रौशनी.. ३

Primary tabs

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
22 Sep 2007 - 2:16 pm

रौशनी..१
रौशनी..२
रौशनी..३
रौशनी..४
रौशनी..५

डिस्क्लेमर - हे लेखन स्वानुभवावर आधारीत असून सत्य आहे. १८ वर्षां खालील मंडळींनी ते नाही वाचले तरी चालेल. यात काही ठिकाणी शिवराळ भाषा वापरली आहे तसेच यातली काही वाक्य/प्रसंग अश्लील वाटू शकतील. आंतरजालीय जगतात असे लेखन सर्रास होते किंवा नाही याबाबत मला कल्पना नाही. तरी कृपया वाचकांनी या सूचनेची वेळीच नोंद घेऊन पुढे वाचायचे की नाही हे आत्ताच ठरवावे!

रौशनी भाग १ व २ या आधी येथे पुनर्प्रकाशित केले आहेत. भाग ३ येथे प्रथमच प्रकाशित करत आहे..

भाग २ वरून पुढे सुरू..

>>शेवटी एकदाचे आलो आम्ही रौशनीच्या खोलीपाशी. खोलीत समोरच सोफ्यावर रौशनी बसली होती! पन्नाशीच्या आसपासची, गोरी, आणि देखणी!!

भाग ३ -

"आओ तात्याभाई, बैठो. शर्माना मत!" रौशनी माझ्याकडे पाहात हसून म्हणाली.

माझं नांवबिव सगळं बहुधा या बयेला माहीत होतं. मी तिच्या खोलीत शिरलो. आत जाताचक्षणी माझ्या कल्पनेला पहिला धक्का बसला. 'वेश्याबाजाराच्या एका मावशीचं घर ते कसं असणार? जसा तो बाजार गलिच्छ, त्यात वेश्याव्यवसाय करणार्‍या मुली जश्या गलिच्छ आणि कळकट, तशीच त्यांची मावशी व तिचं घरही कळकट, कुबट आणि ओ येणारं असणार!' या माझ्या कल्पनेला पार तडा गेला. एक तडा रौशनीच्या घरात शिरण्यापूर्वी तिच्या रुपाकडे पाहून गेलाच होता! दुसरा तडा तिच्या घरात शिरल्यावर गेला! अतिशय स्वच्छ, नीटनेटकं, छान आवरलेलं घर. घरात मंद उदबत्त्यांचा वास सुटलेला. तिच्या घरात जाऊन तेथील सोफ्यावर मी बसलो. समोर पाहतो तर भिंतीवर विवेकानंदांचा फोटो, एका लहानश्या शोकेसवजा कपाटात काही पुस्तकं ठेवलेली, कोपर्‍यात उभा केलेला तानपुरा! वेश्याव्यवसाय चालणार्‍या मुंबईच्या एका गलिच्छ वस्तीत मी बसलो होतो या गोष्टीचा माझा माझ्यावरही विश्वास बसेना!

बाजूच्याच सोफ्यावर रौशनी बसलेली होती. तिचं सौंदर्य नक्कीच खानदानी वाटत होतं, गोरपान रंग आणि पन्नाशीच्या पुढची असूनही आकर्षक बांधा राखून होती!

साधारणपणे वेश्यावस्तीतल्या मावश्याही तशाच कळकट, कजाग, ओबडधोबड, भयानक शिवराळ, बथ्थड चेहेर्‍याच्या, अक्षरशः कैदाशिणी वाटाव्यात अश्या, अत्यंत स्थूल शरीरमानाच्या, अस्ताव्यस्त आणि शेप गेलेल्या ओथंबलेल्या स्तनांच्या, नेसलेल्या साड्यांमधून दिसणारी त्यांची ती सुटलेली काळी पोटं दाखवणार्‍या असतात असा माझा समज होता! पण रौशनी एकदम वेगळी होती. चेहेरा सुरेख होता पण करारी होता, त्यात एक जरब वाटत होती! ती असणारच म्हणा. वेश्या वस्तीतील ३०/३५ मुलींची मावशी होणे, त्यांना सांभाळणे, पोलिस, गुंड, दारुवाले यांच्याशी नेहमी संबंध असणार्‍या बायका या! यांना साधं, गरीब राहून चालणारच नव्हतं!

ते काहीही असो, मला मात्र रौशनीकडे पाहताच क्षणी तिचे आकर्षण वाटले होते. 'च्यामारी, बाई पन्नाशीच्या घरातली दिसते पण अजूनही चांगला दमखम राखून असावी असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला! कोण असेल ही? इथे कुठून आली असेल? च्यायला रंडीबाजारातली मावशी ही, हिच्या घरात स्वामींचा फोटो कसा काय? काय संबंध? स्वामी हिने वाचले आहेत काय? हिच्या घरात इतरही पुस्तकं दिसताहेत? किती शिकलेली असेल ही? आणि कोपर्‍यातला तो तानपुरा? ही गाणं शिकलेली आहे की काय? की इतर कुणी यांच्या घरात गातं? मला हिने का बोलावलं असेल? आत्ता आपण ज्या कॉमन गॅल्लरीतून हिच्या घरात प्रवेश केला तिथून आमचा झमझम बार दिसतो खरा, परंतु तिथे येजा करताना असं किती वेळा हिने मला पाहिलं असेल? मलाच हिला का बोलवावासं वाटलं असेल? मन्सूरने माझ्याबद्दल हिला काय सांगितलं असेल?

सगळे प्रश्न! फक्त प्रश्न!! च्यामारी सुशिक्षित/सुसंस्कृत मंडळींना प्रश्नच फार पडतात! :)

"काय घेणार शेठ? काही दूध, लस्सी, कॉफी मागवू का? की थोडी व्हिस्की घेणार? सगळा बंदोबस्त आहे आपल्याकडे!" रौशनी कधी मराठीत बोले, तर कधी बंबैय्या हिंदीत तर कधी अस्खलित हिंदीत.

साला मी कसला तिच्याकडे काही दूध-लस्सी वगैरे घेणार होतो? मला खरं तर वेश्याव्यवसाय सांभाळणार्‍या एका मावशीच्या घरात आपण बसलो आहोत हेच अजून पचवायला कठीण जात होतं. त्यातच अधनंमधनं बाहेरून त्या परकर पोलक्यातल्या, काळपट रंगाच्या, ओठ सुजलेल्या विशीपंचविशीतिशी तल्या वेश्या माझ्याकडे पिजर्‍यातला प्राणी पाहावा अश्या पद्धतीने पाहात होत्या, एकमेकांकडे पाहून टिंगलीच्या सुरात हासत होत्या! 'ये कौन चुतिया इधर आ गया' असंच त्या आपापसात म्हणत असणार! 'च्यामारी झक मारली आणि इथे आलो. का आलो? इथून उठून ताडकन चक्क निघून जावं की काय?' असेच विचार माझ्या मनात येत होते! संस्कार! दुसरं काय? सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातले पांढरपेशा संस्कार! रामरक्षा, पर्वचा, पाढे, शाळा, शिक्षक, मोतोपंत, बालकवी, या सगळ्या गोष्टी मला रौशनीच्या घरच्या सोफ्यावर आरामशीरपणे बसू देत नव्हत्या. कुल्याला फोड आलेला नसतानही मी त्या सोफ्यावर अवघडलेपणाने बसलो होतो!

तेवढ्यात, "एऽऽऽ क्यो खडी है सब लोग इधर? क्या नाटक है? ये सेठ इधर सो ने को नही आया है! चलो, निचे जाव सब लोग मादरचोद! धंदा करना नही करना क्या आज? यहा किसिको फोकट का खाना नही मिलेगा. धंदा नही करना है तो भागो यहासे और अपना रास्ता सुधारो! मन्सूर, तू अब जा और निचे जाके रुक. सेठको भेजती है मै थोडी देर के बाद!"

अरे बापरे माझ्या! बहुतेक माझं अवघडलेपण रौशनीच्या ध्यानात आलं असावं आणि तिने तिच्या ठेवणीतल्या आवाजात त्या बाहेर घुटमळणार्‍या रांडांना दम भरला असणार! 'ये सेठ इधर सोने के लिये नही आया?? बाबारे माझ्या..:) सानेगुरुजींची 'खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अरपावे' ही कविता म्हणणारा मी. एका सरळमार्गी शिक्षिकेचा मुलगा होतो मी. नोकरीधंद्याच्या निमित्ताने त्या भागात वावरत असे. हा इथे आपल्याबरोबर झोपायला आला आहे असं त्या मुलींना वाटलंच तरी कसं? अर्थात, वाटलं असेल तरी त्यांची काय चूक म्हणा! तिथे जाणारी माणसं केवळ त्या एकाच कामाकरता तिथे जात! ते काही स्वरुपानंदांच्या पावसचं किंवा गुहागरच्या व्याडेश्वराचं मंदिर नव्हतं! :)

"थोडी लस्सी तरी घ्या शेठ आमच्याकडची! हमभी आपही की तरह इन्सान है, थोडी लस्सी लोगे तो हमारीभी इज्जत रहेगी!"

रौशनीचा आवाज पुन्हा एकदन नॉर्मल. एका क्षणापूर्वी ही बया केवढ्या मोठ्यांने ओरडली होती! एवढं या बाईला स्वीच ऑन, स्वीच ऑफ तंत्र अवगत होतं? :)

"अरे कृष्णा, जा धोबीसेठ को एक लस्सी उपर भेजनोको बोल!"

आतल्या खोलीतून एक काळासावळा, १७-१८ वर्षांचा मुलगा बाहेर आला. चौकडीचा शर्ट आणि हाफ चड्डी घातलेला. तो पटकन माझ्यासमोरून जात लस्सीची ऑर्डर द्यायला खाली निघून गेला.

"बसा तात्याशेठ. लस्सी मागवली आहे. हा कृष्णा. इसिके बारेमे आपसे जरा बात करनी है!"

आता मात्र रौशनीचं बोलणं मला थोडं आश्वासक वाटू लागलं आणि हळूहळू माझा धीर चेपू लागला. मंडळी, आपल्याला खोटं वाटेल पण त्या बाईच्या चेहेर्‍यावर एक विलक्षण आत्मविश्वास होता, वागण्याबोलण्यात अदब होती! समोरच्या माणूस कितपत पाण्यात आहे हे अवघ्या एका नजरेत ओळखण्याचं कसबही तिच्यात अनुभवाने आलेलं असावं. माझ्या नजरलेला नजर देऊन बोलत होती. उलट मीच थोडासा भांबावलो होतो, उगाच इकडेतिकडे पाहिल्यासारखं करत होतो. तिच्या नजरेला नजर देणं मला जमत नव्हतं. वास्तविक मला guilty वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. ना मी तिचे चारचव्वल देणं लागत होतो, ना कुठल्या गुन्ह्यात मला तिच्यासमोर उभं केलं गेलं होतं, ना मी तिच्यासोबत लाळघोटेपणाकरून झोपायला निघालो होतो! पण च्यामारी बाईचा चेहेराच साला भारी होता, आव्हानात्मक होता, एक प्रकारची हुकुमत होती तिच्या चेहेर्‍यावर!

क्रमशः..

तात्या अभ्यंकर.

अनुभवप्रतिभावाङ्मय

प्रतिक्रिया

सर्किट's picture

22 Sep 2007 - 2:30 pm | सर्किट (not verified)

तात्या,

रौशनी भाग -१, आणि २ ह्यातलं प्रामाणिक प्रकटन जसं मनाला भावलं तसच ह्या तिसर्‍या भागातलंही. आम्ही वाचतो आहोत. लवकरंच पुढे चौथा भागही येऊ द्यात.

वेश्या वस्तीतील ३०/३५ मुलींची मावशी होणे, त्यांना सांभाळणे, पोलिस, गुंड, दारुवाले यांच्याशी नेहमी संबंध असणार्‍या बायका या! यांना साधं, गरीब राहून चालणारच नव्हतं!

ह्यात थोडं फेरफार करून,

सिलिकॉन व्हॅलीतील १०/१५ आय टी इंजिनियर्सचा बॉस होणे, त्यांना सांभाळणे, व्हीपी, कस्टमर्स, एच आर ह्यांच्याशी नेहमी संबंध असणारी मुले ही. यांना साधं गरीब असून चालणारंच नव्हतं!

असं वाचलं.

काही चूक असेल, तर सांगा.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

22 Sep 2007 - 2:42 pm | विसोबा खेचर

ह्यात थोडं फेरफार करून,
सिलिकॉन व्हॅलीतील १०/१५ आय टी इंजिनियर्सचा बॉस होणे, त्यांना सांभाळणे, व्हीपी, कस्टमर्स, एच आर ह्यांच्याशी नेहमी संबंध असणारी मुले ही. यांना साधं गरीब असून चालणारंच नव्हतं!
असं वाचलं.
काही चूक असेल, तर सांगा.

नाही रे बाबा! यात काहीच चूक नाही..

आजपासून आपण तुला 'रौशन' असं म्हणत जाऊ! :))

प्रकाश घाटपांडे's picture

22 Sep 2007 - 3:23 pm | प्रकाश घाटपांडे

आजपासून आपण तुला 'रौशन' असं म्हणत जाऊ! :))

हहपुवा
प्रकाश घाटपांडे

केशवसुमार's picture

22 Sep 2007 - 4:10 pm | केशवसुमार

आजपासून आपण तुला 'रौशन' असं म्हणत जाऊ! :))

आम्ही आमच्या रिसोर्स मानेजरला 'आन्टी' म्हणायचो.. आणि बॉडीशॉपिंगला 'देहविक्री'... प्रोजेक्ट असाईनमेंटला 'जा उसके साठ बैठ'...त्याची आठवण झाली..
तात्याशेठ,
आहो जरा मोठ्ठे भाग लिहा.. उगाच त्या मराठी मालिकां सारख्या लांबवू नका..
उत्सुक्ता वाढली आहे ..पुढचा भाग लवकर येऊद्या..
केशवसुमार

सर्किट's picture

24 Sep 2007 - 4:35 am | सर्किट (not verified)

पर्सिस्टंट काय रे केशवा ? का इन्फोसिस ??

- (आण्टी) सर्किट

लिखाळ's picture

22 Sep 2007 - 7:44 pm | लिखाळ

आजपासून आपण तुला 'रौशन' असं म्हणत जाऊ! :))

ह ह पु वा :)

--लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

प्रकाश घाटपांडे's picture

22 Sep 2007 - 2:34 pm | प्रकाश घाटपांडे

तात्या,
खुप चांगले वर्णन, समोर प्रसंगच उभा राहतो. मनाल कुबड आलेल्या १८ वर्षावरील व्यक्तींनी नाही वाचले तरी चालेल. असे डिस्क्लेमर मधील अदृष्य ओळी मी वाचल्या.
प्रकाश घाटपांडे

राजे's picture

22 Sep 2007 - 2:47 pm | राजे (not verified)

वा तात्या ... मस्तच, पुढील भाग कधी ?

राजे
(*हेच राज जैन आहेत)

free web stats

नंदन's picture

22 Sep 2007 - 2:53 pm | नंदन

तात्या, हा भागही आवडला. मिलिंदरावांनी म्हटल्याप्रमाणे प्रकटन प्रामाणिक आणि ओघवत्या शैलीत झाले आहे. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

[अवांतर -- मिलिंदरावांच्या प्रतिक्रियेवरुन हेराफेरीमधला असरानीचा "पता है, आप जैसे लोगोंकोभी अभी इज्जतसे मॅनेजर बुलाना पडता आहे." हा सीन आठवला. अर्थात, जगात विकणारे आणि विकत घेणारे असे दोनच वर्ग असल्याने हे साम्य तितकेसे अनपेक्षित वाटू नये. :)]

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

सर्किट's picture

22 Sep 2007 - 2:53 pm | सर्किट (not verified)

पता है, आप जैसे लोगोंको भी इज्जतसे मॅनेजर बुलाना पडता आहे.

नंदनराव,

आम्हीही आता "डार्क साईड" ला, बरं का ? तेव्हा जरा सांभाळून ;-)

सर्किट

आजानुकर्ण's picture

22 Sep 2007 - 2:58 pm | आजानुकर्ण

हेच म्हणतो

प्रियाली's picture

22 Sep 2007 - 4:26 pm | प्रियाली

तात्या, हा भागही आवडला. मिलिंदरावांनी म्हटल्याप्रमाणे प्रकटन प्रामाणिक आणि ओघवत्या शैलीत झाले आहे. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

अवांतरसह हेच..फक्त पाहते आहे असे वाचावे. ;-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2007 - 5:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, हा भागही आवडला. मिलिंदरावांनी म्हटल्याप्रमाणे प्रकटन प्रामाणिक आणि ओघवत्या शैलीत झाले आहे. पुढच्या भागाची वाट पाहतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहज's picture

22 Sep 2007 - 5:21 pm | सहज

>>सुशिक्षित/सुसंस्कृत मंडळींना प्रश्नच फार पडतात! :)

बाकी एकदम खास तात्या शैली भाग ३ मधेही आबाधीत आहे.

खूप दिवस वाट बघायला लावलीत भाग ३ साठी आता भाग ४ जरा लौकर येऊ देत.

लिखाळ's picture

22 Sep 2007 - 7:46 pm | लिखाळ

वा छान. तात्या,
हा भागही आवडला. वर मिलिंदरावांनी दिलेल्या प्रतिक्रियेशी सहमत आहे.
पुढचा भाग वाचायला उत्सुक. जरा लवकर टाका.

--लिखाळ.

तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)

कोलबेर's picture

24 Sep 2007 - 10:24 pm | कोलबेर

..म्हणतो.. मस्त लेखन!

धनंजय's picture

22 Sep 2007 - 10:22 pm | धनंजय

छान चालू आहे. कृष्णाचे नवे पात्र उंबरठ्यावर आणून "क्रमशः" लिहिलेत. आता फार ताटकळत ठेवू नका - येऊ द्या!

अवांतर - अजूनतरी अश्लील काहीच दिसले नाही. म्हटलेच तर प्रतिसादांतल्या सि.व्हॅ.मधल्या मावसोबांबद्दल लहान मुलामुलींनी वाचू नये. पण संदर्भ नीट समजावून सांगून मम्मीपप्पा कोवळ्या मनावरील दुष्परिणाम टाळू शकतिल.

बेसनलाडू's picture

23 Sep 2007 - 1:05 am | बेसनलाडू

'तिकडचा' माहोल अगदी परिणामकारकपणे उठवलाय तात्या. पांढरपेशा मध्यमवर्गीय माणसाची त्या वातावरणात होणारी पंचाईत समजण्यासारखी; आणि ती हुबेहूब चितारली आहे. आपल्या निरीक्षणाला आणि व्यक्तीचित्रणाला दाद देतो.

टग्या's picture

25 Sep 2007 - 8:36 am | टग्या (not verified)

> 'तिकडचा' माहोल अगदी परिणामकारकपणे उठवलाय तात्या. पांढरपेशा मध्यमवर्गीय माणसाची त्या वातावरणात होणारी पंचाईत
> समजण्यासारखी; आणि ती हुबेहूब चितारली आहे.

आपला अनुभव?

पण तात्यांची शैली आवडली. भाग १ आणि २ वाचले नाहीत अजून, वाचेन म्हणतो, पण तेही परिणामकारक आणि इंटरेष्टिंग असतील, याबद्दल खात्री आहे.

विसोबा खेचर's picture

25 Sep 2007 - 8:49 am | विसोबा खेचर

>>पण तात्यांची शैली आवडली.

टग्यारावांसारख्या चोखंदळ रसिकाला आमची शैली आवडली हे वाचून धन्य झालो! आज बुधवार नाहीये त्यामुळे आज काही जमणार नाही, परंतु उद्या या आनंदाप्रित्यर्थ ब्लॅक डॉगचा अर्धा पेग जास्त पिईन! :)

धन्यवाद टग्याराव.. पहिले दोन भागही सवडीने वाचा ही इनंती!

तात्या.

चित्रा's picture

23 Sep 2007 - 4:38 am | चित्रा

रौशनीच्या पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.

तुमचे अनुभव ज्या "रेंज" (मराठीतला शब्द आठवत नाही) मधले आहेत ते विस्मयकारक आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्या.

नंदन's picture

24 Sep 2007 - 3:49 am | नंदन

रेंजला प्रतिशब्द म्हणून संदर्भाप्रमाणे आवाका/कक्षा/(अनुभवांचा) परीघ/पल्ला हे शब्द चालू शकतील.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

राजीव अनंत भिडे's picture

23 Sep 2007 - 10:13 am | राजीव अनंत भिडे

साधारणपणे वेश्यावस्तीतल्या मावश्याही तशाच कळकट, कजाग, ओबडधोबड, भयानक शिवराळ, बथ्थड चेहेर्‍याच्या, अक्षरशः कैदाशिणी वाटाव्यात अश्या, अत्यंत स्थूल शरीरमानाच्या, अस्ताव्यस्त आणि शेप गेलेल्या ओथंबलेल्या स्तनांच्या, नेसलेल्या साड्यांमधून दिसणारी त्यांची ती सुटलेली काळी पोटं दाखवणार्‍या असतात असा माझा समज होता!

वास्तववादी वर्णन!

ते काहीही असो, मला मात्र रौशनीकडे पाहताच क्षणी तिचे आकर्षण वाटले होते. 'च्यामारी, बाई पन्नाशीच्या घरातली दिसते पण अजूनही चांगला दमखम राखून असावी असा एक विचार माझ्या मनात डोकावून गेला!

यातला प्रांजळपण आवडला!

संस्कार! दुसरं काय? सुशिक्षित, सुसंस्कृत घराण्यातले पांढरपेशा संस्कार! रामरक्षा, पर्वचा, पाढे, शाळा, शिक्षक, मोतोपंत, बालकवी, या सगळ्या गोष्टी मला रौशनीच्या घरच्या सोफ्यावर आरामशीरपणे बसू देत नव्हत्या.

खरं आहे. तुम्हाआम्हा पांढरपेशा समाजाला कल्पनाही करता येणार नाही अश्या अनेक गोष्टी याच जगात इतरत्र घडत असतात!

तात्या, रौशनीची वाटचाल उत्तम सुरू आहे. पुढचा भाग टाक बाबा लवकर!

अवांतर:

तुमचे अनुभव ज्या "रेंज" (मराठीतला शब्द आठवत नाही) मधले आहेत ते विस्मयकारक आहे. पुढचे भाग लवकर येऊ द्या.

चित्रांप्रमाणे मीही हेच म्हणेन. एकच माणूस शेयर बाजार, संगीत, व्यक्तिचित्रं, मध्येच कुठल्याकुठल्या स्पर्धा, इत्यादी विविध विषयावर लिहितो ही तात्याची व्हर्सटॅलिटी वाखाणण्यासारखी आहे. जवळचा मित्र म्हणून तात्याशी बर्‍याचदा प्रत्यक्ष भेट होत असते तेव्हा ही व्हर्सटॅलिटी अनुभवायलाही मिळते.

एकिकडे रौशनीसारखं वास्तववादी व्यक्तिचित्र रंगवणारा माणूस गीतमेघदूतातल्या संगीतावरही लिहू शकतो, बसंतचं लग्नही लिहू शकतो हे आंतरजालावर मला तरी कुठेच पाहायला मिळालं नाही. एकिकडे काही विघ्नसंतोषी लोक मिसळपावला खोडा घालू पाहात आहेत. तात्याने तिकडे लक्ष न देता लेखन सुरू ठेवावे असे वाटते. लोकांची साथ मिळाली (आणि ती मिळेल अशी खात्री आहे!) तर उत्तमच आहे पण हा माणूस एक हाती हे संकेतस्थळ पुढे घेऊन जाऊ शकतो असे वाटते!

(तात्याचा मित्र) राजीव अनंत भिडे.

राजीव अनंत भिडे's picture

23 Sep 2007 - 10:22 am | राजीव अनंत भिडे

सुरवात करून नंतर गायब व्हायचं, लेखन अर्धवट सोडायचं, हा तात्यामधील एक मोठा दोष आहे. सालस अशीच अर्धवट राहिली, शिंत्रेगुरुजींचीही वाट लागली! रौशनीच्या बाबतीत असं होऊ नये एवढंच वाटतं!

राजीव अनंत भिडे.

सहज's picture

23 Sep 2007 - 10:36 am | सहज

तात्याला भांडणात कमी अडकवल गेल तर तात्या जुन्या राहिलेल्या कामांचा पसारा निपटेलच. पण अजून नवनवीन कार्ये करेल. काय खर की नाय तात्या? :-)

पण काय जाणो की भांडणातून तात्याला एक अशी ऊर्जा / उर्मी (इंग्रजी "हाय") मिळत असेल की ज्या मूळे तात्या एवढा हरहुन्नरी झाला आहे ;-)

गुंडोपंत's picture

23 Sep 2007 - 3:42 pm | गुंडोपंत

लोकांची साथ मिळाली (आणि ती मिळेल अशी खात्री आहे!) तर उत्तमच आहे पण हा माणूस एक हाती हे संकेतस्थळ पुढे घेऊन जाऊ शकतो असे वाटते!

अरे भिडे साहेब, क्या बात कही! वा
एकट्यानेही काही करून दाखवण्याची; तात्यांची तेव्हढी ताकद तर नक्कीच आहे...
पण कुणी साथ सोडेल असे वाटते का तुम्हाला?
जे सोडून जात आहेत ते कधी होते बरोबर? ते त्यासाठीच आले होते हो!

त्यांना विसरून ही वाटचाल पुढे आपण सगळे मिळून सुरु ठेवणार आहोत.

आपला
गुंडोपंत

प्रमोद देव's picture

23 Sep 2007 - 10:33 am | प्रमोद देव

तात्याचे निरीक्षण जबरी आहे पण ते शब्दात मांडणे त्याहूनही जबरी आहे.(जय भाईकाका)
तात्या पुढील भाग लवकर येऊ देत.

तात्या हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे ह्यात दुमत नाही. हे संकेतस्थळ तो एकहाती चालवू आणि नावारुपाला आणू शकेल ह्याबद्दलही मनात संदेह नाही. मात्र एक गोष्ट आहे की सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाण्यात आणि आपल्याला होणारा आनंद इतरांना वाटण्यात जो एक वेगळाच आनंद आहे तो इतर कशातच नाही.म्हणून तात्याने आता जरा जबाबदारीने वागायला हवेय.वेळप्रसंगी समजूतीने घ्यायला हवेय. आम्ही सगळे त्याच्या बरोबर आहोतच. पण मालक-चालक म्हणून त्याची जबाबदारी सांभाळताना उदारमतवादी असावे इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करतो.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Sep 2007 - 8:29 pm | प्रकाश घाटपांडे

पण मालक-चालक म्हणून त्याची जबाबदारी सांभाळताना उदारमतवादी असावे इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करतो.
हेच तर अवघड असतं.
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

24 Sep 2007 - 4:17 am | प्राजु

तात्या..
जागी खिळवून ठेवणारी कथा आहे ही. .. लवकर लिहा पुढचा भाग.

- प्राजु.

स्वाती दिनेश's picture

24 Sep 2007 - 1:01 pm | स्वाती दिनेश

असेच अगदी वरील सर्व प्रतिक्रियांसारखेच..
अतिशय प्रभावी चित्रण केले आहेस, फक्त ते पुढचे भाग जरा लवकर लवकर टाक आणि वर कोणी म्हटल्याप्रमाणे आधीची काही प्रोजेक्ट्स पण लवकर पुरी कर बाबा,टांगत ठेवू नकोस,:))
स्वाती

विसोबा खेचर's picture

24 Sep 2007 - 1:41 pm | विसोबा खेचर

सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार...

रौशनीचा मला आलेला अनुभव शब्दात मांडणं मलाही थोडं कठीणच जात आहे. वास्तविक ती एक सत्यघटना असल्यामुळे जशी घडली तशी भराभर पुढे लिहिणं मला सहज शक्य आहे. परंतु रौशनीच्या बाबतीत आणि एकूणच त्या माहोलच्या बाबतीत काही लिहायला घेतलं की रौशनीच्या कथेसोबतच त्या त्या वेळेला मनात आलेले विचारही आपसुकच कागदावर उतरतात. काही वेळेला डोकं सुन्न होऊन थकायलाही होतं आणि लिहिणं थांबवायला लागतं! थोडा ब्रेक घ्यावा लागतो..

त्या माहोलमधल्या काही काही गोष्टी तर इतक्या भयानक आहेत की त्या इथे लिहिणं टाळलं आहे.

असो, पुढचा भागही थोडाफार लिहून पूर्ण आहे. लवकरच पूर्ण करून इथे टाकतो..

तात्या.

चित्तरंजन भट's picture

24 Sep 2007 - 3:04 pm | चित्तरंजन भट

तात्या, तिथला माहौल चांगला जिवंत केला आहेस. रंगतदार, मस्त, बेष्ट.

सुवर्णमयी's picture

25 Sep 2007 - 7:19 pm | सुवर्णमयी

तात्या,हा भाग वाचला. प्रामाणिक वर्णन आवडले.
काही वाक्ये पचवणे जड गेले पण विषय ,कथा प्रसंगानुरुप तुम्ही वर्णन करतांना अतिशयोक्ती केली नाही... म्हणून ती वाक्ये योग्य वाटली. तुम्ही केवळ स्त्रीचे वर्णन करता आहात म्हणून हा प्रतिसाद नाही, यात पुरुषाचे असे वर्णन असते तरी प्रतिक्रीया सेम राहिली असती.
पुढील भाग लवकर लिहा.

सोनम's picture

16 Dec 2008 - 1:33 pm | सोनम

तात्या तुम्ही केलेले वर्णन खूप छान आहे.
सध्या तरी ३ रा भाग वाचला आहे. पण कथा खूप सु॑दर आहे.

मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते

विसोबा खेचर's picture

16 Dec 2008 - 4:07 pm | विसोबा खेचर

पण कथा खूप सु॑दर आहे.

ही कथा नसून सत्यघटना आहे..

असो,

आपला,
(रौशनीचा मित्र) तात्या.

तात्या, रोशनीचा पाचवा भाग आल्याला आता बरेच दिवस झाले. ती कथा वाचली की हुरहुर लागून राहते. असं किती दिवस आम्हाला अस्वस्थ ठेवणार? पुढचा भाग लिहा ना!

टारझन's picture

16 Dec 2008 - 4:13 pm | टारझन

तात्या, रोशनीचा पाचवा भाग आल्याला आता बरेच दिवस झाले. ती कथा वाचली की हुरहुर लागून राहते. असं किती दिवस आम्हाला अस्वस्थ ठेवणार? पुढचा भाग लिहा ना!

तो भाग दिवाळीत येणार आहे ... ११ महिने थांबा छंदी साहेब ..

-(रोशनी-६ ची वाट पहाणारा) टारझन

(आता पळतो.. नाय तर तात्या जोडे हाणेल)

विसोबा खेचर's picture

16 Dec 2008 - 4:17 pm | विसोबा खेचर

अहो सध्या खरोखरंच सवड नाही, परंतु लौकरच लिहीन..

इन फॅक्ट बरचसं लिहून तयारही आहे...

असो,

तात्या.