अंडे का फंडा .......
अंडे का फंडा .......
साहित्य :- उकडलेली अंडी ४-५ , कढीपत्ता ,जीर ,मोहरी,हिंग , २ टोमाटो बारीक चिरलेले , मीठ चवीनुसार ,लाल तिखट दीड स्पून ,गरम मसाला १ स्पून.
वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस १ वाटी,तळलेला कांदा १ वाटी,(कांदा चिरून थोड तेल घालून हलका सोनेरी भाजावा ),
कोथिंबीर ,खसखस (सोनेरी भाजून घ्यावी ) २ चमचे ,लसून ८-९ पाकळी ,आल १/२ इंच बस ..........
वरील सर्व साहित्य मिक्सी मध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यावे
फोडणी :- कढइत ३ चमचे तेल गरम करा ,मोहरी कढीपत्ता घालून तडतडवा,मग जीर आणि हिंग घाला ,खमंग फोडणी बसली कि लगेच लाल तिखट आणि गरम मसाला घाला ,गॅस थोडा बारीक करून वरील वाटण घाला ,पूर्ण पणे छान मिक्स करून घ्या तेल सुटू लागले कि टोमाटो घाला ,४-५ मिनिट मस्त मिक्स होऊ द्या ,मीठ घाला आणि थोड पाणी घाला ,एक उकळी आली कि अंड्याचे काप घाला .गरम गरम ग्रेविवर हिरवी कोथिंबीर घाला
आणि चापा.........................:)
प्रतिक्रिया
11 Mar 2011 - 12:50 pm | स्पंदना
काय पियु? हल्ली स्वयपाक घरात फार लुडबुड चाललेय?
11 Mar 2011 - 3:22 pm | पियुशा
हा हा हा :)
आम्हि सगळीकड लुड्बुड कर्तो ;)
11 Mar 2011 - 1:06 pm | ५० फक्त
पुर्वतयारी सुरु झाली वाटतं. ते काय म्हणतात ना लास्ट मिनिट रिव्हिजन. अपेक्षित २१ मधले प्रश्न बघुन घ्या पुन्हा एक्दा.
ही अंडी परवा काश्मिरी चिकन साठी कापलेल्या कोंबडीची आहेत का ?
आमच्याकडे या प्रकाराला अंडाकरी म्हणतात, अंडे का फंडा नावाचे एक छोटे हॉटेल होते, राज मोटार्सच्या समोर पॉड रोडला, तिथं चिज आम्लेट वुईथ ग्रिन चटणि हा लई भारी प्रकार मिळायचा.
चिकन साठी काचेची भांडि आणि अंड्याला स्टीलची हा भेदभाव पाहुन अंतकरण तळमळले.
पण एकुण पाक्रु मस्त आहे, खास करुन तवंग आलेला रस्सा. चला उद्या हेमंतकडे जातो मिसळ खायला.
11 Mar 2011 - 1:43 pm | वपाडाव
अवांतर : >>>>
ब्येश्ट रे मित्रा....
तुला कसं काय माहीत रे....
अतिअवांतर :: तुझ्या दुकानातुन तिनं गाभण कोंबडी पळवली होती की काय ??
मुद्याला धरुन : आता यवडे ब्येश फटु हात मन्ल्यानं, अंडा करी भारी असंन ना....
11 Mar 2011 - 2:00 pm | ५० फक्त
अरे मला माहित नाही रे, ते व्केश्चनचिन्ह पहा ना रे. हा माझा प्रश्न आहे. तुला कालच रंगांबद्दल खरड टाकली होती कि रे. आता तुला काळ्या रंगात्लं पण दिसेना का रे ?
असो.
----------------------------------------------
आमची कोंबडी चोरीला गेली आहे, सापडल्यास काश्मिरी चिकन करी करुन खा.
क्रुपया अंडा करी साठी अंड्यांची वाट पाहात बसु नये.
11 Mar 2011 - 1:15 pm | स्पंदना
प्र्.का. टा. आ.
11 Mar 2011 - 1:22 pm | मुलूखावेगळी
वा मस्त ग!!!!
ह्या विकांताचा मेन्यु फिक्स ;)
11 Mar 2011 - 1:27 pm | विंजिनेर
एव्हढं सगळं वापरल्यावर सुरणाची भाजी पण चांगली लागते. अंडी वापरायची काय गरजे?
बळचंकर पाकृ. आहे झालं
13 Mar 2011 - 10:52 pm | पंगा
वाटणघाटण हा एक ग्रोसली ओवररेटेड (मराठी?) प्रकार आहे असे आमचेही प्रामाणिक मत* आहे. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" संदर्भ: पु.ल.) असो.
* प्रत्येकालाच एकएक (तरी) असते. आणि ते सहसा वास मारते. हे आमचे एक.
11 Mar 2011 - 1:30 pm | सुहास..
मस्त ..पियुशा करी अंडा करी स्वंयपाक घरी !! ;)
11 Mar 2011 - 2:54 pm | पिंगू
परवा काश्मिरी चिकन आणि आज अंडी.. काय भारी बेत चालू आहेत..
- (फक्त बेत करणारा) पिंगू
12 Mar 2011 - 10:47 pm | पंगा
'आधी कोंबडी, की आधी अंडे' या सनातन प्रश्नाचे उत्तर गवसले!
11 Mar 2011 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार
कधितरी काहीतरी शाकाहारी पण बनवा.
11 Mar 2011 - 4:02 pm | उगा काहितरीच
अंड शाकाहारी का मांसाहारी?
.
.
.
.
.
मी तर शाकाहारी म्हणुन खातो!
11 Mar 2011 - 8:18 pm | अप्पा जोगळेकर
अंडे शाकाहारीच आहे. अग्नेय आशियातल्या कोण्त्याशा देशात फर्टाईल अंडे फोडून बलक्सदॄश जीव तव्यावर ओततात असे कुठेतरी वाचले होते. ते ऑनव्हेज अंडे. आपल्याकडे तशी अंडी मिळतच नाहीत. त्यामुळे बेधडक खाउ शकतोस.
12 Mar 2011 - 11:24 am | सहज
आपल्या जबाबदारीवर खाली दुवा पहावा. उल्टी आल्यास, अन्नावरची वासना उडल्यास स्व:ताशिवाय अन्य कोणाला जबाबदार धरु नका. शाकहार्यांनी व त्यातल्या त्यात अंडी खायचे "धाडस" करणार्या शूर मंडळींनी न बघीतला तर उत्तम!
नॉनव्हेज अंडे!! अप्पांना ('ऑनव्हेज'??)बालूत म्हणायचे असेल. फिलिपाइन्स मधील प्रसिद्ध चविष्ट पदार्थ!
13 Mar 2011 - 4:11 am | पंगा
प्रकार रोचक दिसतोय. कधी खाऊन पाहण्याचा योग आलेला नाही.
कसा लागतो?
(अन्नावरची वासना उडण्याचे कारण समजत नाही. प्राण्याला जिवंतपणी उकळण्यावर कोणाचा आक्षेप असल्यास तो एक वेळ समजू शकतो, पण लहानपणी घरातल्या असंख्य पाळीव पालींपैकी एखाददुसरीने रात्री दिव्याला येणार्या पतंग, चतुर* वगैरे किड्यांना जिवंत पकडून चट्टामट्टा केल्याचे मोहक दृश्य अनेकदा पाहिलेले आहे. आणि दर वेळी त्यानंतर जवळपास लगेचच मिटक्या मारत** जेवलेलोही आहे. त्यामुळे याबद्दल कोणाचे बाकीचे नैतिक आक्षेप काहीही असोत, पण कोणाची त्यामुळे अन्नावरची वासना वगैरे उडण्याचे काही कारण दिसत नाही***.)
* 'चतुर'च म्हणतात ना त्या किड्याला? साधारणपणे एखाद्या काटकीला चार पंख - प्रत्येक बाजूस दोन - फुटल्यासारखा दिसतो. (निदान आमच्या पुणे पिनकोड ४११०३०मध्ये आम्ही तरी म्हणायचो बुवा. बाकी कोणीही काहीही म्हणोत.)
** सहसा आईने बनवलेला आमटीभात वगैरे. आम्ही आमटीभातही मिटक्या मारत खाऊ शकतो. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" संदर्भ: पु. ल.)
*** आमची कशाहीकडे पाहिल्याने कशाहीवरची वासना वगैरे उडत नाही. लहानपणी पुण्याच्या गल्ल्याबोळांत असंख्य कुत्री आणि बांधकामावरची गाढवे पाहून झालेली आहेत.
13 Mar 2011 - 12:23 pm | सहज
हॅ हॅ हॅ आपण अंडी खायचे धाडस करणारे शाकाहारी आहोत असे दाखवायचा क्षीण प्रयत्न!
अंड्याचे बलक (कधी फारसे आवडत नाही तिच ती) बेचव चव आठवत असेल तुम्हालाही. बाकी चिकन अथवा बदक कसे लागते तसे तो जीव. त्यामुळे चिली सॉस किंवा तुमची आवडती चटणी, सॉस बरोबर खाणे.
13 Mar 2011 - 5:03 pm | पियुशा
बाप रे !
किति भयन्कर आहे हि क्लिप !
बर झाल मि शाकाहरि आहे तेच !
:)
13 Mar 2011 - 10:57 pm | पंगा
... रेशीम कसे बनते याचीही कल्पना असेलच. आणि रेशीम (खरे. रेयॉन वगैरे नव्हे. प्युअरसिल्क.) वापरत नसालच.
"सॉसेज (मराठीत: डुकराच्या मांसाची तळलेली भजी. पु.लं.कडून साभार.) आवडणार्या आणि कायद्याबद्दल आदर असणार्या माणसाने दोन्ही गोष्टी कशा बनतात ते पाहू नये" अशा अर्थाची एक इंग्रजी उक्ती ऐकलेली आहे.
13 Mar 2011 - 10:08 pm | पंगा
हॅहॅहॅ तसे काहीही दाखवण्याची गरज नाही हे नमूद करू इच्छितो. बाकी चालू द्या. :)
(बाकी, अंड्याचा बलक विशेषतः अर्धवट शिजललेला अथवा द्रवावस्थेत असतानाची चव बरी लागते; उलटपक्षी, चव नसते ती पांढर्या भागास, असे मत मांडू इच्छितो.)
14 Mar 2011 - 10:54 am | गोगोल
फक्त पिवळ्या भागात कोलेस्टेरॉल खूप असते असे ऐकून आहे.
11 Mar 2011 - 3:26 pm | पियुशा
ओके ओके बनवु कि नक्कि :)
11 Mar 2011 - 3:53 pm | स्पा
झकास...
खमंग......
चविष्ट .............
11 Mar 2011 - 4:58 pm | प्रकाश१११
पियूशा ताई - पर्वा म्हणजे रविवारी मी स्वता आम्लेट करण्याचा प्रयत्न केला होता .
फसला.. आणि हा लाल रस्सा. त्यावर तर्यी सोबत चपाती [पोळी]भाकरी भात
तुम्ही आजकालच्या पोरी म्हणजे मी हैराण ...!
11 Mar 2011 - 8:15 pm | अप्पा जोगळेकर
मस्त हो पियुषा बाई. फोटो तर लय भारी.तोंडाला पाणीच सुटलंय. आमच्या हपिसच्या कँटिन मधे हा एकच पदार्थ धड बनवतात.
14 Mar 2011 - 10:23 am | ५० फक्त
अप्पा, तुझं ऑफिस कुठं आहे सांग येतो एकदा, अंडाकरि खायला.
14 Mar 2011 - 2:43 pm | वपाडाव
दुसरी कामं नाहीत काय हो तुम्हाला?
भिंगर्या लावुन घेतल्या ककाय पायाला?
का निव्वळ हिंडायचं विडा उचल्ला?
12 Mar 2011 - 6:13 am | अभिज्ञ
लसुण पाकळ्या जरा कमी करा हो.
८-९ पाकळ्या ..फार म्हणजे फार होतात.
बाकी रेसिपि कालच करून पाहिली. छान आहे.
अभिज्ञ.
अवांतर : हेच वाटण व अगदी थोडासा गोडा मसाला वापरुन उत्तम मटार उसळ बनते.
12 Mar 2011 - 11:43 am | विनायक बेलापुरे
:)
13 Mar 2011 - 8:31 pm | प्राजु
काय सॉल्लिड रंग आलाय?
खूप सह्हीये पाकृ.
11 Nov 2011 - 12:06 am | राजहंस
मी कालच तुम्ही सांगितल्या प्रमाणे अंडा करी बनवली होती आणि फार उच्च लागत होती, तेलाचा तवंग पण मस्तच जमला होता....म्हणा तेल नेहमीपेक्षा थोडं जास्त टाकल्यावर तवंग येणारच ना ;)...मी फक्त त्यात थोडे तीळ पण भाजून टाकले होते बाकीचं वाटण अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणेच बनवलं.....धन्यवाद !!.....
अजून येत जाऊद्या अश्या छान, चविष्ट पाककृती :)
11 Nov 2011 - 3:36 pm | किचेन
फोटो तर लैइच भारी आलाय.तोंडाला पाणी सुटलाच.आजच करून बघणार आहे! :)
फक्त तर्री जरा जास्त आहे.तेल जरा कमीच टाकेल.
आणि त्यातल्या त्यात लग्न व्ह्यायचं अस वरच्या प्रतिसादावरून वाटतंय.
मग जरा फिगर मेंतैन ठेवा कि.
अवांतर: अंडी उकड्वताना ती फक्त सात मिनिटेच उकडावीत.अन्यथा त्यात्ती पोषक द्रव्ये नाहीशी होतात! अंड्याच्या पिळल्या भागाला बाहेरून ग्रे रंग आला कि समजावे कि अन्द्यातली पोषक द्रव्ये थोड्या फार प्रमाणात वाया गेली आहेत.अंड्याचा पिवळा भाग हा पूर्णपणे पिव्लाच दिसला पहिजे.यासाठी अंडी रस्शात घातल्यावर ती जास्त उकडू नयेत.लगेच gas बंद करावा
11 Nov 2011 - 4:28 pm | वपाडाव
खुपच उद्बोधक सल्ला.....
अंडे हे काळजीपुर्वकच हाताळले पाहिजे ही शिकवण सर्व जनमानसांत रुजविण्याची तुमची चिकाटी मानली... याला खादाड अमितांची पुष्टी मिळाली की मग फत्तेच....
13 Nov 2011 - 3:24 pm | किचेन
खादाड अमित अहे कि उदय?
14 Nov 2011 - 2:59 pm | वपाडाव
खादाड अमिता ह्या मिपावरील न्युट्रिशनिस्ट आहेत....
अन बै, तो उदय अधाशी आहे खादाड नव्हे.....
तुर्तास अभ्यास वाढवा एवढेच सांगु इच्छितो....
13 Nov 2011 - 10:06 am | पियुशा
ए किचेन तै मी शाकाहारी आहे :)
पण मी सोडुन आमच्या घरात नॉन्-वेज सगळे खातात
मला भावी आयुष्यात काही अड्चण येउ नये म्हनुण सग्ळे प्रकार शिकुन घेते आहे
आहे की नै मी गुनाचि पियु ;)
13 Nov 2011 - 3:22 pm | किचेन
शिकून हेतीयेस हे खूप चान करतीयेस.पण अनेकदा अन्नातील पोषक द्रव्ये निघून गेल्यावर आपण काय खातो त्याचा काहीच उपयोग होत नाही.तुला माहित असेल पालक जास्त शिज्ल्वल्यावर त्यातील पोषक द्रव्ये नाहीशे होतात काहीस तसाच आहे हे.
मी हि लहानपणापासून फक्त नोंवेच्ज च खाते पण हे मलाही माहित नव्हत( आमचे हे शेफ आहेत! त्यामुळे अशी उपयोगी माहिती मिळती मिळत असते :)
मिपावर ते कलेलाही लवकरच.
बाकी एवढी प्रक्टिस चालू आहे तर लग्नालाही बोलाव! असाच नोन वेग चा बेत ठेव.मी त्या अळूची भाजी आणि पनिरणी खूप वैतागली आहे बघ.
11 Nov 2011 - 4:29 pm | वपाडाव
* प्रकाटाआ...
11 Nov 2011 - 6:19 pm | किचेन
प्रकाटाआ...
म्हण्जे काय? तुम्ही सगळे फार कोड्यात बोलता बा. काहीच कळत नाही.
11 Nov 2011 - 6:19 pm | किचेन
प्रकाटाआ...
म्हण्जे काय? तुम्ही सगळे फार कोड्यात बोलता बा. काहीच कळत नाही.
11 Nov 2011 - 4:38 pm | मन१
बिचारी कोंबडी........
15 Nov 2011 - 8:22 pm | विजुभाऊ
पियुषा हा पदार्थ मी रैवारी घरी करून पाहिला.
अंड्या ऐवजी उकडलेले बटाटे तळून घेतले.
तसेच थोडासा पुदीना देखील वापरला.
झकास लागला.
ह्या रैवारी मुलांनी बाबाने केलेला पदार्थ चाखला.
धन्यवाद.
16 Nov 2011 - 1:06 pm | वपाडाव
पाकृ वाचुनच बादलीभर लाळ गाळल्या गेली आहे.... बाकी जर इतरांची हरकत नसेल तर हा पदार्थ मी ही करुन काहीन म्हणतो.... ज्यांना आवतन हवं आहे त्यांनी व्यनि करावा.... शीट्स लिमिटेड.....
अवांतर :: झकास म्हणाजे कसा?? नमकीन का झणझणीत....
18 Nov 2011 - 10:18 am | पियुशा
@ व.प्या.
करुन बघ हो ,अन तु केलेल फोटो पण टाक , :)
आम्हाला पण कळन की तु नुसता हवेत गोळीबर करतो ते ;)
अन झकास म्हणजे झन्झनित बर्र.........:)
18 Nov 2011 - 1:09 pm | सूड
वप्या पाकृ करुन फोटो टाकच लेका !! तुला काही मदत लागली तर सांग म्हणणार होतो, पण आम्ही पडलो स्वावलंबी !! तुम्ही रेशिपी आन फोटो डकवा हि रेशिपी स्वहस्ते करण्यात आम्ही धन्यता मानू.
16 Nov 2011 - 12:34 pm | पियुशा
@ विजुभाउ
" आम्ही धन्य जाहलो " ;)