture

17 Feb 2011 - 12:06 am | वाटाड्या...

अर्पणाताई...

उत्तम बोल्लात..."कपडे छान दिसाव म्हणुन घालायचे असतात, गरीब दिसाव म्हणुन नव्हे."...जोरदार टाळ्या...

- शिंपी वाट्या

आत्मशून्य's picture

16 Feb 2011 - 10:09 pm | आत्मशून्य

डोळे मीटेपर्यंत लक्षात राहील माझ्या.

टारझन's picture

16 Feb 2011 - 11:20 pm | टारझन

आमची मतं ह्यावर काही वेगळीच आहेत :)
आमच्या मते , एखाद्याला जे शोभेल तेच करावे ... ड्रेसिंग सेण्स नसेल तर ते सौंदर्या ऐवजी "ध्याण " होउन बसतं :) थ्री फोर्थ घातली तर किमान वॅक्सिंग केलेले असावे :)
असो , आम्ही सौंदर्योपासक असल्याने एफसी रोड किंवा एमजी रोड ला मस्त पैकी ललना बघत हिंडत टाईमपास करतो :) णॉर्थ च्या किंवा फॉरिनच्या पोरी सहसा टाईट आणि शॉर्ट टी शर्ट खाली ओढताना दिसणार नाहीत. . पण मराठी पोरी हमखास .. !! त्यांना एक तर स्टाईल पण मारायची असते आणि त्यात त्यांना संकोचही वाटत असतो :) त्यांची द्विधा मणस्थिती पहाणे मात्र रोचक ठरते :)

’सगळ्या गोष्टी उघड सांगता येत नाहीत - जालमहापुरुषवाक्यम

-( सौंदर्य प्रेमी) तम्मा टार्‍या

नितिन थत्ते's picture

16 Feb 2011 - 11:23 pm | नितिन थत्ते

>>त्यांना एक तर स्टाईल पण मारायची असते आणि त्यात त्यांना संकोचही वाटत असतो

यावरून एका जुन्या इंग्रज उमरावाची आठवण आली. हे महाशय आपल्या मिशा लाल रंगाने रंगवीत असत आणि मग त्यावर रुमाल धरून झाकून ठेवत असत.

वाटाड्या...'s picture

17 Feb 2011 - 12:10 am | वाटाड्या...

आयला, तुझं बरं लक्ष असतं पोरींच्याकडे त्यांनी वॅक्सिंग केलं का नाय ते बघायला...मला वाटलं का तु लेका पोरी बघायलाच फक्त जातोस 'तिकडे' ?

मरतय आता...टार्‍या काय फिरु देत नाय यफशी रोडाव..;)

- (न्हावी ) वाट्या...

टारझन's picture

17 Feb 2011 - 12:32 am | टारझन

प्रिय वाटाड्या जी , सदर महाभयानक प्रकार आमच्या एका पुर्वकंपनीत अनुभवायला मिळाला होता. तो अभिणव प्रकार सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरल्यामुळे ठाऊक होता . आणि केवळ उदाहरणादाखल दिला होता. :)

बाकी आपल्या सही वरुन आपण सगळ्या प्रकारचे केशकर्तन करुन देता असे कळते :) रोचक आहे :)

-(अस्वल) टार्णिल कपुर

वाटाड्या...'s picture

17 Feb 2011 - 12:50 am | वाटाड्या...

नाय रे बाबा...

अरे तेच म्हणतो...हे केशकर्तन कधी डोळे घालुन बघितले नाही...कोणाची भादरायची वेळच आली नाही बघ..;)

आणि हे काय रे.. वाटाड्या जी वगैरे...

तु जसा टार्‍या तसा मी सुद्धा वाट्या..काय?

- (टार्‍याचा उजवा शिकाऊ न्हावी) वाट्या...

पिवळा डांबिस's picture

17 Feb 2011 - 2:30 am | पिवळा डांबिस

थ्री फोर्थ घातली तर किमान वॅक्सिंग केलेले असावे
बरोब्बर! आणि ती तयारी नसेल तर त्या मुलींनी एफसी किंवा एमजी रोडवर न फिरता जंगलीमहाराज रोडवर फिरावं!!!
;)

त्या मुलींनी एफसी किंवा एमजी रोडवर न फिरता जंगलीमहाराज रोडवर फिरावं!!!

पिडांकाका गल्ली चुकलत
तो जे एम रोड नाही हो. गणेश रोड ( कसबा पेठ ), शिवाजी रोड ,बाजीराव रोड , दाणे आळी , चोळखण आळी , असे बरेच रोड आहेत पुण्यात . अजून थोड्या मोठ्या जागा हव्या असतील तर फुले मंडै , मार्केट यार्ड , आहेतच
( पुणे तेथे काय उणे असे कोणीतरी म्हंटलेच आहे. तेथे शाळेत सुद्धा वजाबाकी करताना उणे करायच्या ऐवजी वन्स कॉंप्लीमेन्ट करून बेरीजच कली जाते असे ऐकलय )

मृत्युन्जय's picture

16 Feb 2011 - 11:11 pm | मृत्युन्जय

बेस लिहिलय गवि. मध्यंतरी एका कार्यक्रमात स्मिता तळवलकर आल्या होत्या. त्यांनी असाच एक किस्सा सांगितला. त्या सिग्नलवर थांबलेल्या असताना एक तरुणी बाईकवर तिच्या कुमारमित्रापाठी अशीच लो राइज जीन्स घालुन बसली होती. मागुन काही मवाली मुलं आली आणि त्यांनी चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली. त्यानंतर त्या रस्त्यावर भर दिवसा लोकांनी जे काही बघितले ते शब्दातीत असावे. त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स काढुन टाकावी लागली. आणि लो राइज जीन्स म्हणजे...........

चक्क जळती सिगारेट त्या जीन्स मधुन आत टाकली.
हा महानालायकपणा झाला.
अश्या मुलांना सिगरेटचे चटके द्यायला हवेत.
या थट्टेपायी काही कायमचं कमीजास्त होवून बसलं तर काय?
विचार करण्याजोगी गोष्ट आहे.
मान्य आहे की त्या मुलीने काहीतरी विनोदी कपडा घातला असेल.
मुलं तरूण असताना वेड्यागत काहीही करून हिंडताना पाहत नाही काय?
पण त्यामुळं त्यांना असल्या जीवघेण्या मस्करीला सामोरं जावं लागलं नसेल.

महा क्रूरपणा. अशानी कमीजास्त होऊ तर शकतच पण जगावरचा विश्वास उडतो. काय बोलणार . तारुण्यात कधीच दुसर्‍याच्या भावना कळत नाहीत.

गुंडोपंत's picture

17 Feb 2011 - 9:49 am | गुंडोपंत

खरे आहे असा क्रूरपणा करू नये.
या मुलांची घरे शोधून त्यांच्या सकाळच्या टमरेलात पाण्याऐवजी बॅटरीचे अ‍ॅसिड भरून ठेवण्याची कल्पना सुचते मला! ;)

बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. या पाशवी मुली त्यांच्या विनंत्याना भीक घालत नसतील. म्हणुनच आपल्या महान संस्कृतिच्या रक्षणासाठी बिचार्‍याना असे टोकाचे उपाय करावे लागत असतील.

शिल्पा ब's picture

18 Feb 2011 - 7:50 am | शिल्पा ब

साधी गोष्ट आहे....अशा फटाकड्या पोरी यांच्याबरोबर गाडीवरून फिरायचं तर दूर बघतही नसतील मग अशी जळफळ निघते दुसरे काही नाही....
आणि बाकीचे लोक गम्मत बघत असतील? हो ना? जिथे रस्त्यावर बाईला अखंड पेटवून दिले तरी कोणी मदत करत नाही तिथे अजून काय होणार?

मुलूखावेगळी's picture

18 Feb 2011 - 12:07 pm | मुलूखावेगळी

बहुतेक संस्कृति रक्षक असावेत. या पाशवी मुली त्यांच्या विनंत्याना भीक घालत नसतील. म्हणुनच आपल्या महान संस्कृतिच्या रक्षणासाठी बिचार्‍याना असे टोकाचे उपाय करावे लागत असतील.

ते करणारे बिचारे :(
नेत्रेश , दुर्दैवाने तुम्हाला कोनी ही शिक्षा केल्यास काय वाटेल जरा इमॅजीन करुन बघा.

वाहीदा's picture

18 Feb 2011 - 1:55 pm | वाहीदा

नविन लेख लिहायला पाहिजे
ग्रो अप गायज! ग्रो अप !

कसले आलेत रक्षक ??
अश्या Pseudo-Culture Protectors च्या कानाखाली जाळ काढायला पाहिजे नाहीतर त्याच्या तोंडावर अ‍ॅसिड च फेकायला पाहीजे म्हणजे परत कोणाच्या वाटेला जाणार नाही .नीच मेला !

अहो ते मी उपहासाने (Sarcasm) बोललो आहे. अशा स्वयंघोशीत मोरल पोलिसांना फटकेच दिले पाहीजेत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Feb 2011 - 12:32 am | विश्वनाथ मेहेंदळे

अशा पाशवी प्रतिसादांपासून वाचण्यासाठी sarcasm sign घेऊन फिरावे.
संदर्भ :- http://www.youtube.com/watch?v=DF7MroTLDfU

चिगो's picture

18 Feb 2011 - 11:45 am | चिगो

ढुंगणाला चटके दिले पाहीजेत साल्यांना... त्यांना भाव देत नसतील मुली म्हणून जळते *****ची.. खरेतर त्या मुलीनी काय केलं ह्यापेक्षा लोकांनी त्या मवाल्यांना काय केलं (किंवा केलं नाही) ते महत्वाचे आहे... बाकी गविंनी ह्या मुलींच्या विरोधाभासी अ‍ॅटीट्युड वर लिहीलंय ते मस्तच आहे.

शिल्पा ब's picture

18 Feb 2011 - 11:54 am | शिल्पा ब

+१

अप्पा जोगळेकर's picture

19 Feb 2011 - 12:02 pm | अप्पा जोगळेकर

त्या पोरीला भर रस्त्यात जीन्स काढुन टाकावी लागली
हे कसं शक्य आहे? एकतर सिगरेट लगेच विझून गेली असणार. थोडासा चटका लागला असणं शक्य आहे. पण तेवढ्यासाठी जीन्स काढून टाकावी लागली हे अशक्य वाटतं.

मृत्युन्जय's picture

19 Feb 2011 - 12:11 pm | मृत्युन्जय

कसं शक्य आहे ते स्मितातैंनाच विचारावे लागेल. जीन्स मध्ये एक्स्प्लोझिव्स असावेत बहुधा.

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2011 - 12:36 pm | नगरीनिरंजन

थोडासा चटका? आप्पा, सिगारेटच्या चटक्याचा अनुभव नाही तुम्हाला असं दिसतंय. जळत्या सिगारेटच्या टोकाला १५०० अंश तापमान असते हे बहुतेकांना माहिती नसते. अशी जळती सिगारेट कापड आणि त्वचेमध्ये दाबून विझणे शक्य आहे?

अप्पा जोगळेकर's picture

19 Feb 2011 - 12:46 pm | अप्पा जोगळेकर

जळत्या सिगारेटच्या टोकाला १५०० अंश तापमान असते हे बहुतेकांना माहिती नसते.
टेक्निकल डिटेल्स बद्दल काही अंदाज नाही.

आप्पा, सिगारेटच्या चटक्याचा अनुभव नाही तुम्हाला असं दिसतंय.
कॉलेजात असताना इतर लोक करतात म्हणून फुकाची स्टाईल मारण्यासाठी हातावर चेचून सिगरेट विझवली होती. निदान तेंव्हा तरी तो चटका तुम्ही म्हणताय तितका जहरी वाटला नव्हता.

नगरीनिरंजन's picture

19 Feb 2011 - 12:55 pm | नगरीनिरंजन

>>कॉलेजात असताना इतर लोक करतात म्हणून फुकाची स्टाईल मारण्यासाठी हातावर चेचून सिगरेट विझवली होती. निदान तेंव्हा तरी तो चटका तुम्ही >>म्हणताय तितका जहरी वाटला नव्हता.
चेचण्याऐवजी एकदा नुसती टेकवून पाहा. विशेषत: मांडीचा मागचा भाग आणि पोटरी यांच्या मध्ये धरून विझवून पाहिली तर कळू शकेल कितपत त्रास होतो. ;-) (ह. घ्या.)

लोखंड वितळते १५३८ से. ला. १० वी मधली झोत भट्टी विसरलात का?
सिगरेटच्या टोकाला ५०० से च्या आसपास तापमान असते.

अशी जळती सिगारेट कापड आणि त्वचेमध्ये दाबून विझणे शक्य आहे?

अंगाला आग लागल्यास जीव वाचवायला जमीनीवर लोळायला सांगतात (Stop, Drop & Roll). जर पेटलेले शरीर आणि कपडे विझू शकतात तर एक छोटी सिगरेट का नाही विझणार?

शाहरुख's picture

16 Feb 2011 - 11:36 pm | शाहरुख

आल्प्सच्या पर्वतरांगांत बागडणार्‍या बॉलिवूड नट्या सोडल्यास कुणीही कंफर्टेबल नसणारे कपडे घालत असतील वाटत नाही...तसे त्या नट्यांनाही पैसा आणि शाहरुखची मिठी यांची उब असतेच म्हणा !

कॉलेजात ड्रेस-कोड ठरवण्याचा कॉलेजवाल्यांना हक्क असावा असे वाटते.

लिखाण आवडले :)

सूर्यपुत्र's picture

17 Feb 2011 - 10:00 am | सूर्यपुत्र

>>आल्प्सच्या पर्वतरांगांत बागडणार्‍या बॉलिवूड नट्या सोडल्यास कुणीही कंफर्टेबल नसणारे कपडे घालत असतील वाटत नाही...तसे त्या नट्यांनाही पैसा आणि शाहरुखची मिठी यांची उब असतेच म्हणा !
प्रेषक : शाहरुख... ;)
मिठी भिडली.... :)

-सूर्यपुत्र.

वाटाड्या...'s picture

17 Feb 2011 - 12:17 am | वाटाड्या...

उत्तम विचारमाला आणि हो तुझ्या नवीन शब्दबंबाळाला हात जोडुन वंदन...

हसुन हसुन मेलो लेका... ह्यावरुन एक जोक आठवला...

प्रश्नः एकदा मल्लिका शेरावत तिचे कपडे कसे धुत असेल...
उत्तरः सोप्पय...अरे सोप्पय...मिक्सर मधे घालुन...

- (धोबी) वाट्या...

माझ्या मुलीने असे कपडे घातलेले मला बिलकुल चालणार नाहीत पण इतरांनी घातले तर माझा आक्षेप नाही. दुट्ट्प्पीपणा म्हणा हवं तर.
इथे बायका सर्रास स्लीव्हलेस घालतात, मिनीस्कर्ट घालतात. पण बेंबीखाली जीन वगैरे फारच अंगावर येतं. कॅलिफोर्नियात पाहीलं होतं पण ईस्ट कोस्ट जरा पारंपारीक (कॉन्झरव्हेटीव्ह शिवाय इंटूक समजला जातो) आहे.

बायकाच का?
टीनएजर्स बघितले असशीलच.
मुलांच्या कमरेवरून आत्ता निसटतील कि मग निसटतील अश्या जीन्स आणि बॉक्सर घालून हिंडताना पाहून कितीतरीवेळा डोळे मिटून घ्यावेत (कायमचे नाहीत) असे वाटते. पुढचा रस्ता दिसणार नाही म्हणून मी तसे करीत नाही.;)
माझ्या कालेजात एक मुलगी केशरी स्कर्ट आणि केसही केशरी करून आली होती.
नंतर जांभळे कपडे घातल्यावर फक्त काही बटा जांभळ्या केल्या होत्या. अगदीच ज्वालाग्रही वाटत होती.;)

टीन मुलं भयानक खाली पडतील असे बर्म्युडा घालतात गं. बाकी केसांचा काहीबाही प्रकार मीही केलाय :( त्यामुळे त्याबाबत मौन. नवरा भयंकर रागवला होता. :P

सुनील's picture

17 Feb 2011 - 2:05 am | सुनील

कॅलिफोर्नियात पाहीलं होतं पण ईस्ट कोस्ट जरा पारंपारीक (कॉन्झरव्हेटीव्ह शिवाय इंटूक समजला जातो) आहे.

हवामानाचा परिणाम!

बाकी अमेरिकन बाया सहसा स्लॅक्स / ट्राऊझर्समध्येच जास्त दिसतात. स्कर्ट-स्टॉकिंग्सची रेलचेल युरोपात पहावी!

ते मात्र असेल बुवा!
आमच्याकडे बर्‍या टाऊनमध्ये अगदी आपल्याकडे आया काळजी करतील अश्याच अमेरिकन आया मुलांच्या कपड्यांच्या लांबीची काळजी करताना दिसतात. आपल्याकडे जसा (आपल्या पद्धतीचा) रोज स्वयंपाक करणे वगैरे प्रकार असतात तसेच माझ्या मुलाच्या मित्र मैत्रिणींच्या आया स्वयंपाक करून न्युट्रीशनबद्दल काळजी करत असतात.

स्कर्ट-स्टॉकिंग्सची रेलचेल युरोपात पहावी! >>

+१

गुंडोपंत's picture

17 Feb 2011 - 3:33 am | गुंडोपंत

अरे काय हे?
कपड्यांचे काय इतके घेऊन बसलात?
घालू द्या ज्या जे घालायचे ते. तुम्हाला का अडचण होते रे?

माझा पूर्ण पाठिंबा आहे असले सगळे काही करण्याला.

काय ते केस रंगवले तर तुमचे जळते हो?
वयोमानाने मला डोक्यावर केसच उरले नाहीत म्हणून, नाही तर मलाही जांभळे करावेसे वाटतात.

करा रे पोरा पोरींनो हवी ती फ्याशन करा! मस्त मजेत जगा! दुसर्‍यांचे कपडे पाहून स्वतःला काचवणारे हे असले खत्रुड लोक जगात असतातच. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मजा करा!

तेव्हा गवि जा आपल्या बनियन-चड्ड्यांची लेबलं कापा ते उलट करून घाला नि निवांत बसा - वय गेलं नि असले काही आपल्यावेळी मिळाले नाही, म्हणून त्रागा करू नका!

नाही गुंडोपंत.माझे काही वय बिय झालेले नाही.केस शाबूत आणि योग्य वयात सौंदर्य बघायला मिळतंय. Thats why I am in unique position to write this thought.

मीही हेच म्हणतो.आवडते ते घाला.जे घातल्यावर सदैव एक हात ते सावरुन झाकपाक करण्यात जाईल आणि मोकळे बसण्याचंही स्वातंत्र्य राहणार नाही असले घालण्याबाबतीत फक्त सारासार विचार करा.तोही नसेल करायचा तरी आनंद आहे.पाहात बसतो गंमत.असो.

मला अडचण होते हा ज्योक झाला. In fact "त्यांना" क्षणोक्षणी अडचण,संकोच होतोय हे दिसतं म्हणून विचार येतो.

बाकी परवानगी नाकारणारा मी कोण आणि जा रे माझा पठिंबा आहे म्हणून ती देणारे तुम्ही तरी कोण? आपण दोघेही काही कोणी राजे नव्हेत.आपण जे वाटते तेच लिहितोय ना? आय होप यू समझींग्ड.

गुंडोपंत's picture

17 Feb 2011 - 9:47 am | गुंडोपंत

बाकी मला तुझा मुद्दा समजला आहे. पण... तरी माझा 'पण' शिल्लकच आहे.

अरे कपडे आहेत म्हणून सौंदर्य आहे. ते तोकडे असल्याने सौंदर्य मादक 'वाटते' आहे. नरमादीच्या गूजनातला हा एक मात्र 'इव्हेंट' आहे.
ते कपडे तोकडे असण्यात ते 'नेमकेपणाने' सावरण्यातपण एक मजा आहे. त्यात अडचण कसली?
नेमक्या कपड्यांची हळू कळू सवय होते. मग नेमकेपणाने कसे बसले आणि बाईकवर कशी मिठी मारली तर आपला शर्ट आणि स्कर्ट उडत नाही ते कळते! हा नुभवाचा भाग आहे. लोक अनुभवातून बिनधास्तपणा शिकतात.

मात्र जे झेपत नाही ते घालू नये हा मुद्दा कळला. पण मग ज्यांना तोकडे घालायची सवयच नाही त्यांनी ती सवय तरी कशी करावी?

जमत असेल आणि चांगलं दिसत असेल तर कोणतेही कपडे घाला....इतरांचं माहित नाही पण मी घालते..भारतात असतानाही घालायचे....
अर्थात मोठ्या शहरात फ्याशन चालते....छोट्या शहरात, गावात वगैरे मानसिकता बदललेली नाही त्यामुळे...
बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत हे वाचून डोळे भरू भरू आले आणि मग वाहू लागले..

गुंडोपंत's picture

17 Feb 2011 - 7:14 am | गुंडोपंत

जमत असेल आणि चांगलं दिसत असेल तर कोणतेही कपडे घाला.... हेच म्हणतो मी. म्हणून मी माझी कोपरी नेहमी घालत असतो :)
नुसत्या कोपरी आणि चड्डीवर आंगणात गेलो म्हणून ही ओरडत असते. पण माझी नाडीची चड्डी असते गुडघ्या पर्यंत. त्यामुळे काय बिघडते. शिवाय मला का कुणी माझी फिगर पाहून पळवून नेणार आहे? ;)

शेखर's picture

17 Feb 2011 - 7:30 am | शेखर

>> नुसत्या कोपरी आणि चड्डीवर आंगणात गेलो म्हणून ही ओरडत असते

पंत, टार्‍या तेच म्हणत होता लोक वॅक्सिंग न करता चड्डीवर बाहेर फिरतात. वॅक्सिंग करुन बघा, बहुतेक तुमची ही ओरडणार नाही ;)

गुंडोपंत's picture

17 Feb 2011 - 9:52 am | गुंडोपंत

आयडीया चांगली आहे.
आमच्या ही ला विचारून पाहतो.
तुम्हाला माहिती आहे का पुरुषांचे व्याकसींग करणारे कुणी?
तुम्ही कुठे केलेत?

शिल्पा ब's picture

17 Feb 2011 - 9:54 am | शिल्पा ब

व्यॅक्सींग म्हणजे काय गंमत आहे का? मुळापासुन केस उपटुन निघतात...आणि या वयात कशाला नाही ते सोंग !! ;) आहात तसेच रहा..जुने जमाने की निशाणी..

गुंडोपंत's picture

17 Feb 2011 - 10:08 am | गुंडोपंत

उपटून? अरे बापरे!!
हे तर भलतेच अवघड आहे म्हणायचे!
व्याकसिंग साठी काही लोकल अनास्थेशिया वगैरे देत असतील ना?
नसेल तर आपल्याला काही जमायचं नाही बॉ!

मग मी जुणे जमाणे की णिशानी म्हणूनच बरा!

टारझन's picture

17 Feb 2011 - 10:30 am | टारझन

वा गुंडोपंत वा :) तुम्ही वॅक्सिंग च्या भाणगडीत ण पडता सरळ वस्तारा फिरवा .. हाय काय नाय काय :)

आणि जरा ती चट्ट्यापट्यांची णाडी वाली शॉर्ट्स सोडुन बदामाचं किंवा फुलांचं किंव्हा ट्विटीबर्ड चं चित्र असलेली बॉक्सर वापरत चला .. हल्लीच्या म्हैलांमधे ते जास्त प्रिय आहे असे मी "टाईम" ह्या मासिकात वाचले आहे :)

सुहास..'s picture

17 Feb 2011 - 10:33 am | सुहास..

=))=))=))=))

गचकेश !!

शिल्पा ब's picture

17 Feb 2011 - 10:39 am | शिल्पा ब

हल्लीच्या म्हैल्लान्ना जाऊद्या हो...त्यांच्या म्हैलेला काय आवडतंय अन त्यांना काय झेपतंय ते महत्वाचं...अशा रंगीबेरंगी ब्वाक्सर लेन्ग्यासारख्या थोडीच घालता येणारयेत?
टैम मराठीत यायला लागला कि काय !! का तुम्हाला विंग्रजी येतंय याची जाहिरात म्हणायची? का तुम्ही काय वापरताय याचा निनाद आहे हा? उगीच प्रश्न पडले इतकंच...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

17 Feb 2011 - 12:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हीहीहीहीही !!! एका प्रतिसादात किती विकेटा काढाल ??

गुंडोपंत's picture

17 Feb 2011 - 11:15 am | गुंडोपंत

अरे बाळा मला महिलांमध्ये लोकप्रियतेची गरज नाही रे बाबा!
महिलाप्रिय झालो तरी या वयात ती लोकप्रियता 'झेपली' पण पाहिजे ना?

आता काही आमचे लाल बदामाच्या चड्ड्या घालायचे वय नाही राहिले. ते तुमच्या सारख्यांवर सोपवले आहे राजे! लढा!

आमच्या 'ही' ला मी प्रिय आहे इतकेच पुरे. त्यामुळे मला माझी निळी, नाडीवाली, बिना लेबलाची चट्टेरी चड्डीच बरी!

स्पा's picture

17 Feb 2011 - 11:04 am | स्पा

बेष्ट ...
वेण्या घाला :D

बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत हे वाचून डोळे भरू भरू आले आणि मग वाहू लागले..

>>>
"बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत"

-1

आसे म्हटले नाही. दुरित हे दुरितच..

कंफर्ट कशाला म्हणायचं आणि कशाला नाही याचा मुद्दा आहे.

खादाड अमिता's picture

21 Feb 2011 - 12:42 pm | खादाड अमिता

>>>बाकी पारंपारिक कपडे घातलेल्या बायकांना किमती द्याव्या लागत नाहीत"

-1

आसे म्हटले नाही.

उत्तम लेख..चांगला विषय..पण मांडणी?

पुर्वी काही पाक्षिके "अरेरे कितीही अश्लिलता" असे म्हणत अश्लिल फोटो दाखवून द्यायची.. म्हणजे दोन्ही लोकांची हौस भागते..ज्या लोकांना फोटो पहायचे आहेत ते फोटो पहात..ज्यांना अश्लिलतेच्या विरूद्धात काही वाचायचे आहे ते ले़ख वाचत...म्हणजे असे केल्याने आपण अश्लिलतेच्या विरूद्धात काहीतरी करत आहोत असे दाखवून आपल्या मॅगॅझिनचा खप वाढवायचा प्रयत्न असायचा..

तुमचा लेख मला थोडाफार या प्रकारातला वाटला..म्हणजे असले शब्द दर तीन चार वाक्यानंतर वापरून पण वरकरणी लेखाचा रोख मात्र काहीतरी या विरूद्ध उपदेश द्यायचा..म्हणजे तुम्ही तसले लिहायची हौस भागवून घेतली आहे असे वाटले..(माफ करा थोडे स्पष्ट बोललो म्हणून..जे मनात आले तेच लिहीले..)

मुद्दा मांडण्यासाठी मसाला मारावा लागतो.ते अधूनमधून हिरवट शब्द नसते तर तुमच्यासहित कोणी काय मुद्दा आहे तेही शेवटापर्यंत वाचले नसते.
हिरवट नव्हे,मी अजून हिरवाच आहे.
एकूण रोचक वाटले ना?भरुन पावलो.

गुंडोपंत's picture

17 Feb 2011 - 9:53 am | गुंडोपंत

गगनविहारी
की
गगन हिरवाई?

मांडणीबाबतीत अतिशय सहमत.
पौगंडावस्थेत समवयस्कांबरोबर ह्या प्रकारचे जोक किंवा चर्चा होत असतात, ते विषय तेव्हा चघळणे, किंवा काही विशिष्ट शब्दसंपत्ती तयार होते तिचा वापर किंवा तसे चारचौघात मित्रांमध्ये बोलून गंमत घेणे हे त्या वयाला अनुरूप असते. पण आपण त्यातून कधीतरी बाहेर पडतो किंवा पडावे अशी अपेक्षा असते. असो.

नीधप's picture

21 Feb 2011 - 9:30 pm | नीधप

+ १

नगरीनिरंजन's picture

17 Feb 2011 - 5:49 am | नगरीनिरंजन

कोणी काय कपडे घालावे तो ज्याचा त्याचा प्रश्न असावा असं मला वाटतं. काही लोकांच्या लैंगिक भावना चाळवल्या जातात म्हणून किंवा नुसतंच एक सामाजिक बंधन म्हणून स्वतःची हौस का मारायची? ज्यांना बघायचं आहे ते तसंही टकामका बघतच असतात. पूर्ण बुरख्यात झाकलेल्या स्त्रीची पाऊले पाहून पुरुषांच्या मनात पाप येते वगैरे किस्से ही ऐकलेलेच आहेत. जेवढं झाकाल तेवढी उत्सुकता आणि अप्रूप वाढतं. कमी आणि उत्तान कपडे घातल्याने बलात्कार वगैरे गुन्हे होतात याला काहीही आधार नाही. विशेषतः चित्रपट, दूरचित्रवाणी वगैरे माध्यमांमध्ये सगळं चालवून घ्यायचं आणि लोकांनी मात्र त्याचं अनुकरण करू नये अशी अपेक्षा बाळगायची हे चुकीचं आहे.

मदनबाण's picture

17 Feb 2011 - 6:22 am | मदनबाण

ओ विहारी... लयं जबराट लिवलं हायेत तुम्ही. :)

बाकी मुली आणि मुलींचे कपडे यावर एक विश्वकोष नक्कीच बनु शकेल हो !!! ;)
लो वेस्ट जिन्स घालुन फिरणार्‍या मुलींच्या मनात नक्की काय भावना असतात, ते जाणुन घ्यायची लयं इच्छा हाय. चिर दर्शन सोहळाच असतो सगळा !!! ;)

जाता जाता :--- ते शेफाली झरीवालाचं काटा लगा आठवलं... का ते समजलचं असेल तुम्हाला. ;) तिच्या हातातल "ते" पुस्तक पाहुन तिच्या "बाल मनावर" झालेला परिणाम लगेच कळला... ;) आणि ते गाणं तसं का ते कळलं...
असो...

एकदा ओरडुन घेतो :--- घोर कलियुग हो !!! ;)

सन्जोप राव's picture

17 Feb 2011 - 6:46 am | सन्जोप राव

लेखकाच्या शब्दकळेला सलाम. वक्षखिंड काय, कुमारमित्र काय,दो-यायुक्त अंतर्वस्त्रं काय, अगदी मस्त शब्द.दो-यायुक्त अंतर्वस्त्रं (इथे स्पाघेटी म्हणायचं असेल तर) ला शेवयासदृश असं का म्हटलं नाही याचं नवल वाटलं. असो.
हिपहगरला कुल्लाकुरवाळक किंवा नितंबनेसण असे शब्द रुढ व्हावेत का?

पंगा's picture

17 Feb 2011 - 7:53 am | पंगा

हिपहगरला कुल्लाकुरवाळक किंवा नितंबनेसण असे शब्द रुढ व्हावेत का?

स्वभाषा आत्मविश्वासाने वापरणार्‍याच्या हक्काने केल्यास तज्ज्ञांच्या मते ग्राह्य ठरावेत, असे वाटते.

पण त्याऐवजी 'नितंबालिंगक' किंवा 'नितंबचुंबक' हे पर्याय कसे वाटतात?

राजेश घासकडवी's picture

17 Feb 2011 - 7:33 am | राजेश घासकडवी

चमचमीत शब्दांत, सुंदर शैलीत, वाचत राहावासा वाटणारा लेख. पण विषयाच्या व मांडणीच्या बाबतीत योगी९०० यांच्याशी सहमत. एकाच वेळी संस्कृतीरक्षणाचा आनंद, व हिरवटपणाचा मजा.

तरीही एक मान्य केलंच पाहिजे की तुम्ही केवळ 'कंफर्टेबल' या कारणाला आक्षेप घेतला आहे. म्हणजे मी असं गृहीत धरतो की समस्त कुमारमित्रस्वयंचलितदुचाकीपार्श्वजागारोहित मुलींनी जर आपला तोकडा शर्ट उडला तरी पर्वा नाही अशा कंफर्टेबली वावरलं तर तुम्ही हा लेख जाहीरपणे मागे घ्याल. किंवा उडण्यास जागा नसलेला स्कर्ट घालून शेरॉन स्टोनगिरी केली तर तुम्ही 'वा, कंफर्टेबल राहाणं म्हणतात ते यालाच' असं म्हणाल.

मी असं म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे की कंफर्ट हे केवळ शारीरिक नसतं तर मानसिकही असतं. शरीराला जे कंफर्टेबल आहे, ते संस्कृतीरक्षकांच्या आणि टवाळांच्या नजरेला हीन वाटतं त्याचा परिणाम ते कपडे घालणाऱ्या मुलींच्या मानसिक कंफर्टवरही होतो. जर संपूर्ण समाजाने मानसिकता बदलली व आपली नजर निर्मळ केली तर हे डिसकंफर्ट जाणार नाही का?

तशी दुर्घटना घडली तर ती हलकी घेऊ शकणार आहात का? पाकीट मारलं गेल्यावर आपण दु:ख करतो पण आयुष्यातून उठत नाही..तसंच याही दुर्घटनेला घेऊ शकू का?

हे फारच खुपलं. बलात्कार हा शब्द न वापरता तुम्ही संभाव्य 'दुर्घटनां'ची जबाबदारी तसले कपडे घालणाऱ्या मुलींवर टाकत आहात. यापेक्षा अधिक डिसकंफर्टिंग काय असेल?

शिल्पा ब's picture

17 Feb 2011 - 8:05 am | शिल्पा ब

<<<हे फारच खुपलं. बलात्कार हा शब्द न वापरता तुम्ही संभाव्य 'दुर्घटनां'ची जबाबदारी तसले कपडे घालणाऱ्या मुलींवर टाकत आहात. यापेक्षा अधिक डिसकंफर्टिंग काय असेल?

+१ अगदी १००%

आणि "तसले " (यात वाईट काय ते नक्की समजत नाही कारण नौवारीच्या सुमारास पाचवारी उथळ ठरवली गेली होती असे काहीसे ऐकून आहे ) कपडे घातलेल्यांवरच अशी दुर्घटना कोसळू शकते का?

गम्मत म्हणजे अशी मानसिकता केवळ पुरुषांचीच असते असे नाही....अन आया सुद्धा त्यांच्या मुलांवर आणि मुलींवर हेच संस्कार करताना दिसतात त्यावेळी दया येते...त्याच त्या घाणेरड्या मानसिकतेत गुंतवून टाकायचं कि त्यांचा त्यांना विचार करून ठरवू द्यायचं?

साडी हे काही खास वस्त्र आहे आणि ते घातले की सर्व उत्तम कंफर्टेबल अशी घोर गैरसमजूत आहे.

As seen on traditional day, साडी सवय नसताना नेसली की तीच स्कर्टवाली डिसकंफर्ट लेव्हल येते.आपण ज्यात सदा कॉन्शस होतो आणि सतत चाचपून ठीकठाक ठेवत राहतो ते वस्त्र,मग साडी,धोतर,पीतांबर,धाबळी,कद,मुकटा,लुंगी,हाप्पँट काही का असेना.कोणीही ते केवळ इतरजण घालतात म्हणून घालावे का? जाऊदे.

By the way..

त्याच त्या घाणेरड्या मानसिकतेत गुंतवून टाकायचं कि त्यांचा त्यांना विचार करून ठरवू द्यायचं?>>>

Vichaar karaayalaach madat karatoy.. :-)

मी असं गृहीत धरतो की समस्त कुमारमित्रस्वयंचलितदुचाकीपार्श्वजागारोहित मुलींनी जर आपला तोकडा शर्ट उडला तरी पर्वा नाही अशा कंफर्टेबली वावरलं तर तुम्ही हा लेख जाहीरपणे मागे घ्याल. किंवा उडण्यास जागा नसलेला स्कर्ट घालून शेरॉन स्टोनगिरी केली तर तुम्ही 'वा, कंफर्टेबल राहाणं म्हणतात ते यालाच' असं म्हणाल.
>>>>
100 %
Just mean dont do whats not comfortable just under pressure to look so called attractive like peers.

जबाबदारी नाही हो टाकली.
तुम्ही अमुक कपडे घातलेत तर बलात्कार योग्य ठरेल असे मूर्ख विचार मी करतोय असं तुम्हाला वाटलं हे अजून discomforting.

जबाबदार नाहीत पण बळी त्याच ठरतात ना? बलात्कार सरळसरळ दुरितच आहे हो.त्याला करणाराच जबाबदार.

But ते पाकीट गेल्याइतके सहजतेने नाही ना घेता येणार? असो.

राजेश घासकडवी's picture

17 Feb 2011 - 9:11 am | राजेश घासकडवी

जबाबदार नाहीत पण बळी त्याच ठरतात ना? बलात्कार सरळसरळ दुरितच आहे हो.त्याला करणाराच जबाबदार.

बलात्कार होणं वाईट हे तुमचं मत आहे याबाबत मला जराही शंका नाही. विशिष्ट पद्धतीने कपडे घातले तर बलात्काराला बळी पडतात या विधानाला काय आधार आहे हे सांगू शकाल का? अन्यथा हा सोयीस्कर पूर्वग्रह वाटतो. तसले कपडे घालणाऱ्या मुलीवर जबाबदारी न टाकता या विधानाची कारणपरंपरा सांगता येईल का?

माझा मुद्दा असा आहे की आपल्याला हवे तसे कंफर्टेबल कपडे घालताना मानसिक डिसकंफर्ट वाढवण्याचं काम तथाकथित संस्कृतीरक्षक करतात. मग तो डिसकंफर्ट हा शारीरिकच आहे असा दावाही करणं हे अन्याय्य होतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Feb 2011 - 10:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

"मंगळसूत्र घातलं की इतर पुरूष वाईट नजरेने बघत नाहीत" या वाक्याएवढं हास्यास्पद आणखी काही वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं.

"मँचेस्टरमधल्या मुलींचे कपडे ऋतूप्रमाणे बदलत नाहीत," अशी 'तक्रार' एका साठीच्या कलीगने केली होती. मँचेस्टरमधे असताना, असे काय काय विनोदी शब्द वापरता येतील असे कपडे वापरताना, कधीही अनकंफर्टेबल वाटलं नाही. मात्र तत्सम संस्कृतीरक्षकांच्या 'गावा'त अंगभर कपडे घालूनही अनेकदा अनकंफर्टेबल वाटतं.
याच्याच उलट गंमत माझ्या मैत्रिणीने सांगितली. तिचा स्विमिंग कॉस्चुम अगदीच "भारतीय" आहे. इटलीत बीचवर पोहायला जाताना ती तोच कॉस्चुम घालून गेली तर इतरांना थोडं अनकंफर्टेबल वाटलं. फुलं बडवायला चपला किंवा फ्लोटर्स घालून गेलं तरीही अनकंफर्टेबल वाटतं.

एकेकाळी स्त्रियांना शिक्षणाची काय गरज असं म्हणत त्यांचं शिक्षणच बंद केलं. आता ते नाही तर अभिव्यक्तीवर हल्ला! स्वतः कायम शर्ट-ट्राऊझर्स घालणारे ढुढ्ढाचार्य "स्त्रियांचं सौंदर्य साडीतच खुलून दिसतं", वगैरे ड्वायलाक मारायला लागले की त्यांच्या सौंदर्यदृष्टीच्या नावाने बोटं मोडण्यात भयंकर मौज वाटते.

बाकी माझे स्वतःचे कपडे फक्त ऋतूमानाप्रमाणेच नाही तर गरज आणि स्वतःच्या आकारमानाप्रमाणेही बदलतात. शिल्पा, त्याबाबतीत तुझ्याबद्दल नक्कीच असूया वाटते. :-)

गवि's picture

17 Feb 2011 - 10:43 am | गवि

"विशिष्ट पद्धतीने कपडे घातले तर बलात्काराला बळी पडतात या विधानाला काय आधार आहे हे सांगू शकाल का?"
आणि
"मंगळसूत्र घातलं की इतर पुरूष वाईट नजरेने बघत नाहीत"

राजेशजी, थेट बलात्कारापर्यंत कशाला पोहोचताय? ती एक एक्स्ट्रीम गोष्ट झाली. नुसत्या नजरासुद्धा टोचत असतील तर आणि त्यामुळे कॉन्शस होऊन ते जे काही अंगात घातलंय त्याच्या आनंदापेक्षा संकोच आणि अवघडलेपण जास्त होत असेल तर अशा मनोवृत्तीने ते का घालावेत असा फक्त विचार करायला सांगितला.

शिवाय एका दृष्टिक्षेपात कदाचित तुम्ही केवळ "तोकडे" कपडे म्हणजे वाईट अशी समजूत करुन घेतलीत. मी अजून स्पष्ट करतो:

मी नुकतीच एअरपोर्टवर खुर्चीत बसलेली एक मुलगी पाहिली. तिचा स्कर्ट असा होता की तिला घट्ट पाय एकमेकांशी जुळवून बसण्याखेरीज इलाजच नव्हता. समोर बसलेला मी, माझी पत्नी आणि तीनवर्षीय मुलगा या तिघांनाही अन्यत्र नजरा वळवून बसणं भाग पडत होतं. तरीही समोरच असल्याने नजर जातच होती. आमचं जाऊ द्या. ती मुलगी स्वतः पूर्ण दोन तासांच्या वेटिंगमधे आपली पोझिशन घट्ट पाय जुळवून सांभाळणे याखेरीज कशातच लक्ष लावू शकत नव्हती.

तरीही जर तिला त्या ड्रेसचा नंतर अन्यत्र काही आनंद / लाभ / आराम होणार असेल तर काही हरकत नाही पण त्याच जागी ती पँट शर्ट घालून बसली असती तर मोकळेपणाने चारचौघांसारखे तिचे ते दोन तास गेले असते.

मी अनेक स्कूल गोईंग मुली स्कर्ट घालून सायकल चालवताना पाहिल्या आहेत. प्रत्येक पेडलला एक हात हँडलवरुन सोडून त्या आपला स्कर्ट गुढग्याखाली सरकवत राहतात. हा ड्रेस कंफर्टेबल आहे का?

मी संस्कृतीरक्षक आहे किंवा माझे काही बुरसटलेले जुने विचार (साडी वगैरे नेसा) असे थोपतो आहे अशी समजूत झाली असेल तर नक्कीच लेख वरवर वाचला आहे असं म्हणता येईल.

तुमच्या समाजाकडून अपेक्षा रास्त आहेत पण आयडिअलिस्टिक आणि फास्ट आहेत.

मी खाली लेखातलंच वाक्य हायलाईट करतो. कपडे बदलून समाज तातडीने बदलणार नाही. त्याची नजर असे कपडे घालून रातोरात मरणार नाही. त्याला वेळ लागेल.

पूर्ण कपडे घालूनही जे व्हायचं ते होणारच हे अगदी खरं पण तुम्ही जे कपडे घालताय त्याचा समोरच्यावर काय इम्पॅक्ट व्हावा याची अपेक्षा आधी ठेवूनच ते ड्रेसिंग केलेलं असावं ना?

आपण क्षणभर शरीरप्रदर्शन हा ढोबळ मुद्दा बाजूला ठेवू.

हे पहा:

किंवा हे:

यापैकी काही स्टाईल मला / तुम्हाला आवडते म्हणून करुन आपण बाहेर गेलो, तर लोकांनी मला /आपल्याला पाहूनही न पाहिल्यासारखे करावे किंवा "विचित्र" नजरांनी पाहू नये आणि त्या नजरांनी मला संकोचून जायला होऊ नये अशी अपेक्षा ठेवणे हे अति नाही होत?

तुम्हीही माझ्याकडे विचित्रपणेच बघाल. अमेरिकेत समजा बरेच लोक असे रहात असतील तर मग लोकांनाही ओव्हर द ईअर्स सवय झालीच असेल. तिथे संकोच वाटूच नये. मी त्या त्या सराउंडिंगमधे कंफर्टेबल नसलेल्या कपड्यांना (पेहराव म्हणू हवं तर) कंफर्टेबल म्हणण्याविषयी म्हणतोय्..कारण नीट विचार केला तर असं दिसेल की हे पीअर प्रेशरने अ‍ॅडॉप्ट केलं गेलेलं असतं.

उदाहरण हे उदाहरणच आहे म्हणून किंचित अतिरेकी घेतलंय.

असो.

शिल्पा ब's picture

17 Feb 2011 - 11:03 am | शिल्पा ब

केवळ दुसऱ्याची बरोबरी करण्यासाठी वगैरे आपले मत, वागणे, कपडे अजून काय असेल ते बदलू नये....

कपड्यांच्या किंवा इतर कोणत्याही फ्याशनविषयी : आपण जर ती फ्याशन करीत असू तर बिनधास्त करावी....याला काय वाटेल, त्याला काय वाटेल असे विचार कशाला करायचे? वरील उदा. दिलेले विचित्र लोकसुद्धा त्यांच्या विचित्रपणात संकोचत नसतील तर तर त्यांच्यापुरते ते ठीकच म्हणायचे...इथे मी यापेक्षा भयानक प्रकार पाहिलेत. असो.