ये अच्छी बात नही है! आवाज दाबू नका...

मार्मिक गोडसे's picture
मार्मिक गोडसे in राजकारण
22 Sep 2017 - 9:34 pm

ये हमारी चोरी किया हुवा पैसा वापिस आना चाहिये कि नही आना चाहिये ?... ये काला धन वापिस आना चाहिये?... ये चोर लुटेरोंसे एक एक रुपया वापिस लेना चाहिये?... इस रुपयोंपर जनता का अधिकार है कि नही है?... ये रुपया जनता के काम आना चाहिये? अरे एक बार...ये जो चोर लुटेरोंके पैसे विदेशी बँकोमे जमा है ना उतने भी रुपये हम ले आये ना.. तो भी हिन्दुस्थान के एक एक गरीब अदमीको मुफतमे १५ -२० लाख रुपया यू ही मिल जायेगा.. इतने रुपये है ये हमारे एमपी साहब कह रहे थे रेल्वे लाईन..ये काला धन वापीस आ जाय जहा चाहे वहा रेल्वे कर सकते हो.. ये लूट चलाई है..और बेशरम होकर कहते है.. सरकार आप चलाते हो और पुछते मोदी को... ये कैसे लाये? जिस दिन भारतीय जनता पार्टी को मौका मिलेगा.. एक एक पाई हिन्दुस्थान की वापीस लाई जाएगी और हिन्दुस्थान के गरीबोंके लिये काम लायी जायेगी... ये जनता के पैसे है, गरिब के पैसे है... हमारा किसान खेत मे मजदूरी करता है, उससे निकला हुआ धन है.. उस धन पर हिन्दुस्थान का अधिकार है ,हिन्दुस्थान के कोटी कोटी गरिबोंका अधिकार है, और उनको वो धन मिलना चाहिये.....

तुमच्यावर विश्वास ठेवून जनतेने तुम्हाला निवडून दिले.. तेही प्रचंड बहुमताने.. सत्तेचा गाडा सुरळीत चालवण्यासठी कुठलेही कडबोळ्याचे लोढने तुमच्या गळ्यात अडकवले नाही. विदेशातला भारतीय काळा पैसा आणणे तुम्हाला जमले नाही.. एकतर त्या विषयाचा अभ्यास नाही.. पक्षातील जाणकारांचे ऐकायचे नाही.. बिनडोक दोन चार लोकांना बरोबर घेवून असा काळा पैसा परत येत असतो काय? सत्तेत येऊन दोन वर्ष उलटली... एक फुटी कवडीही विदेशातून तुम्हाला आणता आली नाही..(आणता येणार नाही हे पहिल्यापासूनच सांगत होतो) थोड्याच दिवसात जनतेला कळून चुकले ... अरे ह्याला देशाचा गाडा काय , साधी बैलगाडीही हाकलता येत नाही. तुम्हाला टेंशन आलं... आणि मग साक्षात्कार झाला ,अरे देशातील काळा पैसाच येथील अर्थव्यवस्थेला कमकुवत बनवत आहे...मग तुमच्या डोक्यात एका बिनडोकाने (अशी लोकं तुम्हालाच सापडू शकतात) त्याच्या डोक्यातील अर्थक्रांतीचा कीडा तुमच्या डोक्यात हळूच सोडला...विदेशातील काळा पैसा आणण्यात आलेल्या अपयशामुळे तुमच्या डोक्यात किडे पडायची वेळ आली होती..अर्थक्रांतीचा हा कीडा तुमच्या डोक्यात फिट्ट बसला.. पुन्हा एकदा बिनडोक निर्णय घ्यायला तुम्ही सज्ज झालात.

कुठलाही मागचा पुढचा विचार न करता(कधी करता?) ८ नोव्हें. २०१६ ला नोटाबंदीची घोषणा केली. काळा पैसा,खोट्या नोटा, दहशतवाद नष्ट करण्याचं ब्रम्हास्त्र सोडल्याचे तुम्ही घोषित केले. दोन दिवसात तुम्हाला कळाले, की ते ब्रम्हास्त्र नसून बुमरँग आहे. नोटा बदलायला लोकांना बँकांसमोर रांगा लावाव्या लागल्या, त्यात अनेक जणांचे प्राण गेले. लोकांचा विरोध वाढत गेला... ३१ डिसेंबरपर्यंत सगळे सुरळीत झाले नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी शिक्षा भोगायला तयार आहे असे जनतेला भावनीक आवाहन केले. (मी तर पोकळ बांबू घेवून तयारच होतो). पण कसचं काय , ३१ तारखेनंतरही गोंधळ चालूच होता आणि तुम्ही जनतेपासून तोड लपवत होता.
आजही शेतकरी, कष्टकरी ज्यांचे हातावर पोट आहे त्यांचे नोटाबंदीमुळे अतोनात हाल होत आहेत. जुन्या बाद केलेल्या जवळ जवळ सगळ्या नोटा परत आल्या हे RBI ने घोषित केले व नोटाबंदी फेल गेली ह्यावर शिक्कामोर्तब झाले.नोटाबंदीमुळे GDP ग्रोथ घटणार(प्रत्यक्षात तसंच झालं) असं बोलणार्‍यांची तुम्ही खिल्ली उडवत होता. नोटाबंदी विरोधकांना 'नोटाबंदीभक्त' देशद्रोही ठरवू लागले . विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. सत्य स्विकारण्याऐवजी तुम्ही त्याकडे काणाडोळा करत आहात. ये अच्छी बात नही है!

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 9:44 am | सुबोध खरे

गोडसे भटजी
ते स्विस बँकेतले पैसे कुणाचे आहेत ते सांगितलं नाही तुम्ही
नाहीं म्हणजे ते आपले नाहीत असे छातीठोकपणे सांगता आहेत तर तुम्हाला माहित असणारच.

मार्मिक गोडसे's picture

27 Sep 2017 - 12:56 pm | मार्मिक गोडसे

द्वेष करायचा ठीक आहे पण म्हणून काहीही?

एखाद्या व्यक्तीच्या लबाडपणाच्या प्रमाणात मी माझा द्वेष व्यक्त करतो.

ते स्विस बँकेतले पैसे कुणाचे आहेत ते सांगितलं नाही तुम्ही

हा लेख मी मिपावर चर्चा घडवून आणण्यासाठी टाकला होता. पुढिल भागात त्याविषयी अधिक स्पष्ट लिहिणार होतो. हा लेख टाकल्यावर मी काही दिवस उत्तरेकडे फिरायला गेलो होतो. नैनितालला एके ठिकाणी मला शेजारची व्यक्ती मोबाईलवर मिपा वाचताना दिसली. मी उत्सुकतेने चौकशी केली ती व्यक्ती मिपासदस्य नव्ह्ती, कुठलातरी विषय शोधत असताना तीला मिपावर तो विषय सापडला होता. मी लिहिलेला हा लेख त्यांना वाचायला दिला. ती व्यक्ती अर्थ सल्लागार , व काही छोटे मोठे व्यवसाय करत होती. पुढील भागाच्या उत्सुकतेने तीने मला विचारले मीही थोडे कच्चे मुद्दे सांगितले (तांत्रिक). तीला ते बरेचसे पटलेही व तीने चक्क आर्थिक मोबदल्याच्या(फार नव्हते) बदल्यात लिखाणाचे हक्क मागितले. मी नकार दिला. परंतू माझा हा प्रतिसाद वाचल्यावर तीने माझ्याशी संपर्क साधला व एक नवीन ऑफर (व्यावसायीक) दिली जी मी लगेच स्विकारली व त्यांच्याबरोबर कायदेशीरबाबी पुर्ण केल्या. आता मला ह्याविषयार लिहिता येणार नव्हते, म्हणून मी पुढील भागही टाकले नाहीत. हा प्रतिसाद देण्यापूर्वी काही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून त्यांच्याशी चर्चा केली. मी आतापर्यंत मिपावर लिहिलेल्या लेखांचा संदर्भ देण्यास कोणतीही अडचण येणार नाही ह्याची खात्री केली. ह्या विषयावर आता ह्यापुढे अधिक स्पष्टीकरण करण्यास मी असमर्थ आहे.

मिपामुळे मला ही व्यावसायीक संधी मिळाली.असाच एक फायदा मला मिपावरील स्पर्धेतील ह्या फोटोमुळे(गुगलची मेहरबानी) झाला होता. गम्मत म्हणजे मी ड्रोनने काढलेला हा पहीलाच फोटो होता व त्यावेळी मी लेन्सवरील प्लॅस्टिकचे आवरण काढायचे विसरलो होतो, नाहीतर हा फोटो अजुन स्पष्ट आला असता. एका आंतरराष्ट्रिय पर्यटन मासिकाने ह्या फोटोबरोबर माझे इतरही फोटो स्विकारले होते. ह्यासाठी मी मिपाचा ॠणी आहे.

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 2:53 pm | सुबोध खरे

हे सर्व "नमनाला घडाभर तेल"सोडा हो
ते पैसे आपले नाहीत तर कुणाचे आहेत ते स्पष्टपणे सांगा बरं

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 6:33 pm | सुबोध खरे

गोडसे बुवा
तुम्ही कुणाचा द्वेष करायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मोदींचा १०० % कशाला २०० % द्वेष करा हो.
म्हणून स्विस बँकेतील पैसा देशाचा नाहीच असे धडधडीत खोटे विधान कसे करू शकता? आणि वर त्याचे समर्थन सुद्धा?
इतकी पातळी खाली आणायची?
मला त्या डांगे अण्णांच्या २० लाखाच्या ट्रकची आठवण आली
अरेरे

मार्मिक गोडसे's picture

27 Sep 2017 - 9:01 pm | मार्मिक गोडसे

तुम्ही मोदींचा १०० % कशाला २०० % द्वेष करा हो.
नाही समप्रमाणातच.
आणि वर त्याचे समर्थन सुद्धा?
इतकी पातळी खाली आणायची?

ठिक आहे तसं समजा. मी माझं काम केलं, त्यावर विश्वास ठेवा अगर नका ठेवू आग्रह नाही. परंतू तुमचं काय? खोटी कहाणी रचून फेकाफेक करायची. तुमच्या'शॄंगापत्ती' लेखावर मी अशी शंका उपस्थीत केली होती. त्यावर तुम्ही उत्तर देण्याऐवजी असा फटकळ प्रतिसाद दिला होता. स्वतःकरता वेगळा न्याय. दुसरा खुलासा करतो तर त्याची खिल्ली उडवता? त्याच धाग्यावर तुम्हाला मी हा प्रश्न विचारला होता , ज्यातुन चुकीचा संदेश जात होता,तरीही त्याचे उत्तर देणे तुम्ही टाळले होते. नशीब तो धागा नंतर वाचनमात्र झाला. 'शॄंगापत्ती'नंतर तुम्हाला आलेले नैराश्य लपविण्यासाठी तुम्ही ट्रकच्या मागे लपत आहात. हरकत नाही. नाहीतरी तुम्ही अडचणीच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे नेहमीच टाळत असतात. मिळत असणारा आदर कसा गमवावा हे तुमच्याकडूनच शिकावे.

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 9:35 pm | सुबोध खरे

हायला
तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय बोललं हे लक्षात ठेवता ?आणी ते उकरून काढता
धन्य आहे !
इतकी हतबलता (DESPARATION) कामाची नाही.
माझ्या बऱ्याच धाग्यांवर बऱ्याच लोकांनी धुळवड खेळली आहे. मी तिकडे लक्ष ना देता पुढे जातो. जुनी ओझी घेऊन स्वतःला त्रास करून घेण्यात काय हशील आहे?
मला नैराश्य वगैरे काहीही आलेलं नाही. उगाच गैरसमज नको. लोकांचे प्रश्न डॉक्टर जर स्वतःला चिकटवून घ्यायला लागला तर त्याला सुखाने जगणे अशक्य होईल.
असो
दुसऱ्या धाग्यावरच्या प्रश्नांची उत्तरे मी इथे देत नाही.
ट्रक ड्रायव्हरला मालक २० लाख रुपये रोख देऊन ठेवतो हे डांगे अण्णांचे उदाहरण स्विस बँकेत भारतिय राजकारण्यांचे पैसे नाहीतच हे म्हणण्याइतकेच धडधडीत असत्य आहे म्हणून दिले आहे
मी माझं काम केलं, त्यावर विश्वास ठेवा अगर नका ठेवू
बाकी अजूनही स्विस बँकेतील पैसे भारतीय जनतेचे नाहीतच हे धडधडीत असत्य तुम्हाला अजूनही ठासून म्हणायचं असेल तर मग काय बोलणार?
..... .. ... भद्रम ते भवतु

मार्मिक गोडसे's picture

27 Sep 2017 - 10:17 pm | मार्मिक गोडसे

तुम्ही कोण, कधी, केंव्हा, काय बोललं हे लक्षात ठेवता ?आणी ते उकरून काढता
धन्य आहे !

कोण किती लाख ट्रक ड्रायव्हरला देतो हे लक्षात ठेवनारे तुम्हीच ना? कशाला लक्षात ठेवता हो?
दुसऱ्या धाग्यावरच्या प्रश्नांची उत्तरे मी इथे देत नाही
मग दुसऱ्याचे ट्रक इथे कशाला आणता?
तुम्ही तेथे उत्तर देऊ शकले नाही, इकडे द्यावं अशी अपेक्षाही नाही. आणि तुम्ही ते देऊही शकणार नाही,कारण ते गृहितकच चुकीचे होते. पळपुटेपणा कळस झाला.

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 11:26 pm | सुबोध खरे

पण स्विस बँकेतले पैसे कुणाचे आहेत ते तुम्ही सांगितलेच नाही. ट्रक सोडा हो!

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 3:23 pm | पगला गजोधर

गोडसे,

सुप्रीम कोर्टाने फटकारून सुद्धा, हे लोक, काळा पैसा खातेदारांची नावे जाहीर का करत नाही ?
यांना नुस्ता वाद घडवायचा असतो बहुदा ....

खातेदारांची नावे यांच्याकडे, जाहीर करत नाही हे,

उलट तपासणी तुम्ही का देताय ?

Black money list with 627 names given to Supreme Court
INDIATODAY.INNEW DELHI | WEDNESDAY, OCTOBER 29, 2014
The Supreme Court also directed the government to share the list with the Enforcement Directorate and the CBI. The case will be next heard on December 3 after the SIT submits its status report by November 30.

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 3:43 pm | सुबोध खरे

प ग
हे पैसे आपले ( राष्ट्राचे) नाहीतच असा दावा गोडसे करत आहेत त्याला तुम्ही फाटे फोडायचा प्रयत्न का करत आहात?

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 3:59 pm | पगला गजोधर

माझ्या अल्पमती प्रमाणे, त्यांनी "मत" (Opinion ) प्रदर्शित केलेल आहे, "दावा" नाही.

रुग्णालयातील डॉक्टरसुद्धा अत्याधुनिक तपासणी करून, आपलं "मत / ओपिनियन " देतात, म्हणून त्यांच्या सेवेला प्रॅक्टिस म्हणत असावेत. (माझ्या अल्पमती प्रमाणे), डॉक्टरसुद्धा कधीही दावा करत नाही तर मत व्यक्त करतात.

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 5:16 pm | सुबोध खरे

दावा मत किंवा ओपिनियन म्हणा ( शब्दच्छल).
मी ( तुम्ही डॉक्टरचे उदाहरण दिले म्हणून )एखाद्या व्यक्तीला कर्करोग आहे असे मत,दावा किंवा ओपिनियन दिले तर ते तसे का आहे याचा काही तरी पुरावा देणे आवश्यक आहे अन्यथा कोणत्याही रुग्णाला तोंडाकडे पाहून तुला कर्करोग आहे सांगणे हे किती गंभीर ठरू शकते.
उगाच शब्दच्छल करून मुद्दा भरकटवण्याचा आपला प्रयत्न केविलवाणा आहे.

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 5:32 pm | पगला गजोधर

अच्छा म्हणजे भ्रस्ताचाराचे पैसे खाल्ले व ते स्विस बँकेत लपवले, हे म्हणायला पुरावे लागत नाही ....

बाकी .... असोच ....

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 5:42 pm | पगला गजोधर

अन्यथा कोणत्याही रुग्णाला तोंडाकडे पाहून तुला कर्करोग आहे सांगणे हे किती गंभीर ठरू शकते.

हे जसं चूक आहे तसंच, जर कुठल्या तोतयाने, डॉक्टर असल्याचे भासवून , कोणा एखाद्याला,
"तुला ६० वर्ष जुना कँसर आहे, व तो मीच एकटा, माझ्या योग्यसामर्थ्यावर बारा करू शकतो", असं म्हणून, त्याला लुबाडलं असेल तर तेही चूकच.

बाकी
शब्दच्छल बुमरँग होताना काहींना वाईट वाटते...

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 6:06 pm | सुबोध खरे

http://www.thehindu.com/news/national/other-states/70k-crore-in-black-mo...
काय आहे गजोधर भैया
या वरच्या दुव्यात सर्वोच्च न्यायालयाने काळे पैसे देशाबाहेर दडवले आहेत असे स्पष्ट म्हटले आहे तेंव्हा ते पैसे देशाचे नाहीतच हे म्हणणे साफ चूक आहे.आणि हे हिमनगाचे टोक आहे.
आणि हो महत्त्वाचे हे श्री मोदी म्हणत नाहीयेत तर सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेली माजी न्यायाधीशांची समिती म्हणते आहे.
नाही तर तुम्ही म्हणाल की ते खोटे आहे.
बुमरँग म्हणायला माझे कोणते विधान असत्य आहे ते दाखवा
मी केवळ गोडसेंचे विधान असत्य आहे असे म्हणालो. त्यासाठी मोदींचे (तथाकथित) असत्य विधान मला दाखवण्याची गरज काय?
बाकी मोदी काय म्हणतात ते खरं कि खोटं ते मतदार ठरवतीलच.

सुप्रीम कोर्टाने फटकारून सुद्धा, हे लोक, काळा पैसा खातेदारांची नावे जाहीर का करत नाही ?

कोर्टानं ज्यांना नावं द्या म्हटलं आहे त्यांना दिली आहेत. आणि जाहिर का नाही केली याचं कारण जेटलींनी सांगीतलं आहे.

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 6:09 pm | सुबोध खरे

http://www.thehindu.com/news/national/centre-submits-list-of-names-of-in...
नावे कोर्टाला दिली आहेत
ती जाहीर करायची कि नाही ते तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला विचारू शकता.
हे बेलाशक आरोप करणे केजरीवालांसारखे व्हायला लागले आहे

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 6:12 pm | पगला गजोधर

Now, Modi govt too refuses to name foreign bank account holders

Dhananjay Mahapatra | TNN | Updated: Oct 18, 2014, 07:08 IST

http://timesofindia.indiatimes.com/india/Now-Modi-govt-too-refuses-to-na...

सुबोध खरे's picture

27 Sep 2017 - 6:26 pm | सुबोध खरे

परत फाटे फोडणारे विधान
आपला दुवा ऑक्टोबर २०१४ चा आहे आणि मी दिलेला दुवा मे २०१६ चा आहे जेंव्हा सरकारने नावे सर्वोच्च न्यायालयाला दिली आहेत.
ती जाहीर करायची कि नाही हा न्यायालयाचा स्वतःच्या अखत्यारीतील प्रश्न आहे.
केवळ दिशाभूल करण्यासाठी काहीतरी जुने उकरून काढण्याचा आपला हा प्रयत्न खालच्या पातळीचा आहे एवढेच नमूद करतो.

सरकारसाहेब's picture

23 Sep 2017 - 3:32 pm | सरकारसाहेब

संघमित्रा,
व्वा, काय सुसंस्कृत भाषा आहे. हीच भाषा नोटबंदीवाल्या काकांना पण वापरणार का? निदान प्रतिसादाच्या शेवटी 'आपला नम्र' असं तरी लिहू नका.

गामा पैलवान's picture

23 Sep 2017 - 5:32 pm | गामा पैलवान

ससा,

मी भाजपविरोधी होतो. मोदींनी मला बाटवलं. बाटगा जास्त कडवा असतो, म्हणून मी जरा कडक भाषा वापरली. बाकी काही नाही.

तसंही पाहता, मोदींनी सेक्युलर मुखंडांकडून सतत बारा वर्षं मौत का सौदागर वगैरे भरपूर शिव्या खाल्ल्या आहेत. त्यामानाने पप्पूने फारशा शिव्या खाल्ल्या नाहीत. काय हा घोर अन्याय! बिचाऱ्याची अशी उपासमार मला आता सहन होईनाशी झालीये. तुम्हीसुद्धा मोदींची चिंता करणं सोडून द्या आणि पप्पूची करायला घ्या.

आ.न.,
-गा.पै.

मृत्युन्जय's picture

23 Sep 2017 - 1:29 pm | मृत्युन्जय

कंटाळा येत नाही का हो गोडसे तुम्हाला? मिपावर या फालतू चर्चाच जास्त व्हायला लागल्यापासून मिपावर यायचेच सोडुन दिले होते. वैताग येतो राव. मिपा हा अपला राजकीय आखाडा चालवण्याची दलदल झाली आहे. बाकी काही नाही. मालकांना देखील आजकाल (म्हणजे बरेच दिवस झले तसे) असल्या गोष्टींमुळे मिळणार्‍या ट्यार्पीचीच मजा येत आहे असे वाटते

मार्मिक गोडसे's picture

24 Sep 2017 - 2:24 pm | मार्मिक गोडसे

कंटाळा येत नाही का हो गोडसे तुम्हाला?

अजिबात नाही. पंतप्रधानांना जोपर्यंत खोटं बोलण्याचा कंटाळा येत नाही तोपर्यंत मलाही येणार नाही.

मिपावर या फालतू चर्चाच जास्त व्हायला लागल्यापासून मिपावर यायचेच सोडुन दिले होते
'फालतू' ?
नोटाबंदीमूळे ज्यांचा जीव गेला त्याचा जाब विचारणे म्हणजे फालतू?
नोटाबंदीमुळे ज्यांचे रोजगार गेले त्याचा जाब विचारणे म्हणजे फालतू?
आरबीआयने परत आलेल्या नोटांचे आकडे घोषित केल्यावर नोटाबंदीच्या उद्देशावर जाब विचारणे म्हणजे फालतू ?
आजुबाजूला अशी परिस्थीती दिसत असताना नाही गप्प बसवत मला.
मिपा हा अपला राजकीय आखाडा चालवण्याची दलदल झाली आहे.
कोण चालवतोय असा राजकीय आखाडा?
आता राहीला प्रश्न तुमच्या वैतागाचा. त्याला मी काहीही करू शकत नाही. नसेल आवडत राजकीय धागे तर ह्या विभागात न डोकावण्याचा पर्याय उपलब्ध आहे. परंतू असे राजकीय धागे मिपावर येउच नये असं तुम्ही मिपा मालकांना सुचवत असाल तर तुम्ही ह्या धाग्याच्या विषयाला पुष्टीच देत आहात.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 3:05 pm | पगला गजोधर

अहो गोडसे,
नोटबंदीसारख्या, सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी काहीही संबंध नसलेले विषय , तुम्ही का उगाळत बसला आहात ?
तुमची जनतेशी बांधिलकी असेल तर
सुभाषचंद्र की गुमानामी बाबा, जर पटेल पंतरप्रधान असते तर, गायीचे महत्व, असे जीवनावश्यक चर्चा विषय तुम्ही का डिस्कसत नाही बरे ?

ज्यादेशातील सर्व पूर्वपंतप्रधान केवळ पर्यटनासाठी, परदेश दौर्यावर जायचे,
तिथे सध्या बिचारा एखादा प्रधानसेवक माणूस वर्षातील सात आठ महिने, जगाचा नकाशा पिंजून पिंजून कोपऱ्याकोपर्यातल्या देशांच्या विमाणप्रवासाच्या भेटी घेण्याच्या वनवासात टाचा घासत असेल,...कशासाठी तर फक्त भारतवर्षासाठी... आपल्या वृद्ध असहाय मातेला घरी एकट सोडून, दौरे करताना स्वतःच्या हृदयावर किती मोठा धोंडा ठेवावा लागतो, याची काही कल्पना ? बिचारे इतक्या दिर्घ विमानप्रवासात जेव्हा जेव्हा खिडकी बाहेर पाहत असतील, तेव्हा तेव्हा जननी व जन्मभूमीच्या विरहाच्या व्याकुलतेने नक्कीच 'ने मजसी ने परत मातृभूमीला ...' म्हणून तळमळत असतील, अश्या माणसावर टीका का ?

नोटबंदीच म्हणाल तर तो सर्व सामान्यांचा प्रश्न कधीच नव्हता, त्यांच्या वृद्ध मातुश्री स्वतः ए टी एम मधून पैसे काढून काटकसरीने संसार चालवतायेत, इतक्या महिन्यापूर्वी काढलेल्या ४ हजारातच त्या आजपर्यंत मुलाच्या समवेत गुजराण करतायेत . परत दिसल्या का हो त्या तुम्हाला रांगेत ? मग...
नोटबंदीमुळे मुदलात कधीही काहीही प्रश्न सर्वसामान्याला आलेले नाहीत, व ४००० हजारा मध्ये इतके महिने संसार चालवता येतो, हेच यातून अधोरेखित होतंय....

विशुमित's picture

23 Sep 2017 - 4:03 pm | विशुमित

याच साठी केला होता अट्टाहास : "खर्चाची पद्धत बदलण्यासाठीच नोटाबंदी"- इति जेटली साहेब

http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/iba-meet-d...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Sep 2017 - 3:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

योग्य मुद्दा मांडला आहेस रे मार्मिका.निश्च्लनीकरणाचा निर्णय घेताना आर.बी.आय.ला सरकारने विश्वासात घेतले नव्हते हे आता रघुराम राजन ह्यांनी उघडपणे सांगितले आहे. जे कोणी अर्थतज्ञ,प्राध्यापक भाजपाला विरोध करतील ते सगळे कॉम्ग्रेसवाले अशी विभागणी आता झालीच आहे.

मराठी कथालेखक's picture

23 Sep 2017 - 3:21 pm | मराठी कथालेखक

मस्त लेख...

तेजस आठवले's picture

23 Sep 2017 - 4:28 pm | तेजस आठवले

अप्रतिम लेख. तुमचा हा लेख एका अतिशय नामांकित वृत्तपत्राचा अग्रलेख होऊ शकतो. त्यांना पाठवा हा लेख, त्यांना असे लेख हवेच आहेत.कुठल्याही पात्रतेची अट नाही. फक्त विषय 'हाच' हवा.

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 4:40 pm | पगला गजोधर

झी न्यूज सारख्या निष्पक्ष वहिनी ला सुद्धा पाठवा ....
झी चे मालक राज्यसभेत व्यस्त असले तरी, चौधरी सारखा टिव्ही पत्रकार (की ज्याच्या स्वच्छ प्रतिमेमुळेच न्यायालयाने त्याला जामीन मिळू दिला ) ज्याने केवळ अन्न खाऊनच पोट भरलं, व सध्या पैशे खाणाऱ्या विरुद्ध दंड थोपटून उभा आहे, तो नक्कीच याची दखल घेईल, आणि हो संदर्भ पुरावे याची जंत्री तो मागत नाही, नुसता लेख त्याला द्या..…. बघा तो डी एन ए रिपोर्ट सादर करेल या लेखावर...

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Sep 2017 - 5:18 pm | श्री गावसेना प्रमुख

बाकी ज्या हेतुने असे लेख पाडले जातात तो हेतु १९ ला तरी साध्य होणार नाही,मला वाटते ह्या कळ बडव्यांना २४ पर्यंत प्रयत्न करावे लागतील!

पगला गजोधर's picture

23 Sep 2017 - 6:09 pm | पगला गजोधर

बरोबर आहे व सहमत,
१९ च्या आधीच
मुंबई महानगर पालिकेतसुद्धा लवकरच शहा झेंडा लावतीलच,
शिवाय महाराष्ट्र सरकार सुद्धा कार्यकाळ पूर्ण करेल, सहकारी पक्षाने काहीही पकपक केली तरीही

सरकारसाहेब's picture

23 Sep 2017 - 6:32 pm | सरकारसाहेब

श्री गावसेना प्रमुख

बाकी ज्या हेतुने असे लेख पाडले जातात तो हेतु १९ ला तरी साध्य होणार नाही....

तुम्ही असं 'हेतू'पुरस्सर बोलला ते ठीक आहे. पण मागे एकदा 'इंडिया शायनिंग' नेमकं पार्श्वभागावर आपटलं होतं. आताही मोदीकाकांनी ताक फुंकून प्यायला हवं.

खाबुडकांदा's picture

24 Sep 2017 - 6:13 am | खाबुडकांदा

हा हा
हुहु
हीही
झालंच तर .....

ख्या ख्या

नाखु's picture

24 Sep 2017 - 8:53 am | नाखु

पुर्वीचं मिपा राहिले नाही असा परंपरागत पद्धतीने गळा काढून मुकाट जाग्यावर बसतो

वाचकांचीच पत्रेवाला नाखु पांढरपेशा बिनसुपारीवाला

मतपेट्यातून निर्णय आल्यावर हारलेले नेते "जनतेचा कौल स्विकारला म्हणतात. तो बरोबर / चूक यावर भाष्य करत नाहीत.
ठीक आहे दोन मोहिमा सरकारच्या फसल्या आहेत असे धरू. त्यांनी मोठ्या संख्येने रांगा लावून १८ महिन्यांनी यांना हाकलावे.

मार्मिक गोडसे's picture

25 Sep 2017 - 8:29 am | मार्मिक गोडसे

मतपेट्यातून निर्णय आल्यावर हारलेले नेते "जनतेचा कौल स्विकारला म्हणतात. तो बरोबर / चूक यावर भाष्य करत नाहीत.
आणि जिंकलेले नेते त्यांच्या सोयीप्रमाणे अर्थ काढतात, असंच ना?

प्रत्येक वेळी निवडणूक निकालांचा संबंध जोडता येत नाही. ते बचावाचे साधन आहे. येथे अवांतर होईल म्हणून जास्त लिहीत नाही.

नमकिन's picture

24 Sep 2017 - 6:46 pm | नमकिन

खोट्या/नकली नोटा पूर्वी पाकिस्तान फार छापायचा व भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करता, पण मग त्या किती सापडल्या?
फार महत्वपूर्ण प्रश्न अनुत्तरित!
की त्या पण भरल्यात बँकेत...

मामाजी's picture

24 Sep 2017 - 7:52 pm | मामाजी

मार्मीक साहेब,
ही लिंक बघा.
https://www.facebook.com/100008727755098/videos/1768147210152854/

पगला गजोधर's picture

24 Sep 2017 - 9:21 pm | पगला गजोधर

होय मार्मिक साहेब, सदर लिंक ही अतिशय विश्वासाहर्या माध्यम
फेसबुक येथील आहे, त्यामुळे ती सत्यच असणार, तिची शहानिशा झालेलीच असणार, कारण इंटरनेटवरून सत्यच बातम्या पुढे येतात.
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI, UNI वैगरे वृत्तसंस्था सगळ्या बोगस कारभार आहे हो.
फेसबुक व व्हॅटसअप माध्यमातून आलेल्या व एका देशभक्त पक्षाच्या सायबर सेल मधुन पाठवण्यात आलेल्या अश्या क्लिप्स, हेच एकमेव सत्य परिस्थिती निदर्शक माध्यम आहे.

मामाजी's picture

24 Sep 2017 - 11:21 pm | मामाजी

पग साहेब राम राम,

कोणत्याही गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास न करता त्यांचा बादरायण संबंध जोडून घाईघाईने उथळ व हास्यास्पद प्रतिसाद देण्यात आपला हात कोणीही धरू शकणार नाही. मी दिलेली लिंक ही कुठल्या छापून आलेल्या बातमीची नसून एका व्याख्यानाची आहे. सदर व्याख्यान दि 31मार्च 2017 ला चेन्नई मधे दिले होते. ते या लिंक वर https://youtu.be/8HsYDpO8Ra8 दि. 7 एप्रिल 2017 ला youtube वर upload करण्यात आले. आता या खुलाश्या नंतर आपण दिलेल्या अभ्यासपूर्ण प्रतिसादाचे नेमके भवितव्य काय ? असो.....
जवळपास 6 महिन्यां पूर्वी दिलेल्या व्याख्यानाची लिंक देण्याचे कारण हे की, मार्मीक साहेब इथे जे नोटाबंदी फसल्याचे दळण दळत आहेत व आपल्या सारखे जे त्यांचे समर्थक आहेत, त्यांना माझी नम्र विनंती आहे की हे व्याख्यान ऐकून त्यात मांडलेल्या मुद्द्यांचे खंडन करणारा एक अभ्यासपूर्ण लेख आपल्या कडुन यावा व सर्व मिसळपाव वाचकांच्या ज्ञानात भर घालावी.
धन्यवाद.

पगला गजोधर's picture

24 Sep 2017 - 11:58 pm | पगला गजोधर

घरचा आहेर

23 minute interview of Subramanyan Swamy with Vir Sanghvi which was to be telecast yesterday on CNN IBN but was not allowed to be shown. Its on u BCtube now . You can watch it before it's taken down.
Here is Dr @Swamy39 in conversation with @virsanghvi It was not telecast on CNNnews18 yesterday. But, Its on youtube

https://t.co/sU47Xo1Usv

मामाजी's picture

25 Sep 2017 - 12:52 pm | मामाजी

पग साहेब राम राम,

घरच्या आहेरा बद्दल धन्यवाद,
भाजपा सोडून इतर कोणत्या पक्षांमधे घरचा आहेर देण्याची मूभा आहे याचा पण जरा दोन चार उदाहरणे देउन खुलासा करावा.

आपण उल्लेख केलेला Video youtube वर आहे https://youtu.be/uAz6pTqd9BQ ( लिंक). आपल्या मता प्रमाणे सदर मुलाखत प्रसारित करू दिली नाही

“23 minute interview of Subramanyan Swamy with Vir Sanghvi which was to be telecast yesterday on CNN IBN but was not allowed to be shown.”

या बातमी ची लिंक देउ शकाल का?

आता सुब्रह्मण्यम स्वामीं मांडतात त्या सर्व मुद्द्यांशी आपण सहमत आहात असा याचा अर्थ आम्ही घ्यायचा का?

आणि शेवटी गुरूमूर्तिंनी मांडलेल्या मुद्द्यांचे खंडन करणारा लेख आपण लिहीणार का? हा प्रश्न अजुन अनुत्तरीतच आहे.

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 2:46 pm | पगला गजोधर

भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरुन अर्थमंत्री अरुण जेटलींना घरचा आहेर दिला आहे.
नोटाबंदी, वस्तू आणि सेवा कर यामुळे अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान यावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वाजपेयींच्या काळात मंत्री असलेल्या यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकावर टीकेची झोड उठवली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लिहिलेल्या लेखातून सिन्हा यांनी सध्याच्या आर्थिक मंदीसदृश्य परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. या लेखातून त्यांनी मोदी आणि जेटली यांच्यावर कडाडून टीका केली. ‘अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे. यावर मी शांत बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेन. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल,’ असे म्हणत त्यांनी जेटलींवर थेट तोफ डागली.
वाजपेयींच्या मंत्रिमंडळात अर्थ मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या सिन्हा यांनी नोटाबंदी, वस्तू आणि सेवा करावरुन मोदी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. ‘नोटाबंदीचा निर्णय प्रचंड आर्थिक नुकसान करणारा होता. तर वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत,’ असे सिन्हा यांनी म्हटले. ‘मी गरिबी अतिशय जवळून अनुभवली आहे, असे पंतप्रधान अनेकदा सांगतात. देशभरातील जनतेने याच गरिबीचा अनुभव घ्यावा, यासाठी पंतप्रधानांचे अर्थमंत्री मेहनत घेत आहेत,’ असा टोलाही त्यांनी लगावला.

मामाजी's picture

27 Sep 2017 - 8:43 pm | मामाजी

पग साहेब राम राम,

माझा मुद्दा

भाजपा सोडून इतर कोणत्या पक्षांमधे घरचा आहेर देण्याची मूभा आहे याची पण जरा दोन चार उदाहरणे देउन खुलासा करावा.

हा होता.

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 12:05 am | पगला गजोधर
गामा पैलवान's picture

24 Sep 2017 - 11:54 pm | गामा पैलवान

नमकिन,

खोट्या/नकली नोटा पूर्वी पाकिस्तान फार छापायचा व भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करता, पण मग त्या किती सापडल्या?
फार महत्वपूर्ण प्रश्न अनुत्तरित!
की त्या पण भरल्यात बँकेत...

तेलगीने खऱ्या नोटा छापवून भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी केली. या दोन्ही ब्यादींवर उपाय एकंच. तो म्हणजे खऱ्या आणि खोट्या दोन्ही नोटा रद्द करणे. तेच मोदींनी केलं.

आ.न.,
-गा.पै.

पगला गजोधर's picture

25 Sep 2017 - 12:11 am | पगला गजोधर

1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी, ISI वाल्या) नोटा
डिफ्रँशिएट करता येतात का ?
2. डी मॉ नंतर, अर्थव्यवस्थेतील एकूण किती % नोटा परत जमा झाल्या ?
3. जमा झालेल्या नोटापैकी किती % खोट्या (तेलगी, ISI वाल्या) नोटा आढळून आल्या ?

गामा पैलवान's picture

25 Sep 2017 - 12:45 pm | गामा पैलवान

प.ग.,

उत्तरे.

1. खऱ्या नोटा व खोट्या (तेलगी, ISI वाल्या) नोटा डिफ्रँशिएट करता येतात का ?

नाही ना! तीच तर समस्या आहे. तेलगीने खऱ्या नोटा अवैधपणे छापल्या.

2. डी मॉ नंतर, अर्थव्यवस्थेतील एकूण किती % नोटा परत जमा झाल्या ?

जवळजवळ सगळ्याच परत आल्या असणार. हातचा पैसा कोण सोडतो. ज्या परत आल्या नाहीत, त्यांची किंमत शून्य आहे.

3. जमा झालेल्या नोटापैकी किती % खोट्या (तेलगी, ISI वाल्या) नोटा आढळून आल्या ?

माहित नाही. कारण तेलगीने खऱ्या नोटा छापल्या.

आ.न.,
-गा.पै.

मार्मिक गोडसे's picture

25 Sep 2017 - 3:12 pm | मार्मिक गोडसे

तेलगीने बनावट स्टँप पेपर छापले होते ,बनावट नोटा नव्हत्या छापल्या.

पगला गजोधर's picture

27 Sep 2017 - 4:20 pm | पगला गजोधर

माहित नाही. कारण तेलगीने खऱ्या नोटा छापल्या.

चला तुम्हाला बेनेफिट ऑफ डाउट देतो... (तेलगीने बनावट स्टँप पेपर छापले होते ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सुद्धा... )

तुम्हाला कदाचित अस म्हणायचे असेल की, "तेलगी सारख्या गुन्हेगारांनी व ISI ने बनावट नोटा छापल्या, त्याही अगदी बेमालूमपणे की, असल और नकल मे फरक ना कर पाओ..."

मग आता असा प्रश्न आहे की, नव्या छापलेल्या नोटा या बनावटीकरणापासून वाचू शकतात का ? नै म्हणजे काही स्पेशल फिचर, जसे की चिप वैगरे ? काही आहे का
या नोटांमध्ये ??
याबाबतीत भाजप सायबर सेलकडून, तुम्हाला काहीतरी विश्वासहार्य बातमी, आतल्या गोटातून मिळाली असेलच की !