मसल्स दिखाऊ संस्कृती

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
21 Dec 2010 - 2:16 pm

आमच्या बालपणी आम्ही एकमेकांना दंडाच्या बेडक्या दाखवित शक्तिप्रदर्शन करीत फिरायचो. ज्याची दंडुकळी उंटाच्या पाठीसारखी टम्म फुगणार तोच खरा शक्तिमान!
आमच्या वरल्या आळीची पोरं 'तालिमगीर' होती. छाती पुढे काढून, बाह्या दुमडून किँवा बनियनवर फिरायची. त्यांचा तो दणकट देह पाहून आम्हांलाही व्यायामाची खुमखुमी यायची. मग पहाटे उठून नदीकाठच्या गवतात डबडं लपवायचं, अन् रस्त्याने धावत सुटायचं. ही आमची पद्धत. हिवाळ्याची चाहूल लागली की आम्हांला व्यायामाचा किडा चावायचाच.
व्हायचं काय की पहिल्याच दिवशी दोन चार मैल पळून आल्याने दुसरा दिवस अंथरुणातच उगवायचा. पोटऱ्‍या सुजून यायच्या, फटपट बोलू लागायच्या. पुन्हा व्यायाम बंद. दरवेळी हाच 'वर्षक्रम' चालू राहिल्याने आम्ही मैदान मारणारे पैलवान झालो नसलो, घरातली कामे करणारे 'बैलवान' मात्र झालो!
मूळ म्हणजे आम्हांला योग्य मार्गदर्शनाची साथ न मिळाल्याने आमचे हात बायकीच राहिले..
पुढे कॉलेजला गेल्यावर रबड्या नावाचा सौष्ठवपटू मित्र म्हणून लाभला. पुन्हा आमच्या मनातल्या बेँडकुळ्या डराँव डराँव करू लागल्यावर आम्ही त्याच्यासोबत 'जिम' नामे गुहेत प्रवेश केला. तेथली यंत्रे आम्ही फिरवणं शक्यच नव्हतं, तसा प्रयत्न केल्यास तेच आम्हांस फिरवित. नेटाने दोन महिने रबड्याचं तटतटतं अंग पाहून सोसेल तशी मेहनत केली. तेव्हा कोठे आमच्या बेडकांची पिलावळ दिसू लागली. ते पाहून काही मित्र विचारायचे- ' जोरावर जोर काढतोयेस की रे, पोरगी पटवायचा विचार आहे की काय?' परंतु तसं काही नव्हतं. पोरी काय नुसत्या बॉडीवरच भाळतात? त्यांना सर्वांगिण गोडीची आस असते. असो.
एकूण काय तर त्या जिममध्ये वेट लिफ्टींग करणारे आम्ही एकमेव काडी पैलवान असू. ते सर्वांगावरचे गोळे उडवणं आम्हांला काही जमलं नाही. आमचा पिंड त्यासाठी नव्हताच, शब्दांची खिँड लढवण्यासाठी होता, हे ज्यावेळी एक मैत्रिण आमची कविता वाचून गोग्गोड हसत जवळ आली तेव्हा कळले! त्या आमच्या कवितेचं शीर्षक होतं- तुझे डोळे.
कोठे ते तिचे टपोरे डोळे अन् कोठे आमच्या दंडाचे सपाट गोळे! केवढा विरोधाभास होता.
एवढं आठवायचं कारण म्हणजे आमच्या परिसरात एक जिम मोठा गाजावाजा करीत सुरु झालीय. तेथे हा-हू करणारी पोरं कधी येऊन आम्हांला विचारतात, 'मेगामासने मास वाढेल काहो?' किँवा 'बॉडीप्लसचा साईड इफेक्ट नाही ना?' किँवा 'मी अमूक तमूक खान सारखा 'बॉडीवान' होऊ शकेल का?'
आता आम्ही त्यातले लेखीवाचितज्ञ असलो तरी प्रँक्टिकली अज्ञ आहोत. त्यांना सांगावसं वाटतं की, 'हा मसल्सचा दिखाऊपणा कशासाठी? तसेही तुम्ही फिट आहात. बनियन-पँटी आणखी फिट्ट करण्याचा अट्टाहास का म्हणून? असे तट्ट शिरांचे गलेलठ्ठ मांसल गोळे घाम गाळून कमावताच कशाला? त्यापेक्षा पुरेसा आरोग्यदायी व्यायाम करुन उरलेली तुमची एनर्जी इतर विधायक कामांसाठी उपयोगात आणता येणार नाही का? शरीर सौष्ठवत्व आयुष्यभर पुरणार की शरीराची तंदुरुस्ती? प्रोटीनेटेड खाद्य कंपन्यांची माल खपवण्याची ही छुपी जाहिरातबाजी नाही कशावरुन? आज तुम्ही बॉडी बिल्डीँग करीत बसाल, म्हातारपणाच्या तरतुदीचं काय? अरे बाबांना खान बांधवांनी अंडी खावून खावून बॉडी कमावली ती प्रदर्शनासाठी, पैसे कमावण्यासाठी. तुम्ही मात्र त्यांच्या सिक्स पँक अँब्ज वर लट्टू होऊन आपल्या खिशाला खट्टू करताहात. या मसल्स दिखाऊ संस्कृतीला अल्पायुष्य असतं, आपली योगा संस्कृतीच चिरतरुण आहे, शाश्वत आधारावर बेतलेली आहे, अनेकांनी त्यायोगे समृद्ध जिंदगी गुजारली आहे. याउलट त्या बॉडीबिल्डींगचे साईड इफेक्टच जास्ती. उतारवयात तेच मसल्स असे काही ठणकू लागतात की आई बाप आठवतील. सांधेदुखी मागे लागते. हा व्यायाम प्रकार हट्टाला पेटून करण्याच्या पठडीतला असल्याने त्याचे शरीरावर दूरगामी परिणाम नक्कीच होतांना दिसतात.'
परंतु जाहिरातबाजीला भुललेल्या त्या पोरांना हे पटलंच नाही. त्यातल्या एकदोघांनी याहूँ करीत लेफ्ट चेस्ट पोझ घेतली व आम्हांकडे तुच्छ नजर टाकून त्या कंपूने जिमकडे मार्चपास केले!
( "चौफेर" मधून)

समाजजीवनमानलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2010 - 2:39 pm | नगरीनिरंजन

रोचक. गोटीदार आणि गोळीबाज शरीराचे संधी मिळेल तिथे प्रदर्शन करण्याच्या जमान्यात हा वेगळाच सूर पाहून मजा आली.
असो. लिहीले उत्तम आहे. काही दबंग आणि मणस्वी प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.

हे लेख वाचुन कळाले.

दररोज न चुकता जिम मध्ये जाणारा...
मला कुठल्याही स्पर्धेत भाग घ्यायचा नाही कि पोरी पटवायच्या नाहीत. त्यामुळे मी गोळ्या घेत नाही. पण डॉक्टर जिम वाईट असते हे चुकीचे आहे.माझ्या बरोबर ५ डॉक्टर जिम मध्ये येतात त्याना विचारायला हवे.

टारझन's picture

21 Dec 2010 - 2:53 pm | टारझन

बरोबर आहे . च्यायला आम्ही बी बेटकुळ्यांसाठी म्हेणत करुन साधा बेडुक पण उगवला नाही. एका पोरीला "तुझे गोळे" म्हणुन कविता ऐकवली तर तिने चक्क गुर्जी म्हणुन माझा अपमान केला :) तेंव्हा पासुन आम्ही पोरींचा नाद सोडला.. पण दुसरा ऑप्शन आवडत नसल्याने पुन्हा सोडलेला नाद धरावा लागला. ;)

-( काडीपैलवान )

एका पोरीला "तुझे गोळे" म्हणुन कविता ऐकवली तर तिने चक्क गुर्जी म्हणुन माझा अपमान केला

=) ) =) ) =) ) =)) =)) =)) =)) =)) =))
=) ) =) ) =) ) =) ) =) ) =))
=) ) =) ) =) )
=) ) =) )
=) )

स्वैर परी's picture

21 Dec 2010 - 3:09 pm | स्वैर परी

दिवटे साहेब, एक्दम दणकट लिहिता राव तुम्ही! काही आवडलेली वाक्ये :
१. दरवेळी हाच 'वर्षक्रम' चालू राहिल्याने आम्ही मैदान मारणारे पैलवान झालो नसलो, घरातली कामे करणारे 'बैलवान' मात्र झालो!
२. आमच्या मनातल्या बेँडकुळ्या डराँव डराँव करू लागल्या
३. तेव्हा कोठे आमच्या बेडकांची पिलावळ दिसू लागली
४. कोठे ते तिचे टपोरे डोळे अन् कोठे आमच्या दंडाचे सपाट गोळे

आत्मशून्य's picture

21 Dec 2010 - 4:29 pm | आत्मशून्य

थोडा मोठा हवा होता.......

गणेशा's picture

21 Dec 2010 - 5:46 pm | गणेशा

छान लिहिले आहे ..
पटले ..
व्यायाम जोर बैठका कींवा जीम मधला का असेना .. पण शरीर पिळदार करण्याची व्यर्थ धडपड खरेच काही देत नाही ..
माझ्या एका ओलखीच्या मुलाने ख्युप बक्षिसे मिळवली आहेत त्यामध्ये .. स्वताची जीम पण सुरु केली आहे ..
पण त्या स्पर्धे साठी बॉडिप्लस गोळ्या खावुन खावुन नतर आजारी पडलल्यावर कळाले .. पांढर्या पेशी कमी होत चालल्या आहेत .. पुन्हा त्या गोळ्या खाल्ल्य्या तर आयुष्यावर बेतु शकते .. किडनी फेल होता होता वाचल्या आहेत, पण तरीही काही सांगता येत नाहिये .. त्याची सुरुवात होउ लागली आहे ..

असेच असते .. अती तेथे माती ..
तंदुरुस्त नक्की राहवे .. पण जास्तीचा दिखावुपणा असा अंगावर येतो

स्पा's picture

21 Dec 2010 - 7:17 pm | स्पा

बॉडिप्लस

नक्की काय करते????

म्हणजे त्यात protine असतात कि.. काहीतरी भलताच chemical ?

गणेशा's picture

21 Dec 2010 - 7:49 pm | गणेशा

नक्की माहित नाहि ..
फक्त येव्हदे माहित आहे, कमी व्यायामामध्ये बॉडि जास्त फुगलेली आणि जशी स्पर्धेसाठी लागते तशी खुप कमी दिवसात होते .. म्हणुन लोक तश्या कॅपसुल खातात ...
त्या गोळ्यांचे साईड एफेक्ट बरेच आहेत .. त्यातच किडनी खराब होउ शकते असे डॉ. ने सांगितले आहे .. आणि किडणी खराब झाली तर साधे एक वेट पण तो उचलु शकणार नाही नंतर .. मग काय करायचे आहे असल्या गोळ्या .. असो

नगरीनिरंजन's picture

21 Dec 2010 - 7:59 pm | नगरीनिरंजन

जरी त्यात फक्त प्रोटीन्स असले तरी अतिरिक्त, न पचलेले प्रोटीन किडनीमध्ये जमा होऊन किडनी स्टोन होऊ शकतो.

स्पा's picture

21 Dec 2010 - 8:02 pm | स्पा

बापरे भयानक आहे मग............

शिल्पा ब's picture

22 Dec 2010 - 4:02 pm | शिल्पा ब

जाडी कमी करणे किंवा मसल्स वाढवणे या कोणत्याही कारणासाठी कसल्याही गोळ्या घेऊ नयेत...ते हानिकारकच आहे...त्यापेक्षा आहार अन व्यायाम यावरच भर द्यावा.
डॉक्टरी सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घेऊ नयेत.

सहमत.
एका हॉस्पीटलमध्ये एक अशीच केस पाहिली होती. ती पेशंट वजन कमी करायला स्वतःच्या मनाला वाटेल तसा डाएट करत होती. वजन ४५ वर आलं, बाई खुश !! काही दिवसांनी घेरी आली म्हणून अ‍ॅड्मिट केलं, डॉक्टरांनी खाण्याबद्दल विचारलं तेव्हा घरच्यांनी सर्व इतिवृत्त सांगितलं. तिने चुकीची डाएट केली होती, वजन कमी झालं पण अशक्तपणा फार वाढला. अ‍ॅड्मिट केल्यानंतर दोन दिवसांनी ती कोमात गेली, तिसर्‍या दिवशी किड्नी फेल, शेवट काय झाला ते माहीत नाही.

टारझन's picture

22 Dec 2010 - 5:04 pm | टारझन

बापरे .. आमच्या इकडे एकीने डायट केला .. तिचं वजन -१३ किलो झालं ओतं. तिला वजनं लावुन जमिनीवर स्टेबल ठेवावं लागत होतं . एकदा चुकुन वजनं निसटली न ही पार नागपुर पर्यंत वाहत गेली.. शेवटी एका झाडाला अडकली तेंव्हा सापडली. चुकीचं डायट फार भयंकर असतं खरं ..

- एक बुंद अम्रितजी

नन्दादीप's picture

22 Dec 2010 - 5:32 pm | नन्दादीप

हा...हा...हा...
लय भारी भौ....

भावना पोचल्या टारुभाऊ !! :D

खरे तर कुठलाही चांगला पर्सनल ट्रेनर हा बॉडीप्लस किंवा तत्सम काही घ्यायचा सल्ला देत नाही तसेच फोटुतल्या सारखे शरीर दिसेल असे आश्वासनही देत नाही. जिम मधली मशिन्सही चुकीच्या पद्धतीने वापरली तर अपाय होणारच. तसेच मसल्सना पुरेशी विश्रांती देणेही आवश्यक. तसे तर चुकीच्या पद्धतीने योगासने केल्यानेही अपाय होतो. तेव्हा जिम वाईट योगा छान असे काही नसते.

तेव्हा जिम वाईट योगा छान असे काही नसते.

षमत आहे !

बाकी ह्या बाबतीत कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात. :)

आजानुकर्ण's picture

21 Dec 2010 - 8:24 pm | आजानुकर्ण

बॉडीप्लस गोळ्या म्हणजे काय हे नक्की माहीत नसले तरी अनेक पर्सनल ट्रेनर्स व्हे प्रोटीन किंवा तत्सम प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला देतात. (व्हे प्रोटीन म्हणजे फक्त दुधाची पावडर असते.) ह्या सप्लिमेंट्समुळे शरीराची आवश्यक प्रोटीनची गरज पूर्ण होते. (उदा.६० किलो वजन असणाऱ्या व्यक्तीची दैनंदिन प्रथिनांची गरज ६० ग्रॅम इतकी असते.) व्यायामशाळेत अधिक शरीर कमावण्यासाठी क्रिएटिन मोनोहायड्रेट वा तत्सम सप्लिमेंटही घेतले जाते. कोणतेही सप्लिमेंट घेतले तरी पुरेसे पाणी प्यायल्यास किडनीला अपाय होत नाही.

(व्यायामपटू) आजानुकर्ण

टारझन's picture

21 Dec 2010 - 9:00 pm | टारझन

येस्स ! :) क्रियाटिन मोनोहायड्रेड हे मसल गेन साठी असतं. मसल मधे पाणी धरुन ठेवण्यास क्रियाटिन मदत करते. डोस बंद केल्यावर पुन्हा डिझॉल्व्ह होउन मसल पुर्ववत होतो . :) असं म्हणतात बॉ ..
बाकी दिवसाला ६ तेर ८ लिटर पाणी प्यायल्यावर कोणताही हार्म होत नाही म्हणे :)
पण एवढं सगळं खाण्यापेक्षा रोज पावशेर उकडलेलं चिकन आणि १२ अंडी खाल्ल्यास इनफ प्रोटीन भेटु शकतं :)
आपण पाँड्स पावडर सोडून कधिच कुठली पावडर वापरली नाही ;)

मला तर एक अंडे व नियमित जेवण लागते.

विंजिनेर's picture

23 Dec 2010 - 8:02 am | विंजिनेर

आपण पाँड्स पावडर सोडून कधिच कुठली पावडर वापरली नाही

पाँडस् पावडर खाण्यापेक्षा व्हे प्रोटीन ची पावडर खाणे शरीराला कमी हानीकारक असते :)

अय्या , कित्ती कित्ती हुश्शार आहात तुम्ही ? :) आयाम विंप्रेस्ड :)

आपणच आपला आहार नीट ठेवला आणि जिम कंटिन्यू केलं तर सप्लिमेंट्सची काही गरज नसावी असं मला तरी वाटतं.
>>जिम वाईट योगा छान असे काही नसते.
या वाक्याशी १००% सहमत.

आजानुकर्ण's picture

22 Dec 2010 - 10:17 am | आजानुकर्ण

मुळात आहारातून आवश्यक ते सर्व घटक मिळत नसल्यानेच सप्लिमेंट घ्यावे लागतात. उदा शाकाहारी व्यक्तींना आवश्यक ती प्रथिने, फॉलिक ऍसिड वगैरे आहारातून मिळणे अवघड जाते.

रेवती's picture

21 Dec 2010 - 7:15 pm | रेवती

चिमटे छान काढलेत.
लेखन आवडले.
या बाबतीत सल्ला द्यायलाच हवा असे व्यक्तिमत्व मिपावर आहे पण मी काही बोलणार नै ब्वॉ!;)

टारझन's picture

21 Dec 2010 - 9:11 pm | टारझन

कोण आहे तो / ती ? समोर आणा :)

नरेशकुमार's picture

22 Dec 2010 - 9:18 am | नरेशकुमार

टार्‍या तु मनावर घेउ नकोस, ते माझ्या बद्दल बोलत आहेत.
मी तुझ्यापेक्शा उन्चिने, तब्येतिने, जास्त आहे. you are not alone here.

टार्‍या तु मनावर घेउ नकोस,

मी मनावर कुठे घेतलं ? घेतलं त्याला पुरावा काय ? बिनढुंगणाचे विधान :)

ते माझ्या बद्दल बोलत आहेत.

खुलाश्याबद्दल धन्यवाद

मी तुझ्यापेक्शा उन्चिने, तब्येतिने, जास्त आहे. you are not alone here.

स्वतःला आमच्याशी कंपेयर करुन प्रसिद्ध होण्याचा भुरटा प्रयत्न :) बाकी चालु द्या.

- एकमेव

धनंजय's picture

21 Dec 2010 - 11:42 pm | धनंजय

खुमासदार लेखन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Dec 2010 - 5:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खुमासदार लेख!

कोणे एकेकाळी जिमची पावती होती तेव्हा तिथल्या डाएटीशनने व्हे प्रोटीन्स खाण्याचा सल्ला दिला होता. तिची कटकट नको म्हणून तिला तोंडावर हो म्हणून मी माझा आहार बदलला नाही; आणि या न-बदलाचा काही अपायही झालेला नाही.

खुसखुशीत लेखन , आवडले.
आमच्या ओळखीतला एक मुलगा बॉडी बनवण्यासाठी रोज कितीतरी केळी, अंडी खायचा. कसली तरी पावडर खायचा. हार्मोन्स च्या गोळ्या घ्यायचा. कालांतराने इतर व्याप मागे लागल्याने जिम सुटले आणि आता त्याचे शरीर ही भलतेच सुटले. २४-२५ व्या वर्षीच पोटाचा घेर वाढला. शरीर बेढब झाले.

वर काहींनी पाणी पिण्यावर लिहीले आहे. मागे एका डॉक्टर ने सांगितले होते की शरीरास आवश्यक तेवढेच पाणी प्यावे . रोज आठ ग्लास. उगाच भरपूर पाणी प्यावे म्हणून कितीतरी लीटर पाणी पोटात ओतू नये. हे बरोबर आहे काय ? गरज नसताना जास्तीच्या पाण्याने शरीरास काही त्रास होतो का? कोणाला माहित असल्यास कृपया सांगावे.

पुष्करिणी's picture

22 Dec 2010 - 1:34 am | पुष्करिणी

रोज आठ ग्लास. उगाच भरपूर पाणी प्यावे म्हणून कितीतरी लीटर पाणी पोटात ओतू नये.

हॅहॅहॅ ... ते माणसांसाठी होतं .. बेडकांनी कृपया इग्नोर करावे :)
माणसांसाठी लिंक :
http://wiki.answers.com/Q/How_much_water_should_you_drink_while_excercising
यायाम करताना खुप डिहायड्रेशन होते म्हणुन एक्स्ट्रा पाणी पिणे जरुरी असतेच ..
असो .. लै ण्याण पाजळलं .. :)

बी.ए.एम्.स डॉ. हे पाणी लागेल तेव्हडेच प्यावे असे सांगतात, आयुर्वेद .. आणि पंचभुत का काय त्यावरुन ते उदा. देवुन सांगतात .. पटते त्यांचे ही ..

आणि बाकीचे डॉ. बिन्धास्त पाणी जास्तीत जास्त प्या .. शरीर म्हण्बजे मशिन आहे ते जेव्हदे कार्यरत तेव्हडे चांगले असे सांगतात .. ते पण पटते ..
दोन्ही प्रकारचे मित्र आहेत मला त्यामुळे .. दोन्हींचे मुद्दे जानुन घेतले दोघे ही उदा. ने बरोबर आहेत असे वाटते ..

मी माझ्या मित्रासारखे बळेच उठल्यावर २-३ जग पाणी पीत नाही , परंतु दिवस भरार जरा इतरांपेक्षा जास्त पाणी पितो ..
दुष्परिनाम अजुन तरी नाहि झाला ..

त्यामुळे पाणी पिन्याबद्द्लचे (काण्याबद्दल्चे पण मी जास्त ऐकत नाही म्हणा) मी कोणाचे मत कसे ही असले तरी पहिल्यापासुन जसे मी जगतो आहे तसेच जगतो .. शरीराला तीच सवय आहे आता ..

--
बाकी योगा खुप थोडे महिने केला होता मी दिवसभर खुप प्रसन्न वाटते योगा केल्यावर..

जीम करतो कायम .. आता मुंबई मध्ये जरा बंद आहे , गोळ्याव्यतिरीक्त गीम करणे ही उत्तम .. शरीर पिळदार आणि ताकदवान बनते ..
निरोगी शरीर असने हे सर्वात महत्वाचे आहे ...

खपवण्याची ही छुपी जाहिरातबाजी नाही कशावरुन? आज तुम्ही बॉडी बिल्डीँग करीत बसाल, म्हातारपणाच्या तरतुदीचं काय? अरे बाबांना खान बांधवांनी अंडी खावून खावून बॉडी कमावली ती प्रदर्शनासाठी, पैसे कमावण्यासाठी. तुम्ही मात्र त्यांच्या सिक्स पँक अँब्ज वर लट्टू होऊन आपल्या खिशाला खट्टू करताहात. या मसल्स दिखाऊ संस्कृतीला अल्पायुष्य असतं, आपली योगा संस्कृतीच चिरतरुण आहे, शाश्वत आधारावर बेतलेली आहे, अनेकांनी त्यायोगे समृद्ध जिंदगी गुजारली आहे. याउलट त्या बॉडीबिल्डींगचे साईड इफेक्टच जास्ती. उतारवयात तेच मसल्स असे काही ठणकू लागतात की आई बाप आठवतील. सांधेदुखी मागे लागते. हा व्यायाम प्रकार हट्टाला पेटून करण्याच्या पठडीतला असल्याने त्याचे शरीरावर दूरगामी परिणाम नक्कीच होतांना दिसतात.'

अपुरी आणि चुकीची माहिती. २ एकमेकांशी फारसा संबंध नसलेल्या गोष्टींची तुलना. एका महत्त्वाच्याच्या गोष्टीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष.

सर्वसामान्य लोकांना हसवण्यासाठी लिहिला असेल तर ठीक अथवा एका डॉक्टरकडून इतके अज्ञान अपेक्षित नाही.
(नुसता आयडी डॉ. म्हणून घेतला असेल किंवा संशोधनातील डॉक्टरेट असेल जाउ द्या.)

टारझन's picture

22 Dec 2010 - 10:39 am | टारझन

अरे .. ते माणसांचे डॉक्टर आहेत असं कोणी सांगितलं ? ते प्रा.डॉ. नसतील कशावरुन ? ;)

हाहाहा! हा तिसरा पर्याय नाही आला लक्षात :)

अप्पा जोगळेकर's picture

22 Dec 2010 - 8:44 am | अप्पा जोगळेकर

सर्वसामान्य लोकांना हसवण्यासाठी लिहिला असेल तर ठीक
असेच म्हणतो.

अन्जन's picture

22 Dec 2010 - 9:56 am | अन्जन

व्यायाम करणारे सगळे बॉडिप्लस गोळ्या खावुनच देह कमवतात हा सम़ज तुंमच्या जवळ, राहु दया. तुमी खर्रच चू़कून व्यायाम कॅला असेल असे वाट्त नाहि. तूंमचे असा ले़ख वाचूण नवीण व्यायामपट्टू नक्की आपला वीचार् बद्लतील. तूंमी एवड्ञा ह़क्काने कसे काय बॉल्ता.

जल्ला 'जनातल्या मनात' कसला 'काथ्याकुट' करुन र्‍हावलाव.
डॉकने एक हलका फुलका लेख लिहिलाय त्याची मजा घ्या राव.
ज्यांना काही तरी कुटायचेच आहे त्यांनी तिकडे (नवे)गांधी, हिंदु अतिरेकी, (चीनी)मनसे,दत्त्/समर्थ असल्या धाग्यांवर दंगा करा की राव.
डॉकने अस कुठेही म्हटल नाहीये की जीम मध्ये जाऊ नका.

तवा मंडळी चील डाऊन.
मस्त खा, प्या,नियमीत व्यायाम करा, भरपुर हसा आणि सुदृढ रहा.

स्पा's picture

22 Dec 2010 - 6:17 pm | स्पा

असेच म्हन्तो