आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता.
समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!"
त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच. "मग माझा डायमंड नेकलेस नक्की ना?" "ऑफ कोर्स" आनंद उत्तरला." "मी आयुषला कळवतो, ओके?" लगेच त्याने पांचगणीला शिकत असलेल्या त्यांच्या मुलाला फोन लावला. "आयुष, युर फादर इज अ बिग मॅन नाउ". आनंदने गुड न्युज आयुषला सांगितली. "देन डॅड, धीस टाईम डिस्नेलॅंड, राईट?" "ओह, येस" असा पिता पुत्राचा संवाद झाला. फोन ठेवताच त्याने समोरच्या मिररमध्ये स्वत:ला न्याहाळले. जेमतेम चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेला आनंद आज एका प्रथितयश मल्टीनॅशनल कंपनीचा इंडिया कंट्री हेड झाला होता. बरोबरच्या सगळ्यांना मागे टाकुन आज तो एका पाठोपाठ प्रगतीच्या पाय-या चढत होता. त्याने परत पुजाला फोन लावला." पुजा, बॉब इज कमिंग टुमॉरो. उद्या डिनरला भेटु त्याला". "येस, डिअर" पुजा म्हणाली. "ओके, मी नंतर फोन करते रे, आता माझ्या सर्कल मधील सगळ्यांना पार्टीचे इन्विटेशन द्यायचेय ना".
तोपर्यंत आनंदला अभिनंदनपर इमेल, कॉल्स येवु लागले. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे कॉल रिसिव्ह करताना त्याला मनातुन प्रचंड आनंद होत होता. थोड्या वेळाने लंच झाल्यावर त्याला अचानक आठवण झाली. त्याने लगेच फोन लावला. "बाबा, आनंद बोलतोय. बाबा, मी माझ्या कंपनीचा इंडिया कंट्री हेड झालो बर का" , "अरे वा! अभिनंदन बेटा. उद्याच कुलदेवाकडे अभिषेक करु आम्ही. तुझी अशीच प्रगती होवो, या उप्पर आता या वयात मला आणि तुझ्या आईला आणखी काय पाहीजे?" "बाबा, तुम्हा दोघांना किती वेळा मी आणि पुजाने दिल्लीला बोलावले, पण तुम्ही येतच नाही." "अरे आनंदा, तुला तर माहितच आहे बाळा कि ज्या शाळेतुन मी प्रिंसिपल म्हणुन रिटायर झालो तिथेच मी गरीब मुलांना शिकवतो, शिवाय तुझ्या आईबरोबर गावातील समाजकार्य, ह्यातुन वेळ मिळत नाही रे. आता आयुषच्या सुटीत तुम्हीच या गावी." ही चर्चा ह्या पुर्वी पण झाली असल्याने आनंदने तो विषय आवरता घेतला.
आपल्या आई वडीलांच्या साधेपणाची कधी त्याला चीड येई तर कधी हेवा वाटे. तीन वर्षापुर्वी गावी गेला असताना त्याने असंख्य लोकांना त्याच्या आई वडीलांच्या पाया पडताना बघीतले होते. या उलट, त्याच्या कार्यक्षेत्रात कोण त्याच्यावर कधी वार करेल आणि त्याच्या करिअरचे नुकसान करेल ह्याची खात्री नसे. रात्र रात्र जागुन तो वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीवर विचार करत बसे. आपले महत्व वाढवणे, प्रतिस्पर्ध्यांचे डाव हाणुन पाडणे ह्याचा विचार करुन त्याचे डोके ठणके. शेवटी दोन-तीन पेग मारुन मगच तो बेडरूममध्ये जात असे. तो संपूर्ण दिवस असाच गेला. संध्याकाळी ऑफीसच्या सहका-यांनी आनंदला पार्टी दिली. तो मध्यरात्री घरी पोहोचला, पुजाला यायला अजुन वेळ होता, ती तीच्या मैत्रिणींबरोबर एका कॉफी शॉप्मध्ये होती. आनंद इतका थकला होता की तो ताबडतोब झोपी गेला.
दुस-या दिवशी भल्या पहाटे त्याने एयरपोर्टवरुन बॉबला पिक अप केले आणि त्याच्या हॉटेलवर घेवुन गेला. बॉब इथे असे पर्यंत त्याचे पूर्ण लक्ष आपल्याकडेच असेल ह्याची खबरदारी त्याला घ्यावीच लागणार होती. कोण कधी काय डाव खेळेल ह्याची त्याला शाश्वती नव्हती. तो पूर्ण दिवस बॉबला वेगवेगळी प्रेसेंटेशन्स देण्यात गेला. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे तो घरी पोहोचला. पुजा तयारच होती. त्याने कंपनीच्या ड्रायव्हरला जायला सांगीतले. आणि स्वत: गाडी चालवत पुजासोबत बॉबच्या हॉटेलला पोहोचला. डिनरवर गप्पा छान रंगल्या. बॉबवर आपले जास्तीतजास्त चांगले इंप्रेशन पडावे ह्या साठी आनंद नुसता धडपडत होता. त्या मानाने पुजा मात्र सफ़ाईदार ईंग्रजीत बॉबशी सहज संवाद करत होती आणि अतिशय स्मार्ट वाटत होती. अशी स्मार्ट पत्नी आपल्याला मिळाली ह्याचा त्याला फार अभिमान वाटला.
एका ठरावीक वेळानंतर बॉबने घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला. तोच इशारा समजुन आनंद आणि पुजाने आवरते घेतले. नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबने दार उघडले आणि तो तिथेच थांबला. त्याच्याशेजारुन पुजा आत शिरली. आनंदने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट विश केले आणि म्हणाला "बॉब, सी यु इन द ऑफिस टुमॉरो. "पुजा, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग." असे सांगुन आनंद निघाला. लिफ़्ट खाली आली आणि आनंद पार्किंग लॉट कडे चालु लागला. सगळे मनासारखे झाल्याने तो खुशीत शीळ वाजवत होता. आता लवकरच न्युयॉर्क पोस्टिंग साठी बॉबशी बोलायचे असे स्वत:ला बजावत त्याने कार स्टार्ट केली......
प्रतिक्रिया
5 Sep 2014 - 8:33 pm | विवेकपटाईत
"बॉब, सी यु इन द ऑफिस टुमॉरो. "पुजा, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग.
उच्चभ्रू समाजातील सत्य आहे.....आवडलं.
10 Sep 2014 - 3:21 am | काउबॉय
आनंद सारखा ज्युनिअर आपल्या हाताखाली कधी लाभलाच नाइ राव :(
10 Sep 2014 - 11:13 am | कपिलमुनी
तुम्हाला बॉब सारखा सिनियर लाभला तर ??
10 Sep 2014 - 12:21 pm | संजय क्षीरसागर
आणि त्यात ऑफिसबॉय अन्मॅरिड असला तर ऑफर फारच महागात पडेल!
10 Sep 2014 - 3:03 pm | काउबॉय
@मुनिवर
दोन सुज्ञ रावण एकमेकांच्या शेपट्यावर पाय द्यायच्या फंदात पडत नसल्याने काही प्रॉब्लम निर्माण होणार नाही.
@ संजय क्षीरसागर
ऑफिसबॉय अन्मॅरिड असला तर तो वेळेचे अस्तित्व गमावल्याने वा बेक ट्रेकिङ्ग्चे फंदात दुर्लक्षित झालेल्या ऑफिस मधील कर्मचार्यान्च्या गरजू संबंधिताना बोबकडे पाठ्वेल.
10 Sep 2014 - 12:49 pm | प्रसाद गोडबोले
एकदम मचाक कथा आहे !!
अजुन काही वेगळे शेवट सुचवतो ---
१) नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबच्या बायकोने दार उघडले आणि बॉब व ती तिथेच थांबले. त्याच्याशेजारुन आनंद आत शिरला. पुजाने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट विश केले आणि म्हणाली "बॉब, सी यु इन द ऑफिस टुमॉरो. " आनंद, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग." असे सांगुन पुजा निघाली.
२) नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबने दार उघडले आणि तो तिथेच थांबला. त्याच्याशेजारुन आनंद आत शिरला. पुजाने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट विश केले आणि म्हणाली "बॉब, सी यु टुमॉरो. " आनंद, आय विल पिक यु अप टुमॉरो मॉर्निंग." असे सांगुन पुजा निघाली.
३) नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबच्या बायकोने दार उघडले आणि बॉब व ती तिथेच थांबले. त्याच्याशेजारुन आनंद आणि पुजा दोघेही आत शिरले. पुजाने बॉबशी शेकहॅंड करुन गुड नाईट किस केले आणि म्हणाली " फरगेट द ऑफीस & प्रमोशन ... लेट्स रॉक टू नाईट " असे सांगुन दरवाजा ओढुन घेतला.
४) नंतर तीघे लिफ्टमध्ये शिरले आणि बॉबच्या रूमसमोर पोहोचले. बॉबच्या बायकोने दार उघडले आणि बॉब व ती तिथेच थांबले. त्याच्याशेजारुन आनंद आणि पुजा दोघेही आत शिरले. आत बॉबची सेक्रेटरी , आनंदची सेक्रेटरी , २-४ न्युजॉईनी कॉलेजपासाऊट पोरं पोरी , तयारीतच बसली होती .... " इनफ ऑफ दिस गुडी गुडी डिस्कशन , लेट्स गेट ब्यॅक टू रियल वर्क " असे सांगुन बॉबने दरवाजा ओढुन घेतला.
तसे अजुन बरेच शेवट सुचवता येतील , पण हे सारे मी माझ्या नीलचित्रपटदिग्दर्शनातील करीयर च्या स्वप्नासाठी राखुन ठेवत आहे .
*biggrin* *biggrin* *biggrin*
10 Sep 2014 - 2:00 pm | काळा पहाड
मी चुकून 'बालचित्रपट्दिग्दर्शनातील' असं वाचलं.
10 Sep 2014 - 5:55 pm | कानडाऊ योगेशु
तुमच्या पर्म्युटेशन आणि कॉम्बिनेशन ने फेफरे आणले.
10 Sep 2014 - 6:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कथा जमली आहे. एकीकडे संस्कार कमी पडलेत आणि दुसरीकडे प्रमोशनसाठी स्वीकारलेला मार्ग हा गुंता
असलेला विषय चांगला हाताळला आहे. मी अशी काही माणसं पाहिलेली आहेत जी मोठी झाली आहेत.
असो....!
-दिलीप बिरुटे
16 Dec 2014 - 6:57 pm | बॅटमॅन
आणि अशाप्रकारे सेञ्चुरी जाहलेली आहे इथेपण.
(शतकवीर) बॅटमॅन.