खुशबू (भाग २)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
18 Feb 2015 - 4:16 pm

भाग १

घरात अठरा विश्वे दारिद्र्य, आई कॅन्सरने आजारी, त्या धक्क्याने आकस्मिक गेलेले वडील, अश्या हलाखीच्या परिस्थितीत अमर उपाध्याय काय करतो ?
काहीच नाही…… करण्यासारखं फार काही नसतंच त्याच्याकडे… फक्त त्याच्या नेटवर्किंगच्या अभ्यासा… आणी विद्यापीठातल्या नोकरीखेरीज ……
--------------------------------
ऑफिसमधून लवकर निघता आल्यामुळे अमर खुश होता. मेंटली न दमता घरी येण्याचा हा अपवादात्मक दिवस. आज संध्याकाळसाठी काही स्वयंपाकही करायचा नव्हता. रात्रीच्या जेवणासाठी त्यानं दाल-खिचडी सकाळीच करून ठेवलं होती. सकाळी उशीरा कामाला जायचं असल्याच आठवून तिला एक टेक्स्ट मेसेज करावासा वाटला फेसबुकवर. बघतो तर आधीच ऐक मेसेज तिच्याकडून आलेला, आश्चर्य वाटलं त्याला याचं. "आय लव्ह युवर कुकिंग स्किल" असं लिहून दोन स्मायली टाकल्या होत्या. मनात गाणं गुणगुणत ऑफिसचे कपडे बदलून, सोसायटीच्या गच्चीवर बनियन पायजम्यावर अवतरला तो. मस्त चाय करून, पुस्तकाचं कपाट उघडलं. छोटंसं पुस्तक काढलं. ते निघालं मॉर्गन काफ्मानच वायरलेस नेटवर्क सिक्युरिटी ...हम्म म्हणत किंचित हसला,
कारण तिचं आणि आपलं, ते आताआता कुठे ओळख-फ्रेंडशिप वरून पुढच्या स्टेजपर्यंत येतय असं वाटायला लागलेलं होतं.… आत्ता कुठे आपला टिफिन शेअरची फळे दिसू लागली होती.
तेवढ्यात फोन वाजला, पलीकडून प्रश्न, 'निघण्यापूर्वी ती प्रोसेस व्यवस्थित रन केली होती न ?',
'हो सर… ',
'जस्ट चेकिंग अमर',
'नो प्रोब्लेम सर …. '
'बाय टेक केअर'
चरफडत अमरने फोन कट केला, मनाशीच विचार केला, सर्वर जरी थोडाकाळ डाऊन झाला जरी, अस्स काय आकाश कोसळणार आहे ? त्या 'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुपच'
----------------------------------
सार्वजनिक फोन बूथवरून, तो फोन नंबर डायल करून, ५ वेळा रिंग ऐकल्यावर, मीराने फोन कट केला.
पुन्हा ५ सेकंदानी तो फोन नंबर डायल केला, पलीकडून फोन उचलला गेला.

मीरा: हलो, ये टोर्नेडो वाक्कुम क्लिनर हेल्पलाइन है ना, मुझे मॉडेल २१५ की कम्प्लेंट करांनी है जी ;

पलीकडून: व्रोंग नंबर ;

फोन कट; मीरेन फोन क्रेडलवर ठेवला, ती फोनजवळच उभी राहिली; १५ सेकंदांनी फोन खनखनला;

मीरा: आप तैयारी शुरू करो
पलीकडून : क्यूं?
मीरा : काम हो गया है. अभी सेलिब्रेशन जारी है. पहले उसने नहीं कहा था, लेकिन मैने उसे अच्छी तरह समझा दिया. रेडी कर दिया. विडीओ दिखाया, अब वह हजार टका करेगा.
पलीकडून : फेसबुक अकौंट बंद करदो, कोई सबूत पीछे नही छोडना.
----------------------------------

कतार येथील ऐका हॉटेलमधे

भाईजान तैय्यार हो जाव, फायरअप यौर मशिन्स, कुछही दिनोमे आय पी अड्रेस, प्रोक्सी डीटेल्स, और बहुत कुछ हाथ आनेवाला है.

हात आये तब बोलना, फिलहाल तो मै रानीमुकर्जी की फिल्मे डाऊनलोड माररिया हु,
और हां, जबीभाईसे भी बात कर लेना …

------------------------------------
आज इंटरविव्हला आले, तेव्हा वाटलं नव्हत, सगळ एवढ्या झटदिशी होईल म्हणून.
जी टी वीच्या ऑफिसमधून बाहेर पडताना खुशबूच्या मनात आलं. सकाळी मगरपट्टातील काचेच्या बिल्डींग्स पाहून, थोडस दडपण वाटलं खर. आणी त्यात रिसेपशन मधे आल्यावर आजूबाजूला पाहिल्यावर तर, उगीचच मनात आपले कपडे, आपली चप्पल, आपली पर्स सगळच कस दळभद्री असल्याची जाणीव करून देत होत्या. थोड्यावेळाने उर्दू विभागाचे संपादक सिद्दिकी आले, मला म्हणाले , काल वाझ तुझ्याविषयी बोलला होता.
चल तुला काही मी यु ट्यूब वर दाखवतो, तुला मी त्याच्यावर काही प्रश्न विचारेन. त्यांनी मला पीटीवी वरच्या ऐका शरिया विषयक चर्चेची २७ मिनिटांची फिल्म दाखवली, आणी त्यावर त्यांनी मला बरेच प्रश्न विचारले, खर तर मला वाटत, त्यांना चर्चे पेक्षा, मी ती माहिती कशी आणि किती ग्रास्प करते, इंटरप्रेट करते, ह्यातच रस होता. जाताना म्हटले कि पगार तसा ओके-ओके च असेन, काम मात्र भरपूर… मुलगी आहेस पण कामाला रात्र अपरात्र अस काहीच लिमिट नाही …
माझ त्यांना एकच उत्तर होत … उद्यापासून जॉईन केलं तर चालेल का सर ?
सकाळी भयावह वाटणाऱ्या त्याच काचेच्या बिल्डींगमधून बाहेर पडताना हातात ऑफर-लेटर होत.

-----------------------------------

'सेंटर फॉर साउथ ऐशियन इकोनोमीक स्टडी ग्रुप'. इमारतीतील त्या विशेष रूममध्ये मिटिंग चालू होती.
सुरेश मेनन: यु नो अमरने इतक्या छानपने मशीन सेटअप केली ना…
प्रीतम: गुड, सुरेश, कीप इन माइंड, ही इज जस्ट सपोर्ट, नॉट कोर मेंबर ऑफ धीस टास्कफोर्स.
वाझसर मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता, यु हाव गुड कॅन्डीडेट अज फुट सोल्जर, हु इज ही ?
वाझ: आक्चुली नॉट ही बट शी, हर नेम इस खुशबू ….

वाङ्मयकथाविरंगुळा

प्रतिक्रिया

राजाभाउ's picture

18 Feb 2015 - 5:22 pm | राजाभाउ

हम्म !!!
हळु हळु पात्रांची ओळख होता आहे.

बहुगुणी's picture

18 Feb 2015 - 5:38 pm | बहुगुणी

दोन्ही भाग वाचले, प्रत्येक भागाची लांबी योग्य वाटली, उत्कंठावर्धक.

जेपी's picture

18 Feb 2015 - 5:39 pm | जेपी

वाचतय

अमित खोजे's picture

19 Feb 2015 - 1:08 am | अमित खोजे

आता थोडी थोडी लिंक लागत चाललेली आहे. छान आहे. पुढचा भाग येऊ द्या!

संपत's picture

19 Feb 2015 - 4:38 am | संपत

उत्कंठावर्धक

ये टोर्नेडो वाक्कुम क्लिनर हेल्पलाइन है ना, मुझे मॉडेल २१५ की कम्प्लेंट करांनी है जी

breaking bad आठवले