(वर्षाव)

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
19 Aug 2010 - 2:15 am

छ्या छ्या, आजकाल बायका दारू पिऊ लागल्या. बीयर, वाईन आणि लिकरमधला फरक तरी कळतो का त्यांना? निदान दारू पिऊन मिपावरती धागे तरी टाकू नयेत. धागे कसले, कॉकटेलमध्ये भिजून ओल्यागिच्च झालेल्या कागदी स्ट्रॉ. आजकाल त्याही मिळत नाहीत. माझ्याकडे एक शेवटची स्ट्रॉ आहे ती टाकून देतो. मग बघतोच उंटाची पाठ कशी मोडत नाही ते.
----------------------------------------------------------------------------------------------
लाहोल बिलाकुवत. तौबा तौबा. या काफरांची ही मिजाज! हे अल्ला परवरदिगार, आता तूच माझं रक्षण कर रे बाबा या रावणी पिठल्यापासून.
----------------------------------------------------------------------------------------------
तो गोसावी रोज येतो. अल्लख म्हणतो. आपल्या भोकरी डोळ्यांनी मला निरखून बघतो. नजर हळूच खाली घरंगळते. पण घेत मात्र काहीच नाही. मला वाटत राहातं एकदा तरी त्याच्या झोळीत भाकर घालताना त्याच्या हाताला हात लागावा. मोहरून माझी मान खाली जाईल, तरी मी चोरटा कटाक्ष एखादा टाकेनच. कल्पनेने सुद्धा हुळहुळून जायला होतं. पण रीत आड येते, त्यालाही. मी ही अशी वांझ, मग तो माझ्या हातची भिक्षा कशी घेणार. हं. बघतेच कशी नाही घेत ते.
----------------------------------------------------------------------------------------------
आपून सगळा करून पायला. साला तिला सगळा उलटाच वाटला तर मी पन काय करनार. आयला माज्याकडचं सगलं काडून दिला, तर ती म्हनतीय वासना. तिच्याच पाठी लागलेल्या एका यडच्याप प्वाराला जरा दमात घेऊन कळवळीची विनंती क्येली तर ती म्हंती मीच गुंड म्हणून. तिची एक मैत्रीण होती जरा 'अडचणीत' तर मी मोठ्या मनाने पैशे दिले हॉस्पिटल वगैरे साठी, तर ही म्हंते दीखावा नुसता. आता मला नीट आटवत नांय हां.. त्ये सगला काडून दिला तेवा दीखावा म्हनली असंल आणि मैत्रिणीच्या वेळी वासना म्हणाली असंल. कायका आसंना पन मुद्द्या काय, कसा वागू मी शहाण्यासारखा................ई...ई......ई......ई.........ईईईईई......................ही पाल कुठनं टपकली मधेच?
----------------------------------------------------------------------------------------------
कॉसकोचा प्रवास करून आताशा माझं वजन वाढायला लागलंय. तिकडे काय मस्त मस्त सॅंपलं मिळतात - हाताळायला आणि चापायलासुद्धा. त्यात एचार वाल्यांनी प्रोसेस इंप्रुव्हायला सांगितली - आणि मीसुद्धा ती घरीच इंप्लिमेंट करायला गेले. ती दूतीही नव्हती तिथे, ते बरंच. नव्या प्रोसेसमुळे अर्ध्या वाटेवर जी पाठीत उसण आली, की विचारू नका. तरी बरं नवरा कधी नव्हे तो नेमका कामाला आला. पण त्याची आणि आमच्या मुलीची छद्मी नजर अजून जात नाही डोळ्यासमोरून.
----------------------------------------------------------------------------------------------
तर मंडळी, या वर्षी आपल्याला रस्तेबांधणीचं बजेट जास्त मागून घ्यायचं आहे. काय आहे की थ्री डी एक्स्प्रेस बांधायची आहे ना! आणि तरीही पुरले नाहीत तर करून टाकू झुमरीतलैया ते पटणा
आणि होस्पेट ते गुलबर्गा कॅन्सल. काय म्हणता, पुणे तळेगाव कॅन्सल? छे छे, मला या पुणेकरांशी पुन्हा वाद उकरून काढायचा नाही. एकदा त्यांच्या ब्ल्याक बुकात गेलो तेवढं पुरेसं आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
आमचे बाबा म्हणजे ना, अगदीच हे आहेत. स्वत्ताला ज्यादा शाने समजतात. मला काच फुटण्याविषयी सांगतात. म्हणतात हॉकी स्टिकने फोडायची. मला काय कळत नाही का? आता मोठा आहे मी. आत्तापर्यंत खूप बाटल्या फुटल्या...
----------------------------------------------------------------------------------------------
आपण इंचाइंचाने काश्मीरमध्ये माघार घेत आहोत. फार बिकट परिस्थिती आहे, आपले प्रधानमंत्री, आपले राष्ट्रपती, आपले लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? आजच जोरदार कारवाई करायला हवी. नाहीतर हे जर असंच चालू राहिलं तर दीडेक लाख वर्षात आपल्याला जम्मू-काश्मीरवर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आणि दहा पंधरा लाख वर्षात संपूर्ण भारत गमावून बसू, आणि युरोपासारखी परिस्थिती येईल. लवकर पोस्टकार्ड टाका, वेळ फार नाही.
----------------------------------------------------------------------------------------------
कविते, तू भाजी होशिल का...

स्फुरलीस तू अवचित मजला,
पोळीचा परि तवा तापला,
भेंडी होऊनी ताकामधली,
वदनी माझिया कवळशिल का ?
कविते, तू भाजी होशील का ?

('गे कविते, तू भाजी होशिल का...' नकोच ते. भलेभले चळतात.)
----------------------------------------------------------------------------------------------
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत. इतकंच नाही, तर त्या चर्चा कशा चालाव्या, किंवा चालू नयेत यासाठी कोणत्या सूचना देणं रास्त आहे, हे शोधून काढण्यासाठी कौल टाकावे का असा कौल टाकण्याची चर्चादेखील चालूच आहे. एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू. पण नुकतंच सरपंचांनी चर्चा टाळाव्यात, वारंवार सूचना टाळाव्यात, मिपा सर्वांचंच आहे अशा अनेक गोष्टी सांगितल्या असतानाही या चर्चा चालवाव्यात का? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे. की कौलच टाकावा सरळ?
----------------------------------------------------------------------------------------------
ऊलिखांनी गांजलेला शक्तिशाली सिंह मी
काय सांगू लायसॉल्ला आयळीची ही व्यथा
----------------------------------------------------------------------------------------------

विनोदविडंबनप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

19 Aug 2010 - 2:27 am | बेसनलाडू

खल्लास विडंबन! __/\__ रावणी पिठल्यापासून परवरदिगारने रक्षण करणे.. हाहाहाहाहा..
(नतमस्तक)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

19 Aug 2010 - 2:35 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.
हहपुवा.

केशवसुमार's picture

19 Aug 2010 - 7:53 am | केशवसुमार

खल्लास विडंबन!
हाहाहाहाहा.. बाकी चालू दे...
(वाचक)केशवसुमार

श्रावण मोडक's picture

19 Aug 2010 - 2:34 pm | श्रावण मोडक

+३

अनामिक's picture

19 Aug 2010 - 2:37 am | अनामिक

जबर्‍या विडंबण!!

बरं तो वर्षाव होता तर याला शिंतोडे म्हणावे का?

निशदे's picture

19 Aug 2010 - 3:04 am | निशदे

आणि हा धबधबा आहे..............हा सुद्धा आवडला.....राजेशरावांचे नाव बघून घाबरतच उघडला होता धागा. :P

घाटावरचे भट's picture

19 Aug 2010 - 2:40 am | घाटावरचे भट

न त म स्त क ! ! !

चतुरंग's picture

19 Aug 2010 - 2:46 am | चतुरंग

खल्लास!! =)) =))
तुझ्याकडून हे येणार ह्याची खात्रीच होती!! ;)

(रावणगोसावी)चतुरंग

पिवळा डांबिस's picture

19 Aug 2010 - 3:01 am | पिवळा डांबिस

राजेशभाऊ, खणखणीऽऽत!!!
खरं तर "हाण तिच्या मा**!!" म्हणणार होतो पण....
जाऊ द्या, भावना समजून घ्या!!!
:)

भाऊ पाटील's picture

19 Aug 2010 - 6:27 pm | भाऊ पाटील

एका दगडात अनेक पक्षी. एका गोळीत अनेक निशाणे.
उच्च, खणखणीऽऽत आणि बरेच काय काय!

अनिल हटेला's picture

20 Aug 2010 - 3:26 am | अनिल हटेला

कसा वागू मी शहाण्यासारखा................ई...ई......ई......ई.........ईईईईई......................ही पाल कुठनं टपकली मधेच?

हे खासच !!

ई ई ई !!

=))

स्मायल्या कुठे लपवल्यात सरपंच जाणे... =)) असो..आमच्यापण भावना जरा समजूनच घ्या..

झक्कास विडंबन...

(पण याला नेमके कशाचे विडंबन म्हणावे? एकाच दगडात किती पक्षी मारायचे याला काही धरबंध असावा कि नाही याविषयी एक लेख टाकीन म्हणते..)

बेसनलाडू's picture

19 Aug 2010 - 3:20 am | बेसनलाडू

आज मी काय म्हणते अशी स्वाक्षरीच टाका शिल्पाताई. म्हणजे 'आज अमुकवर कौल टाकेन म्हणते', 'आज तमुकवर काथ्याकूट टाकेन म्हणते' इ.
(स्वाक्षरीकार)बेसनलाडू
अर्थातच, ह. घ्या.
(टवाळखोर)बेसनलाडू

वात्रट's picture

19 Aug 2010 - 3:29 am | वात्रट

दुसरे शब्द नाहित.
साष्टांग दंडवत घ्या हो आमच्याकडून....

असुर's picture

19 Aug 2010 - 3:53 am | असुर

आवरा!!!!

गुर्जी, येक सेन्च्युरी इथेच झाली वो!!!

__/\__

-- (अनावर) असुर

मधुशाला's picture

19 Aug 2010 - 4:31 am | मधुशाला

:) :) :) :) :) :)

सन्जोप राव's picture

19 Aug 2010 - 5:15 am | सन्जोप राव

वर्षाव फार्फार आवडला. वमनाच्या विडंबनाला आता काय म्हणावे या विचारांना प्रवृत्त करणारा वगैरे वाटला.

मिसळभोक्ता's picture

19 Aug 2010 - 5:16 am | मिसळभोक्ता

(राघाफ्याक्लबाचा संस्थापक) मिभो

सहज's picture

19 Aug 2010 - 5:41 am | सहज

गुर्जी झिंदाबाद!!!!!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2010 - 9:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुर्जींचा विजय असो.

(राघाफ्यानक्लबाची सभासद) अदिती

अगदी असेच म्हणतो..

गुर्जींचा विजय असो

मी-सौरभ's picture

19 Aug 2010 - 10:32 am | मी-सौरभ

मला बी सबासद व्हायाचय....
(अर्ज कुटं भेटतो??)

स्वाती२'s picture

19 Aug 2010 - 6:14 am | स्वाती२

सॉलिड!

चिन्मना's picture

19 Aug 2010 - 6:32 am | चिन्मना

खल्लास विडंबन! खपलो. गुर्जींकडून असं काहीतरी येणार याची अपेक्षा होतीच. मात्र हा धबधबा फारच भारी ;-)

नंदन's picture

19 Aug 2010 - 6:49 am | नंदन

_/\_ राघाभरारी :)

ऋषिकेश's picture

19 Aug 2010 - 8:44 am | ऋषिकेश

=)) =))

पुढील स्मायली शिरसाष्टांगाचा समजावा
==O०=>

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2010 - 9:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी....!

-दिलीप बिरुटे

दिपक's picture

19 Aug 2010 - 9:36 am | दिपक

हुच्च!!!

इन्द्र्राज पवार's picture

19 Aug 2010 - 9:54 am | इन्द्र्राज पवार

आचार्य अत्रे यांनी हयातीत विडंबनाच्याबाबतीत कौतुक केले ते फक्त "दत्तु बांदेकर" यांचेच ! पण आज त्यांच्या (पक्षी : अत्र्यांच्या) आत्म्याने मिपावरील विडंबनाचा हा भन्नाट प्रकार पाहिला/वाचला, तर ते श्री.राजेश घासकडवी यांना आपल्या कवेत घेऊन प्रेमाचा वर्षावच करतील.

दिल्खुष कॅफे लिखाण !

वेताळ's picture

19 Aug 2010 - 9:59 am | वेताळ

कारभारी ......लैभारी.........

निरन्जन वहालेकर's picture

19 Aug 2010 - 10:04 am | निरन्जन वहालेकर

लय भारी राव ! ! मजा आली ! ! !.
अजून येउ देत.

मृत्युन्जय's picture

19 Aug 2010 - 10:18 am | मृत्युन्जय

हे म्हणजे एकदम महाभारतातील लढाई पाहत आहे असे वाटले. एका बाणातुन २ बाण मग ४ बाण मग ८ असे करत करत एका वारात सगळे गारद. :) :D ;)

निखिल देशपांडे's picture

19 Aug 2010 - 10:48 am | निखिल देशपांडे

घासु गुर्जी
काही म्हणजे काही पण लिहु शकतात
विडंबन अती उच्च आहे.

विसुनाना's picture

19 Aug 2010 - 11:10 am | विसुनाना

विडंबन नव्हे, मूळ लेखाचे मराठी संस्थळावरचे प्रतिबिंब वाटले.
आवडले...

ब्रिटिश टिंग्या's picture

19 Aug 2010 - 11:20 am | ब्रिटिश टिंग्या

लै भारी! :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार

गुर्जी शॉल्लॅड !! एकदम ................ई...ई......ई......ई.........ईईईईई...................... षटकार.

__/\__

स्मिता_१३'s picture

19 Aug 2010 - 11:29 am | स्मिता_१३

जबर्‍या.

एका धाग्यात सॉरी दगडात किती पक्षी मारावेत याला काही मर्यादा !

क-ड-क.
जबरदस्त विडंबन

--टुकुल

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Aug 2010 - 11:53 am | बिपिन कार्यकर्ते

शॉल्लेट!!! निस्त्या बाटल्यावं बाटल्या फोडल्याती!!! ;)

प्राजक्ता पवार's picture

19 Aug 2010 - 12:45 pm | प्राजक्ता पवार

नेहमीप्रमाणे तुमचे हेही लेखन आवडले :)

पुष्करिणी's picture

19 Aug 2010 - 2:13 pm | पुष्करिणी

एक्दम हस्तनक्षत्रातील वर्षाव ...

लै लै काम होतं म्हणुन निवांत वेळ मिळेपर्यंत हे वाचायचं नाही असं ठरवलं होतं, कीती बरं केलं.
(इतक्या उशिरा खिदळलो म्हणुन रुममेट्स नी चार शिव्या हासडल्या ते सोडा)

मजा आला. उगाच नाही आम्ही गुर्जींचे शिष्य.

-घासु गुर्जींचा आद्य शिष्य निळ्या.

सुहास..'s picture

19 Aug 2010 - 6:18 pm | सुहास..

अगग !! " लिळामृत'च की !!

ते तेव्हढ 'आतंरजालीय विवाहाच' पण टाकण्यास हल्कत नव्हती !!

प्रभो's picture

19 Aug 2010 - 6:58 pm | प्रभो

चालू द्या गुर्जी असंच..

तिमा's picture

19 Aug 2010 - 8:36 pm | तिमा

वर्षाव फारच आवडला. रावांची सर, तुमचा वर्षाव यानंतर कोणाकडूनतरी ढगफुटीच्या प्रतीक्षेत.

शानबा५१२'s picture

19 Aug 2010 - 11:24 pm | शानबा५१२

मराठी माणुस पुढे का जात नाही,ह्याचे मिपावरचे अजुन एक उदाहरण.

राजेश भाउ लावा तुम्ही हातभार लावा,ही विडंबने करुन मराठी माणसाला एकमेकांपासुन दुर करायला.आणि हो,अहो भावना असतात हो माणसाच्या,आता देवाने आम्हाला विचित्र बनवल त्यात आमचा काय दोष? तुम्ही लोकांनी आमच्या हसण्यावरचं तोंडसुख घेतले,म्हणजे हद्द झाली हो!

तुमचा व सर्व प्रतिसादकर्तांचा निषेध!!

राजेश घासकडवी's picture

20 Aug 2010 - 12:01 am | राजेश घासकडवी

शानबा,

कृपया हे विडंबन व्यक्तिगतरीत्या न घेणे. यातून थोडीशी टिंगलटवाळी करण्याचा हेतू होता. थोड्याशा गुदगुल्या, कोपरखळ्या, चिमटे मैत्रीच्या भावनेने काढण्याचा प्रयत्न होता. शक्यतो लेखनावर फोकस करून लेखनाची चेष्टा करणे इतपतच. ते लेखन करणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणदोषांबद्दल लिहायचं नव्हतं. जर तुम्ही अजाणतेपणाने दुखावला गेला असाल तर मी दिलगीर आहे.

मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला मागे खेचतो त्याचं हे उदाहरण हे मला पटलं नाही. अशा खेळीमेळीने माणसं जवळ यायला मदत होते या मताचा मी आहे. मी माझ्या स्वतःच्या कवितेचं देखील विडंबन केलेलं आहे. याहीआधी स्वतःचं विडंबन करणारी कविता लिहिलेली आहे.