सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


रौशनी.. ४

Primary tabs

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
3 Dec 2007 - 12:30 pm

डिस्क्लेमर - हे लेखन स्वानुभवावर आधारीत असून सत्य आहे. १८ वर्षां खालील मंडळींनी ते नाही वाचले तरी चालेल. यात काही ठिकाणी शिवराळ भाषा वापरली आहे तसेच यातली काही वाक्य/प्रसंग अश्लील वाटू शकतील. आंतरजालीय जगतात असे लेखन सर्रास होते किंवा नाही याबाबत मला कल्पना नाही. तरी कृपया वाचकांनी या सूचनेची वेळीच नोंद घेऊन पुढे वाचायचे की नाही हे आत्ताच ठरवावे!

रौशनी..१
रौशनी..२
रौशनी..३
रौशनी..४
रौशनी..५

>>ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत >>लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता, >>आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्‍यावर!

दोन-पाच मिनिटं अशीच शांततेत गेली. त्यानंतर कृष्णाने सांगितलेली लस्सी आली.

"लिजिये सेठ. कृष्णा, सेठको नमस्ते करो"

त्या काळ्यासावळ्या कृष्णाने मला नमस्कार केला. त्याचा चेहेरा लाघवी होता. माझ्यासमोर थोडासा अवघडलेपणाने उभा होता, थोडासा कसनुसा होऊन उभा होता. 'कोण हा?', 'रौशनीला याच्याबद्दल माझ्याशी काय बोलायचं असेल?' माझ्या मनात पुन्हा एकदा प्रश्न उभे राहू लागले. मी काहीच न बोलता लस्सी पिऊ लागलो.

आता रौशनीने विषयाला हात घातला. "तात्यासेठ, हा कृष्णा. अमिताचा मुलगा. याला कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामपे लगाओ तो बहोत मेहेरबानी होगी! वैसे बिलकुल गवारा/अनपढ नही है. डोंगरीके मुन्शिपाल्टीके स्कूलमे चारपाच साल तक इसने पढाई की है. याने चांगलं शिकावं, तुम लोग जैसा साब बनावं, अशीच इच्छा होती याच्या आईची. अमिता इसे इस माहोलसे दूर रखना चाहती थी!

"तात्यासाब, तुम बहोत सही और सिधेसाधे इन्सान लगते हो, अच्छे घरानेके लगते हो, बडे बडे लोगोंके साथ उठतेबैठते हो, तुम्ही याच्याकरता कुठेतरी चांगली नोकरी बघा. लडका तसा हुशार आहे, मेहनती आहे, प्रामाणिक आहे, पडेल ते काम करेल!" असं रौशनी म्हणाली तेव्हा मला जरा नवलच वाटलं. मी सिधासाधा, अच्छे घरानेका आणि थोरामोठ्यांसोबत उठबस करणारा आहे, हा शोध तिला कसा लागला देव जाणे! बहुतेक तिच्या अनुभवी नजरेने तिला हे सांगितलं असेल!

"जा बेटा कृष्णा, तू अंदर जा और हिसाब लिख. तात्याभाई, हमारा सेठ है ना, उसके सब हिसाब लिखने का काम आजकल कृष्णाही करता है. जगहे का भाडा, खानापिना-चायपानी, लडकियोके भाडे का हिसाब, वगैरा वगैरा!"

हे ऐकून मी मनाशीच हसलो. साला काय फरक होता माझ्यात आणि कृष्णात? मी देशी दारूचे हिशेब लिहीत असे, तर कृष्णा रांडांच्या खोलीभाड्याचे वगैरे हिशेब लिहीत असे! दोन्ही लाईनी तश्या डेंजरच!" :) ते असो, थोडक्यात त्या कृष्णा नावाच्या मुलाला कुठेतरी चांगल्या ठिकाणी कामाला लावायचा होता आणि ह्याकरताच रौशनी मला भेटू इच्छित होती हे मला समजलं. निदान आत्तापर्यंत रौशनी प्रकरणातल्या एका गोष्टीचा तरी मला उलगडा झाला होता, हेही नसे थोडके!

पण आता, 'ही अमिता कोण?', 'ही हयात नाही का?' हे पुन्हा काही नवे प्रश्न तयार झाले. च्यामारी एकदा मनात विचार आला की मरेनात का तो कृष्णा, ती अमिता आणि ती रौशनी! आपल्याला सालं काय देणघेणं या रंडीबाजारवाल्यांशी? ही लस्सी संपवावी आणि इथून चुपचाप फुटावं हे खरं! नंतर नेहमीच काहीतरी कारणं सांगून टाळाटाळ करणं मला सहज शक्य होतं!

लस्सी पीत असतांनाच माझी नजर रौशनीकडे गेली. बाई मोठ्या विश्वासाने माझ्याकडे पाहात होती. 'हा मनुष्य चांगला आहे', 'कृष्णाचं काम करील' असा विश्वास तिच्या चेहेर्‍यावर दिसत होता! मग माझी मलाच क्षणभर शरम वाटली. असेना का ही रंडीबाजारातली मावशी! मला तर तिने खूप इज्जत देऊ करून आदराने वागवलं होतं ना? मला काही वावगं तर करायला सांगत नव्हती ना ती? मग मला तिचं काम करायला काय हरकत होती? निदान प्रयत्न तरी करून पाहायला काय हरकत होती?

आणि खरं सांगायचं तर आता रौशनी मला आवडू लागली होती! हां, आता त्या माहोलमध्ये राहून तिची भाषा काही वेळेला हार्श आणि शिवराळ होती हे खरं, परंतु पहिल्याच भेटीत माझ्या नकळत मी तिच्याकडे आकर्षित झालो होतो. गोरापान रंग, रेखीव चेहेरा! तिचं बोलणं, चालणं, उठणं, बसणं ही प्रत्येक गोष्ट अत्यंत ग्रेसफूल होती. त्या गलिच्छ वातावरणात ह्या सगळ्या गोष्टी अद्याप कशा काय टिकून राहिल्या होत्या देव जाणे! कुठे रौशनी आणि कुठे त्या बाकीच्या काळ्याकुट्ट, पोट सुटलेल्या, बेढब आणि अवाढव्य लोंबत्या स्तनांच्या इतर मावश्या! असो..

"ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. त्या मुलाचं संपूर्ण नांव, कहा तक सिखा है, उसके जनम की तारीख, ये सब मुझे एक कागजपे लिखके दो!"

हे ऐकल्यावर रौशनी निराश हसली!

"कृष्णा हसन हे त्याचं नांव आहे. बस, उसके डोंगरीके स्कूलका एक कागज है मेरे पास. वो देती है आपको. और तात्यासाब, खरं सांगायचं तर हमारे यहा जो बच्चे पैदा होते है, उनका बस एकही नाम होता है - 'हरामी"!! अमिता किसीसे प्यार करती थी. आता काय सांगू तुम्हाला तात्याभाई, अहो रांडांवर कधी कुणी प्रेम करतं का? फक्त शरीराची भूक भागवायला आलेल्या माणसाचं प्रेमही फक्त तेवढ्यापुरतंच! एकदा पाणी पडलं की त्यांच्या प्रेमाची नशादेखील खाडकन उतरते! (ही खास त्या बाजारातली भाषा! हे वाक्य रौशनीच्या तोंडचं आहे, माझं नाही, याची कृपया सुशिक्षित, सुसंस्कृत वाचकांनी नोंद घ्यावी!! :)

"पण अमिताला हे समजलं नाही. एक गिर्‍हाईक आलं होतं तिच्या आयुष्यात. बस! पडली त्याच्या प्रेमात! तिला भाबडीला वाटलं की तोही तिच्यावर प्रेम करतोय म्हणून! अहो पैसेही घेत नसे त्याच्याकडून. त्याची काय चैनच हो! तो मादरचोद फुकटात ठोक ठोक ठोकायचा अमिताला! कसलं प्यार नी कसलं काय! शेवटी एके दिवशी अमिताचं पोट फुगवून, कृष्णाला तिच्या पोटात सोडून निघून गेला कायमचा! अब तो कृष्णा की जिम्मेदारी मुझपे छोडकर अमिताभी इस दुनियासे चली गयी! अमिता मेरी बहोत अच्छी सहेली थी. कृष्णाका कुछ भला हो तो अच्छाही है, नही तो जिंदगीभर रंडियोके हिसाब लिखते वो भी यही पे पडा रहेगा!"

रौशनी बोलत होती, मी ऐकत होतो! सुशिक्षित, पांढरपेशा समाजातला मी, रितीप्रमाणे कृष्णाचा बायोडेटा मागितला तर रौशनीने मला त्याचा वरील बायोडेटा सांगितला! असला बायोडेटा यापूर्वी कधीच माझ्या पाहण्यात आला नव्हता!! ज्याच्या बापाचं खरं नांव माहीत नाही असा बायोडेटा! अमिताच्या त्या ठोक्याचं नांव हसन असावं बहुधा!

"ठीक है. चलता हू मै. मुझसे जो हो सकेगा मै करूंगा." असं म्हणून मी तिथून उठलो. रौशनी मला सोडायला चाळीच्या जिन्यापर्यंत आली. पुन्हा एकदा त्या रांडांच्या गर्दीतून वाट काढत काढत मी जाऊ लागलो.

"दोबारा जरूर आना सेठ. हमे भूल मत जाना." असं म्हणून रौशनीने मला निरोप दिला.

"और तात्यासाब, खरं सांगायचं तर हमारे यहा जो बच्चे पैदा होते है, उनका बस एकही नाम होता है - 'हरामी"!!"

रौशनीचं ते वाक्य माझ्या कानात घुमत होतं! आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो! तो चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला, काळासावळा, भाबड्या चेहेर्‍याचा कृष्णा हरामी होता, हरामखोर होता, हरामाचा होता!! छ्या.. डोकं सुन्न झालं होतं! अमिताला मी कधीही पाहिलं नव्हतं, पण कृष्णाच्या चेहेर्‍यात मला आता तिचा चेहेरा दिसत होता!

आणि रौशनी? मैत्रिणीच्या पोराचं भलं करायला निघाली होती. दोस्ती निभावायला निघाली होती. मृत अमिताचं पोरगं तिथेच सडूकुजू नये म्हणून प्रयत्नशील होती! म्हटलं तर सगळंच अगम्य होतं. आणि मी तरी असा मोठा कोण होतो की त्या चार यत्ता शिकलेल्या कृष्णाला मारे कुठे कामाबिमाला लावणार होतो? तेव्हा मी स्वतःच अवघ्या हजार-बाराशे रुपयावर नोकरी करत होतो. झमझम बारमध्ये हिशेब लिहिण्याचे चार पैसे जरा जास्त सुटत इतकंच!

बारमध्ये परतलो तर बारमधली नेहमीची नोकर मंडळी मिश्किलपणे माझ्याकडे बघत होती. तो चूतमारिचा दीडदमडीचा मन्सूर मला विचारतो, "काय तात्याशेठ, रौशनीकडे काय मजा केलीत? कुणी नवाकोरा माल आला आहे का तिच्याकडे? नथ उतरवायला साली जाम मजा येते!"

पाचदहा रुपायाच्या टीपवर जगणार्‍या मन्सूरने नथ उतरवायची मजा केव्हा अनुभवली होती कुणास ठाऊक! :) पण मला आता या सगळ्याचं काहीच वाटेनासं झालं होतं. मन्सूरला तरी मी का दोष देऊ? तो सगळा माहोलच तसा होता!

काही दिवस असेच गेले. अधनंमधनं 'रौशनीने चाय पिने के लिये बुलाया है' असे मन्सूरचे निरोप यायचे, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. 'ही बया मला वारंवार का बोलावते?' कृष्णाच्या नोकरीचं अजून काहीच काम झालं नव्हतं. म्हणजे मी काही प्रयत्नच केले नव्हते. पण रौशनी मात्र मनातून जात नव्हती. तिने दहा निरोप पाठवूनदेखील आपण एकदाही तिला भेटायला जात नाही हे कुठेतरी माझ्याही मनाला खटकत होतं हेही खरं होतं!

अश्यातच एके दिवशी मन्सूरचा पुन्हा एकदा निरोप आला, "तात्याभाई, तुम्हाला आज रौशनीने खानेपे बुलाया है. ना मत केहेना!" बस! मनाशी ठरवलं, तसाच उठलो आणि पुन्हा एकदा रौशनीची माडी चढलो. 'कृष्णाच्या नोकरीकरता प्रयत्न करत आहे' असं तिला सांगायचं असं मनाशी ठरवलं होतं!

"आओ तात्याभाई, आप तो हमारा रास्ताही भूल गये! आज आपको हमारे यहासे खाना खाकेही जाना पडेगा!"

पुन्हा एकदा रौशनीने माझं हसतमुखाने स्वागत केलं! तिच टापटीप, साफ, स्वच्छ खोली आणि तीच आणि तशीच आकर्षक रौशनी!

'साली दुनिया गेली बाझवत!' असा विचार करून आज मी तिच्यासोबत व्हिस्की पिणार होतो, तिच्या हातची बिर्याणी खाणार होतो आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती!

क्रमश:

--तात्या अभ्यंकर.

अनुभवप्रतिभावाङ्मय

प्रतिक्रिया

धोंडोपंत's picture

3 Dec 2007 - 12:47 pm | धोंडोपंत

वा वा वा वा,

तात्या,

लई झकास. अस्सल लिखाण झाले आहे. असेच चालू दे. तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस.

हा लेख वाचल्यावर लगेच नामदेव ढसाळांचे 'गोलपीठा' आठवलं. त्यात नामदेव ढसाळ म्हणतात -

"खद्र्या मैनांनो,
तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार"

समाजातल्या ह्या अतिशोषित वर्गावर लेखन करतांना हीच नि:पक्ष भाष्यकाराची भूमिका असली पाहिजे.

आपला,
(वाचक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रकाश घाटपांडे's picture

3 Dec 2007 - 1:45 pm | प्रकाश घाटपांडे

>

"खद्र्या मैनांनो,
तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार"

ऑक्सफर्ड इंग्रजी -मराठी डिक्सनरीत (रमेश धोंगडे संकलित) cunt या शब्दाचा अर्थ पुच्ची असा दिला आहे. इथे सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या नाहीत असे काही जणांना नक्की वाटेल. पण अर्थवैविध्याचा संकोच होउ नये म्हणुन ही "काळजी" संपादकांनी घेतली असावी.
बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते.
धोंडोपंतांशी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

तात्या, 'रोशनी' भन्नाट होत आहे.
मावशी असूनही तिच्यातली सुसंस्कॄत स्त्री जिवंत आहे हे जाणवते.
चांगलं काय आणि वाईट काय याचं (तथाकथित?) सभ्य समाजानं केलेलं वर्गीकरण तिला मान्य आहे.
ती तुम्हाला त्या अर्थानंच 'सही आणि सीधेसाधे' समजते.
आता तिची कहाणी ऐकल्यावर मगच ती मावशी का झाली याचा उलगडा होईल.
प्रतिक्षेत.

एक प्रश्न उभा राहतो -
समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का?
या व्यवसायात उतरणार्‍या स्त्रियांची दु:खे, त्यांची आगतिकता गेल्या पिढीत फार चर्चिली गेली आणि
या स्त्रिया केवळ परिस्थितीची शिकार होऊन हा 'धंदा' करतात असा सर्वसाधारण सूर होता.
आता मात्र अनेक तरूण मुली स्वेच्छेने, केवळ भरपूर संपत्ती कमी वेळात मिळवता येईल असा हिशोब
करून 'डान्स बार'च्या अथवा इतर नावांखाली हाच किंवा अशा प्रकारचा व्यवसाय करतात. इतकेच काय पण त्यांना यातून बाहेर
काढण्याच्या प्रयत्नांना - 'पण आमच्या आमदनीला धक्का न लावता' - ही पूर्वअट आहे.
असं का झालं आहे?(की त्यावेळीही अशीच परिस्थिती होती?)
आजची 'रोशनी' अशी आपल्या मैत्रिणीच्या मुलाचा उद्धार व्हावा याच्या तळमळीत असेल काय?
तात्या, याबद्दल तुमचा अनुभव/मत काय?

समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का?
- समाजाचे सांस्कृतिक मापदंड हे काळानुसार बदलत असतातच. तेव्हा ते हल्ली आणि भविष्यात बदलत राहतील हे नि:संशय.

आपण शरीरविक्रय करणार्‍या आणि बारबालांचा उद्योग करणार्‍या मुलींना सहज या ठीकाणी पाहतो. थोडा विचार करून पाहा, आपल्या आजूबाजूलाही अशा मुली दिसतात पण समाजातील कनिष्ठ वर्गाकडे आपण सहज बोट दाखवतो. या प्रतिष्ठित घराण्यांतील मुलींपैकी काही चित्रपटांच्या वेडाने, नाट्य, टीव्ही शृंखला इ.च्या वेडाने झपाटलेल्या असतात. कधी जाहीरात क्षेत्राकडे तर हवाईसुंदरी, हॉटेलिंग व्यवसाय यांतील असतात. (सरसकट ठपका ठेवण्याचा हेतू नाही परंतु हवाईसुंदरी आणि मोठमोठ्या हॉटेल्समधील काही व्यक्तींशी ओळख असल्याने त्यांच्या "विचारांत आचारांत" अचानक आलेले बदल अनुभवलेले आहेत. दुर्दैवाने, हे बदल त्यांच्या पांढरपेशा पालकांतही पाहिलेले आहेत. तेव्हा येथे मावशी कोण असा प्रश्न पडतो.)

तरुण मुली सोडल्या तर हात आणि घरखर्चाला थोडे अधिक पैसे मिळावे म्हणून प्रतिष्ठीत घरांतील सुगृहिणीही असे 'पार्टटाईम' उद्योग करून असतात. ओम पुरी आणि रेखा अभिनीत 'आस्था' हा चित्रपट याच गोष्टीवर आधारित होता हे आठवते.

तात्या, रोशनीचा ४था भाग आवडला. पुढच्या भागांसाठी उशीर नको.

विसुनाना's picture

3 Dec 2007 - 5:46 pm | विसुनाना

म्हणायचे होते. फक्त कनिष्ठ वर्गावर ठपका ठेवण्याचा हेतू नव्हता. इतकेच काय? तर रोशनीमध्येच मालिका अभिनेत्रीचे जे पात्र आले आहे त्यातून तात्यांना हेच (उच्चभ्रू म्हणवणार्‍या समाजाचे अधःपतन) दाखवावेसे वाटत असावे.

पण माझा मुद्दा एवढाच की -
पूर्वी वैयक्तिक फायद्यासाठी ऊर्ध्वगमन करण्याचे प्रयत्न चालत.
(उदा. रोशनी कृष्णाला गर्तेतून बाहेर काढू इच्छिते, शिकवून शहाणा, नीतीमंत करू पहाते.)
आता व्यक्तिगत अधोगतीतच फायदा दिसत आहे.
(उदा. आजची रोशनी कृष्णाला म्हणेल - शिकून काय मिळणार? त्यापेक्षा मस्त दारूच्या अड्ड्यावर काम कर. 'दल्ला'ली कर. डॉन-बीन हो!)

गेल्या दहा बारा वर्षात सांस्कृतिक मापदंडातला हा अमूलाग्र बदल (घूमजाव) पाहून भोवळ येते.

आनंदयात्री's picture

3 Dec 2007 - 1:31 pm | आनंदयात्री

हा भाग आधीसारखाच आवडला. आता पुढले भाग मात्र रेग्युलर टाका म्हणजे झाले.

सहज's picture

3 Dec 2007 - 2:48 pm | सहज

रौशनी भाग ४ आला.......
...थोडे तरी मार्गी लागलो.

आता जास्त वेळ वाट नका बघायला लावू...

हा भाग देखील नेहमी सारखा मस्त चकचकीत... नो डाउट...

आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती!

हे शेवटचे वाक्य मात्र सुत्रधार/नायकाने/लेखकाने कसे टाकले ते समजले नाही. रौशनी ,"जेव आधी, मग सांगते." असे कदाचित म्हणाली असेल.

असो लवकर पुढचा भाग येऊ देत.

प्रमोद देव's picture

3 Dec 2007 - 2:49 pm | प्रमोद देव

और भी लिख्खो!आपुन पढ रहेला है!

केशवसुमार's picture

3 Dec 2007 - 3:14 pm | केशवसुमार

हा ही भाग आवडला. आता पुढले भाग मात्र रेग्युलर येऊ देत म्हणजे झाले.
केशवसुमार

नंदन's picture

3 Dec 2007 - 4:03 pm | नंदन

तात्या, इंतजार का फल मीठा होता है म्हणतात तसं वाटलं हा भाग वाचून. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता लागली आहे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

कोलबेर's picture

3 Dec 2007 - 7:32 pm | कोलबेर

आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो!

आवडले.
पुढ्यच्या भागांच्या प्रतिक्षेत!
-कोलबेर

बेसनलाडू's picture

3 Dec 2007 - 11:45 pm | बेसनलाडू

आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. हा भाग आधीच्या भागांप्रमाणेच चांगला आणि पुढील भागांची उत्कंठा वाढवणारा. पुढचे भाग येऊ द्यात; आम्ही वाचत आहोतच.
(वाचक)बेसनलाडू

धनंजय's picture

4 Dec 2007 - 6:53 am | धनंजय

आताच कुठे कथा सुरू होते आहे, आधीच आवडलेली आणखीन आवडत आहे.

(अवांतर १: मागे मी दुसर्‍या एका चित्रणाच्या बाबतीत म्हटले होते की "नकल केल्यासारखे वाटले", यावेळी ती तक्रार साफ खोटी पाडून मला शर्मिंदा केलेत! आणि या शरमेत मला अधिक सुख आहे, ते सांगावे लागू नये.)
(अवांतर २: या कथेत एकही अश्लील शब्द किंवा वाक्य नाही. कारण "अश्लीलपणा" हा संदर्भाने होतो, शब्दाच्या उच्चाराने नाही. त्यामुळे उगाच माफी मागू नका बुवा - कोण्या अडाण्याला वाटेल की खरेच माफी मागण्यालायक काही आहे.)

राजे's picture

4 Dec 2007 - 9:39 pm | राजे (not verified)

शी सहमत.
छान लेखन... आम्ही वाचतो आहोत.. पुढील भाग लवकर लिहा नाहीतर थांबाला चार-पाच महिने तो पर्यंत आम्ही सगळे विसरुन जाऊ व मग कोणीतरी चर्चा चालू करेल "रोशनी" चे काय ?
तर अशी वेळ येऊ देऊ नका, लवकर लिहा.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

सर्किट's picture

4 Dec 2007 - 12:06 am | सर्किट (not verified)

हाही भाग छानच जमलाय तात्याशेठ !
येऊ द्या.

आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे.

बेसनलाडवाशी सहमत !

- सर्किट

प्राजु's picture

4 Dec 2007 - 12:28 am | प्राजु

आहे. अजून लवकर येऊदेत पुढचे भाग.
रोशनीचे व्यक्तिमत्व कणखर दाखवले आहे... आवडले.

पांढरपेशा समजातला "हा उद्योग" माहिती होता. पण नवे आलेले २ चित्रपट
१. मुंबई सालसा
२. दिल विल एक्सेट्रा...

हे पाहून ही नवी फॅशन वाटते... कॉलेज जीवनात किवा शालेय जीवनातही.. १ पेक्षा जास्त व्यक्तींशी सबंध ठेवून.. त्यात काही गैर नाही अशी विचार सरणी असणे. किंवा त्यावर पैज लावणे.
मला हे चित्रपट झेपलेच नाहीत.

- प्राजु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Dec 2007 - 5:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
रोशनीचा हा भाग ही आवडला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

(आम्हालाही या लेखाच्या निमित्ताने नामदेव ढसाळांच्या कवितेतील वेगवेगळ्या शब्दांची आठवण झाली)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किमयागार's picture

5 Dec 2007 - 9:04 am | किमयागार (not verified)

अध्यक्ष महोदय,
लेख मालिका संपेपर्यंत आम्ही आमचे मत राखून ठेवत आहोत.
कळावे,
-कि'गार
********************************************
अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

विसोबा खेचर's picture

6 Dec 2007 - 8:17 am | विसोबा खेचर

सर्वांचे मनापासून आभार...

नानासाहेब, आपले प्रश्न वाजवी आहेत, प्रियालीने दिलेल्या उत्तराशी मी सहमत आहे..

तात्या.

चित्रा's picture

6 Dec 2007 - 9:11 am | चित्रा

विचार करायला लावणारे लिहीत आहात, कथा (आणि रौशनी ) बद्दल उत्सुकता आहे.

दिगम्भा's picture

6 Dec 2007 - 12:35 pm | दिगम्भा

आपल्या मराठी लोकांना उर्दू विशेष समजत नसल्यामुळे हरामखोर आणि हरामज़ादा हे एकच किंवा जवळपासचे वाटतात. त्यातले वाईट नि जास्त वाईट (चुकून चागले-वाईट म्हणणार होतो) कळत नाही.
ज्यांना अचूक शिव्या देण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा खुलासा -
खोर (ख़्वार) म्हणजे खाणारा -- हरामखोर म्ह. हरामाचे खाणारा, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने उदरनिर्वाह करणारा, स्त्रियांचा शरीरविक्रय करून जगणारा भडवा हा त्यापैकी एक;
ज़ादा म्हणजे जन्मलेला किंवा मुलगा -- हरामातून जन्मलेला, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने जन्मलेला, लावारिस, अनौरस, अक्करमासा/शा, मराठीत सांगायचे तर बास्टर्ड.
शिव्या देतांना हरामखोर ही काहीशी सौम्य तर हरामज़ादा ही तीव्र शिवी आहे, हे मराठी लोकांना कळले नाही तरी उत्तरेकडील लोकांना चांगले कळते हे ध्यानात ठेवावे व योग्य काळजी घ्यावी.
रौशनीला हरामी म्हणजे हरामज़ादा अभिप्रेत होता असे वाटते, हरामखोर नव्हे.

कथा आवडते आहे. अर्वाच्यता स्वाभाविकपणे आल्यासारखी वाटते. आधीचा एक लेख (व त्याखालील प्रतिसाद) केवळ अर्वाच्यतेसाठी लिहिल्यासारखा वाटला होता तसे येथे वाटत नाही.
पुढील भागाची वाट पाहतो आहे.
- दिगम्भा

टग्या's picture

7 Dec 2007 - 12:05 am | टग्या (not verified)

> मराठीत सांगायचे तर बास्टर्ड.

हे आवडले! :-)