कृष्ण पाडवांच्या विंनती नूसार हस्तिनापूरला दुर्योधनासमोर पांडवांचा संधी प्रस्ताव घेऊ निघाले होते... त्यांच्या सारथी दारुक कृष्णाला विचार मग्न पाहून विचारतो की "महाराज, आपण दुखी आहात की आनंदी हे आपल्या चेह-याकडे पाहून मला समजले नाही कृपया आपण स्वतःच सांगा"
"सारथी दारुक!
तो बघ अस्ताला चालेला सुर्य !
प्रभात काळी तो विजेता असतो.. एकदम तेजस्वी...व जेव्हा अस्ताला चालेला असतो तेव्हा देखील तो अक्राळस्तेपणा न करता धीर गंभीर पणे.. शांत... रक्तमय लालीमा अंगावर खेळवत... आपला पराजय खुल्या मनाने स्वीकारत.... पुन्हा लढण्याची... उद्या उगवण्याची तयारी करत चाललेला असतो ! ह्याच पध्दतीने कधी मानव आपला पराभव स्वीकार खुल्या मनाने करु शकेल ?..... संधी वार्ता मी करण्यासाठी चाललो आहे पण त्या दुर्योधनाकडे अशी सुर्यासारखी तेजमय प्रतिभा नाही आहे.. ना आपला विजय व पराजय पचवण्याची ताकत ! काय होईल तेथे हे मला माहीत आहे पण समाज म्हणेल की मुरलीमनोहर ने अटळ युध्द टाळण्यासाठी एकदाही प्रयत्न केला नाही... हे लांच्छन मला नको आहे म्हणून मी तेथे जात आहे !
एक राजा, सम्राट... पुत्रप्रेमाने अंधळा होऊन.. लहान भावाच्या मुलांचे हक्क नाकारतो आहे.... एक पितामहा तो व्यक्तीशी नाही तर त्या हस्तिनापूर च्या सिहासनाशी प्रतिबध्द आहे... दुर्योधन, कर्ण व शकुनी आपल्या कपटी व धुर्त कार्यात मग्न आहेत व पांडवाना समुळ नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत... पांडव आपले राज्य मिळवणे व प्रतिष्ठा पुनः संपादीत करणे ह्याची तयारी करत आहे... द्रोपदीला झालेल्या अपमानाचा बदला हवा आहे... तर भिम आपल्या शक्तीचे प्रदर्शन करुन दुर्योधनाचा वध करुन द्रोपदीचा बद्ला पुर्ण करु इच्छीत आहे.. युध्द अटळ आहे .. कोण कोणाच्या बाजूने लढणार हे देखील स्पष्ट आहे... पण तरी ही एक निकराचा प्रयत्न म्हणून ही संधीवार्ता!
चल येथे थांबून आपण विश्राम घेऊ ! "
हस्तिनापूरचे सभागृहामध्ये दुर्योधनाने जशी शंका होती त्याच प्रमाणे पांडवाचा संधी प्रस्ताव नाकारला व उलट एक सुईच्या टोका येवढी सुध्दा जमीन देखील देणार नाही त्यांना जर राज्य हवे असेल तर त्यांनी दे युध्दभुमी वर जिंकावे असा सल्ला देखील दिला तेव्हा कृष्ण म्हणाले " पितामह, मी माझा प्रयत्न निकराने केला, पण हा बालक बुध्दी दुर्योधन व त्यांचे साथी मी काय सांगायचा प्रयत्न करत होतो तेच समजवून घेत नाही आहेत... विनाश हा विनाकारण केलेल्या हट्टामुळेच होतो.... युध्द लवकरच सुरु होईल व संपेल ही लवकर पण.. त्या युध्दानंतर ह्या राज्यात असे एक ही घर नसेल ज्या घरातून मृत्युचा प्रवेश झालेला नसेल... ! अजून ही वेळ आहे, तुम्ही हस्तक्षेप करा, समजवा दुर्योधनाला.. त्यांने केलेल्या प्रत्येक अपराधाला क्षमादान पांडव देत आहे... कोणाला माहीत नाही की ह्यांने पांडवांना मारण्यासाठी लहानपणा पासून नेहमी प्रयत्न केले.. छल करुन जुगारामध्ये हरवले.. राज्य हिसकावून घेतले.. त्यांच्या पत्नीचा भर सभेत अपमान केला.. त्यांना १३ वर्ष चा वनवास दिला तरी ही पांडव झाले गेलेले सर्व विसरुन ह्याला क्षमा देत आहेत हे तुम्ही ह्याला समजवा.. आजची रात्र मी येथे आहे उद्या सकाळी मी निघेन येथून पण ... अजून वेळ गेली नाही प्रयत्न करा ! "
सारथीने पाहीले की महाराजांच्या चेह-यावर अजूनही काहीच बदल घडलेला नव्हता... जसे येथे येताना स्मित हास्य ह्यांच्या चेह-यावर होते ...तसेच हास्य येथून परत जाताना ही आहे ?... येणारा काळ ह्यांना दिसत असावा.. हे विचार चक्र चालू असतानाच कृष्ण म्हणाले " सारथी दारुक, जेव्हा काळ येतो तेव्हा मानवाची बुध्दी भ्रष्ट होते.. असेच काहीतरी दुर्योधनाबरोबर देखील घडत आहे, त्याला कळत नाही आहे की काय करावे, मुर्खासारखा तो फक्त युध्दाचा जाप करत आहे.. जे होईल ते आपण फक्त पहात राहणे ईतकेच आपल्या हाती आहे. चल जलद चल पांडवाना हे कळवणे महत्वाचे आहे की युध्दाची वेळ आली आहे कौरव वंश समाप्त होण्याच्या मार्गावर आला आहे "
कृष्ण विश्राम घेत होते तेव्हा थोड्या वेळाने दुर्योधन त्याच्या डोक्याजवळ येऊन बसला व अर्जुन त्यांच्या पायाशी येऊन बसला .... जसे कृष्णाने डोळे उघडले तसे त्यांनी प्रथम अर्जुनाला पाहीले व विचारले " अर्जुन तु अधी आलास ? " तोच दुर्योधन म्हणाला " वासुदेव, प्रथम मी आलो आहे व तुमच्या कृपेचा प्रथम मानकरी मी असावयाला हवे " तेव्हा कृष्ण म्हणाले " ह्म्म, अरे अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे तेव्हा प्रथम तो मागेल व मग तुझी मागणी.. बोल अर्जून काय हवे... एका बाजूला मी आहे .. निशस्त्र.. व एका बाजूला माझी सहस्त्र लाख सेना.. बोल काय हवे ? " दुर्योघनाचा श्वास तेथेच अडकला तो विचार करु लागला.. अरे ह्या अर्जुनाने जर सेना मागितली तर ह्या कृष्णाला घेऊन मी काय करणार.. ना हा युध्दात लढणार ना.. मनाने माझ्या बाजूने रहणार... अरे रे हे काय झालं .... तोच अर्जुन म्हणाला "वासुदेव, मला तुम्हीच हवे... सेना नको ! " दुर्योधनाला आकाश ठेगंणे वाटू लागले... हा अर्जुन मुर्खच आहे... सहस्त्र लाख सेना सोडून ह्या निशस्त्र कृष्णाला मागितले... महामुर्ख ! दुर्योधन म्हणाला " देव, अर्जुनाने तुम्हाला मागीतले व राहीले.. सैन्य तेच द्या मला.. " व नमस्कार करुन हसत हसत दुर्योधन तेथून बाहेर पडला... कृष्ण म्हणाले.. " हे पार्थ, तु सेना का नाही मागितलीस.. मी तुझ्यासाठी निरुपयोगी आहे ! तुला माहीत आहे ना मी ह्या युध्दामध्ये शस्त्र देखील हाती घेणार नाही मग ? " तेव्हा अर्जुन म्हणाला " मुरलीमनोहर, ज्या बाजूला तुम्ही तेथे सत्य व जेथे सत्य तेथेच विजय ! ह्याच कारणामुळे मी तुम्हाला मागितले... "
प्रतिक्रिया
7 May 2009 - 2:12 pm | परिकथेतील राजकुमार
छान लिहिलयत राजे. मुख्य म्हणजे विषयाला उगीच काहि फाटे फोडले नाहियेत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 May 2009 - 2:29 pm | अनंता
पराशी अर्धसहमत!
जिथे श्रीकृष्ण तिथे विजय!!
सहज म्हणून संत ज्ञानेश्वरांची एक ओवी आठवते-
चंद्रु तेथ चंद्रिका
शंभु तेथ अंबिका
संत तेथ विवेका
असिणे किजो!
strong>प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
7 May 2009 - 2:27 pm | दशानन
कृष्ण हा विषयच असा आहे की कुठलेली पान हाती ह्या तुम्हाला नवीन माहीती मिळत जाते त्यामुळेच विषयाला फाटे फोडण्याची गरज भासली नाही.
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 2:16 pm | अवलिया
छान लिहिले आहेस रे !! :)
--अवलिया
7 May 2009 - 2:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान लिहिले आहेस रे !!
7 May 2009 - 3:11 pm | निखिल देशपांडे
छान लिहिले आहेस रे !!
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
7 May 2009 - 2:37 pm | प्रकाश घाटपांडे
कृष्णाला अहोजाहो कशाला?
देव, राजा, मित्र व आई यांना अरेतुरे करण्याची परवानगी व्याकरणात देखील आहे. अरेतुरे ही गोष्ट जवळीक दाखवते म्हणुन संत देवाला अरेतुरे च म्हणतात.
अहोजाहो आदरार्थी असले तरी दुसरीकडे ते अंतरार्थी सुद्धा आहे. बर्याचवेळा ते आदरापेक्षा अंतर दाखवते. तिथे औपचारिकता येते.
अहोजाहो तल्या कृष्णापेक्षा अरेतुरे तला कृष्ण जवळचा वाटतो. 'देरे कान्हा चोळी लुगडी' हे ऐकताना 'द्या हो कान्हा चोळी लुगडी' कसं वाटेल?
औपचारिक ओळखीचे रुपांतर अनौपचारिक मैत्रीत झाले की अहोजाहो वरुन अरेतुरे केव्हा येतो हे समजत नाही. क्वचित प्रसंगी उलट देखील होते
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 May 2009 - 2:39 pm | सुमीत
अगदी नवीन वाटले वाचताना, आधी कधी दारूक आणि कृष्णाचे संभाषण वाचनात नव्हते आले.
7 May 2009 - 2:49 pm | सहज
छान लिहलेय राजे.
दुनियादारी वाचत असताना एकदम कृष्ण महाभारत कुठून आले? :-)
7 May 2009 - 2:50 pm | दशानन
दुनियादारी मध्ये पण महाभारतचा भास होतोच की मधे मधे :)
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 3:02 pm | जागु
खुप सुंदर लिहले आहे.
7 May 2009 - 4:16 pm | अरुण वडुलेकर
'माम मनी कृष्णसखा रमला' अशी बहुतेकांची अवस्था असतेच.
मनामनावर अधिराज्य करणारे कृष्णासारखे अन्य कुणी नाही.
लेख अप्रतिम झाला आहे.
पुलेशु.
7 May 2009 - 4:26 pm | अनंता
माझी खव बंद आहे , मदत करा.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;) तंगडी खेचायला ;) ;)
7 May 2009 - 4:36 pm | ऍडीजोशी (not verified)
लेख लिहिण्यामागचे कारण समजले नाही. लहानपणापासून कोणत्या ना कोणत्या पुस्तकात वाचलेल्या घटनाच पुन्हा लिहून काय साध्य झाले? त्याचा ना वेगळ्या दॄष्टीकोनातून विचार झलाय ना नवीन काही समजलंय अथवा काही गर्भितार्थ शोधण्याचाही प्रयत्न दिसत नाही.
7 May 2009 - 4:39 pm | दशानन
आता तुमच्या एवढी अफाट बुध्दी माझ्याकडे नाही ना लेखन कला ;) त्यामुळे असं होते कधी कधी !
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 4:50 pm | ऍडीजोशी (not verified)
अहो सिरीयसली विचारतोय मी.
क्रमश: नसल्याने ह्याचे अजून भागही येणार नाहीत असं वाटतंय. त्यामुळे कॄष्ण असं शीर्षक घेऊन त्या उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या आयुष्यातील ही एकच ठरावीक घटना घेऊन त्यातून काहीच नवीन न सांगितल्यामुळे हा प्रश्न पडला मला.
7 May 2009 - 4:55 pm | दशानन
लेख छोटे खानी आहे हे मला देखील जाणवलं पण पुर्ण कृष्ण लिहण्याची ताकत माझ्याकडे नाही त्यामुळे जे मला आवडले , पटले व वाटले तेच लिहले फक्त.
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 7:15 pm | प्राजु
मोठ्या भावाच्या मुलांचे हक्क नाकारतो आहे....
पांडू हा धृतराष्ट्राचा लहान भाऊ होता.
लेखन आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
9 May 2009 - 3:56 pm | दशानन
धन्यवाद.
योग्य तो बदल करतो.
थोडेसं नवीन !
24 May 2009 - 1:15 pm | संजय अभ्यंकर
कृष्णाच्या पायाशी धर्मराज बसला होता, अर्जुन नव्हे!
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
26 May 2009 - 1:02 pm | दशानन
संजय साहेब तुम्ही चुकत आहात :)
थोडेसं नवीन !
7 May 2009 - 9:24 pm | क्रान्ति
" मुरलीमनोहर, ज्या बाजूला तुम्ही तेथे सत्य व जेथे सत्य तेथेच विजय ! ह्याच कारणामुळे मी तुम्हाला मागितले... " हा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. लेख खूप आवडला. =D>
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
9 May 2009 - 7:12 pm | स्वाती दिनेश
छान लिहिलं आहे राजे.
स्वाती
9 May 2009 - 9:40 pm | टारझन
वाह वाह वाह वाह !!
दाद घेउन गेलास गड्या
- टार्कृष्ण
23 May 2009 - 4:06 pm | हर्षद आनंदी
वडीलांना दिलेले वचन, त्यांच्या एहिक सुखासाठी केलेली भीष्म प्रतिज्ञा यांच्या भोवर्यात अडकल्याने, श्रीकृष्णासारख्या ज्ञानी पुरूषाचे बोलणे त्यांना कळले पण वळले नाही. त्या प्रतिज्ञेतच एका महान कुळाच्या नाशाची बीजे लपली होती.
अन्यथा गादीच्या भल्यासाठी राज्यकारभार स्वताच्या हातात घेऊन, उत्तराधिकारी म्हणून धर्मास घोषित करणे त्यांना अशक्य नव्हते. खरेतर त्यांना अशक्य काहीच नव्हते. पण ते आपणास करता येईल याचा विश्वास त्यांना वाटत नसावा.
एखाद्या गोष्टीचा आदी, विस्तार, भरभराट, होत तीचा अंत निश्चित असतो. भरतवंशाचे तेच झाले. ती काळाची गरज होती, प्रत्यक्ष परमेश्वर तेथे हतबल होता
24 May 2009 - 6:29 am | बहुगुणी
"...एक राजा, सम्राट... पुत्रप्रेमाने अंधळा होऊन.. लहान भावाच्या मुलांचे हक्क नाकारतो आहे...." ".. युध्द अटळ आहे .. कोण कोणाच्या बाजूने लढणार हे देखील स्पष्ट आहे..." " .. विनाश हा विनाकारण केलेल्या हट्टामुळेच होतो.... युध्द लवकरच सुरु होईल व संपेल ही लवकर पण.. " वगैरे वाक्ये वाचून मला सुरुवातीला वाटलं की राजेंनीदेखील क्रिप्टिक लिहायला सुरूवात केलीये आणि ही गोष्ट बाळ ठाकरे-उद्धव-राज यांच्या संदर्भात आहे!! पण तसं काहीच नाही असं आता कळतंय ;)
24 May 2009 - 2:47 pm | शशिधर केळकर
खरे आहे, कृष्ण हा विषयच असा आहे की त्याला अंतच नाही असे वाटते. हा छोटासा लेखही छान उतरला आहे. क्रमशः जरी नाही, तरी विविध विषयांच्या अनुषंगाने, विविध पैलूंवर कृष्ण विचार असेच आणखी यावेत असे या निमित्ताने वाटले.
कृष्णप्रेमी शशिधर.
25 May 2009 - 11:27 am | विशाल कुलकर्णी
कृष्णाच्या पायाशी धर्मराज बसला होता, अर्जुन नव्हे!>>> हे विधान चुकीचे आहे. त्यावेळी तिथे अर्जुनच उपस्थित होता. कृष्णाचा सगळ्यात लाडका आणि आवडता सखा म्हणुन धर्मराजाने या कामासाठी अर्जुनाचीच योजना केली होती.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
25 May 2009 - 7:55 pm | स्वानन्द
अडीजोशी च्या मताशी सहमत. वेगळे काही असेल असे वाटले होते, पण एखाद्या पुस्तकातील उतारा घ्एतल्यासारखा वाटला.
असो. पण शब्दरचना मात्र अगदी व्यवस्थित जमलीय.