देशातील एक रुपयाही स्विस बँकेत नाही.
टीव्ही ,रेडिओ ,वर्तमानपत्रातून आपण देशातील काळ्या पैशाबदल ऐकत असतो, वाचत असतो. काही राजकीय नेते छातीठोकपणे देशातील काळ्या पैशाचे आकडेही सांगत असतात व ह्यातील बराचसा पैसा स्विस वा अन्य विदेशी बँकांमध्ये ठेवला गेला आहे ह्याची आकडेवारीही सांगतात. हे प्रचंड आकडे ऐकून आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची छाती दडपून जाते व डोळे पांढरे होऊन जातात. मधेच कोणीतरी सोम्या गोम्या उठतो आणि हा परदेशात गेलेला काळा पैसा भारतात आणण्याचे आश्वासन देतो. परदेशातून हा काळा पैसा देशात आल्यावर आपली अर्थव्यवस्था कशी गुटगुटीत होईल, लोकांना नवीन कर लावले जाणार नाही अशी स्वप्ने दाखवतो. हे ऐकून सर्वसामान्य माणूस खुश होतो. तरीही त्याला नेहमी प्रश्न पडत असतो,की हा काळा पैसा येतो कुठून ? किंवा तो ओळखायचा कसा ?
रिझर्व्ह बँक ही संस्था ठरवते की किती नोटा छापायाच्या किंवा रद्द करायच्या. रिझर्व्ह बँकेने बाजारात वितरीत केलेल्या ह्या नोटा अधिकृत समजल्या जातात. काळा पैसा हा वेगळा छापला जात नाही तो ह्या अधिकृत छापलेल्या पांढऱ्या पैशातूनच तयार होता असतो. तो कसा तयार होतो हे समजण्यासाठी प्रथम काळा पैसा म्हणजे काय ? हे जाणून घेणे गरजेचे आहे.
ज्या आर्थिक व्यवहाराची कागदोपत्री किंवा डिजिटली नोंद होत नाही अशा अनधिकृत व्यवहारातून तयार होणार्या पैशाला काळा पैसा म्हणतात. आपणही नकळत काळ्या पैशाला जन्म देत असतो. उदा. बँकेतून पैसे काढून आपल्या गाडीने निघत असताना आपण वाहतुकीचा नियम तोडल्यास पोलिसाने दंडाची पावती फाडू नये म्हणून त्याला चिरीमिरी देतो तेव्हा आपल्या हातातील पांढरा पैसा क्षणात काळा झालेला असतो. असेच आपण जमिनीचे, घराचे व सोने खरेदीचे व्यवहार रोखीने करतो व अधिकृत पावती घेत नाही तेव्हाही काळ्या पैशाच्या वाढीला हातभार लावत असतो.
काळ्या पैशाची एक समांतर अर्थव्यवस्था आहे बिल्डर,सिनेसृष्ष्टी, हिरे व्यापार, क्रिकेटचे सामने ई . मध्ये प्रचंड प्रमाणात काळा पैसा वापरला जातो. हा पैसा बँकेत ठेवता येत नाही (लॉकर अपवाद ).त्या पैशाने अधिकृत व्यवहार करता येत नसल्यामुळे सरकारचा कररूपाने मिळणारा महसूल बुडतो. ह्या पैशाच्या विरुद्ध बोलणार्या राजकारण्यांकडेही मोठ्या प्रमाणात काळा पैसा असतो. मोठ्या उद्योगपतींप्रमाणे ह्यांचेही स्विस बँकेत खाते असते, जेथे हा काळा पैसा ठेवला जातो. हा पैसा अनेक मार्गाने परदेशात पाठवला जातो. त्यापैकी हवाला हा एक मार्ग आहे.
हवालाचे व्यवहार कसे केले जातात?
हा एक गुप्त व विश्वासावर चालणारा व्यवहार आहे. समजा भारतातील व्यक्तीने 100 कोटी रोख रुपये ह्या इथल्या हवाला एजंटकडे दिले तर तो त्या रुपयाचे विदेशी चलनात (त्याचे कमिशन वजा करून ) डॉलर किंवा पौंडात रूपांतर करतो व परदेशात इच्छित स्थळी पोचवतो. ते पैसे स्विस बँकेत त्या विदेशी चलनात ठेवले जातात. संपूर्ण व्यवहारात प्रत्यक्षात कुठेही भारतीय चलन (रुपया) देशाबाहेर जात नाही. म्हणजे 100 कोटी रुपये आपल्या देशातच राहतात फक्त काळ्या पैशाचे हस्तांतरण होते.
स्वीस बँकेत ठेवलेल्या पैशाचा उपयोग परदेशात पर्यटन, हॉटेल खर्च, महागड्या खरेदी , बेटिंग,मॅच फिक्सिंग ई. साठी वापरला जातो. काही पैसा रितसर मार्गाने पांढरा होऊन शेअर मार्केट,जमीन खरेदी, वायदे बाजार ई.साठी वापरला जातो. खरोखरच उद्या स्विस बँकेतील पैसा भारतात पांढरा बनून आला तर काय होईल?
आपल्या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. शीर्षकात म्हटल्या प्रमाणे आपल्या देशातील एकही रुपया बाहेर गेलेला नाही . स्विस बँकेतून मिळणार पैसा हा विदेशी चलनात असणार.त्यामुळे विदेशी चलनाचे रुपयात रूपांतर करण्यासाठी बाजारातला पैसा वापरावा लागेल. ती अशक्य कोटीतील गोष्ट आहे. परकीय गंगाजळी भरमसाठ फुगल्यामुळे रुपया व डॉलर/पौंड ह्याच्या विनिमय दरावर परिणाम होईल. रुपया मजबूत झाल्यामुळे निर्यात परडवणार नाही. परदेशी गुंतवणूक होणार नाही. म्हणजे धरलं तर चावतंय व सोडलं तर पळतंय अशी गत होईल.
खरं तर हा पैसा स्विस बँकेत असल्यामुळे फार काही तोटा होत नाही, परंतु देशात तो काळ्या स्वरूपात तयार होतो व वावरतोय ह्यापासून आपल्या अर्थव्यवस्तेला खरा धोका आहे. सरकारने आपली शक्ती इथे वापरली पाहिजे, ते आपल्या हातात आहे व शक्य आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपण ह्याला नक्कीच रोखू शकतो.
लेख बराच विस्कळीत झाला ह्याची जाणीव असल्यामुळे काळा पैसा पांढरा कसा होतो व हवाला विषयी विस्तृतपणे पुढे कधीतरी.
वर्गीकरण
वाचने
43073
वाचनखूण
प्रतिक्रिया
188
In reply to फाउल फाउल फाउल by संदीप डांगे
माई मोड ऑन
मुळ लेखा पेक्शा ....
कर्जरोख्यांवर सहा टक्केच
In reply to कर्जरोख्यांवर सहा टक्केच by कंजूस
बाहेर म्हणजे कुठे ?
In reply to बाहेर म्हणजे कुठे ? by पगला गजोधर
त्यांना बाहेर म्हणजे इतरत्र
In reply to त्यांना बाहेर म्हणजे इतरत्र by संदीप डांगे
देशातच इतरत्र.
In reply to कर्जरोख्यांवर सहा टक्केच by कंजूस
कर्जरोख्यांवर सहा टक्केच
कर्जरोख्यांवर सहा टक्केच व्याज देते सरकार.बाहेर अधिक व्याज मिळते तरीही नवीन लॅाट विक्रीस काढल्यावर धडाधड विक्री का होते हा प्रश्न कुणाला पडला नाही का?तुम्हाला बाहेर म्हणजे नक्की कोठे म्हणायचे आहे ? सद्या भारतातले कर्जरोख्यांचे व व्याजाचे दर विकसित देशांपेक्षा अनेक पटींनी जास्त आहेत. १. कालचे युएस ट्रेझरी बॉड्सचे दर १ महिन्यासाठी ०.२३% ते ३० वर्षांसाठी २.२३% टक्के इतके कमी होते. २. स्विस नॅशनल बँकेचा सद्याचा वार्षीक व्याजदर -०.७५% आहे म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट ठेवायचे तर ग्राहकाला बँकेला दरवर्षी ०.७५% च्या दराने पैसे मोजावे लागतात. दर उणे आहे, टंकनचूक नाही. वेळोवेळी Standard & Poor's, Moody's व Fitch यांनी देशाला दिलेल्या रेटिंग्जची ची माध्यमांत चर्चा केली जाते हे पाहिले असेलच. या संस्थांच्या रेटिंगवर देशाची पत ठरते व त्या देशांच्या रोख्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात उचलले जाईल की नाही आणि त्याकरिता काय व्याजदर द्यावा लागेल हे ठरते. पूर्वानुभवामुळे (करारात ठरलेल्या व्याजासह, ठरलेल्या वेळी पैसे परत करणे); सद्य भक्कम परकीय चलन गंगाजळी, आणि देशाच्या चांगल्या आर्थिक स्थितीमुळे भारत सरकारच्या रोख्यांची स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली प्रत आहे. अर्थात त्यांना चांगली मागणी आहे. भारताची आर्थिक स्थिती सुधारू लागल्यावर १९९० व २००० च्या दशकांत भारताने कमी व्याजाचे नविन कर्जरोखे विकून आलेल्या पैशाने अधिक व्याजाची जुनी कर्जे फेडल्याचे वाचले असेलच.In reply to कर्जरोख्यांवर सहा टक्केच by कंजूस
रोख्यामध्ये पैसे घालणारे लोक
काळा पैसा, पांढरा पैसा...
In reply to काळा पैसा, पांढरा पैसा... by डॉ सुहास म्हात्रे
सुयोग्य आणि सुस्पष्ट
हा लेख त्यावरील आलेल्या
आता मिपावाले आपलेच आहेत म्हणुन.....
In reply to आता मिपावाले आपलेच आहेत म्हणुन..... by इरसाल
वरती सांगीतल्या प्रमाणे तुमचा पैसा
In reply to वरती सांगीतल्या प्रमाणे तुमचा पैसा by नाखु
नाखुसायेब
In reply to नाखुसायेब by इरसाल
मेल करा! आफ्रिकेत अडकलेल्या
काळा पैसा आणि पांढरा पैसा .
In reply to काळा पैसा आणि पांढरा पैसा . by मृगनयना
तुमच्या उदाहरणात थोडासा गोंधळ
In reply to तुमच्या उदाहरणात थोडासा गोंधळ by संदीप डांगे
मी सांगितलेल्या उदाहरणात फक्त ABC चा रोल CLEAR केलाय.
In reply to मी सांगितलेल्या उदाहरणात फक्त ABC चा रोल CLEAR केलाय. by मृगनयना
हो, असे बरेच प्रकार आहेत, हे
चूक ४
In reply to चूक ४ by बोका-ए-आझम
@बोका-ए-आझम
In reply to @बोका-ए-आझम by मार्मिक गोडसे
रिव्हर्स हवाला
In reply to रिव्हर्स हवाला by बोका-ए-आझम
+1, मॉरिशस कंपन्यांबद्दलही
In reply to रिव्हर्स हवाला by बोका-ए-आझम
रिव्हर्स हवाला कसा पुर्ण होतो
In reply to रिव्हर्स हवाला कसा पुर्ण होतो by मार्मिक गोडसे
मुळात भारतातील पैसा बेकायदेशीर पद्धतीने बाहेर काढणं
In reply to मुळात भारतातील पैसा बेकायदेशीर पद्धतीने बाहेर काढणं by बोका-ए-आझम
फसलेला प्रतिसाद. तुम्हाला
In reply to फसलेला प्रतिसाद. तुम्हाला by मार्मिक गोडसे
ठीक आहे.
In reply to ठीक आहे. by बोका-ए-आझम
हवालाच्या तुम्हीच दिलेल्या
In reply to हवालाच्या तुम्हीच दिलेल्या by मार्मिक गोडसे
माझ्यामते, हवाला ऑपरेटर हे
In reply to हवालाच्या तुम्हीच दिलेल्या by मार्मिक गोडसे
हे वाचा तुमचं शंका निरसन होईल
एक नंबर धागा. खूप माहिती
एक नंबर प्रतिसाद!
एक कन्फ्यूजिंग शंका.
In reply to एक कन्फ्यूजिंग शंका. by आनंदी गोपाळ
तुमचे उत्पन्न १००० रु आहे
In reply to एक कन्फ्यूजिंग शंका. by आनंदी गोपाळ
इन्कम टॅक्स कायद्यातील सेक्शन
भारतिय व्यक्ती/संस्था परदेशात
In reply to भारतिय व्यक्ती/संस्था परदेशात by डॉ सुहास म्हात्रे
हे उदाहरण म्हणजे शस्त्रास्त्र
भारतसरकारचे मिसळपावच्या