रेखाटन - १

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
25 Sep 2007 - 9:25 pm

अभियांत्रिकी विद्यालयात मागल्या बाकड्यावर बसून जुन्या घराचे आठवणारे स्वयंपाकघर चितारले होते. त्याचे हे रेखाचित्र.
माध्यम - बॉलपेन

कलातंत्रमौजमजाआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 9:35 pm | विसोबा खेचर

वा ओंकारराव,

आपण साला पहिल्यापासूनच तुमच्या रेखाटनांचे चाहते आहोत.

साध्या वहीच्या कागदावर काढलेले हे चित्र अतिशय आवडले, एका मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या स्वयंपाकघरात घेऊन गेले! :)

आणि अरे हे रे काय? ग्यॅस तर दोन्हीही सुरूच दिसताहेत! डावीकडच्या पातेल्यात काय बरं शिजत असेल? त्यात बहुतेक मिसळीचा रस्सा असेल! आणि उजवीकडे सर्व मिसळप्रेमींकरता चहाचं आधण ठेवलंलं दिसतं आहे! :)

आलोच सगळे तुझ्याकडे मिसळ खायला आणि चहा घ्यायला! :)

बाकी, एका आपुलकी आणि उत्तम पाहूणचार असलेल्या घराच्या स्वयंपाकघरात डोकावून आल्यासारखं वाटलं!

असो, चित्र छानच आहे...

आपला,
(घरगुती) तात्या.

प्राजु's picture

25 Sep 2007 - 9:45 pm | प्राजु

अप्रतिम...

- प्राजु.

प्रियाली's picture

25 Sep 2007 - 9:47 pm | प्रियाली

अगदी घराची स्वयंपाकखोली दिसते आहे. मोरीच्या खालची कचर्‍याची बादली आणि खराटा.. :)) वा! वा!

ह्या घराची आई virgo आहे का?

प्रकाश घाटपांडे's picture

25 Sep 2007 - 9:51 pm | प्रकाश घाटपांडे

अशी रेखाचित्रे काढणार्‍यांबद्दल माझ्या मनात असुयायुक्त आदर आहे. पेन्सिलच तरि खोडता येत पण पेनचं काय?
प्रकाश घाटपांडे

आजानुकर्ण's picture

25 Sep 2007 - 9:59 pm | आजानुकर्ण

अभियांत्रिकी विद्यालयात मागल्या बाकड्यावर बसून कोणाचे चित्र रेखाटायचे ते कळले नाही वाटतं ;)

(ह. घ्या.)

मस्तच आहे पण!

लिखाळ's picture

25 Sep 2007 - 10:09 pm | लिखाळ

फार सुंदर चित्र.
समोर त्या वस्तू नसताना केवळ आठवणीच्या बळावर इतके तपशील रेखाटणे म्हणजे कमाल. त्यात कप्पे, शेगडी वरील भांडी आणि सिलिंडर इत्यादिची खोली आणि गोलावा तर फार छान.
--लिखाळ.
तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

धनंजय's picture

25 Sep 2007 - 10:39 pm | धनंजय

गॅसवरती एका शेगडीवर उसळ शिजते आहे, आणि दुसर्‍या शेगडीवर चहा बनतो आहे.
साधारणपणे आम्ही हॉटेलात जातो, पण तुमच्या आपुलकीच्या स्वयंपाकघरात येऊ दिलेत, धन्यवाद.

सर्किट's picture

25 Sep 2007 - 10:42 pm | सर्किट (not verified)

फळीवर लोणचे आहे की मुरंबा ?

- सर्किट

ॐकार's picture

26 Sep 2007 - 7:38 pm | ॐकार

वर लोणचे आहे. तोंडावर फडके बांधलेल्या चिनी मातीच्या बरणीत!

स्वाती दिनेश's picture

27 Sep 2007 - 12:40 pm | स्वाती दिनेश

जुना काळ खरच जिवंत केला आहेत तुम्ही, लोणच्याच्या त्या बरण्या आता नामशेष झालेल्या दिसतात.
अवांतरः लोणच्याच्या बरणीला बांधलेले फडके- याला दादरा असे म्हणतात. 'दादरा' हा शब्द सुध्दा किती दिवसांनी वापरला!
स्वाती

सर्किट's picture

27 Sep 2007 - 12:52 pm | सर्किट (not verified)

भोकराच्या लोणच्याची अशीच बरणी आत्ता माझ्यापुढे आहे.
इथे, अमेरिकेत !
ही संस्कृतीचिन्हे नामशेष झालेली नाहीत, हे माझे म्हणणे.
भोकराचे लोणचे मला अतिशय आवडते.
त्यातूनच ह्या संस्कृतीचे जतन झालेले आहे, हे नमूद करावेसे वाटते.

- सर्किट

स्वाती दिनेश's picture

27 Sep 2007 - 1:11 pm | स्वाती दिनेश

दादरा बांधलेली बरणी ? अमेरिकेत? मस्तच! मी तरी दादरा बांधलेली चिनीमातीची बरणी पाहून अनेक वर्ष लोटली, लोणची नाही नामशेष झाली,होणारही नाहीत,पण ती चिनीमातीच्या दादरा वाल्या बरण्यातून आता काचेच्या बरण्या आणि प्लॅस्टीक पाऊचमध्ये आलेली दिसतात.
स्वाती

सर्किट's picture

27 Sep 2007 - 1:18 pm | सर्किट (not verified)

लोणची बुटक्यात काढून घ्यावी तर अशा दादरा बांधलेल्या बरणीतूनच.
बेडेकर, पाठक, निरव ही आम्हाला आवडत नाहीत ती ह्यामुळेच. छान फडक्याने (दादर्‍याने) बंद केलेल्या बरण्या नसतात.

छोट्या कच्च्या कैर्‍यांचे लोणचे (कोयींसकट) किंवा वाळलेल्या लिंबाचे लोणचे.... अहाहा..
हे प्याकबंद एअर टाईट बरणितून खरेच चांगले लागत नाही.
त्याला का कोण जाणे ते फडके बांधलेली फळीवरची बरणीच हवी.

- (जुन्या पीढीतला) सर्किट बेडेकर

स्वाती दिनेश's picture

27 Sep 2007 - 1:27 pm | स्वाती दिनेश

तुम्ही तर मला एकदम आमच्या जुन्या घरातच नेऊन ठेवलेत हो.. आता इथे कुठून आणू त्या दादरा बांधलेल्या चिनीमातीच्या बरण्या आणि ती बेडेकर,कुबल,केप्र,पाठक इ. कडे न मिळणारी केवळ घरातच बनलेली, आजी,आईच्या खास चवीची ,मेथीच्या फोडणीची, भोकरांची,कोयीसकटच्या बाळकैर्‍यांची ,खास उपासाची ,मऊभाताबरोबर खायची स्पेशल लिंबाची आणि अशी कितीतरी...
स्वाती

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 1:14 pm | बेसनलाडू

आहे.
ही संस्कृतीचिन्हे नामशेष झालेली नाहीत, हे माझे म्हणणे.
१००% सहमत आहे. माझ्या डोळ्यांसमोर आत्ता अगदी असेच 'दादरा' बांधलेले मिरचीचे लोणचे आहे. अमेरिकेत!
- बे.ला बेडेकर

सर्किट's picture

27 Sep 2007 - 1:21 pm | सर्किट (not verified)

माझ्या डोळ्यांसमोर आत्ता अगदी असेच 'दादरा' बांधलेले मिरचीचे लोणचे आहे. अमेरिकेत!

आणि बाथरूमच्या काचेच्या छोट्या कपाटात प्रिपरेशन एच आहे, असे कृपया स्पष्ट सांगा ;-)

- (मिर्चीचा फ्यान) सर्किट

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 1:24 pm | बेसनलाडू

दादरच्या राहत्या वन रूम किचनच्या स्वयंपाकघरात आईच्या हातून तयार झालेले लोणचे अंटार्क्टिकात जाऊन खाल्ले तरी प्रेप्-एच वगैरेची *ट गरज पडायची नाही!!!
(जुन्या पिढीतला नवीन)बेसनलाडू

सर्किट's picture

27 Sep 2007 - 1:28 pm | सर्किट (not verified)

सहमत !!!
शेवटी, आईच्या हातच्या चवीची सवय !

- (श्रावणबाळ) सर्किट

कोलबेर's picture

28 Sep 2007 - 8:14 am | कोलबेर

... ही काय भानगड आहे बॉ?

सर्किट's picture

28 Sep 2007 - 10:14 pm | सर्किट (not verified)

http://www.preparationh.com/ येथे बघा.

कोलबेर's picture

28 Sep 2007 - 10:30 pm | कोलबेर

... नशिब ह्याचं नाव जाणून घेण्याइतपत देखिल कधी गरज पडली नाही ;-) :-)

सर्किट's picture

28 Sep 2007 - 10:32 pm | सर्किट (not verified)

जेवणात दोन हालापेनो रोज कचाकचा खाल्यास, सदर जिन्नसाचे नावच नाही, तर इन्ग्रेडियण्टस देखील माअहिती होतात ;-)

- (माहितगार) सर्किट

बेसनलाडू's picture

29 Sep 2007 - 4:40 am | बेसनलाडू

हालापिनिओज ऐवजी हॅबनारोज असतील तर कोणती जास्तीची माहिती उजेडात येईल? ;)
(जिज्ञासू)बेसनलाडू

बेसनलाडू's picture

27 Sep 2007 - 1:22 pm | बेसनलाडू

याबद्दल अधिक माहिती द्याल का? कश्या प्रकारचे फळ आहे? लोणचे घरीच बनवतात की बाजारात मिळते? भोकर म्हणजे अंबाडी (आंबट-तुरटसे इलिप्सॉइडल फळ) नव्हे ना?
- बे.ला कुबल

सर्किट's picture

27 Sep 2007 - 1:27 pm | सर्किट (not verified)

भोकर म्हणजे अंबाडी नाही.
भोकर हे फळ आहे, ते झाडाला लागते.
ते हिरवे असते बाहेरून. आतून (म्हणजे फोडल्यास) पांढरट हिरवे असते.
ते फोडल्यास त्यातून चिकटसा द्रव बाहेर पडतो. त्यात पांधरट बीही असते.
भोकराचा चीक पतंगीच्या मांजासाठी काही लोक (म्हणजे मी) वापरतात.

एकदा ती बी आणि ते चिकटपण काढले की जे काही उरते, ते थोडेसे तुरट लागते. त्याचे लोणचे करावे. इतर कुठल्याही लोणच्यासारखे. मस्त लागते.

- सर्किट

(ता.क. व्यनितून पत्ता पाठवा, एक छोटीशी बाटली लोणचे फेडेक्स करीन.)

चित्रा's picture

27 Sep 2007 - 7:25 pm | चित्रा

आमच्या घराच्या बागेत भोकराचे झाड आहे त्यामुळे दारात भोकरांचा सडा पडायचा! झाड बर्‍यापैकी उंच होऊ शकते. त्याची पाने गोळा करून आम्ही चैत्रगौरीच्या दिवशी त्यावर कैरीची डाळ घालून ती पन्ह्याबरोबर द्यायचो. ती पाने चांगली मजबूत असतात.

भोकराचा चीक अगदी शेंबडासारखा दिसतो! त्यामुळे लहानपणी भोकर आवडायचे नाही. आजी ती भोकरे आणायला पाठवायची.
बाकी लोणचे वगैरेच्या आठवणी छान.

स्वाती दिनेश's picture

27 Sep 2007 - 1:29 pm | स्वाती दिनेश

भोकर म्हणजे करवंदाच्या जातीतील एक फळ - कच्च्या करवंदाचे अतिस्वादिष्ट लोणचेही मस्त लागते.

कोलबेर's picture

26 Sep 2007 - 12:43 am | कोलबेर

कट्ट्याखाली 'दुभत्या'चे कपाट आहे ना? त्यात असणारे तूप आणि त्यामुळे त्या कपाटाला येणारा एक विशिष्ठ वास सगळे आठवले!!

सहज's picture

26 Sep 2007 - 9:04 am | सहज

जूना काळ उभा केलात चित्रकार तुम्ही.

प्रत्येक वस्तूकडे बघताना वेगळेच वाटयेत...:-) दोन बर्नरची स्टँड अलोन शेगडी....

गॅस चालू, पण बहूदा गृहस्वामीनी नको बाइ माझे चित्र म्हणून फ्रेमबाहेर.....:-)

खिडकीतून मंद झूळूक येतेय ना का वेडावाकडा स्टॉर्च झाला आहे टॉवेल ;-)....

मजा आली....

काकू's picture

26 Sep 2007 - 11:03 am | काकू

छान आहे चित्र.
आमचे घर असेच होते.

-काकू

टग्या's picture

26 Sep 2007 - 5:10 pm | टग्या (not verified)

खिडकीबाहेर दोरीवर वाळत घातलेला टॉवेल म्हणजे नक्की तळमजल्यावरचा फ्ल्याट असणार!

- (होम्स) टग्या.

धनंजय's picture

26 Sep 2007 - 5:45 pm | धनंजय

किंवा वरच्या मजल्याची गच्ची तरी. टॉवेलच्या वजनामुळे दोरी खाली ओढली गेली आहे - त्या ओढलेल्या आकारावरून दोरी फार लांब नाही असा माझा निष्कर्ष आहे. गच्चीत बांधलेलीही असू शकेल.

ॐकार's picture

26 Sep 2007 - 7:40 pm | ॐकार

:)
तळमजला आहे!

राजे's picture

26 Sep 2007 - 9:10 pm | राजे (not verified)

ॐकार स्वरुपा,
अरे मी जसा, संगणक दुरुस्ती साठी लेखन चालू केले आहे तसेच तु देखील चित्रे कशी काढावी ह्याची देखील लेखमालाच काढ ही विनंती, नाही चित्रकलेची मला खुप आवड आहे मी खुपदा मार देखील खल्ला आहे आगाशे सरांचा [ त्यांनी कधी ताब्यांचे चित्र काढायला सांगितलेल की मी मात्र घाघरीचे चित्र तरी जरुर काढले आहे]

हो घाघरी वरुन आठवले तुझ्या चित्रात एक घाघरीचीच कमी आहे म्हणजेच तुझे चित्र एक सोडून सर्व गोष्टी दाखवत आहे.

बाकी पेन ने चित्रकला खुप अवघड जरुर एकाच बैठकीमध्ये काढले असावेस कारण मला वाटते की एकदा पेन उचलून बाहेर ठेवला की पुन्हा तो सुर येतच नाही.. काय म्हणतोस बरोबर ना ?

राजे
(*हेच राज जैन आहेत)

सहज's picture

27 Sep 2007 - 12:53 pm | सहज

पाण्याचे पिंप दिसले नाही त्यावरून मला पण शंका आली की बहूतेक सुखी माणसाचे घर आहे. अहो २४ तास नळाला पाणी म्हणजे काय कमी सुखी समजू नका. किंवा कदाचीत बाहेरच्या खोलीत फ्रीज असेल ज्यात तांब्यात पाणी भरून ठेवले असेल.

असो त्या स्वयंपाकघराच्या बाकीच्या ३ भिंतींची रेखाटने अजून बघायची आहेत. खरेतर ती पण काढून ३६० पॅनोरॅमीक व्ह्यू मधे सगळे एकत्र बघायला काय मजा येईल. (हॉलीवूड्च्या ऍनीमेशन ची सवय लागून माजलोय ना?)

चित्रा's picture

27 Sep 2007 - 7:16 pm | चित्रा

रेखाटन आवडले! कुठचे गाव असावे त्याचा विचार चालू आहे.

खिडक्यांना अर्धवट उंचीचे पडदे नाहीत. पूर्वी पुण्यात असे छोटे पडदे असायचे - म्हणजे शिवाजीनगर वगैरे काही भागातल्या घरांत पाहिले आहेत. खिडकीबाहेर बर्‍यापैकी उजेड. गज आडवे आणि जवळ जवळ आहेत - खिडकी काहीशी रुंद आहे - म्हणजे खूप जुना वाडा नसावा. असे आपले अंदाज! चूक असल्यास सांगावे..

देवदत्त's picture

26 Oct 2007 - 4:46 pm | देवदत्त

सुरेख चित्र आहे.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

ध्रुव's picture

26 Oct 2007 - 5:55 pm | ध्रुव

फार भारी आहे.
तुमच्या रेखाटनांना सलाम!!
ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

मनस्वी's picture

16 May 2008 - 4:56 pm | मनस्वी

ॐकारने काढलेले चित्र सापडले..
छान आहे रे ॐकार.. जुने स्वयंपाकघर आठवले!

आनंदयात्री's picture

16 May 2008 - 5:01 pm | आनंदयात्री

ओंकारा जमलेस तर ते रेखाचित्र काढलेलं घोडमं पण टाक रे ईकडे, मला आवडले होते पब्लिकला पण फार आवडेल.
मस्त होतं ते, आपल्याला लै लै आवडलं होतं.

शितल's picture

16 May 2008 - 5:32 pm | शितल

बॉलपेनाने काढलेले हे रेखाटन केवळ अप्रतिम आहे,
जुन्या घराची आठवण करून देणारे.
अजुन तुमची रेखाटने पहायला आवडतील.

वरदा's picture

17 May 2008 - 5:31 am | वरदा

लहान पणीच्या घराची आठवण झाली...सुंदरच काढलय... अप्रतिम....