स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका

Trump's picture
Trump in जनातलं, मनातलं
8 Oct 2021 - 9:02 pm

स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांच्या मालिका

मला नेहमीच स्वयंकेद्री (nerd) आणि तंत्रउत्साही (geek) लोकांविषयी उत्सुकता वाटते. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघायच्या काही मालिका मला माहीती आहेत.
तुम्हाला जर काही माहीती असतील तुम्हीही लिहा.

१. बिग बँग थियरी (BBT)
सुरवातीला छान होती. नंतर पुढे जशी जशी पात्रे पुढे प्रेमात पडु लागली तशी, मजा कमी होत गेली. शेवटचे काही भाग तर बघणे बघितलेच नाहीत.
https://en.wikipedia.org/wiki/The_Big_Bang_Theory
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97_%E0%...

२. सिलिकॉन व्हँली
अतिशय उत्तम. कितीही वेळा बघितले तरी पुन्हा बघावसे वाटते.
https://en.wikipedia.org/wiki/Silicon_Valley_(TV_series)

३. तरुण शेल्डन
बिग बँग थियरी मधील प्रमुख पात्र शेल्डनचे बालपण ह्यात दाखवले आहे. गुणवत्ता ठिक आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Young_Sheldon

तुम्हाला जर काही मालिका असतील तुम्हीही लिहा.

तंत्रमौजमजाविचारसमीक्षामाध्यमवेध

प्रतिक्रिया

गॉडजिला's picture

8 Oct 2021 - 10:01 pm | गॉडजिला

मस्त... शेवट जरा लांबला पणं परफेक्ट शेवट केला. ९०% स्टार्टप काय अनुभवातून जातात हे समजुन घ्यायचे असेल ते ही मिश्किलपने तर सिलिकॉन व्हॅली चांगली सुरुवात आहे...

श्रीगुरुजी's picture

8 Oct 2021 - 11:28 pm | श्रीगुरुजी

Nerd म्हणजे स्वयंकेंद्री नाही. Nerd म्हणजे काहीसा बावळट, वर्गात पहिल्या बाकावर बसून घोकंपट्टी करणारा चष्मा लावणारा, इतरांमध्ये मिसळायला घाबरणारा असा अर्थ होतो.

अवांतर - Revenge of the nerds या धमाल विनोदी चित्रपटाचे दोन्ही भाग पहा.

Nerd म्हणजे काहीसा बावळट, वर्गात पहिल्या बाकावर बसून घोकंपट्टी करणारा चष्मा लावणारा, इतरांमध्ये मिसळायला घाबरणारा असा अर्थ होतो.

मराठी प्रतिशब्द द्या

सुरिया's picture

8 Oct 2021 - 11:48 pm | सुरिया

चम्या

श्रीगुरुजी's picture

9 Oct 2021 - 12:00 am | श्रीगुरुजी

बावळट, शेळपट, बुळचट हे शब्द जवळपास जाऊ शकतील.

सुक्या's picture

9 Oct 2021 - 12:27 am | सुक्या

अभ्यासु किडा.

Nerd म्हणजे एखादा माणुस / मुलगा जो अभ्यासात खुप हुशार आहे, मेहेनती आहे परंतु त्याचबरोबर इतरांशी मिळुन मिसळुन वागता येत नाही असा.

कॉमी's picture

9 Oct 2021 - 7:28 am | कॉमी

NERD शब्द वरीलप्रमाणे वापरतात, पण हे केवळ अभ्यास किंवा पुस्तकांशीच संबंधित असते असे नाही. गेम, चित्रपट, मालिकांच्या एकनेक पात्र आणि घटनांबद्दल खडानखडा माहिती असणारी पोरं पोरी सुद्धा नर्डच.

गॉडजिला's picture

9 Oct 2021 - 2:24 pm | गॉडजिला

लौकीक द्रुश्ट्या कमालिचे अल्पसंख्यांक पण तरीही एखाद्या विषयात अतीविषेश गती, प्राविण्य/प्रभुत्व व रमायची वृत्ती असणार्‍या व्यक्तींना वापरला जातो...

it is justifiable if you say saints are spiritual nerds.

it is justifiable if you say saints are spiritual nerds.

हे विधान मी मागे घेतो कारण गुगलबाबा म्हणतात नर्ड शब्द दोन प्रकारे वापरला जातो

noun
१) a foolish or contemptible person who lacks social skills or is boringly studious.
verb
२) engage in or discuss a technical field obsessively or with great attention to detail.

यामुळे माझ्या मते संताना स्पिरीचुअल नर्ड शब्द चपखलपणे लागु होउ शकत नाही.

सुरिया's picture

9 Oct 2021 - 3:09 pm | सुरिया

गटणे
सखाराम गटणे

त्यातल्या त्यात घासू हाच शब्द बरोबर वाटतो..
पण हा शब्द प्रमाणभाषेत आहे का कल्पना नाही

स्ट्रेंजर थिंग्स पाहायला नक्कीच सुखद आहे (अगदी ग्रेट वैगेरे नसले तरी.)
लहान नर्ड्सच्या मैत्रीचे चित्रण मात्र छान घेतले आहे त्यात.

गॉडजिला's picture

9 Oct 2021 - 12:31 pm | गॉडजिला

हे आपण तेंव्हा अनुभवतो जेंव्हा एक अथवा एका पेक्षा जास्त व्यक्ती त्यांच्या आवडीच्या विषयावर चर्चा/विचार करत असताना सुचणार्‍या /माहित पडणार्‍या नवनवीन मुद्देसुद कल्पना जबरा मनोरंजन देतात.

(Nerdgasm - a thrill of excitement felt in response to something relating to a subject in which a person has an obsessive interest.
)

सुंदर ट्रायल, कोर्टरुम ड्रामा आहे. सत्य घटनेवर आधारीत आहे. गुगलने गुगल अर्थ प्रोडक्ट कसे ढापले व त्यावरील कोर्ट केस हे कथानक जरी असले तर सीलीकॉन वॅली सिलीकॉन वॅली का आहे आणी इतर देशात ती का तयार होउ शकत नाही यावर अतिशय चांगला प्रकाश इथे टाकला आहे.

थोडी तांत्रीक माहिती असेल तर कथानक जास्त रंजक बनते. कोर्टरुम ड्रामा देखील सुरेख.

सुखी's picture

27 Jan 2022 - 10:54 pm | सुखी

कुठे बघायला मिळेल?

Trump's picture

21 Dec 2021 - 1:23 am | Trump

आय टी क्राउड #.
अतिशय उत्तम मालिका. डेली मोशनवर बरेच भाग आहेत.