वाढदिवसाच्या शुभेच्छा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
14 Sep 2011 - 7:14 am

वेळोवेळी 'डेव्हिल्स अ‍ॅडव्होकेट' बनून विचार आम्हांस करण्यास प्रवृत्त करणार्‍या पंगाशेटना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पंगाशेट हे आमच्या काही आवडत्या जाल-आयडींपैकी एक. आमचं शिव्या देणं असो१ वा प्रश्न विचारणं२, पंगाशेटने सदैव तार्किक मुद्द्यांवर सहमती वा असहमती दाखवत आम्हांस विचार करण्यास भाग पाडलं. कधी थोडे चिमटे काढत पंगाशेटने कधी आमची निखळ करमणूकही केली. पंगाशेटना मी "जिवेत शरदः शतम्।" असं म्हणून शुभेच्छांची चार वाक्य संपवते. आमेन.

शुभेच्छुक -
अदितीताई अवखळकर पाटील
चिटणीस, अवखळवाडी महिला मंडळ,
मु. अवखळवाडी, पो. बेरकेवाडी.

१. दुवा १, दुवा २
२. संदर्भ देणं आवडलं असतं, पण ते सध्या पब्लिक डोमेनमधे जमणे नाही.

समाजजीवनमानसद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

14 Sep 2011 - 7:16 am | मुक्तसुनीत

मारुती कांबळे यांना अनेक शुभेच्छा.
- मुसु मास्तर.

ढब्बू पैसा's picture

14 Sep 2011 - 7:29 am | ढब्बू पैसा

पंगाशेठना आमच्याही शुभेच्छा!
हल्ली दिसत नाहीत ते मिपावर, कुठे असतात?
अवखळकर बै तुम्ही किडन्याप तर नै केलं ना त्याना?

मुक्तसुनीत's picture

14 Sep 2011 - 7:37 am | मुक्तसुनीत

पंगा शेटना त्यांच्या खरडवहीवर जाऊन शुभेच्छा द्या की .

http://www.misalpav.com/user/8970

ढब्बू पैसा's picture

14 Sep 2011 - 7:57 am | ढब्बू पैसा

मास्तर,
प्रयत्न केला होता!
"Access denied" असं सांगण्यात आलं. काही तांत्रिक बिघाड आहे का ;) ?

मुक्तसुनीत's picture

14 Sep 2011 - 8:02 am | मुक्तसुनीत

"बिघाड" आहे. तांत्रिक म्हणता येईल का , कल्पना नाही.

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2011 - 7:28 am | राजेश घासकडवी

पंगांच्या प्रतिसादशैली मार्मिकपणे पकडण्याचा प्रयत्न आवडला. त्यात 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' हा जालीय वाक्प्रयोग त्यांनीच प्रसिद्ध केला असं ऐकून आहे. तेव्हा त्यांना यावेळी अशा शुभेच्छा देणं हा काव्यात्म न्यायच ठरतो.

प्रवाहाविरुद्ध पोहण्याची, वारा वळेल तशी पाठ न फिरवता आपल्याला हव्या त्या दिशेला तोंड करण्याची (कधीकधी मुद्दामून वाऱ्याला सामोरं जाण्याची) त्यांची ख्याती आहे. पंगा ही खरं तर सविनय बंडखोरीची प्रवृत्तीच म्हणता येईल.

त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांच्या प्रतिसादांची लांबी (कंस, सुपरस्क्रिप्टं, तळटिपा, राखाडी अक्षरं यांसकट) वाढत जावो ही शुभेच्छा.

अर्धवट's picture

14 Sep 2011 - 8:18 am | अर्धवट

अगदी असेच म्हणतो

सहज's picture

14 Sep 2011 - 7:31 am | सहज

पंगा यांचे निलंबन अतिशय क्लेषदायक गोष्ट आहे.

मिपाच्या स्थापनेपासुन मी मिपासदस्य आहे. इथे संपादन, व्यवस्थापन विषयावर बोलायला बंदी आहे किंवा ठरावीक लोकांनी बोललेले चालून जाते हेही पाहीले आहे. व्यवस्थापनाला आपले व्याप सांभाळून अनेक कटकटींना सामोरे जावे लागते याचाही पूर्ण अंदाज आहे. सहानुभूतीदेखील आहे.

पण मिपा हे मी पाहीलेल्या काही मोजक्या मराठी संस्थळात वेगळे, पारदर्शक कारभार असलेले संस्थळ वाटले होते. दोन एक वर्षापुर्वी मिपाच्या माध्यमातून (हो हो गहजब नको पण मिपाच्या व्यनितून ऑफर, विनंत्या आल्या म्हणून माध्यम म्हणत आहे)काही चुकीचे प्रकार झाले त्यातुन मग पुढे काही व्यवस्थापन बदल होउन पुन्हा गाडे सुरळीत होताच अजुन एक इंटरनेट प्रायव्हसीचे प्रकरण ऐकू येउ लागले. यावर खाजगीत बरेच काही बोलले जाउ लागले पण जाहीर ना सवाल केला गेला की खुलासे दिले गेले जणू काही घडलेच नाही. ही पारदर्शकता!!

मिपावर रोज उठून राजकारणी कसे भ्रष्ट आहेत, कसे दडवतात असे जो तो बोलतो पण जेव्हा आपल्याकडून चुका होतात त्याची कबूली द्यायला, सामान्य लोकात किती धैर्य असते अथवा जबाबदारी वाटते?

बर त्या त्रुटी अगदी समजवुन घेतल्या तरी मिपावर दिसुन आलेल्या एका गोष्टीचा मला अतिशय त्रास झाला. तो म्हणजे सदस्य निलंबनातील मनमानी. सर्व्हरवर कीडे अथवा कोणाचे वैयक्तिक नुकसान असे काही झाल्यास निलंबन होणे समजु शकतो. पण केवळ आपले विचार जुळत नाहीत म्हणून एखाद्या आयडीला परस्पर जालकंटक समजुन, कारणे न देता उडवणे हे जबाबदार व्यवस्थापना भूषणावह नाही. यातुन हाच संदेश जातो की तुम्ही विशिष्ट कंपूत हवा अथवा विरोध न करणारे सदस्य हवात अन्यथा तुमचे खाते कधीही उडवले जाउ शकते.

रिकामटेकडा (मिपा आयडी आठवत नाही बहुदा टोपणनाव) , व आता पंगा हे दोन आयडी अतिशय ज्ञानी व उत्तम वादविवादपटू आयडी. भले त्यांची काही मते पटत नसतील पण प्रतिसादातुन आपल्या चातुर्याची, लोकांना दुसरी बाजु उत्तमपणे उलगडवून दाखवयाची हातोटी वाखाणण्याजोगी. या दोघांच्या प्रतिसादातुन अनेक लोकांचे प्रबोधन किमान मनोरंजन तर नक्कीच झाले असेल. माझ्या माहीतीनुसार हे दोन्ही आयडी आपल्या लेखनातुन भले आक्रमक वाटू शकतील पण अविवेकी आणि आक्रस्ताळे नव्हे. किमान सभ्यता पाळायचे. आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य योग्य दुवे देणे, मुद्यांचा प्रतिवाद करणे प्रसंगी (श्री पंगा) वेगळा मुद्दा जाणवून दिल्याबद्दल विरोधकांना धन्यवाद दिल्याचेही पाहीले होते.

एक तर अश्या लोकांना एकतर्फी कोणतीच सुचना न देता उडवणे मिपाकरांना योग्य वाटते का? इथे अनेक वेळा लोक निनावी आयडीने राजकीय नेते, पक्ष, धर्म याबाबत वाट्टेल ती अनुचित विधाने करतात ते चालून जाते पण केवळ आपल्याला गैरसोयीची वाटतात व ह्या आयडींचा कोणत्या कंपूत समावेश नसणे ह्या कारणाने फटकन निलंबन केले जाते हे अतिशय चुकीचे वाटते.

मिपाच्या स्थापनेपासुन मी कायम व्यवस्थापनाला माझे मत सांगीतले आहे की वर उल्लेख केलेले प्रकार वगळता कोणाला निलंबीत करु नका फार तर काही दिवस वाचनमात्र करा. पण अजुनही मिपावरही मनमानी दिसुन येते आहे. मिपावर प्रसंगी कट्टर वाटेल असा विरोध चालवून घेतला जात नाही हा एकमेव संदेश व्यवस्थापन देत असेल तर ते मला चुकीचे वाटत आहे.

मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल.

ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा.

मिपाकरांना ह्या दोघांच्या निलंबनाबद्दल काय वाटते हे विचारावेसे वाटते.

मुक्तसुनीत's picture

14 Sep 2011 - 7:47 am | मुक्तसुनीत

सहजराव , बॅकप घेतला आहे ना ?

चिंतामणी's picture

14 Sep 2011 - 10:26 am | चिंतामणी

सहजराव , बॅकप घेतला आहे ना ?

सगळ्यांनीच या धाग्यावरचे पोस्टचे बॅकअप घ्यावे. कारण सर्वांनीच ह्याकडे दुर्लक्ष केलेले आहे असे दिसते.

नमस्कार,
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

ढब्बू पैसा's picture

14 Sep 2011 - 7:48 am | ढब्बू पैसा

खूप धक्का बसला होता खरं तर. आणि तेही कुठल्याही अधिकृत माध्यमातून कळले नव्हते. कारण तर आत्ता तुमच्य सविस्तर प्रतिक्रियेतून कळतंय आणि हे सगळं ज्या भावनेतून मिपा सुरू झालं होतं त्याच्याशी विसंगत आहे.
पंगा यांचे लेखन म्हणजे नेहमीच (माझ्यासाठी तरी) एनलाईटनिंग ह्या प्रकारातले होते. आणि कुठलाही सूज्ञ वाचक जालकंटक आणि उत्तम वादविवादपटू ह्यातला फरक ओळखू शकेलच.
पण लेखन हा क्रायटेरिआ न लावता केवळ वैयक्तीक आकसातून कार्यवाही झाली असेल तर हे दुर्दैवी आहे असं मी म्हणेन!

>>ह्या प्रतिसादाचा (बहुदा धाग्याचाही) व्यवस्थापनाला अडचणीत आणण्याचा कोणताही हेतु नाही पण जर आपल्या हातून काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर केवळ इगो जपण्याकरता ते निर्णय तसे ठेवण्यापेक्षा ते निर्णय बदलण्याचा दिलदारपणा बघायला मिळावा ही अपेक्षा.>>>
ह्यासाठी सहजकाका, तुम्हाला अनुमोदन :)

नितिन थत्ते's picture

14 Sep 2011 - 8:13 am | नितिन थत्ते

सहज यांच्याशी सहमत आहे. मिपा इतके पारदर्शक* संस्थळ दुसरे नाही हे खरे असले तरी त्यामुळेच अपेक्षा जास्त आहेत.

पंगा यांई सदस्यत्व घेतले तेव्हा त्यांच्या मराठेतर भाषेतील प्रतिसादांना आक्षेप घेऊन त्यांचे खाते गोठवावे का? असा कौल मीच स्वतः काढला होता. त्या आक्षेपावर आत्ता (१ वर्ष ४ महिन्यांनी) कारवाई झाली आहे की काय?

*हे माझे परसेप्शन आहे कारण अडीच वर्षाहून अधिक काळ इथे वावरत आहे. काही सदस्य आणि संपादकांशी ओळख आहे/झाली आहे. कदाचित नव्या सदस्यांना अशा प्रकारचे प्रतिसाद आणि धागे उडवले जाताना पाहून तसे न वाटण्याची शक्यता आहे.

खुलासा व्हावा अशी अपेक्षा आहे.

नितिन थत्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2011 - 8:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थ्यँक्स नितिन. तुझ्यामुळे आज चक्र पूर्ण झाल्याचं लक्षात आलं. १ वर्ष चार महिन्यांपूर्वी पंगाशेटने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्पानिशमधे दिल्या होत्या हे लक्षात आलं. (बंगालीचे होतकरू प्राध्यापक) पं. डि(ली)त गागाभट्ट यांनी बंगालीची होतकरू विद्यार्थिनी अदिती हिच्याकडून शुभेच्छा स्वीकाराव्यात.

विजुभाऊ's picture

14 Sep 2011 - 10:59 am | विजुभाऊ

हा हन्त हन्त हन्त

निनाद's picture

14 Sep 2011 - 9:56 am | निनाद

सहजराव या धाग्याचा काही संबंध आहे का?
http://mr.upakram.org/node/3443

सुनील's picture

14 Sep 2011 - 10:11 am | सुनील

मी इथे मागणी करतो की श्री पंगा व श्री टोपणनाव यांचे निलंबन रद्द करुन त्यांचे खाते पूर्ववत केले जावे. किमान नक्की कोणत्या कारणास्तव ह्या दोघांना काढले गेले त्याचे स्पष्टीकरण द्यावे. जेणेकरुन इतरांना त्यापासुन बोध घेता येईल. मिपा स्वताला म्हणवते तितके पारदर्शक, जबाबदार संस्थळ आहे का याचाही ज्याला त्याला अर्थ लावता येईल.

सहमत.

पंडित गागाभट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांना निलंबित केल्याचे माहीत नव्हते (आताच वाचले).
तरी कृपया आमच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोचविण्याची विनंती अदितीला करत आहे!!

नगरीनिरंजन's picture

14 Sep 2011 - 7:48 am | नगरीनिरंजन

पंगा यांच्यावर आमचे दशांगुळे आणि त्यांचे आमच्यावर आभाळाएवढे प्रेम होते आणि आहे. म्हणूनच मी अतिशय सद्गदित अंतःकरणाने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ईश्वर त्यांना परत येण्याची आणि व्यवस्थापनावरील प्रेम आमच्यावर काढण्याची बुद्धी देवो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2011 - 7:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ननि यांच्या या प्रतिसादातून मला एक कल्पना सुचली आहे. पंगाशेट नेहेमीच आपल्याला वेगवेगळ्या लिंका, कंस देतात, सोरि, सोरि, द्यायचे. कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.

नगरीनिरंजन's picture

14 Sep 2011 - 10:56 am | नगरीनिरंजन

प्रेमाच्या ट्रान्झिटीव्हिटीवर पंगा यांनी लिहिलेला एक प्रतिसाद देण्याचा मोह टाळण्यात आलेला आहे असे नमूद करण्याचा मोह आवरत नाही.

विजुभाऊ's picture

14 Sep 2011 - 11:23 am | विजुभाऊ

सुनील कितीही लाल करून सांगितले तरी काही फरक पडणार नाही

राजेश घासकडवी's picture

14 Sep 2011 - 8:07 am | राजेश घासकडवी

कृपया पंगाशेटला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हीही त्यांच्या आवडलेल्या प्रतिसादांच्या लिंका द्या. म्हणजे पंगाशेटच्या एकसेएक भारी प्रतिसादांचं संकलन याच धाग्यावर होऊन जाईल.

मी सुरूवात करतो, कारण त्यांच्या पहिल्या काही प्रतिक्रियांपैकी एक माझ्या लेखावर होती. सगळेजण त्या लेखाला चान चान म्हणत असताना ट्रैश असं त्यांनी म्हटलं होतं. शशिकांत ओकांच्या नाडीविषयाची थोडीशी चेष्टा केल्यावर, 'एखाद्याला किती उगाच हाणायचं... ' असं मत पंगांनी मांडलेलं होतं. (त्यावेळी ते गंमत म्हणून प्रतिसाद हिंदीमध्ये लिहीत असत. ) प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन मत मांडण्याची तयारी दाखवणाऱ्या अगदी थोड्या लोकांपैकी ते एक.

सहज's picture

14 Sep 2011 - 11:19 am | सहज

अश्लीलते कडे झुकत चाललेल्या थिल्लर धाग्यावर काय सणसणीत प्रहार केला होता की कोणत्याही संस्कृती रक्षकाला पंगा यांचा अभिमान वाटावा :-)

Nile's picture

14 Sep 2011 - 11:36 am | Nile

आज आधीच पंगाशेठच्या आठवणीने विव्हळलो होतो त्यात पुन्हा सैपाकाची आठवण कशाला करून दिलीत? वर्ष उलटून गेलं तरी आजून आम्ही सैपाक कलेत करंटेच ह्या आठवणीने अजून कळवळलो... असो..

नंदन's picture

14 Sep 2011 - 8:10 am | नंदन

शून्य खाजगीपणा आणि गैरसोयीच्या मंडळींचे 'लिक्विडेशन' ही ग्रेट पर्जची व्यवच्छेदक लक्षणं होती म्हणे. असो, पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Nile's picture

14 Sep 2011 - 8:47 am | Nile

असं कसं झालं रेssss!!! कीत्ती कीत्ती गोष्टी शिकायच्या होत्या मला पंगाशेठकडूनssss! आता कोण शिकवणार मलाssss!!! असा कोणत्या नियतीनं घाला घातला आमच्या पंगाशेठवरssss!! आता कोणाकडे बघायचं आम्हीssss???

पंगाशेठना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ऋषिकेश's picture

14 Sep 2011 - 2:14 pm | ऋषिकेश

अरेच्या! हे कधी झालं? 'पंगा' यांच्या खात्याला गोठवल्याचं माहित नव्हतं :(

ते विविध दृष्टीकोनातून मुद्दी मांडण्यात निष्णात होते हे नक्की. त्यांना अयोग्य वाटेल / असहमती असेल तेथे वाद घालत पण वितंडवाद-अतार्किक वाद घातल्याचे आठवत नाही. (माझ्याबरोबरही कोणत्याशा धाग्यावर असहमती झाली होती मात्र मुद्दा सोडून वैयक्तीक वार केल्याचे आठवत नाही)

सारी मराठी संस्थळे खाजगी मालकीची आहेत हे सारे जाणतातच, मात्र वर सहजराव म्हणाले तसं बर्‍यापैकी पारदर्शक असल्याने मिपा व्यवस्थापनाकडून कारण समजणे अपेक्षित आहे.

अरे हो वाढदिवसाच्या शुभेच्छा राहिल्याच होत्या.. श्री. पंगा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंगासेठचे खाते गोठवण्याचा निर्णय आत्ताच समजला.. निर्णय आश्चर्यचकीत करणारा आहे आणि वेदनादायीही.

त्यांच्या लेखनातील तर्कशुद्धता आणि एकएक शब्द तपासुन घेण्याची प्रवृत्ती या गोष्टी शिकता आल्या असत्या.. अत्यंत संयत भाषेत वाद घालणे यासाठी मी त्यांचा फॅन आहे.

त्यांच्या निलंबनाला काही सबळ आणि तितकेच महत्वाचं कारण असावं अशी आशा बाळगून आहे. ते कारण तितकंसं खाजगीही नसावं अशीही अपेक्षा आहे. बघू.. पुढेमागे कधितरी ते एखाद्या खुल्या अथवा कमराबंद चर्चेतून कळेलच..
पंगा यांचे प्रतिसाद वाचुन तयार झालेल्या त्यांच्या प्रतिमेशी अशी शक्यता विसंगत वाटत आहे.. पण "सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे असा नियम नाही" आणि "समाज ही गुंतागुंतीची चीज आहे" या दोन आधारांवर विसंबून "गप्प बसायचे ठरवले आहे"

पण या निलंबनाचे कारण म्हणजे केवळ त्यांचे टीका करणारे, जनप्रवाहाविरूद्ध जाणारे, न पटलेल्या गोष्टीला संयत आक्षेप नोंदवणारे प्रतिसाद इतकंच असेल तर.. व्यवस्थापनाचा निषेध नोंदवत आहे..

अवांतर - पंगा यांचा मेल आयडी घ्यायचा राहिला ही हुरहूर राहीलीच. कुणाकडे पंगा या आयडी मागचा चेहेरा अथवा त्यांचा मेल आयडी अथवा त्यांचा दुसर्‍या संस्थळावरचा आयडी अथवा याच संस्थळावरचा दुसरा आयडी असेल तर तो मला इथे (ardhawat@gmail.com) पाठवावा ही जाहीर विनंती करत आहे. उपकृत होइन.

"सगळ्यांना सगळं कळलंच पाहिजे असा नियम नाही"
वा वा....... शेख करता है मसजीद मे सजदे............ उनका असर हो ये जरुरी तो नही.....

या निमित्तानं व्होल्तेअरचं एक उद्धृत द्यायचा मोह टाळता येत नाही:

As long as people believe in absurdities they will continue to commit atrocities.

आणि पुन्हा पुन्हा असे धागे काढणारे आणि त्यांना हौतात्म्य देणारे या दोहोंसाठी व्होल्तेअरचं अजून एक उद्धृतः

It is dangerous to be right in matters where established men are wrong.

सर्वप्रथम पंगाशेटना खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!

पंगाशेटनी कुणाच्या/कुठल्या दुखर्‍या नशीवर बोट ठेवले माहीत नाही. पण त्यांच्या अचानक अदृश्य होण्याचा अचंबा वाटला होता. (निलंबन झाले की ते स्वत:हुन गेलेत याबद्दल संस्थळ चालकच सांगु शकतील.)
पण सहजरावांनी व इतरांनी वर जे पंगाशेट बद्दल मतप्रदर्शन केलेय त्याचाशी सहमत आहे.
पंगाशेट मिपावर परत यावेत ही माझीही इच्छा आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Sep 2011 - 2:07 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व.

त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का?

छोटा डॉन's picture

14 Sep 2011 - 2:46 pm | छोटा डॉन

>>श्री. पंगा यांचा खरोखरच वाढदिवस असल्यास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! त्यांच्याबद्दल फक्त एक हुशार सदस्य एवढीच ओळख आहे / होती. संपर्क रहावा असे आवर्जून वाटावे असे एक व्यक्तिमत्व.

हेच म्हणतो.
त्यांचा आज खरोखर वाढदिवस असेल तर त्यांना मनापासुन शुभेच्छा :)

बाकी धाग्याचे ठिक आहे.
ही चौकशी करण्याचे इतर मार्गही उपलब्ध आहेत, पण हरकत नाही, चालू द्यात एवढेच म्हणतो.
वैयक्तिकरित्या हा धागा पटला नाही असे स्पष्टपणे सांगतो.

- छोटा डॉन

मुक्तसुनीत's picture

14 Sep 2011 - 5:24 pm | मुक्तसुनीत

त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का?

पण हा धागा तर वाढदिवसाचा आहे की :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Sep 2011 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते

ब्वॉर्र! :)

मी बाकीच्या गोंधळाबद्दल बोलत असेन बहुधा! :)

मुक्तसुनीत's picture

14 Sep 2011 - 5:36 pm | मुक्तसुनीत

"बर्‍या असलेल्या , कालच्या" गोंधळाबद्दल तर नव्हे ? ;-)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Sep 2011 - 6:04 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! अहो तो आता नित्याचाच झाला आहे! ;)

नितिन थत्ते's picture

15 Sep 2011 - 3:49 pm | नितिन थत्ते

>>त्यांचे खाते का गोठवले वगैरेंबद्दल काही स्पष्टीकरण आल्यावर मगच काही मत मांडता येईल. अन्यथा, त्यांनी स्वतःहून खाते गोठवण्याची विनंती केली असे समोर आले तर केलेले मतप्रदर्शन चुकीचेच ठरेल, नाही का?

सहमत आहे. पण म्हणजे स्पष्टीकरणाची अपेक्षा धरावी की कसे?

म्हणजे स्पष्टीकरणाची अपेक्षा धरावी की कसे?

प्रास's picture

14 Sep 2011 - 2:08 pm | प्रास

बातमी नवीन आहे.

म्हण्टलं तर पंगाशेठ यांच्या वाढदिवसाची बातमीही नवीनच आहे. गेल्या काही दिवसातीलच हे घटना असावी. तेव्हा योग्य क्रमानुसार प्रथम

पंगाशेठना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आता मुख्य -

पंगाशेठांच्या निलंबनाची बातमी नवी आहे. कारवाई योग्य का अयोग्य माहित नाही पण दु:खद जरूर आहे. पंगाशेठांनी नेहमीच स्वतःच्या विचारांशी असलेली बांधिलकी राखलेली दिसून आलेली आहे आणि आपले विचार व्यक्त करण्याची त्यांची शैलीही त्यांच्या विचारांइतकीच असाधारण असल्याचे जाणवले होते. त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क कधी झाला नव्हता पण कधीतरी व्हावा अशी इच्छा जरूर होती.

पंगाशेठांचे मिपावर पुन्हा दणक्यात आगमन व्हावे ही सदिच्छा!

प्रियाली's picture

14 Sep 2011 - 2:42 pm | प्रियाली

वाढदिवसांच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायला मला कधीही आवडत नाही परंतु हा धागा पाहून तळपायाची आग मस्तकात गेली.

मिसळपाव हे एक खाजगी संकेतस्थळ असून ते एका व्यक्तीच्या मालकाचे आहे ही साधी गोष्ट धागाकर्ती आणि तिला पाठींबा देणार्‍या दोन-चार लोकांच्या लक्षात आली नसावी. दोन चार बड्या लोकांनी या संकेतस्थळाला लोकाभिमुख इ. म्हटले तरी इथे एकाधिकारच कामी येतो हे येथील ज्येष्ठ सदस्यांच्या वारंवार ध्यानात आलेले नाही काय?

मालक आणि त्यांची मर्जी सांभाळून वागणारे संपादक मंडळ यांच्या कार्यशैलीवर टिप्पणी करणारा हा धागा क्लेशदायक आहे. तेवढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच.

संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा. अदितीने त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. जमल्यास स्वतःच्या गुर्जींनाही शिकवणी लावावी.

असो.

मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2011 - 8:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

१. पंगा यांचे खाते गोठवले असल्याचे मला या धाग्यातून समजले. धागा आणि माझे प्रतिसाद नीट वाचले असता तुमच्या हे लक्षात येईलच.
२. पंगा हा माझ्या आवडत्या जालआयडींपैकी एक आहे. तर आपल्या आवडत्या लेखक-प्रतिसादकाला शुभेच्छा देण्यात काय गैर आहे? मागे देवकाकांनी सिद्धहस्त लेखकांची यादी काढली होती, पिडांकाकांनी लोणच्याची रेसिपी टाकत स्वातीताईची प्रशंसा केली होती, त्यातलाच हाही एक प्रकार. या लेखनप्रकारात काही आक्षेपार्ह आहे काय? तसे असल्यास संस्थळाच्या धोरणात मला ते सापडले नाही. तसं काही असल्यास ते शोधण्यात तुम्ही कृपया मदत करावी.
३. धाग्यात कोणाच्याही कार्यशैलीवर टीप्पणी नाही. असलीच तर ती पंगाशेटच्या तार्कीक असण्यावर आहे आणि त्यात निखळ प्रशंसाच आहे.
४. वाढदिवसाच्या धाग्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करत असालही पण हा धागा निव्वळ शुभेच्छांसाठी आहे. मिपावरील एक ज्येष्ठ आयडी या नात्याने तुम्हाला "वाढदिवसाच्या शुभेच्छा" याचा अर्थही मी समजवण्याची गरज पडावी हे पटण्यासारखं नाही.
५. सर्व लेखकांचे चांगले धागे संकलित करण्याची कल्पना निघाली तशी चांगल्या प्रतिसादांचेही संकलन व्हावे असं माझ्या बालबुद्धीला वाटलं. पंगाशेटने फार धागे काढल्याचं माझ्या स्मरणात नाही, पण त्यांचे प्रतिसाद वाचनीय असायचे. त्यांचे संकलन या धाग्यात व्हावे अशी माझी इच्छा होती. ते धोरणाबाहेर किंवा व्यवस्थापनास क्लेषदायक असेल असं मला खरोखर वाटलं नाही. काही जुने धागे काढून मी स्वतः बराच वेळ हसत होते.
६. इतर मंडळी आगीत तेल ओततात यात माझा दोष काय?

सबब, मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. सरकारवर, मौलवींवर टीका करणारे धागे चालतात तर एखाद्या आयडीची प्रशंसा करणारा धागा का टोचावा?

Nile's picture

14 Sep 2011 - 8:57 pm | Nile

>>ते वढे पुरेसे नाही काय म्हणून घासकडवी, मुक्तसुनीत, सहज आणि इतर मंडळी आगीत तेल टाकायला हजर आहेतच.

नाहीतर काय, आगलावे कुठले!!! (मला दिले असते वढे तर काय बिघडलं असतं??)

>>संपूर्ण धाग्यात एकच मॅच्युअर प्रतिसाद दिसला आणि तो म्हणजे आमच्या बिपिनदांचा.

आमच्या डान्याला पण आपले म्हणा हो काकू!!

>>मालकांना आणि त्यांच्या संपादकांना या धाग्यामुळे अत्यंत क्लेश होतील असे वाटते. तरी त्यांनी मिळून किमान अदिती, मुक्तसुनीत, राजेश घासकडवी आणि सहज यांची खाती लगोलग गोठवून टाकावी ही विनंती.

व्यवस्थानपनाला सुचना करू नये या धोरणाचे उल्लंघन केल्याने प्रियाली काकूंचेही खाते गोठवावे अशी 'विनंती' करतो.

विनायक प्रभू's picture

14 Sep 2011 - 2:46 pm | विनायक प्रभू

भारी प्रतिसाद
असो. पंगा ना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

राही's picture

14 Sep 2011 - 3:04 pm | राही

मराठी जालस्थलांवर गेली कित्येक वर्षे (बहुतांशी फक्त वाचनमात्र) वावर आहे. वाढदिवसाच्या किंवा अश्या स्वरूपाची वैयक्तिक माहिती जाहीर मांडणार्‍या धाग्यावर प्रतिसाद देणे आतापर्यंत कटाक्षाने टाळले होते. पण या धाग्यामध्ये श्री. पंगा यांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे लिहावेसे वाटले. श्री पंगा यांचे प्रतिसाद बहुतेक वेळा नर्म विनोदी,वादपटुत्व, वादचातुर्य आणि वादरुची दर्शवणारे,संदर्भांच्या रेलचेलीमुळे व्यासंगाची कल्पना देणारे,हिरीरीने बाजू मांडतानासुद्धा कधीही कटुता येऊ न देणारे असत. अर्थात ते अत्यंत वाचनीय असत हे वेगळे सांगायला नको.निलंबनाविषयी याच धाग्यातून कळल्यामुळे आणि तपशील माहित नसल्यामुळे मतप्रदर्शन टाळीत आहे.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
(श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?)

प्रियाली's picture

14 Sep 2011 - 3:33 pm | प्रियाली

श्रद्धांजली देखील अर्पण करावी का?

श्राद्धपक्ष सुरू झाला ना? मग विचारणा कशाला करायची? जो पर्यंत आपले श्राद्ध घातले जात नाही तोपर्यंत दुसर्‍याचे श्राद्ध घालायला आपण मोकळेच आहोत.

या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती. ;)

Nile's picture

14 Sep 2011 - 8:57 pm | Nile

>>या निमित्ताने इतर काही उडवलेल्या आयडींचेही श्राद्ध घालावे ही विनंती.

आमच्या श्राद्धाला तुम्ही सोईस्कररीत्या विसरला होतात हे नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो!! अजूनही वेळ गेलेली नाही, कधी येऊ श्राद्धाचं जेवायला? श्राद्धाचे 'वढे' मला फार आवडतात! ;-)

बाकी काहीही असो, किंवा कोणी काहीही म्हणो, आमच्याकडून श्री. पंगा यांना वाढ दिवसाच्या अनेक शुभेच्छा.

आदिजोशी's picture

14 Sep 2011 - 7:59 pm | आदिजोशी

पंगा जर निलंबीत झाले असतील तर त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही. मधून मधून अशी अनेक मंडळी निलंबीत होत राहतात. असे झटके येत राहतात.

पण अमाप गोंधळ घालणारी अनेक मंडळी अजून मिपा वर असल्याचे मात्र नेहेमीच आश्चर्य वाटते आणि वाटत राहील.

क्रेमर's picture

14 Sep 2011 - 8:06 pm | क्रेमर

श्री पंगा यांचा हा प्रतिसाद बहूधा (पंगा या आयडीने) पहिलाच असावा.

माझीही शॅम्पेन's picture

14 Sep 2011 - 10:42 pm | माझीही शॅम्पेन

अगदी ... अगदी जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ह्या धाग्या पासून वाचतोय पंगा शेठ ला.

पंगा शेठ ला वाढविसाच्या शुभेच्छा !

सिद्धार्थ ४'s picture

14 Sep 2011 - 10:23 pm | सिद्धार्थ ४

वाढदिवसाच्या शुभेच्छा ...
!!! जीवेत् शरदः शतम्! !!!

वाढदिवसाच्या अन निलंबनाच्या शुभेच्छा पंगा या आयडिला.

(हा प्रतिसाद प्रकाशित होण्याची फारशी अपेक्षा नाही!)
गेले कित्येक महिने मिपावर एक सामान्य मिपाकर या नात्याने माझा वावर आहे. कार्यबाहुल्यामुळे म्हणा किंवा लेखनात मुळातच फारशी गती नसल्यामुळे म्हणा हातून फारसे लेखन जरी घडले नाही तरी इथे नियमित येणार्‍या अनेक अभ्यासपूर्ण आणि विद्वत्तापूर्ण लेखांनी जसे प्रभावित केलं तसेच इथल्या अनेक खट्याळ धाग्यांवर येणार्‍या तितक्याच महा खट्याळ प्रतिसादांनी करमणूक देखील केली. अशा विद्वानांच्या आणि अभ्यासूंच्या मांदियाळीत जी काही थोडी नावं त्यांच्या उपजत लेखन कौशल्याने, प्रतिभेने आणि सर्वांगीण ज्ञानाने उठून दिसली त्यात श्री पंगा यांचा समावेश नक्कीच करावा लागेल.

श्री पंगा यांनी नक्की कोणता अपराध केला होता हे समजण्यास मलातरी जागा नाही, पण अशा अपमानास्पद रीतिने त्यांना निलंबित करण्याइतका त्यांनी कुठला गंभीर गुन्हा केला असावा असं त्यांच्या आत्तापर्यंतच्या मिपावरील वावरावरुन तरी वाटत नाही. ( अर्थात आंतरजालावरील कुठलाच गुन्हा निलंबन करावा अशा पातळीचा सहसा असणार नाही- गुन्हेगारी वा तत्सम अपराध वगळता- असं मला तरी वाटतं.)

मिपाची मालकी व व्यवस्थापन खाजगी आहे असं वरच्या काही प्रतिसादातून कळलंच. ते जर खरं असलं तर आपल्याला गैरसोयीचे ठरणारे विचार वा व्यक्ती यांना नारळ देण्याचा व्यवस्थापनाचा हक्क अबाधित आहेच. पण तरी सुद्धा श्री पंगा यांना अशातर्‍हेने निलंबन करण्याचं कारण मिपा व्यवस्थापनाने स्पष्ट केलं पाहिजे. श्री पंगा यांच्यासारखे अनेक सिद्धहस्त लेखक लिहितात म्हणून आमच्या सारखे अनेक लोक मिपावर वारंवार यायला प्रवृत्त होतात हे दुर्लक्षू नये. एवढी मस्ती दाखवायला मिपा म्हणजे काही फेसबुक नव्हे! तेवढे मोठे व्हाल तेव्हा ही गुर्मी सुद्धा सहन करु! एवढंसं ते मिपा काय- आंतरजालावरच्या अगणित संस्थळांपैकी एक- त्यात कुणा एकाबरोबर पटत नसल्याने त्याला बाहेर काढण्याचा तो प्रकार काय! केवळ दुबळे आणि भ्याड लोकच असा अधिकार गाजवायला बघतात. असाच माज दाखवत राहिलात तर जी काही चार टाळकी आज मिपावर येताहेत ती सुद्धा बंद होतील आणि काटकुळ्या दंडातल्या बेटकुळ्या दाखवायला कुणी उरणार नाही याची आग्रहपूर्वक नोंद घ्यावी ही विनंती!

बाळकराम's picture

15 Sep 2011 - 2:44 am | बाळकराम

प्र.का.टा.आ.

धनंजय's picture

15 Sep 2011 - 3:00 am | धनंजय

पंगा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

पाषाणभेद's picture

15 Sep 2011 - 3:13 am | पाषाणभेद

पण नामकरण समारंभ पुन्हा करून किंवा गॅझेटमध्ये 'नाव बदललेले आहे' असे करून पंगा पुन्हा मंगा असे नाव घेवू शकतात ना?

एक आठवण सांगतो.

सुरूवातीला हे पंगा फक्त हिंदी या मला न समजणार्‍या लिपीतच ल्याहायचे. त्यांना एकदोन वेळा समजही दिली होती. मग मात्र बोळा सुटला अन ते मराठी झाले. असो.

मराठमोळा's picture

15 Sep 2011 - 5:33 pm | मराठमोळा

अरे वा. छान.

तसा मी अदितीच्या धाग्यावर प्रतिक्रिया द्यायचं कटाक्षाने टाळतोच, पण हा धागा पाहून रहावलं नाही.
उत्तम धागा आणि चर्चा. बाकी चालु द्या. ;)

अतिशय सुद्य्न अभ्यासू, वैचारिक , उत्तम वादविवाद पटू असलेले पंगा यांची कमालिची तर्कशुध्दता त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात जाणवायची,
सहज यांच्या वरिल प्रतिसादाशी सहमत
पंगा यांचे खाते गोठविणे ही निव्व्ळ खेदाची बाब :-(

मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....

परिकथेतील राजकुमार's picture

17 Sep 2011 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

मी निरिक्षण केल्याप्रमाणे त्यांनी एका धाग्यात श्री हुप्प्या यांना प्रतिसाद देताना रा स्व संघ यांच्या प्रार्थनेबध्द्ल काही लिहीले होते अन त्यानंतर त्यांचा तो प्रतिसाद ही गायब झाला अन ते ही ....

अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.

मला तर दिग्विजयसिंगाची गाडी दिसली होति मिपाकार्यालयाबाहेर.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2011 - 4:06 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्छा म्हणजे पंगा ह्यांचे खाते उडण्यामागे संघाचा हात आहे तर.

गप्प बसण्याचे ठरवलेले नाही, पण लिंका शोधायचा कंटाळा आला आहे.

शहराजाद's picture

17 Sep 2011 - 4:51 am | शहराजाद

पंगाशेटना वाढदिवसाच्या शुभेच्छा