माझी निघाली वार्‍यावरची वरात: पुढील मदत हवी आहे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
4 Apr 2010 - 2:57 pm

मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला.

खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की

एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का?

माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.

तंत्रचौकशीसल्लाप्रश्नोत्तरेमदतमाहिती

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

4 Apr 2010 - 6:34 pm | अरुंधती

माझा स्वतःचा विज्ञानात उजेड आहे, पण तुम्हाला http://www.arvindguptatoys.com/toys.html ह्या साईटवर उपयुक्त माहिती मिळेल असे वाटते!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

वाहीदा's picture

5 Apr 2010 - 7:07 pm | वाहीदा

अरुंधती,
http://www.arvindguptatoys.com/toys.html ही साईट मस्तच ग =D>
~ वाहीदा

समंजस's picture

6 Apr 2010 - 6:58 pm | समंजस

एक खुपच उपयुक्त दुवा दिल्याबद्दल धन्यवाद तै .....
मुलीला शाळेत हस्तकलेच्या नावाखाली काय करुन द्यावे हा माझा प्रश्न मिटला तर :D
आता पाषाणभेदींना त्यांना हवी असलेली माहिती मिळो वा न मिळो ;)

(कुठल्या धाग्यावर काय मिळेल हे सांगता येत नसल्यामुळे प्रत्येक धागा नक्कीच उघडून बघावा काय :? )

चक्रमकैलास's picture

4 Apr 2010 - 6:47 pm | चक्रमकैलास

इन्व्हरर्टर मधे वापरतात तसली बॅटरी वापरून बघा..मोठी बॅटरी असते..पण तिचे input voltage जास्त असते..ते कमी करता येते, Step Down Amplifier वापरून.. एखाद्या चांगल्या Electronics/Electrical च्या दुकानात सर्व साहित्य मिळते यासाठी लागणारे..
चांगला ऊपक्रम आहे..मला ई-मेल अथवा फोन करा आण्खी सविस्तर बोलाय्चे असल्यास..
kailas.kulkarni@gmail.com
09890603486

--नसूनही असलेला चक्रम कैलास...!!

नितिन थत्ते's picture

4 Apr 2010 - 7:50 pm | नितिन थत्ते

फ्लिकर ची चित्रे पहायला मेंबर असावे लागते का?

तुम्ही दिलेल्या दुव्यावर चित्र दिसले नाही. म्हणून अंदाजाने उत्तर.

साठवण्यायोग्य वीज निर्माण व्हायला (किमान २-३ व्होल्ट) मोटर जोरात फिरायला हवी. मी माझ्या मुलीसाठी एक खेळणे बनवले आहे त्यात टेपरेकॉर्डरची जुनी मोटर घेतली आहे आणि त्याला दोन एल ई डी लावले आहेत. मोटरवरची पुली टिचकीत धरून भिंगरी फिरवल्यासारखी फिरवली की एल ई डी पेटतात. इतपत जोरात मोटर फिरवायला हवी. त्यासाठी एक ट्रायल करून बघावी. चौपाटीसदृश ठिकाणी दोरी ओढून उडवण्याची हेलिकॉप्टर मिळतात. त्यातले एक विकत घेऊन त्याचा पंखा मोटरला लावून ती पवनचक्की म्हणून वापरा. त्यातून २-३ वोल्ट पैदा झाले तर त्यावर तुम्हाला रिचार्जेबल पेन्सिल सेल चार्ज करता येईल. अशा चार्ज केलेल्या सेलवर (२ सेल) एलईडी पेटवता येतील.

आपण ठाण्याला कधी भेटू शकलो तर अधिक मदत (एकमेकांना) करता येईल.

(दुसरीकडे कोणीतरी गिअर्ड मोटर वगैरे सुचवले आहे तिकडे दुर्लक्ष करावे. :) )

नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)

jaypal's picture

4 Apr 2010 - 7:58 pm | jaypal

पवन चक्की फिरण्यासाठी मोटार कशाला वापरायची? ती चक्की तर हवेनी फिरायला हवी ना?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

नरेश_'s picture

4 Apr 2010 - 8:21 pm | नरेश_

पवन चक्की फिरण्यासाठी मोटार कशाला वापरायची? ती चक्की तर हवेनी फिरायला हवी ना?
हा तर अगदी आतबट्ट्याचा व्यवहार झाला !

इतरांनी खोटं बोललेलं मला मुळीच खपत नाही ;)

दादा कोंडके's picture

4 Apr 2010 - 8:41 pm | दादा कोंडके

@जयपालः मोटारला आपण जेंव्हा वोल्टेज देतो तेंव्हा तीचं रुपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये होतं. पण जर आपण उलटं केलं, म्हणजे मोटरचा रोटर जर आपण फिरवला (वार्‍याने, पाण्याने वगैरे) तर आपल्याला वोल्टेज मिळेल. अर्थाल मोटर आणि डायनॅमो एकाच तत्वावर काम करत असले तरी, त्यांची कार्यक्षमता मोटर किंवा डायनॅमो रचनेवर अवलंबून असते.

@पाषाणभेदः माझ्या माहितीनुसार बॅटरी वोल्टेज कमीतकमी १.५ वोल्ट असते. त्यामुळे ती चार्ज करण्यासाठी, तुम्हाला साधारण दोन वोल्ट तयार करावे लागतील.
वरती देव काका म्हणतात त्याप्रमाणे जर (वार्‍यामुळे) मोटार जोरात फिरल्यामुळे जास्तं वोल्टेज तयार झालं तर, ते नियंत्रीत करण्यासाठी एक रेग्युलेटर लागेल.

प्रमोद देव's picture

4 Apr 2010 - 8:06 pm | प्रमोद देव

मिलीवोल्टमध्ये आहे...अहो म्हणजे करंट तर मायक्रो अ‍ॅंपियर्समध्ये असणार?
अशाने काहीच साध्य होणार नाही....वर नितिनशेठ म्हणतात...तसा एखाद दुसरा एलईडी पेटेल...बाकी काही नाही.
चार्जरमध्ये करंट जास्त हवा आणि मुख्य म्हणजे नियमित हवा...कमीजास्त होता कामा नये.

शानबा५१२'s picture

4 Apr 2010 - 8:26 pm | शानबा५१२

म्हणजे तुला electric power store करुन नंतर ती उर्जा पवनचक्कीला portable बनवायला वापरायची आहे का?
हो, तर मग ही असली पाहीजे का?(ही motor आहे?)अशी fish tankमधे वापरतातhee

हे पण हो तर ती portable वगैरे असलेली मिळेल अस वाटत...................
मला वाटत मला प्रश्न १००% नाही समजला.
High power electric battery(अर्थात सेल्)चालेल तर ती वापरा.
मला वाट्त.....हे खाली लिहलेल बरोबर आहे

जर तुला पवनचक्कीमधे जनरेट झालेली उर्जा साठ्वायची आहे तर बॅटरी वगैरेची माहीती नाही तरी एक सांगतो................

पवनचक्कीने तयार केलेली उर्जा एखादा मोबाईल चार्ज करायला वापरा......
मोबाईलच्या बॅटरीची चार्ज केल्यानंतरची 'साठ्वलेली' वीज - मोबाईलच्या बॅटरीची चार्ज करण्यापुर्वीची 'साठ्वलेली' वीज = पवनचक्कीने पुरवलेली वीज

ह्याने तुमच्या पवनचक्कीने कीती electric power suplly केली ते कळेल.

हे बरोबर वाटतय........तस नसेल तर कळवा......sushantkadam75@gmail.com
chemistryचा project करायचा ना!! माझ्या मित्राने fire extinguisher बनवला होता s.y.मधे......थोडी धोकादायक chemicals होती,पण मस्त होत्,मजा आली होती.
तस काय बनवायच तर सांग मदत करायला आवडेल.

*******मानुसघान्या,एक केले से भी अकेला,दिसत नसला तरी "खाली मुंडी पाताळ धुंडी"असलेला,साधालाजरा-बॉय..........*****

आनंद's picture

5 Apr 2010 - 12:14 pm | आनंद

बंगल्या वरती किंवा टेरेस वर बसवण्या जोग्या ज्या योगे सोसायटीचा पाण्याचा पंप चालु शकेल
अश्या छोटया पवनचक्क्या मिळ्तात (चिन मधुन इंपोर्ट ) १कि.वॅ. क्षमतेच्या पवनचक्की साधारण ४० ते ५० ह्जारा पर्यंत मिळु शकते.या बद्द्ल बरीच माहीती मागे काढली होती.एखाधी पवनचक्की आधी मागवुन घेवुन , ती इथेच बनवता येइल काय या विषयी विचार चालु आहे.

अन्या दातार's picture

6 Apr 2010 - 5:33 pm | अन्या दातार

मलाही अशीच सेम आयडीया सुचली होती, पण या पवनचक्क्या कितपत फिजिबल पडतात याचा अंदाज न आल्याने प्रोजेक्ट अर्धवट सोडून दिला. जर काही आणखी माहिती असेल तर मला amdatar@gmail.com येथे मेल करा. शक्य ती मदत नक्कीच करेन यात शंका नको.

मोटर - जनरेटर तत्त्व एकच असले तरी त्या दोन्हीची रचना पूर्णपणे वेगळी असते त्यामुळे मोटरपासून वीज निर्मितीत तुम्हाला कार्यक्षमता मिळणार नाही. तुम्ही त्याजागी सायकलचा डायनामो वापरलात तरी तुम्हाला जास्ती वीज मिळेल.

चतुरंग