श्री गणेश लेखमाला २०२३

1

बिअरचा ग्लास (?) आणि भारतीय प्रमाणमीमांसा

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
10 Mar 2014 - 10:19 pm

भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणमीमांसा हा संबंधीत विषयातील तज्ञांनी हाताळावयाचा विस्तृत विषय आहे. तथापि तर्कशास्त्र आणि तार्कीक उणीवां अभ्यासण्याच्या दृष्टीने लेखमाले अंतर्गत भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणमीमांसेच्या संदर्भात किमान परिचयाचा लेख लिहावाच लागला असता आणि तसे होण्याचा योग लेखमालेतील ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास लेखास आलेल्या मिपा सदस्य प्रकाश घाटपांडे यांच्या प्रतिसादाला उत्तर देण्याच्या निमीत्ताने आलाच आहे म्हणून, भारतीय तत्वज्ञानातील प्रमाणमीमांसा स्वतंत्र मोठा विषय असल्यामुळे वेगळा धागा काढण्याचा निर्णय घेतला.

ब्लॅक अँड व्हाईट-एक फसव द्विभाजन आणि (अर्धे) भरलेले ग्लास लेखात खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे 'द्रव्याने अर्धा भरलेला एक ग्लास दाखवला आहे. या ग्लासातील द्रव्याबाबत सदस्य प्रकाश घाटपांडे यांची प्रतिक्रीया खालील प्रमाणे होती.

समजा बिअर ने अर्धा भरलेला ग्लास आहे व तुम्हाला अजून बिअर हवी असेल तर उरलेला अर्धा भरायचा. आहे तेवढी बिअर समजा पुरेशी असेल तर तो अर्धा संपवून टाकायचा . हाय काय नाय काय!

प्रमाणमीमांसेत जे प्रत्यक्ष दिसत ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. छायाचित्रात दाखवलेला 'द्रव्याने अर्धा भरलेला एक ग्लास फकत आपल्या डोळ्यांनी (ज्ञानेंद्रीयांना) दिसणार्‍या जानवणार्‍या गोष्टींच्या अधारावर फारतर ग्लास काचेचा आहे, विशीष्ट आकाराचा आहे, आणि त्यात पिवळ्या रंगाचे द्रव्य आहे एवढीच अधिकची माहिती जोडता येते. हे झाल प्रत्यक्ष प्रमाण.

पण प्रतिसादात घाटपांडे साहेबांनी विधान हे गृहीत धरून केल कि पिवळ्या रंगाच द्रव्य हे बिअरच असल पाहिजे. अर्थात हे त्यांच व्यक्तीगत अनुमान झाल. खात्री करण्याची पुरेशी काळजी घेतली नाही तर प्रत्यक्ष प्रमाणाशिवाय इतर सर्व 'प्रमाणं' फसवी असू शकतात. पिवळ्या रंग असलेली प्रत्यक्षात अनेक द्रव्ये असू शकतात घाटपांडे साहेब म्हणतात त्या प्रमाणे बिअरही असू शकते, पण बिअरच्या एवजी मधही असू शकते किंवा एखादे औषध अथवा सरबतही असू शकते. तर हा झाला अनुमान नावाचा प्रमाणाचा प्रकार.

पण या छायाचित्रातील द्रव्याची प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वरील अनुमानांमध्ये सांगीतल्या पेक्षा वेगळीच आहे. हे खरे आहे की छायाचित्रातील द्रवपदार्थ अल्कोहोलीक ड्रिंक आहे पण ती बिअर नाही तर युरोपातील नेदरलँड नावाच्या देशातील प्लँटिअ‍ॅक/ग नावाची ब्रॅण्डी (१०० वर्षे जुना ब्रँड) आहे. म्हणजे अनुमान चुकू शकते. आता मी जी माहिती देतो आहे ती झाली शब्द प्रमाण कारण यात ऐकीव किंवा दुसर्‍या व्यक्तीने दिलेली माहिती आहे. आणि तीही मी तिसर्‍या व्यक्तींनी दिलेल्या माहितीवर आधारीत आहे हि माहिती मी अजून एखाद्या व्यक्ती कडून खात्री करून घेऊ शकतो पण ऐकीव माहिती ऐकीवच असते. (अवांतरः संबंधीत ब्रॅण्डीत ज्येष्ठमध असते आणि सुवासिकही असते असेही वाचले.)

उदाहरणार्थ एखादी दृकश्राव्य डिटर्जंटची जाहीरात आहे. आधी मळलेला कपडा दाखवतात समोरची जाहिरात करणारी व्यक्ती सांगत असते अमुक तमुक साबण वापरा आणि मग एकदम शुभ्र पांढर्‍या कापडाची जाहीरात इथे शब्दांनी सांगतात त्यांना हव ते अनुमान काढण्यास तुम्हाला प्रवृत्त करतात पण खरी वस्तुस्थिती वापरून पाहील्या नंतर प्रत्यक्ष प्रमाणानेच समजते.

half filled glass

हा विषय मला जेवढा समजला तेवढ्या आधारावर लिहिण्याचा प्रयास आहे चुक भूल देणे घेणे. अधिक माहितीचे स्वागत असेल. नित्या प्रमाणे विकिप्रकल्पाकरता असल्यामुळे आपले या धाग्यावरील प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त कॉपीराईट फ्री होते आहे असे गृहीत धरले जाईल. ग्लासचे छायाचित्र विकिमीडिया कॉमन्समधील कॉपीराईट समस्या नसलेले म्हणून घेतले (अजून वेगळा काही हेतु नाही)

तंत्रमाहितीचौकशीप्रतिभा

प्रतिक्रिया

ज्ञानव's picture

11 Mar 2014 - 12:40 pm | ज्ञानव

आत्त्ताच अर्धा तर अर्धा म्हणून संपवला...... आता काही सुधरत नाहीये तुम्ही फार गहन लिहिले आहे का?....थोड्या वेळाने बघतो.

काय माहितगार , कितवा पेग?

माहितगार's picture

11 Mar 2014 - 1:33 pm | माहितगार

@ज्ञानव;! मी आत्ता लिही पर्यंत ३८० वाचनं झाली (तशी ३८१ पण त्यातल १ माझच होत) प्रत्येक वाचकाच्या प्रत्येक वाचनाकरता अर्धा भरून ठेवत आहे. पण ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट पॉलीसीनुसार त्याला अर्धा म्हटला की त्याचा (ग्लासाचा) अपमान होतो बरंका फूल म्हणायच फूल; नाहीतर हा रिकामा का ठेवला ?.. असं म्हणून विचारायच असा धाग्याचा अरध आहे..!
आणि @ स्पा;! ३८० मधले शील्लक किती आणि शीलकीतले रिचवले किती हे मोजण्याच्या स्थितीत आम्ही सध्या नाही. (खोटा) आकडा हवा असल्यास ते स्वतः प्रत्यक्षप्रमाणाने मोजून आपण आम्हास धागा तळाला गेल्यावर सांगावे. आपले अनुमानीत प्रमाण आम्हास मान्य असेण्याची शक्यता आहे :) (ह. घ्या.) खरा आकडा ज्ञानव यांना विचारावा कारण ते रिकाम्या आणि पूर्ण ग्लासांना अर्धा म्हणूनच मोजत आहेत. त्यांचे मोजमापाचे प्रमाण त्यांच्या करता प्रत्यक्ष आमच्या करता शब्दप्रमाण (काय म्हणतोय मी ज्ञानवांप्रमाणेच मलाही सूचत नाही आहे. सम्जूण घेण्याचा प्रयास करावा हि तीविंन :) ) (ज्ञानव आपण पण ह. घ्या.)

आणि हो घाटपांडे मागच्याच धाग्यावर राहीले कुणी घेऊन येता का या नव्या पार्टीला त्यांना येताना चकणाबी घेऊन येवा हि विनंती (घाटपांडेजी आल्यावर आपण पण हलकेच घ्या बबरे )

अजुन खुप अभ्यास करावा लागेल तुम्हाला... इतक्यात भारतीय तत्वज्ञान समजलं अशी मनाची समजुत करुन घेऊ नका. थोडक्यात काय तर आमचे मित्र कै.श्रामो यांच्या भाषेत "मोठे व्हा !"

माहितगार's picture

11 Mar 2014 - 1:49 pm | माहितगार

अभ्यासतर करावा लागेल हे खरे (आम्हास तसा तो नाही हे आम्ही वर लेखातच कबुल केले आहे; भारतीय तत्वज्ञानाच्या सुर्यप्रकाशापुढे आम्ही काजव्या एवढे सुद्धा चमकू शकत नाही हे अमंळ खरेच आहे ), पण आम्ही तो मिसळपाव आणि इतर मराठी संकेतस्थळांवरून ऑनलाइन करू इच्छितो ज्यामुळे आमच्या सोबत इतरांचाही फायदा होईल.

आम्हास अपरिचीत आपले मित्र कै.श्रामो यांना आदरपुर्वक वंदन. आणि आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

(ज्ञानी लोकांच्या हाताचे बोट धरून मोठा होऊ इच्छिणारा)

मारकुटे's picture

11 Mar 2014 - 1:57 pm | मारकुटे

http://books.google.co.in/books/about/A_History_of_Indian_Philosophy.htm...

आणि राधाकृष्णन तसेच http://en.wikipedia.org/wiki/M_Hiriyanna
यांची पुस्तके वाचा... थोडं फार कळेल... वाचा..
चर्चेपेक्षा वाचन मनन आणि चिंतन या भारतीय पद्धतीचा लाभ होईल.
नुसतीच चर्चा बाष्कळ होते अशा विषयांसाठी...
आणि अखेर बुद्ध म्हणतो तसं बुद्धीला पटेल तेच स्विकारा... :)

मा.र. कुटे साहेब दुव्यांकरता धन्यवाद . सवडीने जरूर वाचेन. राजहंसाप्रमाणे पोहता आले नाही म्हणून बदकांनी बगळ्यांनी आणि इतर जीवमात्रांनी ज्ञानाच्या तलावातले ओंजळभर पाणि पिण्याचा प्रयासही करू नये हे कितपत न्याय्य ठरते ? ज्ञान ग्रहणाचे आणि ज्ञानप्रसाराचे आमचे प्रयास थोर विद्वान ऋषी मुनींप्रमाणे नसतील पण आम्ही (मी) विकिपीडिया संस्कृतीतून येतो प्रत्येक व्यक्ती कडे काही ना काही देण्यासाराखे घेण्यासारखे ज्ञान आहे यावर आमचा अढळ विश्वास आहे तो आमच्या धाग्यांना आणि चर्चांना कुणी बाष्फळ म्हटल्याने तुटणारा नाही.

या धाग्यांचा उद्देश किमान परिचय स्वरूपाचा आहे. मराठी आंतरजालावरील लेखन आणि चर्चांना तर्कसुसंगतता यावी म्हणून तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र या बद्दल मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून अधिक लेखन करून हवे आहे. हा धागाच काढला नसता तर आपण एवढ्या चांगल्या माहितीचा दुवाही शेअर करू शकला असता का ते या निमीत्ताने होते आहे. मिसळपाव सारख्या संकेतस्थळावर कुणी पिएचड्या करण्या साठी येत नाही. होणारी विषयांची ओळख चर्चा ओझरती असते बाकी मुख्य विषय अधिक सखोल अभ्यासावयाचे असतात याची सर्वांना कल्पना असते. धाग्यात किंवा चर्चेतील मुद्यात कुठे सुधारणा असतील काही चुकले असेल तर ते चर्चेत सहभागी होऊन जरूर दर्शवावे. इतरांनी विषयांतर केले तरीही रंजनात सुद्धा सुप्तपणे मुख्य मुद्दा इन्क्लुड करण्याचा प्रयास केला आहेच.

भारतीय तवज्ञान केवळ पोथ्या मंध्ये जपून ठेवावे आणि काही लोकांनीच ते वाचावे स्वतः सोबत अस्तंगत व्हावे सर्वसामन्यांनी ज्ञानी लोकांची नुसतीच वाहवा करून डोक्यावर घेऊन ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर न केला जाणे न होऊ देणे हे गेली कैक हजारो वर्षे होत आले आहे. आमचे हे प्रयासही त्यास फार पुढे नेतील असे नव्हे पण प्रयत्न न करण्या पेक्षा प्रयत्न करणे महत्वाचे असते असे वाटते.

मा.र. कुटे साहेब आपला विवीध विषयांवर चौफेर अभ्यास आहे तेव्हा मराठी विकिपीडियावर येऊन आपल्या आवडीच्या विषयांवर लेखन केल्यास आनंदच असेल. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादाकरीता धन्यवाद.

मारकुटे's picture

11 Mar 2014 - 6:41 pm | मारकुटे

>>>मा.र. कुटे साहेब आपला विवीध विषयांवर चौफेर अभ्यास आहे तेव्हा मराठी विकिपीडियावर येऊन आपल्या आवडीच्या विषयांवर लेखन केल्यास आनंदच असेल.

क्षमा असावी. आम्हास लेखनकला अवगत नाही.