मंत्रयोग - जपयोग

अनिल तापकीर's picture
अनिल तापकीर in जनातलं, मनातलं
17 Jul 2014 - 4:32 pm

मंत्रयोग - जपयोग
शास्त्रानुसार ज चा अर्थ आहे जन्माचे थांबणे आणि प चा अर्थ आहे पापाचे नष्ट होणे. कुठल्याही शब्दाचे किंवा मंत्राचे वारंवार उच्चारण करणे किंवा मनातल्या मनात वारंवार घोकणे याला जपयोग म्हणतात.
याला मंत्रयोग देखील म्हटले जाते. मंत्राचा अर्थ आहे मनाला एका तंत्रात बांधणे. आणि ज्यावेळी मन एका तंत्रात एका नियमात बांधले जाते तेव्हा ती व्यक्ती मनाने खूप सामर्थ्यशाली बनते. कारण नेमाला खूप महत्व आहे माऊलींनी एका ठिकाणी म्हटले आहे कि, ।। नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ ।। जपयोग हि साधना खूप पुरातन आहे. म्हणूनच सर्व धर्मामध्ये या योगाचे अनुसरण करतात. हा एक चमत्कारी योग आहे. याचा प्रभाव व्यक्तीच्या मनावर व मस्तकावर जबरदस्त पडतो. जप योगामुळे सर्व प्रकारचे रोग आणि दु:ख यातना संपतात.
जपयोगाचे चार प्रकार आहेत १ - वैखरी - आपल्या वाणीने स्पष्ट व मोठ्याने करतात तो वैखरी जप होय.
२- मध्यमा - या मध्ये ओठातल्या ओठात जप केला जातो.
३- पश्यंती - या मध्ये मनातल्या मनात केला जातो यामध्ये ओठ हलत नाही.
४- परा - यामध्ये जप करायचा नसतो तो आपोआप होतो.
पहिल्या तीन प्रकारामध्ये जप प्रयन्त पूर्वक करायचा असतो. चवथा प्रकार जो आहे. तो आपल्याला प्राप्त होत असतो. ती एक दैवी देणगी असते. पहिल्या तीन प्रकारची साधना सफल झाली कि परावाणी प्राप्त होते.
दु:ख- शोक दूर कसे होतात - ज्यावेळी व्यक्ती खूप काळजीत तणावात चिंतेत असते . त्यावेळी ती नकारात्मक विचारांनी घेरली जाते. आणि पहिल्यापेक्षा जास्त संकटात आणि दु:खात पडते. विचार करून करून हैराण होते. सर्वप्रथम या सर्व विचारातून सुटण्यासाठी मन एकाग्र झाले पाहिजे कुठल्याही देवतेच्या सततच्या मंत्र जपाने मन एकाग्र व्हायला लागते आणि मनामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला लागते. आणि तुमच्या सर्व दुःखाचा हळू हळू विनाश व्हायला सुरुवात होते. काही दिवसातच तुम्ही एक आनंदी आणि सामर्थ्यशाली होता.
आपल्या आराध्य देवतेच्या निरंतर जपाने मनुष्य त्या दैवी शक्तीशी जोडला जातो आणि त्या दैवी शक्तीकडून त्याला सर्व प्रकारचे सहाय्य प्राप्त होते. जप योगामुळे दिव्य दृष्टी प्राप्त होते. आणि तो सामर्थ्यशाली तर होतोच पण अंतर्ज्ञानी देखील बनतो.
जपयोगाच्या चमत्काराविषयी सर्व धर्म ग्रंथामध्ये उल्लेख आलेले आहेत. वेदांमध्ये विविध प्रकारच्या मंत्रांचा उल्लेख केलेला आहे. देवतेच्या नाम मंत्रामध्ये खूप शक्ती असते. त्याचा जप केला कि साधारण मनुष्य देखील दैवी शक्ती प्राप्त होऊन सामर्थ्यशाली होतो मंत्रजपाने जे ध्वनी तरंग उठतात त्याने त्या व्यक्तीचे स्थूल व सूक्ष्म अशी दोन्ही शरीरे कंपित होतात. यालाच मंत्रयोग - जपयोग म्हणतात.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

22 Jul 2014 - 4:04 pm | टवाळ कार्टा

दाणकण १०१ वरुन २०१...सेहवागपण इतका भन्नाट खेळत नाही

अत्रुप्त आत्मा यांचा हा अति जबरदस्त प्रतिसाद, फार तिरका होऊ लागल्याने इथे पेष्टवत आहे.

मूळ लिंकः http://misalpav.com/comment/597948#comment-597948

प्रतिसाद खालीलप्रमाणे.

प्र.गो.-हे वाचा आणि थोडा विचार करा.

प्र.गो. आपणे जे म्हणतायत,ते येणे प्रमाणे- जर वेदोक्त शिकायचे असेल,तर मुंजिचा संस्कार करुन शिकावे..आणि ते ज्यांना(द्विजांना) धर्मानी अधिकार दिला आहे त्यांनीच. बाकिच्यांना पुराणोक्ताचा अधिकार आहे.आणि या दोन्हीत श्रेष्ठ/कनिष्ठ असे काहिही नाही. तेंव्हा कमी-जास्त पणाचा आरोप करु नका.

प्र.गो:- हे सगळं तुंम्ही तुमच्या सद्बुद्धीचा कौल लाऊन म्हणताय.(जे शास्त्राला अजिब्बात मान्य नाही.)प्रत्यक्ष वैदिक(ज्याला सामान्यतः हिंदू संबोधतात.)त्या परंपरेत आणि ती परंपरा चालविणार्‍या आमच्या वैदिक आचार्यांमधे वेद मंत्रांची किंमत आणि स्थान हे पुराणोक्ताच्या वरचं आहे. पुराणोक्त कर्म(कांड) करणे..हे दुय्य्यम आणि हलक्या स्वरुपाचं मानलेलं..आचरलेलं आहे. म्हणजे वेदोक्त श्रीखंडासारखं,तर पुराणोक्त मंजे निव्वळ दही साखर...! दोन्हीतले घटक/कृती तीच पण घटीत आणि दर्जा वेगळा! मंत्रातला अर्थ/आशय तोच पण मान आणि दर्जा वेगळा..असा हा मामला आहे. मला या गोष्टी कळल्यावर मी आमच्यातल्या अनेकांना हा प्रश्न विचारला,पण उत्तरं देताना कोणिही पोथीप्रामाण्या बाहेर गेले नाहीत.(एका अर्थी स्वतःच्या अंगावर येणार,ते पोथीच्या अंगावर ढकललं..इतकच)

आता यातही काहि आचार्य/प्रवचनकार/पुरोहित हे वेदमंत्र ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे.(शिकण्याचा नव्हे!) अशी भुमिका (अर्थातच शास्त्रा धार-काढून) घेत असतातच.यातल्या काहिंना असं प्रामाणिकपणे वाटत असतं,की आपण म्हणतो तेच शास्त्रातलं मत बरोब्बर..बाकिची लफंगेगिरी/अप्रामाणिकता.उरलेल्यांना ही उघड विषमता आहे हे कळत असतं,पण लोकांनी ऐकावं म्हणून आणि त्यांनाही परंपरेत राहुन हे साध्य करायचं असल्यानी ते शास्त्राधार घेतात. ..असो!

माझ्या सारख्यांना सावरकरांची वेदामृत सर्वांना पाजा ही माणुसकीपूर्ण भुमिका पटते...त्यामुळे मी ज्याला वेदमंत्र शिकण्याची पात्रता आहे त्या (हिंदुसमाजातल्या) प्रत्येक स्त्री/पुरुषाला..पौरोहित्य किंवा व्यक्तिगत उपासनेसाठी वेद शिकवले पाहिजेत. या मताचा आहे.

आता तुमचा रहाता राहिला मुद्दा विधिनिषेध पाळण्याचा...
तर तुंम्हाला हे नम्रपणे सांगतो की धर्मशास्त्रातले विधिनिषेध हे ऐहिक दृष्ट्या निरर्थक आहेत. निरर्थक म्हणजे - तुलनाच न करता येण्याच्या स्वरुपाचे.

वेदाध्ययना साठी मुंजीचा संस्कार हा विधि करावा लागतो.. हा विधी न करता वेद शिकणे हा निषेध.

आता हे निरर्थक कसं होतं ते पहा...

मुंजीचा संस्कार हा वेदाध्ययनाच्या दालनात शिरायचा गेटपास आहे. पण आपल्या धर्मपरंपरेत हा पास लायकीवर नाही,तर जातिवर मिळतो..ही पहिली विषमता. (आपल्याला CAR शिकायची असेल,तर ज्याला येते त्याला शिकायचा गेटपास म्हणजे लर्निंग लायसनची मुंज करवून मिळते आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास परमनंट लायसन मिळतं..आणि स्वतःची गाडी चालवायचं उपासना स्वातंत्र्य मिळतं..किंवा चालक या पदावर पौरोहित्याची संधी मिळते....म्हणजे जात पाहिली जात नाही..सरळ लायकता पाहिली जाते.. ही ऐहिक समता[आपल्याच लोकसमुहाकरीता] धर्मात का नाही? याचा विचार करा.) ही विषमता आजही जिवंत आहे. वेदपाठशाळांमधे स्त्रीया वा ब्राम्हणेतरांना प्रवेश नाही.याबद्दल तुंम्हाला काय वाटतं?

आता थोडा ग्रंथाधारः- मनु:स्मृती - अध्याय- २ :- श्लोक ३१ ते ४९ हा भाग मुद्दाम वाचा हा खास उपनयनाचे द्विंजांसाठी/त्रैवर्णिकांसाठीचे नियम सांगतो.. हे ही जाती आधारीत आहेत.अध्ययनाकरिता ब्राम्हणापासून पुढे प्रत्येक वर्णाची मुंज ही ४ वर्षांची गॅप ठेऊन सांगणे. कमरे भेवतीच्या मेखला वेगवेगळ्या धाग्यांच्या सांगणे,धरणाचे दंड वेगवेगळ्या वृक्षांचे आणि उंचीचे सांगणे... असा या आमच्या वैदिककॉलेज मधे,,विद्यार्थीसमुहात पाहाता क्षणीच ओळखायला सोप्पा जावा ,असा जन्माधारीत विषमतेचा कडेकोट बंदोबस्त,मनुस्मृतीनी सांगितलेला आहे..विधीनिषेधाच्या नावाखाली हा पाळण्या योग्य मानायचा का? आपल्याला काय वाटतं? शिवाय शूद्रा*ला मुंज करून शिकायला परवानगीच नाही..हे का बरं? पाण्यात उडी मारायला संधीच द्यायची नाही,आणि तू पोहोण्यायोग्य नाहीस असा आधिच निर्वाळा द्यायचा..हे कशाचं लक्षण मानायचं?

शिवाय दुसर्‍या धर्मांमधेही असच आहे..ते बघा..!--- असा सल्ला मधुन मधुन तुंम्ही देता. तर तुंम्हाला ते ही समर्थनीय वाटतं काय? आणि मी किंवा माझ्यासारख्या कुणी ही विषमता माझ्याधर्मापुरती दुर/हद्दपार करायची,आणि धर्मात समता आणायची म्हटली तर त्यात काहि चूक आहे...असं तुम्हाला दुसर्‍या धर्मांचा दाखला देऊन सांगावसं का वाटतं? त्यांचं घर राहू दे ना घाणेरडं आपण आपलं स्वच्छ करू..काय हरकत आहे? असं का वाटत नाही? Smile

*@द्विज/त्रैवर्णिक इत्यादी कलीयुगात नाहीत. कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. ब्राम्हण व *इतर(शूद्र) हे धर्मशास्त्र्यांचं मत आहे. आणि त्यावरूनच शाहू/वेदोक्त प्रकरण झालं होतं. मग तुंम्ही वादापुरतं सुद्धा द्विज म्हणजे त्रैवर्णिकांच्या कथित अधिकाराचं बाहुलं नाचविण्यात काय अर्थ उरतो??? याचाही विचार करा.
====================
प्र.गो:--- मी वर मांडलेले विचार..मुद्दे हे तुंम्हाला हरवण्यासाठी नाहीत. हे जाता जाता नमूद करु इच्छितो.

प्रसाद गोडबोले's picture

22 Jul 2014 - 4:11 pm | प्रसाद गोडबोले

पुढील चर्चा भेटीअंती :)

@प्रगो, तुम्ही ब्राम्हण-शुद्र असा भेदभाव (कोणत्याही स्वरुपात का होईना) इतक्या ठामपणे मांडताना पाहून आश्च्रर्य अन विषाद वाटला.
@अ.आ. आणि बॅटमॅन - अतिशय उत्तम प्रतिसाद, आदर दुणावला.. *good*

प्रगोंसारखे विचार मांडणारेच खरेतर ब्राम्ह्ण-ब्राम्हणेतर मांडणीला खतपाणी घालत असतात, या ना त्या मार्गाने..
हे थांबायला हवं. *stop*

एस's picture

22 Jul 2014 - 6:20 pm | एस

आत्मुबुवा आणि बॅटमॅन यांचे प्रतिसाद आवडले. अगदी नेफळ्यांचेही या लेखातील काही प्रतिसाद विचार करायला लावण्यासारखे.

मी http://www.misalpav.com/comment/597855#comment-597855 इथेही आणि यापूर्वीही खफवर जात्याधारित भेदभाव अथवा उच्चनीचसंकल्पना अजिबात समर्थनीय नाहीत असे म्हटले होते. प्रगोंची या धाग्यावरील मांडणी प्रतिगामी वाटली. कदाचित त्यात विडंबनाचा सूर असेल, पण तसे खरेच असेल तर जाणवले नाही.

अजूनही प्रतिगामित्वाचा असाच अभिनिवेश दाखवला जाणार असेल तर हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा! मानवताधिष्ठित समानतेच्या वाटा आपण स्वतंत्रपणे धुंडाळू. त्यासाठी कुठल्या निरर्थक मंत्रांची वा कर्मकांडांची अजिबात गरज नाही. आमचे गायत्री मंत्र आम्हीच लिहू. आमचा देव असलाच तर आम्हीच शोधू. हाकानाका. :-)

प्रसाद गोडबोले's picture

22 Jul 2014 - 6:26 pm | प्रसाद गोडबोले

हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा! मानवताधिष्ठित समानतेच्या वाटा आपण स्वतंत्रपणे धुंडाळू. त्यासाठी कुठल्या निरर्थक मंत्रांची वा कर्मकांडांची अजिबात गरज नाही. आमचे गायत्री मंत्र आम्हीच लिहू. आमचा देव असलाच तर आम्हीच

पर्फेक्ट !
स्पॉट ऑन !
बुल्स आय !

मी हेच सांगायचा प्रयत्न करत होतो ... आपल्याला जे पटत्ट नाही ते करायचा अट्टहास हट्टाग्रह कशासाठी ... ते ज्याला जसे करायचे तसे ते करु दे ... आपण आपला वेगळा मार्ग निवडु ... "पण पटत नाही तेच करणार तेही आम्हाला वाट्टेल तसेच" हा असा अ‍ॅटीट्युड का आहे हे माहीत नाही :)

अजूनही प्रतिगामित्वाचा असाच अभिनिवेश दाखवला जाणार असेल तर हवाय कशाला तो धर्म आणि त्या परंपरा!

जर चार लोकांनी चार ओळीचा एक मंत्र म्हटल्याने यांचा धर्म बुडणार असेल तर असा धर्म बुडलेलाच बरा!

प्रसाद गोडबोले's picture

22 Jul 2014 - 6:30 pm | प्रसाद गोडबोले

धर्म बुडणार असेल तर असा धर्म बुडलेलाच बरा!

देअर यु आर ! मी हेच म्हणत होतो की ब्यॅटा !

बुदणारा धर्म बुडु दे की निवांतपणे त्याच्या ष्टाईल ने ... पण आम्हाला तोच हवा आहे आणि आम्ही तोच सुधारणा करुन तरंगवायचा प्रयत्न करणार हा अट्टहास का ? हेच तर विचारत होतो मी *pardon*

बॅटमॅन's picture

22 Jul 2014 - 6:37 pm | बॅटमॅन

मुळात अमुक अमुक गोष्ट करण्याच्या इच्छेला अट्टाहास म्हणण्यामागचे लॉजिकच गंडलेले आहे तिथे बाकी बोलण्यात अर्थ काय? तुमची ती डिफॉल्ट पोझिशन, बाकीच्यांचा तो अट्टाहास हे समीकरण कुठवर ताणणार?

गायत्री मंत्रावर द्विजांची मक्तेदारी नाही. धर्मशास्त्रे जे सांगतात त्यातले सगळेच घ्यायचे नसते, तारतम्य ठेवावे लागते. पण तारतम्याला अट्टाहास आणि सिलेक्टिव्ह रीडिंग अशी लेबले लावली जात असतील तर इलाज नाही. पण सुदैवाने आज अशा पोझिशनवाल्यांची किरकिर एखाद्या कोपर्‍याबाहेर येत नाही ते बरेय.

जर धर्माचे असे मक्तेदार धर्मातील त्याज्य भाग वगळायला/बदलायला तयार नसतील तर परिघाबाहेरचे आणि परिघ मंजूर नसलेलेही आपल्या स्वतंत्र वाटा चोखाळतीलही. पण त्यामुळे प्रतिगाम्यांवरील संकुचिततेच्या आरोपाची धार अथवा त्यांचे सुधारणेप्रतीचे उत्तरदायित्व किंचितही कमी होत नाही.

पण त्यामुळे प्रतिगाम्यांवरील संकुचिततेच्या आरोपाची धार अथवा त्यांचे सुधारणेप्रतीचे उत्तरदायित्व किंचितही कमी होत नाही.

सहस्रशः सहमत!

नानासाहेब नेफळे's picture

22 Jul 2014 - 6:53 pm | नानासाहेब नेफळे

बुडणारा धर्म बुडू दे त्याच्या स्टाईलने

प्रगो, आता एक डीस्क्लोजर टाकाच तुम्ही, की वैदीक धर्म आणि हिंदू धर्म हे दोन वेगवेगळे धर्म आहेत ते.

ही आता अशी माघार नाय घ्यायची ओ गिर्जाकाका.

अधिराज's picture

22 Jul 2014 - 5:10 pm | अधिराज

येस्स! यु कॅन डू इट, गिर्जाकाकू!

प्रसाद गोडबोले's picture

22 Jul 2014 - 5:20 pm | प्रसाद गोडबोले

टाकली काडी *biggrin*

मुद्दा इतकाच आहे की ....

चर्चेअंती बोलु *biggrin*

प्रचेतस's picture

22 Jul 2014 - 5:24 pm | प्रचेतस

म्हणजे भुलेश्वरला :०

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2014 - 5:35 pm | अत्रुप्त आत्मा

@चर्चेअंती बोलु >>> +++१११ प्रत्यक्ष भेटीतच बोलू . *i-m_so_happy* कारण हा विषय वन टू वनचाच आहे.

अत्यंत समांतरः- त्या आगोबाhttp://www.sherv.net/cm/emoticons/war/shooting-ak47-gun.gif आगलावेंकडे :-/ अज्जिब्बात लक्ष देऊ नका!
त्यांना सवयच आहे ही http://www.sherv.net/cm/emoticons/war/dynamite.gif जुनी! *ROFL*

बाळ सप्रे's picture

22 Jul 2014 - 5:26 pm | बाळ सप्रे

माघार नाय घेणार अशा गिर्जाकाकू

तिरक्या प्रतिसादातला शेवटचा प्रतिसाद असा आहे त्यांचा..

प्रगो - Tue, 22/07/2014 - 16:06

आय थिंक आय कॅन स्टिल डिफेन्ड माय पॉईट !

आता आत्मूबुवांच्या एकेका लायनीला १० लायनी असा मोठा प्रतिसाद येइल बघा.. :-)

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jul 2014 - 6:57 pm | llपुण्याचे पेशवेll

हो ही विषमता मला काही बाबतीत समर्थनीय वाटते. याबतीतले अधिक चिंतन वाचायचे असेल तर वरदानंद भारतींच्या मनुस्मृतीच्या भाषांतराची त्यांनी लिहीलेली अनुक्रमणिका वाचा.

ज्या विषमतेत आपण स्वतः उच्च स्थानावर असतो ती समर्थनीय वाटणं साहजिकच आहे. :)

धन्या's picture

22 Jul 2014 - 7:08 pm | धन्या

खिळ्याला डोक्यावरच ठोकलंत तुम्ही.

नानासाहेब नेफळे's picture

22 Jul 2014 - 7:15 pm | नानासाहेब नेफळे

आणि ते समर्थन नेहमीच स्वार्थातून आणि सत्ताभ्रष्ट होण्याच्या भीतीतून आलेले असते...

नानासाहेब नेफळे's picture

22 Jul 2014 - 10:39 pm | नानासाहेब नेफळे

ब्याटम्यानचा पुरोगामीत्वाचा इंडेक्स वाढतोय

अधिराज's picture

22 Jul 2014 - 8:31 pm | अधिराज

क्या बात! क्या बात!! एकच हाणला पण सॉलिड हाणला!

अधिराज's picture

22 Jul 2014 - 8:31 pm | अधिराज

क्या बात! क्या बात!! एकच हाणला पण सॉलिड हाणला!

नानासाहेब नेफळे's picture

22 Jul 2014 - 10:41 pm | नानासाहेब नेफळे

क्या बात! क्या बात! क्या बात!

मान गये अतृप्त आत्माजी! खूपच छान विचार मांडले आहेत आपण.

कवितानागेश's picture

22 Jul 2014 - 4:17 pm | कवितानागेश

या सगळ्या भानगडीत अनुराधा पौडवालची मुंज झालीये की नाही हे कळलंच नाही..... =))

आणि नसेल तर तिला कसली शिक्षा देणार तेही कळ्ळं नै =)) तापलेल्या शिशाचा रस कानात ओतणे इ.इ. ;)

प्रसाद गोडबोले's picture

22 Jul 2014 - 5:03 pm | प्रसाद गोडबोले

त्या पेक्षा कानात तिच्याच आवाजातल्या ठिबक सिंचनाचे मशीन लावुन गायत्री रस ओतण्याची शिक्षा कशी वाटते *music2* ;) *crazy*

बॅटमॅन's picture

22 Jul 2014 - 5:08 pm | बॅटमॅन

=))

सध्या जेलमध्ये असणारे एक बाबा ,"संसारी स्त्रियांनी ॐचा जप करू नये" असे काही वर्षांपूर्वी म्हणताना ऐकल्याचे आठवते.

स्वप्नांची राणी's picture

22 Jul 2014 - 6:39 pm | स्वप्नांची राणी

"संसारी स्त्रियांनी ॐचा जप करू नये"....

करु द्या हो जप. ॐचा जप केल्यामुळे जादू येतो...संसारी स्त्रियांना तेव्हढाच टाईमपास...

करा कि जप कोण नाही म्हणतंय, ती मुक्ताफळे सध्या जेलमध्ये असणर्‍या एका बाबाची आहेत. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जपामुळे जादू का फादू येतो ते माहित नाही पण त्या बाबाच्या मते ॐचा जप केल्याने संसारी स्त्रियांना विरक्ती येऊ शकते आणि प्रॉब्लेम होऊ शकतो. हे असले बिनबुडाचे विधीनिषेध पाळणे म्हणजेच धर्मपालन असे विचार वरील काही प्रतिसादांत आहेत.

स्वप्नांची राणी's picture

23 Jul 2014 - 10:52 am | स्वप्नांची राणी

फादू कोण..? जादू च येतो...कोई मिल गया मधला...म्हणुन बघा 'आँओंओंओंओंम्म्म्म्म्म'

असे चिडू नका..जप करा म्हणजे असं बिनबुडाचे चिडणे पळेल..

अधिराज's picture

23 Jul 2014 - 11:08 am | अधिराज

अभिनंदन व पु. वा. शुभेच्छा!
:)) :)) :))

काय करावं. नामस्मरणावर शंका नको घेऊयात. कोणीतरी विचारलं तुम्ही असा मानूस पाहीलाय का? हो, तुम्हालाही दाखऊ शकतो.

जयांचे वाचेपुढां भेजें। नाम नाचत असे माझे। जें जन्मसहस्री ओळगिजे। एक वेळ मुखासि यावया।।

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2014 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

खालचा अत्रूप्त आत्मा यांचा प्रतिसाद खूप म्हणजे खूपच आवडला.

पण प्रति-प्रति-प्रतिसादांच्या खेळात त्याची रुंदी इतकी लहान झाली होती की तो वाचकांच्या डोळ्यातून सहज निसटून जावा. शिवाय अरूंदीमुळे वाचायला लै म्हनजे लैच कठीण ! मलाही जरा जोर लावूनच वाचायला लागला.

इतका सुंदर 'वजनदार' प्रतिसाद दुर्लक्षित होऊ नये याच प्रेरणेने जनतेच्या सेवेसाठी तो इथे 'पूर्ण जाडी'मध्ये चोप्य पस्ते करण्याचे समाजिक कार्य करत आहे...

==============================

प्र.गो.-हे वाचा आणि थोडा

अत्रुप्त आत्मा - Tue, 22/07/2014 - 13:29

प्र.गो.-हे वाचा आणि थोडा विचार करा.

प्र.गो. आपणे जे म्हणतायत,ते येणे प्रमाणे- जर वेदोक्त शिकायचे असेल,तर मुंजिचा संस्कार करुन शिकावे..आणि ते ज्यांना(द्विजांना) धर्मानी अधिकार दिला आहे त्यांनीच. बाकिच्यांना पुराणोक्ताचा अधिकार आहे.आणि या दोन्हीत श्रेष्ठ/कनिष्ठ असे काहिही नाही. तेंव्हा कमी-जास्त पणाचा आरोप करु नका.

प्र.गो:- हे सगळं तुंम्ही तुमच्या सद्बुद्धीचा कौल लाऊन म्हणताय.(जे शास्त्राला अजिब्बात मान्य नाही.)प्रत्यक्ष वैदिक(ज्याला सामान्यतः हिंदू संबोधतात.)त्या परंपरेत आणि ती परंपरा चालविणार्‍या आमच्या वैदिक आचार्यांमधे वेद मंत्रांची किंमत आणि स्थान हे पुराणोक्ताच्या वरचं आहे. पुराणोक्त कर्म(कांड) करणे..हे दुय्य्यम आणि हलक्या स्वरुपाचं मानलेलं..आचरलेलं आहे. म्हणजे वेदोक्त श्रीखंडासारखं,तर पुराणोक्त मंजे निव्वळ दही साखर...! दोन्हीतले घटक/कृती तीच पण घटीत आणि दर्जा वेगळा! मंत्रातला अर्थ/आशय तोच पण मान आणि दर्जा वेगळा..असा हा मामला आहे. मला या गोष्टी कळल्यावर मी आमच्यातल्या अनेकांना हा प्रश्न विचारला,पण उत्तरं देताना कोणिही पोथीप्रामाण्या बाहेर गेले नाहीत.(एका अर्थी स्वतःच्या अंगावर येणार,ते पोथीच्या अंगावर ढकललं..इतकच)

आता यातही काहि आचार्य/प्रवचनकार/पुरोहित हे वेदमंत्र ऐकण्याचा अधिकार सर्वांना आहे.(शिकण्याचा नव्हे!) अशी भुमिका (अर्थातच शास्त्रा धार-काढून) घेत असतातच.यातल्या काहिंना असं प्रामाणिकपणे वाटत असतं,की आपण म्हणतो तेच शास्त्रातलं मत बरोब्बर..बाकिची लफंगेगिरी/अप्रामाणिकता.उरलेल्यांना ही उघड विषमता आहे हे कळत असतं,पण लोकांनी ऐकावं म्हणून आणि त्यांनाही परंपरेत राहुन हे साध्य करायचं असल्यानी ते शास्त्राधार घेतात. ..असो!

माझ्या सारख्यांना सावरकरांची वेदामृत सर्वांना पाजा ही माणुसकीपूर्ण भुमिका पटते...त्यामुळे मी ज्याला वेदमंत्र शिकण्याची पात्रता आहे त्या (हिंदुसमाजातल्या) प्रत्येक स्त्री/पुरुषाला..पौरोहित्य किंवा व्यक्तिगत उपासनेसाठी वेद शिकवले पाहिजेत. या मताचा आहे.

आता तुमचा रहाता राहिला मुद्दा विधिनिषेध पाळण्याचा...
तर तुंम्हाला हे नम्रपणे सांगतो की धर्मशास्त्रातले विधिनिषेध हे ऐहिक दृष्ट्या निरर्थक आहेत. निर्रर्थक म्हणजे - तुलनाच न करता येण्याच्या स्वरुपाचे.

वेदाध्ययना साठी मुंजीचा संस्कार हा विधि करावा लागतो.. हा विधी न करता वेद शिकणे हा निषेध.

आता हे निर्रर्थक कसं होतं ते पहा...

मुंजीचा संस्कार हा वेदाध्ययनाच्या दालनात शिरायचा गेटपास आहे. पण आपल्या धर्मपरंपरेत हा पास लायकीवर नाही,तर जातिवर मिळतो..ही पहिली विषमता. (आपल्याला CAR शिकायची असेल,तर ज्याला येते त्याला शिकायचा गेटपास म्हणजे लर्निंग लायसनची मुंज करवून मिळते आणि त्यात उत्तीर्ण झाल्यास परमनंट लायसन मिळतं..आणि स्वतःची गाडी चालवायचं उपासना स्वातंत्र्य मिळतं..किंवा चालक या पदावर पौरोहित्याची संधी मिळते....म्हणजे जात पाहिली जात नाही..सरळ लायकता पाहिली जाते.. ही ऐहिक समता[आपल्याच लोकसमुहाकरीता] धर्मात का नाही? याचा विचार करा.) ही विषमता आजही जिवंत आहे. वेदपाठशाळांमधे स्त्रीया वा ब्राम्हणेतरांना प्रवेश नाही.याबद्दल तुंम्हाला काय वाटतं?

आता थोडा ग्रंथाधारः- मनु:स्मृती - अध्याय- २ :- श्लोक ३१ ते ४९ हा भाग मुद्दाम वाचा हा खास उपनयनाचे द्विंजांसाठी/त्रैवर्णिकांसाठीचे नियम सांगतो.. हे ही जाती आधारीत आहेत.अध्ययनाकरिता ब्राम्हणापासून पुढे प्रत्येक वर्णाची मुंज ही ४ वर्षांची गॅप ठेऊन सांगणे. कमरे भेवतीच्या मेखला वेगवेगळ्या धाग्यांच्या सांगणे,धरणाचे दंड वेगवेगळ्या वृक्षांचे आणि उंचीचे सांगणे... असा या आमच्या वैदिककॉलेज मधे,,विद्यार्थीसमुहात पाहाता क्षणीच ओळखायला सोप्पा जावा ,असा जन्माधारीत विषमतेचा कडेकोट बंदोबस्त,मनुस्मृतीनी सांगितलेला आहे..विधीनिषेधाच्या नावाखाली हा पाळण्या योग्य मानायचा का? आपल्याला काय वाटतं? शिवाय शूद्रा*ला मुंज करून शिकायला परवानगीच नाही..हे का बरं? पाण्यात उडी मारायला संधीच द्यायची नाही,आणि तू पोहोण्यायोग्य नाहीस असा आधिच निर्वाळा द्यायचा..हे कशाचं लक्षण मानायचं?

शिवाय दुसर्‍या धर्मांमधेही असच आहे..ते बघा..!--- असा सल्ला मधुन मधुन तुंम्ही देता. तर तुंम्हाला ते ही समर्थनीय वाटतं काय? आणि मी किंवा माझ्यासारख्या कुणी ही विषमता माझ्याधर्मापुरती दुर/हद्दपार करायची,आणि धर्मात समता आणायची म्हटली तर त्यात काहि चूक आहे...असं तुम्हाला दुसर्‍या धर्मांचा दाखला देऊन सांगावसं का वाटतं? त्यांचं घर राहू दे ना घाणेरडं आपण आपलं स्वच्छ करू..काय हरकत आहे? असं का वाटत नाही? Smile

*@द्विज/त्रैवर्णिक इत्यादी कलीयुगात नाहीत. कलियुगात दोनच वर्ण अस्तित्वात आहेत. ब्राम्हण व *इतर(शूद्र) हे धर्मशास्त्र्यांचं मत आहे. आणि त्यावरूनच शाहू/वेदोक्त प्रकरण झालं होतं. मग तुंम्ही वादापुरतं सुद्धा द्विज म्हणजे त्रैवर्णिकांच्या कथित अधिकाराचं बाहुलं नाचविण्यात काय अर्थ उरतो??? याचाही विचार करा.
====================
प्र.गो:--- मी वर मांडलेले विचार..मुद्दे हे तुंम्हाला हरवण्यासाठी नाहीत. हे जाता जाता नमूद करु इच्छितो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jul 2014 - 8:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

शंभर नंबरी विचार !!!

सगळ्यात आश्चर्य वाटते ते याच गोष्टीचे की:

(१) विषमतावादी विचारांनी हिंदू धर्माने आपल्यातल्या काही जणांना वेगळे वागवून दूर ठेवले... (इतर बहुतेक धर्मांत अगदी सर्वच समभाव नसला तरी तशी शिकवण आणि बर्यापैकी वागणूक तरी आहे)

(२) आपल्या धर्मातल्या लोकांना क्षुल्लक कारणांवरून धर्मबाह्य करायला पुढेमागे पाहिले नाही... (इतर बहुतेक धर्मांत धर्माबाहेर जाण्यास कडाडून विरोध केला जातो, त्याला अगदी देहदंडापर्यंतही शिक्षा आहे)

(३) इतर धर्मातल्या लोकांनी आपल्या धर्मात यावे यासाठी काहिही संघटीत प्रयत्न तर केले नाहीत... (इतर बहुतेक धर्मात या साठी साम, दाम, दंड, भेद यशस्वी रित्या वापरले गेले आहेत.)

(४) धर्मांतर करून गेलेल्यांना परत धर्मात घेण्यात विरोध केला गेला / जातो... (हे तर हिंदू धर्म सोडून इतर धर्मात असेल असे वाटत नाही... जागतिक पातळिवरील मुख्य धर्मांत तर नाहीच नाही)

आणि इतके सर्व असूनही हिंदू धर्म जगभर मान्यता पावेल (किंवा पावावा) अशी स्वप्ने पाहिली जातात ! !

आणि त्यावर वरकड म्हणजे हिंदूबहुल भारतात हिंदू धर्माला काहीच महत्व नाही म्हणून आश्चर्यमिश्रित दु:ख व्यक्त केले जाते !!!

सर्वसमभाव आणि समान संधी या दोन गोष्टी धोरणात असल्याशिवाय आणि त्यांचा व्यवहारात परिणाम दिसणारे क्रिटीकल मास असल्याशिवाय कोणत्याही संघटनेला बळ येत नाही अथवा त्याच्या घटकांना तिच्याबद्दल आत्मियता वाटत नाही... आणि या तत्वाला धर्मसंस्थाही अपवाद नाही.

हिंदू धर्माबद्दल खरेच आत्मियता असेल आणि त्याची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर कालाबाह्य, संकुचित आणि हितसंबधी प्रथा-रुढींना दूर करणार्‍या प्रामाणिक, हितसंबद्धरहित, मूलभूत धर्मप्रवर्तनाची (ग्रासरूट रिफॉर्म्स) गरज आहे... एकप्रकारे सर्वसमावेशी, सर्वसमभावी नवहिंदू धर्म व्यवहारात आणण्याची गरज आहे.

(२) आपल्या धर्मातल्या लोकांना क्षुल्लक कारणांवरून धर्मबाह्य करायला पुढेमागे पाहिले नाही... (इतर बहुतेक धर्मांत धर्माबाहेर जाण्यास कडाडून विरोध केला जातो, त्याला अगदी देहदंडापर्यंतही शिक्षा आहे)

(३) इतर धर्मातल्या लोकांनी आपल्या धर्मात यावे यासाठी काहिही संघटीत प्रयत्न तर केले नाहीत... (इतर बहुतेक धर्मात या साठी साम, दाम, दंड, भेद यशस्वी रित्या वापरले गेले आहेत.)

(४) धर्मांतर करून गेलेल्यांना परत धर्मात घेण्यात विरोध केला गेला / जातो... (हे तर हिंदू धर्म सोडून इतर धर्मात असेल असे वाटत नाही... जागतिक पातळिवरील मुख्य धर्मांत तर नाहीच नाही)

आणि इतके सर्व असूनही हिंदू धर्म जगभर मान्यता पावेल (किंवा पावावा) अशी स्वप्ने पाहिली जातात ! !

मस्त प्रतिसाद!!
हिंदूंनीच बाटवणं सोपं करुन दिलं असं बर्‍याचदा वाटतं. बाटवतात म्हणजे काय? मागे एकदा(बहुधा चित्रगुप्तांनी) म्हटल्याप्रमाणे त्यांनी विहीरीत गोमांस टाकलं तर तुम्ही ती गोमूत्र टाकून पवित्र करुन घ्यायची होतीत, आपल्याकडची जानवी घालून त्यांना आता तुम्हीच हिंदू झालात असं सांगायचं होतं. मूळचे हिंदू पण पोर्तुगीजांनी बाटवलेल्या एखाद्या किरिस्तावाची लेक सून म्हणून घरात आणली तर आजच्या काळात सुद्धा किती लोक हसत स्वीकारतील हा प्रश्न आधी स्वतःला विचारावा आणि मग हिंदू धर्माचे गोडवे वैगरे गावे.

हाडक्या's picture

23 Jul 2014 - 7:44 pm | हाडक्या

अहो पण एक जण (वेदोक्त/पुराणोक्त समर्थक) इथे काय म्हणतोय पाहिलंत का ?

बुदणारा धर्म बुडु दे की निवांतपणे त्याच्या ष्टाईल ने ... पण आम्हाला तोच हवा आहे आणि आम्ही तोच सुधारणा करुन तरंगवायचा प्रयत्न करणार हा अट्टहास का ? हेच तर विचारत होतो मी

म्हणजे यांचे महत्त्व जपणारा धर्म यांची जहागिरच जणु. इतरांनी सोडून जावे, धर्म बुडणार असेल तर बुडो द्यावा. आणि हे कोण इतरांना सोडून जायला सांगणारे टिकोजीराव ?

जात-पात मानत नसताना देखील असले जहागिर्दार (बिग्रेडी वा सोवळे) पाहिले की डोक्यात जातात.

असो. ई.ए. ना +१ !

एस's picture

22 Jul 2014 - 10:35 pm | एस

वरती बॅटमननीपण हेच सामाजिक कार्य करून ठेवले होते की वो! ;-) असो. आत्मुंचा प्रतिसादच तेवढा भारी होता.

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 1:47 pm | प्यारे१

द्विरुक्ती करुन प्रतिसाद ठसवायचं आणखी एक सामाजिक कार्य इ ए ह्यांनी केलंय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2014 - 7:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

आत्मुस यांचा प्रतिसाद वाचून त्याखाली माझा पतिसाद टंकताना बॅटमन यांचा प्रतिसाद दिसला नव्हता. पन तरीही मूळ प्रतिसाद इतका चांगला आहे की व्दिरुक्तीचा दोष घ्यायला माझी अजिबात हरकत नाही. :)

vikramaditya's picture

22 Jul 2014 - 8:35 pm | vikramaditya

विषय मांडण्याची जागा(मंच)साफ चुकली, हे त्यांच्या लक्षात आले आहे. असो.

“Faith is taking the first step even when you can't see the whole staircase.”

― Martin Luther King Jr.

*bye*

प्यारे१'s picture

22 Jul 2014 - 10:37 pm | प्यारे१

>>>> Martin Luther King Jr.

मराठी आंतरजालीय सदस्य खचितच नसणार हा. अहो नावाचाच 'ज्युनिअर' आहे ना! ;)

खटपट्या's picture

22 Jul 2014 - 11:38 pm | खटपट्या

जबरी चर्चा चालू आहे राव !!
आत्मुबाबांचा प्रतिसाद तर फ्रेम करून ठेवण्यासारखा आहे.
बैट्मन साहेबांनी पुरोगामित्वाचा लढा दिलाय त्याला तोड नाही.
स्पा असे म्हणाले कि फक्त अशा चर्चांसाठी मिपा राहिलेय. माझ्यामते हीच मिपाची खासियत आहे.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 12:05 pm | प्रसाद गोडबोले

२८२ झालेत अजुन १८ हुवुन्द्या ... म्हणजे त्रीपल सेन्च्युरी होईल *biggrin*

योगायोगाने सध्द्या दुसर्‍या एका मराठी संकेतस्थळावरही सिमिलर चर्चा चालु आहे )मी तिथे अजिबात ब्यॅटींग केलेली नाहीये हं )... पण तिथे एकाने मस्त सिक्सर मारलाय तो इथे शेयर करायचा मोह आवरत नाहीये

"वेद हे अपौरुषेय आहेत म्हणजेच वेद हे पुरुषांनी लिहिलेले नसुन स्त्रीयांनीच लिहिलेले आहेत "

*biggrin*

बॅटमॅन's picture

23 Jul 2014 - 5:16 pm | बॅटमॅन

=))

वेदांतले किमान एक सूक्त लिटरली अपौरुषेय आहे. अंभृणी या ब्रह्मवादिनीने रचलेले सूक्त- ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातले १२५ वे सूक्त. बाकीचं माहिती नै.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 10:43 pm | प्रसाद गोडबोले

४००+ साठी ही काडी

आमच्या माहितीनुसार मंडल १ व १० प्रक्षिप्त आहेत व नंतर घुसडण्यात आलेली आहेत *biggrin*

मिपाय स्वाहा मिपाय इदम् न मम् =))

माझ्या दृष्टीने नामस्मरण हे "वडाच्या झाडाकडे एकटक पाहिल्याने त्रास होतोय तर आंब्याच्या झाडाकडे बघ" असं सांगण्यासारखे आहे.

जगातील इतर वाईट गोष्टींवरील चित्त हटवून "देव" या चांगल्या गोष्टीवर चित्त केंद्रीत करा, असं काहीसं.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 5:12 pm | प्रसाद गोडबोले

चांगल्या गोष्टींवर चित्त केंद्रित करण्याला कधी कधी इव्ह टीझींग म्हणतात .

धन्या's picture

23 Jul 2014 - 5:17 pm | धन्या

तीनशेच्या उंबरठयावर येऊन धागा थंडावला होता. वर यावा म्हणून थोडा जाळ सारला झालं.

तसंच काहीसं. मान्य. बहुतांशी पोषकही. (कंडीशन्स अप्लाय)

काहीही न करता नाम घ्या असा अ‍ॅप्रोच नक्कीच चुकीचा असतो. पण काहीही चळवळ न करता नुसती चुळबूळ असेल तर त्यापेक्षा नाम कधीही चांगलं. :)

- विथ ड्यु रिस्पेक्ट 'धाग्याचं काश्मीरपेक्षा धाग्याची जपमाळ केली/ झाली','इंच इंच लढवू ऐवजी मणी मणी ओढू' अशा वाक्प्रचार वापराच्या प्रतीक्षेत. ;)

कवितानागेश's picture

23 Jul 2014 - 5:33 pm | कवितानागेश

पण मग बिघडलं कुठे?

बिघडलं कुठे? मी फक्त मला काय वाटतं ते सांगितलं.

एस's picture

23 Jul 2014 - 5:23 pm | एस

तीनेशेवा टंकायची संधी हुकली! :-(

हा माझा प्रतिसाद कितवा आहे?

कवितानागेश's picture

23 Jul 2014 - 5:59 pm | कवितानागेश

जपावरचा धागा आहे. असा जप मोजू नये, यशो.
आपण आपले प्रतिसाद देत जावे. मोजणारा वरती बसलाय. ;)

जप असा करतात होय? स्वानुभूती सांगतेयस ना? स्वानुभूती नसेल तर बोलायचं काम नाय हां (असं म्हणतात म्हणे ) ;)

ज्याअर्थी त्यांनी "मोजणारा वरती बसलाय" असं लिहिलंय त्याअर्थी स्वानुभूती नसावी. :)

जपाबद्दल विचारलं मी धन्या. वर्ती बसणार्‍याबद्दल नाही. :)

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 6:30 pm | प्यारे१

सानुभूती की स्वानुभूति की सहानुभूति?
स्वानुभूति असलं तरी स्व ची अनुभूति की स्व ला झालेली अनुभूति?
स्व ला झालेली अनुभूति दुसर्‍याला का नि कशी समजणार?
तसं होत नसेल तर काय करावं?
मी कोण आहे?
मी कुठं आहे?
मी आहे ?

बॅटमॅन's picture

23 Jul 2014 - 6:41 pm | बॅटमॅन

अहो, सुप्रा कॉन्शसच्या लेव्हलवरून ऑकल्ट एक्स्पीरिअन्सेस घेताना...

पण तुम्ही गुरुदेवांचं 'इ ट्यून विथ द ट्यून' वाचलं आहे का?

मीच लिहिलंय, गुरुदेव स्वतः स्वप्नात आले आणि म्हणाले, लिही!

परिक्षण लिहायला दिलं नाय काय अजून? *mosking*

बॅटमॅन's picture

23 Jul 2014 - 7:06 pm | बॅटमॅन

गुरुदेवांच्या शिकवणीचं परीक्षण????? तौबा तौबा..या शिर्क साठी खरे तर काली फॉसीफोरमच दिली पाहिजे, पण असो =))

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 7:29 pm | टवाळ कार्टा

=))

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 6:56 pm | प्रसाद गोडबोले

सानुभूती की स्वानुभूति की सहानुभूति?
स्वानुभूति असलं तरी स्व ची अनुभूति की स्व ला झालेली अनुभूति?
स्व ला झालेली अनुभूति दुसर्‍याला का नि कशी समजणार?
तसं होत नसेल तर काय करावं?
मी कोण आहे?
मी कुठं आहे?
मी आहे ?

हे असं गांजा पिल्यावर होतं =)) म्हणुन म्हणतो की दारु परवडली *biggrin*

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 7:16 pm | प्यारे१

अनुभव नाही.

आम्ही काहीही इन्टेक न घेता वरील अवस्था काही (च्या बाही) प्रतिसाद वाचून 'प्राप्त' करुन घेतलेली आहे.

दारुबाबतः सध्या 'रमादान करिम' रे बाबा! मिळता मिळत नाही. ;)

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 7:56 pm | टवाळ कार्टा

४००+ जाणार... काश्मिरपण पार करेल... कदाचीत धाग्यावर मंत्र-जप पडणे असा नवा वक्प्रचार वाक्प्रचार मीळेल मिपावर :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2014 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

धाग्याच्या पत्रिकेत "मंत्रयोग - जपयोग" आहे / दिसतोय, असाही वाकप्रचार पडायला हरकत नाही ;) =))

टवाळ कार्टा's picture

23 Jul 2014 - 8:41 pm | टवाळ कार्टा

धाग्याच्या पत्रिकेत "मंत्रयोग - जपयोग" आहे / दिसतोय

हे जास्त चांगले आहे :)

कोण म्हणतं मंत्राचा प्रभाव पडत नाही, ह्या धाग्याचेच उदाहरण घ्या, सुरवातीला मंदगतीने चालणारा हा धागा काही महात्म्यांनी खालील मंत्र सोडल्यावर ३००+पर्यंत मजल मारू शकला.

१. इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||
२. या देवि आंतर्जालेषु संस्थलरुपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 10:38 pm | प्रसाद गोडबोले

इन्टर्नेटाय विद्महे | सर्च इंजिनाय धीमही | तन्नो गुगल प्रचोदयात ||

नोट ह्या मंत्राचा अधिकार फक्त मिपाकरांनाच आहे *biggrin* )

पूर्वाश्रमीचे गिर्जा असल्याने हा मंत्र एका पूर्वाश्रमीच्या ब्रह्मवादिनीने रचला आहे असंही म्हणू शकता. ;)

अधिराज's picture

24 Jul 2014 - 9:31 am | अधिराज

>>>>>हा मंत्र एका पूर्वाश्रमीच्या ब्रह्मवादिनीने रचला आहे

म्हणजेच हा मंत्र अपौरुषेय आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे ना? :)

>>म्हणजेच हा मंत्र अपौरुषेय आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे ना?

अगदीच तसं नाही, पण तसंच काहीतरी. ;)

>>>नोट ह्या मंत्राचा अधिकार फक्त मिपाकरांनाच आहे
ह्या मंत्रजपाचे काही विधीनिषेध असतील तर तेही सांगा. Meditation

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 11:20 am | प्रसाद गोडबोले

ह्या मंत्रजपाचे काही विधीनिषेध असतील तर तेही सांगा.

हा मंत्र ऑफीसात त्यातही बेन्चवर असतानाच मिपावर ज्ञानपुर्ण प्रतिसाद टाकणार्‍यांसाठीच आहे ... इतरांनी हा मंत्र वापर नये अशी सक्त ताकीद आहे *biggrin*

नाम घेण्यावरुन चर्चा चालू आहे. मात्र तेहतीस कोटी देवांपैकी कुठल्या देवाचं नांव घ्यायचं ते कुणीच नाही लिहिलं राव.

याबाबतचा माझा काही अनुभवः

१. श्रावण महिन्यात आमच्या घरी ग्रंथवाचन व्हायचे. हरीविजय, रामविजय, पांडवप्रताप, काशीखंड, भक्तविजय, शीवलिलामृत, एकनाथी भागवत या अशा अनेक ग्रंथांचे वाचन व्हायचे. या ग्रंथांमध्ये जे दैवत ग्रंथाचा विषय असेल त्या देवाचा उदो उदो केलेला असतो. बाकीचे देव या देवाला आपली संकटे दूर करण्यासाठी कसे शरण येतात याची पाल्हाळीक वर्णने असतात.

२. तोच प्रकार पौराणिक दुरदर्शन मालिकांच्या बाबतीत. ज्या देवतेबद्दल मालिका ती देवता श्रेष्ठ दाखवली जाते. उदा. देवोंके देव महादेव ही मालिका. सारे देव हात जोडून "भोलेनाथ अब आपही हमको बचा सकते हैं" म्हणत काकुळतीला आलेले असतात.

तर प्रश्न असा आहे की समजा नामस्मरणाने काही लाभ होतो असं गृहीत धरलं तर कोणत्या देवतेचे नामस्मरण करणे अधिक चांगले?

माताय !! आता तर पाचशे कुठेच नाय गेले. *acute*

बाळ सप्रे's picture

24 Jul 2014 - 3:56 pm | बाळ सप्रे

११,६८,३९,५२३ व्या (sorted on name asc) देवाचं नामस्मरव करावं. तो सगळ्यात पावरबाज आहे.

तेहतीस कोटी देवांचे एक्सेलशिट बनवलं असेल तर आम्हाला पण द्या हो.

ह्या वरच्या नंबरांवरून कळत नाही कि कुठला देव कुठल्या नंबरावर आहे ते.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 5:11 pm | प्रसाद गोडबोले

११,६८,३९,५२३ व्या (sorted on name asc)

६८ ? ३९ ? ५२३ ?

काय राव हे अज्ञान .... ३३ कोटी देव कोणक? ह्याचा किमान अभ्यास करुन तरी कमेन्ट करा

अधिराज's picture

24 Jul 2014 - 5:32 pm | अधिराज

>>तेहतीस कोटी देवांपैकी कुठल्या देवाचं नांव घ्यायचं ते कुणीच नाही लिहिलं राव

त्याचं असं आहे बघा प्रत्येक देवतेकडे एक एक डिपार्ट्मेंट सोपवले आहे. तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते साध्य ज्या डिपार्ट्मेंटच्या अंडर येते त्या रिसपेक्टिव देवतेचा जप करायचा असतो.

पिलीयन रायडर's picture

24 Jul 2014 - 4:04 pm | पिलीयन रायडर

सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले.. तर (फक्त ह्या धाग्यावर) मला संक्षीचा मुद्दा पटला आहे. (त्यांचं सगळंच लिहीलेलं मी वाचलेलं नाही.. तेवढी माझी कुवत नाही..) पण त्यांचा मुद्दा मला पटलाय..
मागे मंत्राच्याच धाग्यावर जे लॉजिक लोक लावत होते की मंत्र हा फक्त शब्द समुह आहे.. त्याला काही विशिष्ट सामर्थ्य नाही.. तसंच काहीसं..
लहानपणी जर आपल्याला "मिसळपाव" हा एक देव आहे.. असं सांगितलं असतं.. तर "श्रीराम" हा जप करुन जे साध्य होतं तेच "श्री मिसळपाव" ह्या नामस्मरणाने सुद्धा होईल. एकंदरीत नामस्मरण म्हणजे बाकी गोंधळातुन लक्ष काढुन घेऊन एकाच शब्दावर ते केंद्रित करणे असा प्रकार असावा.. लाखो वेळा तेच घोकल्यावर मेंदुला फटिग येऊन भास होणं शक्य नाही का?

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या बेसिक कोर्स मध्ये पहिल्यांदा सुदर्शन क्रिया करताना एकाच लयीत जोर जोरात श्वास घेतल्याने मी ती क्रिया करता करता नियंत्रण सुटुन जमिनीवर पडले होते.. जनरली लोक ह्यांना "चमत्कार" किंवा "अनुभुती" म्हणत असावेत..

एकंदरीत हे सगळे मनाचे खेळ आहेत असं माझंही मत आहे.. ह्यानी भगवंत भेटतील (म्हणजे नक्की काय होईल? आनी देव भेटलाच तर पुढे काय? देव नक्की आहे का? हे आणखी त्रिशतकी विषय आहेत..) असं मला वाटत नाही..

(तळटीपः- मला नामस्मरण... त्याच्या पायर्‍या.. वैखरी/अजपा ह्या शब्दांचा अर्थ.. आणि कशाचाच एकंदरीत अनुभव नाही.. अत्यंत जनरल निरीक्षणं आहेत..)

सगळे पुर्वग्रह बाजुला ठेवले.. तर (फक्त ह्या धाग्यावर) मला संक्षीचा मुद्दा पटला आहे. (त्यांचं सगळंच लिहीलेलं मी वाचलेलं नाही.. तेवढी माझी कुवत नाही..) पण त्यांचा मुद्दा मला पटलाय..

या मताशी मीही सहमत आहे.
पण मला प्रवचनकार, किर्तनकार यांचं शब्दांना रुपकं आणि प्रतिकं यांची जोड देत गोल गोल घुमवणं आवडतं. आणि ते या धाग्यावर छान चालू आहे. :)

मागे मंत्राच्याच धाग्यावर जे लॉजिक लोक लावत होते की मंत्र हा फक्त शब्द समुह आहे.. त्याला काही विशिष्ट सामर्थ्य नाही.. तसंच काहीसं..

हे पण अगदी खरं आहे. वाल्या कोळ्याची गोष्ट जर खरी मानली तर तो तरी कुठे विधीवत आणि अजून काय काय "राम" म्हणाला होता? तो तर "मरा मरा" असंच म्हणाला होता.

एकंदरीत नामस्मरण म्हणजे बाकी गोंधळातुन लक्ष काढुन घेऊन एकाच शब्दावर ते केंद्रित करणे असा प्रकार असावा..

अगदी अगदी.
माझ्या दृष्टीने नामस्मरण हे "वडाच्या झाडाकडे एकटक पाहिल्याने त्रास होतोय तर आंब्याच्या झाडाकडे बघ" असं सांगण्यासारखे आहे.

जगातील इतर वाईट गोष्टींवरील चित्त हटवून "देव" या चांगल्या गोष्टीवर चित्त केंद्रीत करा, असं काहीसं.

(तळटीपः- मला नामस्मरण... त्याच्या पायर्‍या.. वैखरी/अजपा ह्या शब्दांचा अर्थ.. आणि कशाचाच एकंदरीत अनुभव नाही.. अत्यंत जनरल निरीक्षणं आहेत..)

मला थोडाफार अनुभव आहे नामस्मरणाचा. लहानपणापासून आपल्या मनाचं कंडीशनिंग झालेलं असतं, देवाच्या नामस्मरणानं मनःशांती मिळते. (शांतता नाही, शांती. ;) ) त्यामुळे भाविक मनोवृत्तीच्या माणसाला थोडा वेळ देवाच्या नावाची आवर्तने केली की तात्कालिक आणि आभासी शांती मिळते. कारण मनावर लहाणपणापासून तसं बिंबवलेलंच असतं. अर्थात ही शांती चिरस्थायी नसते. नामस्मरण बंद, शांती गायब असा मामला असतो.

वर संक्षींनी म्हटल्याप्रमाणे शांती येत नसते आणि जात नसते. ती आपल्याच अंतर्मनात खोलवर दडून बसली आहे, अनेक भ्रमांच्या आवरणाखाली. आपण स्वतःच शांतीस्वरुप आहोत. त्यासाठी कुठल्याच बाह्यप्रक्रियेची जरुरी नाही.

संक्षींनी म्हटल्याप्रमाणे शांती येत नसते आणि जात नसते. ती आपल्याच अंतर्मनात खोलवर दडून बसली आहे, अनेक भ्रमांच्या आवरणाखाली. आपण स्वतःच शांतीस्वरुप आहोत. त्यासाठी कुठल्याच बाह्यप्रक्रियेची जरुरी नाही.

म्या पामराला नीटसे हे समजले नाही, हि शांती खोलवरून दडून बसली म्हणजे काय ? शांती स्वरूप आहोत म्हणजे काय? थोडे उलगडून सांगा णा सर