पिंगळावेळ आणि आमचा आम्रविका खंडाचा सूक्ष्म - प्रवास

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in भटकंती
24 Apr 2012 - 11:34 pm

अलिकडे पौराणिक विमाने, लिंगदेहाने केलेला मंगळग्रहाचा प्रवास इ. विषयी वाचून आमच्या मनाने घेतले, की आपणही असा प्रवास करावा, आणि प्राचीन काळचे जग कसे होते, ते बघावे... अमेरिकेच्या स्थूलदेहाने केलेल्या प्रवासात आम्हाला सर्वत्र एकसारखी शहरे, बाजारादि दिसले होते, परंतु आमची प्राचीनत्वाची हौस त्यातून भागली नव्हती...सूक्ष्म देहाने जावे ???
परन्तु कसे? आपण काही त्या थोर नर्तकांसारखे ब्रम्हर्षी वा प्रज्ञाब्रम्ह वगैरे नव्हे, मग हे जमायचे कसे?

तेवढ्यात आठवले की मागे एकदा एका कठीण प्रसंगी आपण आपल्या दिवंगत माता-पित्यांना आवाहन केले होते, मग त्यांनी आवाहनास साद देउन मार्गदर्शन केले होते ... असे आत्मे भल्या पहाटे पिंगळावेळेस पिंगळ्याच्या रूपात आपल्या घरासमोर बसून आपल्याला साद देतात, हे अनुभवाने ठाऊक झालेले होतेच, मग रात्री झोपताना अगदी उत्कट इच्छा केली, की उदईक पहाटे त्यांनी पुन्हा एकदा दर्शन द्यावे.
...हाच तो आत्म्यांचा संदेश आणणारा पिंगळा:

दुसरे दिवशी पहाटे पिंगळा बोलला, आणि अर्धवट जाग आली. आत्मे पिंगळ्यामार्फत आपल्याला संदेश देतात, आपण डोळे न उघडता, हालचाल न करता मन एकाग्र करायचे, म्हणजे आत्म्यांशी संपर्क होतो...
...समोर अनेक वर्षांपूर्वी दिवंगत झालेले माता-पिता सुहास्य वदनाने उभे होते.... त्यांना साष्टांग दंडवत घालून मी कश्यासाठी पाचारण केले, ते सांगितले, तेंव्हा ते म्हणाले की अरे, यासाठी तुला पुरुषोत्तम चांगली मदत करील, थांब त्याला बोलावितो ... असे म्हणण्याचा अवकाश, की लगेचच समोर 'ताजमहाल म्हणजे तेजोमहाआलय' इत्यादि ग्रंथांचे कर्ते, सुप्रसिद्ध पु.ना. ओक प्रकट झाले, . मी त्यांना वंदन करून म्हटले, की मला अमेरिका देश फार पूर्वी कसा होता, हे बघायचे आहे, त्यावर ते म्हणाले, की चल, आताच जाउया आपण.

त्यांनी मला " ओम र्‍हीम र्‍हूम काल भैरवाय नमः ओम र्‍हीम र्‍हूम कालप्रवासार्थ सज्यामि" असा मंत्र म्हणायला सांगितले..... मी मंत्रजाप सुरु करताच एकदम भोवतालचे वातावरण बदलत गेले, सोसाट्याचा वारा सुटल्यागत आवाज येऊ लागला आणि मी पुनांसह एका नवीनच जागी होतो, असे आढळले.
हीच ती जागा:

"हे बघ, आपण अनेक शतकांपूर्वीच्या अमेरिकेत आलेलो आहोत... पुना म्हणाले... त्याकाळी यास 'आम्रविका' असे नाव होते,
आणि आपल्या भारतास "इंदुस्थान" म्हणत....
हे ऐकून मला वाटलेले आश्चर्य ताडून ते म्हणाले, ..."ज्यास सांप्रत काळी अमेरिका म्हणण्याचा प्रघात आहे, त्याचे मूळ नाव 'आम्रविका' होय. याची उपपत्ती अशी, की प्राचीन काळी अपरांतक अथवा कोकण प्रदेशातून उत्तम प्रतीचे हापूस आम्र या आम्रविका देशात जहाजे भरभरून पाठविले जात. चितळे, आपटे, केळकर आदी चित्पावनांची मोठमोठी जहाजे असत. 'अमेरिका खंड' हा शब्द प्रयोग देखील 'आम्रखंड' वरून प्रचलित झालेला आहे.

या खेरीज ओक घराण्यातील व्युत्पन्न ब्राम्हण आम्रविकेतील बहुत लोकांच्या ताडपट्टीवरील नाड्या इकडे पाठवून त्यांना त्यांच्या पूर्व-जन्मांतील पापांचे स्मरण करवून देत, व त्यावरील उपाययोजना सांगत. ओक घराण्याचा दबदबा एवढा, की आज देखील 'शर्मन ओक' 'ओकल्यांड', 'सिल्व्हर ओक' इत्यादी जागा प्रसिद्ध आहेत. ओकांनी लाविलेले हजारो 'ओक वृक्ष' अमेरिकेत आहेत.... बघ तिकडे पलीकडे आहेत ओक वृक्ष...
चित्र: अमेरिकेतील ओक वृक्ष

पुना पुढे म्हणाले :"आंब्याखेरीज हिंदुस्थानातून इतर अनेक जिन्नस पाठवले जात. उदाहरणार्थ हिंग. हा त्याकाळी हिंदुस्थानाचाच एक भाग असलेल्या अफगाणी लोकांचे प्रदेशातून येई. ( 'अफगाणी' या शब्दाची उपपत्ती अशी, की तेथे अफूचे उत्पादन फार, सबब तेथील लोक अफूची निशा करून गाणी म्हणत हिंडत, त्यांस 'अफुगाणी' म्हणत). हिंगाचा व्यापार एवढा चाले, की हा व्यापार करणार्‍या लोकांचे अंगास अहोरात्र हिंगाचा वास येई. त्यावरून त्या लोकांचे आडनाव 'वास-हिंग-तन' असे पडिले, ते आजमितीस 'वॉशिंगटन' म्हणून प्रचलित आहे. या नावाचे एक गाव पूर्वी असे, ते पुढे आम्रविकेची राजधानी झाले.

त्याकाळचे पुरुषांस बटकी, कुळंबिणी, अंगवस्त्रे इत्यादिंचा सोस फार. याकारणे जारज प्रजाही अमाप. सबब तेथील पुरूषांचे 'जारज' हे नाव बहुत प्रचलित असे, उदाहरणार्थ 'जारज वास- हिंग- तन' ह्यास हल्ली 'जॉर्ज वाशिंगटन' असे म्हणतात....

हे सर्व ऐकून मी थक्कच झालो, मी त्यांना सांगितले, की मी पूर्वी अमेरिकेतील पिट्सबर्ग, न्यूयॉर्क वगैरे शहरे बघितलेली आहेत, त्यावर ते म्हणाले, अरे, पिट्सबर्ग म्हणजे पीतस-दुर्ग, इथे भारतातून वारेमाप हळद येई, त्यामुळे इथला किल्ला अगदी पिवळाजर्द झाला होता, आणि ज्याला आता न्यूयॉर्क म्हणतात, त्याचे मूळ नाव 'नऊअर्क' इथे इंदुस्थानातून नऊ प्रकारचे आयुर्वेदिक अर्क मोठ्या प्रमाणावर येत.... ते बघ नव-अर्क बंदर.

मला हे सर्व काही खरे वाटे ना, तेंव्हा ते म्हणाले, चल तुला प्रत्यक्षच दाखवतो... ते बघ आंबे घेउन येणारे जहाज, आणि माल उतरून घेण्यास नावेतून चाललेले आम्राविकन लोक.

हे बघून मात्र माझी खात्री पटली....
...परंतु भारत देशास 'इंदूस्थान' म्हणत, हे काय गौडबंगाल ? या माझ्या प्रश्नावर पुना म्हणाले " अरे, प्राचीनकाळी भारतातून नियमित पणे चंद्रावर आपली अंतराळयाने जात. त्यांना "इंदुयान" म्हणत. त्यामुळे ज्या देशात अशी 'इंदुयाने' असत, तो देश 'इंदूस्थान' म्हणून विख्यात झाला. ते बघ आकाशात उडणारे इंदुयान ...

आणि ते बघ खुद्द आम्रविकेत आलेले एक लहान इंदुयान...

तेवढ्यात, " अरे, आता मला जायला हवे, कारण इंद्र देवाने माझ्यावर त्या अल्ला आणि गॉड च्या प्रदेशातील बित्तंबातमी काढून आणण्याची गुप्त कामगिरी सोपवलेली आहे, तिथे जाणे मला आता भाग आहे, तू पुन्हा ये, मग तुला आणखी गोष्टी दाखवेन...." असे म्हणोन पुना अंतर्धान पावले, आणि मला पण पूर्ण जाग आली... मग मी ठरवले, की आता पुढल्या वेळी आपण रोम, फ्रान्स वगैरेची काल-यात्रा करायची.... (क्रमशः)

प्रतिक्रिया

हाय्ला द्येवा कित्ती चान चान स्वप्न पडतात हो तुम्हाला. आमच्या स्वप्नात तर जौद्या........
मागे विजूभौंनी अशीच स्वप्नांच्या राज्यातुन सहल घडवुन आणली होती. त्याची आठवण झाली.

आवांतर : चित्रे आणि त्यांच्या परिचय करुन देण्याची अभिनव कल्पना आवडल्या गेली आहे. :)

पुस्वप्र. :)

यकु's picture

24 Apr 2012 - 11:50 pm | यकु

थॉमस बर्चचे 'माऊथ ऑफ डेलावेअर' प्रचंड आवडले आहे.
लाटांचे फुगवटे आणि पाण्याचा रंग, खल्लास!!

मस्त कलंदर's picture

25 Apr 2012 - 12:07 am | मस्त कलंदर

खल्लास!!!
लोकांना सोबत नेण्यासाठी काही स्कीम आहे का हो?

आबा's picture

25 Apr 2012 - 12:15 am | आबा

मस्त ! :)
चित्रकारांची नावे पण सांगा की.

पाषाणभेद's picture

25 Apr 2012 - 12:35 am | पाषाणभेद

काका, बर्‍याच दिवसांपासूनचा लटकलेला लेख लिहीला. खरोखर, पुर्वीच्या काळी भारताने जी प्रगती केली ती या लेखामुळे पुर्ण जगाला समजेल.
आपली वर्णव्यवस्था अमेरिकेतही आपण राबवीलेली होती. आपले घिसाडी तेथे स्मिथ झाले. शिंपी टेलर झाले. त्याबाबतचे दाखलेही द्या जेणेकरून इतिहासात येणार्‍या पिढ्या आपल्याला धन्यवाद देतील.
अमेरिका हा प्रांत आपलाच होता याची साक्ष या लेखाने सिद्ध होते. अमेरिका या खंडाची भारताने मागणी केलीच पाहीजे. अन्यथा युद्ध करून तो प्रदेश भारताने पुन्हा ताब्यात घ्यावा असा सल्ला भारतसरकारला देतो.

भडकमकर मास्तर's picture

25 Apr 2012 - 1:49 am | भडकमकर मास्तर

चित्रगुप्त.. यू टू??

चित्रे भारी आहेत... चित्रांविषयी अजून लिहा...
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...

सहज's picture

25 Apr 2012 - 7:14 am | सहज

छान. पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे.

५० फक्त's picture

25 Apr 2012 - 7:15 am | ५० फक्त

मजा आली नाही, उगाचच ओढुन ताणुन लिहिलेलं आहे हे जाणवतंय. काका, तुम्ही तुमच्या चित्रांबद्दलच लिहित जा, हे असले टवाळीचे विषय हाताळायला बाकीचे समर्थ आहेत.

प्रचेतस's picture

25 Apr 2012 - 8:59 am | प्रचेतस

सहमत आहे.
शिवाय भटकंतीमध्ये सदर लेख हा अस्थानी आहे.

चौकटराजा's picture

25 Apr 2012 - 9:57 am | चौकटराजा

मला वाचून मजा वाटली हे खरे ! पण ५० ओन्ली म्हणतात त्याप्रमाणे काहीनी अशा लिखाणापासून लांब रहावे हेच बरे !

परिकथेतील राजकुमार's picture

25 Apr 2012 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

फक्त ५० ह्यांच्याशी सहमत.

वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न आवडला नाही.

त्यापेक्षा सरळ चित्रे आणि त्यांचा परिचय जास्ती भावला असता. कौटूंबीक चित्रपटाद्वारे कायम निखळ करमणूक करणार्‍या एखाद्या दिग्दर्शकाच्या नवीन चित्रपटाला हजेरी लावावी आणि आतमध्ये फक्त दर दहा मिनिटांनी आयटम साँग बघायला मिळावे अशी अवस्था झाली.

प्रभाकर पेठकर's picture

25 Apr 2012 - 10:16 am | प्रभाकर पेठकर

फार सुंदर कल्पना. आणि ती राबविण्यासाठी केलेला चित्रांचा उपयोग फारच कल्पक म्हणावा लागेल.
ह्या अभिनव कल्पनेने पूर्णपणे प्रभावित झालो आहे.

प्रसाद प्रसाद's picture

25 Apr 2012 - 12:45 pm | प्रसाद प्रसाद

पु. ना. नी शिकागो ची व्युत्पत्ती सांगितली नाही, नशीब!!!!!

शशिकांत ओक's picture

25 Apr 2012 - 1:25 pm | शशिकांत ओक

पुष्कळ नाही नाही त्या कल्पना लढवणाऱ्या (लो)कांना अमेरिकेचे पाणी पाजावयाला नेणारा पिंगळा. वेळोवेळी चित्रे दाखवून पुन्हा गुप्त होतो झालं....
वाचायला मजा आली...
आम्र देशा नंतर आता इट(ड)लीच्या प्रवासात "मेरे रोम रोम में बसने वाले - ".... म्हणत, रोमचे पापाजी पोप..."आमेन" म्हणायच्या ऐवजी हात जोडून, उपस्थितांना झारीतून तीर्थ देताना... " हरे राम हरे राम" कसे म्ह्णत असत. आदि वाचायची उत्सुकता आहे. बढे रहो.... गुप्त चित्रे.....

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Apr 2012 - 6:58 pm | बिपिन कार्यकर्ते

लेखन लैच आवडलं. खूप मस्त. येऊ दे अजून. चित्रं तर छानच.

पैसा's picture

25 Apr 2012 - 7:51 pm | पैसा

सहमत!

स्मिता.'s picture

25 Apr 2012 - 7:25 pm | स्मिता.

आम्रविकेचे फोटो तर आवडले पण फारच कमी होते. पुढल्या सफरीच्या वेळी जास्त फोटो काढून आणा हो काका.

चित्रगुप्त's picture

25 Apr 2012 - 10:56 pm | चित्रगुप्त

पु ना ओकांचे स्मरण...

माझा हा धागा काही मिपाकरांना आवडला, तर काहींनी मी चित्रकलेविषयी लिहिणेच जास्त योग्य असल्याचे सुचवले. मला दोन्ही प्रकारचे प्रतिसाद योग्य वाटले.
हा धागा मी चित्रांची ओळख करून देण्याच्या हेतूने लिहिला नसून कै. पु. ना. ओक यांचे स्मरणार्थ लिहिला आहे. पुना हे माझे नात्यात असून मी १९७७ साली दिल्लीत नोकरीसाठी गेलो, तेंव्हा त्यांना पत्र लिहिले, त्यावेळी ते लंडनला अनेक महिने त्यांच्या अभ्यासाकरिता / संशोधनासाठी जाणार होते, सबब त्यांनी मी घराची किल्ली समोर ठेऊन जात आहे, तू येउन खुशाल घरात रहा, असे कळवले. मी दिल्लीत पोचलो, तेंव्हा त्यांचा तात्कालीन उच्चभू वस्तीतील मोठा बंगला बघून चकितच झालो होतो. मी तिथे सुमारे महिनाभर एकटाच राहिलो. त्यावेळी माझा त्यांच्या लेखनाशी परिचय झाला. त्यांची तिथे असलेली बरीच पुस्तके मी वाचून काढली. परिणामी मी तेंव्हा 'चर्च' म्हणजे चर्चा करण्याची जागा, 'ट्रिनिटी' म्हणजे 'त्रिनीति' रोम हे रामाने वसवले, व्हॅटिकन म्हणजे 'वाटिका' , जीजस कृस्त म्हणजे ईशस् कृष्ण, खिश्चनिटी म्हणजे कृष्ण-नीति, वगैरे नाद- साधर्म्यावर आधारित तर्क करण्यात इतका तरबेज झालो, की मला दिवसभर असे काही ना काही सुचत रहायचे. त्याकाळी लिहिलेला एक कागद अलीकडे मला सापडला, त्याने या लेखाचे स्वरूप घेतले.
पुढे यथावकाश त्यांची भेट झाली, आणि त्यांचे तर्क पटो वा न पटो, मात्र वैयक्तिक जीवनात ते अत्यंत तत्वनिष्ठ, संयमी, शिस्तशीर, प्रगल्भ आणि बुद्धीमान होते, हे मला उमजले. त्यांच्या लहानपणी घरात त्यांची आई संस्कृत, तर वडील इंग्रजी बोलत, त्यामुळे त्यांना या दोन्ही भाषा अतिशय उत्तम अवगत झाल्या होत्या. वयाच्या सत्तरीतही ते रोज दीडशे सूर्य नमस्कार नेमाने घालत. आहार अतिशय संयमित घेत. दिलेला शब्द व वेळ कोणत्याही परिस्थितीत पाळणे, आपल्या जीवन- कार्याशी समग्रतेने समर्पित असणे, बोलण्या-वागण्यात परखड, अतिशय उद्योगी, अश्या त्यांच्या व्यक्तिमत्वातून बरेच काही शिकण्यासारखे निश्चितच होते...
.. कुणास ठाऊक, पुढे हजार-पाचशे वर्षांनंतर त्यांनी मांडलेले विचार खरे ठरतीलही...

विकास's picture

25 Apr 2012 - 11:36 pm | विकास

पुना ओकांबद्दल अनेकदा ऐकले जाते अर्थातच ताजमहाल-तेजोमहालयासंदर्भातच... कृष्णनिती, वाटीका पण नंतर ऐकले होते. मात्र, "त्यांचे तर्क पटो वा न पटो" असेच वाटत राहीले. पटणे अवघडच आहे... "मात्र वैयक्तिक जीवनात ते अत्यंत तत्वनिष्ठ, संयमी, शिस्तशीर, प्रगल्भ आणि बुद्धीमान होते," ह्या वाक्यात पण तथ्य आहे असेच वाटले. (मी त्यांना भेटलेलो नाही अथवा त्यांच्याशी ओळख ही नाही). माझ्या आठवणीप्रमाणे ते आझाद हिंद सेनेत देखील होते (सुभाषचंद्रांचे सचिव?)

फक्त ही ओळख वाचताना एक प्रश्न पडला: त्यांची आई संस्कृत, तर वडील इंग्रजी बोलत, मग त्यांनी मराठीत का लिहीले? ;)

बॅटमॅन's picture

25 Apr 2012 - 11:46 pm | बॅटमॅन

त्यावरनं आठवलं, (एका विश्वसनीय आणि तूर्तास गोपनीय सूत्रानुसार) भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांचं एकदा लेक्चर होतं, त्यात (इतर अनेक गोष्टींबरोबर) ते म्हणाले की ऑटोमोबाईल हा शब्द आत्मबली वरून आला आहे!!!!!!!!!!!

मित्रा,
पुना ओक हे आझाद हिंद सेनेत होते.
त्यानंतर त्यांनी दिल्लीत इंग्रजी वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून नोकरी केली व नंतर य़ु एस आय एस मधे नवी दिल्लीत एडिटोरिल खात्यात वरिष्ठ संपादकाचे कार्य केले होते. त्यांची सर्व पुस्तके इंग्रजीतून आहेत. ती सर्व पुस्तके नंतर हिंदी व मराठीतून लिहिली आहेत. फक्त मराठीत ते लिहित असत कि काय असा समज नको म्हणून खुलासा.
त्यांच्या इंग्रजी भाषाप्रभुत्वाचा, तर्कशुद्ध विचारांचा व इतिहास संशोधनाच्या तत्वांना वकीली बाण्याने व कसोशीने पालन करण्याच्या त्यांच्या सचोटीचा अनुभव घेण्यासाठी तरी - मग त्यांचे विचार आपणास आवडोत वा ना आवडोत - ग्रंथ वाचावेत. असे जाता जाता सुचवावेसे वाटते.

चित्रगुप्त's picture

26 Apr 2012 - 7:28 am | चित्रगुप्त

@ विंग कमांडर ओक यांस,
पु ना ओकांचे मराठी ग्रंथ वाचायचे झाल्यास ते जालावर उपलब्ध आहेत का ? कुठे ? तसेच त्यांच्या सर्व ग्रंथांची यादी दिल्यास वाचनेच्छुंना लाभ घेता येइल.

निनाद's picture

26 Apr 2012 - 10:05 am | निनाद

मला हे सापडले -
बरेच लेखन केले आहे असे दिसते. A History of Histories हा २ भागांचा दिड हजार पानांचा ग्रंथ आहे!

==Books written==

  • Taj Mahal: The True Story - Publisher: A Ghosh (May 1989) - Review - http://www.amazon.com/Taj-Mahal-The-True-Story/dp/0961161442
  • Some Missing Chapters of World History - Publisher: Hindi Sahitya Sadan (2010) Language: English
  • World Vedic Heritage: A History of Histories - Publisher: New Delhi: Hindi Sahitya Sadan (2003)
  • Vaidik Vishva Rashtra Ka Itihas - Publisher: New Delhi: Hindi Sahitya Sadan
  • Bharat Mein Muslim Sultan
  • Who Says Akbar was Great
  • Some Blunders Of Indian Historical Research
  • Agra red Fort is a Hindu Building

अनेक पुस्तके जालावर हिंदीतून आणि इंग्रजी तूनही उपलबध आहेत. P. N. Oak असा शोध घेतल्यास मिळतील.

लेखकाचे कोणतेही लेखन न वाचता, त्यावर प्रतिक्रिया देणे अथवा त्याची चेष्टा मात्र मला योग्य वाटत नाही. या पेक्षा चित्रगुप्त नी ओक यांच्या लेखनातील किंवा त्यांचे योग्य ते खंडन केले असते; विसंगती / तृटी पुराव्याने दाखवल्या असत्या तर योग्य वाटले असते.

चित्रगुप्त's picture

26 Apr 2012 - 10:11 pm | चित्रगुप्त

............ या पेक्षा चित्रगुप्त नी ओक यांच्या लेखनातील किंवा त्यांचे योग्य ते खंडन केले असते; विसंगती / तृटी पुराव्याने दाखवल्या असत्या तर योग्य वाटले असते.................

१. पु. ना. ओकांच्या विचारांचे खंडन करायला त्यांच्या तोडीची विद्वत्ता हवी. नसलेल्यांनी त्या भरीस पडू नये, हेच बरे.
२. माझ्यापुरते बोलायचे झाले, तर त्यांच्या लेखनात मला वावगे काहीच वाटत नाही (त्यांचे पुष्कळ साहित्य वाचले आहे), ते ज्या निष्ठेने त्यांच्या अंगिकृत कार्याचा पाठपुरावा करत होते, ती केवळ प्रशंसनीयच नव्हे, तर अनुकरणीय होती... त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीला सलाम.
३. माझे त्यांचे प्रेमाचे नाते होते, माझ्या चित्रकलेचे त्यांना नेहमी कौतूक वाटायचे. माझे असले लेखन वाचून त्यांना मजा वाटली असती, किंबहुना त्यांनी त्यांच्या 'अमेरिका म्हणजे आम्रविका' अश्या एखाद्या आगामी ग्रंथासाठी मला मदतनीस म्हणून नेमले असते. या सर्व गोष्टींमुळे मला त्यांची थोडी बहुत नक्कल करण्याचा, मिश्किलपणा करण्याचा अधिकार आहे, असे वाटून हे लेखन केले आहे.
४. या लेखात पिंगळा बोलणे वगैरे बद्दल जो उल्लेख आहे, त्याबद्दल माझा अनुभव असा, की कधीकधी अगदी पहाटे घरासमोर पिंगळा बोलतो (म्हणूनच त्या वेळेला पिंगळावेळ म्हणतात) आणि त्याला बघितल्यावर उडून जातो. त्या दिवशी हमखास काहीतरी चित्राची वा लेखनाची चांगली कल्पना सुचते. अश्या वेळी मला नेहमी वाटते की माझे आई-वडील, गुरु वा पुनांसारख्या प्रेमाच्या (दिवंगत) लोकांपैकी कुणीतरी त्या पिंगळ्याच्या रूपात मला प्रेरणा देत आहे...

निनाद's picture

27 Apr 2012 - 5:30 am | निनाद

३. माझे त्यांचे प्रेमाचे नाते होते, माझ्या चित्रकलेचे त्यांना नेहमी कौतूक वाटायचे. माझे असले लेखन वाचून त्यांना मजा वाटली असती, किंबहुना त्यांनी त्यांच्या 'अमेरिका म्हणजे आम्रविका' अश्या एखाद्या आगामी ग्रंथासाठी मला मदतनीस म्हणून नेमले असते. या सर्व गोष्टींमुळे मला त्यांची थोडी बहुत नक्कल करण्याचा, मिश्किलपणा करण्याचा अधिकार आहे, असे वाटून हे लेखन केले आहे.

ओके गुप्ताजी!
आक्षेप मागे! :)

वाहवा चित्रगुप्त! खाशी ओळख करून दिलीत आम्रविका खंडाची! वरती प्रतिक्रियांमध्ये लोकांनी उधळलेल्या मुक्ताफळांकडे दुर्लक्ष करा आणि खुशाल येऊद्यात पुढचे भाग. विडंबन अल्टिमेट जमले आहे.

पाषाणभेद's picture

25 Apr 2012 - 11:48 pm | पाषाणभेद

+१
कुणा लेखक कविकडे चित्रकाराकडे एकाच प्रकारच्या लेखाची मागणी करणे चुकीचे आहे. चतूरस्र लेखक कोणत्याही प्रकारचे लेखन करू शकतो.
काका, इतर काय म्हणतात त्याकडे दुर्लक्ष करा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Apr 2012 - 3:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

होय होय आम्रविकेत फार झाडं आहेत ओकांची. शिवाय ती जुन्या काळापासून असणार. आमच्या गावातल्या अनेक जुन्या रस्त्यांना थ्री ओक्स रोड, ओक ट्री लेन अशी नावं आहेत. तुमच्यामुळे आज हे रहस्य समजलं.

पिंगळा सोडून इतर चित्र फारशी आवडली नाहीत. पण लेखनप्रकार आणि हा प्रयोग झकास आहे. त्यामुळेच ही चित्रही चालून गेली ... दगडी बेडकीहळ्ळीकर नावाची कोणी स्त्री कधी अस्तित्त्वात नसण्याचीच शक्यता अधिक, पण पुलंनी विडंबनादाखल ते नाव वापरलं आणि चालून गेलं. तसंच काहीसं.

पुढचा नंबर कोणाचा?

अवांतरः असं उच्चारसाधर्म्य नंदन खरडींत लिहीतो आणि उगाच बदनाम होतो. त्यापेक्षा असं काहीतरी लिहीत का नाही?

श्री . पु. ना. ओक यांना समर्पित

रमताराम's picture

26 Apr 2012 - 11:56 am | रमताराम

आपण तर येंजॉय केलं बघा. (पण तुमच्या भविष्यात तुम्हाला लय फटके पडणार हे कोणतीही कुंडली, नाडी वगैरे न पाहता सांगू शकतो.)

रमताराम's picture

26 Apr 2012 - 11:39 am | रमताराम

देव-कारकूनाकडून थेट विडंबन प्रांतात स्वारी. हल्ली तिकडेही रेकॉर्ड कम्पूटराईज झाल्याने वेळ मिळतोय वाट्टं.
जबरदस्त विडंबन. केवळ शब्दाच्या तोडमोडीवरून निष्कर्ष काढणारी जमात कायम डोक्यात जाते. 'खिस्त <- कृस्त <- कृष्ण' हे ऐकून निपचित पडलो होतो. लकव्यातून बाहेर यायला बरीच वर्ष लागली होती.

आम्रविका आणि आम्रखंड जोडी एकदम हिट्ट हो.

आणि हो, ते पर्‍याचं काय ऐकू नका हो. लै ड्याम्बिस मानूस.

(वाचल्यावर खळखळून हसू यावं असं लिखाणही दर्जेदार मानणारा) रमताराम

निनाद's picture

26 Apr 2012 - 12:02 pm | निनाद

केवळ शब्दाच्या तोडमोडीवरून निष्कर्ष काढणारी जमात कायम डोक्यात जाते

अर्र! :(

म्हणजे (हिंदी)तारा > (फारसी) सितारा > (इंग्रजी ) स्टार (किंवा उलट) - असे दिसले तर तुम्हाला मान्य नसणारच... असे समजायचे का?

रमताराम's picture

26 Apr 2012 - 12:13 pm | रमताराम

यात निष्कर्ष काय ते सांगा आधी.

निनाद's picture

26 Apr 2012 - 12:17 pm | निनाद

पण निष्कर्ष काही असला तरी तुम्हाला मान्य नसणार असेच ना?

रमताराम's picture

26 Apr 2012 - 12:25 pm | रमताराम

हा 'पैचान कौन' खेळाचा प्रकार वगैरे आहे का? चालू द्या.

(दोन परस्परविरोधी निष्कर्ष असतील तर एकाच वेळी दोन्ही अमान्य कसे करायचे या गुंत्यात अडकलेला) रमताराम

निनाद's picture

27 Apr 2012 - 5:26 am | निनाद

अहो निष्कर्ष सोपा होता!

इंग्रज इराण मार्गे इंग्रजी भाषा घेऊन भारतात आल्या नंतर,
त्याच्या आधाराने हिंदी भाषेची सुरुवात झाली.
त्यानंतर हिंदी वर आधारीत संस्कृत भाषा जन्माला आली.

है काय अन नाय काय!

मग? अजूनपण अमान्य च का?

....हल्ली तिकडेही रेकॉर्ड कम्पूटराईज झाल्याने वेळ मिळतोय वाट्टं.........
अहो, तीच तर बोंब आहे, आम्ही यमराजांना सांगून सांगून थकलो, कि ती संगणकं हिकडं पण मागवा, पण ऐकतच नाहीत. आम्ही याबद्दल मोठी कैफियत अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे, त्यात भगवद्गीता, मेनका, ओक, वर्तक, येशू, महंमद, बुद्ध, ओशो, पद्मपुराण, असं बरंच काही आहे, परंतु टंकवण्याचे कष्टापायी अजून इथे देता आलेली नाही...

या निष्कर्ष काय ते सांगा आधी. >>>

मॅनेजर आले ! ;)

चेरी ऑन द केक कशी ठेवतात ?

चित्रगुप्त's picture

17 May 2013 - 2:35 pm | चित्रगुप्त

'आम्रविका' या शब्दाविषयी कोणी पृच्छा केल्यमुळे हा धागा उपसत आहोत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 May 2013 - 10:01 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ प्रसाद प्रसाद:
पु. ना. नी शिकागो ची व्युत्पत्ती सांगितली नाही, नशीब!!!!!

शिकागोची व्युत्पत्ती तर जगप्रसिद्ध आहे. त्या जागेवर फार्फार पुर्वी एका मराठी माणसाने शाळा सुरु केली आणि मुलींना म्हणाला, "शिका गो". तेथे नविनच आलेल्या गोर्‍यांनी ते ऐकले आणि त्यांना वाटले की हेच त्या जागेचे नाव आहे.

आदूबाळ's picture

17 May 2013 - 11:19 pm | आदूबाळ

अर्रर्रर्रर्र... :))

महेश नामजोशि's picture

20 May 2013 - 4:30 pm | महेश नामजोशि

माझ्या लहानपणची एक आठवण आहे. माझ्या वडिलांचे बालपणापासूनचे त्यांचे एक मित्र, आम्ही त्यांना कृष्णाकाका म्हणत असु., गपा मारायला येत तेव्हा बर्याच गमती जमती सांगत असत व आम्ही ते सर्व समजत नसतानाही मजा म्हणून ऐकत असु. पु. ना. ओकांचे नाव तेव्हा ऐकले होते. त्यांनी एक कुठले पुस्तक आणले होते ते असेच काहीतरी होते. ताजमहाल हा ताज महाल नसून तेजो महाल आहे व ते एक शंकराचे मंदिर होते. त्यात कळसामधून जे भोक होते त्यातून शंकराच्या पिंडीवर अभिषेक होतो. त्यातील खोल्याही १० ० ८ आहेत, गोशाला आहे वगैरे माहिती होति. त्यावरील बरेच कोरीव काम हिंदू धर्माप्रमाणे आहे. मुस्लिम लोकांच्या इमारतीवर अशी चिन्हे नसतात. यावर बरीच चर्चा होई. आम्हाला त्यात काही कळत नसे. पण आत्ता उल्लेख आला त्यावरून आठवले. खरे खोटे काय महित. पण हे ऐकल्याचे आठवते. आता माझे वडीलही नाहीत व ते मित्रही नाहीत त्यामुळे ते पुस्तक कोणते हे माहित नाहि.
महेश नामजोशी

चित्रगुप्त's picture

20 May 2013 - 7:11 pm | चित्रगुप्त

पु.ना. ओक आणि त्यांची पुस्तके या विषयी खालील दुव्यावर माहिती मिळेलः
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81.%E0%A4%A8%E0%A4%BE.%E0%A...

http://en.wikipedia.org/wiki/P._N._Oak

राजा सोव्नी's picture

22 May 2013 - 9:30 pm | राजा सोव्नी

फारच मस्त ,पुढील प्रवासाची वाट पाहत आहोत