तुमचा पासवर्ड चेंज करा ....

सध्या "आय टी" इंडस्ट्री आणि आमच्यासारख्या बिगर "आय टी" पण पोट भरण्यासाठी कंपनीत कंप्युटरचा वापर करणार्‍या लोकांना भेडसवणारी एक समस्या म्हणजे दर एक महिन्यानी आपल्या स्क्रीन" वर येणारा "तुमचा लॉग्-ईन पासवर्ड आता गचकायची वेळ आली आहे, कॄपया तो बदला नाहि तर मातीत जावा " असा धमकीवजा संदेश ...

आपलं तर डोकंच काम करत नाही अशा वेळेस ...

किती वेळा बदलायचा, बर ठिक आहे बदलतो पण त्यासाठी तो असा नको तसा हवा अशा १०० अटी. शिवाय मागच्या १० वेळच्या पासवर्ड शी जुळल्यास पुन्हा बोंब ....

माझी तर आत्तापर्यंत माझ्य नाव, मित्रांची नावे, काही खास मैत्रीणींची नावे, जन्मतारखा, गाडीचे मॉडेल्स, आवडते खाद्य, खेळ नकोनकोते शब्द, आकडे सर्व वापरून झाले आहे, आता ह्यापुढे बुद्धी चालत नाही ....

बर एखादे खासगी "नाव" टाकावे म्हणले की लगेच दुसर्‍या दिवशी रात्री "कलीग" चा फोन " तेरा पासवर्ड बता, मुझे थोडा तेरे लॉग्-इन पे काम करना है ". आली का पंचाईत आता, पुढचा प्रश्न " कौन है वो ? साले हमसे छुपाता है ... *** **** ** "

आता तुम्हीच मला मदत करा, तुम्ही काय वापरता ते सांगा म्हणजे माझा मी योग्य तो लेसन घेईन ...
जास्त अवघड सांगू नका कारण मी अल्पमती आहे असे माझे सर म्हणायचे.[ त्यांचे नाव पण मी विसरलो आहे ...]

पिक्चर

पिक्चरची नावे ठेवावीत Smile

ही मदत

ही मदत मलाही हवी आहे!
सगळ्या आवडत्या पुस्तकांची नावंही संपली आहेत.
आता मी 'न्यू बॉर्न बेबी नेम्सच्या ' साईटवरुन क्रमाने नावं उचलतो आणि त्या क्रमानेच त्यांचा क्रमांकही वापरतो...आहे की नाही मज्जा?

नारायण, नारायण...

बदल म्हटला की, हे राम. त्यानंतर देवा पांडुरंगा, हाय रे दैवा, आस्तीक - नास्तीक काळभैरव, जय महांकाली की, बं भोले, शिव - शिव, हरे रामा - हरे कृष्णा, हरी - हरी, वेतोबा प्रसन्न... एवढ्यावर भागत नसले तर, जाऊ तिथं खाऊ, देता की जाता, वगैरे वगैरे. क्ल्यू आहेत बरं हे.

अहो पण

अहो पण एव्हढ्यावर भागतं का?
सतरा लफडी असतात ना...इतकीच अक्षरं हवीत...अंक असायलाच हवा...पेश्शल क्यारेक्टरपण हवं...
नस्तं झेंगाट तिच्याआयला!

अहो..

आता हे क्ल्यू. म्हटल्यावर ती बाकीची झेंगटं याच्या आसपास जमवायची राव. आम्ही तरी जमवतो. उदा: रामरामचे - १रामराम२ किंवा (आ)राम(ह)राम वगैरे. थोडं चालवा की राव, भन्नाट प्रतिसादांसारखं. जमेल मग.

*वेतोबा प्रसन्न*

खूपच आवडले.. सगळेच सही..

कारण...

पीसी सारखा टुण्ण व्हायचा. येकबी मंतर कामी येत नव्हता. मग घातलं वेतोबाला साकडं. तवा कुठं आला लायनीवर.

धमाल मुला (होणारा बाप?),

अरे, आत्तापासूनच का बेबीनेम साईट पाहतोस?
Smile))))))))))))))))))))

पासवर्डः लहानपण च्या टोपण नावाचे सुद्धा चालतील, पण दुसर्‍या कोणाला देताना जरा सावधान नाहीतर हसे होईल (जर मजेशीर नाव असेल तर)

:-)))))))))))))))

ठ्ठप्पाक्क !!!!

जोरात कपाळावर हात मारुन घेतला मी!
आयला, इथं सरळपणाने सांगायची काही म्हणता काही सोय नाही! जरा कुठं चान्स मिळाला की टाकलंच मुंडक्यावर!

ह्म्म्म

पिक्चरची नावे ठेवावीत Smile
हि आयडीया बेस आहे.

अवांतरः बाकी 'नावं ठेवायची' मला सवय नसल्यामूळे या बाबतीत आम्ही तुमची काही मदत करु शकणार नाही.

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

राजकारणा॑ची नावे घ्या.

तुम्ही पहिल्या॑दा भारताचे पहिले राष्ट्र्पती या॑चे नाव व त्या॑चा ते पद भुषविल्याचा कालावधी (आकड्या॑साठी) ते चालु राष्ट्र्पती, (कोण आहेत हो? ), ते स॑पले की मग उपराष्ट्र्पती, प॑तप्रधान, मुख्य॑म्॑त्री इथपर्य्॑त गाडी येऊ दे.

अहो थोडं हटके सांगा ...

एवढ्या तत्पर प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद ...

पण गावाचे नाव, देवाचे नाव, राजकारणी [ छ्या बुवा ], सिनेमे असले काही कॉमन सांगू नका ...
जे ४ लोक करतात ती गोष्ट मी कधीच करत नाही ...

थोडं हटके, सटके, रोमँटीक, मजेशीर पण लक्षात रहायला सोप असं सांगा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

हे बघ बरं...!

दोन पिक्चरांची नावे एकत्र करुन लिही.म्हणजे जरा मजेदार नावे तयार होतील.

उदा:
हम आपके है कौन+जानी दूश्मन
वहीनीच्या बांगड्या+दादाच्या तंगड्या
माहेरची साडी+सासरचं धोतर Smile

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

एक युक्ती

मला अशी सुचली आहे.

मला "भीमरूपी महारुद्रा..." हे स्तोत्र पाठ आहे.
त्याचे गमभन-रोमन लेखनही माहीत आहे.
तर पहिला पासवर्ड असा घ्यायचा :
bhImarUpI#1
मग क्रमाने असे :
mahArudrA#2
vajrahanumAna#3
mArutI#4
...
prabhaMjanA#8...

अशा प्रकारे "आकडा घातला पाहिजे" "स्पेशल चिह्न घातले पाहिजे" असले नियम सहज पाळता येतात.

(हे सर्व उदाहरणादाखल! मी हे विशिष्ट स्तोत्र वापरत नाही आणि गमभनची रोमन न वापरता दुसरीच कुठली रोमन वापरतो. विशेष अक्षर # असेही वापरत नाही. त्यामुळे माझा पासवर्ड वरच्या सांगण्यावरून सहज शोधता येणार नाही.)

पण सगळ्यात चाट पडलो ते तुमच्यावर आलेला हा प्रसंग वाचून :
बर एखादे खासगी "नाव" टाकावे म्हणले की लगेच दुसर्‍या दिवशी रात्री "कलीग" चा फोन " तेरा पासवर्ड बता, मुझे थोडा तेरे लॉग्-इन पे काम करना है ".
माझ्या कलीगला आणि मला एकाच लॉग-इन वर काम करावे लागले अशी वेळ आली आहे. पण अशा वेळी एक नवीन आय-डी तयार करून दोघांनी मिळून पासवर्ड ठरवला. माझा वैयक्तिक पासवर्ड मी कदाचित जिवाच्या जोडीदाराला देईन. नाहीतर पासवर्ड माझ्या सहीइतका खाजगी आहे.

म्हणजे?

सहीइतका खाजगी (की खागी?) म्हणजे? उघड गुपीत असलं काय तरी होतंय ते. कारण सही तर दिसते राव. हां आता सरदार असू तर तोबी दिसत्योच म्हना. *****

खासगी/खाजगी

दोन्ही मला हव्या त्या अर्थाने चालतात Smile
(इति माझ्याकडील शब्दकोश)

सही दिसते, पण तो विशिष्ट फर्राटा खरडण्याचे कौशल्य (??वाईट हस्ताक्षराला कौशल्य म्हटले!!!) मात्र माझ्याकडेच आहे. पासवर्ड म्हणजे ते कौशल्य - दर्शनी सही नव्हे.

आमच्या विद्यापीठाच्या अध्यक्षाची एक "सार्वजनिक अध्यक्षीय" सही आहे. ती खरडण्याचे प्रशिक्षण त्यांच्या मदतनिसाला दिलेले आहे (तशी सही उमटवणारे यंत्र मदतनिसाला दिले आहे.) ही सही विद्यापीठाच्या चेकवर चालते. पण अध्यक्षांच्या वैयक्तिक बँकखात्यात चालणार्‍या सहीचे प्रशिक्षण त्या मदतनिसाला दिलेले नाही. ती खासगी/खाजगी आहे.

भलतीच डोकेदुखी

ही डोकेदुखी मलाही आजकाल फारच त्रास देते आहे.

१.हापिसातल्या संगणकाचा पासवर्ड,
२.घरच्या लॅप्टॉपचा पासवर्ड,
३.प्रत्येक बँकेच्या खात्याचा पासवर्ड,
४.डिमॅट खात्याचा पासवर्ड,
५.खाजगी संस्थांकडे केलेल्या गुंतवणुकीचा पर्फॉर्मन्स बघण्यासाठीचा पासवर्ड,
६..
७..
..
..

आणि परत या सर्व गोष्टी माझ्याबाबतीतल्या तर लक्षात ठेवायच्याच आणि घरातल्या इतरांसाठीच्यापण ! प्रत्येक पासवर्ड बदलण्याची वेळ वेगळी - प्रत्येकवेळी सुचेल असा पर्यायी पासवर्ड वेगळा.. तो लक्षात ठेवणे हे आणखी जिकीरीचे काम ! डोक्याची पाऽऽऽर मंडई होते कधी चुकूनमाकून पासवर्ड आठवत नाही म्हटले की. एकदा अशीच एका बँकेच्या एटीएमचा फुटकळ ४ आकडी पासवर्ड विसरले होते.. कुठे तो लिहूनही ठेवलेला नव्हता. लागोपाठ २ दिवस आपली चोरासारखी जाऊन वेगवेगळे पासवर्ड टाकून पाहत होते.. अचानक एकदा आठवला आणि नविन एटीएम कार्ड घेण्याच्या व्यापातून सुटका झाली !

हे सगळे पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी काही सोपी क्लृप्ती आहे का? नविन पासवर्ड बनवण्यासाठी तर काही प्रश्न आला नाही आजवर...

सोप्पय रे

सोप्पय रे डान्या .. एकसलग असणार्‍या कोण्त्याही ३ अक्षरी की, मग ३ आकडे मग तेच आकडे शिफ्ट दाबुन !!

बाकी हे उदाहरणादाखल ..... (पुढचे सगळे धनुदादा सारखे)

सिनेमाची आद्याक्षरे

सिनेमाची आद्याक्षरे आणि त्याचे प्रदर्शन साल ह्यांची जोडी Smile
पण सिनेमाची नावे नाही आवडत ना? मग......????

अरे वा, मला ही एक कल्पना सुचली. दिल चाहता है पाहिला असेलच. त्यात सुबोध ज्याप्रमाणे भेटण्याचे ठिकाण व वेळ लक्षात ठेवायचा तसेच काही तरी वापरत जा. त्या गोष्टी लक्षात राहिल्याने गर्लफ्रेंडही खुष राहील Wink

पण खाजगी ही नाही चालणार ना ? Sad

मग ऑफिसमध्ये भींतीवर/टेबलावर काही कॅलेंडर/जाहीराती काहीतरी असेल ना? त्यातील अक्षरे व आकडे वापरून बघा. एखाद्याला सांगतानाही सोपे पडेल Smile

आमची आयडिया!!

आम्ही मराठी/ कोकणी शिव्या वापरतो, पासवर्ड म्हणून!!
सध्याचा " तदमाताय!"
कामही होतं आणि स्वतःलाच जरा हसूही फुटतं!!!Smile)

-पिडा

+१

डांबिसकाका, अल्टिमेट ...
पण तिच्यायला बाकीच्या अमराठी लोकांनी त्याचा अर्थ विचारला तर ???

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

त्यात काय कठीण?

अमराठी माणसांना तू सांगशील तो अर्थ!!
मी अमेरिकनांना 'भिकारचोट' चा अर्थ 'ईश्वराची कृपा' असा सांगितला होता. त्यांनी समजल्याप्रमाणे मान डोलावली!!Smile))
पार पोचलेला,
डांबिसकाका
Smile))

धन्य आहे ...

"मी अमेरिकनांना 'भिकारचोट' चा अर्थ 'ईश्वराची कृपा' असा सांगितला होता. त्यांनी समजल्याप्रमाणे मान डोलावली!!Smile))"
धन्य आहे तुमची डांबिसकाका ...

बाकी आम्ही पण आमच्या एका जर्मन कलिग ला "डिअर फ्रेंड" चे हिंदी " उल्लू का पठ्ठा " असे शिकवले होते. ४ दिवस हसू हसून येडे झालो होतो ...
तो असे म्हणला की बाकीचे अज्ञानी त्याच्याकडे आश्चर्याने बघायचे आणि हे बेणं एकदम खूष व्हायचं, सगळी धमाल .....
नंतर त्याला सत्य कळल्यावर त्याने आम्हाला "जर्मनमधून" दे दणादण शिव्या हाणल्या ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

कमाल आहे नाही?

माणसाला हृदय १, कप्पे ४ आणि पासवर्ड किती?
(आपला पुणेरी)
अ. अ. जोशी

एकदम सोप्पय

एकदम सोप्पय हो.. त्यात काऽही अवघड नाही.
समजा, तुमचं आवडतं गाणं कोणतं?
समजा, "देखा जो तुझे यार दिलमे बजी सितार"
१) देजोतुयादिबसि - DeJoTuYaDiBaSi
२) आता, A=1, B=2....

याप्रमाणे, D=4, J=10, T=20, Y=25, D=4, B=2, S=19

३) आता, 4 + 10 + 20 + 25 + 4 + 2 + 19 = ८४

DeJoTuYaDiBaSi84

४) आता विशेष अक्षरे अर्थात स्पेशल कॅरॅक्टर्स:

तर ८४ मधल्या ८ आणि ४ च्या डोक्यावर काय आहे.. तेच पण.. क्रम बदलून! म्हणजे $*
एक सुरुवातीला आणि एक शेवट

झाला पासवर्ड तयार!
$DeJoTuYaDiBaSi84*

आहे की नाही सोप्पा!
असेच निरनिराळ्या आवडीच्या गाण्यांप्रमाणे चेंज करत रहावा.
म्हणजे लक्षात ठेवायलाही अगदी सोप्पा.. हो की नाही?

पासवर्ड

'भिकारचोट' चा अर्थ 'ईश्वराची कृपा' .Smile)))))
तुम्ही इथे घेतलेले तुमचे नाव एकदम योग्य आहे.
यापेक्षा डांबीसपणा दुसरीकडे भेटणे अवघड आहे.
......अवांतर : काही लोक प्रेम करतात. काही आपल्या प्रेयसी/प्रियकराशी लग्न करतात त्यांच्या नावासोबत प्रेयसी/प्रियकाराचे नाव जोडले जाते. ज्याना हे जमत नाही ते (जे प्रेम पात्राशीलग्न करत नाहीत) त्यांच्या प्रेयसी/प्रियकराचे नाव पहिल्या मुला/मुलीच्या नावात शोधतात. ज्याना हेही जमत नाही त्यांच्या प्रेयसी/प्रियकराचे नाव जालावर त्यांची लॉग इन नेम अथवा पासवर्ड बनुन येते.
.......अशाच एका पासवर्डच्या शोधात विजुभाऊ

हा, हा, हा!!

रावण हश्या!!!Smile)

पासवर्ड

लॉग इन पासवर्ड हा गोपनीय ठेवावा असा नसतो म्हणजे तु सांगीतल्याप्रमाणे तो आपल्याला आपल्या कलीग बरोबर शेअर ही करावो लागतो . मग राहील्या दोन कंडीशन
तो लक्षात राह्ण्यासाठी सोपा असावा आणी पासवर्ड च्या अटी
तर मी जी पद्ध्त वापरतो ती अशी
jan@2008
feb@2008
mar@2008
apr@2008
and so on..
(संत्र्याच्या बागेत रमणारा नागपुरवासी) नितिन