आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट !
१. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे.
इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल.
२. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत.
मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे.
दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच !
३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन
प्रतिक्रिया
21 Nov 2020 - 12:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तर्जन्याची आयडीया भारी होती, मनातले विचार क्षणभर पॉज झाले खरे... बाकी चालू ठेवा.
-दिलीप बिरुटे
21 Nov 2020 - 1:25 pm | संगणकनंद
समस्त मिपाकरांना कळवण्यात येते की त्यांनी सिद्ध महाराजांना डीवचू अन्यथा त्यांच्यासाठी सिद्ध महाराजांची दारं कायमची बंद होतील आणि मग त्या पामरांचा (सिद्ध महाराजांच्या अमृतवाणीत सांगायचे तर त्याचू आणि छपरी लोकांचा) उद्धार होणार नाही.
21 Nov 2020 - 2:16 pm | सुबोध खरे
इथे सिद्ध महाराजांची दारं उघडायला कोणाला उचकी लागली आहे?
आपणच हुशार आणि बाकी सगळे (सिद्ध पुरुष, संत, महंत, बुद्ध इत्यादी इत्यादी) महा मूर्ख असा आव आणणारा भंपक माणूस काय कुणाचा उद्धार करणार आहे?
21 Nov 2020 - 9:09 pm | nanaba
Sorry for English.
I couldn't resist sharing and my mobile is not allowing marathi typing.
I will try to retype in marathi from my laptop later.
Experience:
I didnt feel much with this except momentary feeling of trance.
I asked my family to try this out without telling them what to expect. Asked just to observe.
Husband said he didn't feel anything.
Mom said "hallak pana ala".. She meant sort of nothingness.
My 7 year old told : " she felt as if she was flying without feeling d body".
This was totally unexpected.
And i found this damn interesting so sharing here.
Thanks to Sanjay Kshirsagar for sharing this.
I will try to see if i can feel what my 7 year old felt. :)
21 Nov 2020 - 10:46 pm | संजय क्षीरसागर
मजा म्हणून इंग्रजीतून लिहितो :
The Meditation is absolutely Scientific. It is the Essence of My Understanding of Human Psychology. It is an Ultimate combination of Spirituality & Human Psychology. It Will work Instantly for Anyone, Anytime, Anywhere.
That Exactly is Thoughtlessness !
That is the Way to Test Any Method Scientifically, Great !
This Has Made me curious ! Please Make the Mudra exactly as shown in the Photos and Ask Him To Look Straight. If the Neck Tilts (of course to the left) the Thought Process continues.
That is Exactly What Buddha Means By Shunyata : Emptiness !
Yes, Because the Entire Existence is Floating in an Infinite Emptiness.
Now, Make Her a Dancer ! She Will Make Havoc ! She Will be a Dancer which the World Has Never Seen Before !
I am Thrilled. You Stunned & Silenced Everyone Here.
23 Nov 2020 - 1:22 pm | अर्धवटराव
माझं इंग्रजी फार कच्चं आहे. त्यामुळे प्रतिसाद मराठीत देतोय (दुसरा पर्याय नाहि ;) )
शरीराची एक विशिष्ट रचना करुन त्याचा अनुभव घेणे, तो शेअर करणे, चर्चा करणे वगैरे गोष्टी चालत राहातात. मोठी माणसं त्यातलं कभि खुषी कभि गम बघत असतात, ते ही ठीक. तुम्ही तुमच्या चिमुकलीचा अनुभव सांगीतलात म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच.
शरीराच्या काहि रचना करुन त्यातलं सुख अनुभव करण्यात काहि हरकत नाहि. काहि वेळेस त्यात थ्रील वाटणं, त्याची मजा घेणं हे देखील ठीक. पण शारीरात मॅनिप्युलेश करुन, मग ते साधं मांडी घालुन बसणं असो किंवा एखाद्या स्प्रींग प्रमाणे शरीराला पिळणे असो, त्यातले येणारे अनुभव हे शरीर जन्य आणि शरीर कन्स्युम्ड असतात याचं भान ठेवणं आवष्यक असतं.
इथे चर्चीला जाणार्या प्रोसेसच उदाहरण घेऊया.
कुठल्याही भौतीक वस्तुला बेलेन्समधे ठेवण्यात त्या वस्तुच्या सेन्ण्टर ऑफ ग्रॅविटीचे फार मोठे योगदान असते. ढोबळ मानाने बघितल्यास आपल्या शरीरात अस्थि आणि मसल वापरुन हि यंत्रणा राबवली जाते. शरीर उभं असताना, बसलं असताना, झोपल्या अवस्थेत किंवा इतर कुठल्याही अवस्थेत, आपली हाडं ट्रस प्रमाणे काम करुन ( ट्रस ... इंजीनियरींजच्या विद्यार्त्यांचा 'आवडीचा' विषय ;) ) वजन विभाजन करतात. मसल्स त्या अवस्थेला आवषयक ते बळ पुरवतात. शरीराची ठेवण आणि अवस्था या नुसार मेंदु हे सगळं कंट्रोल करत असतं. आपल्या डोक्याचं आकारमान जरि तुलनेने कमि असलं तरी त्याचं वजन बरच असतं. शरीराचा तोल सांभाळण्याच्या दृष्टीने मानेच्या वरच्या भागाचं केल्क्युलेशन त्यानुसार होतं.
या सगळ्या झांगडगुत्याला जर काहि स्टिम्युलस मिळालं तर वेगवेगेळे अनुभव सुरु होतात. एखादी ध्यानमुद्रा साधणे, स्वतःभोवती गोल फिरणे, आकाशपाळण्यात बसणे, या सगळ्यांमधे अल्टीमेटली शरीराच्या गुरुत्वीय केंद्राची चलबिचल सांभाळण्यात मेदु गुंतला असतो, त्याचेच अनुभव येत असतात. काहि अनुभव फार प्लेसंट असतात, काहि थ्रिलींग वाटतात, कहि एकदम नकोसे असतात. व्हर्टीगोचा प्रोब्लेम असो, किंवा अगदी नशापाणि केल्याने येणारी झिंग असो. या सर्व गोष्टी शारीरीक आहेत, त्यात अशरीरी असं काहि नाहि.
हि सर्व बडबड या साठी, कि शरीराची मजा घेताना त्यामागची वस्तुस्थीती लक्शात न घेता त्याला भलतेचं लेबलं लावुन आपल्या मुलीच्या मनात चुकीच्या कन्सेप्टची पेरणी करु म्हणुन हा सावधतेचा इशारा. तसं बघितलं तर हे सगळं वयापरत्वे तिला कळेलच. पण प्रश्न एका कोवळ्या मनात चुकीच्या धारणांचं बिजारोपण होण्याचा दिसला म्हणुन टंकलं. बाकि आपण सुज्ञ आहात.
23 Nov 2020 - 3:55 pm | आनन्दा
नेमक्या शब्दात आणि नेटके मांडले आहात.
23 Nov 2020 - 10:21 pm | nanaba
तुम्ही लिहिलेलं अत्यंत योग्य आहे.
तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही.
इन फॅक्ट ते सारखं सारखं करत बसायची जरुरी नाही हे ही सांगितलय.
आणि त्यानंतर तिच्या इतर उचापतीत तिला आठवणही झालेली नाही.
पण तुम्ही लिहिलेलं अगदीच योग्य आहे, पटलेलं आ हे.
ती इतरांबरोबर असल्याने तिने ऐकले आणि ट्राय केले इतकेच.
मला स्वतः करताही - ह्याबाबतीत वेगळं असं वाटतं की संक्षि म्हणतात ते खरे असेल तरी आपली मनाची, शरीराची तयारी नसताना केवळ हॅक सापडला म्हणून एखादी गोष्ट करत राहू नये.
त्याचे काय दुष्परिणाम असू शकेल ते आपल्याला माहित नाहिये.
हॅक च्या मागे जाण्यापेक्षा उपासना करून ती गोष्ट मिळवावी.
आणि वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे ती फायनल स्टेज असेल असेही माहित नाही आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ती अगदीच शारीर क्रियाही असू शकते.
मला इथल्या वादात पडायचे नसल्याने मी आधी हे सगळे लिहिले नव्हते.
पण मला तिलाही न सांगता तोच अनुभव आला ह्याची मजा नक्कीच वाटली आहे.
23 Nov 2020 - 10:24 pm | nanaba
तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही म्हणजे तिला इथली कारण मिमांसा, चर्चा वगैरे माहित नाहियेत. ते अंतराळ, शून्य वगैरे काहीच माहित नाही.
23 Nov 2020 - 10:42 pm | अर्धवटराव
सबके पिल्लु ठिक तो अप्पुन भी खुष :)
24 Nov 2020 - 1:15 am | अर्धवटराव
राहिला मुद्दा मनाची अविरत बडबड थांबवण्याचा...
मनातले विचार थांबण्यासाठी कुठली साधना करणं हेच मुळी मानसीक रोगाचं लक्षण आहे. आणि तसली काहि साधनेला आध्यात्माच्या पेकेजमधे विकणं हि तर शुद्ध फसवणुक आहे - बुवाबाजी आहे.
हे म्हणजे कसं, कि पहिले खा-खा खायचं.. आणि मग शरीरातली अनावष्यक चरबी कमि करायला जीम मधे घाम गाळायचा. आणि या मूर्खपणाला स्वतःच सेलीब्रेट वगैरे करायचं. त्यापेक्षा पोट आणि एकुणच शरीर जसं डिमांड करतं तसा आहार घेतला कि अनावष्यक चरबी मुळी जमा होणारच नाहि.
तसच मनाचं आहे. पहिले सो कॉल्ड स्वच्छंद-फंद करायचे. मग मनाला गप्प करायला साधनेची टुम काढायची. त्यापेक्षा विवेकाने, प्रामाणीकपणाची वागणुक ठेवली तर मन करपणारच नाहि. मग अनावष्यक विचार थांबवणे वगैरेची भानगडच नाहि. पण नाहि. पहिले उचापती करायच्या. मग त्यावर साधनेचं मलम लावायचं. त्यापेक्षा
किमान स्वतःशी प्रामाणीक राहिलं तर मन गरज असेल तेंव्हा धोक्याची जाणीव करुन देऊन प्राण रक्षण करेल, अन्यथा आनंदाने बागडत राहिल. इट्स अॅज सिंपल अॅज दॅट.
24 Nov 2020 - 12:32 am | संजय क्षीरसागर
आपल्या प्रतिसादातून मानवी मनाचे मनोज्ञ दर्शन घडते असे नमूद करतो. जे कष्टसाध्य ते योग्य आणि जे सहज ते टाकावू असा एक पारंपारिक गैरसमज आहे. यावरुन मुल्ला नसरुद्दिनचा एक विनोद स्मरतो, तो असा:
मुल्ला रस्त्यानं लंगडत चाललेला असतो, वेदना त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत असते. मागून येणारा त्याचा मित्र ते दृश्य पाहून आपुलकीनं विचारतो "मुल्ला क्या तकलीफ़ है ?"
त्यावर मुल्ला म्हणतो "तकलीफ़ कुछ भी नही बस एक जूता दस साईज का है और दुसरा आठ का"
"अगर तुम्हे पता ही है तो दुकानसे ठीक साईजके जूते क्यों नही लिए ?"
" ये तो मैं हमेशासे करता हूं . दुकानदार मुझे दस साईजकाही जूता देता है. लेकिन दस साईज के साथ मैं एक आठ का भी जूता खरिदता हूं और मिस-मॅच करके पहेनता हूं !"
" ये तो कमाल हो गया ! इसमे क्या अक्लमंदी कै ?"
"मियां, अक्लमंदीकी छोडो, घर पहुंचते ही जब जूते उतारता हूं तो जो सुकून आता है उसका मजा ही कुछ और है !"
आपण जरुर कष्टसाध्य उपासना करावी पण अधूनमधून हा ज्योक ही आठवावा असे सुचवेन.
अविरत चाललेली मेंटल अॅक्टीविटी थांबणं हे मानसिक आरोग्याचं लक्षण आहे आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यही उत्तम राहतं असा आमचा अनुभव आहे. हे आपणास गैर वाटत असल्यास तसे कळवावे. शिवाय पुरेशी संपन्नता आल्यावरही शांती नाही यावर ध्यान करण्याची पद्धत जगात सर्वत्र चाललेली दिसते. आपल्या कन्येला ही आनंदाचा अनुभव आला आणि आपल्याला त्याचा धसका वाटतो हे मात्र आमच्या आकलनापलिकडे आहे हे नम्रपणे नमूद करतो.
प्रत्यक्ष आपणासही शांत वाटल्याचे आपण लिहिले आहे पण आपणास आता ते इतके सोपे कसे असेल याचा अचंभा वाटत आहे. त्यावर आम्ही असे नमूद करतो की आनंद आणि शांतता हे बाय डिफॉल्ट आपले स्वरुप आहे आणि स्वरुपाशी कनेक्ट होण्यात कोणताही धोका नाही.
ओशोंचे आम्हास अशासाठी अप्रूप वाटले की स्वरुपोलब्धी ही सामान्यांनाही शक्य आहे; त्यासाठी सायासाची (संसार त्याग वगैरे) गरज नाही असा दावा आणि भरोसा देऊन त्यांनी प्रस्थापित आध्यात्माला शह दिला. साधरण दीड ते दोन लाख पुस्तकांचे समग्र वाचन करुन त्यांनी स्वतःच्या ध्यानप्रणाली विकसित केल्या. आम्ही ओशोंचा समग्र अभ्यास करुन एकच सोपी मेथड शोधली आहे असे (पुन्हा नम्रपणे) नमूद करतो
24 Nov 2020 - 2:33 am | संजय क्षीरसागर
ठरवलं आहे त्यांच्या विषयीचा आमचा अनुभव असा की काही वेळानंतर आपण प्रतिसादात वर काय लिहिलं आहे ते खाली येईपर्यंत ते विसरलेले असतात, असा आमचा अनुभव आहे. आमच्या आकलनानुसार ही मनाची योग्य स्थिती नव्हे त्यामुळे आम्ही त्यांना प्रतिसाद देणे थांबवले आहे. आपणासही खातरजमा करुन घ्यायची असेल तर त्यांच्याकडून लेखनाच्या लिंक्स मागवून ते लेख अभ्यासावे (विषेशतः मानसशास्त्रिय) असे सुचवेन आणि त्यातून आपल्या हाती काही लागल्यावर ते आम्हास ही कळवलेत तर बरे होईल.
जगातल्या सर्व ध्यानप्रणाली मेंटल अॅक्टीविटी थांबवण्याच्या प्रक्रिया आहेत कारण सर्व ज्ञानी लोकांनी असा निष्कर्श काढला आहे की अविरत चालू असलेली मेंटल अॅक्टीविटी हेच तणावाचं एकमेव कारण आहे. वेड लागलेला माणूस स्वतःशी बडबडतो हे आपण पाहिलेच असेल. त्याचा अर्थ असा की मनाची अॅक्टीविटी संपूर्णपणे आवाक्या बाहेर गेली आहे.
मनाचा त्रास होण्यासाठी केवळ सदाचार उपयोगी ठरत नाही हे आतापर्यंतच्या जगण्यातून आपल्याही लक्षात आले असावे. त्यामुळे जसे पायाचा उपयोग नसतांना पाय हालवत राहणे उचित नाही तद्वत गरज नसतांना मेंटल अॅक्टीविटी थांबणं श्रेयस आहे.
याउप्पर आम्ही काय लिहावे ?
24 Nov 2020 - 9:27 am | nanaba
Mazee awastha atta hya kshani pula nchya asami sarakhi zaliye.
Tyanchehi pataley, tumachehi patatey.
Lol.
Yuktivad patatoy, pan something is missing ase atun vatatey..
Tumachya muddyanvar nakki punha vichar Karen.
Lekichya babteet matra ardhavatravancha salla manaNar.
Swataha karata punarvichar Karen.
24 Nov 2020 - 10:49 am | संजय क्षीरसागर
होईल यात आम्हाला ही शंका नाही कारण अवघड ते श्रेयस हा सार्वत्रिक गैरसमज आहे. आमच्या अल्प मतीनुसार मात्र कुठलीही अवघड गोष्ट सोपी करणं याला आम्ही दाद देत आलो आहोत, बहुदा त्यामुळे आमचे जीवन सोपे झाले असावे असे वाटते.
२. आपणास प्रतिसाद देतांना उत्तररात्र झाली असल्याने, आता झोपलो नाही तर उठायची वेळ होईल असा सूज्ञ विचार करुन आम्ही आवरते घेतले. तरी आपला अनुभव आमच्यासाठी इतका प्रेरणादायी होता की परवाच आमच्या मातोश्रींना तो विदित केला. त्याही गेली अनेक वर्षे सोहम नामक साधना मोठ्या श्रद्धेने करत. यात आलेला श्वास, गेलेला श्वास, त्याबरोबर सोहम उच्चारण आणि तिसर्या डोळ्यावर अवधान इतका सायास होता. अशी साधना करुन त्यांना झालेला एकमेव फायदा म्हणजे दिवसा झोप लागणे असे आमचे निरिक्षण झाले. त्यामुळे त्यांना अपराधभाव दाटून येत असावा असे आम्हास वाटते कारण आपली साधना कमी पडते त्यामुळे इच्छित फलप्राप्ती होत नाही असे त्यांना राहून राहून वाटे. आम्ही त्यांच्या साधनेच्या डायवर्शनची जोखिम पत्करुन त्यांना आमची साधना पुन्हा एकदा करुन पाहा असे सुचवले कारण प्रस्थापिताविरुद्ध काही सोपे आणि सहज सांगणे म्हणजे रोष ओढवून घेणे आहे हे एव्हाना आम्हाला कळून चुकले आहे. आमची साधना करता क्षणी त्यांना प्रचिती आली (जी पूर्वीही आली होती पण आम्ही कुणा दिग्गजाचे उत्तराधिकारी नाही आणि कुणालाही दिक्षा वगैरे देऊन नसते बालंट गळ्यात घेत नाही कारण सर्व सिद्धच आहेत यावर आम्ही ठाम आहोत आणि `ज्याचे ओझे त्यानी उचलावे 'असा आमचा बालपणीपासूनचा शिरस्ता आहे) ; हे त्यांना माहिती असल्याने त्यांनी सोहम साधनेचा रेटा मारणे चालूच ठेवले होते. परवापासून मात्र मातोश्रींनी सोहम साधनेला फाटा देऊन आमची साधना चालू केली आहे हे नम्रपणे नमूद करतो. देहात कुणीही नाही या आमच्या वस्तुस्थिती निदर्शक विधानाची त्यांना
"असे बुद्ध म्हणतो "
अशी पुस्ती जोडून कल्पना दिली (कारण `पुलंनी म्हटलंय' असं सांगितल्याशिवाय लोक काही ऐकायलाच तयार होत नाहीत, तीच परिस्थिती आध्यात्माची आहे).तर सांगायचे तात्पर्य असे की ' देहात कुणीही नाही याची प्रचिती येईल' या आमच्या विधानाने त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने हे हेरले की 'आमच्या साधनेनी त्यांची मृत्यूची भीती शून्य होईल' कारण मरायला देहात कुणीच नाही; उतार वयात यापरता दिलासा तो काय ?
ते एक तर आहेच पण खरा दिलासा आम्हाला मिळाला हे इथे नम्रपणे नमूद करतो कारण आमच्या मातोश्रींनी आम्हाला दाखवून दिले की साधनेत कोणताही धोका नाही. शिवाय त्यांच्या चालण्यातही सध्या उत्साह जाणवतो, आमच्या अल्प मतीला असे वाटते की देहात कुणीही नाही या आमच्या विधानाने (साधनेमुळे यथावकाश तो त्यांचाही अनुभव होईल) त्या आनंदात असाव्यात. तरीही आनंदाचे कारण विचारुन त्याचा विरस करु नये हे एक आम्हाला बालपणी समजले होते, अर्थात तारुण्यात मात्र जगातल्या सर्व अध्यात्माचा सर्वांगिण अभ्यास केल्यावर आमच्या असे लक्षात आले की आनंद हा आपला स्वभावच आहे त्यामुळे निष्कारण आनंदात राहणे हे उचितच आहे.
24 Nov 2020 - 11:20 am | रंगीला रतन
महाराज या प्रतिसादातील स्वतःला अग्रलेखांचा बादशहा म्हणवून घेणाऱ्या नवा काळ दैनिकाची भाषा लेख लिहिताना तुम्ही वापरली तरी चालेल. स्वतःचा उदो उदो करण्याच्या सवयी मुळे तुमचे लेख वाचकांना आवडत नाहीत असे आमचे निरीक्षण आहे.
24 Nov 2020 - 12:07 pm | शा वि कु
प्रतिसाद भारी आहे!
24 Nov 2020 - 7:16 pm | अर्धवटराव
तुमच्या कन्फ्युजनचं कारण कदाचीत 'यांचा मार्ग विरुद्ध त्यांचा मार्ग' या विचारात आहे. हे सर्वप्रथम मनातुन काढुन टाका. प्रश्न मार्गाचा नसुन आपल्याला गरज कशाची जाणवते याचा आहे. तसंही मी काहि मार्ग वगैरे सांगितलेला नाहि. शरीर असो किंवा मन.. त्याचं अन्न काय असावं, काय सेवन केल्यास संपूर्ण वाढ आणि विकास होईल, स्वभावतःच त्यांची आनंदवृत्ती कशा विकसीत होतील.. हे सर्व निसर्गधर्माने ऑटोमॅटीक होत असतं. तो विकास तसा झाला नाहि आणि या गोष्टी आपल्या परिपक्व अवस्थेला पोचल्या नाहित तर मग प्रॉब्लेम सुरु होतात, आणि औषध घ्यावे लागते. आता काहि लोकांना त्या औषधाचच कौतुक असतं... पण निसर्ग स्वतःच सर्वोत्तम औषध आहे. त्याने नेमुन दिलेली लाईफ सायकल डोळसपणे बघा. आनंदात निरामय जगण्याचा तोच सर्वोत्तम उपाय आहे.
तुम्ही तुमच्या मुलीला कशाप्रकारे डेव्हलप करायला बघताय?
एक पॉलीसी म्हणजे संपूर्ण कंट्रोल. गरज वाटेल तेंव्हा तिने सांगेल ते काम करावं. अन्यथा गो फ्रीज. इथे परमोच्च कंट्रोल गाठावा लागेल. इतका कि प्रत्येक क्षणी आपण कंट्रोल होतोय हे देखील जाणवु नये.
दुसरी पॉलीसी म्हणजे तिने स्वभावतःच परिपक्व व्हावं. मग तिला खुल्ला फ्री छोड दो... आपला विवेक वापरुन ति निर्णय घेईल. आणि स्वभावतःच आनंदात जगेल... या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या उक्तीप्रमाणे. इथे परमोच्च मॅच्युरिटी गाठावी लागेल.
मनाचं देखील तेच आहे. मन कंट्रोल्ड हवय कि मॅच्युअर्ड. मनाला गुलाम करयचय कि मित्र.
मन गुलाम होणं अशक्य आहे. मन मित्र होणं हि त्याची नैसर्गीक परिपक्व अवस्था आहे.
सर्वात महत्वाचं... यात अध्यात्म वगैरे काहि नाहि. साधं सरळ मानसशास्त्र आहे, जैवीक प्रोसेस आहे.
24 Nov 2020 - 7:42 pm | रंगीला रतन
जब्बर्दस्त प्रतिसाद.
24 Nov 2020 - 8:56 pm | सतिश गावडे
हा धागा वाचल्यापासून मला जो प्रश्न पडला होता त्याचं हा प्रतिसाद नेमकं उत्तर आहे.
लेखक ज्याला आपण लावलेला अध्यात्मातील अभूतपूर्व शोध समजत आहेत ती केवळ एक शारीरिक क्रिया आहे, बोटं गुंफा, गोलक बनवा आणि जबरदस्तीने त्यावर लक्ष केंद्रीत करा. नैसर्गिकता नाहीच त्यात.
असलं विदेहत्व काय कामाचं. नजर हटली, बाजार उठला. :)
किती सुरेख वर्णन केलंय प्रगल्भतेचं. __/\__
24 Nov 2020 - 10:40 pm | आनन्दा
गवि, तुम्ही संक्षीना नीट समजून घेत नाही आहात.
संक्षीना असे म्हणायचे आहे की ही बोटे गुंफने म्हणजे ट्रिगर आहे, त्याने एकदा तुम्ही सत्य आहात, किंवा देह नाहीत हा अनुभव घेतलात की ती धारणा हळूहळू स्थिर होत जाईल, आणि मग तुम्ही आपोआपच कर्ता भावनेतून मुक्त व्हाल.
तत्वज्ञान म्हणून यात काहीच चूक नाही, कदाचित कोणाला अनुभव येतही असेल, पण
1. मला नाही आला.
2. जे अनुभव कोणतेतरी शारीरिक बिंदू ट्रिगर होऊन मिळतात त्यांची मर्यादा इंद्रियजन्य असते, त्यामुळे ते अनुभव कालातीत नसतात.
अध्यात्माचा मुख्य उपयोग तुमचे सत्य स्वरूप कळणे, त्यामध्ये केवळ देहभान विसरणे किंवा निर्विचार होणे अपेक्षित नसते, किंवा मी देह नाही ही या अनुभवाची पहिली पायरी आहे.
अंतिमतः तुमच्या जाणिवा रुंदावत जाऊन तुम्ही विश्वाशी तदाकार होणे अपेक्षित असते. संक्षी त्या पातळीवर गेले आहेत का ते माहीत नाही, पण त्या पातळीवर गेलेल्या माणसासाठी सत्य ही सिद्ध करायची गोष्ट राहत नाही, साधना हा केवळ मार्ग राहतो, साध्य राहत नाही, आणि विश्वाशी तदाकार झाल्यामुळे सगळ्या विश्वाची स्पंदने अनुभवता येतात, आणि अशी तदाकारता प्राप्त झालेला माणूस आपोआपच सगळ्या विकारांपासून मुक्त होतो.
हे लक्षण मला अजूनतरी दिसलेले नाही, पण तरीही मी हे लेखमाला वाचत आहे, कारण कदाचित संक्षीना काय सांगायचे आहे हे कदाचित पुढच्या भागात स्पष्ट होईल.
केवळ आकांडतांडव करतात, वाद घालतात, अक्कल काढतात म्हणून ते भोंदू आहेत असे मी मुळीच म्हणणार नाही. संक्षीना हाताला काहीतरी लागलेले आहे हे नक्की, पण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत असे माझे मत आहे, ते येणारा कालच ठरवेल.
24 Nov 2020 - 10:55 pm | सतिश गावडे
माझा हाच मुद्दा होता. जास्त टंकायचा कंटाळा असल्याने प्रतिसाद थोडक्यात आटपला होता :)
तुमच्या बाकीच्या मुद्द्यांशी सहमत आहे. जमल्यास कधीतरी प्रत्यक्ष चर्चा करु. मी तुमच्या शेजारीच राहतो, मात्र अजून भेटण्याचा योग आलेला नाही. :)
तुम्ही बहूतेक नजरचूकीने हा प्रतिसाद गविंना उद्देशून लिहीला आहे. गविंच्या समोर मी एक सामान्य सदस्य आहे. :)
24 Nov 2020 - 11:31 pm | अर्धवटराव
नामदेवाने भक्तीभावाने पांडुरंगाला नैवेद्य दाखवला, आणि श्रीहरी प्रत्यक्ष जेवला . म्हणुन नामदेव अधिकारवाणीने आजन्म भक्तीमार्गाचा प्रसार करत राहिला. त्याने चुकुनही 'नैवेद्य दाखवणे' हि भक्ती साध्य करण्याची 'प्रोसेस' आहे असा दावा केला नाहि. किंबहुना खरच भक्ती साध्य झाली असेल तर पांडुरंग केवळ नैवेद्य खाणार नाहि तर तुमच्या घरी येऊन पाटावर बसुन जेवेल हि भक्तीमार्गीयांची अनुभुती सांगितली गेली.
चमनदेवाने केपिलरी अॅक्शनने गणपतीच्या मूर्तीला दुध पाजले. त्या अनुभवाने प्रचंड उल्हासीत होऊन आपणही भक्तीसिद्ध झालो आहो असा त्याने स्वतःचाच खरा-खोटा समज करुन घेतला. नामदेवासारख्या एकट्या-दुकट्याने देवाला जेऊ घातल्याचा अनुभव सांगितला. पण देवाला जेऊ घालण्याची सर्वांना, सर्वकालीन, आणि तात्काळ परिणाम दाखवणारी पद्धत कोणलाच जमली नाहि, अगदी नामदेवाला देखील. आपण प्रचंड बुद्धीत्तेचं प्रदर्शन करत इतकी सोपी पद्धत विकसीत करुन जगाला उपकृत केल्याचा भाव चमनदेवाच्या मनात दाटुन आला. अशा तर्हेने चमनदेव 'सिद्ध' झाला. पण आता आपलं सिद्धत्व इतरांकडुन पटवुन घ्यायची तडफड त्याच्या मनाला लागली. मग त्याने मिडीयावर धिंगाणा घालायला सुरुवात केली.
विठ्ठलाने नामदेवाचा नैवेद्य ग्रहण करणं हा त्याच्या भक्ती अवस्थेचा परिपाक आहे.
चमनदेवाचे गणपतीला दुध पाजणं हि एक भौतीक क्रीया आहे.
इति नामदेव - चमनदेव फरक स्पष्टीकरण कमेण्ट संपूर्ण.
अवांतरः
हे केवळ एक रुपक आहे. त्याच्या आशयाकडे सोयीस्कर दुर्लक्ष्य करुन, देव, भक्ती वगैरे कशा फोल आहेत असे फटाके वाजणं आता सुरु होईल बहुतेक ;)
24 Nov 2020 - 11:55 pm | आनन्दा
हो चुकून गविना लिहिला.
बाकी भेटू नक्कीच!
25 Nov 2020 - 12:58 am | कानडाऊ योगेशु
ह्यावर आता फिन्गर्स क्रॉस्ड म्हणायचीही सोय राहीली नाही.!
25 Nov 2020 - 1:07 am | संजय क्षीरसागर
हा मात्र सॉलीड टाकला आहे !
25 Nov 2020 - 1:55 pm | शाम भागवत
सहमत.
असहमत. हे कारण होऊ शकत नाही. तर हा कारणाचा परिणाम आहे. कारण नव्हे.
कारण असे आहे की, ते जिथे पोहोचले आहेत, तो रस्त्यावरील मैलाचा दगड आहे. तो दगड सुचवतोय की रस्ता बरोबर आहे. त्याच बरोबर तो दगड असंही सुचवतोय की, रस्ता अजून संपलेला नाही. वाट अजून बरीच शिल्लक आहे. आत्ताशी फक्त चारी मुक्तिचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया झाली आहे. आता खरी वाटचाल सुरू होणार आहे.
पण त्यांना वाटतंय की ते मुक्कामी पोहोचले आहेत.
“देवाचिया द्वारी उभा क्षणभरी” असं जे माऊली म्हणतात, त्यातला हा जो “क्षण” आहे, तो क्षण ते अनुभवू शकले आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे. पश्यन्तीच्या पलिकडे काहीकाळ तरी जाता येणे हे हजारोंमध्ये एकालाच जमते. कृपेशिवाय शक्य नसते. भले त्यांना त्याची जाणीव नसेल. पण जिथे धूर असतो, तिथे अग्नी नसेल असे कसे बरे होऊ शकेल?
म्हणूनच त्यांच्या बाबतीत मी नेहमी संयमीत भाषेत बोलतो व लिहितो. त्यांना जो शांतीचा अनुभव आलाय, तिथूनच त्यांना पुढच्या प्रवासाची दिशा मिळो या उद्देशाने म्हणत असतो.
ॐ शांती ॐ
खर तर अध्यात्मिक प्रवासात कोण कुठे आहे याचे तर्क करू नये असे म्हणतात. (साधू होऊन साधू ओळखावा असं म्हणतात.) त्यांना ज्या स्थितीचा अनुभव आहे, तो मला आहे की नाही, हे मी एकदा मनोगतावर १० वर्षापूर्वी सांगितले होते. त्यावेळेस ते सांगणे ही माझी जरा चूकच झाली. पण त्याच अनुषंगाने मी आजही लिहितोय.
याला कारण एकच. आनंदा तुमचे विचार. एकदम वेगळेपण लक्षात आल्याने मला राहवले नाही, आणि लेखमाला संपेपर्यंत थांबायचे विसरून गेलो.
आनंदराव, तुम्हाला पुढील वाटचालीला शुभेच्छा.
🙏
25 Nov 2020 - 4:17 pm | आनन्दा
धन्यवाद सर. बाकी तुमच्याशी सहमत आहेच.
22 Nov 2020 - 4:37 pm | संजय क्षीरसागर
ध्यान या शब्दाची सर्वोत्तम व्याख्या, अष्टावक्र या सांख्ययोगातल्या दिग्गजानं त्याच्या संहितेत अशी केली आहे :
अनावधानस्य सर्वत्र !
जन्मतः आणि नंतर साधारण एक वर्षापर्यंत मुलाची जाणीव अनावधानस्य सर्वत्र अशी असते, पण नंतर मुलाला फोकसिंग करायला शिकवलं जातं. कारण कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी जाणीवेचा रोख (अवधान) त्या गोष्टीकडे ओरियंट होणं आवश्यक असतं. पुढेपुढे ही सवय इतकी भिनते की त्याला अनावधानात राहणं अशक्य होतं. इतर सजीव मात्र सहजपणे, गरज नसेल तेंव्हा अनावधानात असतात. हे अनावधानच खरं रिलॅक्सेशन आहे कारण ती जाणीवेची मूळ स्थिती आहे (The Default State of Consciousness).
पुढेपुढे तर हा अवधानाचा कहर इतका वाढतो की गरज नसली तरी, व्यक्तीच्या अवधानाचा रोख सतत मेंटल अॅक्टीविटीकडे लागून राहतो. या अवधानामुळे असा लफडा होतो की मेंटल अॅक्टीविटी अविरत चालू राहते. अगदी झोपेत सुद्धा केवळ रात्री २ ते ४ च्या दरम्यान केंव्हा तरी ती आपोआप थांबते (सुषुप्ती) आणि केवळ त्यावेळी शरीर आणि मेंदू संपूर्णपणे रिलॅक्स होतो.
माझी ध्यानपद्धती जागेपणी मेंटल अॅक्टीविटी थांबवते, भर दिवसा तुम्हाला सुषुप्तीची मजा घेता येते ! त्यामुळे तुम्हाला रिलॅक्सेशन येतं. जाणीव पुन्हा तिच्या डिफॉल्ट स्टेटला येते. लहान मुल ज्या अकारण आनंदात असतं ती स्थिती तुम्ही अनुभवता आणि याचं कारण आहे : अनावधानस्य सर्वत्र !
अष्टावक्रानं स्थितीचं वर्णन यथार्थ केलंय पण ती कशी येते याची त्याला कल्पना नव्हती. आज ते रहस्य तुम्हाला उघड झालं आहे.
_______________________________________
डोक्यावर तरंगती शिळा घेऊन जीवाच्या धसक्यानं एकाग्रता साधणं हा शुद्ध निर्बुद्धपणा आहे कारण एकाग्रता हे कशावर तरी अवधान साधणं आहे आणि अवधान हेच टेंशनच मूळ कारण आहे.
22 Nov 2020 - 5:04 pm | संगणकनंद
अष्टावक्रानं स्थितीचं वर्णन यथार्थ केलंय पण ती कशी येते याची त्याला कल्पना नव्हती. आज ते रहस्य तुम्हाला उघड झालं आहे.
मी भाग दोन वर तुम्हाला विनोदी लेखक म्हटलं आहे आणि लेखाना विनोदी लेख ते उगाच नाही.
लेखनाची उबळ आली की तुम्ही इथे येऊन काही तरी लिहीता आणि वर हे ही रेमटून देता की तुम्हाला जे कळलंय ते याआधी कुठल्याच ज्ञानी पुरुषाला कळले नव्हते. आणि आता ते इथे एका लेखात प्रतिसादात खरडल्याने समस्त मानव जातीचा उद्धार होणार आहे.
असेच विनोदी लेखन अजून येऊ द्या. छान टाईमपास होतोय वाचताना.
24 Nov 2020 - 1:56 am | संजय क्षीरसागर
१. अष्टावक्राचा सांख्ययोग सत्याचा आविष्कार कसा करतो ? याविषयी आपले विचार इथे मांडावे त्यामुळे इतरांनाही आपल्या ज्ञानाचा लाभ घेता येईल.
२. अष्टावक्रानं स्वरुपोलब्धीसाठी कोणती साधना सांगितली आहे ? याचा ही उलगडा तो श्लोक नेमका कोणत्या अध्यायात आहे ते सांगून करावा.
३. आपण केलेल्या आध्यात्मिक लेखनाच्या लिंक्स देता येतील का ? तसे केल्यास उत्तम कारण केवळ आपल्या प्रतिसादांवरुन आपल्या अलौकिक बुद्धीमत्तेचा अंदाज बांधणे आम्हास तरी उचित वाटत नाही.
24 Nov 2020 - 11:22 am | प्रसाद गोडबोले
हा श्लोक अठराव्या अध्यायातील आहे :
बाकी ह्याचाच अलिकडेच एक भारी श्लोक आहे >>>
निष्काम / सिध्द पुरुष शांत संत पुरुषांची स्तुती करत नाही कि दुष्टांची निंदा करत नाही. सुख दु:ख ह्यांना समबुध्दीने पहाणारा असा जो सिध्द पुरुष असतो त्याला काहीच कर्तव्य असे नसते !
मिपावरील एकमेव अद्वीतीय स्वयंघोषित सिध्द पुरुष ज्याप्रकारे " माझेच कसे योग्य" हे दाखवण्यासाठी प्रतिसादातुन लेखनातुन आकांडतांडव करत असताना दिसतात , प्रतिकुल प्रतिसद देणार्यांची निंदा अन खंडनमंडन करताना कालापव्यय करताना दिसतात , अख्ख्या जगाला शहाणे करुन सोडायचे कर्तव्य स्वतःच्या माथ्यावर घेऊन जिथे तिथे "मी ची लाल" करुन घेताना दिसतात , त्यावरुन त्यांच्या सिध्दत्वाविषयी शंका येते बस्स इतकेच.
=))))
24 Nov 2020 - 12:17 pm | शा वि कु
गीतेतली सिद्ध पुरुषांची व्याख्या बरोबरच आहे, किंवा संक्षि त्या व्याख्येनुसार स्वतःला सिद्ध म्हणत आहेत आणि ती सिद्धत्वाची व्याख्या सरसकट सर्वांना मान्य आहे असे ऍसंप्शन का ?
(मला व्यक्तिगतरीत्या सिद्धत्व नावाच्या गोष्टीच्या अस्तित्वाची पण खात्री नाही. त्यामुळे, तुम्हाला त्यांच्या सिद्धत्वावर शंका येते हा त्यामुळे माझ्या दृष्टीने अत्यंत गौण मुद्दा असून, तुमच्या शंकेस आमचा काहीही आक्षेप नाही. :))
27 Nov 2020 - 9:10 am | आनन्दा
सर्वत्रानवधानस्य हा दाखला लेखकाने स्वतःच दिला आहे, नाही का?
27 Nov 2020 - 10:26 am | शा वि कु
माझ्या मते त्यांच्या भावना दाखवणारी एक ओळ त्यांनी वापरली आहे. "मी सांगतो तेच गीतेत सांगितले आहे त्यामुळे मी बरोबर आहे" असे मला तरी वाटले नाही."
23 Nov 2020 - 2:51 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचे हे दोन प्रतिसाद वाचले :
१. https://www.misalpav.com/comment/1086862#comment-1086862
२. https://www.misalpav.com/comment/1086895#comment-1086895
माझी मतं सांगतो.
१.
@ गामा पैलवान : पूर्ण माहितीमुळे हा प्रकार अधिक फनी झालाय !
तुम्हांस चौरंगीनाथांच्या कथेची पूर्ण माहिती नाही. उघड अर्थ काढण्याच्या नावाखाली काही असत्य गोष्टी तुम्ही गृहीत धरल्या आहेत.
२.
१. मच्छिंद्रनाथांनी डायरेक्ट न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतालाच धोबीपछाड मारला आहे.
पौर्णिमा आणि अमावास्येला उधाणाची एकाच प्रकारची भरती येते. ही न्यूटनच्या गुरुव्र्षानाच्या सिद्धांतातली धडधडीतपणे दिसणारी त्रुटी आहे. पण लक्षांत कोण घेतो.
मच्छिंद्रनाथांनी न्यूटनच्या नियमांच्या कक्षेत नसलेल्या बलांचा उपयोग केलेला असू शकतो.
३.
सत्य चराचर व्यापून असून देखिल सिद्धत्त्वासाठी तुम्हाला असा अफाट मॅन भेटत नाही तोपर्यंत तुम्ही सत्य नाही. परिणामी या जन्मी तरी तुमचा चान्स हुकला आहे आता पुढच्या जन्मांची वाट पाहात राहा !
हा असला दावा मच्छिंद्रनाथांनी केलेला नाही. किंबहुना तुम्ही सोडल्यास इतर कुणीही केलेला नाही.
४.
कुठल्याही जन्मात असा सुपरमॅन तुम्हाला भेटला, तरी चौरंगीनाथांसारखं डेरींग करुन तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालत नाही तोपर्यंत तुम्ही या जन्म-मृत्यूच्या चक्रातच फिरत राहणार. तस्मात, आजपासूनच डेरींग वाढवायला सुरुवात करा. थोडक्यात, सध्याचं तुमचं डेरींग पाहता या जन्मी तरी तुम्ही एकदम छपरी आहात.
हा अर्थसुद्धा तुमच्या मेंदूतनं निघालेला आहे. तस्मात याचा छडा मी लावू शकंत नाही.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की चौरंगीनाथ राजपुत्र होता. त्याचा राजा असलेला बाप डोक्याने भडक होता. रागाच्या भरात त्याने आपल्या पोराचे हातपाय तोडून त्याला चौकात टाकला. मच्छिंद्र आणि गोरक्ष नाथांना तो हातपाय तुटलेल्या मूर्छितावस्थेत सापडला. त्यांनी त्याला राजाकडनं मागून घेतला. त्याला खांद्यावर वाहून हिमालयात आणला. नंतर त्याला गुहेत तपस्येला बसवला आणि अनुसंधानासाठी त्याच्या डोक्यावर शिळा टांगवली. प्रत्यक्षात ती शिळा मच्छिंद्रनाथांनी योगसामर्थ्याने तोलून धरली होती.
सदर साधना चौरंगीने स्वत:हून स्वीकारली नव्हती. परिस्थितीशी जुळवून घेणे हा इतकाच उपाय त्याच्याकडे उरला होता.
५.
या अद्भूत चमत्काराची तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्ही अज्ञानी आहात. तुमचं ज्ञान चरचौघात प्रकट करायचं असेल तर अत्यंत विनयानं ही स्टोरी पुढच्यांना सांगा कारण विद्या विनयेन शोभते !
असा अर्थ लावायची काहीही जरुरी नाही. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ स्वत:च्या योगसामर्थ्याने भक्तहृदयी विराजमान आहेत.
६.
या आणि अशा अनेक उदाहरणंनी, ज्यांना पूर्वापार ग्रेट मानलं गेलंय त्यांच्या भक्तांनी आणि अनुयायांनी, त्यांच्या पश्चात आध्यात्माची कशी वाट लावून ठेवली आहे ....
हे उदाहरण नवनाथ भक्तिसार ग्रंथात आहे. तुम्हांस विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. पण असंख्य भक्तांना याच्या पारायणाचे अनुभव आले आहेत. तुम्ही ज्याला अध्यात्माची वाट लावणे म्हणतात ती भोंदू लोकांनी लावून ठेवलेली आहे. प्रस्तुत उदाहरणांत भोंदूगिरी करणारा कोणीच नसल्यामुळे तुमचा हा दावा फोल आहे.
७.
.... आणि जनसामान्यांत नाहक, किती पराकोटीचा इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स निर्माण केलाय ....
कोण्या माणसात कसलासा न्यूनगंड उत्पन्न झाला तर मी, तुम्ही वा इतर कोणीही त्यास कारणीभूत नाही.
८.
शिळा तरंगवता येते तर बोईंग उडवता यायला काय हरकत आहे ?
तरंगणारी शिळा एकाच ठिकाणी स्थिर असते. याउलट बोईंग सतत पुढंपुढं सरकंत असतं. त्यामुळे या दोहोंचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.
९.
कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन ?
कमी श्रमांत बोईंग हवेत उडवून दूरवर सुखरूप उतरवण्यासाठी. 'कमी' हा शब्द महत्त्वाचा.
१०.
ऑइल क्रायसिसचा जागतिक प्रश्न एका झटक्यात संपेल !
हे खरंय. पर्यायी तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास तेलावरील अवलंबन कमी होईल. त्यामुळे तेलाचा प्रश्न कायमचा संपू शकेल.
११.
अडाणी पण कावेबाज भक्तांनी स्वतःची दुकानं सुरु रहावीत म्हणून लावलेल्या या स्टोर्या आहेत इतकी साधी गोष्ट सुशिक्षितांना समजत नसेल तर अशिक्षितांचे हाल तर विचारायलाच नको.
नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा कर्ता परलोकवासी होऊन कैक शतकं लोटली आहेत. त्यामुळे हा दावा नवनाथ भक्तिसार ग्रंथास लागू पडंत नाही. बाकीच्या ग्रंथांचं माहित नाही.
१२.
त्यामुळे दुसर्या लेखावरच्या प्रतिसादात मी म्हटलंय की इतक्या निर्बुद्ध मानसिकतेच्या खोलवर रुजलेल्या धारणांना माझ्या लेखनाचा शून्य उपयोग आहे. त्यांनी शिळा तरंगवणार्याची वाट पहावी आणि तरंगती शिळा डोक्यावर घेऊन अनुसंधान साधावं !
शिळा तरंगल्याची घटना दैववशात घडली होती. कोणी मुद्दामहून ती साधना करायला गेला नव्हता. अशा घटनेविषयी तुच्छतेने शेरेबाजी करून तुम्ही विनाकारण ज्ञाताज्ञात शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे म्हणावंसं वाटतं की, एकवेळ शिळा तरंगवणारा सापडेल पण तुमच्या सल्ल्याने जीवन्मुक्त होणं अशक्य आहे.
आ.न.,
-गा.पै.
23 Nov 2020 - 9:08 am | आनन्दा
कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन ?
कमी श्रमांत बोईंग हवेत उडवून दूरवर सुखरूप उतरवण्यासाठी. 'कमी' हा शब्द महत्त्वाचा.
>>>>
गापै याबद्दल 100 नमस्कार.. हे काम 50 रुपयात होणारे रामकृष्ण आठवले मला यांच्यावरून.. याबद्दल धन्यवाद!!
23 Nov 2020 - 9:21 am | आनन्दा
थोडा गंडलाय,
हे काम दोन पैशात होते, असे म्हणणारे रामकृष्ण परमहंस.
23 Nov 2020 - 11:59 am | संजय क्षीरसागर
तुम्हीच दिलेल्या 'पूर्ण माहितीवर' माझा प्रतिसाद बेतला आहे ! हे आपल्या लक्षात आले नाही काय ?
आपल्यासारख्या तर्कपुष्ट व्यक्ती कडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. भरतीचे पाणी मच्छिंद्रनाथांच्या शिळेप्रमाणे आकाशात तरंगत राहते काय ? (गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते पुन्हा खालीच येते असा सार्वत्रिक अनुभव आहे.) तरीही तसे विलोभनीय दृष्य आपण किंवा आपल्या समर्थकांनी पाहिले असल्यास इथे मान्य होणार नाही. कृपया शास्त्रिय पुरावा म्हणून ऑथेंटिक लिंक द्यावी.
आपले मच्छिंद्रनाथ सत्य चराचर व्यापून नाही असे म्हणतात का ? तसे असेल तर त्यांच्या तशा विधानाची सप्रमाण कॉपी इथे पेस्ट करावी.
४.
हे तर आपण अफाटच लिहिले आहे. पाय तोडल्यावर चौरंगीनाथ कसे बसू शकले ? असा प्रश्न आपल्यासारख्या विचारवंताला पडू नये काय ?आणि त्याही पुढे जाऊन हात नसलेली व्यक्ती कशाच्या आधारे बसेल ? असा किमान वाजवी प्रश्न आपण स्वतःला विचारला नाहीत काय ?
किंबहुना हात आणि पाय अँप्युट केलेली व्यक्ती केवळ टोरसोवर उभी राहिलेली आपण किंवा आपल्या समर्थकांनी पाहिली असल्यास इथे फोटो देणे.
एखादे वेळी शिळेबरोबर चौरंगीनाथही योगसामर्थ्यानं हवेत तरंगत होते असा उल्लेख अनावधानाने ग्रंथात करायचा राहिला तर नाही ना ? याचा ही छ्डा लावावा आणि शक्य झाल्यास तशी दुरुस्ती करावी.
एवढे सगळे झाल्यावर आपल्या या अभूतपूर्व प्रयोगाची सत्यता आयएमए कडून पडताळून घ्यावी आणि त्याची लिंक इथे दिली तर आम्हीही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.
एकदा डो़कं वापरायचंच नाही हे ठरवल्यावर हे विधान मान्य करण्यावाचून भक्तांपुढे काही पर्याय उरतो का ? या ही शक्यतेचा आपल्या (इतर वेळी सक्रीय असलेल्या) तर्कबुद्धीनं यथोचित विचार व्हावा असं नम्रपणे सुचवतो.
टोरसो इंडीपेंडंटली बसू शकणं आणि त्याच्या डोक्यावर योग सामर्थ्यानं शिळा तरंगत ठेवणं या स्टोरीलाच भोंदूगिरी म्हणत असावेत असा एक सार्वत्रिक समज आहे. आपल्या तर्कबुद्धीला भोंदूगिरीचा काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे काय ? किंवा मराठी शब्दकोषात तसा बदल घडला आहे का ? असल्यास त्याचा पुरावा इथे सादर करावा.
आपण ज्या धारिष्ट्यानं चित्तचक्षू चमत्कारिक कथा भर पब्लिक फोरमवर लिहिता आहात त्यावरुन आपल्याला कोणताही न्यूनगंड नाही असे सकृत दर्शनी दिसते. पण सामान्य लोक अशा स्टोर्या वाचतांना किमान बुद्धीचा वापर करतात असे वाटते, तेंव्हा त्यांना (पुन्हा थोडी बुद्धी वापरल्यास) न्यूनगंड येत असावा असे वाटते.
प्रोपल्शन ही तरंगण्यानंतरची लगेचची पुढची पायरी आहे असा आमचा समज आहे. बोईंग नुसते हवेत तरंगण्यासाठी निर्माण झाले आहे काय ? तसे असल्यास कृपया कोणत्याही विमान कंपनीकडे चवकशी करुन इथे लेखी पुरावा सादर करावा.
व्यक्तिगत योगसामर्थ्य लावणे हे ऑइल रिगच्या भव्य प्रोजेक्टपेक्षा कमी श्रमाचे आहे असे तार्किक अवलोकनावरुन वाटते. आपण ऑइल रिग प्रोजेक्टच्या खर्चाची आणि त्यासाठी होणार्या मानवी श्रमाची माहिती घेतली आहे काय ? शिवाय ऑइल बेसेसवर कब्जा मिळवणे या एका कारणावरुन जगात कशी युद्धे चालू आहेत याची आपल्याला कल्पना असावी. ती युद्धे हा परिश्रम नाही असे आपणास वाटत असल्यास तसे कळवावे.
ठीक आहे.
आपण शिळा तरंगवणार्याची जरुर वाट पहावी आमच्या साधनेनं लोक मुक्त होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे जो इथे आलेल्या प्रतिसादांवरुन सिद्ध झाला आहे.
23 Nov 2020 - 3:06 am | गामा पैलवान
nanaba,
यांस प्रयोग जरूर म्हणता येईल. परंतु हे सायंटिफिक टेस्टिंग नव्हे. अशा प्रकारच्या टेस्टिंगसाठी हायपोथिसीस लागतं, जे प्रस्तुत प्रसंगात दावेदाराने ( म्हणजे संजय क्षीरसागर यांनी) स्पष्ट केलेलं नाही.
हा प्रयोग असल्याने यांत ऑब्झरवेशन व इन्फरन्स ( = निरीक्षण व अनुमान ) आहेत, पण यांत कनक्लूजन ( = निष्कर्ष ) नाही.
माझं हे मत विकीवरील माहितीवर आधारित आहे : https://en.wikipedia.org/wiki/Scientific_method
आ.न.,
-गा.पै.
23 Nov 2020 - 10:19 am | संजय क्षीरसागर
डायरेक्ट रिझल्ट आहे जो वैज्ञानिक सत्याच्या तीनही निकषांवर (निर्वैयक्तिकता, स्थल-काल निरपेक्षता आणि वारंवारिता) शाबित होतो.
१) सदस्येनं कुणालाही काय रिझल्ट येईल याची कल्पना दिली नव्हती किंवा तिची स्वतःची काय रिझल्ट यावा याबद्दल कोणतीही गृहितकं नव्हती. शिवाय तिनी कोणत्याही प्रकारे रिझल्ट मॉनिटर केला नाही (rigorous skepticism about what is observed आणि cognitive assumptions can distort how one interprets the observation)
२. हायपोथेसिसचा अर्थ जनरल स्टेटमंट आणि डिडक्टीव रिजनींगचा अर्थ अनेक शक्यतांमधून नेमक्या निर्णयाप्रत येणं असा आहे. तुमचं म्हणणंय की मी हायपोथेसिस मांडला नाही ? अहो लेखाचं नांवच १. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता आहे आणखी काय असतो हायपोथेसिस ? आणि कन्क्लूजनचं काय घेऊन बसलात ? डायरेक्ट रिझल्ट तुमच्यासमोर आहे !
३. आणि निर्विचारता किंवा लेखिकेच्या मुलीला तत्क्षणी आलेला विदेहत्वाचा अनुभव इथे आणखी सहा आयडींनी इंडीपेंडंटली वेरिफाय केला आहे (शाविकु, गवि, टर्मिनेटर, चित्रगुप्त , प्रतिसादाची लेखिका आणि डिबी). लेखिकेची आई आणि मुलगी यांना लेखनाची काहीही माहिती नसतांना आणि सात वर्षाच्या मुलीला अध्यात्माची सुतराम कल्पना नसतांना विदेहत्वाचा अनुभव आला आहे, तिच्या शब्दात : " she felt as if she was flying without feeling d body".
असो, त्यामुळे तुमच्या मुद्याला केवळ काही तरी खुसपट काढणं याव्यतिरिक्त काहीही अर्थ उरत नाही. हा घ्या तुमच्या लिंक मधला सायंटिफिक प्रोसेसचा नेमका उतारा
_______________________________________________
It involves careful observation, applying rigorous skepticism about what is observed, given that cognitive assumptions can distort how one interprets the observation. It involves formulating hypotheses, via induction, based on such observations; experimental and measurement-based testing of deductions drawn from the hypotheses; and refinement (or elimination) of the hypotheses based on the experimental findings. These are principles of the scientific method, as distinguished from a definitive series of steps applicable to all scientific enterprises
__________________________________________________
जितक्या नम्रपणे तुम्ही प्रतिसाद देता तितक्याच नम्रपणे सांगतो की तुमचं स्वतःचं फक्त निश्चित मत इथे मांडा. मला प्रतिसाद देतांना ( मी मागितल्याशिवाय) निष्कारण सपोर्ट लिंक्स देऊ नका.
माझं इंग्रजी अतीउत्तम असलं, कोणत्याही लिंकचा मी यथोचित समाचार घेऊ शकत असलो आणि कोणत्याही फोरमवर कोणत्याही दिग्गजाशी मी इंग्रजीतून चर्चा करायला समर्थ असलो तरी अशा लिंक्स वाचायला मला वेळ नसतो !
23 Nov 2020 - 9:10 am | अर्धवटराव
केवळ याच धाग्यावर म्हणुन नाहि, पण इतरत्रही अशा प्रकारच्या चर्चेत तुम्ही जि चिकाटी दाखवता, भाषाशैली वापरता, मुख्य म्हणजे जो प्रामाणीकपणा दाखवता... त्याला _/\_
मतभिन्नता असणं स्वाभावीक आहे, आणि त्यानुषंगाने वाद-विवाद देखील आपसुक आलेच. पण समोरचा माणुस बदमाशी करत असला तरी आपला तोल ढळु न देता प्रामाणीकपणे चर्चा करत राहाणं सोपं नाहि.
पुन्हा एकदा _/\_ _/\_
23 Nov 2020 - 5:13 pm | विटेकर
नेहमीप्रमाणे च ... मी मी मी ... भंकस ....
वेळ वाया गेला ...
24 Nov 2020 - 5:34 am | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
तुमचे हे दोन प्रतिसाद वाचले :
१. https://www.misalpav.com/comment/1087043#comment-1087043
२. https://www.misalpav.com/comment/1087033#comment-1087033
माझी मतं सांगतो.
१.
ही माहिती पूर्ण नाही. पूर्ण माहिती द्यायची झाली तर नवनाथ भक्तिसारातले लांबलचक अध्याय (३०, ३१, इत्यादि) लिहावे लागतील.
२.
का बरं? पौर्णिमेस चंद्र व सूर्य विरुद्ध बाजूस असतात. मग भरतीचे दोन फुगवटे दिसणं तार्किक आहे. पण अमावास्येला सूर्य व चंद्र एकाच बाजूला असतात. तेव्हा पृथ्वीच्या पाठीमागील बाजूस उधाणाची भरती येणं न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत बसंत नाही.
फार काय, ठाण्याला खाडीच्या जवळ मासुंदा तलाव आहे. खाडीला भरती येते, पण तलावाला भरती येत नाही. ही न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांतली खोट आहे.
३.
हवेपेक्षा जड वस्तू हवेत उडू शकंत नाही, असा एक गैरसमज काही शतकांपूर्वी युरोपात प्रचलित होता. तशाच धर्तीचा हा बाळबोध प्रश्न आहे.
४.
पण बोटांचे गोल गुंफून तत्काळ विदेहत्व प्राप्त होतं, हे मात्र इथे मान्य आहे.
५.
तुमचं हे विधान पार असंबद्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ब्रह्मन् जरी एकसंध असलं तरीही वेदान्त, सिद्धान्त व धादान्त अशा तीन प्रकारच्या प्रचीती मानल्या जातात.
६.
गुढघ्यापासून खाली पाय नसले तरी माणसं चक्रासनावर ( = व्हीलचेअर वर) बसतातच ना? मग खाली जमिनीवर नाही का बसता येणार?
७.
बसला असेल टेकून भिंतीला. किंवा केली असेल काहीतरी व्यवस्था मच्छिंद्रनाथांनी. हा काही फार गहन प्रश्न नाही.
८.
बोटांचे गोल गुंफतांना थोडी दारू ढोसून बसलेलं चालतं का, याचाही छ्डा लावावा आणि शक्य झाल्यास तशी दुरुस्ती करावी. काये की सर्व प्रक्रिया एकदम आनंदी होऊन जाईल. जणू एखादा उत्सवच.
९.
तुम्हांस आचंबित करणे हे आमचे ध्येय नव्हे.
१०.
बोटांत बोटं घालून विदेहत्व मिळवायचं ठरवलं की भक्तांपुढे काही पर्याय उरतो का ? या ही शक्यतेचा आपल्या (इतर वेळी सक्रीय असलेल्या) तर्कबुद्धीनं यथोचित विचार व्हावा असं नम्रपणे सुचवतो.
११.
धड जमिनीवर बसल्यावर त्याला खालून आधार द्यायला मांडीची हाडं शाबूत आहेत. बाकी, बोटांचे गोल गुंफून जीवनाचा उत्सव सुरू करणे याला हातचलाखी म्हणावं की बोटचलाखी?
१२.
हा समज चुकीचा आहे. मोटार तरंगल्याशिवाय पुढे जाते.
१३.
नाही. बोईंग नुसते हवेत तरंगण्यासाठी निर्माण झालेले नाही. म्हणूनंच बोईंगची तुलना तरंगत्या शिळेशी करायची नसते.
१४.
हा तर्क चुकीचा आहे. ऑईल रिग मध्ये व्यक्तिगत परावलंबन नसते. याउलट व्यक्तिगत योगसामर्थ्य लावल्यास प्रचंड प्रमाणावर परावलंबन निर्माण होईल.
१५.
तसंही पाहता केवळ तरंगत्या शिळेसारखं एका जागी तरंगून पुढेपुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुरस्सरणार्थ इंधनाची गरज लागेलंच. ते इंधन तेल वा तत्सम पदार्थांपासून मिळवावे लागेल. त्यामुळे व्यक्तिगत योगसामर्थ्य आणि तेलविहिर यांची तुलना यथायोग्य नाही.
१६.
व्यक्तिगत योगसामर्थ्य वापरून युद्धे का म्हणून थांबवायची? त्यापेक्षा बोटांचे गोल गुंफून युद्ध थांबवणं फायदेशीर नाही का?
१७.
अवश्य पाहीन. असेल नशिबात तर शिळा तरंगावणारा मिळेल. अन्यथा माझा मी समर्थ आहेच.
तसंही पाहता तरंगत्या शिळेखालची साधना सामान्य लोकांसाठी नाहीच. ज्याअर्थी तुम्ही मला शिळा तरंगवणार्याची वाट पाहायचा सल्ला देताहात त्याअर्थी मी असामान्य आहे अशी तुमची खात्री झाली असावी. तुमच्या या दिलदारीबद्दल आभारी आहे. :-)
१८.
सूर्य उगवला आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्यासाठी आम्ही प्रतिसाद मागवीत नाही.
१९.
म्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नाही.
२०.
वैज्ञानिक सत्य नामक कोणतीही चीज या जगात अस्तित्वात नाही.
२१.
म्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नव्हे.
२२.
माझ्या लिंकमधल्या उताऱ्यात hypotheses या शब्दाच्या एका उल्लेखाखाली दुवा आहे. त्यावर टिचकी मारली की हे पान उघडतं : https://en.wikipedia.org/wiki/Hypothesis
या पानावर दिसतं की हायपोथिसिस सायंटिफिक म्हणून गणला जायला हवा असेल तर तो टेस्टेबल ( म्हणजे चाचणी करण्याजोगा ) असावा लागतो. मूळ वाक्य : For a hypothesis to be a scientific hypothesis, the scientific method requires that one can test it.
तुमचा हायपोथिसिस सायंटिफिक म्हणवता तर मग तो टेस्टेबल आहे का? सांगोपांग चाचणी ( म्हणजे रिगरस टेस्टिंग ) करता येत नसल्यास सायंटिफिक हा शब्द वापरू नका म्हणून सुचवेन.
२३.
म्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नव्हे.
२४.
तुमच्या जो काही हायपोथिसीस आहे त्याची सांगोपांग चाचणी दाखवा आणि सायंटिफिक म्हणवून घ्या.
२५.
माझा युक्तिवाद ज्याच्यावर आधारित आहे त्या मजकुराचा स्रोत देणे माझ्या मते खुलेपणाचं लक्षण आहे. तुम्हांस तो वाचायचा वेळ नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही.
बाकी, सपोर्ट लिंका दिल्या तर इतका तिळपापड का होतोय तुमचा?
२६.
असं असेल तर मग सायंटिफिक हा शब्द वापरू नका. अन्यथा दुसरा पर्याय म्हणजे वेळात वेळ काढून सायंटिफिक प्रोसेस समजावून घेऊन त्यानुसार चाचणी करण्याजोगं हायपोथिसीस मांडणं हा आहे.
आ.न.,
-गा.पै.
24 Nov 2020 - 2:56 pm | संजय क्षीरसागर
आमच्या अल्प मती नुसार तीन मुद्यात त्याचा गोषवारा घेण्याचा प्रयत्न करतो.
१. निर्विचारिता येईल हे आमचे हायपोथेसिस असून तत्क्षणी निर्विचारता येते हा तिचा रिझल्ट आहे त्यामुळे आमची ध्यानपद्धती, आपणास अपेक्षित असलेल्या सायंटिफिक मेथडनेही सिद्ध होते असे इथे नम्रपणे नमूद करतो. (आपल्या प्रतिसादातील मुद्दे १९ ते २६ बघावे)
२. ' आपले खाली पडलेले पाकीट आपण लगेच उचलतो ही घटना म्हणजे न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत धुडकावला ' असे आपणास वाटत असावे असे आपल्या एकूण प्रतिसादावरुन आम्हास वाटते. आमच्या मते ते केवळ बला-बलातील फरकामुळे शक्य होते, म्हणजे गुरुत्वाकर्षणापेक्षा पाकीटाच्या काळजीने व्यक्ती जास्त बलप्रयोग करते. तरीही पाकीट हाती लागल्यावर व्यक्ती त्याच स्थितीत उभी राहिली तर यथावकाश भुईसपाट होईल असे गुरुत्वाकर्षण सिद्धांताचे आमचे आकलन आहे. आपला अनुभव काही वेगळा असल्यास प्रचिती घेऊन कळवावे. (आपले मुद्दे २ ते १८ पाहावे)
३. मुद्दा क्रमांक ८ मधे आपल्या स्वाभाविक नम्रतेचा तोल काहीसा ढळलेला दिसतो असे अतीनम्रपणे सांगावेसे वाटते. इथे आलेल्या प्रतिसादात एका सदस्येच्या ७ वर्षीय कन्येला जर विदेहत्त्वाचा अनुभव आला असे नमूद केले आहे तर आमच्या साधनेत मद्यप्राशनाची गरज नाही हे आपल्यासारख्या तर्कशुद्ध विचारसरणीच्या नजरेतून कसे सुटले बरे ?
तरीही आम्हाला मद्यप्राशनाचा वैयक्तिक अनुभव असल्याने ते घेतल्यावर आपणाबरोबर जगही तरंगल्यासारखे वाटते हे बारीक खरे. त्यामुळे आपल्या शिळाप्रयोगात तसे तर झाला नसेल ना ? अशी पुसटशी शंका मात्र मनात येऊन गेली. आपल्यासारख्याच प्रगाढ श्रद्धा असलेले एक गांजाश्री इथे आहेत. कुणाच्याही कोणत्याही समस्येला ते गांजा मारा असा अनमोल सल्ला भर पब्लिक फोरमवर बिनदिक्कतपणे देत असतात. त्यामुळे तरंगाईतता साधण्यासाठी अध्यात्मिक जगतात गांजा ही मद्यपानापेक्षा श्रेष्ठ दर्जाची कॢप्ती समजण्याचा प्रघात असावा असे आमचे (अनुभवशून्य का असेना) पण निरिक्षण आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधल्यास शिळा तरंगती दिसावी यासाठी गांजा की मद्यपान अशी साद्यंत चर्चा करुन नेमका निष्कर्श येथे मांडावा असे सुचवेन.
आमच्या अल्प मतीनुसार मात्र सर्व अस्तित्त्वच एका अथांग पोकळीत तरंगत आहे, खुद्द वसुंधराच तरंगाईत असल्याने आपल्या इवल्याशा आणि क्षणभंगुर देहाची ती काय वेगळी अवस्था ? असा आमचा एक तर्कशुद्ध आणि अनुभवसिद्ध सिद्धांत आहे . तस्मात देहाची तरंगाईतता अनुभवण्यासाठी कोणत्याही योग सामर्थ्याची आम्हाला कधी गरज भासली नाही. आम्ही आमच्या साधनेने विदेहत्त्व साधताच ती विनासायास उपलब्ध झाली. आमचा अनुभव इथल्या सदस्येच्या सात वर्षीय कन्येनं, या भानगडींची काहीही कल्पना नसतांना सुद्धा एंडोर्स केला त्यामुळे आम्हाला कमालीचा आनंद वाटला हे मात्र इथे नम्रपणे नमूद करायला हवे.
24 Nov 2020 - 1:31 pm | शाम भागवत
बापरे! बरीच चर्चा झालीय. मायबोलीवरच्या नानबांची पण उपस्थिती!
पण ही लेखमाला आहे असे कळतंय.
ती लेखमाला संपेपर्यंत तरी
मी निवांत बसणार आहे.
25 Nov 2020 - 1:02 am | संजय क्षीरसागर
ज्यांनी आमच्या धाग्यावर न येण्याचा पण केला होता ते ही आता इथे येऊन ठेपले आहेत. अर्थात, हा पब्लिक फोरम असल्याने कुणाला कुठेही जाण्याचा हक्क आहे पण सद्य परिस्थिती हे आमचे सुदैव समजावे का त्यांचे दुर्दैव या विचारात आज आम्ही आहोत हे मात्र नक्की. आमच्या अल्पमतीने आम्हाला असे वाटते की :
१. शिळा तरंगवणारे, डेड मॅनला उठवणारे, श्रीहरीला लंच भरवणारे (हे आज आम्हाला नव्याने समजले हे पुन्हा नम्रपणे नमूद करतो), झालेच तर मान्यताप्राप्त ग्रंथातून दिव्य उतारे कॉपी पेस्ट मारुन त्यावर निरुपणात्मक भाष्य करणारे आणि इतकेच काय तर संकेतस्थळाच्या अधिकृत धोरणातल्या क्रमांक चारच्या नियमाला धुडकावून सरळसरळ व्यक्तिगत प्रतिसाद देणारे असे सगळे एकावेळी उपस्थित असून ही आम्ही सिद्धत्त्वाची घोषणा करतो आणि धाग्याचा रंग जरा ही बदलू देत नाही हे काय गौडबंगाल असावे ? असा प्रश्न त्यांना पडला असावा असे आम्हास वाटते.
२. इतकेच काय कमी होते तर इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स हा स्वरुपोलब्धीतला एकमेव अडथळा आहे असे भर पब्लिक फोरमवर जाहीर करण्याचे धारिष्ट्य दाखवून आम्ही सर्वांच्या हृदयाच्या तारा छेडल्या असाव्यात, असा ही एक रास्त कयास आहे. आमच्या स्वल्पमती नुसार एकवेळ सेक्सवर खुली चर्चा होईल पण स्वतःला इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स आहे ही उघड गोष्ट लपवण्यातच सारी मानवता गुंतली आहे. त्यात आम्ही सुरुवातीला असे विधान केले की जर सत्यच चराचर व्यापून आहे तर स्वतःला सत्य न समजणे हाच अहंकार आहे त्याचा प्रतिवाद त्यांना धाग्यावर करणे अवघड होऊन बसले असावे.
३. आता बहुजनांना हा डबल ट्रबल झाला असावा असे आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन सांगते. म्हणजे साधना केली तर विचार थांबतील, त्यामुळे यथावकाश आपल्या भन्नाट स्टोर्या केवळ आपल्या मेंदूशिवाय कुठेही नव्हत्या हे उमजून मोठी पंचाईत होईल हा एक धसका. आणि आपल्याला इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स असल्याने आपण स्वतःला सत्य समजत नाही ही उघड गोष्ट मान्य करायची तर तो ही एक अनावस्था प्रसंग.
४. तर ते एक असो, बहुजन हितार्थ असे सांगावेसे वाटते की : आपण देहात आहोत हा एकमेव भ्रम व्यक्तिमत्त्वाचा भास निर्माण करतो > व्यक्तिमत्त्व हाच अहंकार आहे > उधृत केली साधना तुम्हाला निर्विचारातून विदेहत्त्वाकडे नेईल > त्या वेळी तुमच्या लक्षात येईल की देहात कुणीही नाही > त्यामुळे तुमची मृत्यूची भीती संपेल आणि > तुम्ही अमृताला उपलब्ध व्हाल > जे तुम्ही आता या क्षणी आहातच पण देहाच्या (भासात्मक) बंदीवासामुळे तुम्हाला तो उलगडा होत नाही.
आता या उप्पर काय करायचे ते प्रत्येकाने स्वतःचे स्वतः ठरवावे असे नम्रपणे नमूद करतो.
25 Nov 2020 - 8:41 am | शा वि कु
शिळा प्रकरण उहापोहात जास्तच वेळ घालवला.थोडं असं पाहा. मच्छीन्द्रनाथांचा जन्म ब्रम्हाचे वीर्य माश्याने गिळल्यामुळे झाला. वालखिल्य ऋषींची जन्मकथा तर अजून गमतीशीर. असेच कुठेकुठे ब्रम्हाचे आणि सूर्याचे इत्यादींचे वीर्य चित्रविचित्र ठिकाणी पडून अनेक ऋषीमुनींचा जन्म होतो. उदा- हत्तीच्या कानात,
वाघाच्या पायावर इत्यादी.
ह्या सगळ्या रुपककथा आहेत. शिळा उचलून धरणे सुद्धा. त्यामुळे शिळा खरोखरीच कोणी उचलून धरलेली कि नाही हा गौण मुद्दा आहे. त्यातला गर्भित अर्थ काय आहे हे एक्स्पर्ट सांगू शकतील.
25 Nov 2020 - 2:44 pm | संजय क्षीरसागर
१. .
या लक्षणीय कथा सांगून एकतर आपण शरीरशास्त्राचे सर्वज्ञात आणि सर्वमान्य नियम एका क्षणात धुडकावून लावले आहेत असे आम्हास वाटते. किमान स्वतःच्या जन्माची कथा आपण ऐकली असती तर आपल्याकडून असे औधृत्य झाले नसते असे ही वाटून गेले. शिवाय शरीरशास्त्राचा अभ्यास नसलेले अशिक्षित सुद्धा, स्वानुभवाधारित असा थोडाफार विचार करु शकले तर या कथा ऐकून अचंबित होण्याची शक्यता शून्य असावी.
ते एक असो, सामाजिक दृष्ट्या सुद्धा अशी इथे-तिथे सांड-लवंड बरी नव्हे, असा ही एक भाबडा विचार मनाला स्पर्शून गेला.
या मानसिक धक्यातून सावरत पुढे वाचले असता थोडा दिलासा मिळाला हे मात्र नमूद करण्या जोगे आहे.
२.
या प्रकारच्या कथा ग्रंथात सुरुवातीलाच उधृत केल्या आहेत असे आम्हास येथिल तर्कनिष्ठ सदस्य श्री गापै यांच्या प्रतिसादातून नुकतेच समजले. त्यामुळे शिळा तरंगवणे काय की डेड स्टेनोला हाक मारुन उठवणे काय की श्रीहरी यांना जेवू घालणे काय या कपोलकल्पित घटना आहेत असे इथले कुणीही सदस्य मानत नाहीत हे आपल्या अजून लक्षात आले नाही काय ? अन्यथा आम्हाला इतका प्रतिसाद प्रपंच का करावा लागला असता बरे ?
आमच्या अल्पमती नुसार सदर कथांमागे एकच रहस्य असावे ते असे की सर्व भक्तगणांना कमालीचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स यावा कारण सर्वांचा जन्म नॉर्मल-कोर्समधे इंटरकोर्स होऊन झालेला असतो. मग त्यांनी त्या कथा जशाच्या तश्या पुढे सरकवाव्या आणि पुढच्यांनी त्या विचार न करता डायरेक्ट `हृदयस्थ कराव्या ' ! नाही तर या चित्त-चक्षू चमत्कारिक कथा हजारो वर्षानंतर आज २५ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या? याचा आपण विचार करावा.
आणि तो विचार करुन झाल्यावर आज इथले सन्माननीय सदस्य, आमच्या एका सोप्या ध्यानपद्धतीची प्रचितीच न घेता ती परस्पर बाद ठरवून; आमच्याशी नाहक वाद घालून आम्हाला अहंकारी, अतींद्रीय शक्तींची माहिती नसलेले, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अशी दूषणे देऊन त्या कथा प्राणपणाने का जपत असावेत बरे ? याचाही मागोसा घ्यावा असे सुचवेन.
याप्रकारे आपला समग्र अभ्यास झाल्यावर आमच्या दुसर्या लेखात आम्ही इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स हाच सत्योपलब्धित एकमेव अडथळा आहे असे का म्हटले असावे बरे ? हे एखादे वेळी आपल्याला उलगडण्याची शक्यता आम्हास वाटते.
25 Nov 2020 - 4:16 pm | आनन्दा
माझा (निनावी) उल्लेख केला आहात म्हणून सांगतो,
एका काळ्या जादूचा मी एकदा अत्यंत ओझरता अनुभव घेतला आहे, आणि त्या ओझरत्या अनुभवाने माझे अशी काही पिवळी झाली होती की आता विज्ञाननिष्ठ अध्यात्म म्हटले की हसायलाच येते.
मी इतरत्र देखील सांगितले आहे, मी सत्य पाहिलेले नाही, पण सत्याचा आणि अतींद्रिय जगाचा अत्यंत ओझरता अनुभव घेतलेला आहे, आणि तो इतका तीव्र आहे की सत्य म्हणजे काय असेल याबद्दल माझ्या मनात काहीही शंका उरलेली नाही, आणि त्याचबरोबर या जगात आपण किती छोटे आहोत याचा देखील अनुभव दुर्दैवाने मी घेतला आहे, त्यामुळे त्याबद्दल देखील मला शंका उरलेली नाही.
संक्षी परत सांगतो - तुम्हाला जे मिळाले आहे ते काहीतरी ठोस आहे यात वाद नाही, पण इतरांना नावे ठेवणे, तीव्र तर्कवाद , अपलाच मार्ग खरा आणि बुद्धीच्या बळावर सत्य जाणण्याचा प्रयत्न करणे हे मला तुमच्या पुढील वाटचालीच्या दॄष्टीने धोकादायक वाटते. तुम्हाला अनुयायी मिळतील, नावाजणारे लोक मिळतील पण तुमची प्रगती थांबेल.
वर शाम भागवत काय म्हणत आहेत ते देखील वाचा. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच. तुमच्या वाटचालीस शुभेच्छा! इत्यलम|
25 Nov 2020 - 7:10 pm | शा वि कु
हो, खरंय. पण आणखी काही नवीन माहिती किंवा विधान अस्तित्वात नाही की ज्याने हे त्यांचे मत बदलेल. सो व्हाय बॉदर ? "मच्छिंद्रनाथांनी न्यूटनच्या नियमांच्या कक्षेत नसलेल्या बलांचा उपयोग केलेला असू शकतो" इथे तार्किक त्रूटी का गामांना दिसत नाही ? दिसत असावी, पण त्यांची श्रद्धा आहे. कोणत्याही युक्तिवादाने त्यात काही फरक पडणार नाही.
त्यांची मर्जी.
ह्रद्यस्त करावे किंबहुना वाचावे कि नाही हा ज्याचा त्याचा चॉईस.इतर लोक्स कथा म्हणून न वाचता इतिहास म्हणून वाचतात, आपणही तसेच वाचले पाहिजे असे नाही.
25 Nov 2020 - 11:16 pm | संजय क्षीरसागर
लोक त्या कथा इतिहास म्हणून वाचत नाहीत तर चमत्कार मानतात ! आणि अशा चमत्कारांना अतींद्रिय शक्ती वगैरे म्हणून आणखी झोल करुन ठेवतात. मग असे हातचलाखीचे खेळ करणारे लोक त्यांना सिद्ध वाटायला लागतात. कोणत्याही अडाण्याला डोक्यावर घेऊन ते नाचायला कमी करत नाहीत. ओशो हे एकमेव सिद्ध होते की ज्यांनी युगानुयुगे चाललेल्या या अनिष्ट परंपरेला छेद देऊन, मी कोणताही चमत्कार करत नाही हा एकच चमत्कार करतो ! असं म्हणायचं साहस केलं. आणि सत्योपलबद्धीचा मार्ग सूज्ञपणे विचार करणार्या सुशिक्षित आणि बुद्धीमान लोकांना मोकळा करुन दिला.
25 Nov 2020 - 11:11 am | सुबोध खरे
आमच्या अल्पमतीने
आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन
असे नम्रपणे नमूद करतो
बाप रे
संक्षी कडून असे अनपेक्षित शब्द जालावर उमटले?
मुंगीने मेरुपर्वत गिळला की समुद्र कोरडा झाला?
25 Nov 2020 - 11:13 am | सुबोध खरे
आमच्या अल्पमतीने
आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन
असे नम्रपणे नमूद करतो
बाप रे
संक्षी कडून असे अनपेक्षित शब्द जालावर उमटले?
मुंगीने मेरुपर्वत गिळला की समुद्र कोरडा झाला?
25 Nov 2020 - 12:06 pm | संगणकनंद
त्यांच्या प्रतिसादातील काही शब्द बदललेत, बाकीची वैशिष्ट्ये तशीच आहेत :)
25 Nov 2020 - 9:45 am | संगणकनंद
लेखकाने सुरुवातीला "ही लेखमाला उत्तरोत्तर रंगत जाणार" अशी बढाई मारली होती. मात्र लेखमाला दुसऱ्या भागातच फुस्स झाली. लेखकाच्या स्वयंघोषित सिद्धत्वाची मजा घेणारे चार प्रतिसाद सोडले तर तिकडे कुणी मिपाकर फिरकलेही नाहीत.
दोन भागातच दी एंड झालेल्या या लेखमालेचा पहीला भाग लेखकाच्या सुदैवाने टीआरपी खेचतोय. त्यामुळे लेखक विनम्र झाला आहे . :)
25 Nov 2020 - 12:57 pm | संजय क्षीरसागर
एकूण प्रतिसादावरुन आपला अध्यात्मिक अभ्यास लक्षणीय असावा असे दिसते शिवाय आपण अंतर्यामीही आहात असा नवाच उलगडा आज आम्हाला झाला आहे. आपल्याला तीन प्रश्न विचारले होते ते पुनरुधृत करतो. व्यक्तिगत प्रतिसादाच्या देण्याच्या आपल्या व्यस्त उपक्रमातून जरा वेळ काढून आपण याचा खुलासा कराल काय ?
१. अष्टावक्राचा सांख्ययोग सत्याचा आविष्कार कसा करतो ? याविषयी आपले विचार इथे मांडावे त्यामुळे इतरांनाही आपल्या ज्ञानाचा लाभ घेता येईल.
२. अष्टावक्रानं स्वरुपोलब्धीसाठी कोणती साधना सांगितली आहे ? याचा ही उलगडा तो श्लोक नेमका कोणत्या अध्यायात आहे ते सांगून करावा.
३. आपण केलेल्या आध्यात्मिक लेखनाच्या लिंक्स देता येतील का ? तसे केल्यास उत्तम कारण केवळ आपल्या प्रतिसादांवरुन आपल्या अलौकिक बुद्धीमत्तेचा अंदाज बांधणे आम्हास तरी उचित वाटत नाही.
25 Nov 2020 - 2:03 pm | संगणकनंद
ते उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या लेखमालेचे काय झालं? तुम्ही तर स्वतःच दुसऱ्या धाग्याकडेही फिरकेनासे झालात.
याच धाग्यावर टीआरपी खेचत राहणार काय? की तिसरा भाग ही टाकणार?
तुमच्या प्रश्नांचे म्हणाल तर अष्टवक्र वाचले/कळले म्हणजेच अध्यात्म कळले असे आहे काय?
आणि तुम्हीही बोटं गुंफून आणि लोलक बनवून फार मोठा तीर मारलेला नाही. याच धाग्यावर अर्धवटराव आणि गांपै सारख्या अभ्यासू आयडीने तुमच्या अध्यात्मातली हवा काढली आहे.
25 Nov 2020 - 3:15 pm | संजय क्षीरसागर
अत्यंत विद्वत्तापूर्ण प्रतिसाद दिला होता याचे विस्मरण झाले काय ? की आपल्याला अष्टावक्र कोण आणि त्याची संहिता काय याची कल्पना नसतांना आपण असे केले ? किंवा एकूणात आपल्याला कशातच काही गम्य नाही ?
ही पोस्ट आध्यात्मिक आहे हे आपल्यासारख्या विद्वान व्यक्तीला लक्षात आले नसेल असे आम्हास वाटत नाही. तरी आपण विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळून स्वतःचाच अवमान करुन घेऊ नये आणि आपण केवळ निर्बुद्ध प्रतिसाद देत नाही तर आपण ही आध्यात्मिक उंची गाठली आहे हे सर्वांना दाखवून द्यावे असे आम्हास वाटते.
१. अष्टावक्राचा सांख्ययोग सत्याचा आविष्कार कसा करतो ? याविषयी आपले विचार इथे मांडावे त्यामुळे इतरांनाही आपल्या ज्ञानाचा लाभ घेता येईल.
२. अष्टावक्रानं स्वरुपोलब्धीसाठी कोणती साधना सांगितली आहे ? याचा ही उलगडा तो श्लोक नेमका कोणत्या अध्यायात आहे ते सांगून करावा.
३. आपण केलेल्या आध्यात्मिक लेखनाच्या लिंक्स देता येतील का ? तसे केल्यास उत्तम कारण केवळ आपल्या प्रतिसादांवरुन आपल्या अलौकिक बुद्धीमत्तेचा अंदाज बांधणे आम्हास तरी उचित वाटत नाही.
25 Nov 2020 - 3:56 pm | संगणकनंद
अजून दोन चार भाग येऊ द्या, मग विचार करेन तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा. तुमची ज्ञानार्जन करण्याची कळकळ पुरेशी दिसत नाही मला. तुम्हाला याच धाग्यावर टिआरपी खेचायचा आहे कारण लेखमाला दोन भागातच फुस्स झाली आहे हे एव्हाना तुम्हाला कळले आहे.
25 Nov 2020 - 4:20 pm | संजय क्षीरसागर
आम्ही पुरते हरखून गेलो आहोत. त्यात आपण म्हंटले आहे :
याचा अर्थ अष्टावक्राबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही असा घ्यावा की आपण त्याही पलिकडची उंची गाठली आहे ? याची नेमकी कल्पना येत नाही.
सध्या पुरता तरी तुम्हाला अष्टावक्राबद्दल काहीही माहिती नाही असा तर्कपूर्ण अर्थ निघतो. पण आपण त्याही पलिकडे आहात असे आपल्या एकूण अविर्भावावरुन वाटते. तरी आपण केवळ निर्बुद्ध प्रतिसादक नसून एक पोहोचलेली व्यक्ती आहोत याची प्रचिती इथे आपले अध्यात्मिक आकलन दाखवून देऊ शकाल काय ?
आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी सत्योपलब्धीसाठी नक्की कोणता मार्ग निवडावा आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगा कारण आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
25 Nov 2020 - 7:25 pm | संगणकनंद
तुम्ही कितीही विदेहत्वाच्या आणि सिद्धत्वाच्या बाता मारल्यात तरी तुमचे मडके कच्चे आहे. जीवन कळले हे समजण्याची एक सोपी खूण आहे:
जीवन त्यांना कळले हो
मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो
तुम्ही काळ परवा पासून प्रतिसादात नम्रपणा आणू पाहत आहात ही चांगली गोष्ट आहे. मात्र अजूनही इतरांप्रती असलेला तुच्छताभाव गेलेला नाही हेच हा प्रतिसाद दर्शवतो.
आणि शेवटी, खरंच तुम्हाला अध्यात्म कळत असतं किंवा सत्याचे ज्ञान झालेले असते तर मी तुमच्या धाग्यावर काय लिहीतो याने तुम्हाला फरक पडला नसता. मात्र तुम्ही मला काहीच कळत नाही हे सिद्ध करायला कंबर कसली आहे.
म्हणून म्हणतोय, मडके कच्चे आहे.
25 Nov 2020 - 8:18 pm | संजय क्षीरसागर
छे, छे आपण कच्च्या मडक्याची तमा बाळगू नका. तुम्ही सर्वज्ञानी आणि अंतर्यामी आहात. अष्टावक्राची संहिता काय आहे याची सुतराम कल्पना नसतांना आपण डायरेक्ट `अनावधानस्य सर्वत्र' वर बिनदिक्कत प्रतिसाद देता हे खरे भयमुक्ततेचे लक्षण आहे हे इथे दाखवून द्याच असे सुचवेन.
अर्थात, त्यासाठी तुम्हाला आपली अफाट ज्ञानक्षमता, किमान या बेसिक गोष्टींचे उत्तर देऊन करावी लागेल :
आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी सत्योपलब्धीसाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण आमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
25 Nov 2020 - 8:35 pm | संगणकनंद
अध्यात्मिक जाण ही तुमच्यासाठी दाखवण्याची गोष्ट आहे, आणि ती दाखवण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही. तुम्ही ज्याला अध्यात्मिक जाण समजताय ते खरे तर पुस्तकी पांडित्य आहे.
अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे, प्रदर्शन मांडण्याची नव्हे.
25 Nov 2020 - 10:33 pm | संजय क्षीरसागर
आपण आपले गुह्य इथे फॉककन (एका क्षणात) विदेहत्व ! उघडे केले आहे. आपले अध्यात्मिक आकलन मांडायला आपल्याला धड चार ओळी सुद्धा लिहिता येत नाहीत त्या ही कुठून तरी कॉपी पेस्ट कराव्या लागतात असे मात्र आम्ही कदापि म्हणणार नाही कारण आपली नम्रताच इतकी अमाप आहे की त्याचे श्रेय आपण स्वतःकडे घेऊ इच्छित नाही. आपल्याला विदेहप्राप्ती कशी झाली याची नोंद आता मिपा इतिहासात कायमची राहिल.
आमचे मडके कच्चे असल्याने आपण कृपया खालील खुलासे करावे असे सुचवतो :
१. निदान सुरुवातीला तरी साधना दीर्घकाल करावी लागते असे म्हणतात. आपल्या साधनेमुळे इतरांची गैरसोय होते यावर साधकाने कशी मात करावी ? थोडक्यात, आम्हाला आपल्या भयमुक्त किंवा लोकलज्जा शून्य स्थितीची कल्पना आली आहे पण सतत वाजणार्या दाराने, साधनेत येणार्या विक्षेपाला आपण कसे तोंड दिले ?
२. साधनेसाठी आपण शोधलेल्या दिव्य स्थानी व्यक्ती दीर्घकाल व्यतीत करत असेल तर घरातल्या लोकांचा गैरसमज होऊन त्यांनी औषधोपचार करुन घेण्याचे दडपण आणले नाही का ? शिवाय लोक इतके अज्ञानी आहेत की त्या मार्गाने एखादा विदेहत्त्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो म्हटल्यावर त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असे समजून मानसोपचारतज्ञाकडे नेण्याचे सुद्धा कमी करणार नाहीत, अशा वेळी साधकाने संयम राखून साधनेच्या स्थानी कसे अढळ रहावे ?
आपल्या दिव्य अध्यात्मिक आकलनाने संकेतस्थळावरच्या साहित्याचा दर्जा अचानक उंचावला आहे असे वाटून जे साधक आपल्या मार्गाने जाऊ इच्छितात त्यांना आपल्या खुलाश्याने फार मोठा दिलासा मिळेल अशी आम्हाला खात्री आहे, असे नमूद करतो.
26 Nov 2020 - 12:01 am | संगणकनंद
माझं वाक्य होतं: पोटाला तडस लागली असेल आणि काही कारणाने शौचास होत नसेल तर जेव्हा शौचास होते तेव्हाही मोकळं झाल्यानंतर विदेहत्व अवस्था प्राप्त होते.
यात एक विदेहत्व हा शब्द सोडला तर तुम्ही वर लावलेल्या गुर्हाळाचा लवलेश तरी आहे का? तुंबलेला रेटा सुटला की मोकळे वाटते इतक्या सरळ अर्थी वापरला होता तो शब्द. तुम्ही उगाच त्यात अर्थ शोधत बसला आहात. आणि प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिलेच पाहीजे या तुमच्या स्वभावामुळे उगाच मोठमोठे प्रश्न विचारुन येनकेन प्रकारेण मला काहीही येत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात. असलं कसलं तुमचं विदेहत्व आणि सिद्धत्व जे एका आयडीच्या प्रतिसादांनी अस्वस्थ होतंय?
26 Nov 2020 - 12:48 am | संजय क्षीरसागर
१. आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी विदेहत्त्व जाणण्यासाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण आमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
26 Nov 2020 - 1:30 am | संजय क्षीरसागर
अरे, एवढ्यात आपल्या मनात दुभंग निर्माण झाला काय ? आपल्या मनात हा विचार आलाच कसा ? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
ज्याला तुम्ही कच्चे मडके ठरवले आहे त्याचे बेसिक प्रश्न आपल्यासारख्या सर्वज्ञ व्यक्तीला, अज्ञान उघडे पडण्याची भीती घालतात ? हे आम्हाला तरी शक्य वाटत नाही. किंबहुना लोकलज्जा आपल्यासारख्या पोहोचलेल्या माणसाला असायचे कारणच नाही हे आपण आपल्या प्रतिसादातून वेळोवेळी दाखवून दिले आहे. तरी आता माघार नाही असा ज्ञानी व्यक्तिसारखा निर्धार दाखवून, आपला शून्य वकूब आहे आणि पिंका टाकण्यापलिकडे आपल्याला काहीही जमत नाही असे समजणार्या लोकांना, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या ज्ञानाने दिपवून टाका.
26 Nov 2020 - 11:55 am | संगणकनंद
हे लोक म्हणजे तुम्ही आणि तुमचा चेला/डुआयडी असलेला अजून एक आयडी असे दोघेच. बरोबर ना? तुम्हा दोघाव्यतिरीक्त अजून कुणी असतील तर सांगा. :)
आणि ज्ञानाने दिपवून टाकण्याच्या गोष्टी ओशोंची चार पुस्तके वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पुस्तकी पंडीत करतात. असेच लोक नुसता खळखळाट करतात. आपण किती विद्वान आणि ज्ञानी आहोत हे दाखवण्यासाठी मिसळपाववरील धाग्यांची यादी देतात.
26 Nov 2020 - 1:34 pm | उन्मेष दिक्षीत
आपण सूज्ञ आहात, वरील आयडीने वारंवार मिपा धोरण ४ आणि ५ यांचे उल्लंघन केलेले आहे. त्यांचा आयडी, एकंदर वाटचाल आणि या धाग्यावरचे प्रतिसाद आणि त्यामागचा उद्देश बघून वेळीच समज देऊन मिपाचे अधःपतन थांबवावे.
४. व्यक्तिगत पातळीवर उतरणारे लेखन, लेखनाशी संबंधीत नसणारे अनावश्यक प्रतिसाद यासाठी मिसळपावावर खरडवही, खरडफळा आणि व्यक्तिगत निरोपांची सुविधा देण्यात आलेली आहे. मिसळपावावर प्रकाशित झालेल्या साहित्यात अशा प्रकारचे प्रतिसाद संपादक मंडळ कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अप्रकाशित करू शकते याची नोंद कृपया सर्व सदस्यांनी घ्यावी.
५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करणारे लिखाण, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल
- उन्मेष दिक्षीत
27 Nov 2020 - 7:44 am | संगणकनंद
खरं तर तुम्ही संक्षी यांचेच डुआयडी आहात आणि त्यांची बाजू सावरायला इथे उगवता असा दाट संशय आहे. पण तरीही तुम्ही स्वतंत्र आयडी असण्याचीही शक्यता गृहीत धरुन तुम्हाला संशयाचा फायदा देऊन लिहीतो.
सिद्ध महाराजांवर कुणी काही लिहू नये म्हणून तुमच्या जीवाचा आटापिटा चाललेला असतो. तुमची अपेक्षा आहे की तुमच्या गुरु महाराजांना मिपावर मोकळे रान मिळावे. त्यांनी येता जाता ज्ञानी पुरुषांना कमी लेखावे, इथल्या सदस्यांच्या मताची आणि विचारांची खिल्ली उडवावी, त्यांचा तुच्छतादर्शक शब्दात उल्लेख करावा. मात्र तुमच्या गुरु महाराजांना मात्र कुणी काहीच बोलू नये अशी तुमची अपेक्षा आहे.
तुमचे गुरु महाराज करतात ते अध्यात्म आणि बाकीचे करतात ते वैयक्तीक प्रतिसाद.
आता तुम्हाला गंमत सांगतो. तुम्ही हा जो मिपा धोरणाचा अभ्यास करुन जो प्रतिसाद लिहीला आहे त्याची वेळ आहे 26 Nov 2020 - 1:34 pm
तुमच्या गुरु महाराजांनी त्यांच्या लेखाचे विडंबन असलेल्या धाग्याला एक प्रतिसाद दिला आहे त्याची वेळ आहे 27 Nov 2020 - 1:40 am
म्हणजे बरोबर बारा तासांनी. काय म्हणतात तुमचे गुरु महाराज या प्रतिसादात? हे पहा:
केवळ आपल्या धाग्याचं विडंबन केले म्हणून ते माकडचाळे? आणि त्या धाग्यावर प्रतिसाद देणार्या वाचकांच्या आकलनाचा वकुबही तितकाच?
जर संक्षीचा डुआयडी नसाल तर तुम्हीही विचार करा. आणि सांगा, कोण चुकतंय.
27 Nov 2020 - 2:50 pm | उन्मेष दिक्षीत
आता मोकळे रान तर चक्क संपादकांनी दिलंय तुम्हाला. लगे रहो ! गवींनी सांगितल्याप्रमाणे खेळीमेळीचे वातावरण आणि एकमेकांच्या मतांचा आदर करु आता आपण.
मी संक्षींचा डु-आयडी नाही, तुम्ही ट्रॅ़क करुन बघा माझे प्रोफाइल. आणि तुमचे आयडी नाव अगदी कसेही आणि काहीही असले, तरी काय फरक पडतो ? तुम्ही एकदम ओरिजिनल त्याचू आहात.
पण तरीही तुम्ही स्वतंत्र आयडी असण्याचीही शक्यता गृहीत धरुन तुम्हाला संशयाचा फायदा देऊन लिहीतो.
>> डोंट वरी तुमच्या सारख्या ओरिजिनल आयडी ना हे विश्वास ठेवणे जड जाऊ शकते. पण याच्यासाठी, माझा कांदा लिंबू यांना लिहिलेला प्रतिसाद बघावा.
- उन्मेष दिक्षीत
27 Nov 2020 - 9:10 pm | संगणकनंद
गुरुचे विदेहत्व एका विडंबनाने कसे फुस्स झाले आणि त्यांचा खरा चेहरा कसा दिसला हे लिहीलेला भाग सोयिस्कर दुर्लक्षीत केला आणि डुआयडीचा स्वतःला सोयिस्कर मुद्दा फक्त उचलून धरला. जसा गुरु तसा चेला. :)
27 Nov 2020 - 9:19 pm | उन्मेष दिक्षीत
आय एम ऑनर्ड !
विडंबनाच्या धाग्यांचा कुणाला करमणुकीशिवाय काही उपयोग नसतो. आणि मी त्याचू सारखा संबंध नसताना तिथे जाऊन विडंबकाला नाही नाही ते बोलून गोंधळ घातलेला नाही. फरक समजून घ्या.
27 Nov 2020 - 9:33 pm | संगणकनंद
पून्हा मुद्दा टाळलात. तेव्हढं मुद्द्याचं बोला ना तुमच्या गुरुजींच्या लिलांबद्दल. :)
27 Nov 2020 - 9:47 pm | संगणकनंद
आणि मी धाग्यावर गोंधळ घालतो हा गोड गैरसमज मनातून काढून टाका. गोंधळ घातला की आयडी ब्लॉक होतो, विचारा तुमच्या गुरुजींना. :)
तुमच्या गुरुजींच्या धाग्यांचाही कुणाला करमणुकीशिवाय काही उपयोग नसतो.
26 Nov 2020 - 11:45 pm | संजय क्षीरसागर
१. आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी विदेहत्त्व जाणण्यासाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
३.
उपरोक्त गैरसमज होऊ नये याची जवाबदारी मात्र आता आपल्याला घ्यावीच लागणार आहे याची कल्पना अजून आपल्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला आली नसेल असे नाही. त्यामुळे उत्तर न दिल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती आपल्यासारख्या लोकलज्जेपासून मुक्त व्यक्तीला नक्कीच वाटत नसणार असे आम्हास वाटते. आमच्या अल्पमतीनुसार इतकी बेसिक उत्तरे न देता आल्याने आपण मुळातच त्याचू आहात की काय ? अशी लोकांची संयुक्तिक खात्री पटेल अशी एक संभावना मात्र आम्हाला वाटते आणि तसे आपण कदापि होऊ देऊ नका, असे सुचवेन.
27 Nov 2020 - 7:54 am | संगणकनंद
बाता अध्यात्माच्या मारता आणि एका विडंबनाने व्यथित होऊन त्या विडंबनाला माकडचाळे म्हणता आणि त्या धाग्यावर प्रतिसाद देणार्या सदस्यांच्या आकलनाचा वकुब काढता.
खरे अध्यात्म आपके बस की बात नही. तुम्ही फक्त ओशोंची पुस्तकं वाचा आणि इथे येऊन त्यावर लेख लिहून आपले पांडीत्य प्रदर्शीत करा. कुणी काही शंका घेतली तर त्याला मुर्खात काढा, त्याच्या तोंडावर तुमच्या इथल्या लेखांची यादी फेका. त्यातच तुमचे सौख्य सामावलेले आहे.
27 Nov 2020 - 3:21 pm | संजय क्षीरसागर
१. आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी विदेहत्त्व जाणण्यासाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
२. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
उपरोक्त गैरसमज होऊ नये याची जवाबदारी मात्र आता आपल्याला घ्यावीच लागणार आहे याची कल्पना अजून आपल्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला आली नसेल असे नाही. त्यामुळे उत्तर न दिल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती आपल्यासारख्या लोकलज्जेपासून मुक्त व्यक्तीला नक्कीच वाटत नसणार असे आम्हास वाटते. आमच्या अल्पमतीनुसार इतकी बेसिक उत्तरे न देता आल्याने आपण मुळातच त्याचू आहात की काय ? अशी लोकांची संयुक्तिक खात्री पटेल अशी एक संभावना मात्र आम्हाला वाटते आणि तसे आपण कदापि होऊ देऊ नका, असे सुचवेन.
27 Nov 2020 - 9:30 pm | संगणकनंद
सर्वांची म्हणजे फक्त तुमची. झालंच तर तुमच्या चेल्याची. तुम्हा दोघांव्यतिरीक्त इतरांची नावे सांगा.
सर्वांना शब्दासाठी वरचेच स्पष्टीकरण.
अध्यात्मिक जाण ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नाही हे मी याआधी दोन वेळा सांगितलं आहे. मात्र ओशोंची चार पुस्तक वाचून आपलं पुस्तकी पांडीत्य दाखवण्यालाच अध्यात्माची जाण समजणार्या आयडीला हे कदापी समजणार नाही. अशी संधी तुम्हालाच लखलाभ होवो.
तुम्ही सोडले तर अजून कुण्णाकुण्णाचा गैरसमज होणार नाही त्यामुळे काळजी नसावी. आणि कुणाचा गैरसमज झालाच तर मला फरक पडणार नाही.
पितळ उघडे पडण्याची भीती तुमच्या सारख्या बेगडी अध्यात्मवाल्याना असते. एक विडंबन सहन झाले नाही, लगेच त्याला माकडचाळे म्हणून मोकळे झालात आणि तिथे प्रतिसाद देणार्या लोकांचा वकुब काढलात. खरं तर त्या प्रतिसादाने तुमच्या बेगडी अध्यात्माचाच वकुब दिसला.
लोकांमध्ये कोण कोण येतं? फक्त तुम्हीच. तुमचं तुम्ही बघा. संभावनेची भीती तुमच्यासारख्या बेगडी अध्यात्मवाल्यांना असते. एक विडंबन सहन झाले नाही आणि गप्पा मारता सिद्धत्वाच्या आणि विदेहत्वाच्या.
27 Nov 2020 - 10:26 pm | संजय क्षीरसागर
१.
तसे समजा. पण फॉक्कन यापलिकडे आपले अध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही हे आता सिद्ध झाले आहे.
२.
एकूणात आपल्याकडे काहीच नाही हे सुद्धा कळले.
३.
आपल्याही प्रतिसादांची त्यापरता वेगळी स्थिती नाही.
27 Nov 2020 - 10:36 pm | संगणकनंद
मग नाचा आता :)
28 Nov 2020 - 11:50 pm | संजय क्षीरसागर
आपण इथे जो त्याचू डान्स दाखवला तो पुरेसा आहे. इथून पुढे असा प्रकार करु नये इतकी समज यावी अशी अपेक्षा.
29 Nov 2020 - 1:59 pm | संगणकनंद
संपादित.
व्यक्तिगत टीका टाळावी
29 Nov 2020 - 4:21 pm | संगणकनंद
स्वतःला सिद्ध आणि विदेही म्हणून घोषीत करणार्या धागाकर्त्यांनी माझे एक आठवड्यापूर्वीचे प्रतिसाद उकरुन काढून खाजवून खरुज काढली त्यामुळे तोल ढळला.
25 Nov 2020 - 5:00 pm | उन्मेष दिक्षीत
आत्ताच ब्रुस ली फाईट्स विडिओ बघत होतो. मिक्स्ड मार्शल आर्ट्स बघतो कायम. तर कंपेर्ड टु टुडेज मार्शल आर्ट्स, ब्रुस लीचे पंचेस, किक्स, टाईमिंग आणि स्पीड बघताना असं वाटतं कि त्याला विदेहत्व जाणवत असावं.
मायकल जॅक्सन चा डान्स किंवा फेडरर ला जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं खेळताना, असं वाटत होतं कि हि इज जस्ट फ्लोटिंग अराउंड द कोर्ट, इतका एफर्ट-लेसनेस मला वाटतं तेव्हाच येऊ शकतो जेव्हा कळत नकळत विदेहत्व जाणवतं. मला वाटतं कोणत्याही अॅक्टिविटीमधे जेव्हा हे साधतं तेव्हाच निष्प्रयास आणि क्रिएटिविटी येते.
25 Nov 2020 - 5:34 pm | संजय क्षीरसागर
मैफिल रंगते तेंव्हा गायकांना दुसराच कुणी तरी परफॉर्म करतोयं असं वाटतं कारण त्या क्षणी त्यांना विदेहत्त्व गवसलेलं असतं. पण मैफिल संपली की ते पुन्हा व्यक्तिमत्त्वाच्या दायर्यात घेरले जातात आणि देहबद्ध होतात. माझ्या ध्यानपद्धतीनं, कोणतंही कौशल्य आत्मसात न करता तुम्ही विदेही होता कारण आपल्याला देह नाही, तर फक्त देहाची जाणीव आहे.
25 Nov 2020 - 7:21 pm | सुबोध खरे
यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील !
असं काहीही होत नाही.
इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे.
जे होतं ते फक्त तुमचा मन विचलित झाल्यामुळे मनात चालू असलेले विचार हे सबकॉन्शस होतात (जाणिवेच्या पातळीपर्यंत पोचत नाहीत.)
तुम्ही त्याकडे पाहणे सोडले कि विचार परत जाणिवेच्या पातळीवर येतातच.
यामुळेच या साधनेचा सुरुवातीला ज्यांना फायदा होतो असे जाणवते त्यांना हा फायदा काही दिवसांनी अजिबात होत नाही असे लक्षात येईल.
मनात विचार न येणे आणि मन विचलित झाल्याने विचाराची जाणीव न होणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
आणि हि गोष्ट लक्षात न घेता संक्षी यांनी एवढा मोठा जडजंबाल शब्दांचा डोलारा रचुन ठेवला आहे.
बाकी त्यांच्या इतके हुशार साधक या दुनियेत कोणीही नाही. बाकी सगळे संत महंत ओशो वगैरे भंपक आहेत
असे त्यांचे मत आहे.
25 Nov 2020 - 7:23 pm | सुबोध खरे
आपल्याला देह नाही, तर फक्त देहाची जाणीव आहे.
कशाला फोका मारताय?
देह नाही फक्त जाणीव आहे तर लांब तलवार शरीरातून आरपार जाईल त्याची तुम्हाला फक्त जाणीव होईल परिणाम काहीही होणार नाही?.
मग येणारे रक्त आणि जाणारा प्राण काय फक्त जाणीव आहे ?
29 Nov 2020 - 12:38 am | संजय क्षीरसागर
नैनं च्छिंदंती शस्राणी असं गीतेत म्हटलंय त्याचा अर्थ काय असेल ? याचा अभ्यास करा . आणि मग लेख वाचा म्हणजे लेखाचा आषय कळू शकेल.