मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाटेश्वर - अजुन एक शाक्तपंथीय देवस्थान.

५० फक्त · · कलादालन
श्रावणाच्या पहिल्या रविवारी भुलेश्वर ते शेवटच्या रविवारी पाटेश्वर असा शाक्तपंथीय शिवालयांचा प्रवास घडला, भुलेश्वराचे फोटो आधीच टाकलेत म्हणुन हे पाटेश्वराचे. Image removed. जवळुन पाहिल्यावर हे फुलांचे ताटवे दिसले, Image removed. Image removed. हि दोन फुलं तर घ्यावीच वाटली Image removed. अजुन किती लांब अन उंच असा विचार करतानाच अचानक समोर काही बांधीव पाय-या आल्या बहुधा आपल्याला इथंच जायचंय जवळच, आता सामानाचं ओझं जरा हलकं वाटायला लागलं, पाय-या संपता संपताच समोर आली ती त्या बाजुच्या डोम्गरातच खोदुन काढलेली गणपतीची प्रतिमा अगदी रिद्धी सिद्धि सहित. Image removed. मुर्तीच्या पायावर डोकं ठेवलं पण पायवाट पुढं पुढं जातच होती. आता बराच वेळ चालल्यावर पुन्हा एक बांधकाम असावं असं काही दिसु लागलं, वाटेतच एक मोठं झाड, वडाचं का पिंपळाचं, समजुन घ्याय्ला वर नजर फिरवली तर छे विश्वासच बसेना त्याचा, चाफ्याचं झाड एवढं मोठं, पण विचार करायला वेळ नव्हता, सहज मागं पाहिलं, Image removed. Image removed. कळकबेट Image removed. किती छान कुंड आहे, आणि चक्क कमळं आहेत त्यात, Image removed. Image removed. Image removed. थांबुन चालणार नव्हतं, त्या दगडी पाय-या पार करुन पुढं आलो आणि थबकले, देवळाच्या बाहेर देव आणि तो ही असा Image removed. Image removed. पुढं नेणा-या या पाय-या अन त्यांच्या भिंतीतले हे दिव्यांचे कोनाडे, Image removed. Image removed. एका मोठ्या कोनाड्यातलं हे शिवलिंग Image removed. ही अजुन एक सुरक्षादेवता Image removed. पाय-यांचा वर असलेलं हे देउळ Image removed. आणि हा नंदि Image removed. Image removed. Image removed. आणि त्याच्या पायाला वेटो़ळा घातलेला हा सर्प, Image removed. आणि त्या नंदिच्या पायात असलेलं हे शिवपुजेचं शिल्प Image removed. देवळाच्या बाहेरच्या भिंतीत असलेला हा महामहादेव, Image removed. पुर्वी अतिशय रागीट पण आता या मर्त्य मानवाला काही करत नाहीये, Image removed. याच देवळाच्या प्रांगणातली अजुन काही मंदिरं जी पाहुन सगळ्यांनाच आश्चर्य वाटेल , का हेच पहा, हा शेषशायी विष्णु अगदी लक्ष्मी सह चक्क महादेवाच्या देवळात Image removed. आणि हा चार मुखी ब्रम्हा चक्क शस्त्रासह Image removed. आणि महादेवाच्या सर्पांबरोबर जन्मोजन्मिचं वैर असणारा विष्णु वाहन गरुड पण,. Image removed. खरंतर देउळ हे याचं महादेवाचं Image removed. ही चार हात असलेली शिव प्रतिमा Image removed. बाहेरची ही अष्टभुजा Image removed. आणि हा स्त्रि गणेश Image removed. ही शिव पार्वती प्रतिमा Image removed. Image removed. Image removed. Image removed. आणि ही इतर मंदिरं, सगळी शिवाचीच पण भव्य अन गुहेत कोरुन काढलेली. Image removed. Image removed. Image removed. Image removed. इथं पिंडीवर पिंडी आहेत, वेगळाच प्रकार Image removed. Image removed. Image removed. पिंडिवरच काय पण गुहेतल्या खांबावर अन भिंतीवर पण पिंडीच आहेत. आणि बाकी आहेत त्या पिंडी तरी किती वेगळ्या आहेत.. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. ह्या पिंडी आहेत का उखळं आहेत ? Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. हा दुसरा नंदी आणि त्याच्या पाठीवरची वेग़ळीच नक्षी. हे नंदिच्या वर असलेले छत Image removed. हे मंदिराचे गवाक्ष, दगड कोरुन काढलेले , Image removed. जेवढ्या या पिंडी अनाकलनिय तेवढ्याच या खुणा सुद्धा. Image removed. अरे भगवंता शंभो हे काय रे हा प्रकार तुलाच माहिति याची महती अन कार्यकारणभाव Image removed.] काही धार्मिक अथवा ऐतिहासिक माहिती चुकीची असण्याची शक्यता आहे तरी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी मार्गदर्शन केल्यास बदल करेन.

वाचन 23473 प्रतिक्रिया 0