१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता
आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !
आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !
४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.
तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !
हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.
ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________
हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.
इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.
काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन
In reply to Interesting experience by nanaba
1. I didn't feel much with this except momentary feeling of trance.That Exactly is Thoughtlessness !
2. I asked my family to try this out without telling them what to expect. Asked just to observe.That is the Way to Test Any Method Scientifically, Great !
3. Husband said he didn't feel anything.This Has Made me curious ! Please Make the Mudra exactly as shown in the Photos and Ask Him To Look Straight. If the Neck Tilts (of course to the left) the Thought Process continues.
4. Mom said "hallak pana ala".. She meant sort of nothingness.That is Exactly What Buddha Means By Shunyata : Emptiness !
6. My 7 year old told : " she felt as if she was flying without feeling d body". This was totally unexpected.Yes, Because the Entire Existence is Floating in an Infinite Emptiness. Now, Make Her a Dancer ! She Will Make Havoc ! She Will be a Dancer which the World Has Never Seen Before !
7. And i found this damn interesting so sharing hereI am Thrilled. You Stunned & Silenced Everyone Here.
In reply to Interesting experience by nanaba
In reply to नमस्कार !! by अर्धवटराव
In reply to नमस्कार !! by अर्धवटराव
In reply to @अर्धवटराव - योग्य प्रतिसाद by nanaba
In reply to तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही म्हणजे by nanaba
In reply to तिला इथे काय लिहिलय ते अर्थातच सांगितलेलं नाही म्हणजे by nanaba
In reply to @अर्धवटराव - योग्य प्रतिसाद by nanaba
१. मला स्वतः करताही - ह्याबाबतीत वेगळं असं वाटतं की संक्षि म्हणतात ते खरे असेल तरी आपली मनाची, शरीराची तयारी नसताना केवळ हॅक सापडला म्हणून एखादी गोष्ट करत राहू नये.त्याचे काय दुष्परिणाम असू शकेल ते आपल्याला माहित नाहियेआपल्या प्रतिसादातून मानवी मनाचे मनोज्ञ दर्शन घडते असे नमूद करतो. जे कष्टसाध्य ते योग्य आणि जे सहज ते टाकावू असा एक पारंपारिक गैरसमज आहे. यावरुन मुल्ला नसरुद्दिनचा एक विनोद स्मरतो, तो असा: मुल्ला रस्त्यानं लंगडत चाललेला असतो, वेदना त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत असते. मागून येणारा त्याचा मित्र ते दृश्य पाहून आपुलकीनं विचारतो "मुल्ला क्या तकलीफ़ है ?" त्यावर मुल्ला म्हणतो "तकलीफ़ कुछ भी नही बस एक जूता दस साईज का है और दुसरा आठ का" "अगर तुम्हे पता ही है तो दुकानसे ठीक साईजके जूते क्यों नही लिए ?" " ये तो मैं हमेशासे करता हूं . दुकानदार मुझे दस साईजकाही जूता देता है. लेकिन दस साईज के साथ मैं एक आठ का भी जूता खरिदता हूं और मिस-मॅच करके पहेनता हूं !" " ये तो कमाल हो गया ! इसमे क्या अक्लमंदी कै ?" "मियां, अक्लमंदीकी छोडो, घर पहुंचते ही जब जूते उतारता हूं तो जो सुकून आता है उसका मजा ही कुछ और है !" आपण जरुर कष्टसाध्य उपासना करावी पण अधूनमधून हा ज्योक ही आठवावा असे सुचवेन.
२. पण मला तिलाही न सांगता तोच अनुभव आला ह्याची मजा नक्कीच वाटली आहे.अविरत चाललेली मेंटल अॅक्टीविटी थांबणं हे मानसिक आरोग्याचं लक्षण आहे आणि त्यामुळे शारीरिक आरोग्यही उत्तम राहतं असा आमचा अनुभव आहे. हे आपणास गैर वाटत असल्यास तसे कळवावे. शिवाय पुरेशी संपन्नता आल्यावरही शांती नाही यावर ध्यान करण्याची पद्धत जगात सर्वत्र चाललेली दिसते. आपल्या कन्येला ही आनंदाचा अनुभव आला आणि आपल्याला त्याचा धसका वाटतो हे मात्र आमच्या आकलनापलिकडे आहे हे नम्रपणे नमूद करतो. प्रत्यक्ष आपणासही शांत वाटल्याचे आपण लिहिले आहे पण आपणास आता ते इतके सोपे कसे असेल याचा अचंभा वाटत आहे. त्यावर आम्ही असे नमूद करतो की आनंद आणि शांतता हे बाय डिफॉल्ट आपले स्वरुप आहे आणि स्वरुपाशी कनेक्ट होण्यात कोणताही धोका नाही. ओशोंचे आम्हास अशासाठी अप्रूप वाटले की स्वरुपोलब्धी ही सामान्यांनाही शक्य आहे; त्यासाठी सायासाची (संसार त्याग वगैरे) गरज नाही असा दावा आणि भरोसा देऊन त्यांनी प्रस्थापित आध्यात्माला शह दिला. साधरण दीड ते दोन लाख पुस्तकांचे समग्र वाचन करुन त्यांनी स्वतःच्या ध्यानप्रणाली विकसित केल्या. आम्ही ओशोंचा समग्र अभ्यास करुन एकच सोपी मेथड शोधली आहे असे (पुन्हा नम्रपणे) नमूद करतो
In reply to @ nanaba : स्वतःशी कनेक्ट होण्यात धोका तो काय ? by संजय क्षीरसागर
In reply to आपल्या निमित्तानं, ज्या सदस्याचे प्रतिसाद आपण अनुसरण्याचं by संजय क्षीरसागर
In reply to :) by nanaba
"असे बुद्ध म्हणतो " अशी पुस्ती जोडून कल्पना दिली (कारण `पुलंनी म्हटलंय' असं सांगितल्याशिवाय लोक काही ऐकायलाच तयार होत नाहीत, तीच परिस्थिती आध्यात्माची आहे).
तर सांगायचे तात्पर्य असे की ' देहात कुणीही नाही याची प्रचिती येईल' या आमच्या विधानाने त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने हे हेरले की 'आमच्या साधनेनी त्यांची मृत्यूची भीती शून्य होईल' कारण मरायला देहात कुणीच नाही; उतार वयात यापरता दिलासा तो काय ?
ते एक तर आहेच पण खरा दिलासा आम्हाला मिळाला हे इथे नम्रपणे नमूद करतो कारण आमच्या मातोश्रींनी आम्हाला दाखवून दिले की साधनेत कोणताही धोका नाही. शिवाय त्यांच्या चालण्यातही सध्या उत्साह जाणवतो, आमच्या अल्प मतीला असे वाटते की देहात कुणीही नाही या आमच्या विधानाने (साधनेमुळे यथावकाश तो त्यांचाही अनुभव होईल) त्या आनंदात असाव्यात. तरीही आनंदाचे कारण विचारुन त्याचा विरस करु नये हे एक आम्हाला बालपणी समजले होते, अर्थात तारुण्यात मात्र जगातल्या सर्व अध्यात्माचा सर्वांगिण अभ्यास केल्यावर आमच्या असे लक्षात आले की आनंद हा आपला स्वभावच आहे त्यामुळे निष्कारण आनंदात राहणे हे उचितच आहे.
In reply to @ nanaba : कुणाही व्यक्तीची अवस्था पुलंच्या बेंबट्यासारखी by संजय क्षीरसागर
In reply to @ nanaba : कुणाही व्यक्तीची अवस्था पुलंच्या बेंबट्यासारखी by संजय क्षीरसागर
In reply to :) by nanaba
In reply to याचं करण म्हणजे... by अर्धवटराव
In reply to याचं करण म्हणजे... by अर्धवटराव
मनाचं देखील तेच आहे. मन कंट्रोल्ड हवय कि मॅच्युअर्ड. मनाला गुलाम करयचय कि मित्र. मन गुलाम होणं अशक्य आहे. मन मित्र होणं हि त्याची नैसर्गीक परिपक्व अवस्था आहे.किती सुरेख वर्णन केलंय प्रगल्भतेचं. __/\__
In reply to वाह... जियो !!! by सतिश गावडे
In reply to गवि, तुम्ही संक्षीना नीट by आनन्दा
2. जे अनुभव कोणतेतरी शारीरिक बिंदू ट्रिगर होऊन मिळतात त्यांची मर्यादा इंद्रियजन्य असते, त्यामुळे ते अनुभव कालातीत नसतात.माझा हाच मुद्दा होता. जास्त टंकायचा कंटाळा असल्याने प्रतिसाद थोडक्यात आटपला होता :) तुमच्या बाकीच्या मुद्द्यांशी सहमत आहे. जमल्यास कधीतरी प्रत्यक्ष चर्चा करु. मी तुमच्या शेजारीच राहतो, मात्र अजून भेटण्याचा योग आलेला नाही. :) तुम्ही बहूतेक नजरचूकीने हा प्रतिसाद गविंना उद्देशून लिहीला आहे. गविंच्या समोर मी एक सामान्य सदस्य आहे. :)
In reply to माझा हाच मुद्दा होता by सतिश गावडे
In reply to माझा हाच मुद्दा होता by सतिश गावडे
In reply to गवि, तुम्ही संक्षीना नीट by आनन्दा
संक्षीना हाताला काहीतरी लागलेले आहे हे नक्की, पण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत असे माझे मत आहे, ते येणारा कालच ठरवेल.ह्यावर आता फिन्गर्स क्रॉस्ड म्हणायचीही सोय राहीली नाही.!
In reply to संक्षीना हाताला काहीतरी by कानडाऊ योगेशु
In reply to गवि, तुम्ही संक्षीना नीट by आनन्दा
संक्षीना हाताला काहीतरी लागलेले आहे हे नक्की,सहमत.
पण ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत असे माझे मत आहे,असहमत. हे कारण होऊ शकत नाही. तर हा कारणाचा परिणाम आहे. कारण नव्हे. कारण असे आहे की, ते जिथे पोहोचले आहेत, तो रस्त्यावरील मैलाचा दगड आहे. तो दगड सुचवतोय की रस्ता बरोबर आहे. त्याच बरोबर तो दगड असंही सुचवतोय की, रस्ता अजून संपलेला नाही. वाट अजून बरीच शिल्लक आहे. आत्ताशी फक्त चारी मुक्तिचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया झाली आहे. आता खरी वाटचाल सुरू होणार आहे. पण त्यांना वाटतंय की ते मुक्कामी पोहोचले आहेत. “देवाचिया द्वारी उभा क्षणभरी” असं जे माऊली म्हणतात, त्यातला हा जो “क्षण” आहे, तो क्षण ते अनुभवू शकले आहेत. ही खूप मोठी उपलब्धी आहे. पश्यन्तीच्या पलिकडे काहीकाळ तरी जाता येणे हे हजारोंमध्ये एकालाच जमते. कृपेशिवाय शक्य नसते. भले त्यांना त्याची जाणीव नसेल. पण जिथे धूर असतो, तिथे अग्नी नसेल असे कसे बरे होऊ शकेल? म्हणूनच त्यांच्या बाबतीत मी नेहमी संयमीत भाषेत बोलतो व लिहितो. त्यांना जो शांतीचा अनुभव आलाय, तिथूनच त्यांना पुढच्या प्रवासाची दिशा मिळो या उद्देशाने म्हणत असतो. ॐ शांती ॐ खर तर अध्यात्मिक प्रवासात कोण कुठे आहे याचे तर्क करू नये असे म्हणतात. (साधू होऊन साधू ओळखावा असं म्हणतात.) त्यांना ज्या स्थितीचा अनुभव आहे, तो मला आहे की नाही, हे मी एकदा मनोगतावर १० वर्षापूर्वी सांगितले होते. त्यावेळेस ते सांगणे ही माझी जरा चूकच झाली. पण त्याच अनुषंगाने मी आजही लिहितोय. याला कारण एकच. आनंदा तुमचे विचार. एकदम वेगळेपण लक्षात आल्याने मला राहवले नाही, आणि लेखमाला संपेपर्यंत थांबायचे विसरून गेलो. आनंदराव, तुम्हाला पुढील वाटचालीला शुभेच्छा. 🙏
In reply to संक्षीना हाताला काहीतरी by शाम भागवत
In reply to या निमित्तानं सर्वांना उपयोगी होईल असा प्रतिसाद देतो by संजय क्षीरसागर
अष्टावक्रानं स्थितीचं वर्णन यथार्थ केलंय पण ती कशी येते याची त्याला कल्पना नव्हती. आज ते रहस्य तुम्हाला उघड झालं आहे.
मी भाग दोन वर तुम्हाला विनोदी लेखक म्हटलं आहे आणि लेखाना विनोदी लेख ते उगाच नाही.
लेखनाची उबळ आली की तुम्ही इथे येऊन काही तरी लिहीता आणि वर हे ही रेमटून देता की तुम्हाला जे कळलंय ते याआधी कुठल्याच ज्ञानी पुरुषाला कळले नव्हते. आणि आता ते इथे एका लेखात प्रतिसादात खरडल्याने समस्त मानव जातीचा उद्धार होणार आहे.
असेच विनोदी लेखन अजून येऊ द्या. छान टाईमपास होतोय वाचताना.In reply to हसून हसून पूरे वाट by संगणकनंद
In reply to या निमित्तानं सर्वांना उपयोगी होईल असा प्रतिसाद देतो by संजय क्षीरसागर
अनावधानस्य सर्वत्र !हा श्लोक अठराव्या अध्यायातील आहे :
सर्वत्रानवधानस्य न किंचिद् वासना हृदि। मुक्तात्मनो वितृप्तस्य तुलना केन जायते॥१८- ८९॥बाकी ह्याचाच अलिकडेच एक भारी श्लोक आहे >>>
न शान्तं स्तौति निष्कामो न दुष्टमपि निन्दति। समदुःखसुखस्तृप्तः किंचित्कृत्यं न पश्यति॥१८- ८२॥निष्काम / सिध्द पुरुष शांत संत पुरुषांची स्तुती करत नाही कि दुष्टांची निंदा करत नाही. सुख दु:ख ह्यांना समबुध्दीने पहाणारा असा जो सिध्द पुरुष असतो त्याला काहीच कर्तव्य असे नसते ! मिपावरील एकमेव अद्वीतीय स्वयंघोषित सिध्द पुरुष ज्याप्रकारे " माझेच कसे योग्य" हे दाखवण्यासाठी प्रतिसादातुन लेखनातुन आकांडतांडव करत असताना दिसतात , प्रतिकुल प्रतिसद देणार्यांची निंदा अन खंडनमंडन करताना कालापव्यय करताना दिसतात , अख्ख्या जगाला शहाणे करुन सोडायचे कर्तव्य स्वतःच्या माथ्यावर घेऊन जिथे तिथे "मी ची लाल" करुन घेताना दिसतात , त्यावरुन त्यांच्या सिध्दत्वाविषयी शंका येते बस्स इतकेच. =))))
In reply to अनावधानस्य सर्वत्र ! by प्रसाद गोडबोले
In reply to एक शंका. by शा वि कु
In reply to सर्वत्रानवधानस्य हा दाखला by आनन्दा
In reply to संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
In reply to कशाला हवं फिजिक्स आणि संशोधन by आनन्दा
In reply to संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
१. तुम्हांस चौरंगीनाथांच्या कथेची पूर्ण माहिती नाही ?तुम्हीच दिलेल्या 'पूर्ण माहितीवर' माझा प्रतिसाद बेतला आहे ! हे आपल्या लक्षात आले नाही काय ?
२. पौर्णिमा आणि अमावास्येला उधाणाची एकाच प्रकारची भरती येते. ही न्यूटनच्या गुरुव्र्षानाच्या सिद्धांतातली धडधडीतपणे दिसणारी त्रुटी आहे.आपल्यासारख्या तर्कपुष्ट व्यक्ती कडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती. भरतीचे पाणी मच्छिंद्रनाथांच्या शिळेप्रमाणे आकाशात तरंगत राहते काय ? (गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते पुन्हा खालीच येते असा सार्वत्रिक अनुभव आहे.) तरीही तसे विलोभनीय दृष्य आपण किंवा आपल्या समर्थकांनी पाहिले असल्यास इथे मान्य होणार नाही. कृपया शास्त्रिय पुरावा म्हणून ऑथेंटिक लिंक द्यावी.
३. हा असला दावा मच्छिंद्रनाथांनी केलेला नाही. किंबहुना तुम्ही सोडल्यास इतर कुणीही केलेला नाही.आपले मच्छिंद्रनाथ सत्य चराचर व्यापून नाही असे म्हणतात का ? तसे असेल तर त्यांच्या तशा विधानाची सप्रमाण कॉपी इथे पेस्ट करावी. ४.
तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की चौरंगीनाथ राजपुत्र होता. त्याचा राजा असलेला बाप डोक्याने भडक होता. रागाच्या भरात त्याने आपल्या पोराचे हातपाय तोडून त्याला चौकात टाकला. मच्छिंद्र आणि गोरक्ष नाथांना तो हातपाय तुटलेल्या मूर्छितावस्थेत सापडला. त्यांनी त्याला राजाकडनं मागून घेतला. त्याला खांद्यावर वाहून हिमालयात आणला. नंतर त्याला गुहेत तपस्येला बसवला आणि अनुसंधानासाठी त्याच्या डोक्यावर शिळा टांगवली. प्रत्यक्षात ती शिळा मच्छिंद्रनाथांनी योगसामर्थ्याने तोलून धरली होती.हे तर आपण अफाटच लिहिले आहे. पाय तोडल्यावर चौरंगीनाथ कसे बसू शकले ? असा प्रश्न आपल्यासारख्या विचारवंताला पडू नये काय ?आणि त्याही पुढे जाऊन हात नसलेली व्यक्ती कशाच्या आधारे बसेल ? असा किमान वाजवी प्रश्न आपण स्वतःला विचारला नाहीत काय ? किंबहुना हात आणि पाय अँप्युट केलेली व्यक्ती केवळ टोरसोवर उभी राहिलेली आपण किंवा आपल्या समर्थकांनी पाहिली असल्यास इथे फोटो देणे. एखादे वेळी शिळेबरोबर चौरंगीनाथही योगसामर्थ्यानं हवेत तरंगत होते असा उल्लेख अनावधानाने ग्रंथात करायचा राहिला तर नाही ना ? याचा ही छ्डा लावावा आणि शक्य झाल्यास तशी दुरुस्ती करावी. एवढे सगळे झाल्यावर आपल्या या अभूतपूर्व प्रयोगाची सत्यता आयएमए कडून पडताळून घ्यावी आणि त्याची लिंक इथे दिली तर आम्हीही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.
५. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ स्वत:च्या योगसामर्थ्याने भक्तहृदयी विराजमान आहेत.एकदा डो़कं वापरायचंच नाही हे ठरवल्यावर हे विधान मान्य करण्यावाचून भक्तांपुढे काही पर्याय उरतो का ? या ही शक्यतेचा आपल्या (इतर वेळी सक्रीय असलेल्या) तर्कबुद्धीनं यथोचित विचार व्हावा असं नम्रपणे सुचवतो.
६. तुम्ही ज्याला अध्यात्माची वाट लावणे म्हणतात ती भोंदू लोकांनी लावून ठेवलेली आहे. प्रस्तुत उदाहरणांत भोंदूगिरी करणारा कोणीच नसल्यामुळे तुमचा हा दावा फोल आहे.टोरसो इंडीपेंडंटली बसू शकणं आणि त्याच्या डोक्यावर योग सामर्थ्यानं शिळा तरंगत ठेवणं या स्टोरीलाच भोंदूगिरी म्हणत असावेत असा एक सार्वत्रिक समज आहे. आपल्या तर्कबुद्धीला भोंदूगिरीचा काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे काय ? किंवा मराठी शब्दकोषात तसा बदल घडला आहे का ? असल्यास त्याचा पुरावा इथे सादर करावा.
७. कोण्या माणसात कसलासा न्यूनगंड उत्पन्न झाला तर मी, तुम्ही वा इतर कोणीही त्यास कारणीभूत नाही.आपण ज्या धारिष्ट्यानं चित्तचक्षू चमत्कारिक कथा भर पब्लिक फोरमवर लिहिता आहात त्यावरुन आपल्याला कोणताही न्यूनगंड नाही असे सकृत दर्शनी दिसते. पण सामान्य लोक अशा स्टोर्या वाचतांना किमान बुद्धीचा वापर करतात असे वाटते, तेंव्हा त्यांना (पुन्हा थोडी बुद्धी वापरल्यास) न्यूनगंड येत असावा असे वाटते.
८. तरंगणारी शिळा एकाच ठिकाणी स्थिर असते. याउलट बोईंग सतत पुढंपुढं सरकंत असतं. त्यामुळे या दोहोंचा एकमेकांशी काहीही संबंध नाही.प्रोपल्शन ही तरंगण्यानंतरची लगेचची पुढची पायरी आहे असा आमचा समज आहे. बोईंग नुसते हवेत तरंगण्यासाठी निर्माण झाले आहे काय ? तसे असल्यास कृपया कोणत्याही विमान कंपनीकडे चवकशी करुन इथे लेखी पुरावा सादर करावा.
९. कमी श्रमांत बोईंग हवेत उडवून दूरवर सुखरूप उतरवण्यासाठी. 'कमी' हा शब्द महत्त्वाचा.व्यक्तिगत योगसामर्थ्य लावणे हे ऑइल रिगच्या भव्य प्रोजेक्टपेक्षा कमी श्रमाचे आहे असे तार्किक अवलोकनावरुन वाटते. आपण ऑइल रिग प्रोजेक्टच्या खर्चाची आणि त्यासाठी होणार्या मानवी श्रमाची माहिती घेतली आहे काय ? शिवाय ऑइल बेसेसवर कब्जा मिळवणे या एका कारणावरुन जगात कशी युद्धे चालू आहेत याची आपल्याला कल्पना असावी. ती युद्धे हा परिश्रम नाही असे आपणास वाटत असल्यास तसे कळवावे.
१० आणि ११ठीक आहे.
१२. शिळा तरंगल्याची घटना दैववशात घडली होती. कोणी मुद्दामहून ती साधना करायला गेला नव्हता. अशा घटनेविषयी तुच्छतेने शेरेबाजी करून तुम्ही विनाकारण ज्ञाताज्ञात शत्रू निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे म्हणावंसं वाटतं की, एकवेळ शिळा तरंगवणारा सापडेल पण तुमच्या सल्ल्याने जीवन्मुक्त होणं अशक्य आहेआपण शिळा तरंगवणार्याची जरुर वाट पहावी आमच्या साधनेनं लोक मुक्त होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे जो इथे आलेल्या प्रतिसादांवरुन सिद्ध झाला आहे.
That is the Way to Test Any Method Scientifically, Great !यांस प्रयोग जरूर म्हणता येईल. परंतु हे सायंटिफिक टेस्टिंग नव्हे. अशा प्रकारच्या टेस्टिंगसाठी हायपोथिसीस लागतं, जे प्रस्तुत प्रसंगात दावेदाराने ( म्हणजे संजय क्षीरसागर यांनी) स्पष्ट केलेलं नाही. हा प्रयोग असल्याने यांत ऑब्झरवेशन व इन्फरन्स ( = निरीक्षण व अनुमान ) आहेत, पण यांत कनक्लूजन ( = निष्कर्ष ) नाही. माझं हे मत विकीवरील माहितीवर आधारित आहे : https://en.wikipedia.org/wiki/Scientific_method आ.न., -गा.पै.
In reply to हे सायंटिफिक टेस्टिंग नव्हे by गामा पैलवान
तुम्हीच दिलेल्या 'पूर्ण माहितीवर' माझा प्रतिसाद बेतला आहेही माहिती पूर्ण नाही. पूर्ण माहिती द्यायची झाली तर नवनाथ भक्तिसारातले लांबलचक अध्याय (३०, ३१, इत्यादि) लिहावे लागतील. २.
आपल्यासारख्या तर्कपुष्ट व्यक्ती कडून अशा विधानाची अपेक्षा नव्हती.का बरं? पौर्णिमेस चंद्र व सूर्य विरुद्ध बाजूस असतात. मग भरतीचे दोन फुगवटे दिसणं तार्किक आहे. पण अमावास्येला सूर्य व चंद्र एकाच बाजूला असतात. तेव्हा पृथ्वीच्या पाठीमागील बाजूस उधाणाची भरती येणं न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत बसंत नाही. फार काय, ठाण्याला खाडीच्या जवळ मासुंदा तलाव आहे. खाडीला भरती येते, पण तलावाला भरती येत नाही. ही न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमांतली खोट आहे. ३.
भरतीचे पाणी मच्छिंद्रनाथांच्या शिळेप्रमाणे आकाशात तरंगत राहते काय ? (गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार ते पुन्हा खालीच येते असा सार्वत्रिक अनुभव आहे.)हवेपेक्षा जड वस्तू हवेत उडू शकंत नाही, असा एक गैरसमज काही शतकांपूर्वी युरोपात प्रचलित होता. तशाच धर्तीचा हा बाळबोध प्रश्न आहे. ४.
तरीही तसे विलोभनीय दृष्य आपण किंवा आपल्या समर्थकांनी पाहिले असल्यास इथे मान्य होणार नाही.पण बोटांचे गोल गुंफून तत्काळ विदेहत्व प्राप्त होतं, हे मात्र इथे मान्य आहे. ५.
आपले मच्छिंद्रनाथ सत्य चराचर व्यापून नाही असे म्हणतात का ? तसे असेल तर त्यांच्या तशा विधानाची सप्रमाण कॉपी इथे पेस्ट करावी.तुमचं हे विधान पार असंबद्ध आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. ब्रह्मन् जरी एकसंध असलं तरीही वेदान्त, सिद्धान्त व धादान्त अशा तीन प्रकारच्या प्रचीती मानल्या जातात. ६.
पाय तोडल्यावर चौरंगीनाथ कसे बसू शकले ? असा प्रश्न आपल्यासारख्या विचारवंताला पडू नये काय ?गुढघ्यापासून खाली पाय नसले तरी माणसं चक्रासनावर ( = व्हीलचेअर वर) बसतातच ना? मग खाली जमिनीवर नाही का बसता येणार? ७.
आणि त्याही पुढे जाऊन हात नसलेली व्यक्ती कशाच्या आधारे बसेल ? असा किमान वाजवी प्रश्न आपण स्वतःला विचारला नाहीत काय ?बसला असेल टेकून भिंतीला. किंवा केली असेल काहीतरी व्यवस्था मच्छिंद्रनाथांनी. हा काही फार गहन प्रश्न नाही. ८.
एखादे वेळी शिळेबरोबर चौरंगीनाथही योगसामर्थ्यानं हवेत तरंगत होते असा उल्लेख अनावधानाने ग्रंथात करायचा राहिला तर नाही ना ? याचा ही छ्डा लावावा आणि शक्य झाल्यास तशी दुरुस्ती करावी.बोटांचे गोल गुंफतांना थोडी दारू ढोसून बसलेलं चालतं का, याचाही छ्डा लावावा आणि शक्य झाल्यास तशी दुरुस्ती करावी. काये की सर्व प्रक्रिया एकदम आनंदी होऊन जाईल. जणू एखादा उत्सवच. ९.
एवढे सगळे झाल्यावर आपल्या या अभूतपूर्व प्रयोगाची सत्यता आयएमए कडून पडताळून घ्यावी आणि त्याची लिंक इथे दिली तर आम्हीही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.तुम्हांस आचंबित करणे हे आमचे ध्येय नव्हे. १०.
एकदा डो़कं वापरायचंच नाही हे ठरवल्यावर हे विधान मान्य करण्यावाचून भक्तांपुढे काही पर्याय उरतो का ? या ही शक्यतेचा आपल्या (इतर वेळी सक्रीय असलेल्या) तर्कबुद्धीनं यथोचित विचार व्हावा असं नम्रपणे सुचवतो.बोटांत बोटं घालून विदेहत्व मिळवायचं ठरवलं की भक्तांपुढे काही पर्याय उरतो का ? या ही शक्यतेचा आपल्या (इतर वेळी सक्रीय असलेल्या) तर्कबुद्धीनं यथोचित विचार व्हावा असं नम्रपणे सुचवतो. ११.
टोरसो इंडीपेंडंटली बसू शकणं आणि त्याच्या डोक्यावर योग सामर्थ्यानं शिळा तरंगत ठेवणं या स्टोरीलाच भोंदूगिरी म्हणत असावेत असा एक सार्वत्रिक समज आहे.धड जमिनीवर बसल्यावर त्याला खालून आधार द्यायला मांडीची हाडं शाबूत आहेत. बाकी, बोटांचे गोल गुंफून जीवनाचा उत्सव सुरू करणे याला हातचलाखी म्हणावं की बोटचलाखी? १२.
प्रोपल्शन ही तरंगण्यानंतरची लगेचची पुढची पायरी आहे असा आमचा समज आहे.हा समज चुकीचा आहे. मोटार तरंगल्याशिवाय पुढे जाते. १३.
बोईंग नुसते हवेत तरंगण्यासाठी निर्माण झाले आहे काय ?नाही. बोईंग नुसते हवेत तरंगण्यासाठी निर्माण झालेले नाही. म्हणूनंच बोईंगची तुलना तरंगत्या शिळेशी करायची नसते. १४.
व्यक्तिगत योगसामर्थ्य लावणे हे ऑइल रिगच्या भव्य प्रोजेक्टपेक्षा कमी श्रमाचे आहे असे तार्किक अवलोकनावरुन वाटते.हा तर्क चुकीचा आहे. ऑईल रिग मध्ये व्यक्तिगत परावलंबन नसते. याउलट व्यक्तिगत योगसामर्थ्य लावल्यास प्रचंड प्रमाणावर परावलंबन निर्माण होईल. १५.
आपण ऑइल रिग प्रोजेक्टच्या खर्चाची आणि त्यासाठी होणार्या मानवी श्रमाची माहिती घेतली आहे काय ?तसंही पाहता केवळ तरंगत्या शिळेसारखं एका जागी तरंगून पुढेपुढे जाता येणार नाही. त्यामुळे पुरस्सरणार्थ इंधनाची गरज लागेलंच. ते इंधन तेल वा तत्सम पदार्थांपासून मिळवावे लागेल. त्यामुळे व्यक्तिगत योगसामर्थ्य आणि तेलविहिर यांची तुलना यथायोग्य नाही. १६.
शिवाय ऑइल बेसेसवर कब्जा मिळवणे या एका कारणावरुन जगात कशी युद्धे चालू आहेत याची आपल्याला कल्पना असावी. ती युद्धे हा परिश्रम नाही असे आपणास वाटत असल्यास तसे कळवावे.व्यक्तिगत योगसामर्थ्य वापरून युद्धे का म्हणून थांबवायची? त्यापेक्षा बोटांचे गोल गुंफून युद्ध थांबवणं फायदेशीर नाही का? १७.
आपण शिळा तरंगवणार्याची जरुर वाट पहावीअवश्य पाहीन. असेल नशिबात तर शिळा तरंगावणारा मिळेल. अन्यथा माझा मी समर्थ आहेच. तसंही पाहता तरंगत्या शिळेखालची साधना सामान्य लोकांसाठी नाहीच. ज्याअर्थी तुम्ही मला शिळा तरंगवणार्याची वाट पाहायचा सल्ला देताहात त्याअर्थी मी असामान्य आहे अशी तुमची खात्री झाली असावी. तुमच्या या दिलदारीबद्दल आभारी आहे. :-) १८.
आमच्या साधनेनं लोक मुक्त होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे जो इथे आलेल्या प्रतिसादांवरुन सिद्ध झाला आहे.सूर्य उगवला आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे. त्यासाठी आम्ही प्रतिसाद मागवीत नाही. १९.
@ गामा पैलवान : इथे हायपोथिसिसचा प्रश्नच नाही ! डायरेक्ट रिझल्ट आहेम्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नाही. २०.
.... जो वैज्ञानिक सत्याच्या तीनही निकषांवर (निर्वैयक्तिकता, स्थल-काल निरपेक्षता आणि वारंवारिता) शाबित होतो.वैज्ञानिक सत्य नामक कोणतीही चीज या जगात अस्तित्वात नाही. २१.
शिवाय तिनी कोणत्याही प्रकारे रिझल्ट मॉनिटर केला नाहीम्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नव्हे. २२.
अहो लेखाचं नांवच १. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता आहे आणखी काय असतो हायपोथेसिस ? .... हा घ्या तुमच्या लिंक मधला सायंटिफिक प्रोसेसचा नेमका उतारा ...माझ्या लिंकमधल्या उताऱ्यात hypotheses या शब्दाच्या एका उल्लेखाखाली दुवा आहे. त्यावर टिचकी मारली की हे पान उघडतं : https://en.wikipedia.org/wiki/Hypothesis या पानावर दिसतं की हायपोथिसिस सायंटिफिक म्हणून गणला जायला हवा असेल तर तो टेस्टेबल ( म्हणजे चाचणी करण्याजोगा ) असावा लागतो. मूळ वाक्य : For a hypothesis to be a scientific hypothesis, the scientific method requires that one can test it. तुमचा हायपोथिसिस सायंटिफिक म्हणवता तर मग तो टेस्टेबल आहे का? सांगोपांग चाचणी ( म्हणजे रिगरस टेस्टिंग ) करता येत नसल्यास सायंटिफिक हा शब्द वापरू नका म्हणून सुचवेन. २३.
आणि कन्क्लूजनचं काय घेऊन बसलात ? डायरेक्ट रिझल्ट तुमच्यासमोर आहे !म्हणूनंच ही विकीवरील मतानुसार सायंटिफिक मेथड नव्हे. २४.
त्यामुळे तुमच्या मुद्याला केवळ काही तरी खुसपट काढणं याव्यतिरिक्त काहीही अर्थ उरत नाही.तुमच्या जो काही हायपोथिसीस आहे त्याची सांगोपांग चाचणी दाखवा आणि सायंटिफिक म्हणवून घ्या. २५.
जितक्या नम्रपणे तुम्ही प्रतिसाद देता तितक्याच नम्रपणे सांगतो की तुमचं स्वतःचं फक्त निश्चित मत इथे मांडा. मला प्रतिसाद देतांना ( मी मागितल्याशिवाय) निष्कारण सपोर्ट लिंक्स देऊ नका.माझा युक्तिवाद ज्याच्यावर आधारित आहे त्या मजकुराचा स्रोत देणे माझ्या मते खुलेपणाचं लक्षण आहे. तुम्हांस तो वाचायचा वेळ नसेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर मी भाष्य करणं बरोबर नाही. बाकी, सपोर्ट लिंका दिल्या तर इतका तिळपापड का होतोय तुमचा? २६.
माझं इंग्रजी अतीउत्तम असलं, कोणत्याही लिंकचा मी यथोचित समाचार घेऊ शकत असलो आणि कोणत्याही फोरमवर कोणत्याही दिग्गजाशी मी इंग्रजीतून चर्चा करायला समर्थ असलो तरी अशा लिंक्स वाचायला मला वेळ नसतो !असं असेल तर मग सायंटिफिक हा शब्द वापरू नका. अन्यथा दुसरा पर्याय म्हणजे वेळात वेळ काढून सायंटिफिक प्रोसेस समजावून घेऊन त्यानुसार चाचणी करण्याजोगं हायपोथिसीस मांडणं हा आहे. आ.न., -गा.पै.
In reply to संजय क्षीरसागर यांना प्रतिसाद by गामा पैलवान
In reply to ज्यांना आम्ही प्रतिसाद देऊ इच्छित नाही आणि by संजय क्षीरसागर
In reply to संक्षि तुम्ही by शा वि कु
थोडं असं पाहा. मच्छीन्द्रनाथांचा जन्म ब्रम्हाचे वीर्य माश्याने गिळल्यामुळे झाला. वालखिल्य ऋषींची जन्मकथा तर अजून गमतीशीर. असेच कुठेकुठे ब्रम्हाचे आणि सूर्याचे इत्यादींचे वीर्य चित्रविचित्र ठिकाणी पडून अनेक ऋषीमुनींचा जन्म होतो. उदा- हत्तीच्या कानात, वाघाच्या पायावर इत्यादी.या लक्षणीय कथा सांगून एकतर आपण शरीरशास्त्राचे सर्वज्ञात आणि सर्वमान्य नियम एका क्षणात धुडकावून लावले आहेत असे आम्हास वाटते. किमान स्वतःच्या जन्माची कथा आपण ऐकली असती तर आपल्याकडून असे औधृत्य झाले नसते असे ही वाटून गेले. शिवाय शरीरशास्त्राचा अभ्यास नसलेले अशिक्षित सुद्धा, स्वानुभवाधारित असा थोडाफार विचार करु शकले तर या कथा ऐकून अचंबित होण्याची शक्यता शून्य असावी. ते एक असो, सामाजिक दृष्ट्या सुद्धा अशी इथे-तिथे सांड-लवंड बरी नव्हे, असा ही एक भाबडा विचार मनाला स्पर्शून गेला. या मानसिक धक्यातून सावरत पुढे वाचले असता थोडा दिलासा मिळाला हे मात्र नमूद करण्या जोगे आहे. २.
ह्या सगळ्या रुपककथा आहेत. शिळा उचलून धरणे सुद्धा. त्यामुळे शिळा खरोखरीच कोणी उचलून धरलेली कि नाही हा गौण मुद्दा आहे. त्यातला गर्भित अर्थ काय आहे हे एक्स्पर्ट सांगू शकतील.या प्रकारच्या कथा ग्रंथात सुरुवातीलाच उधृत केल्या आहेत असे आम्हास येथिल तर्कनिष्ठ सदस्य श्री गापै यांच्या प्रतिसादातून नुकतेच समजले. त्यामुळे शिळा तरंगवणे काय की डेड स्टेनोला हाक मारुन उठवणे काय की श्रीहरी यांना जेवू घालणे काय या कपोलकल्पित घटना आहेत असे इथले कुणीही सदस्य मानत नाहीत हे आपल्या अजून लक्षात आले नाही काय ? अन्यथा आम्हाला इतका प्रतिसाद प्रपंच का करावा लागला असता बरे ? आमच्या अल्पमती नुसार सदर कथांमागे एकच रहस्य असावे ते असे की सर्व भक्तगणांना कमालीचा इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स यावा कारण सर्वांचा जन्म नॉर्मल-कोर्समधे इंटरकोर्स होऊन झालेला असतो. मग त्यांनी त्या कथा जशाच्या तश्या पुढे सरकवाव्या आणि पुढच्यांनी त्या विचार न करता डायरेक्ट `हृदयस्थ कराव्या ' ! नाही तर या चित्त-चक्षू चमत्कारिक कथा हजारो वर्षानंतर आज २५ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या? याचा आपण विचार करावा. आणि तो विचार करुन झाल्यावर आज इथले सन्माननीय सदस्य, आमच्या एका सोप्या ध्यानपद्धतीची प्रचितीच न घेता ती परस्पर बाद ठरवून; आमच्याशी नाहक वाद घालून आम्हाला अहंकारी, अतींद्रीय शक्तींची माहिती नसलेले, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अशी दूषणे देऊन त्या कथा प्राणपणाने का जपत असावेत बरे ? याचाही मागोसा घ्यावा असे सुचवेन. याप्रकारे आपला समग्र अभ्यास झाल्यावर आमच्या दुसर्या लेखात आम्ही इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स हाच सत्योपलब्धित एकमेव अडथळा आहे असे का म्हटले असावे बरे ? हे एखादे वेळी आपल्याला उलगडण्याची शक्यता आम्हास वाटते.
In reply to @ शा वि कु : आपल्या या प्रतिसादाने आज आमची मतीच गुंग झाली आहे by संजय क्षीरसागर
In reply to @ शा वि कु : आपल्या या प्रतिसादाने आज आमची मतीच गुंग झाली आहे by संजय क्षीरसागर
कपोलकल्पित घटना आहेत असे इथले कुणीही सदस्य मानत नाहीत हे आपल्या अजून लक्षात आले नाही काय ?हो, खरंय. पण आणखी काही नवीन माहिती किंवा विधान अस्तित्वात नाही की ज्याने हे त्यांचे मत बदलेल. सो व्हाय बॉदर ? "मच्छिंद्रनाथांनी न्यूटनच्या नियमांच्या कक्षेत नसलेल्या बलांचा उपयोग केलेला असू शकतो" इथे तार्किक त्रूटी का गामांना दिसत नाही ? दिसत असावी, पण त्यांची श्रद्धा आहे. कोणत्याही युक्तिवादाने त्यात काही फरक पडणार नाही.
आज इथले सन्माननीय सदस्य, आमच्या एका सोप्या ध्यानपद्धतीची प्रचितीच न घेता ती परस्पर बाद ठरवून; आमच्याशी नाहक वाद घालून आम्हाला अहंकारी, अतींद्रीय शक्तींची माहिती नसलेले, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अशी दूषणे देऊन त्या कथा प्राणपणाने का जपत असावेत बरे ? याचाही मागोसा घ्यावा असे सुचवेन.त्यांची मर्जी.
मग त्यांनी त्या कथा जशाच्या तश्या पुढे सरकवाव्या आणि पुढच्यांनी त्या विचार न करता डायरेक्ट `हृदयस्थ कराव्या ' ! नाही तर या चित्त-चक्षू चमत्कारिक कथा हजारो वर्षानंतर आज २५ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्यापर्यंत कशा पोहोचल्या? याचा आपण विचार करावा.ह्रद्यस्त करावे किंबहुना वाचावे कि नाही हा ज्याचा त्याचा चॉईस.इतर लोक्स कथा म्हणून न वाचता इतिहास म्हणून वाचतात, आपणही तसेच वाचले पाहिजे असे नाही.
In reply to कपोलकल्पित घटना आहेत असे इथले by शा वि कु
ह्रद्यस्त करावे किंबहुना वाचावे कि नाही हा ज्याचा त्याचा चॉईस.इतर लोक्स कथा म्हणून न वाचता इतिहास म्हणून वाचतात, आपणही तसेच वाचले पाहिजे असे नाही.लोक त्या कथा इतिहास म्हणून वाचत नाहीत तर चमत्कार मानतात ! आणि अशा चमत्कारांना अतींद्रिय शक्ती वगैरे म्हणून आणखी झोल करुन ठेवतात. मग असे हातचलाखीचे खेळ करणारे लोक त्यांना सिद्ध वाटायला लागतात. कोणत्याही अडाण्याला डोक्यावर घेऊन ते नाचायला कमी करत नाहीत. ओशो हे एकमेव सिद्ध होते की ज्यांनी युगानुयुगे चाललेल्या या अनिष्ट परंपरेला छेद देऊन, मी कोणताही चमत्कार करत नाही हा एकच चमत्कार करतो ! असं म्हणायचं साहस केलं. आणि सत्योपलबद्धीचा मार्ग सूज्ञपणे विचार करणार्या सुशिक्षित आणि बुद्धीमान लोकांना मोकळा करुन दिला.
In reply to ज्यांना आम्ही प्रतिसाद देऊ इच्छित नाही आणि by संजय क्षीरसागर
आमच्या अल्पमतीने आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन असे नम्रपणे नमूद करतो
बाप रे संक्षी कडून असे अनपेक्षित शब्द जालावर उमटले? मुंगीने मेरुपर्वत गिळला की समुद्र कोरडा झाला?In reply to आमच्या अल्पमतीने by सुबोध खरे
आमच्या अल्पमतीने
आमचे मानसशास्त्राचे स्वल्प आकलन
असे नम्रपणे नमूद करतो
बाप रे संक्षी कडून असे अनपेक्षित शब्द जालावर उमटले? मुंगीने मेरुपर्वत गिळला की समुद्र कोरडा झाला?In reply to आमच्या अल्पमतीने by सुबोध खरे
In reply to लेखकाचं सुदैवच म्हणायचं... by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : आपल्या लेखमालेवर येणार्या by संजय क्षीरसागर
In reply to पुढचा भाग केव्हा येणार? by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : अष्टावक्राच्या 'अनावधानस्य सर्वत्र' यावर आपण by संजय क्षीरसागर
In reply to लेखमाला रंगतदार होऊ द्या.. by संगणकनंद
तुमच्या प्रश्नांचे म्हणाल तर अष्टवक्र वाचले/कळले म्हणजेच अध्यात्म कळले असे आहे काय?याचा अर्थ अष्टावक्राबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही असा घ्यावा की आपण त्याही पलिकडची उंची गाठली आहे ? याची नेमकी कल्पना येत नाही. सध्या पुरता तरी तुम्हाला अष्टावक्राबद्दल काहीही माहिती नाही असा तर्कपूर्ण अर्थ निघतो. पण आपण त्याही पलिकडे आहात असे आपल्या एकूण अविर्भावावरुन वाटते. तरी आपण केवळ निर्बुद्ध प्रतिसादक नसून एक पोहोचलेली व्यक्ती आहोत याची प्रचिती इथे आपले अध्यात्मिक आकलन दाखवून देऊ शकाल काय ? आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी सत्योपलब्धीसाठी नक्की कोणता मार्ग निवडावा आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगा कारण आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
In reply to @ त्याचू वैलपान : आपल्या यापूर्वीच्या प्रतिसादाने by संजय क्षीरसागर
In reply to मडके कच्चे आहे! by संगणकनंद
१. मात्र तुम्ही मला काहीच कळत नाही हे सिद्ध करायला कंबर कसली आहे ?छे, छे आपण कच्च्या मडक्याची तमा बाळगू नका. तुम्ही सर्वज्ञानी आणि अंतर्यामी आहात. अष्टावक्राची संहिता काय आहे याची सुतराम कल्पना नसतांना आपण डायरेक्ट `अनावधानस्य सर्वत्र' वर बिनदिक्कत प्रतिसाद देता हे खरे भयमुक्ततेचे लक्षण आहे हे इथे दाखवून द्याच असे सुचवेन. अर्थात, त्यासाठी तुम्हाला आपली अफाट ज्ञानक्षमता, किमान या बेसिक गोष्टींचे उत्तर देऊन करावी लागेल : आपल्या दिव्य ज्ञानानुसार साधकांनी सत्योपलब्धीसाठी नक्की कोणता मार्ग निवडावा ? आणि आपल्या मते काय साधना करावी ? तसेच आपल्या आगाध ज्ञानाने आपण, स्वतःची अशी कोणती साधना शोधली आहे ? हे मात्र आता सांगाच कारण आमची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २. इथे आपली एकही पोस्ट नाही किंवा व्यक्तिगत प्रतिसादापलिकडे काहीही वकूब दिसत नसला तरी तो आपल्या अध्यात्मिक आकलनाचा मापदंड होऊ शकत नाही हे आम्ही जाणतो. तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा एकदा अद्वितीय प्रतिसाद ! by संजय क्षीरसागर
तरी आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हे सर्वांना दाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.अध्यात्मिक जाण ही तुमच्यासाठी दाखवण्याची गोष्ट आहे, आणि ती दाखवण्याची एकही संधी तुम्ही सोडत नाही. तुम्ही ज्याला अध्यात्मिक जाण समजताय ते खरे तर पुस्तकी पांडित्य आहे. अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे, प्रदर्शन मांडण्याची नव्हे.
In reply to अध्यात्म ही अनुभवायची गोष्ट आहे, प्रदर्शन मांडण्याची नव्हे. by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : अरे व्वा ! तरीही अनाहूतपणे by संजय क्षीरसागर
In reply to काहीही हं क्ष्री... by संगणकनंद
In reply to काहीही हं क्ष्री... by संगणकनंद
उगाच मोठमोठे प्रश्न विचारुन येनकेन प्रकारेण मला काहीही येत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ?अरे, एवढ्यात आपल्या मनात दुभंग निर्माण झाला काय ? आपल्या मनात हा विचार आलाच कसा ? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. ज्याला तुम्ही कच्चे मडके ठरवले आहे त्याचे बेसिक प्रश्न आपल्यासारख्या सर्वज्ञ व्यक्तीला, अज्ञान उघडे पडण्याची भीती घालतात ? हे आम्हाला तरी शक्य वाटत नाही. किंबहुना लोकलज्जा आपल्यासारख्या पोहोचलेल्या माणसाला असायचे कारणच नाही हे आपण आपल्या प्रतिसादातून वेळोवेळी दाखवून दिले आहे. तरी आता माघार नाही असा ज्ञानी व्यक्तिसारखा निर्धार दाखवून, आपला शून्य वकूब आहे आणि पिंका टाकण्यापलिकडे आपल्याला काहीही जमत नाही असे समजणार्या लोकांना, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या ज्ञानाने दिपवून टाका.
In reply to @ त्याचू वैलपान : by संजय क्षीरसागर
आपला शून्य वकूब आहे आणि पिंका टाकण्यापलिकडे आपल्याला काहीही जमत नाही असे समजणार्या लोकांना, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन आपल्या ज्ञानाने दिपवून टाका.हे लोक म्हणजे तुम्ही आणि तुमचा चेला/डुआयडी असलेला अजून एक आयडी असे दोघेच. बरोबर ना? तुम्हा दोघाव्यतिरीक्त अजून कुणी असतील तर सांगा. :) आणि ज्ञानाने दिपवून टाकण्याच्या गोष्टी ओशोंची चार पुस्तके वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पुस्तकी पंडीत करतात. असेच लोक नुसता खळखळाट करतात. आपण किती विद्वान आणि ज्ञानी आहोत हे दाखवण्यासाठी मिसळपाववरील धाग्यांची यादी देतात.
In reply to ज्ञानाने लोकांना दिपवून टाकण्याची भाषा अज्ञानीच करु शकतो by संगणकनंद
In reply to मिपा संपादक by उन्मेष दिक्षीत
सर्कस मधला ज्योकर हा कसबी कसरतकारांपेक्षाही उच्च दर्जाचा असतो. आधीच्या कसरतवीरांनी दाखवलेलं कमालीचं कौशल्य सुद्धा किती जुजबी होतं हे तो `विडंबनात्मक शैलीनं दाखवून' लोकांना हसवतो. असे आमचे निरिक्षण आहे पण विदुषकाकडे काहीही वकूब नसतांना त्यानं विडंबनाचा प्रयत्न केला तर ते निव्वळ माकडचाळे ठरतात असे आमच्या अल्पमतीला वाटते. अर्थात, अशा माकडचाळ्यांना सुद्धा दाद देणारे लोक असतात पण त्यांचाही आकलनाचा वकूब तितकाच असतो असे नमूद करावेसे वाटते.केवळ आपल्या धाग्याचं विडंबन केले म्हणून ते माकडचाळे? आणि त्या धाग्यावर प्रतिसाद देणार्या वाचकांच्या आकलनाचा वकुबही तितकाच? जर संक्षीचा डुआयडी नसाल तर तुम्हीही विचार करा. आणि सांगा, कोण चुकतंय.
In reply to तुम्हारे गुरुवर्य करे तो चमत्कार, बाकी करे तो अत्याचार... by संगणकनंद
In reply to त्याचू by उन्मेष दिक्षीत
In reply to जसा गुरु तसा चेला by संगणकनंद
In reply to त्याचू by उन्मेष दिक्षीत
In reply to त्याचू by उन्मेष दिक्षीत
विडंबनाच्या धाग्यांचा कुणाला करमणुकीशिवाय काही उपयोग नसतो.तुमच्या गुरुजींच्या धाग्यांचाही कुणाला करमणुकीशिवाय काही उपयोग नसतो.
In reply to ज्ञानाने लोकांना दिपवून टाकण्याची भाषा अज्ञानीच करु शकतो by संगणकनंद
उगाच मोठमोठे प्रश्न विचारुन येनकेन प्रकारेण मला काहीही येत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ?उपरोक्त गैरसमज होऊ नये याची जवाबदारी मात्र आता आपल्याला घ्यावीच लागणार आहे याची कल्पना अजून आपल्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला आली नसेल असे नाही. त्यामुळे उत्तर न दिल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती आपल्यासारख्या लोकलज्जेपासून मुक्त व्यक्तीला नक्कीच वाटत नसणार असे आम्हास वाटते. आमच्या अल्पमतीनुसार इतकी बेसिक उत्तरे न देता आल्याने आपण मुळातच त्याचू आहात की काय ? अशी लोकांची संयुक्तिक खात्री पटेल अशी एक संभावना मात्र आम्हाला वाटते आणि तसे आपण कदापि होऊ देऊ नका, असे सुचवेन.
In reply to @ त्याचू वैलपान : मूळ मुद्दा लक्षात घ्या ! by संजय क्षीरसागर
In reply to बाता अध्यात्माच्या मारता... by संगणकनंद
३. उगाच मोठमोठे प्रश्न विचारुन येनकेन प्रकारेण मला काहीही येत नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात ?उपरोक्त गैरसमज होऊ नये याची जवाबदारी मात्र आता आपल्याला घ्यावीच लागणार आहे याची कल्पना अजून आपल्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला आली नसेल असे नाही. त्यामुळे उत्तर न दिल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती आपल्यासारख्या लोकलज्जेपासून मुक्त व्यक्तीला नक्कीच वाटत नसणार असे आम्हास वाटते. आमच्या अल्पमतीनुसार इतकी बेसिक उत्तरे न देता आल्याने आपण मुळातच त्याचू आहात की काय ? अशी लोकांची संयुक्तिक खात्री पटेल अशी एक संभावना मात्र आम्हाला वाटते आणि तसे आपण कदापि होऊ देऊ नका, असे सुचवेन.
In reply to @ त्याचू वैलपान : तुमचा मूळ मुद्दा हुकतोयं ! by संजय क्षीरसागर
हे मात्र आता सांगाच कारण सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.सर्वांची म्हणजे फक्त तुमची. झालंच तर तुमच्या चेल्याची. तुम्हा दोघांव्यतिरीक्त इतरांची नावे सांगा.
आपल्या अध्यात्मिक लेखनाच्या काही लिंक्स असतील तर त्या देऊन इथे आपली अध्यात्मिक जाण किती पराकोटीची आहे हेसर्वांना शब्दासाठी वरचेच स्पष्टीकरण. अध्यात्मिक जाण ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नाही हे मी याआधी दोन वेळा सांगितलं आहे. मात्र ओशोंची चार पुस्तक वाचून आपलं पुस्तकी पांडीत्य दाखवण्यालाच अध्यात्माची जाण समजणार्या आयडीला हे कदापी समजणार नाही. अशी संधी तुम्हालाच लखलाभ होवो.सर्वांनादाखवण्याची ही आपल्याला चालून आलेली एक संधीच आहे असेच समजा असे सांगेन.
उपरोक्त गैरसमज होऊ नये याची जवाबदारी मात्र आता आपल्याला घ्यावीच लागणार आहेतुम्ही सोडले तर अजून कुण्णाकुण्णाचा गैरसमज होणार नाही त्यामुळे काळजी नसावी. आणि कुणाचा गैरसमज झालाच तर मला फरक पडणार नाही.
उत्तर न दिल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भीती आपल्यासारख्या लोकलज्जेपासून मुक्त व्यक्तीला नक्कीच वाटत नसणार असे आम्हास वाटते.पितळ उघडे पडण्याची भीती तुमच्या सारख्या बेगडी अध्यात्मवाल्याना असते. एक विडंबन सहन झाले नाही, लगेच त्याला माकडचाळे म्हणून मोकळे झालात आणि तिथे प्रतिसाद देणार्या लोकांचा वकुब काढलात. खरं तर त्या प्रतिसादाने तुमच्या बेगडी अध्यात्माचाच वकुब दिसला.
आमच्या अल्पमतीनुसार इतकी बेसिक उत्तरे न देता आल्याने आपण मुळातच त्याचू आहात की काय ? अशी लोकांची संयुक्तिक खात्री पटेल अशी एक संभावना मात्र आम्हाला वाटते आणि तसे आपण कदापि होऊ देऊ नका, असे सुचवेन.लोकांमध्ये कोण कोण येतं? फक्त तुम्हीच. तुमचं तुम्ही बघा. संभावनेची भीती तुमच्यासारख्या बेगडी अध्यात्मवाल्यांना असते. एक विडंबन सहन झाले नाही आणि गप्पा मारता सिद्धत्वाच्या आणि विदेहत्वाच्या.
In reply to हे मात्र आता सांगाच कारण by संगणकनंद
सर्वांची म्हणजे फक्त तुमची. झालंच तर तुमच्या चेल्याची. तुम्हा दोघांव्यतिरीक्त इतरांची नावे सांगा.तसे समजा. पण फॉक्कन यापलिकडे आपले अध्यात्मिक ज्ञान अजिबात नाही हे आता सिद्ध झाले आहे. २.
अध्यात्मिक जाण ही प्रदर्शन करण्याची गोष्ट नाही हे मी याआधी दोन वेळा सांगितलं आहे .एकूणात आपल्याकडे काहीच नाही हे सुद्धा कळले. ३.
एक विडंबन सहन झाले नाही, लगेच त्याला माकडचाळे म्हणून मोकळे झालात आणि तिथे प्रतिसाद देणार्या लोकांचा वकुब काढलातआपल्याही प्रतिसादांची त्यापरता वेगळी स्थिती नाही.
In reply to @ त्याचू वैलपान : आपल्या अफाट ज्ञानाने आम्ही अचंबित झालो आहोत ! by संजय क्षीरसागर
In reply to मग नाचा आता :) by संगणकनंद
In reply to @ त्याचू वैलपान : स्वतःच्या अज्ञानाचा पिसारा फुलवून by संजय क्षीरसागर
In reply to संपादित by संगणकनंद
In reply to विदेहत्व आणि एफर्ट-लेसनेस by उन्मेष दिक्षीत
In reply to @ उन्मेष दिक्षीत : येस ! by संजय क्षीरसागर
असं काहीही होत नाही.
इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे. जे होतं ते फक्त तुमचा मन विचलित झाल्यामुळे मनात चालू असलेले विचार हे सबकॉन्शस होतात (जाणिवेच्या पातळीपर्यंत पोचत नाहीत.) तुम्ही त्याकडे पाहणे सोडले कि विचार परत जाणिवेच्या पातळीवर येतातच. यामुळेच या साधनेचा सुरुवातीला ज्यांना फायदा होतो असे जाणवते त्यांना हा फायदा काही दिवसांनी अजिबात होत नाही असे लक्षात येईल. मनात विचार न येणे आणि मन विचलित झाल्याने विचाराची जाणीव न होणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि हि गोष्ट लक्षात न घेता संक्षी यांनी एवढा मोठा जडजंबाल शब्दांचा डोलारा रचुन ठेवला आहे. बाकी त्यांच्या इतके हुशार साधक या दुनियेत कोणीही नाही. बाकी सगळे संत महंत ओशो वगैरे भंपक आहेतअसे त्यांचे मत आहे.
In reply to यासाठी एक अत्यंत सोपी साधना by सुबोध खरे
In reply to आपल्याला देह नाही, तर फक्त by सुबोध खरे
गम्मत आहे खरी....