आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता.
समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!"
त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच. "मग माझा डायमंड नेकलेस नक्की ना?" "ऑफ कोर्स" आनंद उत्तरला." "मी आयुषला कळवतो, ओके?" लगेच त्याने पांचगणीला शिकत असलेल्या त्यांच्या मुलाला फोन लावला. "आयुष, युर फादर इज अ बिग मॅन नाउ". आनंदने गुड न्युज आयुषला सांगितली. "देन डॅड, धीस टाईम डिस्नेलॅंड, राईट?" "ओह, येस" असा पिता पुत्राचा संवाद झाला. फोन ठेवताच त्याने समोरच्या मिररमध्ये स्वत:ला न्याहाळले. जेमतेम चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेला आनंद आज एका प्रथितयश मल्टीनॅशनल कंपनीचा इंडिया कंट्री हेड झाला होता. बरोबरच्या सगळ्यांना मागे टाकुन आज तो एका पाठोपाठ प्रगतीच्या पाय-या चढत होता. त्याने परत पुजाला फोन लावला." पुजा, बॉब इज कमिंग टुमॉरो. उद्या डिनरला भेटु त्याला". "येस, डिअर" पुजा म्हणाली. "ओके, मी नंतर फोन करते रे, आता माझ्या सर्कल मधील सगळ्यांना पार्टीचे इन्विटेशन द्यायचेय ना".
तोपर्यंत आनंदला अभिनंदनपर इमेल, कॉल्स येवु लागले. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे कॉल रिसिव्ह करताना त्याला मनातुन प्रचंड आनंद होत होता. थोड्या वेळाने लंच झाल्यावर त्याला अचानक आठवण झाली. त्याने लगेच फोन लावला. "बाबा, आनंद बोलतोय. बाबा, मी माझ्या कंपनीचा इंडिया कंट्री हेड झालो बर का" , "अरे वा! अभिनंदन बेटा. उद्याच कुलदेवाकडे अभिषेक करु आम्ही. तुझी अशीच प्रगती होवो, या उप्पर आता या वयात मला आणि तुझ्या आईला आणखी काय पाहीजे?" "बाबा, तुम्हा दोघांना किती वेळा मी आणि पुजाने दिल्लीला बोलावले, पण तुम्ही येतच नाही." "अरे आनंदा, तुला तर माहितच आहे बाळा कि ज्या शाळेतुन मी प्रिंसिपल म्हणुन रिटायर झालो तिथेच मी गरीब मुलांना शिकवतो, शिवाय तुझ्या आईबरोबर गावातील समाजकार्य, ह्यातुन वेळ मिळत नाही रे. आता आयुषच्या सुटीत तुम्हीच या गावी." ही चर्चा ह्या पुर्वी पण झाली असल्याने आनंदने तो विषय आवरता घेतला.
आपल्या आई वडीलांच्या साधेपणाची कधी त्याला चीड येई तर कधी हेवा वाटे. तीन वर्षापुर्वी गावी गेला असताना त्याने असंख्य लोकांना त्याच्या आई वडीलांच्या पाया पडताना बघीतले होते. या उलट, त्याच्या कार्यक्षेत्रात कोण त्याच्यावर कधी वार करेल आणि त्याच्या करिअरचे नुकसान करेल ह्याची खात्री नसे. रात्र रात्र जागुन तो वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीवर विचार करत बसे. आपले महत्व वाढवणे, प्रतिस्पर्ध्यांचे डाव हाणुन पाडणे ह्याचा विचार करुन त्याचे डोके ठणके. शेवटी दोन-तीन पेग मारुन मगच तो बेडरूममध्ये जात असे. तो संपूर्ण दिवस असाच गेला. संध्याकाळी ऑफीसच्या सहका-यांनी आनंदला पार्टी दिली. तो मध्यरात्री घरी पोहोचला, पुजाला यायला अजुन वेळ होता, ती तीच्या मैत्रिणींबरोबर एका कॉफी शॉप्मध्ये होती. आनंद इतका थकला होता की तो ताबडतोब झोपी गेला.
दुस-या दिवशी भल्या पहाटे त्याने एयरपोर्टवरुन बॉबला पिक अप केले आणि त्याच्या हॉटेलवर घेवुन गेला. बॉब इथे असे पर्यंत त्याचे पूर्ण लक्ष आपल्याकडेच असेल ह्याची खबरदारी त्याला घ्यावीच लागणार होती. कोण कधी काय डाव खेळेल ह्याची त्याला शाश्वती नव्हती. तो पूर्ण दिवस बॉबला वेगवेगळी प्रेसेंटेशन्स देण्यात गेला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे तो घरी पोहोचला. पुजा तयारच होती. त्याने कंपनीच्या ड्रायव्हरला जायला सांगीतले. आणि स्वत: गाडी चालवत पुजासोबत बॉबच्या हॉटेलला पोहोचला. डिनरवर गप्पा छान रंगल्या. बॉबवर आपले जास्तीतजास्त चांगले इंप्रेशन पडावे ह्या साठी आनंद नुसता धडपडत होता. त्या मानाने पुजा मात्र सफ़ाईदार ईंग्रजीत बॉबशी सहज संवाद करत होती आणि अतिशय स्मार्ट वाटत होती. अशी स्मार्ट पत्नी आपल्याला मिळाली ह्याचा त्याला फार अभिमान वाटला.
एका ठरावीक वेळानंतर बॉबने घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला. तोच इशारा समजुन आनंद आणि पुजाने आवरते घेतले. नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबने दार उघडले आणि तो तिथेच थांबला. त्याच्याशेजारुन पुजा आत शिरली. आनंदने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट विश केले आणि म्हणाला "बॉब, सी यु इन द ऑफिस टुमॉरो. "पुजा, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग." असे सांगुन आनंद निघाला. लिफ़्ट खाली आली आणि आनंद पार्किंग लॉट कडे चालु लागला. सगळे मनासारखे झाल्याने तो खुशीत शीळ वाजवत होता. आता लवकरच न्युयॉर्क पोस्टिंग साठी बॉबशी बोलायचे असे स्वत:ला बजावत त्याने कार स्टार्ट केली......
वाचने
23628
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन आवडलं.
टिपिकल पूर्वग्रहदूषित कथा.
+१
In reply to टिपिकल पूर्वग्रहदूषित कथा. by आदूबाळ
+११११
In reply to टिपिकल पूर्वग्रहदूषित कथा. by आदूबाळ
अरे बाप्रे!
असलं प्रमोशन नको रे बाप्पा !!
थोडे पचायला कठीण, पण असे घडू
वर्तुळ
तुषार दळवी आणि सोनाली
In reply to वर्तुळ by नेत्रेश
कथा फारच ऑबवियस असल्यानं एकदम टुकार वाटली.
हम्म
माईसाहेब, पोलिसात तक्रार कोण करणार?
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
संस्कार करायचे राहूनच गेले.....
अरेरे! गरीब मुलांना शिक्षण
In reply to संस्कार करायचे राहूनच गेले..... by प्रभाकर पेठकर
सहमत!
In reply to अरेरे! गरीब मुलांना शिक्षण by किसन शिंदे
नाय नाय
In reply to सहमत! by साती
ठ्ठॉक्क..
In reply to संस्कार करायचे राहूनच गेले..... by प्रभाकर पेठकर
बिचारे बाबा
In reply to ठ्ठॉक्क.. by चिगो
याच्या उलट कथानक असलेला एक
ऐतराज सिनेमा होता तो. त्यात
In reply to याच्या उलट कथानक असलेला एक by इनिगोय
मूळ इंग्रजी सिनेमा - डिसक्लोजर
In reply to ऐतराज सिनेमा होता तो. त्यात by किसन शिंदे
'डिस्क्लोजर' हा मायकल ड्ग्लस
In reply to मूळ इंग्रजी सिनेमा - डिसक्लोजर by समीरसूर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period.}:- NASDAQ.comडेमी मूर - इंडिसेण्ट प्रपोज़ल
In reply to 'डिस्क्लोजर' हा मायकल ड्ग्लस by मदनबाण
अगदी अगदी..
In reply to मूळ इंग्रजी सिनेमा - डिसक्लोजर by समीरसूर
नखरा
In reply to अगदी अगदी.. by किसन शिंदे
हम्म्म.
In reply to मूळ इंग्रजी सिनेमा - डिसक्लोजर by समीरसूर
भारतानं क्रिकेट मॅच
In reply to हम्म्म. by प्यारे१
चेहर्यावर फारसे भाव नसतात हो
In reply to भारतानं क्रिकेट मॅच by बॅटमॅन
चेहर्यावर फारसे भाव नसतात हो
In reply to चेहर्यावर फारसे भाव नसतात हो by प्यारे१
हालिवुड पिच्चरात (नाव इसारलो)
In reply to चेहर्यावर फारसे भाव नसतात हो by बॅटमॅन
आयच्यान् सांगतो खरंच विसरलोय.
In reply to हालिवुड पिच्चरात (नाव इसारलो) by असंका
अ. पा. भाग ६
In reply to आयच्यान् सांगतो खरंच विसरलोय. by बॅटमॅन
बरोबर आहे. "मला खेळ खेळायला
In reply to अ. पा. भाग ६ by असंका
आयला "मस्तच" आहे ठ्यांकू
In reply to बरोबर आहे. "मला खेळ खेळायला by आदूबाळ
अकौंटंट आणि आदूबाळः
In reply to अ. पा. भाग ६ by असंका
म्हणजे आपल्या माहितीत अजून
In reply to अकौंटंट आणि आदूबाळः by बॅटमॅन
च्यायला ह्यासाठी तरी
In reply to म्हणजे आपल्या माहितीत अजून by असंका
प्रणयात धुंद म्हणजे हिंदी
In reply to च्यायला ह्यासाठी तरी by टवाळ कार्टा
नै ओ माहिती. आठवला तर सांगू
In reply to म्हणजे आपल्या माहितीत अजून by असंका
प्रमोशनचा फोन गेल्याबरोबर
आनंदला अधुनिक `वाल्या कोळी' म्हणायला हवं!
In reply to प्रमोशनचा फोन गेल्याबरोबर by स्पंदना
वाल्याकोळी आवडल.
In reply to आनंदला अधुनिक `वाल्या कोळी' म्हणायला हवं! by संजय क्षीरसागर
मुलगा अजून लहान आहे
In reply to वाल्याकोळी आवडल. by स्पंदना
काही करा पण..
In reply to वाल्याकोळी आवडल. by स्पंदना
हो बाई!! चुकलच लिहायला.
In reply to काही करा पण.. by साती
रुल ऑफ अल्केमी=द ईक्वल
ह्म्म...
पटले
In reply to ह्म्म... by विटेकर
पेठकर काका आणी संक्षीसरांचे
अगदी
विटेकर साहेब
लाखमोलाची गोष्ट बोललात!
In reply to विटेकर साहेब by सुबोध खरे
माझे गाण्याचे मास्तर म्हणतात
In reply to लाखमोलाची गोष्ट बोललात! by संजय क्षीरसागर
खरं तर सिंथेसाइजरचे मास्तर !
In reply to माझे गाण्याचे मास्तर म्हणतात by स्पा
शेवटी काय माणूस चांगला असणे
In reply to लाखमोलाची गोष्ट बोललात! by संजय क्षीरसागर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 8 Reasons Why A New Global Financial Crisis Could Be On The Way {We are now in a post-crisis period}:- NASDAQ.comशप्पथ
In reply to शेवटी काय माणूस चांगला असणे by मदनबाण
शक्यता आहे..
In reply to विटेकर साहेब by सुबोध खरे
च्यायला - वाघीणीचे दूध
In reply to शक्यता आहे.. by विटेकर
शेवटी काय माणूस चांगला असणे
In reply to विटेकर साहेब by सुबोध खरे
शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही.शंभर नंबरी सत्य... हे वाक्यावरचा प्रतिसाद इतका मोठा झाला की येथे अवांतर करणाऐवजी ते विचार मिपावरच्या वेगळ्या धाग्यात येथे लिहून ठेवले आहेत.पटली नाही.
Indecent Proposal आठवला.
In reply to पटली नाही. by साती
please note
In reply to पटली नाही. by साती
I believe its a good
In reply to please note by vikramaditya
"its the 'power' that gives
In reply to please note by vikramaditya
काहीही फेकतायं!
In reply to please note by vikramaditya
पैश्यापुढे? तुम्ही नीट वाचलीत
In reply to काहीही फेकतायं! by संजय क्षीरसागर
`प्रमोशन' म्हणजे
In reply to पैश्यापुढे? तुम्ही नीट वाचलीत by मृत्युन्जय
बॉबची कसली आलीये पॉवर?
In reply to काहीही फेकतायं! by संजय क्षीरसागर
अगदी टुकार आणि टीपिकल
शाहरुख खानचा "येस बॉस" याच विषयावर होता का?
टुकार
मचाक
छान
कथा जमलीये !
हं
तुलना बरोबर नाही हो ही.
In reply to हं by योगी९००
तडजोड..?
In reply to तुलना बरोबर नाही हो ही. by असंका
दुर्दैव!
In reply to तडजोड..? by योगी९००
कथा आवडली
वाचन
भल्याभल्यांची प्रोत्साहनं पाहून भिकार कथाविषय सुद्धा कसा
आता हा प्रतिसाद इथे राहिला तर
In reply to भल्याभल्यांची प्रोत्साहनं पाहून भिकार कथाविषय सुद्धा कसा by संजय क्षीरसागर
संक्षी
In reply to भल्याभल्यांची प्रोत्साहनं पाहून भिकार कथाविषय सुद्धा कसा by संजय क्षीरसागर
असं प्रोत्साहन असेल तर अजून बराच स्कोप आहे!
In reply to संक्षी by इरसाल
या पृथ्वीवर काहीही शक्य आहे.
In reply to असं प्रोत्साहन असेल तर अजून बराच स्कोप आहे! by संजय क्षीरसागर
कै च्या कै गोष्ट आणि अशा कै
धाग्याला चांगलाच प्रमोशन
कमाल आहे राव!
खिक्क्क
In reply to कमाल आहे राव! by दिनेश सायगल
विदा