वजनदार ! - १
आज आपण विकासकडे जाणार आहोत" तिच्या अल्टीमेट्म पुढे मी फारसा विरोध करण्याच्या परिस्थितीत नसतोच. विकास तिचा बालमित्र. डॉक्टर आहे. गोरेगावात त्याचे हॉस्पीटल आहे.
विकासच्या चेंबरमधे गेल्या गेल्या तिने आकाशवाणी केली. " दिवस रात्र खोकत मला आठ दिवसापासून बेजार करतो आहे. जरा बघ बर. " माझ्या मैत्रीणीला बेजार करणार्या नराधमा थांब बघतोच तुला असा भाव विकासच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होता . मी खाटकाच्या दारातल्या बोकडाच्या मानसिकतेने टेबलावर आडवा झालो.
स्टेथोस्कोप, बि.पी., ई.सी.जी. आदी षोडशोपचार झाल्यावर डॉ. करवादले, " तुम यार वजन कम करो बॉस. तुम्हारा बि.पी. बहोत बढा है." नागपूरी मराठी पुरुष शक्यतोवर संभाषणाची सुरूवात राष्ट्रभाषेतच करतात. हिंदी बोलल्या शिवाय मर्दुमकी सिद्ध होत नाही हा समस्त नागपूरकरांचा दृढ विश्वास आहे.
टेबलावरून मला वजन काट्यावर उभे केले मात्र आणि वजन पाहून मलाच चक्कर आली. ९० कि.ग्रा. !
" अरे तो काटा ६ किलो जास्त दाखवतो. पण तरीही ८४ कि. खूप जास्त आहे."
"मग ते तुझे बि.पी. चे उपकरण तरी जास्त दाखवत नाही हे कशावरून ? " - मी.
" तुला करेक्ट रिडींगजच सांगीतले . तू चेक करून घे."
हा डॉ. आहे का कोण ? - माझे मनाचे श्लोक.
"तरी मी ह्याला म्हणतच होते." तीच्या दृष्टीने आता खोकला कधीच बरा झाला होता.
" विकास, अरे तू मला फोन वर खोकल्या करता गोळ्या घ्यायला सांगीतल्या होत्या त्या फार स्ट्राँग होत्या. त्याचाच परिणाम असेल " मी एक क्षीण प्रयत्न करून पाहिला.
" तू आता ७ दिवस रोज बि.पी.चे रिडींग घे. सूधारणा झाली तर ठिक. नाही तर जन्मभर बि.पी. च्या गोळ्या घ्याव्या लागतील" इती डॉ. "आणि हो ते वजनाच बघ."
या नंतरचा आठवडा रोज दवाखान्याच्या चकरा करण्यात गेला. सुदैवाने बि.पी. नॉर्मल होत गेले कारण बहूदा माझ्या खोकल्याच्या गोळ्या बंद झाल्या होत्या.
तीचा - माझा ८ दिवसांचा तह झाला होता. तो आज संपला होता आणि परत आमची वरात विकासकडे पोहोचली.
मी विजयी मुद्रेने माझे बि.पी. चे रिडींगस् दाखवले.
"ठीक है| लेकिन वेट तो कम करनाही पडेगा|" डॉ. उवाच. " तू अस कर. भात पूर्ण बंद कर. साखर कमी करून टाक. व्यायाम सुरू कर....."
माझी बाजुला बघायची हिंमत होत नव्हती. विकास आवरता आवरल्या जात नव्हता. घरी गेल्यावरचे हळदी घाटातले युद्ध समोर दिसत होते.
तिच्याकडून एकही वाक्य न येणे ही वादळा पूर्वीची शांतता होती हे मला नंतर कळले.
क्रमशः
वि.सू. - क्रमशः हे केवळ मला लवकर टंकता येत नाही म्हणून.
प्रतिक्रिया
इं ट रे स्टिं ग ! उद्या येते
+१
+१ असेच म्हनतो.
हॅ हॅ हॅ...असेच म्हणते.
छान सुरूवात
लई भारी
उपास
धन्यवाद
विचार
तेच
मस्तच. पुढच्या भागाची वाट
मनोरंजक!
अतिशय सुरेख लिहिले आहे. साधे
१०० % बरोबर.
कीती नागपुरकरांना ओळखता?
पुणेकर
मस्त...
मस्त...