बाप्पा माझापण

अभ्या.. जनातलं, मनातलं
हा मी रंगवलेला बाप्पा. (स्कॅन केल्यावर फोटोशॉप मध्ये संपादित) माध्यम : आयव्हरी कार्ड आणि कॅम्लिनचे आर्टिस्ट क्वालिटी पोस्टर कलर. (ब्रश : पुण्यातल्याच व्हीनसचे ०, ००) विषय : जाहिराती साठी केलेले इलस्ट्रेशन.
वर्गीकरण
लेखनप्रकार

41 टिप्पण्या 9,753 दृश्ये

Comments

किसन शिंदे नवीन

मस्त चित्र आहे रे अभि. झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. येत्या काही दिवसातच कलादालनातला एरर दूर करण्यात येईल.

प्रभाकर पेठकर नवीन

व्वा! व्वा! सुरेख चित्र.

धमाल मुलगा नवीन

हातात बाकी कला आहे हों! रंगसंगतीही झकास जमलीये. आता, मुळातच आर्टिष्ट असलेल्यांना आम्ही काय सांगणार म्हणा! :)

पैसा नवीन

चित्राची संकल्पना आणि रचना भयंकर आवडली आहे!

परिकथेतील राजकुमार नवीन

मस्त हो अभिशेठ. बाप्पा एकदम फर्मास जमला आहे.

अभ्या.. नवीन

सर्वांनाच मनापासून धन्यवाद. @ तर्री : एका जाहिरातीच्या मोहिमेत (कँपेन) मुद्रित माध्यमात असलेल्या १/२ पान आकाराच्या जाहिरातीसाठी तयार केलेले हे चित्र आहे. बाकी त्यावरचा मजकूर आणि लोगो वगैरे संगणकावर केले होते. (संस्कृती, परंपरा अशी थीम होती)

श्रीरंग_जोशी नवीन

थीम, रंगसंगती, एकूण चित्रातील विविध घटकांचे संतुलन सर्वच बाबतीत अप्रतिम. या कलाकृतीमागे अभिजीतचे प्रचंड कष्ट असणार अन भक्तीही.

बोका-ए-आझम नवीन

कसला माणूस यार अभ्या तू! लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! __/\__

अत्रुप्त आत्मा नवीन

In reply to by बोका-ए-आझम

लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी!
आधी या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! आणि याला जेव्हढे असतील नस्तील तेव्हढे सगळे प्लस प्लस वन!

स्वाती दिनेश नवीन

चित्र आवडले, रेखीव आहे. स्वाती

खटपट्या नवीन

ज ब र द स्त !! अभ्या, तुमची स्वतःची वेब साईट आहे का ?

अभ्या.. नवीन

In reply to by खटपट्या

हाय की. http://www.misalpav.com माझी, तुमची, सगळ्यांची. ;) इथेच असतात जास्त चित्रे माझी. बाहेर पैसे घेऊन केलेली कामे असतात.