सैपाकाची पथ्ये

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in काथ्याकूट
4 Aug 2010 - 8:36 am
गाभा: 

नुकत्याच झालेल्या चर्चांमध्ये आयटीमधल्या स्त्रियांना स्वयंपाक करता येत नाही, यावा का, यावाच का, वगैरेवर साधकबाधक आणि लंबीचवडी चर्चा झाली. पण मला या बाबतीत विषय थोडा व्यापक करायचा आहे. फक्त आयटी, किंवा फक्त स्त्रियाच का, स्वयंपाक सगळ्यांनाच करता आला पाहिजे.

मधुशाला यांनी खालील मत मांडलं आहे, ते पटतं...
"स्वयंपाक न येणं ही तुम्हाला एवढी साधी गोष्ट का वाटते? रोज आपण जे खातो ते बनवायला सुद्धा यावं असं का वाटू नये? कमीतकमी प्रयत्न तरी करता येईल की नाही???... आता जर असं असेल की एखादी अवघड गोष्ट येत नाही, उदा. पुरणपोळी, गुळपोळी तर समजू शकतो. पण कुकर सुद्धा लावता येत नाही आणि कधी लावणार सुद्धा नाही या मानसिकतेचं समर्थन कसं करणार???"

आता व्यापक अर्थाने बघता काही लोक म्हणतील की आमचं वय झालंय, भूक कमी झाली आहे, आम्ही रोज खातच नाही... पण त्याने प्रश्न बदलत नाही. स्वयंपाक आला पाहिजे हे खरंच. आपला स्वयंपाक रोजच दुसऱ्याने करून द्यायला काय आपण बिल क्लिंटन लागून गेलोय का? (क्लिंटनने तरीही वर एकदा 'मी जेवलोच नाही' हे 'मी धूर आत घेतलाच नाही' च्या थाटात सांगितलं होतंच - अरे पण धूर बाहेर सोडलासच ना गधड्या...)

मुळात व्यापकपणे चर्चा करायची झाली तर स्वयंपाक या शब्दालाच आक्षेप घेता येईल. या शब्दाची व्याख्या लोकशाहीच्या व्याख्येच्या अंगाने करता येते. स्वयं + पाक = स्वतः केलेला, स्वतःसाठीचा, फक्त स्वतःचा पाक. ही व्याख्या अर्थातच अत्यंत स्वार्थी आहे हे उघड आहे. स्वयं हा शब्दच सध्या थोडा डागाळलेला आहे - हा त्याच शब्दाचा स्वयंदोष असावा. आता स्वयंसंपादनच घ्याना... त्यातही या स्वार्थी छटा आहेत म्हणूनच संपादकांनी तो अधिकार काढून घेतला आहे. एखाद्या टीनेजरकडून स्वयंपाक करण्याचा हक्क कुणीही पालक काढून घेईलच ना, तसंच. त्यांनी उगाच खोडसाळपणे भलत्या ठिकाणी स्वयंपाक करून ठेवला तर? असो. थोडे भरकटलो. पण स्वयंपाकाऐवजी मी सैपाक हा जास्त घरगुती शब्द वापरणं पसंत करेन. त्याचा अर्थ व्यापक आहे - एकाने एकट्यासाठी, एकाने फक्त दुसऱ्यासाठी, किंवा दोघांनी मिळून एकमेकांसाठी, किंवा अनेकांनी एकत्र या सगळ्यांना तो शब्द सामावून घेतो.

चला. व्याख्या तर पुरेशी व्यापक झाली. आता आपण मूळ मुद्द्याकडे वळूया. सैपाकाविषयी काही गोष्टी मधुशाला यांच्या प्रतिसादातून स्पष्ट आहेत.
-सैपाक सगळ्यांनाच करता आला पाहिजे. येत नसेल तर तो सगळ्यांनी शिकून घेतला पाहिजे.
-शिक्षण लग्नाआधीच व्हावं. एकदम लग्न झाल्यावर आता खायचं काय असा प्रश्न पडू नये. चांगल्या शिक्षणासाठी सराव आवश्यक आहे.
-गुळपोळी, पुरणपोळी वगैरे जमलं नाही तरी हरकत नाही. किंवा काही व्हेजिटेरियनाना नळीफोड पाककृती जमत नाहीत, ते समजून घेता येतं.
-पण कुकर लावता येत नाही, साधी शिट्टी काढता येत नाही आणि मी शिकणारही नाही ही मानसिकता चांगली नाही.

यावरून मलाही काही मुद्दे सुचले

-सैपाक करताना एकमेकांच्या चवी लक्षात घेऊन त्यानुसार बेत करावेत. शेवटी व्हरायटी हाच मसाला आहे.
-सैपाक व जेवण करताना दोघांचंही पोट भरेल अशी सोय पहावी.
-सैपाक करणं पुरुषांना देखील व्यवस्थित आलं पाहिजे. किमान योग्य तिथे मदत करता आली पाहिजेत.
-आधुनिक उपकरणांनी काही काम सोपं होतं.
-पाककृतींची पुस्तकं, व व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ती जरूर वापरावीत.

इतक्या व्यापक विषयाचे सगळेच पैलू छोट्याशा चर्चाप्रस्तावात मांडता येत नाहीत. हॉटेलमध्ये खाणे, सैपाकाला बाई ठेवणे, कायम बायकोनेच सैपाक करणे, निरनिराळ्या देशाच्या पाकपद्धती, सैपाक करताना कष्ट कमी व्हावेत म्हणून अर्गोनॉमिकल विचार... या सर्वांविषयी तुम्हाला काय वाटतं ते जरूर लिहा. सैपाकाच्या अधिक पाककृती मिपावर याव्यात का? सैपाकाची कुठची कामं पुरुषांना व कुठची स्त्रियांना आलीच पाहिजेत का? स्त्रीमुक्तीच्या दृष्टीकोनातून या प्रश्नावर काय विचार करता येईल? वगैरे वगैरे... आणि हो, आधीच्या चर्चांमधले काही निवडक प्रतिसाद नव्या दृष्टीकोनातून लोकांनी पहावे असं वाटलं तर तेही डकवा (दुवे नकोत). अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

4 Aug 2010 - 8:47 am | शिल्पा ब

<<<पण कुकर सुद्धा लावता येत नाही आणि कधी लावणार सुद्धा नाही या मानसिकतेचं समर्थन कसं करणार???"

हा जो कोणी मधुशाला नावाचा प्राणी इथे आला आहे आणि अकलेचे तारे तोडत आहे ते आता पुरे....
वरील वाक्याला काही अर्थ आहे का? अशी मानसिकता कदाचित अपवाद असलेल्या त्यांचा बायकोची असू शकते हे वाटतंय.... येत नाही आणि शिकणारपण नाही असली मानसिकता पुरुषांमध्येच पहिली आहे...स्वैपाकाच्या बाबतीत तरी...

मी आतापर्यंत गृहिणी असणारी किंवा नोकरी करणारी एकही स्त्री पहिली नाही कि जी घर चालवायला नकार देते, अपवाद असतील....हे सर्व आता अति होते आहे....घासकडवी गुर्जी या लेखाची गरज नव्हती.

आजानुकर्ण's picture

4 Aug 2010 - 8:52 am | आजानुकर्ण

जी घर चालवायला नकार देते,

ज्ञानेश्वर माऊलींनाही फक्त भिंत चालवायला जमली. घर चालवणाऱ्या बायका तुम्हाला कुठे दिसल्या?

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 9:31 am | राजेश घासकडवी

(माझा हा प्रतिसाद तुम्हांला अश्लील तर वाटत नाही ना?)

अश्लील, छे छे. फक्त अनावश्यक वाटतो. सैपाकाविषयी बोला की भौ.

क्रेमर's picture

5 Aug 2010 - 6:57 am | क्रेमर

ज्ञानेश्वर माऊलींनाही फक्त भिंत चालवायला जमली.

भिंतीत कित्तेकांची घरे (उंदीर, घूस, किटक इ.) असतात. तेव्हा माऊलीने घर चालवले नाही असे म्हणता येत नाही. चूभूद्याघ्या.

चर्चाप्रस्ताव अश्लीलतेकडे झुकणारा आहे असे माझे प्राथमिक मत आहे.

पंगा यांचे मत वाचायला आवडेल.

मुक्तसुनीत's picture

4 Aug 2010 - 9:03 am | मुक्तसुनीत

चर्चाप्रस्ताव कुठल्या अर्थाने अश्लील वाटला हे जाणून घ्यायला जरूर आवडेल.

जीए कुलकर्णींच्या पत्रात त्यांनी लिहिल्याप्रमाणे मराठीमधले प्रत्येक क्रियापद (लैंगिक कोटीस्वरूप) द्वयर्थी वाटू शकते त्यातला हा प्रकार आहे काय ? असल्यास, याच लेखाबद्दल विशेषत्वाने अश्लीलतेची आठवण का यावी हे मला नीटसे उमजलेले नाही.

आजानुकर्ण's picture

4 Aug 2010 - 9:06 am | आजानुकर्ण

अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल.

तो दुवा चाळला (पूजेची पथ्ये). त्याच स्वरुपाची द्वयर्थी चर्चा इथे अपेक्षित आहे असे श्री. घासकडवी यांच्या पुस्तीवरुन वाटते.

मुक्तसुनीत's picture

4 Aug 2010 - 9:22 am | मुक्तसुनीत

सॉरी. मी तो दुवा उघडला नव्हता.
आता घासकडवींच्या "सद्गुरु स्वयंप्रकाशित आत्म्या"चा साक्षात्कार झाला.

पुजा, सैपाक अशा 'रोज मर्राच्या' गोष्टींबद्दल जेष्ठांमध्ये असलेली अनास्था पाहुन मन हळहळले.

हीच अनास्था अनेक गोंधळास कारणीभुत आहे, खाली सविस्तर उत्तर दिले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 9:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नवीन पिढी मात्र सर्व माहिती घेण्यास उत्सुक आहे हे वरच्या दोन प्रतिसादांतून समजावे.

धनंजय's picture

4 Aug 2010 - 6:50 pm | धनंजय

श्री. घासकडवी यांनी स्टार्टर दुवा दिला नसता, तर माझ्याकडून प्रकाशनळी पेटली नसती.

आता मी सर्वच लेख या स्टार्टरनिशी वाचणार आहे.

(थोड्या कालांतराने)
आम्लानंदाचे पारणे फिटले.

मिसळभोक्ता's picture

4 Aug 2010 - 10:35 pm | मिसळभोक्ता

आदरणीय प्रविन्भप्करांचा चर्चा प्रस्ताव नीट वाचल्यास लक्षात येईल, की त्यांनी "स्वयंपाय" लिहिले होते.

अमेरिकन पाय ह्या आमच्या आवडत्या चित्रपटावरून स्वयंपाकाचे शिक्षण लग्न आधीच व्हायला हवे, हे स्पष्ट होते.

बाकी, चर्चेकडे लक्ष ठेवून आहे.

एक पथ्य सुचवावेसे वाटते, की जरी दोघांनीही मिळून स्वयंपाक करायचा असला, तरी मेनु एकानेच सुचवावा, आणि स्वयंपाकाचे नेपथ्य स्वतःकडे घ्यावे.

राजेश घासकडवी's picture

5 Aug 2010 - 2:53 am | राजेश घासकडवी

सर्वच स्लिपा फ्रॉइडियन नसतात, काही नायलॉनच्या, चुकून आपल्या बॅगेत राहिलेल्या वगैरे पण असतात.

सिनेमांचा विषय निघाला म्हणून मला एक सुंदर तैवानी सिनेमा आठवला - इट, ड्रिंक, मॅन, वुमन... नक्की पहाण्यासारखा आहे.

पथ्यं सांगताना तुम्ही एकदम नेपथ्यात शिरलात. मेनूला कदाचित रिक्वायरमेंट डॉक्यूमेंट वगैरे म्हणता येईल बहुतेक. म्हणजे ज्याला जे हवं ते करण्यात त्याने/तिने पुढाकार घ्यावा असंच म्हणायचं असावं तुम्हाला.

क्रेमर's picture

5 Aug 2010 - 6:55 am | क्रेमर

इट, ड्रिंक, मॅन, वुमन... वरून आम्हालाही 'ला ग्रांदे ब्युफे' हा फ्रेंच शिनेमा आठवला.

मेनूला कदाचित रिक्वायरमेंट डॉक्यूमेंट वगैरे म्हणता येईल बहुतेक.

मेनू वगैरेने उगाचच औपचारिकता येण्याची शक्यता आहे. हा औपचारिक मामला व्यावसायिकतेकडे (हाटेलात जाणे वगैरे) झुकणारा आहे. शक्य असल्यास ते टा़ळावे. तिकडच्या पदार्थांनी डॉक्टरकडे जाण्याची पाळी येऊ शकते.

राजेश घासकडवी's picture

5 Aug 2010 - 7:00 am | राजेश घासकडवी

तुम्ही हॉटेलांचा उल्लेख केला ते फार बरं झालं. तिथेदेखील कोणी ना कोणी सैपाक करतंच ना...आता स्वच्छता असणं अतिशय महत्त्वाचं हे ओघानेच आलं. पण कधीकधी बाहेरचे पदार्थ देखील लोक खातातच.

बाहेर जाण्याप्रमाणेच काही लोकं आपद्धर्म म्हणून का होईना शेजारी जेवायला जातात असंही ऐकलं आहे.

बाहेर जाताना वारंवार उकळलेल्या तेलातील पदार्थ टाळावेत. अधिक माहिती करता सद्ध्या चालु असलेली दुसरी चर्चा पहाणे.

क्रेमर's picture

5 Aug 2010 - 7:12 am | क्रेमर

खवय्ये जमेल तिथे चविष्ट पदार्थ खाण्यासाठी जातात, हे मान्य आहे.

शेजार्‍यांकडे जाण्यासारखेच आणखी एक उदाहरण सूचले. गावाकडे समारंभात लागणारे जेवण खेड्यातील अनेक पुरूष एकत्र येऊन बनवतात/ बनवीत असत असेही ऐकले आहे. अशा टिम अ‍ॅक्टिविटीज आपल्या संस्कृतीत आहेत याचा अभिमान वाटतो.

पंगा's picture

4 Aug 2010 - 10:31 pm | पंगा

(डिस्क्लेमरः सर्वप्रथम, हा प्रतिसाद हा (या धाग्याकरिता दिलेला प्रतिसाद असला, तरी) आजानुकर्ण यांच्या प्रतिसादास थेट उपप्रतिसाद नाही, किंवा (या धाग्याशी संबंधित असला, तरी) आजानुकर्ण यांच्या प्रतिसादाशी थेट संबंधितही नाही. केवळ आपला प्रतिसाद वर आणून लिंबुप्रकाशात - लाइमलाइटात - दाखल करण्यासाठी वापरलेली ही एक हीन आणि हिडीस ट्रिक आहे. तरीही, आजानुकर्ण यांनी माझे मत विचारलेले असल्यामुळे ते मांडण्याचा प्रतिसादाचे शेवटी जरूर प्रयत्न करेन. डिस्क्लेमर समाप्त.)

पाकसिद्धी हा अनुभवसिद्ध प्रकार असून अनुभवाने सैपाकाच्या दर्जावर फरक पडत असावा, असा एक कयास आहे. 'आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर' या बहिणाबाईंच्या (?) उक्तीप्रमाणे, बसलेले चटके जितके अधिक, तितका भाकरीचा दर्जा चांगला, असे काही गणित असावे, अशी शंका निर्माण होते. (उक्तीची 'अरे संसार, संसार' अशी सुरुवातदेखील सहेतुक असावी, असेही वाटू लागते.)

याच संदर्भात, ज्यातत्यात ओढूनताणून (आणि मोडूनतोडून) पु.लं.ची वाक्ये घुसडण्याच्या चालू प्रथेस अनुसरून, पु.लं.चे एक वाक्य उद्धरण्याचा मोह अनावर होतो. (वाक्य अर्धवट आठवत असल्यामुळे मूळ शब्दांबरहुकुम नाही, हे जनरीतीस साजेसेच झाले.)

"(आणि म्हणूनच) आजीच्या हातच्या पुरणपोळीची सर आईच्या हातास नाही, आणि पत्नीच्या तर मुळीच नाही" असे काहीसे ते वाक्य आहे. (गरजूंनी 'हसवणूक' या संग्रहातील 'माझे खाद्यजीवन' हा लेख मूळ वाक्यासाठी जरूर धुंडाळावा.)

भाईकाका आम्हाला गुरुस्थानी असल्यामुळे त्यांच्या विधानाबद्दल शंका घेण्याचा उद्देश अर्थातच नाही. पण दुर्दैवाने या बाबतीत आमच्याजवळ असलेला त्रोटक विदा हा पूर्णपणे ऐकीव, अनेक्डोटल स्वरूपाचा असून त्यात प्रचंड विरोधाभास आहे. म्हणजे, एकीकडे "तुझ्या हातचा सैपाक माझ्या आईच्या हातच्या सैपाकासारखा होत नाही" असे आपल्या नवपरिणीत पत्नीला सांगणारे नवरे भरपूर असतात, असे ऐकलेले आहे, तर याउलट, "You cook just like my mother. She is a lousy cook, too." असे आपल्या पत्नीस ऐकवणार्‍या पतीबद्दलचा विनोदही ऐकलेला आहे. त्यामुळे खरे काय ते कळत नाही.

तरी चर्चाप्रवर्तकाने 'आजी, आई आणि पत्नी यांच्या हातच्या सैपाकाच्या चवीची तुलना' याबद्दलची आपली अनुभवसिद्ध (असल्यास) तज्ज्ञ टिप्पणी (expert comments) मांडल्यास ती सर्वांनाच उद्बोधक ठरावी, असे वाटते. इतर इच्छुक सदस्यांनीही बहीण, मुलगी, वडील, भाऊ, मुलगा अशा किंवा इतरही परिवारसदस्यांच्या, नातेवाइकांच्या अथवा मित्रमैत्रिणींच्या हातचा सैपाक चाखण्याचा अनुभव गाठीशी असल्यास, तुलनात्मक चवीबद्दलची मते विदागारात दाखल केल्यास ते विदासंचयवृद्धीसाठी फायद्याचे ठरावे, व या धाग्याचे फलितही साध्य व्हावे.

पंगा यांचे मत वाचायला आवडेल.

हा चर्चाप्रस्ताव अश्लीलतेकडे झुकतो किंवा कसे, हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे. आपण खाली अन्य एका प्रतिसादात निर्दिष्ट केलेल्या प्रस्तुत चर्चाप्रस्तावकाच्या दुसर्‍या एका चर्चेवरून आपल्याला तशी शंका आली असल्यास आपल्याला मी दोष देऊ शकत नाही, परंतु केवळ शंकेपोटी आपल्याशी ठाम आणि जाहीर सहमती दर्शवणे मला थोडे कठीण वाटते.

मात्र, प्रस्तुत चर्चा ज्या प्रकाशात वाचली जाणे अपेक्षित आहे, त्याच प्रकाशात माझा प्रस्तुत प्रतिसादही वाचता (आणि वाचण्यात) यावा, एवढेच नमूद करून आपले स्वल्प मतप्रदर्शन मी आवरते घेतो.

"If you can't beat them, join them."

आजानुकर्ण's picture

5 Aug 2010 - 8:47 am | आजानुकर्ण

स्पष्टीकरणाबद्दल हार्दिक आभार.

राजेश घासकडवी's picture

5 Aug 2010 - 8:54 am | राजेश घासकडवी

ही अश्लीलतेविषयीची चर्चा मला या लेखावर अनाठायी वाटते. श्लील काय अश्लील काय या चर्चेविषयी एक स्वतंत्र धागा काढावा असं मी सुचवेन. इथे कृपया सैपाकाविषयी बोला.

आजानुकर्ण's picture

5 Aug 2010 - 8:54 am | आजानुकर्ण

श्री. पंगा यांच्या प्रतिसादानंतर ही व अशा स्वरुपाच्या चर्चा थांबण्यास हरकत नसावी.

मुक्तसुनीत's picture

4 Aug 2010 - 8:56 am | मुक्तसुनीत

कुठला शब्द बरोबर ? सैपाक का सैंपाक ? की स्वयंपाक ? (मी स्वंयपाक किंवा स्वैंपाक असाही उच्चार बर्‍याचदा ऐकला आहे. सानुनासिक उच्चार आहे हे नक्की) भाषाशैलीबद्दल प्रसिद्ध असलेल्या सुनीताबाई देशपांड्यांच्या पुस्तकात "सैपाक" हा शब्द येतो. हा कदाचित कोकणी/कोकणस्थ प्रकार असावा काय ?

आजानुकर्ण's picture

4 Aug 2010 - 8:59 am | आजानुकर्ण

मोल्सवर्थ भटाने 3 शब्द बरोबर दिले आहेत. मात्र स्वैंपाक हा चुकीचा वाटतो.

वझेसाहेबालाही 3 शब्द बरोबर वाटतात
दुवा १
दुवा २

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 9:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सैपाक (स्वैपाक / स्वयंपाक) न करता येणारी कोणी व्यक्ती तुमच्या पहाण्यात आहे का? आणि नसेल तर पहिला मुद्दा अनाठायी आहे.

या सर्व शिक्षणाबरोबरच "सुरूवातीलाच मोदक किंवा आल्याच्या वड्या बनवू नयेत, पण सुरूवात अगदी सोप्या पाकृंपासून केलीत तर उत्तम" असा काही उत्तेजनार्थ सल्ला आला असता तर नवथर सैपाक्यांना प्रेरणा मिळेल.

आजानुकर्ण's picture

4 Aug 2010 - 9:07 am | आजानुकर्ण

चपात्या, पुरणपोळ्या असे पोळीप्रकार अधिक अवघड आहेत. वड्या वगैरे प्रकार सोपे आहेत.

Nile's picture

4 Aug 2010 - 10:32 am | Nile

सैपाकातील काही गोष्टी पुरुषांस करण्यास सोप्या तर काही स्त्रीयांस करण्यास सोप्या असाव्यात असे वाटते. इथे भेद, उच्च निच्च नसुन काही स्वाभाविक गुण आहेत.

पोळ्यावगैरे करायला थोडीशी नाजुकता, पेशंस लागतो, जे बायकांच्यात असते. त्याउलट काही अत्याधुनिक उपकरणी वापरणे सहसा पुरुषांना जास्त चांगले जमत असावे(चुभुदेघे, अनुभवावरुन).

त्यामुळे, सगळेच जमले नाही तरी चालेल, जे चांगले जमते ते करावे.

सहमत आहे.. मात्र कोणाला काय सोपे जाते यासाठी सार्वत्रिक नियम करता येणार नाहित असे वाटते. प्रत्येक जोडप्याने ते ठरवावे

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 9:20 am | राजेश घासकडवी

सैपाक (स्वैपाक / स्वयंपाक) न करता येणारी कोणी व्यक्ती तुमच्या पहाण्यात आहे का? आणि नसेल तर पहिला मुद्दा अनाठायी आहे.

या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. आमच्या अनुभवात, प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात सैपाक येतो. प्रश्न असा आहे की तो व्यवस्थित जमावा, भरपूर चमचमीत भोजनं व्हावीत या दृष्टीने कोणती पथ्यं पाळावीत याविषयी ही चर्चा आहे.

या सर्व शिक्षणाबरोबरच "सुरूवातीलाच मोदक किंवा आल्याच्या वड्या बनवू नयेत, पण सुरूवात अगदी सोप्या पाकृंपासून केलीत तर उत्तम" असा काही उत्तेजनार्थ सल्ला आला असता तर नवथर सैपाक्यांना प्रेरणा मिळेल.

हा अतिशय उत्तम मुद्दा आहे. अशा सोप्या पाककृती कुठच्या याविषयीही चर्चा व्हावी असा उद्देश आहे. मिपावरील अनुभवी बल्लवाचार्यांनी याबाबत ऊहापोह करावा.

मला याबाबतीत पाश्चात्यांचं थोडं कौतुक वाटतं. सैपाक करायला लग्नाआधीच सुरूवात करायला त्या संस्कृतीत अधिक मोकळं वातावरण असतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 9:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सैपाक व्यवस्थित जमावा या मुख्य मुद्द्यावर तर आपली सहमती आहेच. पण आता मुख्य मुद्दा आहे तो डीटेल्सचा!

>> तो व्यवस्थित जमावा, भरपूर चमचमीत भोजनं व्हावीत या दृष्टीने कोणती पथ्यं पाळावीत ... <<
सैपाक व्यवस्थित जमावा हे तर ठीकच. पण भरपूर आणि/किंवा चमचमीत हे तेव्हाच्या प्रवृत्ती (मूड)वर अवलंबून असायला हवे. म्हणजे एखाद दिवशी फक्त खिचडी खाऊनच समाधान होते तर कधी पुरणपोळ्यांबरोबर टोमॅटो सार आणि भाजलेला पापडही हवासा वाटतो.

>> अशा सोप्या पाककृती कुठच्या याविषयीही चर्चा व्हावी असा उद्देश आहे. <<
अतिशय स्तुत्य असा उद्देश आहे. गुर्जी, तुमच्याशी झालेल्या चर्चेबद्दल मला आठवण आहे. ती म्हणजे फक्त सैपाकघरातल्या समजल्या जाणार्‍या या कामाबद्दल आता उघडउघड छापील माध्यमांतून चर्चा होत आहे, हे उत्तमच!

>> मिपावरील अनुभवी बल्लवाचार्यांनी याबाबत ऊहापोह करावा. <<
इथे मात्र पुन्हा आपली असहमती होईल. फक्त अनुभवी लोकांनीच उहापोह करावा तर अनुभव कसा मोजणार? कोणी पाकृंचे धागे काढतो, कोणी इतर सर्व क्षेत्रांमधे नाव कमावून मग अचानक पाकृंचे धागे काढतो आणि कोणी अजिबातच शब्द लिहीत नाही. त्यामुळे माझी सूचना अशी की मिपावरील प्रत्येकाने स्वतःला थोडाबहुत अनुभव असल्यास जरूर उहापोह करावा.

>> मला याबाबतीत पाश्चात्यांचं थोडं कौतुक वाटतं. सैपाक करायला लग्नाआधीच सुरूवात करायला त्या संस्कृतीत अधिक मोकळं वातावरण असतं. <<
माझा व्यक्तीगत, फर्स्ट हँड अनुभव नाही, तरीही ऐकीव माहितीप्रमाणे पुन्हा एकदा सहमती. सैपाक करण्यासाठी, वयपरत्वे होणारे जबाबदार वर्तन एवढाच एक क्रायटेरिया (बहुदा) असतो.

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 11:13 am | राजेश घासकडवी

एखाद दिवशी फक्त खिचडी खाऊनच समाधान होते तर कधी पुरणपोळ्यांबरोबर टोमॅटो सार आणि भाजलेला पापडही हवासा वाटतो.

अगदी. साधा पापड भाजणे यातही मन ओतलं तर तो स्वर्गीय आनंद होऊ शकतो. मला काही उत्कृष्ट पापड भाजणारेही माहीत आहेत... पण त्याविषयी चर्चा अवांतर ठरेल.

उघडउघड छापील माध्यमांतली चर्चा काहीशी फसवी असू शकते... छापील माध्यमांचा वाचकवर्ग जुन्याकाळपासून साडेतीन टक्क्यांवर फिक्स्ड आहे. उरलेल्यांनी काय करावं?

मिपावर एकंदरीत सैपाकाबद्दल अनास्थाच दिसलेली आहे. अर्थात हे माझं मत झालं. पण प्रत्येकाने आपापले सैपाकाचे अनुभव सांगावेत याला खणखणीत दुजोरा...

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 9:12 am | राजेश घासकडवी

कृपया या लेखापुरता सैपाक हा शब्द एखाद्या टेक्निकल टर्म प्रमाणे वापरावा ही विनंती. 'स्वयं' शब्दातल्या मर्यादा टाळण्यासाठी मी तो वापरतो आहे, हे मूळ चर्चाप्रस्तावात स्पष्ट केलं आहे. प्रांतीयता यात आणू नये - किमान शब्दाबाबत तरी. सैपाकाच्या प्रांतीय वैविध्यावर जरूर लिहावे.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Aug 2010 - 10:29 am | प्रकाश घाटपांडे

जैववैविध्यावर सध्या पर्यावरणारवाद्यांमधे खुपच चर्चा चालू असते. त्याला जिविधा असा सोपा पर्यायी शब्द ही त्यांनी दिला. इथे भौगोलिक विषमते मुळेच वैविध्य निर्माण होते. विशिष्ट वनस्पती या विशिष्ट मातीत चांगल्या रुजतात. त्याला अनुकूल वातावरण असले की त्याची वाढ ही चांगली होती. हा अभ्यास करण्यासाठी डोंगर उतारांवर अनेक अभ्यासक जात असतात. हे वैविध्य शोधण्यासाठी त्यांना तसे करावेच लागते. ते काय आपल्या बगीचातच परसबाग फुलवून थोडेच अभ्यासता येणार आहे?
हा आपला 'प्रांत' नाही असे अभ्यासकाला म्हणता येणार नाही. तसे केले तर त्याचे अनुभव विश्व ही संकुचित राहील. शिवाय इतर लोकही त्याच्या अभ्यासाबद्दल शंका घेतील.
लवंगी मिरची कोल्हापुरची या उक्तीत मला प्रांतिय वाद दिसत नाही. कोल्हापुरच्या मातीचा गुण त्या मिरचीत उतरला आहे. तशा प्रकारचा 'गुण' अन्य प्रांताच्या मिरचीत असता तर लवंगी मिरची **** ची अशी उक्ती झाली असती. असो सांगायचा मुद्दा असा कि वैविध्याचा आनंद लुटायचा असेल तर प्रांतिय विश्लेषण हे अपरिहार्य आहे.
आपला मुद्दा पाकवैविध्याशी निगडीत आहे. पाककृतीचा आनंद व पोटपुजेचा आनंद यातील कोणता आनंद श्रेष्ठ ? हा कळीचा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा नाही. विविध म्हणजे काय? असे काही जे एकसारखे नाही. सगळेच एकसारखे असते तर वैविध्य आलेच नसते. म्हणजे वैविध्यात असमानता हा अंगीभुत गुण आहे. मग असमानता म्हणजेच विषमता. विषमता म्हणजेच शोषण याही चर्चे कडे मला जायचे नाही.
माझा मुद्दा एवढाच आहे कि असमानतेतील वैविध्य जोखायला आपल्या मनाची जडणघडण तशी हवी. सैपाकातील प्रांतिय वैविध्य समजा आपण काही काळ बाजुला ठेवल तर सैपाकात प्रत्येकाच्या 'हाताला' वेगळीच 'चव' असते हा मुद्दा दुर्लक्शित करता येणार नाही. हा जिव्हाचौचल्य जपण्यासाठी /पुरवण्यासाठी काही खवैय्यानी रचलेला डाव आहे अशी टीका ही होत राहणार आहे. बल्लवाचार्यांनी याला बळी पडू नये ही हाकाटी देखील होत राहणार. श्रोते आहेत म्हणुन गायक आहेत व गायक आहेत म्हणुन श्रोते आहेत. काही गायक हे श्रोतेही असतात पण सगळेच श्रोते गायक होउ शकत नाहीत. बल्लवाचार्यांच/ अन्नपुर्णाच व खवय्यांच नात असच असत. तिथ एकमेकांना दाद देउनच ते फुलत असत.
असो ही चर्चा पुढे नेण्यास मिपाकर समर्थ आहेत.

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 11:17 am | राजेश घासकडवी

प्रांतीय भेद असणारच. तुमच्या प्रांतातल्या विशिष्ट शैल्या सांगितल्यात तर आवडेल.

प्रांताप्रमाणे व्यावसायिक भेदही असणार. तुम्ही पोलिस खात्यात होतात असं ऐकून आहे. त्या 'खात्या'च्या चवींविषयी काही चविष्ट किस्सेही ऐकायला आवडतील.

जिव्हाचौचल्य - शब्द आवडला.

मुक्तसुनीत's picture

4 Aug 2010 - 9:00 am | मुक्तसुनीत

"प्रत्येकाला सैपाक यायला हवा" हा मुद्दा पटतो. गणपा सारख्यांचे धागे वाचताना "जीवन त्यांना कळले हो" असे म्हणावेसे वाटते.

अर्थात सैपाक येण्याच्या बाबतीत अस्मादिकांची अवस्था "कळतं पण वळत नाही" ही आहे हेही मान्य करतो. काही गोष्टी शिकायच्या राहून गेल्या खर्‍या.

आजानुकर्ण's picture

4 Aug 2010 - 9:11 am | आजानुकर्ण

गणपा सारख्यांचे धागे वाचताना "जीवन त्यांना कळले हो" असे म्हणावेसे वाटते.

मला गणपाचे धागे वाचताना 'जेवण त्यांना कळले हो' असे म्हणावेसे वाटते. हॉ हॉ हॉ.

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 9:24 am | राजेश घासकडवी

अर्थात सैपाक येण्याच्या बाबतीत अस्मादिकांची अवस्था "कळतं पण वळत नाही" ही आहे हेही मान्य करतो. काही गोष्टी शिकायच्या राहून गेल्या खर्‍या.

काय भाऊ, काय सांगता? लग्न होऊन इतकी वर्षं झाली तरी सैपाक येत नाही? हा तुमचा विनय म्हणावा की आणखीन काही? कदाचित "वळतं पण कळत नाही" अशी अवस्था असेल...

मुक्तसुनीत's picture

4 Aug 2010 - 9:28 am | मुक्तसुनीत

शुद्ध मराठीत सांगायचे तर आय थिंक द एंटायर पन हिअर इज रादर स्पेंट अँड दस, जारिंग नाऊ :-(

विंजिनेर's picture

4 Aug 2010 - 9:18 am | विंजिनेर

स्वैपाक न करता येणारी आणि न आवडणारी एक(तरी) स्त्री माझ्या चांगली ओळखीची आहे. योगायोगाने म्हणा ती आयटी संबधित उद्योगात आहे. वर कडी म्हणजे तीचा नवरा शेफ आहे. उदरनिर्वाहासाठी लोकांना जेवू घालतो(आणि घरी येऊन बायकोला जेवू घालतो).
सगळे कावळे काळे नसतात हे सिद्ध करायला जसा एक पांढरा कावळा पुरतो त्याच न्यायाने वर कुणीतरी म्हटलंय की पहिला मुद्दा अनाठायी आहे(कारण स्वैपाक न येणारी एक तरी ...) - ते विधान लागू होत नाही. सबब पहिला मुद्दा गैरलागू/अनाठायी नाही.
आता बोला ...

मिसळभोक्ता's picture

4 Aug 2010 - 11:21 pm | मिसळभोक्ता

उदरनिर्वाहासाठी लोकांना जेवू घालतो(आणि घरी येऊन बायकोला जेवू घालतो).

लकी बास्टर्ड !

राजेश घासकडवी's picture

5 Aug 2010 - 2:40 am | राजेश घासकडवी

पण सर्वांचंच पोट भरत असेल व उदरनिर्वाहही चालत असेल (दोन तशा वेगळ्या गोष्टी आहेत) तर एव्हरीबडी विन्स.

आपण वाचणारे सोडून.

अप्पा जोगळेकर's picture

4 Aug 2010 - 9:22 am | अप्पा जोगळेकर

स्वयंपाक न येणं ही तुम्हाला एवढी साधी गोष्ट का वाटते?
सवयंपाक येणं ही मात्र खूपच साधी गोष्ट आहे. म्हणून ती प्रत्येकाला आली पाहिजे.

पांथस्थ's picture

4 Aug 2010 - 11:11 am | पांथस्थ

बरेचदा प्रश्न एखादि गोष्ट साधी आहे कि नाहि यापेक्षा ती एखाद्याला करायला आवडते की हा असतो.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Aug 2010 - 9:29 am | प्रकाश घाटपांडे

स्वयं हा शब्दच सध्या थोडा डागाळलेला आहे - हा त्याच शब्दाचा स्वयंदोष असावा. आता स्वयंसंपादनच घ्याना... त्यातही या स्वार्थी छटा आहेत म्हणूनच संपादकांनी तो अधिकार काढून घेतला आहे

खर तर स्वयं शब्दाला आत्मतृप्तीचा आनंद आहे. आपला आनंद इतरांवर म्हणुन का अवलंबुन असावा. आपल्या कडे अध्यात्मात देखील स्वानंदाला किती महत्व आहे. त्याला ब्रह्मानंदाचा व्याप्ती दिलेली आहे.
अपना हात जगन्नाथ या उक्तीत देखील किती ईश्वराचे अधिष्ठान आहे ते पहा. उक्ती आणि कृती यातील अंतर सर्वसामान्याला जवळच वाटाव म्हणुनच ते अधिष्ठान आहे.
धुर्ताचार्यांच्या मते संसाराचा गाडा 'रेटणे' अथवा 'ओढणे' हे ज्यांना काही कारणामुळे शक्य होणार नाही त्यांना स्वयंसिद्ध होण्यासाठी जगन्नाथाचे अधिष्ठान हे लागते. हा 'कमकुवतपणा' वा कुठला 'दोष' नाही . वास्तव आभास यातील सीमारेषा यातील सीमारेषा जेव्हा पुसट होते तेव्हाच तुम्हाला 'मोक्षप्राप्ती' होते. मोक्षाचा आनंद हा स्वानंद आहे. अध्यात्म असो वा विज्ञान अंतिम उद्देश हा मानव सुखी करण हा आहे. मला इथे सुखाची सापेक्षता आणुन 'रसभंग' करायचा नाही. आभास व वास्तव या अवस्था यांना 'स्वप्नदोष' वा 'सत्यगुण' या विकल्पात ही आणायचे नाही. मला 'स्वयंसिद्धते'ला कमी लेखु नये एवढच सांगायच आहे.

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 10:27 am | राजेश घासकडवी

स्वप्न, सत्य, गुण व सिद्धता यांचा ऊहापोह करून तुम्ही स्वयं शब्दाचं महत्त्व अधोरेखित केलंत त्याबद्दल धन्यवाद. आपला हातगुण शेवटी खरा असला तरी नेहेमीच अ मॅन इज नॉट अॅन आयलंड...

तरीही आपले मुद्दे वाचून स्वयं शब्दाला अधिक मान प्राप्त होईल ही आशा.

आपल्या संस्कृतीत सैपाकाचा केलेला बाउ मला अजिबातच पटत नाही. आपल्याला सैपाक शिकवण्याची काही व्यवस्था आहे का? मुळात सैपाक शिकवणे याबाबतीत अगदीच अनास्था दिसुन येते. असे असताना सर्वांना साग्रसंगीत सैपाक येण्याची अपेक्षा कशी करता!! फारतर मुलींना सैपाकाचे चार धडे आईकडुन मिळत असावेत, बहुदा, सैपाक हीच यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे आणि चांगला सैपाक जमणे हे स्त्रीचेच काम आहे. अन्यथा नवरा शेण खायला बाहेर जातो असे म्हणतात असे ऐकले असेलच. (हे ही स्त्रीयांमध्ये काय आहे कळत नाही, आपले ते जेवण इतरांचे ते.. असो)

अनेक मुले तर सैपाक परिस्थितीनुसार शिकतात, अनेकदा चुकतात, अनेकांना तर तेही जमत नाही. मेस मध्ये अनेक वर्षे काढणारे काही तर आत्मविश्वास गमावुन बसतात, मग नंतर पुढे यांवरच वैवाहीक आयुष्य बिघडवण्याचा ठपकाही येतो. रीतसर शिकले असते तर असे झाले असते का?

तर मुद्दा असा आहे, की मुले असोत वा मुली, यांना सैपाकाचे धडे लहानपणीच मिळाले तर ही असमानता राहणार नाही. नवरा बायको एकमेकांना सांभाळुन सैपाकाची काळजी घेतील आणि ही असमानता मुळातुनच नाहीशी होण्यास मदत होईल, असे वाटते.

हे आमचे तोकडे ज्ञान, कुणास काही चुक असल्यास दाखवुन द्यावे. धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

निळ्या, याच बाबतीत गुर्जींनी मला एक छोटेखानी व्याख्यान पुस्तक प्रदर्शनात दिलं होतं त्याचीच पुन्हा एकदा आठवण झाली.

मुलींना थोडेफार धडे आई, ताई, इ.इ. घरातल्या ज्येष्ठ स्त्रियांकडून मिळतात हे उत्तमच होतं आणि आहे. पण मुलांची मात्र कुचंबणा होते.

एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडल्याबद्दल बालक निळे यांचे आभार.

त्यापुस्तकाचे परिक्षण लिहावे ही दुर्बिटणे बैंना विनंती.
-अभ्यात्सु

शहराजाद's picture

4 Aug 2010 - 11:00 am | शहराजाद

फारतर मुलींना सैपाकाचे चार धडे आईकडुन मिळत असावेत, बहुदा, सैपाक हीच यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे आणि चांगला सैपाक जमणे हे स्त्रीचेच काम आहे. अन्यथा नवरा शेण खायला बाहेर जातो

असहमत... नाईलभाऊ, तुम्ही स्त्रीविश्व फर्स्टहॅंड किती बघितलंय माहीत नाही. पण मी जो अनुभव घेतला आहे, त्यात सैपाकाचे शास्त्रशुद्ध धडे मुलींना देण्याची पद्धत नाही. पाण्यात पडल्यावर पोहोता येते, तसेच लग्न झाल्यावर सैपाक येईल असे गृहीत धरले जाते. फारतर नवऱ्याच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, इतपतच कानमंत्र वडीलधाऱ्या स्त्रियांकडून मिळतो. सैपाक हे केरवारा, धुणीभांडी इ. प्रमाणे chore वाटावे असेच वातावरण मी पाहिलेल्या भारतीय घरांत असते. उपवर मुलीला सैपाकाची शास्त्रशुद्ध माहिती (पाकसिद्धी, सादरीकरण आणि आस्वाद) देण्याची प्रथा नाही. सैपाकासकट सर्व chores सुखी संसारासाठी आवश्यक समजली गेली तरी मी पाहिलेल्या समाजात या सर्व संसारासाठी, नवऱ्यासाठी करायच्या गोष्टी हेच ठसवलं जातं. स्वतःच्या आनंदासाठी सैपाक कसा करावा याबद्दल बहुतांशी अनभिज्ञता आढळून येते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 11:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

योग्य मुद्दा!

आनंदासाठी सर्व काही, अगदी सैपाकसुद्धा याचं शिक्षण कसं द्यावं याबद्दल शहराजाद यांनी आणखी दोन शब्द लिहावेत अशी त्यांना विनंती.
सैपाक आनंदासाठीही (नव्हे आनंदासाठीच?) करायचा असतो याचं मूलभूत शिक्षण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत श्री. घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे अरगॉनॉमी वगैरेंचा विचार कसा करता येणार?

शहराजाद's picture

4 Aug 2010 - 11:47 am | शहराजाद

मला वाटते की आपल्या पूर्वजांमध्ये या बाबतीत अधिक मोकळेपणा होता. पूर्वी १४ विद्या व ६४ कलांमध्ये सैपाकाचा अंतर्भाव होता. त्यावर मान्यवरांनी पुस्तके लिहिली होती व ती वरीष्ठ वर्गात हे शिक्षणही दिले जात असे. इतकेच काय पण सध्या स्त्रियांना खालचा दर्जा देणार्‍या मुस्लीम देशांतही स्त्रिया सैपाकांत चतुर होत्या. अरेबियन नाईट्समध्ये अशा आनंदाने सैपाक करणार्‍या अनेक स्त्रियांचा उल्लेख येतो. जिज्ञासूंनी गौरी देशपांडे यांनी केलेले अरेबियन नाइट्सचे भाषांतर वाचावे.

पूर्वी १४ विद्या व ६४ कलांमध्ये सैपाकाचा अंतर्भाव होता. त्यावर मान्यवरांनी पुस्तके लिहिली होती व ती वरीष्ठ वर्गात हे शिक्षणही दिले जात असे.

याबद्दल अधिक वाचायला आवडेल. खास करुन जर तुम्ही अशा पुस्तकांचे परिक्षण लिहलेत, त्यातील दोन चार रेसीप्यांचे फोटू टाकलेत तर उत्तम.

अशाच एका पुस्तकाबद्दल ऐकले होते, पण त्यात फक्त वेगवेगळ्या रेसीपी करतानाचे फोटुच होते फक्त, बाकी कसे करावे वगैरे काही माहिती नव्हती. तुम्ही म्हणता ते खरे असेल तर अशा गुप्त गोष्टी बाहेर यायलाच हव्यात.

अहो मी तेच म्हणले आहे, फारतर मुलींना थोडेफार शिक्षण मिळते (दिले जाते असे नाही) अदिती म्हणते त्याप्रमाणे ताई वगैरे कडुन असेल.

बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड अनुभव नाहीच हो, मी पुरुष आहे. ;-)

बाकी स्त्रीविश्वाचा फर्स्टहँड अनुभव नाहीच हो, मी पुरुष आहे.

क्षमस्व. नावावरून कळले नाही म्हणून मुळात मी संदिग्ध लिहिले होते. नाईल हे नदीचे नाव असल्यामुळे कदाचित तुम्ही स्त्रीही असू शकाल असे वाटले. असो.

असु द्या हो, खरं तर गेले दोन तीन दिवस सैपाक विषयावर मी दाखवलेल्या रुचीमुळेही कदाचित असु शकेल. ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 12:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सैपाकात रूची दाखवली म्हणजे आयडी स्त्रीचाच असेल किंवा पुरूषाचाच असेल हे असे स्टीरीओटाईप्स बदलायला हवेत. सैपाक शिकण्यात हे ही एक पथ्य शिकवलं गेलं पाहिजे.

ऋषिकेश's picture

4 Aug 2010 - 9:50 am | ऋषिकेश

माणसाला 'स्वयं'पाक करणे कालांतराने कंटाळवाणे होऊ लागते.. बॅचलरहूड मधे ठिक आहे. एकदा स्त्री-पुरूषांचं लग्न झालं (प्रसंगी लग्न न होताही एकत्र राहत असल्यास) एकमेकांकडून-एकमेकांसाठी सैपाक करून घ्यावासा वाटु लागतो. व त्यात गैर काहिच नाहि. एकमेकांना सैपाक करून घालणे ही भारतीयच नाहि तर अखिल मानवीय संस्कृती आहे

सैपाक करण्यास कंटाळा येणे, कमी मजा येणे, ताकद नसणे वगैरे कारणांमुळेच बाजारात सैपाकाची अनेक आधुनिक साधने मिळतातच!

:) :)

माणसाला 'स्वयं'पाक करणे कालांतराने कंटाळवाणे होऊ लागते..

खरे आहे, पण म्हणुनच काही फास्ट रेसीपीज अस्तित्त्वात आहेत. याचे धडे लहानपणी मिळाले असते तर बॅचलहुड अधिक सुखकर झाले असते. ह्या रेसीपीज अर्थात सद्ध्या अनेक लोक स्वानुभवाने शिकतातच, पण मग चुका होतात वगैरे. म्हणुन पुन्हा बॅक टु माय पाईंट.

सहमत आहे.. ख्रंतर शाळामधे हा विषय सुरू करता येईल म्हणणर होतो. पणे तिथे काहि अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय इतक्या लहान वयात सैपाकाची उपकरणे वापरण्याने सैपाक शिकवण्याचा मुळ उद्देश साध्य होत नाहि.

असे काही नाही. शाळेत सुरुवात झाली तर उत्तमच. सहज सोप्या गोष्टी तिथे शिकवता येतील. उदा, कोशींबीर बवनणे वगैरे. एकदा का सैपाकाची भिती मेली, की आयुष्यात पुढे अडचण येणार नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडे मतभेद आहेत.
विशिष्ट काही पाकृ शिकण्यापेक्षा 'स्वयंपाकाची पूर्वतयारी' असे धडे शाळेत गिरवता येतील.

बव्हंशी सहमत. बव्हंशी यासाठी कारण काहि उत्साही मुले व मुली पूर्वतयारी शिकवली की लगेच टिव्हीवर बघुन अथवा कुठेतरी वाचुन विशिष्ट पाककृती करू पाहतील.
अर्थात मित्रांकडून पाककृतीची चुकीची माहिती होऊन पुढे प्रॉब्लेम होण्यापेक्षा शाळेत शिकवलेली बरीच बरी.

अहो तेच म्हणणे आहे. पण मुख्यतः हे शिक्षण पुस्तकी असणार म्हणुन किमान कोशिंबीरीसारख्या सोप्या कृती करायला शिकवण्याने त्यांनाही कृतीचा अनुभव येईल.

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 10:37 am | राजेश घासकडवी

तुम्ही शाळेचा उल्लेख केल्यामुळे एक मुद्दा मांडावासा वाटतो. शाळांमध्ये सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती अत्यंत लाजिरवाणी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. या महत्त्वाच्या विषयाचं ज्ञान केवळ बाय द वर्ड ऑफ माउथ व्हावं हे लांच्छनास्पद आहे. शिक्षणाच्या आधिकारिक धोरणात या महत्त्वाच्या विषयाची किमान तोंडओळख करून देण्याची दखल घेतली जावी असं आम्हाला वाटतं.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Aug 2010 - 10:58 am | प्रकाश घाटपांडे

अन्न वस्त्र निवारा वगैरे गरजातील अन्न ही मुलभुत गरज आहे. वस्त्राची तमा न बाळगणारे अनेक आहेत म्हणुनच प्राधान्यक्रमात अन्न हे प्रथम आहे. अन्न या मुलभुत गरजांकडे लक्ष देण्यासाठी सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती नक्कीच लांछनास्पद आहे. विचारवंतांनी याचा विचार केला पाहिजे.
आता काही लोक सैपाक हा शिक्षणाचा विषय आहे की संस्काराचा? तो शाळेत शिकवला जावा कि समाजात? असे प्रश्न उपस्थित करतील ही. पुर्वी गुरुकुल पद्धतीत निसर्गाकडुनच काही शिक्षण व्हायचे. सैपाकाचा कच्चा माल हा शेवटी निसर्गाकडूनच मिळतो . आदिमानव हा पुर्वी कच्चे मांस खात असे. अरण्यात वणवा पेटल्यावर भाजले गेलेले प्राणी हे अधिक रुचकर लागतात हे त्याला निसर्गोत्पातामुळेच समजले. मसाल्याचे पदार्थ वापरल्यामुळे अन्न अधिक काळ टिकते हे देखील त्याला निसर्गातुनच समजले. पण माणुस हा वेगळा प्राणी आहे. प्रत्येक वेळी ठेच लागल्यावरच शिकावे का? पुढच्यास ठेच मागचा शहाणा. कशाला प्रत्येकाने ठेचा खाव्यात?
शिक्षणाने माणुस बदलतो. पिढी बदलते. त्यामुळे सैपाकाचा शिक्षणात समावेश केला पाहिजे. अभ्यासक्रमात थिअरी प्रॅक्टिकल हा भाग ठरवता येईल पण तो नंतर. राजेश म्हणतो तशी विषयाची तोंड ओळख तर प्रथम झाली पाहिजे. रस नंतर निर्माण होतो.

>> शाळांमध्ये सैपाकाच्या शिक्षणाविषयी जी अनास्था दिसते ती अत्यंत लाजिरवाणी आहे असं आमचं स्पष्ट मत आहे.
आमची शाळा बरीच पुढारलेली होती म्हणायची मग.

कार्यानुभव च्या तासांमध्ये थोडफार शिक्षण मिळायच कुकिंग बद्दल.
कधी कधी तर स्पर्धा पण असायच्या.

लकी मी.

>>कार्यानुभव च्या तासांमध्ये थोडफार शिक्षण मिळायच कुकिंग बद्दल.
कधी कधी तर स्पर्धा पण असायच्या.

हे अस असेल तर नक्कीच बरीच पुढारलेली होती म्हणायची ;)

आमच्या शाळेत सिनीअर विद्यार्थ्यांनी सैपाकाबद्दल बरीच माहिती पुरवली होती पण बहुतांश माहीती ऐकिव असावी असे तेव्हा वाटत असे. एकट्यापुरता सैपाक करायचे धडे मात्र तेव्हाच मिळाले असावेत.

पहिला चहा शाळेत असतानाच केला होता हे आठवले.

सध्या सोप्या पाकृ करता येतील कि नवशिक्यांना... उदा. भात आणि सांबर अथवा रसम...माझा नवरा एकदम फस्क्लास बनवतो...
अजून साधी फोडणी देऊन कडधान्ये करता येतील... अवघड काय त्यात ? चवीचं म्हणाल तर हळूहळूच माणूस शिकतो...एकदम कसे येणार ?

शिल्पा काकुंना इथे त्या रेसीपी, फोटुसकट, टाकुन नवशिक्यांची मदत करावी अशी विनंती करतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 10:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विनंतीला दुजोरा.

शैलेन्द्र's picture

4 Aug 2010 - 11:14 pm | शैलेन्द्र

ठार मेलो......

शिल्पा ब's picture

5 Aug 2010 - 11:07 am | शिल्पा ब

ज्यांना गरज आहे त्यांनी इंटरनेटवरून रेसिपी घ्याव्यात...फोटूसकट उपलब्ध असतात म्हणे.

चर्चाप्रस्ताव वाचून करमणुक झाली.

अशीच आधीची एक उद्बोधक चर्चा या दुव्यावर पहायला मिळेल.

तो दुवा चाळला (पूजेची पथ्ये). त्याच स्वरुपाची द्वयर्थी चर्चा इथे अपेक्षित आहे असे श्री. घासकडवी यांच्या पुस्तीवरुन वाटते. -- अजानुकर्ण

-- अजानुकर्णाचे मत पाहून चर्चाप्रस्ताव कोणत्या विभागात आहे ते पाहीले. विनोद, विरंगुळा, क्रिडा या विभागात पाहून मजा वाटली ;)

शेवटचा दुवा उघडून वाचला नाही.

'कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झाले :)

कळावे... :)

Nile's picture

4 Aug 2010 - 12:24 pm | Nile

कुकरची शिट्टी काढणे' या वाक् प्रयोगाने बरेच मनोरंजन झाले

लिखाळ काकांकडुन कुकरची शिट्टी काढण्यात रंजन होते की नाही हे ऐकण्यास उत्सुक. ;-)

प्रकाश घाटपांडे's picture

4 Aug 2010 - 1:27 pm | प्रकाश घाटपांडे

या पुर्वी कुकरच्या शिट्टीवर कौल झाला होता. (कौलचा दुवा घ्यावा. )
आमच्य मते हे उर्जा नियोजनासाठी याचा उपयोग खुप होतो. कुकरला शिट्टी नसेल तर कुकरचा स्फोट होउ शकतो. कुकरच्या शिट्टीला मनोरंजन मुल्या पेक्षा सुरक्षिततेचे मूल्य अधिक आहे.
उर्जेचे योग्य नियोजन केले तर शिट्टीची वेळ येणारच नाही.

कौलात दिल्याप्रमाणेच आमचे मत पुन्हा लिहतो.

शीटी कडे लक्ष दिलेत तर उर्जाही वाचते अन डाळही शिजते. शिटी न होता शिजवणे लांबवले तर उत्तम. एकाच शिटीस डाळ शिजेल.

कुकरची शिट्टी म्हणजेच कुकरचा बोळा असावा ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 2:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काकांचा मुद्दाही पटला.

ऊर्जेचे योग्य नियोजन नाही केले तर (कुकरची) शिटी वाजेल!

नगरीनिरंजन's picture

4 Aug 2010 - 11:18 am | नगरीनिरंजन

सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे.
सैपाक करताना दृष्टी, चव आणि गंधाबरोबरच स्पर्श हाही एक महत्वाचा घटक आहे. उदा. कणकेचे गोळे तिंबणे, दाणे कुटणे किंवा नुसती लिंबे हाताने मऊ करणे यात सुद्धा एकप्रकारचा आनंद आहे. काही यांत्रिक उपकणे वापरत असल्यास त्याचा आवाज हा ध्वनिच्या माध्यमातून आनंद देणारा घटक आहे. तर असा पंचज्ञानेंद्रियांना आनंद देणारा सैपाक करण्यास कोणत्याही पुरुषाने मागे राहू नये. ज्याप्रमाणे जेवण हे उदरभरण नसून यज्ञकर्म आहे त्याप्रमाणेच सैपाक हे एक काम नसून कला आहे. मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

4 Aug 2010 - 11:30 am | प्रकाश घाटपांडे

सोवळ्यात किंवा ओलेत्याने सैपाक केल्यास सैपाकाचा आनंद जास्त येतो व भूकही छान लागते असा अनुभव आहे.

तुम्हाला प्रचंड भुक लागली आहे अशा वेळी केवळ धार्मिक परंपरा म्हणुन सोवळ्या ओवळ्यानेच वा ओलेत्यानेच सैपाक केला पाहिजे हा अट्टाहास आनंदा पेक्षा दु:ख देणारा आहे. अशा वेळी पारोश्याने जरी सैपाक केला तरी अन्न वेळेवर मिळणे हा भाग अधिक महत्वाचा असतो. पण हा स्खलनशील विचार धर्मपंडितांनी पाखंडी ठरवला आहे.

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 12:10 pm | राजेश घासकडवी

नगरीनिरंजनभाऊ,
तुम्ही एकदम चोक्कस बात केलीत. सर्वसामान्य पाककृतींच्या पुस्तकांत रुक्ष मोजमापं, पदार्थांची जंत्री व यांत्रिक कृतीचं वर्णन इतकंच असतं. पण पंचेंद्रियांना सैपाकातून आनंद मिळू शकतो हे अगदी खरं आहे.

उदरभरण हे केवळ अंतिम ध्येय असतं. खरा आनंद असतो तो तिथपर्यंत पोचण्याच्या मार्गात. एकाच वेळी भूक वाढवण्याचं आणि मग ती भागवण्याचं भाग्य मिळतं त्यात.

मला स्वतःला सैपाकात प्रचंड रुचि असून कोणत्याही स्त्रीसाठी सैपाक करण्यात मला कमीपणा वाटणार नाही.

वा वा!

पारंगत पुरुषानी IT wife असे धागे काढुन रडारड करण्यापेक्षा गरजु स्त्रीला सैपाक शिकवला तर समाजात एकही अडाणी स्त्री राहणार नाही. (व आपल्या आवडत्या स्त्रीला आपणच सैपाक शिकवु या प्रेरणेने एकही अडाणी पुरुष राहणार नाही) ह्या विचाराने केव्हढा सुखावलो. बाकी असेच आमचे मत आम्ही पुर्वीच व्यक्त केले आहे.

अरसिक माणूस ,ओलेत्याने सैपाक करायचा ?
अवांतर : दृष्टी, चव आणि गंध आणि स्पर्श गेले ते दिन गेले.....
(तूर्तास बेंच बहाद्दूर) रामदास

बेसनलाडू's picture

4 Aug 2010 - 9:26 pm | बेसनलाडू

सैपाक हे काम नसून कला आहे, हे मान्य करणे ही एक प्रेरणा होऊ शकेल. स्वतःच्याच जिभेचे चोचले पुरवायचे असतील, तर स्वतःच स्वयंपाक करण्यासारखा परमानंद नाही, हेही खरे!
(बल्लवाचार्य)बेसनलाडू
ओलेत्याने सैपाक करण्यात कसली अरसिकता रामदासकाका? (ओलेत्याने सैपाक करणारा IT WIFE चा नवरा किंवा) नुकतेच अंघोळ करून बाहेर आलेली, कवेत घेतल्यावर काहीशी ऊन, सुगंधी लागणारी, अंग पुसावयाचा टॉवेल केसांच्या बुचड्यावरून बांधून बाथरोबवरच सैपाकघरात पळून आमटी/भाजी फोडणीला टाकणारी बायको हे 'अन्न हे पूर्णब्रह्म' बनण्यातील एक प्रमुख घटक आहे, असे आमचे ठाम मत आहे :) किंबहुना हे सैपाकाचे प्रमुख पथ्य म्हणून पाळले जावे, अशा मताचे आम्ही आहोत ;)
(मतदार)बेसनलाडू

धनंजय's picture

4 Aug 2010 - 9:30 pm | धनंजय

"काम असून (किंवा असल्यामुळे) कला आहे" असे वाचावे.
"कलातुराणां न भयं न लज्जा ।"

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 9:46 pm | राजेश घासकडवी

कबीरानेच सांगून ठेवलं आहे,

कल करे सो आज कर, आज करे सो अब.

आमोद शिंदे's picture

5 Aug 2010 - 7:34 am | आमोद शिंदे

ऊन, सुगंधी लागणारी बायको??

म्हणजे काय? अजाबात झेपली नाही!!

अप्पा जोगळेकर's picture

5 Aug 2010 - 8:25 am | अप्पा जोगळेकर

कणकेचे गोळे तिंबणे, दाणे कुटणे किंवा नुसती लिंबे हाताने मऊ करणे यात सुद्धा एकप्रकारचा आनंद आहे. हा अश्लीलपणा नाही का?

काही यांत्रिक उपकणे वापरत असल्यास त्याचा आवाज हा ध्वनिच्या माध्यमातून आनंद देणारा घटक आहे डोक्यावरुन गेलं.

अनिल २७'s picture

4 Aug 2010 - 11:25 am | अनिल २७

आता बास हो स्वयंपाकाचे (सैंपाकाचेही) धागे.. कंटाळा आला आता..

मुक्तसुनीत's picture

5 Aug 2010 - 8:30 am | मुक्तसुनीत

असेच म्हणतो.

सगळे स्वयंपाक वाले धागे जामीनावर मुक्त झाले कि काय?

विनायक प्रभू's picture

4 Aug 2010 - 9:38 pm | विनायक प्रभू

ओलेत्याने 'स्वयं'पाक मस्त होतो.

अररर मास्तर U २ ओलेत्याने 'स्वयं'पाक करता?

विनायक प्रभू's picture

4 Aug 2010 - 9:53 pm | विनायक प्रभू

उपाशी राहाण्यापेक्षा बरे गणपाजी.

एक's picture

4 Aug 2010 - 10:21 pm | एक

वगैरे करावं म्हणजे..इतरांचा सैपाक कसा होतो? किंवा एखाद्याची (चा) बायको (नवरा) कशी सुग्रण आहे. याचा पण अनुभव येईल..

क्रेमर's picture

5 Aug 2010 - 6:35 am | क्रेमर

पोट भरण्यासाठी काम करावेच लागते. सैंपाक कामच असल्यामुळे सैंपाक शिकणे गरजेचे आहे. मी एकट्याने व मिळून सैंपाक केलेला आहे. पण दोनापेक्षा जास्त लोकांनी मिळून सैंपाक करण्याचा प्रयत्न केल्यास डिश बिघडण्याची शक्यता असते. (आम्ही तसा प्रयत्न अजुन केलेला नाही/ करण्याची शक्यता-संधी दिसत नाही.) पूर्वीच्या आमच्या स्वाक्षरीत अशा एका टूमेनीपणाने बिघडलेल्या पदार्थाबाबत लोकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे स्मरते.

क्रेमर's picture

5 Aug 2010 - 6:40 am | क्रेमर

नुकतेच अन्नपदार्थात होत असलेल्या भेसळीबाबत वाचले. अशा प्रकारच्या भेसळीमुळे सैंपाकावर तसेच पदार्थाच्या अंतिम रूपावर काय परिणाम होऊ शकतात? जाणकारांनी फोकस मारावा.

सहज's picture

5 Aug 2010 - 7:07 am | सहज

आजकालच्या डिन्क (डबल इन्कम नो किड्स)च्या आय टी / मॉडर्न जमान्यात एक दोघांच्या स्वयंपाकाचे जरा अतीच कौतुक होते आहे असे मला वाटते बॉ. आयत्यावेळी म्हणजेच पूर्वसुचना न देता येणार्‍या अनेक पाहुण्यांचे आपल्या पाककौशल्याने पोट भरणार्‍या अन्नपूर्णेच्या महान भारतीय संस्कृती मधे हे तर अजिबात पटतच नाही.

वरचेवर मोठ्या मेजवान्या आयोजीत करणार्‍यांची पथ्ये, अनुभव ऐकण्यास उत्सुक!

महर्षी वेदव्यास यांनी यावर काही प्रकाश टाकला आहे का? नाही म्हणले तरी द्रौपदीला पाच जणांच्या आवडीनिवडी सांभाळायला लागत असतील ना. तर द्रौपदीची पथ्ये यावर कोणी जाणकार प्रकाश टाकेल काय?

राजेश घासकडवी's picture

5 Aug 2010 - 10:48 am | राजेश घासकडवी

वा, द्रौपदीकडे अक्षयपात्र होतं हे तुम्हाला माहीत नाहीसं दिसतंय.
(हा शब्द वाचून का कोण जाणे, पण माझ्या एका जुन्या मित्राची आठवण झाली)

अर्धवट's picture

5 Aug 2010 - 10:42 am | अर्धवट

च्यायला. सगळ्याच सदस्यांविषयीचा आदर शतपटीने वाढला, ही चर्चा बघुन...