मंत्रयोग - जपयोग

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in जनातलं, मनातलं
17 Jul 2014 - 4:32 pm

मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

17 Jul 2014 - 5:23 pm | कवितानागेश

:)

एस's picture

22 Jul 2014 - 3:21 pm | एस

:-)

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2014 - 5:24 pm | प्रसाद गोडबोले

अनिलराव एकदा वर लिहिलेले सर्व आत्मप्रचितीला उरतते का हे तपासुन पहा !

असो !

म्हणोनि जितुका भोळा भाव । तितुका अज्ञानाचा स्वभाव ।
अज्ञानें तरी देवाधिदेव । पाविजेल कैचा ॥ ११ ॥

अवांतर :
ह्यावरुन एक जोक आठवला :
परांजपे ह्या शब्दाची व्युत्पत्ती : परा + जपे अर्थात परावाणी मधे जप करणारे अशी आहे ...
पण आमच्या एका बीग्रेडी मित्राने ती व्युत्पत्ती पर्+अन्न्+जपे म्हणजे दुसर्‍याच्या अन्नावर जगणारे अशी केली होती =))

कवितानागेश's picture

17 Jul 2014 - 5:33 pm | कवितानागेश

कुणाच्या आत्मप्रचितीला?

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2014 - 5:45 pm | प्रसाद गोडबोले

बराच वेळ चिंतन केल्यावर ह्या प्रश्नाचा अर्थ उमगला ... फारच गहन आणि खोल प्रश्न विचारलात माऊली !!

तत्वें साक्षत्वें वोसरतीं| साक्षत्व नुरे आत्मप्रचिती |आत्मा असे आदिअंतीं| आपण कैंचा ||१४||

जिथे "आपण"ही नाही ... साक्षित्वच नाही ...तिथे आत्मप्रचिती कशी आणणार !

मनापासुन धन्यवाद :)

तुम्ही ज्ञानेश्वरीचे पारायण करता का?

ज्ञानदेवांनी नऊ हजार ओव्यांच्या ज्ञानेश्वरीत कोणत्या अध्यायात, कोणत्या ओवीत काय म्हटले आहे हे तुमच्या कसे लक्षांत राहते?

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2014 - 5:57 pm | प्रसाद गोडबोले

हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही

आणि लक्षात कसे रहाते हे समजण्यासाठी तुम्हाला आधी समष्टी व्हावी लागेल *biggrin*

हे समर्थांनी म्हणले आहे ...ज्ञानेश्वरांनी नाही

यापुढे ओवीचा उल्लेख करताना तिचा संदर्भ देत जा राव. आमच्यासाठी ओवीपेक्षा ओवीचा संदर्भ जास्त महत्वाचा आहे. :)

नेहमीच्या यशस्वी कलाकारांच्या प्रतिक्षेत

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2014 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११ टू (या वेळी *biggrin* ) पांडु!
http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink033.gif

मृगनयनी's picture

17 Jul 2014 - 6:45 pm | मृगनयनी

अनिल'जी... खूपच उपयुक्त माहिती... :)

मंत्रसामर्थ्य अगाध आहे. मंत्र व नामस्मरण या दोन्हीबद्दल आपण या आधीदेखील लेख लिहिले आहेत. प्रत्येक वेळी आपण जी विस्तृत स्वरूपात माहिती देता, त्यावरून देव, मंत्र या गोष्टींशी कमी संबंध असणार्‍या किम्बहुना काहीही सम्बन्ध नसणार्‍यांना सुद्धा उचित बोध मिळू शकतो......

तुम्हाला शुभेच्छा!!!! .. :) || जय मल्हार ||

अनिल तापकीर's picture

21 Jul 2014 - 6:59 pm | अनिल तापकीर

धन्यवाद

प्रचेतस's picture

17 Jul 2014 - 5:30 pm | प्रचेतस

:)

जेपी's picture

17 Jul 2014 - 5:36 pm | जेपी

नीट आटवत नाय.
पण अस कायतर आहे.
युद्ध माझे बॅट्या करणार ...........
धाग्यावर मंत्र बसणार निश्चीत.

(जेपी फ्राम तामीळनाडु)

सूड's picture

17 Jul 2014 - 6:07 pm | सूड

समर्थक प्रवचने देणार।विरोधक खोडून काढणार॥
व्यष्टी समष्टीची अंत्येष्टी होणार। राडा घडणार निश्चित॥ ;)

स्पा's picture

17 Jul 2014 - 6:23 pm | स्पा

सूड रावांशी शमत

धमाल मुलगा's picture

17 Jul 2014 - 6:28 pm | धमाल मुलगा

व्यष्टी समष्टीची अंत्येष्टी... =)) खुळ्यागत हसतोय राव.

समष्टीच्या व्यामिष्रतेची आपणास कल्पना नसल्याने आपण सदर ओवी लिहिण्यास उद्युक्त झालात.

वास्तविक पाहता समष्टीवर भाष्य करताना समष्टी आणि तिची व्यामिष्रता यांच्या जोडीनेच भ्रम (इल्यूजन), प्रमाद(चुका करण्याचा स्वभाव), करणापटव (लिमिटेशन्स), विप्रलिप्सा (लोभीपण), कूटार्थ, मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था, विचारांची क्लॅरिटी, भगवदतत्त्व, त्रैमूर्ती ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण तसेच ज्ञानरुपी तृतीय नेत्र इत्यादी बाबींचा साकल्याने विचार करावा लागतो.

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 6:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

राडा होणार निश्चित!!
पॉपकॉर्न घेउन बसलोय :)

आदिजोशी's picture

17 Jul 2014 - 7:57 pm | आदिजोशी

दंग्याची सगळी लक्षणं दिसत आहेत...
सगळे कंपूबाज टवाळ जमले आहेत...
दंगा होणार निश्चित...

मराठी कथालेखक's picture

17 Jul 2014 - 6:26 pm | मराठी कथालेखक

"बाबाजी ... " आठवला .. *smile*

कपिलमुनी's picture

17 Jul 2014 - 6:44 pm | कपिलमुनी

खेकडे, अमावस्या, दहीवडा नरकोंडम बेट, बाली,शाही ? अंडी..पोपट , जाम+ इ एम आय ई. ई. च्या प्रतीक्षेत

नानासाहेब नेफळे's picture

17 Jul 2014 - 6:50 pm | नानासाहेब नेफळे

मन एकाग्र करणे.....
च्यायला ,पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते, त्यासाठी एवढ्या देवांच्या नावाने कशाला शंख करत बसायचे....

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2014 - 7:20 pm | प्रसाद गोडबोले

पाचरुपयाची गायछाप आणि चूना डबीसुद्धा हे करु शकते

हायला ५ रुपाय्ला झाली होय ? पुर्वी दीडरुपायला तबाकु आणि ५० पैशात चुना मिळायचा .... गेले ते दिवस !

नानासाहेब नेफळे's picture

17 Jul 2014 - 7:43 pm | नानासाहेब नेफळे

खरंय हो, पाच रुपयात चार मिनारचे पाकिट यायचे .आता पाच रुपयात फक्त एकच चैतन्यकांडी मिळते. गेले ते दिन गेले.

एसमाळी's picture

17 Jul 2014 - 7:59 pm | एसमाळी

गेले ते दिवस,
आता गायछाप नऊ रुपयाला झालाय. आणी चुनाडबी 2 रु. ला

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jul 2014 - 9:16 pm | llपुण्याचे पेशवेll

अनुभवाने सांगतो पाच रुपयाच्या गायछापने हे काम साधत नाही.

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2014 - 1:12 pm | श्रीगुरुजी

अरे माईसाहेब,

आत्ता समजलं की तू प्रत्येक धाग्यावर जाऊन का पिचकार्‍या मारतोस ते!

धन्या's picture

17 Jul 2014 - 7:03 pm | धन्या

मंत्रजपावरुन आठवले, सहस्त्रार्जूनाच्या नावाने कसलासा मंत्र आहे म्हणे. तो जपला की हरवलेली वस्तू मिळते असे म्हणतात.

आमच्या एका मित्राचा परवा भीमाशंकर मंदीराच्या प्रांगणात भ्रमणध्वनी संच हरवला. मित्र मंत्रपठणाच्या क्षेत्रातील निष्णात असल्यामुळे त्याने तो मंत्र जपलासुद्धा मात्र भ्रमणध्वनी संच काही सापडला नाही. बहुतेक चपलांच्या स्टँडजवळ उभ्या असणार्‍या आजीबाईंना दहा रुपये न दिल्यामुळे त्यांनी दिलेला "देव पावंल तुमाला" हा शाप भोवला असावा. सहस्त्रार्जुनाच्या "हरवलेले सापडते" मंत्रापेक्षा आजीबाईंचा तळतळाट जास्त पावरफुल ठरला.

कार्तवीर्यार्जुनो नाम राजा सहस्त्रबाहुवान्। तस्य (यस्य?) स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते॥

मृगनयनी's picture

17 Jul 2014 - 7:24 pm | मृगनयनी

अरे व्वा.... सूड..... श्लोक, स्तोत्र वगैरे पाठ दिसताहेत की तुमचे!!!... :) छान छान ...

प्रसाद गोडबोले's picture

17 Jul 2014 - 7:30 pm | प्रसाद गोडबोले

ह्या मंत्राच्या स्मरणाने तुमच्या त्या मित्राला समष्टी झाली आणि हरवलेली मनःशांती परत मिळाली असे ऐकीवात आहे ! म्हणजे कार्तवीर्यही जिंकला आणि आज्जी बाईही जिंकली असे अध्यात्मिक अनुमान काढतायेईल.

पण हे कळण्यासाठी तुमचा कर्मविपाकाचा पुरेसा अभास असावा लागेल तरच तुम्हाला अध्यात्मिक आणि आधिभौतिक जगतातील व्यामिश्रतापुर्ण कार्यकारणभाव लक्षात येईल !
*biggrin*

जरा सोप्या मराठी मध्ये समजावून सांगा. प्रतिसाद वाचतानाच २ फुट डोक्यावरून गेला.

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2014 - 10:16 am | प्रसाद गोडबोले

आधी दासबोध वाचुन या =))))

अच्छा म्हणजे तुमचा प्रतिसाद कळण्यासाठी अगोदर संपुर्ण 'दासबोध' वाचावा लागेल का?

मग तर नकोच. :)

सध्या आम्हाला सर्दी झालेली असल्यामुळे आम्ही आलेपाक खात आहोत. सर्दी गेली की कर्मविपाकाचा अभ्यास करु.

रच्याकने, आधिभौतिकला इंग्रजीत काय म्हणतात? पॅराफिजिकल? सुपरश्टीशीयस?

स्वप्नांची राणी's picture

17 Jul 2014 - 7:50 pm | स्वप्नांची राणी

कर्मवि पाक कसा करावा? मला डेमेरारा पाक फक्त करता येतो... =-O =O =-o =0 O_O O_o

माझं प्रवासाचं SL कार्ड काल पासून हरवलं आहे, वरील मंत्राने ते मिळेल का हो? ;)

मला स्वतःला काही अनुभव नाही. या क्षेत्रातील जाणकारच काही सांगू शकतील. या क्षेत्रात स्वानुभव खुप महत्वाचा असतो.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jul 2014 - 1:02 am | अत्रुप्त आत्मा

@या क्षेत्रात स्वानुभवhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/pointing-and-laughing.gif खुप महत्वाचा असतो. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/hearty-laugh.gif

अनिल तापकीर's picture

21 Jul 2014 - 7:01 pm | अनिल तापकीर

आपल्या प्रतिसादाशी सहमत

चौदा दिवस लवकर आलेला धागा.

धन्या's picture

17 Jul 2014 - 7:04 pm | धन्या

कस्काय्वो?

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 7:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

श्रावण :)

अस्सं होय. वातावरण निर्मिती करत असतील ते.

आदूबाळ's picture

17 Jul 2014 - 8:01 pm | आदूबाळ

सत्रा तारखेपासून चौदा दिवसांनी काय आहे? घाल बोटें, मोज!

सूड's picture

17 Jul 2014 - 8:06 pm | सूड

'घाल बोटें, मोज!'

'धर बोटें, मोज!!' असं आहे हो ते !! *dash1* *mosking*

धमाल मुलगा's picture

17 Jul 2014 - 8:11 pm | धमाल मुलगा

हे देखील बरोबरच आहे.

चित्रगुप्त's picture

17 Jul 2014 - 7:38 pm | चित्रगुप्त

शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.

१. हे नेमके कोणत्या शास्त्रात सांगितले आहे, मूळ श्लोक कोणता, हे जरा तपशीलात लिहावे, अशी विनंती करतो.
२. 'जप' ही एक मानसिक क्रिया असल्याने तिचे परिणाम -- "साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होणे" वगैरे नेमके कसे घडून येतात, वगैरेंवर धागाकर्त्याने प्रकाश टाकावा.
३. धागाकर्त्याचा या बाबतीत स्वानुभव काय आहे ? कोणता, किती जप केला, त्याचा काय परिणाम घडून आला, वगैरेही विशद करावे.
'जप' या संकल्पनेच्या मोघम माहिती ऐवजी नेमकी आणि स्वानुभवाधिष्ठित माहिती मिळावी, या हेतूने ही विचारणा करत आहे.

शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.

नेमकं हेच विचारायचं होतं, की नुसतं "ज" म्हणजे जन्माचं थांबणं आणि "प" म्हणजे पाप नष्ट होणं असं नक्की कुठे लिहीलं आहे? असे एकाक्षरी शब्दावरून एवढा सगळा अर्थ कसा काय होतो याचं खरंच कुतूहल आहे.

चित्रगुप्त's picture

19 Jul 2014 - 3:41 am | चित्रगुप्त

'ज' म्हणिजे काय
'प' म्हणिजे काय
'जप' म्हणिजे काय
मज निरोपावे ..

'ज' म्हणिजे जगणे
'प' म्हणिजे पाप करणे
'जप' म्हणिजे पाप करित जगणे
ग्रंथांतरी बोलिले.

धन्या's picture

19 Jul 2014 - 2:43 pm | धन्या

नाम "जपाला" विशेष महत्व असणार्‍या एका निरुपद्रवी संप्रदायाच्या अनुयायाकडून "विश्वात ठसवलेला तो विठ्ठल" अशी विठ्ठल या शब्दाची फोड ऐकली होती. त्यामुळे अशा अतर्क्य शब्दार्थांचे हल्ली नवल वाटत नाही.

प्रसाद१९७१'s picture

21 Jul 2014 - 4:40 pm | प्रसाद१९७१

शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे.

"ज" वरुन "जेवण" आणि "प" वरुन पाप असे का नाही?

अहो त्यांच्या शास्त्रात तसं नाही. दुसरी शास्त्रे रचायासि प्रतिबंधु केलाय कवणें?

ज वरून जहाज आणि प वरून परात पण होऊ शकते

ज वरून जाम आणि प वरून पाक पण होऊ शकते. 'अन्न' शास्त्राप्रमाणे पाहिले तर हेच्च बरोबर आहे.

नानासाहेब नेफळे's picture

17 Jul 2014 - 8:44 pm | नानासाहेब नेफळे

स्वानुभधिष्ठीत माहीती मिळावी

केलात ना घोळ!
स्वानुभवाचा दाखला देऊन प वि सुक्ष्म देहाने मंगळावर जाऊन आले होते, ठेवणार आहात का विश्वास!!

चित्रगुप्त's picture

18 Jul 2014 - 12:16 am | चित्रगुप्त

सूक्ष्म देहाने प्रवास काय, आम्ही सुद्धा करतो, पण मंत्र-जप वगैरे लई भारी दिसतंय, म्हणून विचारलंय.
बघा आमच्या सूक्ष्मदेह-प्रवासाची हकिगतः
पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास
http://www.misalpav.com/node/21492

आमचे मिपावरील लेखनः
http://www.misalpav.com/user/9160/authored

टवाळ कार्टा's picture

18 Jul 2014 - 10:25 am | टवाळ कार्टा

काय ढिंच्याक लेख आहे =)) \m/

भृशुंडी's picture

18 Jul 2014 - 1:09 am | भृशुंडी

श्री तपकीर,
तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते जरूर लिहा.

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 3:27 am | प्यारे१

||ॐ||
||ॐ नमः शिवाय||
||ॐ नमो भगवते वासुदेवाय||
||श्रीराम जयराम जयजयराम||

मदनबाण's picture

18 Jul 2014 - 5:56 am | मदनबाण

@ अनिलराव माहिती आवडली. माझ्या माहिती प्रमाणे मंत्रांच्या उगम स्थानाचे ४ भाग आहेत.
१}वैदिक
२}उपनिषदातले
३}तांत्रिक
४}पौराणिक

राम मंत्राचिया आवर्ती | घडती जयासी पुढतोपुढती |
त्याचा जन्म धन्य ये क्षिती | सर्व कुळासी तारक ||१||
राम मंत्र आवडे जीवा | हाचि उद्धार सर्व जीवां |
शिवासही विसावा | पार्वती सहित ||२||
रामकॄष्ण उच्चारे | तरती जड पामरें |
ऐसें हें व्यासे निर्धारेम | नानाग्रंथी सांगितले ||३||
नामा जपे नाम मंत्र | आणिक नेणे नाना शास्त्र |
राम नामे नित्य वक्त्र | हरी रंगें रंगले ||४||

इति :- श्री संत नामदेव.
संदर्भ :- नाम महिमा अभंग १४६

नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥
रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥
ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥

संदर्भ :- श्री ज्ञानदेव हरिपाठ

वासनेचे मूळ छेदिल्या वाचून । तरलोसे कोणी न म्हणावे ॥२३॥
न म्हणावे जाला पंडित वाचक । करो मंत्रघोष अक्षरांचा ॥२४॥

संत तुकाराम अभंग
संदर्भ :- तुकाराम अभंगगाथा

चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ? ;)
असो... वाचकांसाठी मंत्रपुष्पांजली चा अर्थ
संदर्भ इकडुन घेतला आहे.

जाता जाता :-
माला तो कर में फिरे, जीभ फिरै मुख माहि ।
मनुवाँ तो चहुँ दिसि फिरै, यह तो सुमिरन नाहिं ॥
इति:- संत कबीर

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

मृगनयनी's picture

18 Jul 2014 - 9:41 am | मृगनयनी

आssssssss हा .. मदनबाण...... क्या ब्बात कही है......... चोक्कस्स!!!...

चला गणपती चे दिवस जवळ येत आहेत... आरती म्हणुन झाल्यावर मंत्रपुष्पांजली सर्व म्हणतातच नाही का ?

व्हेरी गुड... एका दगडात बरे पक्षी.. हां..... ;)

खटपट्या's picture

18 Jul 2014 - 11:10 pm | खटपट्या

मदणबाण बाबा की जय !!!

मदनबाण's picture

19 Jul 2014 - 7:55 am | मदनबाण

मदणबाण बाबा की जय !!!
हॅं.हँ.हँ... नारायण ! नारायण ! काय साहेब गरीबाची चेष्टा करताय ? ;)
बाबा तर आपले गुगल आहेत हो... खाली त्यांच्या भक्तांची प्रतिभा तर पहा... कसे म्हणतात, तन्नो गुगल प्रचोदयात |
आता मला देखील गुगल बाबांची महती विषद करावी वाटते... ;)
एन्जॉय माडी... :)

जाता जाता :- हा ८० वा प्रतिसाद... और सिर्फ २० रन चाहिये सेंन्चुरी के लिये. ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ७ समुंदर पार... :- विश्वात्मा

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2014 - 5:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेर्री वेर्री फन्नी =))

अनिल तापकीर's picture

21 Jul 2014 - 7:04 pm | अनिल तापकीर

धन्यवाद

बाळ सप्रे's picture

18 Jul 2014 - 10:23 am | बाळ सप्रे

पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते

हातच्या कंकणाला आरसा कशाला.. कॉलिंग परा ..

टवाळ कार्टा's picture

18 Jul 2014 - 4:01 pm | टवाळ कार्टा

चायला अजुन १०० नाहीत... १ मिपाकर म्हणुन शरम...वगैरे वगैरे ;)

टवाळ कार्टा's picture

18 Jul 2014 - 4:03 pm | टवाळ कार्टा

कोणीतरी मंत्रपठण सुरु करा रे ... आहुती टाकणारे कुठे पानपतात गेले आहेत कुणास ठाउक

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2014 - 4:40 pm | प्रसाद गोडबोले

मिपावर प्रतिसाद वाढवायला काहीतरी मंत्र असला पाहिजेल राव ... अनिलराव जरा शोधुन पहाता का ?

सूड's picture

18 Jul 2014 - 4:43 pm | सूड

या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

प्यारे१'s picture

18 Jul 2014 - 5:39 pm | प्यारे१

सबुरी बाळगा. होतील.

बॅटमॅन's picture

18 Jul 2014 - 4:10 pm | बॅटमॅन

:)

=====================================================

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव्!!!!

टवाळ कार्टा's picture

18 Jul 2014 - 4:39 pm | टवाळ कार्टा

हे काय????

धन्या's picture

18 Jul 2014 - 5:40 pm | धन्या

हे काय????

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..ढिशक्यांव् ढिशक्यांव् ढिशक्यांव् असा नामजप.

संस्कृत मंत्र जास्त प्रभावी कि मराठी मंत्र जास्त प्रभावी?

प्रसाद गोडबोले's picture

18 Jul 2014 - 6:13 pm | प्रसाद गोडबोले

संस्कृत वाणी देवे केली | मग प्राकृत काय चोरांपासुनी झाली || असा सणसणीत प्रश्न व्हिचारुन ठेवलाय नाथांनी .

धन्या , थांब रे थोडा जरा दम धर तुला रेफरन्स काढुन सांगतो *biggrin*

तोवर ह्या मंत्राचा जप कर

" इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात || "

*lol*

इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||

ये क्या मंत्र है, मै तो बोखला गया रे बाबा!

चित्रगुप्त's picture

18 Jul 2014 - 5:47 pm | चित्रगुप्त

आपले तापकीर साहेब एवढ्या कळकळीनं 'शहाणे करुन सोडावे, सकळ जन' या रास्त हेतूनं काही माहिती देत आहेत, तरी नुस्ती टवाळी चालवलीय शिंच्यांनी. पुढे एकाद्या धूर्त अमेरिकन प्रकाशकानं "सेव्हन एन्शियंट सीक्रेट्स ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" किंवा "अमेझिंग पॉवर ऑफ मान्ट्रा-जॅपा" किंवा " हौ टु बिकम वल्ड्ज मोस्ट पॉवर्फुल पर्सनः मिरॅकल ऑफ मान्ट्रा-जॅपा योगा" असे पुस्तक "बेस्ट सेलर" म्हणून बाजारात आणले, की त्यावर उड्या घ्याल, आणि स्तुतिपर धागे काढाल. अरे काही आहे की नाही?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2014 - 9:28 am | अत्रुप्त आत्मा

८०+http://www.sherv.net/cm/emo/smoke/passing-joint-smiley-emoticon.gif = ?

टवाळ कार्टा's picture

19 Jul 2014 - 4:41 pm | टवाळ कार्टा

=))

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2014 - 1:24 pm | श्रीगुरुजी

>>> ४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.

यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.

संजय क्षीरसागर's picture

20 Jul 2014 - 2:27 pm | संजय क्षीरसागर

ते प्रथम सांगा.

चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.

ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?

यालाच "अजपाजप" असेही म्हणतात.

या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad.

तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad.

आपल्या ओळखीत वरील वर्णनाचं कुणी आहे वाटतंय. एवढ्या ठामपणं कसं काय म्हणू शकता?

अर्थात!

तुम्हाला वैयक्तिक अनुभव घ्यायचा असेल तर करा सुरु साधना आणि अजपा सुरु झाला की कळवा. तुमची मुलाखत घेऊ!

प्यारे१'s picture

20 Jul 2014 - 5:47 pm | प्यारे१

:) आमेन!

श्रीगुरुजी's picture

21 Jul 2014 - 9:27 pm | श्रीगुरुजी

>>> तुम्ही कोणत्या स्टेजला आहात ते प्रथम सांगा.

ते तुम्हाला सांगायची गरज नाही आणि सांगून ते तुम्हाला कळणारही नाही.

>>> ग्रंथांचे दाखले ग्रंथात राहूं द्या आणि कोणाही संताला मधे आणू नका. अशी देणगी मिळालेली हयात व्यक्ती तुमच्या पाहण्यात आहे का?

तुमचा ग्रंथांवर विश्वास नाही आणि संतांवरही नाही. तुम्हाला स्वतःला शून्य अनुभव आहे आणि इतरांच्या अनुभवावर विश्वास ठेवायची तुमची तयारी नाही. तुम्ही स्वतः कधी अनुभव घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. तरीदेखील अत्यंत ठामपणे तुम्ही जिलब्या पाडत आहात.

बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.

>>> या स्टेजला गेलेली व्यक्ती पूर्णपणे भ्रमिष्ट झालेली असते! मनावरचं नियंत्रण संपूर्णपणे नाहीसं होणं म्हणजे अजपाजप. मनाची बडबड थांबवताच येत नाही. अश्या व्यक्तीचं संपूर्ण अवधान मनानं वेधून घेतलेलं असतं. स्वतःच्या जाणीवेचा रोख ती व्यक्ती हवा तसा वळवायला असमर्थ होते. तिला समोरच्या गोष्टीवर किंवा हाततल्या कामावर, फोकसच करता येत नाही. The person has gone completely mad.

खरं सांगायचं तर तुम्ही स्वतःच भ्रमिष्ट झालेले दिसताय (कदाचित गेले वर्षभर अखंड केलेल्या "अरविंद" जपाचा परीणाम असावा व त्यातूनच भ्रामकता आली असावी). जप/नामस्मरण यांविषयी कणभरही माहिती किंवा अनुभव नसताना तुम्ही त्याविषयी अत्यंत चुकीच्या आणि भ्रामक कल्पना मनात घट्ट धरलेल्या आहेत आणि आपल्याच भ्रामक कल्पना हेच वैश्विक सत्य आहे अशी चुकीची समजूत करून घेऊन त्या भ्रामक कल्पना ठामपणे मांडत आहात. पोहण्याचा अनुभव घेण्याकरीता किंवा पोहणे शिकण्याकरीता स्वतः पाण्यात उतरावे लागते. निव्वळ जिलब्या पाडण्याऐवजी काही दिवस स्वतः अनुभव घेऊन बघा आणि मग भाष्य करा.

तुमच्या परिचयात अशी कोणी व्यक्ती असेल तर तिला फक्त स्वानुभवाची एक पोस्ट इथे लिहायला सांगा (किंवा तिचं अनुभव कथन तुम्ही लिहा) आणि बघा काय मजा येते ती.

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2014 - 4:05 pm | टवाळ कार्टा

बादवे, अशी देणगी मिळालेल्या अनेक व्यक्ती माझ्या पाहण्यात आहेत.

नावे मिळतील का...एकदा चरणस्पर्श करुन येइन

कवितानागेश's picture

22 Jul 2014 - 4:12 pm | कवितानागेश

केवळ चरणस्पर्श केल्यानी तुम्ही पावन व्हाल ही तुमची अन्धश्रद्धा आहे कार्टासाहेब. ;)
आणि खरोखरच स्पर्शानी काही होत असेल, तर तुमचा स्पर्श करुन घेउन उलट स्वतःच टवाळ होण्याचा धोका कोणता शहाणा माणूस पत्करेल? :P