नमस्कार, पाऊस पडून गेला आहे. निसर्गाने हिरवा शालू नेसला आहे. सगळीकडे हिरेवेगार डोळ्याला सुखावणारे चित्र वाटावे असा निसर्ग नटला आहे. नद्या, आपला तीव्र आवेग आवरुन हळुहळु संथ गतीने रमत गमत वाहात आहेत. 'नदीला पुर आलेला, कशी येऊ कशी येऊ ?' असा प्रेमभावनेचा काळ आता सरला आहे. जीवन वास्तवावर आलं आहे, जगण्याची धावळपळ सुरु आहे. शाळा-महाविद्यालयांना सुट्या लागणार आहेत. मिपावर दिवाळी अंकाची लगबग सुरु आहे. मिपावर पाऊस-पाण्यामुळे ऑक्टोबरच्या चालू घडामोडीचा धागा दिसेना तेव्हा, कोणीच पुढाकार घेत नाही म्हटल्यावर गप्प राहील तो मिपाकर कसला म्हणून ऑक्टोबर नोव्हेंबरच्या चालू घडामोडीचा धागा.
आता पावसामुळे पुर पाण्यामुळे शेती वाहुन गेली प्रचंड नुकसान झालं. शेतक-यांचे नुकसान जे व्हायचे ते झालं आहे. सर्वच पक्ष जेव्हा विरोधात असतात तेव्हा, अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली जाते. आणि सत्तेत आलो की ओला दुष्काळ वगैरे काही संकल्पना नसते, असे म्हटल्या जाते. सामाजिक कार्याच्या गटात काम करीत असल्यामुळे एका सहआयुक्ताकडे गेलो होतो. तेव्हा, लक्षात आलं की, महसुल अधिकारी पंचनामे करीत आहेत पण, नुकसान भरपाई देण्याच्या अटी इतक्या आहेत की, भरपाई नको पण कागदपत्रे आवरा अशी वेळ आहे. महाराष्ट्रातील याही विषयावर बोलू काही.
१. कबुतखान्याच्या मुद्यांवरुन जैन मुनी आक्रमक झाले आहेत. शांतीदूत जनकल्याण पक्षाची स्थापना करुन. कबुतराच्या विष्ठेमुळे अनेकांचे खराब झालेले मूत्रपिंड व्यवस्थित झाले आहे. दररोज एक महिन्यापर्यंत पाण्यात कबुतरांची विष्ठा भिजवून सकाळी प्यायल्यास खराब झालेले मूत्रपिंड अगदी व्यवस्थित होते. ( च्यायला, हे वाचून लै ताण झाला. काळ गोबर, शेण, गोमुत्राच असला तरी )
२. कोणत्याही प्राण्यावर अन्याय झाल्यास त्याच्या न्यायासाठी हिंसा करणे हाही धर्म आहे. त्यासाठी शस्त्र उचलावे लागते तर तेही, करु. -जैनमुनी ( हे वाचून कमंडलु घेऊन दीगंबर अवस्थेत, कोणत्या तरी कुंभमेळ्यात निघून जावे असा विचार आला. पण, त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. वैचारिक प्रबोधन सुरु ठेवले पाहिजे हा विचार मनात आला ) संदर्भ लोकसत्ता - दि. १२/१०/२०२५
३. अजून एक बातमी, तालीबानी-सनातनी भाई भाई. :) तर, मिपाकर मित्रहो, दीपावलीच्या शुभेच्छा. लिहिते राहू....!
प्रतिक्रिया
22 Oct 2025 - 3:04 am | स्वधर्म
आयटीआयमध्ये धर्मशास्त्रांचे धडे, पुरोहितांना का वावडे?
24 Oct 2025 - 9:18 am | कंजूस
याबाबत अतृप्त आत्मा नावाचे मिपाकर काय म्हणतात हे विचारले पाहिजे.
आमच्याकडे प्रामाणिकपणाची वानवा आहे. शिवाय कुणाला, कोणत्या संस्थेला मुख्य म्हणायचं. शिवाजी महाराजांनाही राज्याभिषेकांत अनंत अडचणी आल्या. ज्ञानेश्वर आणि बंधुंनाही त्रास झाला. सारस्वत ब्राह्मणांनीही चिडून शेवटी आपले पुरोहित तयार केले. पंचांगांत ही वाद झाला आणि आहेच. राष्ट्रीय पंचांग थोपलेच. ज्याचा काहीही उपयोग नाही.
24 Oct 2025 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कर्नाटकमधील विधानसभा २०२३च्या निवडणुकीदरम्यान अळंद या मतदारसंघात संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून मतदारांची नावे हटविण्याचा प्रयत्न झाला होता आणि यशस्वीरित्या हटविलेल्या प्रत्येक मतासाठी ८० रुपये दिले जात होते, असे कथित मतचोरीप्रकरणी नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सहा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
25 Oct 2025 - 7:14 pm | अभ्या..
भारतीय उद्योगपती आणि एचसीएल चे संस्थापक शिव नाडर यांच्या पत्नी किरण नाडर (ज्या किरण नाडर म्युझियम ऑफ आर्ट च्या संस्थापक आणि चित्र संग्राहक आहेत) यांनी भारतीय वंशाचे (अमिरातीचे नागरिक) प्रसिध्द चित्रकार मकबूल फिदा हुसेन ह्यांचे 'ग्रामयात्रा' नामक अनटायटल्ड चित्र (चित्रसमूह) तब्बल ११८ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
हा लिलाव मार्च महिन्यातच ख्रिस्टीज न्यूयॉर्क ने केलेला होता पण खरेदीदार म्हणून नाडर ह्यांचे नाव आता प्रसिध्द झाले आहे. त्यांचे एक म्युझियम दोहा, कतार येथेही सुरु होणार आहे.
भारतीय वंशाच्या चित्रकारांना त्यांच्या चित्रासाठी मिळालेली ही आत्तापर्यंतची सर्वोच्च रक्कम आहे.
26 Oct 2025 - 9:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण गोबरयुगात अनेक धक्कादायक गोष्टी ऐकत असतो आता त्याचं नवलही वाटत नाही. एखादा देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर, काय करायला पाहिजे तर, त्याचं साधं उत्तर असतं की, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, आणि रोजगाराच्या संधी वाढविल्या पाहिजेत, भ्रष्टाचार कमी करणे आणि देशांतर्गत उद्योगांना प्रोत्साहन देणे वगैरे. आपल्याकडे आपल्या देशाच्या सरकारचे धोरण पाहिले की, आता लाज वाटायला लागते. तरुणांना आपण कुठे घेऊन जात आहोत.
बिहारच्या निवडणूकीत आपले लाडके पंतप्रधान म्हणाले ' इंटरनेट डेटा सस्ता कर दिया जिस वजह बिहार के नौजवान रील बना कर कमाई कर रहा है'' रील्समुळे रोजगार मिळतो अशी येडपट कल्पना कोणाला सुचू शकते. युवकांनी शिक्षण घेतले पाहिजे, आपल्या शिक्षणाला अनुरुप असा रोजगार मिळाला पाहिजे. पण, पंतप्रधान म्हणतात, एक चहाच्या कपाच्या किमतीत एक जीबी डेटा मिळतो, आणि त्यावर रील्स बनवतो. कमाई करतो. रील्स आणि इन्ष्टाग्राम हे रोजगाराचे साधन असू शकते ? म्हणजे युवकांनी शिक्षण घेऊन, वडे तळणे, रील्स करणे, हा शिक्षणाचा हेतू असू शकतो ?.
आपणास अजून एक माहिती असेल की, डिजीटल इंडियाच्या जाहिरातीसाठी सरकारने ''रील्सची स्पर्धा'' आयोजित केली होती. आणि सरकार त्यास वेगवेगळी बक्षीसं देणार होती. अर्थात, वाढत्या मोबाईल व्यसनाने युवापिढी बरबाद होत चालली आहे, अशा वेळी गोबरयुगात अशा मूर्खपणाच्या गोष्टी येतच राहतील.
१. रील्सचं सविस्तर वृत्तांकन २. रील्सस्पर्धा (डीजीटल इंडिया )
-दिलीप बिरुटे
26 Oct 2025 - 5:11 pm | स्वधर्म
सर, आपण सध्याच्या नेतृत्वाबाबत व्हीजन नसलेलं नेतृत्व असे म्हटले आहे पण त्यांचा व्हिजन अगदी स्पष्ट दिसतो:
- संपूर्ण सुशिक्षित मध्यमवर्गीयांची विचार करण्याची शक्ती संपुष्टात आणून त्यांच्या धर्मश्रध्देचा वापर करून आपले शोषण करणार्यांप्रतीच पूर्ण भक्तीभाव निर्माण करणे.
- सर्व लोकांची प्रश्न विचारण्याची क्षमता संपवणे.
- अशा प्रकारे निरूपद्रवीकरण झालेल्या जनतेस किरकोळ रोख पैसे व रेशन देऊन देशाची बहुमूल्य साधनसंपत्ती काही विशिष्ट लोकांकडे जमा करणे
27 Oct 2025 - 2:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नव्या व्हीजनशी सहमती आहेच.
बाकी ते, एल आय सी ने अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला. संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या धोरणांनुसार आणि पुरेशा विचारमंथनानंतरच ही गुंतवणूक करण्यात आली.
कृपया कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. =))
-दिलीप बिरुटे
27 Oct 2025 - 3:57 pm | टर्मीनेटर
अरे वाह... म्हणजे एल.आय.सी. ही स्वायत्त संस्था आहे हे आपल्याला मान्य आहे तर... हे ही नसे थोडके 😀
आता एक(च) प्रश्न माझ्यासाठी अनुत्तरीत राहिलाय त्याचेही उत्तर आपल्याकडून मिळाले तर माझ्या मनुष्य जन्माचे सार्थक झाले असे मी समजेन...
एल.आय.सी. ने स्वतंत्रपणे घेतलेल्या ह्या निर्णयाचा तिच्या (ULIP पॉलिसीज मध्ये) गुंतवणूक करणाऱ्या पॉलिसी धारकांच्या गुंतवणूकीवर सकारात्मक परिणाम झाला की नकारात्मक परिणाम झाला?
म्हणजे त्यांनी निवडलेल्या फंडांच्या NAV (Net Asset Value) मध्ये वृद्धी झाली की घट झाली?
जर वृद्धी झाली असेल तर हा निर्णय योग्य होता आणि जर घट झाली असेल तर हा निर्णय चुकीचा होता असे मानण्यास आपलीही काही हरकत नसावी अशी भाबडी अपेक्षा आहे 😀
काय आहे की माझ्या (मंद)बुद्धीच्या आकलना पलीकडचे हे विषय असल्याने बुद्धिमंतांकडूनच अशा गहन प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा बाळगावी लागते! वो कहते हैं ना..."नाईलाज को क्या इलाज?" 😂
(चोख) उत्तराच्या प्रतीक्षेत असलेला
टर्मीनेटर
27 Oct 2025 - 4:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या आकलनावर मला शंका घ्यायची नाही. पॉलिसीधारकांचा फायदा झाला किंवा झाला नाही हा प्रश्न नाही. सध्या जी राळ उडालेली ती अशी आहे की,
अमेरिकी सरकारी संस्थांकडून लाचखोरी आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे गेल्या वर्षी अदानी उद्योग समूहाला अनेक प्रमुख अमेरिकी आणि युरोपीय बँका कर्ज देण्यास उत्सुक नव्हत्या. या परिस्थितीत या समूहामध्ये केंद्र सरकारच्या पुढाकाराने आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) निधी गुंतवणुकीच्या माध्यमातून वळवण्यात आला, असे वृत्त 'द वॉशिंग्टन पोस्ट'ने प्रसिद्ध केले.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा वित्तीय सेवा विभाग (डीएफएस), तसेच निती आयोगाने याविषयी एलआयसीला गुंतवणुकीचा आग्रही सल्ला दिला, असेही या वृत्तात नमूद केले होत. अदानीच्या कर्जफेडीसाठी ही गुंतवणूक करायला लावली, असा मुख्य आरोप आहे.
-दिलीप बिरुटे
(स्पष्ट )
2 Nov 2025 - 12:40 pm | विवेकपटाईत
ज्या काळात विज्ञान सहित सर्व क्षेत्रात प्रगति होत आहे. त्याला गोबर युग म्हणणे कितपत योग्य आहे. बाकी गेल्या वर्षी 300 कोटींचे गोबर ही आपण विकले.
27 Oct 2025 - 10:35 am | धर्मराजमुटके
२०१४ पासून गोबरयुग चालू झाले मात्र साधारण ११ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी काहिंना अजून त्याची सवय झालेली नाही. ५०-६० वर्षे शेतात उगवलेले काँग्रेस गवत पोटात गेल्याचा हा परीणाम असावा.
काँग्रेस गवत खा नाहीतर शेण खा, आपल्या संसाराचा गाडा आपल्यालाच ओढायचा असतो हे ज्या दिवशी समजेल तो सुदिन.
27 Oct 2025 - 12:51 pm | टर्मीनेटर
You said it...
😂 😂 😂
31 Oct 2025 - 11:26 am | धर्मराजमुटके
काल गुरुवार होता. काल रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने पवई, मुंबई येथे १७ मुलांना ओलीस ठेवले होते. पोलिसांच्या कारवाईत तो मारला गेला. महाराष्ट्र शिक्षण खात्यात त्याने काही संकल्पना राबविल्या होत्या त्याचा मोबदला त्याला मिळत नव्हता म्हणून त्याने हे पाऊल उचलले असे त्याने प्रसारित केलेल्या चित्रफितीत म्हटले होते.
त्याच घटनेसारखा "ए थर्सडॅ' हा यामी गौतम चा चित्रपट हॉटस्टार वर उपलब्ध आहे. यात ती आपल्या शाळेत १६ मुलांना ओलीस ठेवते.
1 Nov 2025 - 8:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टांझानियात निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गडबड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. निकालांनंतर देशात हिंसाचार उफाळला सत्ताधाऱ्यांना तब्बल 98% मतं; निवडणुकीत घोळ झाल्याचे आरोप; देश पेटला, गोळीबारात 700 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी.
बातमी.
-दिलीप बिरुटे
2 Nov 2025 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महाविकास आघाडी आणि मनसेतर्फे मुंबईत फॅशन स्ट्रीट ते मुंबई महापालिका मुख्यालयादरम्यान 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला तुडुंब गर्दी दिसत होती. सदोष मतदारयाद्यांवर आक्षेप घेऊन, दुबार मतदारांची नावे वगळुन मगच निवडणूक घ्या अशी आग्रही मागणी विरोधीपक्षाकडून अर्थात राकॉ (शप) शिवसेना (उबाठा ) मनसे, काँग्रेस आणि इतर महाआघाडीतील पक्षांचे नेते कार्यकर्ते सहभागी होते.
निवडणुकांसाठी कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि कोणत्याही मतदाराने दुबार मतदान करु नये, अशा अद्ययावत मतदान यादी व्हायला हवी ही कोणत्याही निवडणूकीसाठी योग्य मागणी आहे. बोगस मतदार यादी, बोगस मतदान, हे आता टाळता यायला हवे, निवडणूक आयोगाने आपल्या कारभारात सुधारणा करायला पाहिजे.
अशा वेळी, अशीच मागणी करण्याऐवजी भाजपने शनिवारी गिरगाव चौपाटी येथे मूक मोर्चा काढला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पराभवाच्या भितीने हा मोर्चा आणि कट आखला असा आरोप या पक्षाच्या वतीने करण्यात आला. निवडणुका म्हटलं की असं चालायचंच. :)
-दिलीप बिरुटे
2 Nov 2025 - 9:14 pm | कंजूस
दुबार मतदान कसे होते?
>>कोणत्याही मतदाराने दुबार मतदान करु नये, अ>>
म्हणजे तो मतदार एके ठिकाणी मतदान करून आल्यावर बोटावरची शाई पुसून पुन्हा दुसरे एक ओळखपत्र घेऊन दुसरीकडे मतदान करून जातो?
2 Nov 2025 - 10:00 pm | अभ्या..
सिंपल एकदम. कंट्रोल्+टॅब.
ह्या ठिकाणी जे केले तेच दुसर्या ठिकाणी वेगळ्या नावाने जाऊन करायचे.
.
आता प्रोसेस म्हणले तर काहीजण पक्षासाठी करतात, काही पैशासाठी तर काही फक्त किडा म्हणून करतात म्हणे.
तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे?
2 Nov 2025 - 11:26 pm | कंजूस
म्हणजे ..
१. शाई सहज पुसता येते,
२. दोन वेगवेगळ्या नावाची ओळखपत्रे त्यांच्याकडे असतात,
३. वय आणि पुरुष/ स्त्री जमते. फोटोही जमतो.
3 Nov 2025 - 12:15 am | आग्या१९९०
दुबार मतदान कसे होते हे निवडणूक आयोगाला माहिती आहे. त्यामुळे मतदानाचे बूथ लेव्हलवरील व्हिडिओ फुटेज देत नाहीत.
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे तपशील बारकाईने बघितले जात नाहीत. डुप्लिकेट ओळखपत्र सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतदार बाहेरून आणले जातात. दुबार मतदान दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी केल्यामुळे बोटावरील शाईचा प्रश्नच उद्भवत नाही.
3 Nov 2025 - 5:36 am | सुक्या
कुठल्याच बूथवर ओळखपत्राचे तपशील बारकाईने बघितले जात नाहीत. डुप्लिकेट ओळखपत्र सहज उपलब्ध करून दिले जाते आणि मतदार बाहेरून आणले जातात.कै च्या कै ...
3 Nov 2025 - 7:34 am | शाम भागवत
गावाकडचा माणूस नोकरी धंद्या निमित्त शहरात स्थाईक होतो. तिथे त्याचे नाव मतदार यादीत नोंदवले जाते पण गावच्या मतदार यादीतून काढले जात नाही. त्याचे गावात येणे जाणे असते. अनेक फेऱ्यांमधे मतदान व्हायला लागल्यानंतर हा प्रकार वाढला आहे. शहरातल्या ठिकाणचे मतदान व गावातले मतदान यात काही दिवसांचा फरक असू शकतो व दोन्ही ठिकाणी मतदान करता येते. याचा फायदा सर्वच पक्षांना होतो. याव्यतिरिक्त अनेक प्रकार असले तरी हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात चालतो. कारण सर्व कागदपत्रे वैध असतात. यासाठी भारतातील नागरिकांना एनआरसीच्या माध्यमातून ओळखपत्र दिले पाहिजे तरच हा प्रकार थांबेल. किंवा एकाच फेरीत सर्व मतदान पूर्ण करायचे. पण सुरक्षित निवडणुका हा मुद्दा जास्त महत्वाचा ठरतो.
3 Nov 2025 - 4:27 pm | स्वधर्म
एकाच फेरीत सर्व मतदान करायचे हे अगदी बरोबर आहे. पण ते सोईनुसारच ठरते. उदा. मागच्या विधानसभा निवडणुकीत माझ्या आठवणीप्रमाणे महाराष्ट्रात ५ टप्प्यांत मतदान घेतले गेले. त्याला सर्व विरोधी पक्षांनी विरोध केला होता पण सत्ताधारी पक्ष व निवडणूक आयोगाने एक किंवा फार तर दोन टप्प्यांत मतदान घेण्याची मागणी धुडकावून ते पाचच टप्प्यांत घेतले.
3 Nov 2025 - 10:52 pm | अभ्या..
ई एपिक कार्ड, क्यु आर कोडेड, नॉन एडिटेड, डीजिटलाइझ्ड असे निवडणूक आयोगानेच कॅम्पेन बिम्पेन करुन राबवले होते ना? त्या कार्डाचे काय करायचे मग?
पक्षीय अजेंडे रेटण्यापेक्षा काम निवडणुकीचे आहे तर त्यानीच (आयोगाने) निर्दोष यंत्रणा तयार करून निर्दोषपणे राबवणे अपेक्षित आहे. बजेट बिजेट, ऑडिट सारख्या चिल्लर बाबी सुद्धा आयोगाच्या आड येत नाहीत मग काय प्रॉब्लेम आहे?
4 Nov 2025 - 10:07 am | शाम भागवत
परत एखादा शेषन येण्याची मी वाट पहातोय.
😀
3 Nov 2025 - 6:13 pm | कंजूस
"दुबार मतदान करणारे दिसले की त्यांना फटकवा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या" - राज ठाकरे. मतदान खोलीत यादीतले नाव व ओळखपत्र आणि फोटो पडताळणी करतात आणि त्यांचे समाधान झाल्यावर मतदार मतदानासाठीच्या यंत्राकडे जातो.
१. तो दुबारी आहे हे कसे कळते?
२. त्या खोलीत फक्त अधिकृत व्यक्तीच असतात. मग दुबाऱ्याला फटकावणारे कुठे असणार? तर ते त्या इमारतीच्या बाहेर असणार.
३. समजा ओळखपत्रवाला मतदार आणि त्याचे यादीतील नाव, फोटो यांची गल्लत तिथल्या आयोगाच्या अधिकाऱ्यास संशयास्पद वाटली तर त्याला ते तिथल्या पोलिसांकडे देणार आणि ते त्याला त्यांच्या गाडीत घालून नेणार. फटकावणाऱ्यांना चान्स केव्हा मिळणार?
टाळ्या घेण्याचे भाषण ठीक आहे पण पटणारे असावेत मुद्दे.
3 Nov 2025 - 5:32 pm | विजुभाऊ
पाकिस्तानने हायपरसॉनिक मिसाईलची टेस्ट केली अशी वदंता आहे. ख्वाजा आसीफ ला विचारले तर तो म्हणाला चार लोकांत याबद्दल बोलता येणार नाही.
3 Nov 2025 - 6:19 pm | कंजूस
आता हे सर्व मतदान यंत्रावरचा संशय, याद्यांतला घोळ व्यक्त होऊन नंतरही विरोधक निवडून आले तर .....
निवडणूक आयोगावरचा अढळ विश्वास व्यक्त करणार.
लोकशाही वाचली म्हणणार.
झाले गेले विसरून जाणार .
पेढे वाटणार.
3 Nov 2025 - 6:56 pm | रात्रीचे चांदणे
भाजपा जिंकला तर सर्व खापर मतदार याद्या वर फोडलं जाईल आणि नेत्यांना वाचवले जाईल. पुढल्या निवडणुकीला कदाचित वेगळा मुद्दा शोधला जाईल.
4 Nov 2025 - 1:36 pm | चंद्रसूर्यकुमार
आणि या सगळ्या भानगडीत मुंबईत अॅक्वा लाईन सुरू झाल्यानंतर लोकांचा किती वेळ वाचत आहे आणि किती सोय झाली आहे ते पाहता महाभकास आघाडीच्या सरकारच्या काळात स्वतःचा इगो जपायला (आणि कदाचित आणखी काही... सूज्ञांस सांगणे न लागे) मेट्रोच्या कामात मोडता घालून मेट्रो यायला २-३ वर्षे उशीर लावला आणि काहीशे कोटींनी खर्च वाढला हे लोकांच्या चांगलेच लक्षात यायला लागले आहे. जसे मुल्लामौलवी संकटात आल्यावर इस्लाम खतरेमेची बांग दिली जाते त्याप्रमाणे महापालिका निवडणुक जवळ आल्यावर मराठी खतरेमेची बांग देऊन निवडणुक जिंकायचा प्रयत्न हा परिवार नेहमी करत आलेला आहे. इतकी वर्षे ते चालून गेले पण आता तसे व्हायची शक्यता फारच कमी. एक तर मुंबईत अर्ध्याहून जास्त लोक हातावर पोट असलेले आहेत. त्यांना असल्या बाण्याबिण्याची अजिबात काहीही पडलेली नसते असे म्हणायला जागा आहे आणि त्या परिवाराने आपल्याला इतकी वर्षे फसवून आपली मतांची झोळी भरून घेतली हे पण लोकांना आता कळत नाही असे अजिबात नाही. म्हणे अॅनाकोंडा मुंबईला गिळायला आलाय. घंटा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार या बांगेवर त्यांची तिसरी पिढी राजकारण करत आहे. लोकांना काय मूर्ख समजलेत का हे स्वयंघोषित मराठी बाणावाले?
मेट्रो सुरू झाल्यामुळे आपला अधिक मोठा पराभव होणार आहे हे त्यांच्या कदाचित लक्षात आले आहे म्हणून अटकपूर्व जामिन असतो त्याप्रमाणे पराभवपूर्व सबब त्यांनी मतदारयाद्यातील घोळ या आरोपाच्या रूपात आधीच तयार ठेवली आहे असे दिसते. म्हणजे आपण हरल्यावर मतदारयादीत घोळ होते म्हणून हरलो हे म्हणायची सबब तयार ठेवली आहे. पण दीड वर्षापूर्वी मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागा त्यांनीच जिंकल्या होत्या आणि पाचवी जागा पण केवळ ४८ मतांनी गमावली होती तेव्हा त्याच मतदारयाद्या होत्या ना? तेव्हा नाही ते आठवले हे सगळे आरोप? मुळात एक गोष्ट कळत नाही- हल्ली ईव्हीएम हॅक करता येत नाहीत का? कारण इतकी वर्षे ईव्हीएमच्या नावाने शिमगा चालू होता तो अचानक मतदारयाद्यांपर्यंत कसा काय गेला?
तात्पर्य हे की या असल्या फालतू बाणावाल्या लोकांना फाट्यावर मारावे. इकडे त्या पेंग्विनसेनेचे अगदी हिरीरीने समर्थन करणारे जवळपास सगळे सदस्य मुंबईबाहेरचे आहेत. मुंबईत राहणार्या आणि/किंवा कामानिमित्त ठाणे किंवा इतर ठिकाणांहून मुंबईला दररोज जा-ये करणार्या लोकांना किते त्रास होतो आणि त्यांना मेट्रोमुळे किती फायदा झाला आहे याची किंचीतशीही कल्पना त्यांना नाही. असो. मला काय करायचे आहे? परत निकाल लागल्यावर तेच लोक ईव्हीएम, मतदारयाद्या म्हणत आरडाओरडा करणार आहेतच याची खात्री आहे.
4 Nov 2025 - 8:08 pm | सुबोध खरे
Mumbai Metro Aqua Line 3 records 38.6 lakh passengers in October
म्हण्जे सरासरी दिड लाख लोक रोज यातुन प्रवास करत होते. या लोकाना महा भकास आघाडीने आपला अहम कुरवाळण्या साठी अडीच वर्षे त्रास भोगायला लावला.
आता सुद्धा केवळ याच लोकांचे हाल कमी झाले असे नाही तर ओला उबर टॅक्सी वाले यांचे भाडे नाकारणे, बुक केलेली ट्रिप कॅन्सल करणे हे करणे नक्कीच कमी झाले आहे
कारण मेट्रोने जाणारे लोक बरेचसे ओला उबरने पण जात होते.
त्यामुळे त्यांचे प्रवासी कमी झाल्यावर त्यांचा माज पण कमी झाला आहे.
याशिवाय रस्त्यावरची गर्दी कमी झाली. प्रदूषण सुद्धा नक्की कमी झाले आहे. रस्त्यावर होणारे ट्राफिक जॅम जाणवण्याइतके कमी झाले आहेत.
जनतेच्या त्रासाचा तळतळाट आहे भकास आघाडीला निदान मुंबईत तरी नक्की भोवणार आहे अशीच चिन्हे आहेत.
हे कशासाठी तर २३०० झाडांसाठी?
पर्यावरण वादी किती टोकाला जाऊ शकतात आणि आपला इगो कुरवाळण्यासाठी आणि विरोधासाठी विरोध करणाऱ्या महाभकास आघाडी पण किती टोकाला जाऊ शकतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.
4 Nov 2025 - 12:19 pm | कंजूस
दुबार नावे असलेले मतदार हजारो आहेत, ते सर्व काय शाई पुसून परत मतदानाला जाण्याएवढे चलाख आहेत?
5 Nov 2025 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतीय राज्यघटनेतील कलम ३२४ हे भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे, निवडणूकांमधील त्रुटी दूर करणे आणि देशातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडल्या गेल्या पाहिजेत ही त्यांची जवाबदारी आहे. गेले काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या अनेक चमत्कारीक सुरस कथा सामान्य नागरिकांपासून ते मा.सर्वोच्च न्यायालयाने ऐकल्या. विरोधी पक्ष निवडणूक याद्यांवर आक्षेप घेत आहे, त्यावर निवडणूक आयोगाने उत्तर देण्याऐवजी भाजप पक्ष उत्तरं देत आहे, सगळं गमतीशीर सुरु आहे.
''तुळजापूर येथील एका मतदार नोंदणी अधिका-याने एफाआयआर दाखल करुन सांगितले की, २ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान हजार बनावट अर्ज आले, ज्यात आधार कार्डचे फोटो समान पण नावे वेगळी होती, हे बनावट मतदार निवडणूक़ आयोगाच्या अधिकृत अॅपचा वापर करुन जोडले गेले. दुबार नावे, एकाच पत्त्यावर अनेक नावे, अस्तित्वात नसलेल्या घरात नावे नोंदवणे, वयाच्या तपशिलातील चुका अशा विविध त्रुटी आयोगाच्या निदर्शनास आणल्या गेल्या''. ( कतृत्वशून्य भाजपची मतचोरी. लेखातून साभार )
आता हे सगळे घोळ करुन मतदार यादीत घुसलेले बोगस मतदार बोगस मतदान कसे करतात, किती करतात हा संशोधनाचा विषय आहे, फार कमी फरकाने विजयी झालेल्या उमेदवारांना आणि पराभूत झालेल्या उमेदवारांना अशा बोगस मतदानाचा फटका बसलेला असणार, ही पद्धत काम कशी करते त्यावर निवडणूक आयोगाने काम करायला हवं. मतदान केंद्रात प्रवेश करणारे बोगस मतदार, मतदान केंद्र म्हणजे आपलंच घर समजून वाटेल तसे मतदान करवून घेणे, या सर्व त्रुटी दूर करणे गरजेचे आहे, यात काही वाद नाही. सद्य सरकारमधील नेत्याच्या सेल्फगोल पुरेसा बोलका आहे.
-दिलीप बिरुटे
5 Nov 2025 - 11:49 am | सुबोध खरे
बरं मग?
5 Nov 2025 - 2:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय नै, गोबरकाळात हे असं चालायचंच म्हणून सोडून द्यायचं.
-दिलीप बिरूटे
5 Nov 2025 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निवडणूकीत झालेले गोंधळ भाग सुरुच आहेत. आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्राझीलच्या महिलेने हरियाणात बावीस वेळा दहा वेगवेगळ्या मतदान केंद्रावर मतदान केला, असा आरोप केला आहे. ( दुवा ) निवडणूकीतला गोंधळ काही संपत नाही. दररोजच्या दररोज नवीन सुरस चमत्कारिक कथा बाहेर येत आहेत. ब्राझीलमधील मॉडेल हरियाणात मतदान केंद्रात इतक्या वेळा मतदान करते ? निवडणूक आयोग काय खुलासा करते त्याची उत्सुकता लागली आहे.
दुसरी बातमी, प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी माजी राज्यपाल, न्यायव्यवस्था, आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर टीका केली त्या कारणाने एका तक्रारदाराने तक्रार केली की, त्यांच्या विधानामुळे न्यायव्यवस्थेचा अपमान झाला आहे, न्यायव्यवस्थेविषयी अविश्वास निर्माण झाला आहे, त्यामुळे असीम सरोदे यांचे वक्तव्य अशोभनीय आहे, त्यांनी माफी मागावी परंतु अॅड. असीम सरोदे यांनी माफी मागण्यास नकार दिला तेव्हा, बार काउन्सीलने वकीलांनी 'वकिल न्यायिक अधिकारी' असतो न्यायव्यवस्थेविषयी बोलतांना संयम ठेवला पाहिजे असे समितीने म्हटले आहे. 'राज्यपाल फालतू आहेत, न्यायालय सरकारच्या दबावाखाली काम करते' अशी टीका त्यांनी केली होती. तीन महिन्यांसाठी त्यांची सनद रद्द करण्यात आली आहे.
अगं धाव आई, ठाई ठाई दैत्य मातला,
अन संपु देत काळ दुष्ट बंधनातला
-दिलीप बिरुटे
5 Nov 2025 - 3:48 pm | अभ्या..
बार काउन्सीलने वकीलांनी 'वकिल न्यायिक अधिकारी' असतो न्यायव्यवस्थेविषयी बोलतांना संयम ठेवला पाहिजे असे समितीने म्हटले आहे.अरे वा. फारच संयमाची आणि न्यायव्यवस्थेची काळजी ब्वा बार काउन्सिल ला.
एका माथेफिरु वकिलानेच सर्वोच्च न्यायाधीशांवर बूट फेकून मारला आणि त्यावर परत जातीयवादी प्रचंड हिणकस टीका न्यायाधीशावरच सोशल मिडीयाद्वारे केली गेली तेंव्हा बार काउन्सिल गप्प होते काय? त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केल्याची माहीती नाहिये.
का वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या बार काउन्सिलची भुमिका आणि न्याय वेगवेगळा असतो काय?
5 Nov 2025 - 7:19 pm | कंजूस
हा पक्षपात चालवून का घेतात?
5 Nov 2025 - 4:12 pm | आग्या१९९०
मॉडेल चॉइस छान आहे.
5 Nov 2025 - 7:21 pm | कंजूस
मतदार याद्यांवर खुणा केलेले कागद आणून दाखवावेत आणि ती निवडणूक रद्दच करायचा अर्ज करावा.
5 Nov 2025 - 8:11 pm | स्वधर्म
सर तुंम्हाला रा गा यांच्या आरोपात अजिबात तथ्य वाटत नाही का?
निवडणूक आयोग पूर्ण पणे निष्पक्षपातीपणे काम करत आहे असे आपणांस वाटते का?
6 Nov 2025 - 5:30 am | शाम भागवत
२०२९ च्या लोकसभा निवडणूकीपर्यंत रागा पाहिजेतच. आणि महाराष्ट्रात उठा.
:)
6 Nov 2025 - 7:38 am | कंजूस
आरोप वेगळे आणि कोर्टाचे खटले करायचे तर पुरावे आणावे लागतील. रागा भाषणात बोलले आणि टाळ्या वाजवल्या झाले काम.
6 Nov 2025 - 10:41 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कंजूस काका, 'भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या संगनमताने तब्बल २५ लाख बनावट मते तयार करून हरियाणा विधानसभा निवडणूक जिंकली,' असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. 'भारतीय लोकशाहीची हत्या' करण्यासाठी विकसित केलेली ही 'मतचोरी' ची पद्धत बिहार विधानसभा निवडणुकीतही वापरली जाईल, असा दावाही राहुल यांनी केला.
निवडणूक आयोग म्हणाले की, या सर्व प्रकरणात कॉंग्रेस ने आक्षेप का नोंदवले नाहीत. मतदान केंद्रांवरील काँग्रेसचे प्रतिनिधी काय करीत होते, असा प्रश्न करून हे आरोप निराधार असल्याचे आयोग म्हणाले.
मात्र, दुबार नोंद असलेले मतदार आणि मतदारांची यादी अद्ययावत करणे आवश्यकही आहे, असेही 'चुना आयोग' म्हणायला विसरले नाही.
सध्या महानगर पालिका नगर पंचायत निवडणुकीच्या याद्यामधे असंख्य घोळ झाल्याची अनेक तक्रारी वेगवेगळे कार्यकर्ते पक्ष आणि सामान्य नागरिकांनी जिल्हाधिकारी ( निवडणूक निर्णय अधिका-यांकडे केली ) पण आता याद्यामधे बदल करता येणार नाही असे त्यांनी सांगितले. काल उच्च न्यायालयातही चार याचिका आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही असे उच्च न्यायालय म्हणाले.
याद्या अद्ययावत होणे, चुकीची दुबार मतदार नोंद होणे यावरील आक्षेप पूर्ण न होता निवडणूक आयोग आपल्या चुकांचं खापर कोंग्रेसवर फोडणार असेल तर या पेक्षा देशाचं दुर्दैव काय ?
-दिलीप बिरुटे
6 Nov 2025 - 6:52 pm | कंजूस
बिरुटे सर तुमचं म्हणणं पटलं आहे पण...
सरकारवर धार धरून भाषणं ठोकल्याने विरोधकांची भूमिका राहुल गांधी चांगली निभावत असले तरी जेव्हा निवडणूक आयोगावर आरोप करतात तेव्हा एका अंमलबजावणी खात्यावरचे आरोप असतात त्यासाठी ठराविक मुदतीत भक्कम पुरावे द्यावे लागतात. तिथे यांचे टाइमिंग चुकते. किंवा त्यांना माहिती देणारे उशिर करतात किंवा चुकीची माहिती देतात. हल्लीच एक आरोप केला त्या ब्राझिलच्या महिलेचे नाव सांगून मोकळे झाले तिचे नाव ते नाहीच. तिच्या फोटोग्राफरचे नाव आहे ते.
राहुल गांधीं न डगमगता विरोध चालू ठेवत आहेत आणि लोकशाही जिवंत ठेवत आहेत.
6 Nov 2025 - 10:29 am | सुबोध खरे
पप्पू बेफाम काहीतरी बोलतो मग माफी मागावी लागते पण सुधारण्याचे नाव काही घेत नाही.
Rahul Gandhi ‘unconditionally apologises’ to apex court for wrongly attributing ‘chowkidar’ remark to it
In his affidavit, Mr. Gandhi, through advocate Sunil Fernandes, urged that the court may “graciously be pleased to accept the instant affidavit and close the present contempt proceedings”.
गम्मत म्हणजे केवळ श्री मोदींचा द्वेष म्हणून येथे पण काही लोक त्याच्या भंपक वक्तव्याला सत्य मानून टाहो फोडत राहतात.
सुज्ञ मिपाकर आता याला कंटाळले आहेत त्यामुळे याचा प्रतिवाद सुद्धा करत नाहीत.
खरं तर बरेच मिपाकर आता यामुळे मिपावर येईनासे झाले आहेत.
हॉटेलात आलेली माणसं -- याच्या खाली मी गेल्या कित्येक दिवसात १० माणसं काही आलेली पाहिली नाहीत.
चालू द्या
6 Nov 2025 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> मोदींचा द्वेष म्हणून येथे पण काही लोक त्याच्या भंपक वक्तव्याला सत्य मानून टाहो फोडत राहतात.
जाऊ द्या डॉक्टर काका आपण त्यांचं घर उन्हात बांधू. आपण आपल्या त्या अनपढ़ माणसाचा आणि त्याच्या पक्षाचा प्रचार करुन आपल्या 'भक्तीचा' परिचय करुन दिलाच पाहिजे असे स्पष्ट मत आहे. ;)
-दिलीप बिरूटे
6 Nov 2025 - 10:55 am | सुबोध खरे
बिरुटे मास्तर
तुमचा कुंथणं चालू द्या.
तुमच्या प्रतिसादांचा प्रतिवाद सहज करता येईल
पण तुमचं चालूच द्या
6 Nov 2025 - 5:55 pm | अभ्या..
झोरान ममदानी हा भारतीय वंशाचा मुस्लीम युवक न्यूयोर्क चा महापौर म्हणून निवडून आला.
ट्रंपच्या रिपब्लिकन उमेदवाराच्या विरोधात एक डेमोक्रॅटिक सोशालिस्ट उमेदवार म्हणून त्याने हे यश मिळवले आहे.
आपल्या शत्रुचा शत्रू तो मित्र ह्या नात्याने तरी झोरानचे अभिनंदन व्ह्ययला हवे.
न्यूयोर्क सारख्या अमेरिकेतील सर्वाधिक महत्त्वाच्या शहराचे महापौरपद तेही अफाट पैसा, सत्ता, वर्णविद्वेष, धर्मविद्वेष, अनुभव हे सर्व विरोधात असताना ममदानीने मिळवलेले यश उल्लेखनीयच आहे.
अमेरिकेतील हिंदू समाजानेही बदल ओळखून त्याला पाठिंबा दिला व विजयानंतर सत्कारही केला आहे. त्याची आई मीरा नायर ही बॉलीवूडची प्रसिध्द दिग्दर्शिका आहे आणि वडील महमूद ममदानी भारतीय वंशाचे गुजराती खोजा मुस्लीम असून युगांडाला लहानपणीच स्थलांतरीत झालेले आहेत.
6 Nov 2025 - 6:43 pm | कंजूस
भारतीय वंशाचे विशेषण( आपणच, आपले पत्रकार आणि पेपर चानेलवाले डंका वाजवतात ) लावले गेलेल्या अमेरिकनांनी भारताला नेहमीच टाळले आहे हे विसरता कामा नये. ते लोक तिकडच्याच पुंग्या वाजवतात. नैतर त्यांनाच भारी पडेल हे ते लक्षात ठेवतात.
6 Nov 2025 - 6:59 pm | अभ्या..
म्हणजे काय करायचे?
असा प्रतिसाद लिहायचा नाही का? का विशेषण लावायचे नाही?
न्यूयॉर्क चा महापौर झालाय म्हणजे तो काही पिंची महापालिकेत बसणार नाहीये तेंव्हा अपेक्षा नाहीचेत काही तर काय करायला पाहिजे तूर्तास?
6 Nov 2025 - 8:48 pm | कंजूस
हंहंहं. प्रतिसाद लिहायचा हो.
6 Nov 2025 - 6:57 pm | रात्रीचे चांदणे
सध्यातरी ट्रम्पच्या पार्टी पेक्षा विरोधी पार्टी चांगली असेल म्हणावं लागेल.
ट्रम्प चा कांय भरवसा नाही. आज त्यानं ८ विमान पडली म्हणून सांगितलं.
6 Nov 2025 - 6:57 pm | कंजूस
अंजली दमानिया यांनी हल्लीच पार्थ पवारांचे जमीन अधिग्रहण प्रकरण उजेडात आणले आहे.
हे प्रकरण महायुतीच्या जहाजालाच मोठे भोक पाडण्यास कारणीभूत होऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची यावर स्पष्टीकरण देण्यात चांगलीच तारांबळ उडताना दिसते.
अजित पवार साहेब not reachable.
6 Nov 2025 - 9:21 pm | रामचंद्र
सत्तर हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा आपणच आरोप करून एखाद्या व्यक्तीला आपल्याच मंत्रीमंडळात थेट उपमुख्यमंत्रीपद दिलं जात असेल तर अठराशे कोटींचा कथित गैरव्यवहार करणाऱ्या होतकरू तरुणाला क्लीन चिट देणं अभ्यासू, तडफदार नेत्याला काय कठीण आहे?
6 Nov 2025 - 7:13 pm | धर्मराजमुटके
झोरान ममदानीचे अभिनंदन !
मात्र त्याच्यात भारतीय वंश तितकाच शिल्लक राहिला असेल जितका होमिओपॅथी औषधात औषधी गुण !
6 Nov 2025 - 7:39 pm | अभ्या..
आई आणि वडील दोघेही भारतीय वंशाचे असतील तर १०० टक्के शिल्लक असणार भारतीय वंश.
खोजा मुस्लीम पर्शियातून १९ व्या शतकात आले ही वस्तूस्थिती गृहित धरता ओरिजिनल भारतीय वंश असण्याला कीती शतकाची व्हॅलिडीटी ग्राह्य धरायची हा चर्चेचा विषय होऊ शकतो पण गुण मात्र वरिजिनल भारतीय राहिले नसतील. कदाचित हि तुलना ओरिजिनल आयुर्वेद आणि पतंजली उत्पादने इतकी असेल.
6 Nov 2025 - 7:42 pm | धर्मराजमुटके
तेच म्हणायचं आहे. ढवळ्या शेजारी पवळया बांधला. वाण आणी गुण देखील गेला.
6 Nov 2025 - 8:55 pm | कंजूस
होमिओपॅथी शोधणाऱ्या जर्मन डाक्टरास प्रणाम.
सामान्य आजारपण निवारण्यात फारच साथ दिली होमिओपॅथीने.