प्रमोशन

vikramaditya's picture
vikramaditya in जनातलं, मनातलं
3 Sep 2014 - 10:19 pm

आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता.

समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!"

त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच. "मग माझा डायमंड नेकलेस नक्की ना?" "ऑफ कोर्स" आनंद उत्तरला." "मी आयुषला कळवतो, ओके?" लगेच त्याने पांचगणीला शिकत असलेल्या त्यांच्या मुलाला फोन लावला. "आयुष, युर फादर इज अ बिग मॅन नाउ". आनंदने गुड न्युज आयुषला सांगितली. "देन डॅड, धीस टाईम डिस्नेलॅंड, राईट?" "ओह, येस" असा पिता पुत्राचा संवाद झाला. फोन ठेवताच त्याने समोरच्या मिररमध्ये स्वत:ला न्याहाळले. जेमतेम चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेला आनंद आज एका प्रथितयश मल्टीनॅशनल कंपनीचा इंडिया कंट्री हेड झाला होता. बरोबरच्या सगळ्यांना मागे टाकुन आज तो एका पाठोपाठ प्रगतीच्या पाय-या चढत होता. त्याने परत पुजाला फोन लावला." पुजा, बॉब इज कमिंग टुमॉरो. उद्या डिनरला भेटु त्याला". "येस, डिअर" पुजा म्हणाली. "ओके, मी नंतर फोन करते रे, आता माझ्या सर्कल मधील सगळ्यांना पार्टीचे इन्विटेशन द्यायचेय ना".

तोपर्यंत आनंदला अभिनंदनपर इमेल, कॉल्स येवु लागले. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे कॉल रिसिव्ह करताना त्याला मनातुन प्रचंड आनंद होत होता. थोड्या वेळाने लंच झाल्यावर त्याला अचानक आठवण झाली. त्याने लगेच फोन लावला. "बाबा, आनंद बोलतोय. बाबा, मी माझ्या कंपनीचा इंडिया कंट्री हेड झालो बर का" , "अरे वा! अभिनंदन बेटा. उद्याच कुलदेवाकडे अभिषेक करु आम्ही. तुझी अशीच प्रगती होवो, या उप्पर आता या वयात मला आणि तुझ्या आईला आणखी काय पाहीजे?" "बाबा, तुम्हा दोघांना किती वेळा मी आणि पुजाने दिल्लीला बोलावले, पण तुम्ही येतच नाही." "अरे आनंदा, तुला तर माहितच आहे बाळा कि ज्या शाळेतुन मी प्रिंसिपल म्हणुन रिटायर झालो तिथेच मी गरीब मुलांना शिकवतो, शिवाय तुझ्या आईबरोबर गावातील समाजकार्य, ह्यातुन वेळ मिळत नाही रे. आता आयुषच्या सुटीत तुम्हीच या गावी." ही चर्चा ह्या पुर्वी पण झाली असल्याने आनंदने तो विषय आवरता घेतला.

आपल्या आई वडीलांच्या साधेपणाची कधी त्याला चीड येई तर कधी हेवा वाटे. तीन वर्षापुर्वी गावी गेला असताना त्याने असंख्य लोकांना त्याच्या आई वडीलांच्या पाया पडताना बघीतले होते. या उलट, त्याच्या कार्यक्षेत्रात कोण त्याच्यावर कधी वार करेल आणि त्याच्या करिअरचे नुकसान करेल ह्याची खात्री नसे. रात्र रात्र जागुन तो वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीवर विचार करत बसे. आपले महत्व वाढवणे, प्रतिस्पर्ध्यांचे डाव हाणुन पाडणे ह्याचा विचार करुन त्याचे डोके ठणके. शेवटी दोन-तीन पेग मारुन मगच तो बेडरूममध्ये जात असे. तो संपूर्ण दिवस असाच गेला. संध्याकाळी ऑफीसच्या सहका-यांनी आनंदला पार्टी दिली. तो मध्यरात्री घरी पोहोचला, पुजाला यायला अजुन वेळ होता, ती तीच्या मैत्रिणींबरोबर एका कॉफी शॉप्मध्ये होती. आनंद इतका थकला होता की तो ताबडतोब झोपी गेला.

दुस-या दिवशी भल्या पहाटे त्याने एयरपोर्टवरुन बॉबला पिक अप केले आणि त्याच्या हॉटेलवर घेवुन गेला. बॉब इथे असे पर्यंत त्याचे पूर्ण लक्ष आपल्याकडेच असेल ह्याची खबरदारी त्याला घ्यावीच लागणार होती. कोण कधी काय डाव खेळेल ह्याची त्याला शाश्वती नव्हती. तो पूर्ण दिवस बॉबला वेगवेगळी प्रेसेंटेशन्स देण्यात गेला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे तो घरी पोहोचला. पुजा तयारच होती. त्याने कंपनीच्या ड्रायव्हरला जायला सांगीतले. आणि स्वत: गाडी चालवत पुजासोबत बॉबच्या हॉटेलला पोहोचला. डिनरवर गप्पा छान रंगल्या. बॉबवर आपले जास्तीतजास्त चांगले इंप्रेशन पडावे ह्या साठी आनंद नुसता धडपडत होता. त्या मानाने पुजा मात्र सफ़ाईदार ईंग्रजीत बॉबशी सहज संवाद करत होती आणि अतिशय स्मार्ट वाटत होती. अशी स्मार्ट पत्नी आपल्याला मिळाली ह्याचा त्याला फार अभिमान वाटला.

एका ठरावीक वेळानंतर बॉबने घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला. तोच इशारा समजुन आनंद आणि पुजाने आवरते घेतले. नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबने दार उघडले आणि तो तिथेच थांबला. त्याच्याशेजारुन पुजा आत शिरली. आनंदने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट विश केले आणि म्हणाला "बॉब, सी यु इन द ऑफिस टुमॉरो. "पुजा, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग." असे सांगुन आनंद निघाला. लिफ़्ट खाली आली आणि आनंद पार्किंग लॉट कडे चालु लागला. सगळे मनासारखे झाल्याने तो खुशीत शीळ वाजवत होता. आता लवकरच न्युयॉर्क पोस्टिंग साठी बॉबशी बोलायचे असे स्वत:ला बजावत त्याने कार स्टार्ट केली......

कथालेख

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

3 Sep 2014 - 10:24 pm | किसन शिंदे

अत्यंत हलकटपणा आहे हा!

मायला ह्या आनंदच्या..

टिपिकल पूर्वग्रहदूषित कथा.

अनुप ढेरे's picture

4 Sep 2014 - 10:54 am | अनुप ढेरे

+१

टवाळ कार्टा's picture

4 Sep 2014 - 12:40 pm | टवाळ कार्टा

+११११

कवितानागेश's picture

3 Sep 2014 - 10:57 pm | कवितानागेश

अरे बाप्रे!

असलं प्रमोशन नको रे बाप्पा !!!

थोडे पचायला कठीण, पण असे घडू शकतच नाही हे मान्य करावयाच मी तयार नाही.
कथेची उत्तम मांडणी, व कथा देखील. ही कथा अजून पुढे जाऊ शकते, ती या सर्वावर कशी प्रतिसाद देते इत्यादी इत्यादी.

नेत्रेश's picture

3 Sep 2014 - 11:55 pm | नेत्रेश

अगदी याच कथेवर एक नाटक १५ वर्षांपुर्वी पाहीले होते. बहुतेक क्षमा राज चे 'वर्तुळ' असावे.
त्यात फक्त बॉस हा कुणी गुज्जु होता.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 Sep 2014 - 12:38 am | विश्वनाथ मेहेंदळे

तुषार दळवी आणि सोनाली कुलकर्णी होते। चाहुल की काहीसे छोटेसे नाव होते. मग काही वर्षांनी सुबोध भावे चे पण एक आले होते.

सगळ्या क्राइम्समागे दोनच गोष्टी असतात असा पोलिसांचा दावा आहे, बाई आणि पैसा!
पूजा ही त्याच लायकीची आणि आनंदही तसलाच.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Sep 2014 - 12:11 am | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रत्य्क्षात घडण्याची शक्यता कमी.(तशी घडू शकते पण अमेरिकेला पोस्टिंग पाहिजे व कंट्रि हेडसाठी शक्यता कमी वाटते)
वैयक्तिक यश,करीयर करत असताना कुठल्या थराला जायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे.
दुसर्या दिवशी सकाळी बॉबने दरवाजा उघडल्यावर समोर पोलिस दिसले की मग बॉब जेलमध्ये. होय ना?

संजय क्षीरसागर's picture

4 Sep 2014 - 12:18 am | संजय क्षीरसागर

पूजाच एवढ्या तयारीची म्हटल्यावर ती आनंदला टांग मारुन, बॉब बरोबर परदेशी जायला कमी करणार नाही.

प्रभाकर पेठकर's picture

4 Sep 2014 - 2:32 am | प्रभाकर पेठकर

अरे आनंदा, तुला तर माहितच आहे बाळा कि ज्या शाळेतुन मी प्रिंसिपल म्हणुन रिटायर झालो तिथेच मी गरीब मुलांना शिकवतो, शिवाय तुझ्या आईबरोबर गावातील समाजकार्य, ह्यातुन वेळ मिळत नाही रे.

अरेरे! गरीब मुलांना शिक्षण आणि गावातील समाजकार्याच्या धावपळीत, बिचारे बाबा, आनंदवर चांगले संस्कार करायचेच विसरून गेले.

किसन शिंदे's picture

4 Sep 2014 - 8:31 am | किसन शिंदे

अरेरे! गरीब मुलांना शिक्षण आणि गावातील समाजकार्याच्या धावपळीत, बिचारे बाबा, आनंदवर चांगले संस्कार करायचेच विसरून गेले.

खिक्क!

हे पेठकर काका नको तेवढंच बरोबर वाचतात. :D

साती's picture

4 Sep 2014 - 10:09 am | साती

दिव्याखाली अंधार की काय म्हणतात तसं!

इरसाल's picture

4 Sep 2014 - 11:22 am | इरसाल

ते अंधारावरती दिवा असावं .

चिगो's picture

16 Dec 2014 - 5:06 pm | चिगो

अरेरे! गरीब मुलांना शिक्षण आणि गावातील समाजकार्याच्या धावपळीत, बिचारे बाबा, आनंदवर चांगले संस्कार करायचेच विसरून गेले.

ठ्ठॉ ऽऽक.. ;-) जबराच हाणलाय, काका..

प्रसाद गोडबोले's picture

16 Dec 2014 - 5:09 pm | प्रसाद गोडबोले

ते बहुतेक त्यांच्या प्रमोशनसाठीच्या 'धडपडीत' असावेत ;)

याच्या उलट कथानक असलेला एक सिनेमा येऊन गेलाय मध्यंतरी. बाॅसची बायको त्याच्या हाताखालच्या कर्मचा-याला असं वागायला नकार दिल्याबद्दल अडकवते, अशी काहीशी कथा होती.

किसन शिंदे's picture

4 Sep 2014 - 8:30 am | किसन शिंदे

ऐतराज सिनेमा होता तो. त्यात बॉस म्हातारा अमरीश पुरी होता आणि त्याची बायको प्रियांका चोप्रा होती अन् तिच्या हाताखाली काम करणारा कामगार अक्की होता. सेक्श्युअल हॅरॅसमेंटची केस दाखल करते त्याच्यावर.

गाणी एक नंबर होती ब्वॉ.

'डिस्क्लोजर' हा मायकल ड्ग्लस आणि डेमी मूरचा १९९४ चा चित्रपट खूपच जबरदस्त होता. त्यावरून चोरलेला 'ऐतराज' जमला नव्हता पण गाणी बरी होती. "वो तसव्वुर का आलम, वो दिल-ए-आशिकी", "गेला गेला गेला दिल गेला गेला...", "तलातुम तलातुम" अशी छान गाणी होती. "वो तसव्वूर का आलम.." मध्ये करीना कपूर काय सुरेख दिसली होती. डोळ्याचं पारणं फेडलं तिने. वा वा...

'डिस्क्लोजर' हा मायकल ड्ग्लस आणि डेमी मूरचा १९९४ चा चित्रपट खूपच जबरदस्त होता. त्यावरून चोरलेला 'ऐतराज' जमला नव्हता पण गाणी बरी होती.
अगदी ! डेमी ने अगदी जबरदस्त काम केले आहे ! ;)
http://veehd.com/video/3974301_DISCLOSURE-1994-Michael-Douglas-Demi-Moore

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.com

अमित मुंबईचा's picture

10 Sep 2014 - 2:29 pm | अमित मुंबईचा

डेमी मूरचाच इंडिसेण्ट प्रपोज़ल याच धाटणीचा होता, मायकल डग्लस सुद्धा आहे पण नकारात्मक भूमिकेत.

किसन शिंदे's picture

4 Sep 2014 - 12:24 pm | किसन शिंदे

"वो तसव्वूर का आलम.." मध्ये करीना कपूर काय सुरेख दिसली होती. डोळ्याचं पारणं फेडलं तिने. वा वा...

वरचा प्रतिसाद लिहितानाही हे गाणं अन् ती करीना कपूरच डोळ्यासमोर होती राव. :-)

समीरसूर's picture

4 Sep 2014 - 1:35 pm | समीरसूर

तिचा गाण्यातला तो नखरा, खांदे हलकेच हलवत सरळ खाली जाऊन पुन्हा वर येणे, चेहर्‍यावरचे खट्याळ हसू...वा वा...

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 1:45 pm | प्यारे१

हम्म्म.
चित्रपटांचं भारतीयकरण करताना काही गोष्टी अकारण सकारण येतात/ निसटतात त्याचं उत्तम उदाहरण.

काही 'विशिष्ट सीन्स' ऐवजी हिंदी चित्रपटांमध्ये कवायत दृश्य करत गाणी गायली जातात. प्रेम हे दोघांचं वैयक्तिक खटलं असलं तरी भारतानं क्रिकेट मॅच जिंकल्यावर जसं अनोळखी लोक पण एकमेकांना मिठ्या मारतात तसं आजूबाजूला उपस्थित यच्चयावत जनता ह्या घटनेला (पक्षी नायक नायिकेच्या प्रेमाला) आपलंसं करत आपला कार्यभाग उरकून घेतात.
आम्ही त्या मॉबला वडापाववाला मॉब म्हणतो. वडा पाव देऊन आणलेला मॉब. (कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर.... ह्या ह्या ह्या)

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 1:55 pm | बॅटमॅन

भारतानं क्रिकेट मॅच जिंकल्यावर जसं अनोळखी लोक पण एकमेकांना मिठ्या मारतात तसं आजूबाजूला उपस्थित यच्चयावत जनता ह्या घटनेला (पक्षी नायक नायिकेच्या प्रेमाला) आपलंसं करत आपला कार्यभाग उरकून घेतात.

=))

बाकी, "कार्यभाग उरकून घेतात" हे वाचल्यावर बहिर्दिशेस जातात असे दृश्य डॉळ्यांसमोर तरळून गेले =))

चेहर्‍यावर फारसे भाव नसतात हो. यांत्रिकपणं कार्यक्रम सुरु असतात.

नायक नायिका प्रणयात धुंद आणि मागच्यांचं एक-दोन-तीन-चार-एक. स्टेप चुकली तर मास्तर मारेल असा थाट. कार्यभागच. ;)

चेहर्‍यावर फारसे भाव नसतात हो. यांत्रिकपणं कार्यक्रम सुरु असतात.

आणि सोबत प्रणयधुंद वैग्रे पाहून काही भलत्याच रोचक शक्यता तरळून गेल्या. ;) येका हालिवुड पिच्चरात (नाव इसारलो :( )
असा सीन पाहिल्याचे आठवते. कार्यभागासमवेतच हाय हॅलो इ. नेहमीची चर्चाही सुरू असते.

हालिवुड पिच्चरात (नाव इसारलो)

खरंच विसरलाय की धोरणीपणा? मी सांगू का नाव?

आयच्यान् सांगतो खरंच विसरलोय. धोरणीपणा कसला ***चा? तुम्हांला माहिती असेल तर सांगा, तेवढाच जुन्या आठवणींना पुनरेकवार उजाळा मिळेल. ;)

असंका's picture

4 Sep 2014 - 4:38 pm | असंका

अ. पा. भाग ६

(अर्थात हे माझ्या माहितीतलं उदाहरण झालं. तुमची आणि माझी माहिती जुळत नसेल, तर काय सांगता येत नाही. एक सीन दोन पिक्चरमध्ये असणं ही शक्य आहे.)

बरोबर आहे. "मला खेळ खेळायला आवडतात भाग २" मध्येही असा शीन आहे.

टवाळ कार्टा's picture

4 Sep 2014 - 5:39 pm | टवाळ कार्टा

आयला "मस्तच" आहे ;)
ठ्यांकू

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 5:11 pm | बॅटमॅन

अकौंटंट आणि आदूबाळः माहितीकरिता धन्यवाद. बघितल्या जाईल. ;)

म्हणजे आपल्या माहितीत अजून तिसराच पिच्चर आहे होय? आठवला की सांगा नाव त्याचं. आम्हीपण माहितीकरता धन्यवाद देऊ न विसरता!! ;-)

टवाळ कार्टा's picture

4 Sep 2014 - 5:40 pm | टवाळ कार्टा

च्यायला ह्यासाठी तरी पुर्शांचा वेगळा विभाग हवा"च"

प्यारे१'s picture

4 Sep 2014 - 5:57 pm | प्यारे१

प्रणयात धुंद म्हणजे हिंदी चित्रपटात झेपेल एवढंच हो.

तुम्ही लई 'पुढं' गेलासा की पोट्टेहो!

नै ओ माहिती. आठवला तर सांगू हेवेसांनल. शेवटी ज्ञान दिल्याने वाढते ;)

प्रमोशनचा फोन गेल्याबरोबर बायको अन मुलाची रिअ‍ॅक्शन लय भारी.

म्हणजे तुम्हाला ऐश करायचीये ना? मग माझ्या एकट्याच्या जीवावर जमणार नाही, तुम्ही पण कामाला लागा!

स्पंदना's picture

4 Sep 2014 - 7:16 am | स्पंदना

वाल्याकोळी आवडल.
बाकि पूजा कामाला लागली पण मुलगा कसा हातभार लावतोय काही कळल नाही.
बाकी प्रपे काकांचा प्रतिसाद आवडला.

संजय क्षीरसागर's picture

4 Sep 2014 - 10:11 am | संजय क्षीरसागर

त्याला जेव्हा कळेल तेव्हा तो एकतर बापसे सवाई वाल्या होईल किंवा मग डायरेक्ट संन्यासी!

साती's picture

4 Sep 2014 - 10:11 am | साती

काही करा पण लहान मुलांना गोष्टीतही '़कामा'ला लावू नका.

स्पंदना's picture

4 Sep 2014 - 10:13 am | स्पंदना

हो बाई!!
चुकलच लिहायला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

4 Sep 2014 - 8:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

रुल ऑफ अल्केमी=द ईक्वल एक्स्चेंज

बाकी त्याचा पोरगा मोठा झाल्यावर दोघांना विकुन खाणार ह्यात शंका नाही.

विटेकर's picture

4 Sep 2014 - 9:22 am | विटेकर

कदाचित अश्या गोष्टी घडत असतील / कदाचित घडत नसतील ही !
पण माझा एक विश्वास आहे की, चारित्र्य ही आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. त्याबरोबर अन्य गोष्टी असायलाच हव्यात, जश्या की , क्षमता , कार्यकुशलता, संघ भावनेने काम करण्याची वृत्ती, परिश्रमाची तयारी, वक्तशीरपणा, इ. इ. पण या सार्‍या बरोबर जर चारित्र्य नसेल तर मनुष्य यशस्वी होत नाही. असा माझा २७ वर्षांचा अनुभव आहे !
फार कशाला , आणखी काही मजेशीर निरिक्षणं सांगतो,
१. आई- बापाशी न पटणार्‍या माणसाचे करिअर देखील फार चांगले असत नाही ! अर्थात अपवाद असतीलच.
२.हाताखालच्या माणसांशी न पटणारे "हरि साण्डु" आयुष्यात कधीतरी सॉलीड आपटी खातात. लोकांचे शिव्या-शाप आणि आशीर्वाद करियर मध्ये लागतातच ! याला अपवाद माझ्या पाहण्यात नाही.
३. चांगला माणूसच चांगला बॉस बनू शकतो.
याठिकाणी अनेक होतकरु तरुण - तरूणी ही कथा वाचत असतील , त्यांना चुकीचा संदेश जाऊ नये असे वाटले म्हणून जरा विस्ताराने आणि ठासून लिहिले.

बाकी कथा म्हणून उत्तम आहेच !

समीरसूर's picture

4 Sep 2014 - 1:27 pm | समीरसूर

१००% सहमत!

पेठकर काका आणी संक्षीसरांचे प्रतिसाद आवडले.बाकी श्टोरी बद्दल हम्म.....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

4 Sep 2014 - 10:08 am | माईसाहेब कुरसूंदीकर

लोकांचे शिव्या-शाप आणि आशीर्वाद करियर मध्ये लागतातच

अगदी योग्य बोललात. भारतापुरतेच उदाहरण घेऊ. विजय मल्ल्या,सहारा ग्रुप हे परवापर्‍यंत हवेत उडत होते.श्रीमंती थाटमाट,मोठमोठ्या गप्पा.बोलताना जाणवणारा एक दर्प. शेवटी कोसळलेच.
याउलट तुमच्या त्या विप्रो,इन्फोसिसची माणसे. साधी राहणी,सरळ बोलणे व स्वच्छ चारित्र्य.यशाचा लेख चढताच आहे.

सुबोध खरे's picture

4 Sep 2014 - 10:09 am | सुबोध खरे

विटेकर साहेब
आपली तिन्ही निरीक्षणे पटली नाहीत
आई बापाला गरीब म्हणून सोडून दिलेला एक तरुण उच्च पदावर सरकारी नोकरीत यशस्वी आहे. आणी अशी बरीच उदाहरणे आजूबाजूला दिसतात. बायकोच्या सांगण्यावरून आई बापांशी फटकून वागणारे कितीतरी यशस्वी लोक आपल्या आजू बाजूला दिसतात.
हाताखालच्या माणसाना गुलामासारखे वागवणारे कित्येक यशस्वी उद्योगपती दिसतात. एका अशा वरीष्ठाशी न पटल्याने मी नोकरी सोडून दिली. त्याचे आजही उत्तम चालले आहे.
माणूस चांगला असणे आणी चांगला बॉस बनणे या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. काहीवेळा धंद्यात भरभराटी साठी दुद्धाचार्याना किंवा निकामी माणसाना निर्दयतेने तोडून टाकावे लागते. चांगला माणूस असे निर्णय घ्यायला वेळ लावतो आणी स्वतःचे नुकसान करुन घेतो.
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या तिन्ही गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात.
जाता जाता --उच्च पदस्थ सरकारी नोकर (पन्नाशीचा) अमेरिकेत वकिलातीत वर्णी लागावी म्हणून आपली बायको दिल्लीतील आपल्या उच्च्पदस्थाकडे पाठवीत असे. शेवटी जेंव्हा परदेशी जाणार्या अधिकाऱ्यांची यादी आली तेंव्हा त्याचे नाव नव्हते म्हणून त्याने डायरेक्टर जनरल कडे तक्रार केली. DG ने हा तुमचा आपसातील राजीखुशीचा मामला आहे म्हणून हात झटकले. पुढे काय झाले ते कळले नाही.

संजय क्षीरसागर's picture

4 Sep 2014 - 10:16 am | संजय क्षीरसागर

माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात.

माझे गाण्याचे मास्तर म्हणतात : `आपलं इमान आपल्याकडे, दुसर्‍यानं कसं वागवं तो त्याचा प्रश्न' !

माझे गाण्याचे मास्तर म्हणतात

सर ऐकवा कि कधितरी, होउन जौदे मैफिल :)

संजय क्षीरसागर's picture

4 Sep 2014 - 11:58 am | संजय क्षीरसागर

कधी मूड आला तर एखादी ऑडिओ क्लिप खफवर अपलोड करीन. पण ऑडिओ अपलोडींग क्लिष्टयं असा अनुभव आहे.

शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या तिन्ही गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात.
डॉकशी पूर्णपणे सहमत !

जाता जाता :- थोड्यावेळा पूर्वीच "मकडी" चित्रपट फेम श्वेता बसूला सेक्स रॅकेटमध्ये अटक झाल्याची बातमी वाचली ! तिने सांगितले की परिस्थीतीमुळे तिला वेश्याव्यवसाय करावा लागत होता ! च्यामारी... परिस्थीतीमुळे हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय ? हल्ली काय घडेल तेच सांगता येत नाही आणि समजत सुद्धा नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way
{We are now in a post-crisis period}:- NASDAQ.com

समीरसूर's picture

4 Sep 2014 - 1:29 pm | समीरसूर

आज टाईम्समध्ये ही बातमी वाचली. नाव नव्हते त्यात पण मी अंदाज बांधला की ती मकडीमधली मुलगी असू शकेल आणि तो खरा निघाला....

विटेकर's picture

4 Sep 2014 - 10:39 am | विटेकर

तुमचे निरिक्षण कदाचित खरेही असेल.
मी माझा अनुभव मांडला. एकाच विदातून दोन परस्पर भिन्न गोष्टी देखील सिद्ध करता येऊ शकतात. कदाचित यशाची व्याख्या भिन्न असू शकेल.
Saw a thought, reap in action
Saw an action, reap a habit
Saw a habit, reap a character,
Saw a character, reap a destiny.
- Samuel Smiles
स्टिफन कोवे ( सात सवयी) ने गेल्या शतकांतील यशस्वी लोकांच्या चरित्राचा अभ्यास करुन यशस्वी होण्यात चारित्र्य हे व्यक्तिमत्वापेक्षा महत्वाचे असते असा सिद्धांत मांडला आहे.

विटेकर's picture

8 Sep 2014 - 2:29 pm | विटेकर

saw ऐवजी sow असे वाचावे. मिपाच्या जागरुक वाचकाने ही चूक व्यनि करुन निदर्शनास आणून दिली. धन्यवाद !
( पण ही मिपाचे पद्धत नव्हे ! मिपा बदलते आहे काय असा एकोळीचा धागा काढावा असा विचार करत आहे )
तसेही या धाग्याचे वारेमाप पिक आले आहे ,.... !

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2014 - 3:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. शंभर नंबरी सत्य...

हे वाक्यावरचा प्रतिसाद इतका मोठा झाला की येथे अवांतर करणाऐवजी ते विचार मिपावरच्या वेगळ्या धाग्यात येथे लिहून ठेवले आहेत.

साती's picture

4 Sep 2014 - 10:16 am | साती

गोष्टं पटली नाही.
इतक्याश्या प्रलोभनाला आय टी मधली अमेरिकेतील बॉस लोक बळी पडत असतील असे वाटत नाही.
राजरोस बायका/पुरुष/मुले पैसे फेकून सर्वत्र आणि भारतातही उपभोगायला मिळत असताना कुणी अमेरिकी बॉस अशी
'निळू फुले' गिरी करणार नाही.

मृत्युन्जय's picture

4 Sep 2014 - 10:32 am | मृत्युन्जय

Indecent Proposal आठवला. शक्यता नाकारता येत नाही.

अवांतरः लेखकाला नाऊमेद करवत नाही. पण एक कथा म्हणुन खुप सामान्य वाटली. लेखन वाचुन असे वाटते (कारण कही नाही. पण वाटले) की लेखक अजुन चांगले लिखाण करु शकतो. त्यामुळे पुलेशु.

vikramaditya's picture

4 Sep 2014 - 10:36 am | vikramaditya

The story is not related to "IT field" - Country head / US posting could be for FMCG or Pharma or any other sector.
Yes - Money may buy everything, but when one has ample money, then its the 'power' that gives him/ her the real 'kick'. (observe the politicians) The fact that you have the power to make your subordinate do anything is a 'power' many perverts enjoy.

मृत्युन्जय's picture

4 Sep 2014 - 10:38 am | मृत्युन्जय

I believe its a good observation :)

शैलेन्द्र's picture

4 Sep 2014 - 11:28 am | शैलेन्द्र

"its the 'power' that gives him/ her the real 'kick'. (observe the politicians) The fact that you have the power to make your subordinate do anything is a 'power' many perverts enjoy."

+११११ मान्य

संजय क्षीरसागर's picture

4 Sep 2014 - 11:35 am | संजय क्षीरसागर

The fact that you have the power to make your subordinate do anything is a 'power' many perverts enjoy.

पैश्यापुढे बेईमान वाकतो. बॉबची कसली आलीये पॉवर? आनंदला अक्कल हवी. आणि पूजा तर काय....जाऊं द्या.

आता निदान लेखन जस्टीफाय तरी करु नका.

मृत्युन्जय's picture

4 Sep 2014 - 11:38 am | मृत्युन्जय

पैश्यापुढे? तुम्ही नीट वाचलीत ना कथा? की मीच नीट नाही वाचली

संजय क्षीरसागर's picture

4 Sep 2014 - 11:52 am | संजय क्षीरसागर

पैसा नाही तर काय?

कानडाऊ योगेशु's picture

10 Sep 2014 - 7:25 pm | कानडाऊ योगेशु

भीती निर्माण करण्यासाठी बॉसलोक अशा पॉवरचा उपयोग करु शकतात.
उदा.नोकरी जाण्याची भीती ती ही घराचे भले मोठे कर्ज तुमच्या डोक्यावर असताना.मग ती टिकविण्यासाठी कामाव्यतिरिक्त इतर पध्दतीनीही बॉस ला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

प्रसाद१९७१'s picture

4 Sep 2014 - 10:17 am | प्रसाद१९७१

अगदी टुकार आणि टीपिकल

आदित्य पांचोली बॉस दाखवलाय आणि जुही चावला शाहरुखची बायको.

बॅटमॅन's picture

4 Sep 2014 - 10:53 am | बॅटमॅन

टुकार

कपिलमुनी's picture

4 Sep 2014 - 11:59 am | कपिलमुनी

मिपावर मचाक विभाग सुरु करा. ते पीडन वाले ई.ई. ना खुशाल गोंधळ घालू द्या

ऋषिकेश's picture

4 Sep 2014 - 12:21 pm | ऋषिकेश

कथा आवडली. भाषणबाजी टाळणे, कथेच्या शेवटी आनंदच्या डोळ्यात खंत उतरवून वाचकाला बाटलीत उतरवण्याचा टिपिकलपणा टाळून कथेतील पात्राशी प्रामाणिकता साधल्याने कथा अधिकच आवडली.

बाकी असे खरेच घडते का याचा संशय असणार्‍यांनी तरूण तेजपाल आठवावा.

===

अन यश आणि यशस्वीतेची परिमाणे प्रत्येकाची वेगळी असल्याने, यशस्वी कोणास म्हणावे हे स्थल-काल-व्यक्ती सापेक्ष असणारच

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2014 - 12:48 pm | धर्मराजमुटके

कथा जमलीये ! लिहित रहा. वाचकांनी ती कथा म्हणूनच वाचावी. प्रत्यक्ष जीवनात असे घडते की नाही याचा विचार करु नये. कधीकधी सत्य हे कल्पनेपेक्षा भयंकर असू शकते.

योगी९००'s picture

4 Sep 2014 - 1:15 pm | योगी९००

बाकी असे खरेच घडते का याचा संशय असणार्‍यांनी तरूण तेजपाल आठवावा.
पुर्वी असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण माझ्याच कंपनीत एक अशी केस आहे. ती केस ८ वर्षापुर्वी माझ्या दोन लेवल जुनिअर होती. आज केवळ बॉब म्हणतो म्हणून ही केस परदेशात आहे आणि माझा परफॉरमन्स (म्हणजे ऑफिसमधील कामातला) ह्या केस पेक्षा दहा पटीने उत्तम असून सुद्धा ही मुलगी आज मला एक लेवल सिनिअर आहे.

असंका's picture

4 Sep 2014 - 2:41 pm | असंका

तुलना बरोबर नाही हो ही. स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः खपणं वेगळं आणि जोडीदाराला खपायला लावणं वेगळं. मॅडमच्या नवर्‍यानं तर नाही ना काही तडजोड केलेली?

योगी९००'s picture

4 Sep 2014 - 3:22 pm | योगी९००

मॅडमच्या नवर्‍यानं तर नाही ना काही तडजोड केलेली?
मॅडमच्या नवर्‍याने घटस्फोट घेऊन तडजोड दिली...

स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः खपणं वेगळं
आम्ही स्वतः आमच्या प्रगतीसाठी खपतोच की...पण अशातर्हेने नव्हे.

असंका's picture

4 Sep 2014 - 4:12 pm | असंका

दुर्दैव!

:-(

पैसा's picture

4 Sep 2014 - 1:45 pm | पैसा

या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.

लिहीत रहा. जास्त सफाईदार लिहाल हळूहळू.

vikramaditya's picture

4 Sep 2014 - 2:54 pm | vikramaditya

आणि प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.

पुढे रेटला जाऊ शकतो याची कल्पना आली. आता याचा सिक्वेल येऊ द्या!

पूजा जॉब करतीये, तिला कंट्री हेड व्हायचंय. सिग्रेट फुंकत आणि दोन पेग चढवून ती जेनीला फोन करते. जेनी `डन' म्हणते आणि दुसर्‍या दिवशी घरी हजर होते. तिला पुरणपोळीचं जेवण घालून पूजा तिची खणा-नारळानं ओटी भरते (सवाष्णच घरी आलीये ना!). मग गाडीतून दोघांना हॉटेलवर सोडते आणि म्हणते अजिबात संकोच करु नकोस, आमच्या संस्कृतीत अतिथी देव समजला जातो, तुम्ही यथेच्छ बागडा. आणि रुमचं दार स्वहस्ते बंद करुन शांतपणे घरी येते.
_______________________
या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.

संजय क्षीरसागर's picture

4 Sep 2014 - 2:59 pm | संजय क्षीरसागर

या संकेतस्थळावर वैचारिक प्रतिवाद तरी शक्य आहे असं म्हणता येईल!

इरसाल's picture

4 Sep 2014 - 4:00 pm | इरसाल

चार ओळी लिहुन तुम्ही माझा विडंबनाचा धागाच ढापलात की हो.

आनंदला आता वर्ल्ड हेड व्हायचंय. पूजा तर काय कशालाही तयार आहे. सध्या टॉम कंपनीचा वर्ल्ड हेड आहे. आनंद सहा पेग लावतो आणि तिसर्‍या सिग्रेटचा दुसरा झुरका मारत, टॉमला न्यूयॉर्क ऑफिसमधे फोन लावतो. असली भारी ऑफर म्हटल्यावर टॉम वेळात वेळ काढून यांच्या घरी येतो. पूजानं तिच्या आणखी चार सख्या स्वागताला बोलावलेल्या असतात. सगळ्या सुरेख नऊवारी नेसून आणि नथी वगैरे घालून टॉमची पंचारती करतात. मग सगळे यथेच्छ खाऊन पिऊन हॉटेलवर जातात. टॉम कावराबावरा होतो (कारण मूळ ऑफर दोनची असते), तेव्हा आनंद म्हणतो, अरे तुम भी क्या याद करोगे, ऐष करो. या स्वागतानं टॉम इतका गहिवरून जातो की आनंदला मिठी मारुन म्हणतो, `आय रिझाईन!'. आनंदला वाटतं असा एनवेळी का माघार घेतोयं हा टॉम? जरा जास्तच स्वागत झालेलं दिसतंय.

पण तेवढ्यात टॉम पुढे म्हणतो...नॉट फ्रॉम धिस लवली सिश्युएशन माय डिअर, बट फ्रॉम द कंपनी; यू आर द नेक्स्ट वर्ल्ड हेड नाऊ!

यावर आनंद म्हणतो आता दार तरी कशाला लावतोस ? मी आहे ना पाहार्‍याला उभा!
_______________________
या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.

या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.

सर, डोळ्यासमोर अंधारी आली हसून हसून! शेवटचा पंच ब्येश्ट!

नगरीनिरंजन's picture

4 Sep 2014 - 4:55 pm | नगरीनिरंजन

कै च्या कै गोष्ट आणि अशा कै च्या कै लिखाणाला भरपूर ट्यार्पी देऊन कै च्या कै लेखन वरती ठेवण्याची परंपरा पाळली जात असल्याचे पाहून एक मिपाकर म्हणून संतोष जाहला.

धाग्याला चांगलाच प्रमोशन मिळालय.
:-)

दिनेश सायगल's picture

4 Sep 2014 - 5:21 pm | दिनेश सायगल

इथल्या स्वयंघोषित सर्वज्ञांनी कॉर्पोरेट जगातल्या भानगडी कधी ऐकल्या नाहीत काय? का स्वतःच्या मुलींवर बलात्कार करणारे बाप आणि मुलींना वेश्या बनवणारे बाप यांच्या बातम्या कधी पेपरात वाचल्या नाहीत?

तुम्ही लिहा विक्रमादित्य साहेब. आणि तुमच्या लिखाणाला शिव्याशाप देणार्‍यांचे आभार मानायला विसरू नका. त्यांच्यामुळेच तुमच्या कथेला एवढा ट्यार्पी मिळालाय! :D

रामपुरी's picture

5 Sep 2014 - 2:11 am | रामपुरी

"स्वयंघोषित सर्वज्ञ" हे विशेषण भलतंच आवडलं. फालतू फालतू म्हणत दहा दहा वेळा प्रतिसाद द्यायला धाग्यावर हजर... :) :) :)

कपिलमुनी's picture

5 Sep 2014 - 2:58 pm | कपिलमुनी

तरी बरं , हा लेख पलिकडच्या संस्थळावर असता तर लेखकाकडे विदा मागुन फेफरं आणला असता ;)