दिवाळी अंक २०१४

मँगो मस्तानी

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:31 am

मँगो मस्तानी

साहित्यः
दूध ५०० मिली.
कस्टर्ड पावडर ३ मोठे चमचे (टेबलस्पून) सपाट.
साखर २ मोठे चमचे शीग लावून
मँगो आईस्क्रीम २ गोळे (स्कूप्स)
मँगो एसेन्स अर्ध बूच
पिवळा रंग ३ थेंब
लाल रंग २ थेंब

कृती:

नित्यनूतन दीपावली - भरत उपासनी

पैसा's picture
पैसा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:30 am

(श्री भरत उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री उपासनी यांना धन्यवाद!)

*****************

प्रकाश अपेक्षा
प्रकाश प्रतीक्षा
प्रकाशाची स्थिती
नित्य हवी //१//

तेजाची सत्याची
स्निग्ध मांगल्याची
निरामयतेची
दीपावली //२//

आकर्षून घेऊ
नित्य प्रकाशाला
पेशी पेशीमध्ये
दीप लावू //३//

अणु रेणु सारा
प्रकाशाने भरू
अस्तित्वाची करू
दीपावली //४//

ओळख बहारिनची

विशाखा पाटील's picture
विशाखा पाटील in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:21 am

अरबी समुद्राच्या आखाताच्या किनार्‍यावर वसलेले देश म्हणजे आखाती देश. तेलसमृद्ध, इस्लामधर्मीय आणि वाळवंट अशी या देशांची ओळख. आखाती देशांमधलाच बहारीन हा एक लहानसा देश आहे. सौदी अरेबियाच्या पश्चिमेला वसलेलं हे नगरराज्य म्हणजे लहानमोठ्या ठिपक्याएवढ्या बेटांचा समूह आहे. सर्व बेटांचं एकत्रित क्षेत्रफळ मुंबईएवढंच. 706 चौरस किलोमीटर एवढाच यातल्या छत्तीस बेटांचा विस्तार.

विचारशृंखला - संजय उपासनी

पैसा's picture
पैसा in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:21 am

(श्री संजय उपासनी सध्या मिपाचे सदस्य नसले तरी दिवाळी अंकासाठी म्हणून ही कविता आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यासाठी श्री उपासनी यांना धन्यवाद!)

*****************

* विचारशृंखला *
******************

आभाळ दाटून आल्यागत विचार दाटून आलेत.....
पाऊस पडला नाही तरी डोळे मात्र भरून आलेत....
आठवणींच्या सागरात मासे फिरू लागलेत........

ग्रंथसखा -श्याम जोशी

अजया's picture
अजया in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:18 am

लहान असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, सर्व बाजूनी पुस्तकांनी भरलेल्या घरात मी राहते आहे. अभ्यास नाही, तहान भूक नाही. फक्त पुस्तकं आणि मी. पहाटे पडलं होतं का काय माहिती नाही पण ते स्वप्न मी प्रत्यक्षात अवतीर्ण झालेलं पाहिलं, आमच्या बदलापूरच्या ग्रंथसखा ग्रंथालयात, वाचन संस्कृतीच्या माहेरी, माझ्या माहेरी, माझ्या काकामुळे .

नरकचतुर्दशी

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:14 am

दिवाळी किंवा दीपावली चे महोत्सवात रुपांतर कधी झाले कदाचित कोणीच सांगू शकणार नाही. वसुबारसेपासुन सुरु होउन भाऊबीजेला (किंवा देवदिवाळीला) संपणार्‍या या उत्सवाचे बीज कशात याचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. उत्सव फार जुना खरा. स्कंद आणि पद्म पुराणात दिवाळीचे संदर्भ सापडतात. नवरात्रातल्या अष्टमीपासुन ते आश्विनातल्या अमावस्येपर्यंत पार्वतीने शिवाची आराधना केली आणि प्रसन्न होउन शिवाने पार्वतीला स्वत:मध्ये एकरुप करुन घेतले. हाच तो अर्धनारिनटेश्वराचा अवतार. आश्विनातल्या अमावस्येला हा अवतार अस्तित्वात आला म्हणुन हा दिवाळीचा उत्सव महत्वाचा.

पाटिशप्ता

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in दिवाळी अंक
20 Oct 2014 - 8:13 am

पाटिशप्ता

बंगाली मिठाया ह्या बंगाली मुलींप्रमाणेच गोड असतात. की त्या मिठायाच लहानपणापासून खाल्ल्यामुळे बंगाली मुली एवढ्या गोड होत असतील? तात्पर्य काय, तर त्या (म्हणजे मिठाया) न आवडणारा विरळाच.

पाटिशप्ता हा असाच सणासुदीला केला जाणारा एक पारंपारिक पदार्थ. मूळ रेसिपीत गूळ-खोबर्‍याचं सारण करून ते तांदळाच्या पॅनकेकमधे भरून त्याचा रोल करतात. तसं बघायला गेलं तर हे म्हणजे आपल्या मोदकांचंच फ्लॅट व्हर्जन आहे. पण हेच जरा खालील वेगळ्या पद्धतीने केल्यावर डिश एकदम रिच झाली.