अंडे का फंडा .......
अंडे का फंडा .......
अंडे का फंडा .......
साहित्य :- उकडलेली अंडी ४-५ , कढीपत्ता ,जीर ,मोहरी,हिंग , २ टोमाटो बारीक चिरलेले , मीठ चवीनुसार ,लाल तिखट दीड स्पून ,गरम मसाला १ स्पून.
वाटण :- सुक्या खोबर्याचा कीस १ वाटी,तळलेला कांदा १ वाटी,(कांदा चिरून थोड तेल घालून हलका सोनेरी भाजावा ),
कोथिंबीर ,खसखस (सोनेरी भाजून घ्यावी ) २ चमचे ,लसून ८-९ पाकळी ,आल १/२ इंच बस ..........
वरील सर्व साहित्य मिक्सी मध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यावे
फोडणी :- कढइत ३ चमचे तेल गरम करा ,मोहरी कढीपत्ता घालून तडतडवा,मग जीर आणि हिंग घाला ,खमंग फोडणी बसली कि लगेच लाल तिखट आणि गरम मसाला घाला ,गॅस थोडा बारीक करून वरील वाटण घाला ,पूर्ण पणे छान मिक्स करून घ्या तेल सुटू लागले कि टोमाटो घाला ,४-५ मिनिट मस्त मिक्स होऊ द्या ,मीठ घाला आणि थोड पाणी घाला ,एक उकळी आली कि अंड्याचे काप घाला .गरम गरम ग्रेविवर हिरवी कोथिंबीर घाला
आणि चापा.........................:)


वाचन
13892
प्रतिक्रिया
0